अकबरुद्दीन ओवेसी या धर्मांधाचे देशाबाहेर पलायन

सागर's picture
सागर in काथ्याकूट
6 Jan 2013 - 1:23 pm
गाभा: 

या विषयावर मिपावर चर्चा झाली आहे असे दिसले नाही म्हणून हा धागा.

अलिकडेच हैद्राबादेतील झपाट्याने वाढत असलेला व एम.आय.एम या नावाने प्रसिद्ध असलेल्या पक्षाचा नेता अकबरुद्दीन ओवेसी याने एक अतिशय प्रक्षोभक भाषण केले होते. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काणाडोळा केलेल्या मिडियाला कसे भान आले न कळे. पण त्यांनी या प्रकरणाचा गाजावाजा केला व मग या महाशयांवर केस दाखल झाली.

आपल्या भाषणात १०० कोटी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणारे हे अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या इंग्लंडमध्ये परागंदा होऊन भूमिगत झाले आहेत.

असो. धार्मिक तेढ वाढवणे हा या धाग्याचा हेतू नसून आपल्या देशात काही असामाजिक तत्वे अतिशय भयानक वेगाने वाढत आहेत हे मिपाकरांच्या वाचकांच्या ध्यानात आणून देणे हा आहे. अलिकडेच एम.आय.एम. चे अनेक नेते महाराष्ट्रात नांदेड मध्ये ही निवडून आलेले आहेत. ही साम्राज्यविस्तारवादी प्रवृत्ती लोकशाही साठी अतिशय घातक आहे. वेळीच या प्रवृत्तींवर कायमस्वरुपी उपाय केला नाही तर येत्या १० वर्षांत प्रत्येक मुस्लिमेतर नागरिकांसाठी आपल्याच देशात मुक्तपणे जगणे हे अशक्य होईल.

प्रमुख मुद्दे:
१. एकाही मुस्लिम नेत्याने अकबरुद्दीन ओवेसीच्या भाषणाचा जाहीर निषेध केलेला नाहीये. ही सर्वात भयंकर गोष्ट आहे. मुस्लिम समाजाची देशात फूट पाडणार्‍या तत्त्वांना मूक संमती असणे हे येणार्‍या अराजकतेचे मोठे लक्षण आहे.
२. आपल्या भाषणात ओवेसीने खूपच चिथावणारी वक्तव्ये केलेली आहेत, जसे रामाची आई कोठे कोठे गेली होती, गाईचे मांस खायला खूप मजा येते, अजंठा वेरुळची नागडी चित्रकला, वगैरे वगैरे.

वाचकांसाठी ओवेसीच्या या वादग्रस्त भाषणाचे युट्युबवरचे दुवे देत आहे.

भाग १:
http://www.youtube.com/watch?v=WI94cm8Zihg

भाग २:
http://www.youtube.com/watch?v=JDAtxnoWa7U

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

6 Jan 2013 - 1:45 pm | अन्या दातार

असा माणूस (?) लोकसभेवर निबडून आला आहे ही अधिक चिंताजनक गोष्ट आहे.

नांदेडीअन's picture

6 Jan 2013 - 2:01 pm | नांदेडीअन

लोकसभेत असलेला असदउद्दीन हा त्याचा मोठा भाऊ आहे.

नांदेडीअन's picture

6 Jan 2013 - 1:59 pm | नांदेडीअन

अलिकडेच हैद्राबादेतील झपाट्याने वाढत असलेला..

हैद्राबादमध्ये अगोदरच वाढ झालेली आहे या पक्षाची.
आता मराठवाड्यात झपाट्याने वाढ होत आहे. :(

या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काणाडोळा केलेल्या मिडियाला कसे भान आले न कळे.

कदाचित सोशन नेटवर्किंग वेबसाईट्समुळे.
सगळीकडे व्हायरल झाल्या होत्या या क्लिप्स.
सुदर्शन टी.व्ही.ने तर अगदी कट्टर हिंदुत्ववादी (असेलही कदाचित) चॅनल असल्यासारखे झोडपून काढले ओवैसीला.

अलिकडेच एम.आय.एम. चे अनेक नेते महाराष्ट्रात नांदेड मध्ये ही निवडून आलेले आहेत.

यामुळे एक गोष्ट फार वाईट झाली.
नांदेडीअन्सचा मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टीकोनच पार बदलून गेला आहे.

सागर's picture

6 Jan 2013 - 3:17 pm | सागर

यामुळे एक गोष्ट फार वाईट झाली.
नांदेडीअन्सचा मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टीकोनच पार बदलून गेला आहे.

एक विनंती आहे. एम.आय.एम.चा मूळ हेतू हाच आहे की फूट पाडून त्यांची शक्ती वाढवा.
नांदेडिअन्स नी आपली वर्तणूक अशी अजिबात करु नये की ज्यामुळे एम.आय.एम. ला अजूनच मदत होईल.
थोडा संयम ठेवा. अशा विघ्नसंतोषी प्रवृत्तींचा परिणाम फार काळ टिकत नाही.
इजिप्त, सिरिया, इराक, इत्यादी मुस्लिम बहुल देशांत काय झाले ते जगाने पाहिले आहे.
हिंसा हे हिंसेला उत्तर असूच शकत नाही. कारण हिंसा एकदा सुरु झाली की ती विनाश होईपर्यंत थांबत नाही.
महात्मा गांधीजींची अहिंसा सर्वसामान्यांच्या लक्षात पूर्णपणे आलेली नसली तरी लोकांच्या वागण्यात ती संस्कृती आहे. भले गांधीजींचे अनेक निर्णय आपल्याला पटत नसले तरी आपली सहिष्णुता भारतीय समाजाचे बलस्थान आहे.

महात्मा गांधीजींची अहिंसा सर्वसामान्यांच्या लक्षात पूर्णपणे आलेली नसली तरी लोकांच्या वागण्यात ती संस्कृती आहे.
गांधींजींची अंहिसेची त्तवे फारच मोठी होती. त्यांची किंमत हिंदुंना चुकवावी लागली आहे.
काही ओळी:---

Many Hindus do not know what Gandhi, the Great Soul and the Apostle of nonviolence, thought about this heinous behavior of Muslims. In the 6th July, 1926, edition of the Navajivan, Gandhi wrote: “He would kiss the feet of the (Muslim) violator of the modesty of a sister” (D Keer, Mahatma Gandhi, Popular Prakashan, p. 473). Just before the partition, when both the Hindu and Sikh women were being raped by Muslims in large numbers in West Punjab, Gandhi advised them that if a Muslim expressed his desire to rape a Hindu or a Sikh lady, she should never refuse him but cooperate with him. She should lie down like a dead with her tongue in between her teeth, advised Gandhi (Lapierre and Collins, p. 479).

संदर्भ :--- Gandhi's Mindless Appeasement of Muslims and the Partition of India

प्रचंड तापट's picture

8 Jan 2013 - 5:28 pm | प्रचंड तापट

म्हणजे आपण एम.आय.एम. चे पाठीराखे दिसता??

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Jan 2013 - 5:34 pm | श्री गावसेना प्रमुख

एम आय एम ही खास लोकांसाठी आहे ,आणी तुम्ही ज्यांना उद्देशुन बोलताहेत ते खास लोक नाहीयेत आहेत एव्हढ लक्षात ठेवा म्हणजे झाल.

सागर's picture

8 Jan 2013 - 6:45 pm | सागर

म्हणजे आपण एम.आय.एम. चे पाठीराखे दिसता??

मालक धाका कशापायी काढला अस्तां ... ऑ ?

काय बोलणार या येडझव्यांपुढे? याच्या पक्षाची वाढ मात्र अतिशय चिंताजनक आहे आणि तसेच त्याचे लोकसभा सदस्यत्वही. त्याचा पक्ष मजलिस-इत्तेहादूल मुसलमीन हे रझाकारांचे अपत्य आहे हेही जाताजाता नोंदवून ठेवतो.

खरे आहे बॅटमॅन भाऊ
अशा विघातक प्रवृत्तींची वाढ हा खरा चिंतेचा विषय आहे.
या मजलिस पक्षाचे मूळ आहे ते हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात. त्याहीवेळी भारतात हैद्राबाद संस्थान विलीन करण्याची निजामाची तयारी नव्हती. त्यावेळी ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टींना चिकटून या पक्षाची पाळेमुळे फोफावली.
प्रामाणिकपणे काम करण्यापेक्षा एम.आय.एम. ने अशा हिंसक गोष्टीं मुख्य अजेंडा म्हणून राबवल्या तर सिमीचे जे झाले तेच त्यांचेही होईल.

क्लिंटन's picture

7 Jan 2013 - 1:24 pm | क्लिंटन

+१.

भंकस बाबा's picture

12 Feb 2016 - 10:13 am | भंकस बाबा

उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व,
एमआईएम चा इतका धोका आमच्या देशभक्त पार्टीना वाटत होता तर मग भायखळासारख्या व् नांदेडसारख्या तुलनेने ओवेसीला चांगला प्रतिसाद देणाऱ्या मतदारसंघात या देशभक्तानि का युति केलि नाही. सत्तेचे लोणी खाण्यासाठी यांनी आता पाच वर्षे हे जात्यंध आमदार व् नगरसेवक उरावर बसवून घेतले. आपणच एक नाही आहोत राव! दुसर्याकडे बोट दाखवुन काय फायदा? आम्हाला येनकेन प्रकारे सत्ता पाहिजे आणि भाऊबंदकि करायला पाहिजे,मग मरा.

बॅटमॅन's picture

12 Feb 2016 - 2:37 pm | बॅटमॅन

आपणच एक नाही आहोत राव! दुसर्याकडे बोट दाखवुन काय फायदा? आम्हाला येनकेन प्रकारे सत्ता पाहिजे आणि भाऊबंदकि करायला पाहिजे,मग मरा.

तेही खरेच म्हणा.

हारुन शेख's picture

6 Jan 2013 - 2:37 pm | हारुन शेख

ओवेसींच्या भाषणाचा जाहीर निषेध.(मी एक सामान्य मुस्लिम आहे नेता वैगेरे नाही हे स्पष्ट करतो ) मुस्लिम समाजाची देशात फूट पाडणाऱ्या तत्वांना मूक संमती वैगरे काही नाहीये. ही बातमी छापून आल्याच्या दिवशीच आमच्या मित्रवर्तुळात त्यावर अगदी धागाकर्त्यासारखीच काळजी व्यक्त झाली होती. असल्या भाषणाचे निमित्त होऊन दंगल वैगेरे झाली तर सगळ्यात जास्त झळ मुस्लिमांनाच बसेल हे समजत नाही असे नाही. ओवेसीचे आक्रमक भाषण त्याआधी झालेल्या चारमिनारजवळच्या भाग्यलक्ष्मी मंदिराच्या विस्तारीकरणाला झालेल्या विरोधातून (हा वादही बाबरीच्या वळणावर जाऊ नये ही अल्लाहकडे माझी प्रार्थना ) भडकलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर झालंय. त्यामुळे ओवेसी राजकीय फायदा लाटण्याच्या दृष्टीने भावना भडकवण्यासाठी हे बोलला हे कळण्यासारखे आहे. असले राजकारण आपल्याला नवीन नाहीच ;)

सागर's picture

6 Jan 2013 - 3:09 pm | सागर

हारुनभाई

सर्वप्रथम तुमचे अभिनंदन की तुम्ही ओवेसीचा निषेध केला. तुमच्यासारखी समझदारी मुस्लिम समाजातील नेत्यांनीही दाखवायला हवी हे माझे मत आहे. ओवेसींनी ज्या प्रकारचे चिथावणीखोर भाषण केले ते पाहता त्याचा निषेध न करता शांत बसणे ही मुस्लिम नेत्यांची मूक संमतीच होते.

धार्मिक तेढ वाढवण्यात हातभार लावणारा कोणताही नेता (मग तो कोणत्याही धर्माचा असो) देशभक्त कधीही असू शकत नाही. सामोपचाराने आजपर्यंत भारतीय समाज रहात आला आहे यापुढेही राहील. पण ओवेसीसारख्या विखारी व विकृत प्रवृत्ती वाढू लागल्या तर संघर्ष हा अटळ होऊन बसतो. मुख्य भीती ही आहे की हिंदुत्त्ववाद्यांच्या मागे जाण्याची इच्छा नसूनही केवळ पर्याय नाही म्हणून सर्व मुस्लिमेतरांना अशा संघर्षात त्यांच्या बाजूने जावे लागेल. हा खरा मोठा धोका आहे आपल्या सामाजिक ऐक्यासाठी. राजकारणी नेते हे भ्रष्टच आहेत. त्यांच्या चुकांचे खापर जनतेच्या माथी या प्रकारे लादण्याची पद्धत अतिशय भयानक आहे. त्याचे परिणामही सर्वांसाठी भयानक आहेत.
ओवेसींच्या या प्रक्षोभक भाषणातही माझे लक्ष आंध्र मधील सत्तेवर असलेल्या नेत्यांनी जमीन वाटप, सदनिका वाटप यांत केलेल्या मोठ्या भ्रष्टाचारावर दुर्लक्ष झालेले नाहिये. ओवेसींनी जे आकडे दिले आहेत त्यात तत्थ्य असेलही. पण लोकांना युद्धासाठी प्रेरित करणे हा काही यावरचा मार्ग नव्हे.
तुमची प्रतिक्रिया पाहून खरोखर आनंद झाला. सामाजिक हित जपण्याचे काम आजही तुमच्यासारखे सर्व धर्मियांत मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणून आपल्या देशाचे ऐक्य आणि अस्तित्व आजही टिकून आहे.
मनापासून धन्यवाद

आशु जोग's picture

11 Jan 2013 - 12:42 am | आशु जोग

> धार्मिक तेढ वाढवण्यात हातभार लावणारा कोणताही नेता (मग तो कोणत्याही धर्माचा असो) देशभक्त कधीही असू शकत नाही

एक गोष्ट ध्यानात घ्यावी. मजहब आणि धर्म हे समानार्थी शब्द नाहीत.

धर्माला काही अध्यात्मिक अधिष्ठान असते.
धर्म समाजाची धारणा करण्यास मदत करतो.

धर्म द्विराष्ट्र सिद्धांत आणि नंतर त्या राष्ट्राचेही तुकडे करण्याचे तत्वज्ञान मांडत नाही.
धर्म पालन करणार्‍या देशातच लोकशाही नांदू शकते

धर्म ज्या देशात रहाल त्या देशाशी गद्दारी शिकवत नाही
धर्म तुम्ही रहाल त्या संस्कृतीशी एकरूप व्हायला शिकवतो
"धावते धावते गया धपकन पड्या" असली मराठी+ हिंदी बोलायाला शिकवत नाही.

अशा वेगळेपणातूनच पाकिस्तानची निर्मिती होते.
६५ वर्षापूर्वीची गोष्ट आम्ही विसरू शकत नाही.
म्हणून सावध रहायचं

रणजित चितळे's picture

12 Jan 2013 - 11:10 am | रणजित चितळे

खरे आहे.

दादा कोंडके's picture

6 Jan 2013 - 4:06 pm | दादा कोंडके

असले राजकारण आपल्याला नवीन नाहीच ;)

म्हणजे, 'हॅ, तो वेडाय. त्याच्याकडं लक्ष देउ नका' असच ना? ;)

चेतनकुलकर्णी_85's picture

6 Jan 2013 - 8:11 pm | चेतनकुलकर्णी_85

"ओवेसीचे आक्रमक भाषण त्याआधी झालेल्या चारमिनारजवळच्या भाग्यलक्ष्मी मंदिराच्या विस्तारीकरणाला झालेल्या विरोधातून (हा वादही बाबरीच्या वळणावर जाऊ नये ही अल्लाहकडे माझी प्रार्थना ) भडकलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर झालंय"

म्हणजे इथेही चुकी हि हिंदुंचीच का हो?

कसे आहे ..हे तथा कथित धर्मनिरपेक्ष मुस्लिम लोकं जेव्हा एकाकी असतात तेव्हा अगदी साळसूद असतात पण जेव्हा "त्यांच्या" समुहात येतात तेव्हा आपले खरे रंग दाखवतात !!!

श्री गावसेना प्रमुख's picture

7 Jan 2013 - 8:26 am | श्री गावसेना प्रमुख

कसे आहे ..हे तथा कथित धर्मनिरपेक्ष मुस्लिम लोकं जेव्हा एकाकी असतात तेव्हा अगदी साळसूद असतात पण जेव्हा "त्यांच्या" समुहात येतात तेव्हा आपले खरे रंग दाखवतात !!!

हे अगदी १००% खरे आहे

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2013 - 8:59 am | अत्रुप्त आत्मा

@ त्यामुळे ओवेसी राजकीय फायदा लाटण्याच्या दृष्टीने भावना भडकवण्यासाठी हे बोलला हे कळण्यासारखे आहे.>>> राजकीय फायदा?????????????????? इस्लाममध्ये राजकीय फायदा आणी धार्मिक फायदा वेगवेगळा कधि पासून झाला??? आश्चर्यजनकच वक्तव्य आहे हे... ;-)

@असले राजकारण आपल्याला नवीन नाहीच >>> अगदी अगदी.... आणी आपल्यालाही ह्या असल्या राजकारणाची परंपरा कित्ती जुनी आहे, हे माहिती असेलच. :-p

इस्लाममध्ये राजकीय फायदा आणी धार्मिक फायदा वेगवेगळा कधि पासून झाला??? आश्चर्यजनकच वक्तव्य आहे हे...
<<
इस्लामचा तुमचा अभ्यास फारच खोलवर दिसतो :) अधिक माहिती मिळेल काय?

>(हा वादही बाबरीच्या वळणावर जाऊ नये ही अल्लाहकडे माझी प्रार्थना )

हा माणूस खरोखरच शांतताप्रिय असला पाहीजे

प्रभाकर पेठकर's picture

6 Jan 2013 - 2:38 pm | प्रभाकर पेठकर

अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या इंग्लंडमध्ये परागंदा होऊन भूमिगत झाले आहेत.

चांगले आहे नं! असे एकेक करून सर्व मूर्ख भारताबाहेर जातील तो सुदिन.

शुचि's picture

6 Jan 2013 - 3:16 pm | शुचि

हाहाहा =))
हेच म्हणते. खरं तर जगाबाहेर उड्डाण केले तरी उत्तमच पण निदान भारताबाहेर जावेत.

दादा कोंडके's picture

6 Jan 2013 - 3:55 pm | दादा कोंडके

हेच म्हणते. खरं तर जगाबाहेर उड्डाण केले तरी उत्तमच पण निदान भारताबाहेर जावेत.

असं कसं? आणि अमेरिकेत आले तर?

चिंतामणी's picture

6 Jan 2013 - 3:51 pm | चिंतामणी

सगळे सेकुलर नेते कुठे आहेत आता?

आंध्रात शासन जिवंत आहे की नाही?

केंद्र सरकार काय करीत आहे??

केंद्र सरकार काय करीत आहे??

निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार ओवेसीच्या भाषणाचा अभ्यास करत आहे (ते ही त्याविरोधात तक्रार दाखल झाली म्हणून) केंद्र सरकार या प्रकरणाबाबत किती गंभीर आहे (किंवा नाही) ते येत्या काही दिवसांत कळेलच.
पण तूर्तास ते सध्या अभ्यासात गुंतले आहेत
करा बाबांनो करा... आपल्या देशाच्या समस्यांचा अभ्यास क्वचित तुम्हा लोकांना करायला आवडतो. तेव्हा या प्रकरणात काय बाहेर येते त्याकडे आमचे (म्हणजे मतदारांचे ) लक्ष आहेच.

आंध्रात वाय.एस.आर. गेल्यापासून नुसती लुटालुट चालू आहे. आणि सेक्युलर नेत्यांना नेमके काय बोलावे हे समजत नाहिये. त्यामुळे दडी मारुन बसले आहेत. :(

(न.मो.बद्दल काय आणि कसा बोलतो हे बघा. त्याला पाठिंबा देणारे चेकाळलेले देशद्रोही प्रजा बघा.)

(याला मागे कोणीतरी गोळी मारली होती.मरता मरता वाचला .)

असं कसं? आणि अमेरिकेत आले तर?

=))
असेच म्हणतो

सस्नेह's picture

6 Jan 2013 - 4:39 pm | सस्नेह

एक निरीक्षण असे. सामान्य मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठवर्गीय मुस्लिम लोक इतर धर्मियांबद्दल अशा भडक भावना बाळगताना दिसत नाहीत. बेटी नाही पण रोटी व्यवहार तर राजरोस करतात ते इतरांशी. भडकवण्याचे काम नेतेमंडळींचेच.

संजय क्षीरसागर's picture

6 Jan 2013 - 5:42 pm | संजय क्षीरसागर

संपूर्ण सहमत!

सागर's picture

6 Jan 2013 - 6:14 pm | सागर

बत्ती लावणार्‍यांपासून सावध रहा आणि दुसरे त्यात होरपळले जाणार नाहीत याकडेही बघा मित्रांनो :)

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Jan 2013 - 8:23 pm | llपुण्याचे पेशवेll

अत्यंत बालिश निरीक्षण. सामान्या कनिष्ठ बिनिष्ठ वर्गीय देखील तेवढीच तेढ बाळगून असतात फक्त प्रकटपणे व्यक्त होत नाही. बर नेते या बिच्चार्‍याना भडकावून देतात आणि हे भडकतात? काहीही.
रोटी बेटी व्यवहार हे दोन्ही चालतात. बेटी व्यवहार हिंदू मुलींशी लग्नं करण्याइतपत पाळतात. परत पुढे जाऊन लव्ह जिहाद वगैरे करणारे हे कनिष्ठ वर्गातले मुसलमानच आहेत बरे. बाकी डोळ्यावर कातडं ओढून रहायचं तर राहता येतं कायमच.
मागे एका धाग्यात एका सदस्याने लिहीलेले वाक्य कायम मनात येतं "खरी लढाई दिल्लीसाठीच आहे."

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Jan 2013 - 9:34 am | श्री गावसेना प्रमुख

त्यांनी लव जिहाद करायचा आणी आपण डोळ्यावर झापड ओढुन बसायचे,मागे औरंगाबाद्,कोल्हापुर येथे काय केले हे यांना माहीत नाही काय?
http://www.saamana.com/2012/September/02/Link/Utsav3.htm
हिंदु हा स्वताहाचा सर्वनाश असाच ओढुन घेणार हे नक्की

लव्ह जिहाद’च्या नावाखाली हिंदु मुलींना पटवण्यासाठी मुसलमान मुलाला रोज दोनशे रुपये देण्यात येतात. हिंदु मुलीला पटवल्यावर त्या मुसलमान मुलाला एक मोटरसायकल दिली जाते. तिच्याशी निकाह (लग्न) केल्यावर एक-दोन लाख रुपये दिले जातात

शेवटी एक सांगतो धुळे दंगलीत नायब तहसीलदाराच्या मुलाचा गोळीबारात मृत्यु झाला कितीही शिकले तरी घंटा फरक पडत नाही,आणी तेथील एका संघटनेचे अध्यक्ष काय म्हणतात बघा,

बळाचा अतिरेक करत पोलिसांनी गोळीबार केल्याने निरपराध पाच जणांना जीव गमवावा लागला. पोलिसांची या घटनेतील काही पावले हितास बाधा आणणारी होती. पोलिसांसह एका गटातच संघर्ष का झाला, याचे कारण शोधले जावे?, असे हिंद संघटनेचे प्रमुख हाफीज अब्दुल हक अन्सारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

चोराच्या उलट्या बोंबा

खबो जाप's picture

10 Jan 2013 - 12:32 pm | खबो जाप

नवीन बातमी https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=CeGcQkkQYKQ असेच कुणीतरी थोबंडाच्या पुस्तकावर वर टाकली आहे

खबो जाप's picture

10 Jan 2013 - 12:34 pm | खबो जाप

मयुरMK's picture

11 Feb 2016 - 7:44 pm | मयुरMK

सहमत १००%

मयुरMK's picture

11 Feb 2016 - 7:41 pm | मयुरMK

निरीक्षण -१००

विज बिलांवर हे अधीकृत छापुन आलेले आहे. इथे पहा आणि ऐका

http://www.youtube.com/watch?v=Dk4rO21DCDQ

पुन्हा एकदा प्रयत्न करतो.

हे पहा.

http://www.youtube.com/watch?v=fi1R9ohnGFQ

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Jan 2013 - 4:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळे मुस्लिम राष्ट्र्द्वेश्टे नक्किच नाहीत. पण जर का कोणी हिन्दु ना संपवाय्ची भाषा करत आसेल तर त्याला संपवाय्लाच हवा. ह्या आश्या लोकांमुळे धार्मिक तेढ वाढते. एम.आय.एम. ला सिमि चाच दर्जा द्यावा आणि बंदी घालावी.

हरुन भाईंचे म्हणणे पटले.

अशोक पतिल's picture

6 Jan 2013 - 7:45 pm | अशोक पतिल

अतिशय सहमत ! अश्या बांडगुळांचा कायमचा बंदोबंस्त व्हायलाच हवा .

जानु's picture

6 Jan 2013 - 10:02 pm | जानु

गेले ३-४ दिवस हा प्रकार देशपातळीवर चर्चला जात होता. त्यावर आवाज उठला होता. तसे पाहता त्याला व त्यासारख्यांना अशी प्रसिध्दी हवीच असते. बळी सुध्दा आयतेच उपलब्ध आहेत. त्यांचे किंवा आपले. पण सध्या सरकारला हिंदु मुस्लिम दंगल नको असावी.

चिंतामणी's picture

6 Jan 2013 - 11:27 pm | चिंतामणी

शक्यता नाकारता येत नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

7 Jan 2013 - 8:32 am | श्री गावसेना प्रमुख

म्हणजे सरकार पाहीजे तेव्हा दंगली घडवु शकते?पण का ?आत्ता कालच्याला धुळ्यात दंगल झाली अजुनही कर्फ्यु आहे तिथे,५० च्या वर पोलीस असीड हल्ल्याने जखमी आहेत. ०८ ची दंगल विसरले नाहीत ते खायचे वांधे झाले होते स्साले

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2013 - 8:54 am | अत्रुप्त आत्मा

@१. एकाही मुस्लिम नेत्याने अकबरुद्दीन ओवेसीच्या भाषणाचा जाहीर निषेध केलेला नाहीये. >>> ते करणार नाहितच... ते असो,पण जे जे मुस्लिम लोक असला माणूस इस्लामच्या विरोधी बोलत असल्याची बोंब ठोकतात,ते एखाद्या इमामातर्फे फतवा काढून त्याला गैरमुस्लिम का ठरवित नाहीत बंरं??? ओसामा बिन लादेन ला एकाही मुस्लिम समुदायानी गैर-मुस्लिम घोषित का नाही केलं??? हा खरा आमचा सवाल आहेर...
@ही सर्वात भयंकर गोष्ट आहे. मुस्लिम समाजाची देशात फूट पाडणार्‍या तत्त्वांना मूक संमती असणे हे येणार्‍या अराजकतेचे मोठे लक्षण आहे.>>> कुठल्याही समाजात अशी एखाद्या पेअश्नावर कायमस्वरुपी मूकसंमंती असत नाही,मग ती याच समाजात आणी अश्याच प्रश्नांवर विशेषत्वानी का असते??? राहाते???

जे जे मुस्लिम लोक असला माणूस इस्लामच्या विरोधी बोलत असल्याची बोंब ठोकतात,ते एखाद्या इमामातर्फे फतवा काढून त्याला गैरमुस्लिम का ठरवित नाहीत बंरं??? ओसामा बिन लादेन ला एकाही मुस्लिम समुदायानी गैर-मुस्लिम घोषित का नाही केलं??? हा खरा आमचा सवाल आहे

+++++++++++++++ १०००००००००००००००००० प्रचंड सहमत आहे मित्रा....

कापूसकोन्ड्या's picture

7 Jan 2013 - 9:59 am | कापूसकोन्ड्या

अहो ते परत आले बरं!
पळून नव्हते काय गेले. ते परत आले. त्यांच्या स्वागताची गर्दी तर पहा. याच्यात कुठे तरी "परिवाराचा" हात आहे असे मात्र म्हणू नका म्हणजे झाले.

सागर's picture

7 Jan 2013 - 1:49 pm | सागर

पळून नव्हते काय गेले. ते परत आले. त्यांच्या स्वागताची गर्दी तर पहा.

स्वागताची गर्दी नव्हती काय ती. परत त्याच्यावर कोणी गोळ्या झाडू नये म्हणून पुरवलेली ती सिक्युरिटी होती ;)

चावटमेला's picture

7 Jan 2013 - 12:23 pm | चावटमेला

ओवेसीचे आक्रमक भाषण त्याआधी झालेल्या चारमिनारजवळच्या भाग्यलक्ष्मी मंदिराच्या विस्तारीकरणाला झालेल्या विरोधातून (हा वादही बाबरीच्या वळणावर जाऊ नये ही अल्लाहकडे माझी प्रार्थना ) भडकलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर झालंय.

असं का? बरं बरं.नाहीतर गरीब गायच जणु आमचा अकबू हो. त्या खटयाळ हिंदूंनीच त्याची खोडी काढली, नाहीतर कुणाला कध्धी म्हणून कध्धी वाकडा नाही बोलायचा हो ;)

त्यावरचा गजहब, विशेषतः मोदींचे फेसबुकी फॅन आणि बहुसंख्य मिपाकर ह्यांच्या अशा विषयांबाबतच्या प्रतिक्रिया जर प्रातिनिधिक मानल्या तर ओवेसी ह्या राजकारण्यानं असं काही प्रत्युत्तर भारतासारख्या देशात सध्या बोलणं फारसं धक्कादायक नाहीच.
मात्र त्याचं ते बोलणं लावून घेणारे मिपाकर आणि फेसबुकवाले पाहून आश्चर्य वाटतय.
.
"आम्ही" त्यांना ठेचून काढू, किंवा "त्यांना घालवून द्यायला पाहिजे", "समूळ उच्चाटन वगैरे केले पाहिजे" असे विचार आणि ह्याहून अतिजहाल, भडकाउ, आक्रमक म्हणता येतील असे कित्येक गोष्टी "आमच्या" बाजूने आम्ही बोलतोच.
जर तो "त्यांच्यातलाच" आहे तर त्यानेही "याच तुम्ही, तुम्ही आम्हाला हाणाल तर आम्हीही त्याच्या कैकपट करुन दाखवू" असा टोन लावलाय. "त्यांना चिरडून टाकू" किंवा "त्यांना चिरडून टाकायला पाहिजे" हा तुमचा टोन असेल तर "त्यांनी" काय प्रतिक्रिया द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे? "या या, आम्ही पालथे पडलोत, संपवा आम्हाला" असा त्यानं cakewalk तुम्हाला ऑफर करावा का?
.
इतरवेळी ज्यांचं लेखन, प्रतिसाद मला प्रचंड आवडतं, आणि वैयक्तिक पातळीवर चांगले परिचितही आहेत असे लोकही "त्यांच्याविरुद्ध" आक्रमक प्रतिसाद देतात इथे.ते प्रतिसाद मला आवडत नाहित.
.
आता तुम्ही "त्यांना चिरडून टाकावा असं आमचं मत नाहिच", "आम्ही कध्धीच तसे बोललो नाही" वगैरे म्हणाल तर मी प्रत्येक सोडून्मागे घ्यायला तयार आहे.

त्या भाषणाची सुरुवातीची चाळिसेक मिनिटॅ मी ऐकलेली आहेत.

पिंपातला उंदीर's picture

7 Jan 2013 - 8:25 pm | पिंपातला उंदीर

प्रचंड सहमत. 'आपण' आणि 'ते' ही फाळणी इथे जाणवण्यातपत आहे.

अर्धवटराव's picture

7 Jan 2013 - 11:07 pm | अर्धवटराव

पर्फेक्ट

बाकी मी पूर्ण २ तास ते व्हीडीओ बघितले. अकबर भाई भाषण ठोकतोय कि स्टॅण्डअप कॉमेडी करतोय हेच कळेना, इतकं हसायला आलं त्या क्लिप्स बघताना. जगभरातल्या मुस्लीमांच्या समस्या मांडुन, भारतात अल्पसंख्यकांवर होणारे अत्याचार-"मोदीवीजय" चं पारायण संपवुन अकबर साहेब आपण कसे मसीहा आहोत या मूळ मुद्यावर आले आणि हे ट्रांझीशन अगदी केवीलवाणं हास्यास्पद वाटलं... कुछ जम्या नहि भाय को.
उर्दु (बहुतेक उर्दुच असावी...) भाषेत प्रभावी वगैरे भाषण करता करता साहेब अस्सल हैद्राबादी टोन वर घसरले आणि माझा हास्य कडेलोट झाला... एकदम "द अंग्रेझ"मधल्या सलीम फेकुची आठवण झाली आणि विचारावसं वाटलं... "नींद मे से आंख कब खुली बाप सलीम तेरी" =))

अर्धवटराव

प्रभावी वगैरे भाषण करता करता साहेब अस्सल हैद्राबादी टोन वर घसरले आणि माझा हास्य कडेलोट झाला... एकदम "द अंग्रेझ"मधल्या सलीम फेकुची आठवण झाली आणि विचारावसं वाटलं... "नींद मे से आंख कब खुली बाप सलीम तेरी"

+१११११११११११११११११.

मोडी, अरे कउन है मोडी, आ जाव रे तुम लोगा हैदराबादकू वगैरे सुनल्यामुळे तर हहहहहहहहपुवा झाली एकदम =))
=)) =))

अर्ध्या अरे तो ओवेसी कॉमेडी शो करतो त्याबद्दल वादच नाहिये. आणि ती मुळात आपली चिंताही नाहिये.
खरी चिंता आहे ती त्याने जी बेसूर सतार वाजवायला सुरुवात केली आहे त्या सुरात सुर मिळवणारेही वेगाने वाढत आहेत.
जंगलाचा कायदा तर माहिती आहेच ना तुला. संख्याबळ असेल तर जंगलाच्या राजालाही पळून जावे लागते. हैद्राबादेतील वा नांदेडमधील भारतीय म्हणून जगणार्‍या प्रत्येकाला या मूर्खांची झळ पोहोचू नये हा खरा मुद्दा आहे.

शासनाचा अनागोंदी कारभार, जनतेच्या ऐहिक उत्कर्षाप्रती उदासीनता, शत्रु/शेजारी राष्ट्राची कागाळी... एक ना अनेक कारणांनी शासन व्यवस्थेचा बोर्‍या वाजल्याची उदाहरणे आपण इतिहासात पावलोपावली बघतो. तेच सर्कम्स्ट्न्सेस नित्य उपद्व्याप घडवत असतात. आजची परिस्थिती देखील त्याला अपवाद कसा असेल?

ओवेसी च्या करामाती कितीही दु:खद, उपद्व्यापी असल्या तरी त्या अस्वाभावीक नाहित. आणि त्याला जबाबदार आपणच आहोत. तुमच्या-माझ्या सारखे जाणते लोक लोकशाही व्यवस्थेने बहाल केलेल्या शक्तीप्रती उदासीन आहोत. त्यामुळे एकुणच कारभारात गलथानपणा आला आहे, लोकांना उज्वल भविष्याची आशा असेल जर शासन चोख असेल तर ९९% लोक असल्या आगवाली भानगडीत पडत नाहि. उरलेल्या १% लोकांना त्यांचेच धर्मबांधव/समाजबांधव नीट समजाऊन-दटावुन कंट्रोलमध्ये ठेऊ शकतील. त्याही उपर कुणी दिवटा निपजलाच तर शसन व्यवस्था त्याचा बंदोबस्त करायला सफीशियण्ट असेल.. आणि तरिही पाणि डोक्यावरुन जायला लागलं तर पब्लीक अशा गणंगांना ठेचुन काढतील.

ओवेसी सारखे लोक मूळ समस्या नाहि... आपण त्यांना तसं करु देतो हि मूळ समस्या आहे.

अर्धवटराव

सागर's picture

8 Jan 2013 - 9:42 pm | सागर

येस्स.. एकदम पटेश.

ओवेसी सारखे लोक मूळ समस्या नाहि... आपण त्यांना तसं करु देतो हि मूळ समस्या आहे. - पूर्ण सहमत. पण येथे अजून एक मुद्दा जोडावासा वाटतो तो हा की सरकारची भूमिका अशा प्रवृत्तींना कठोर कारवाईने नियंत्रणात आणण्याबद्दल अत्यंत बोटचेपी वा उदासीन आहे. (पतपेट्यांच्या राजकारणाची लाचारी असावी. पण देशहित जिथे येते तिथे पक्षीय राजकारणाबाहेर आपले राष्ट्रीय पक्ष जाऊ शकत नाहीत हा एक दुर्दैवाचा भाग आहे. ) राजकीय पक्षांची याबद्दल सकारात्मक भूमिका दिसत नसल्यामुळे सर्वसामान्य मतदारांपुढे खेळणे बनणे हा एकच पर्याय सारखा बिंबवला जातो. त्याचा फायदा अशा लोकांना मिळतो.

अवांतरः ओवेसीची शैली आणि राज ठाकरेंची शैली यात बरेच साम्य आढळले. कौन मोदी, किधर का मोदी, हैदराबाद आओ तो बता देंगे. (लालू ला पण राज ठाकरेंनी याच शब्दांत सुनावले होते)

अर्धवटराव's picture

8 Jan 2013 - 9:57 pm | अर्धवटराव

सत्ताधार्‍याची/सत्तेची अभिलाषा करणार्‍याची भुमीका सदैव अशीच असते मित्रा. संपूर्ण जगाचा, मानवजातीचा इतिहास आणि वर्तमान याच वृत्तीने व्यापला आहे. आपले भाग्य तरी वेगळे कसे असु शकेल...

अर्धवटराव

इतिहासाचे अवलोकन करुन आपण शहाणे होत नाही ते नाहीच :(
आंधळ्यासारखे या नेत्यांच्या मागे जातो. मतांची ताकद काय असते याबाबत प्रत्येक मतदार जोपर्यंत सुज्ञ होणार नाहीत तोपर्यंत अशा भावना भडकवणार्‍यांचे दुकान जोरात चालणार यात शंकाच नाही.
क्वचित एखादे स्फुल्लिंग पेटते ज्याला रयतेच्या सुखाची आणि निर्भय आयुष्य जगण्याची काळजी असते.
असा राजा पुन्हा होणे नाही हेच खरे

सासुरवाडीकर's picture

7 Jan 2013 - 4:24 pm | सासुरवाडीकर

चे फेसबुकी फॅन आणि बहुसंख्य मिपाकर ह्यांच्या अशा विषयांबाबतच्या प्रतिक्रिया जर प्रातिनिधिकमानल्या तर ओवेसी ह्या राजकारण्यानं असं काही प्रत्युत्तर भारतासारख्या देशात सध्या बोलणं फारसं धक्कादायक नाहीच.
मात्र त्याचं ते बोलणं लावूनघेणारे मिपाकर आणि फेसबुकवाले पाहून आश्चर्य वाटतय.

100% सहमत.

जानु's picture

7 Jan 2013 - 6:01 pm | जानु

हिंदु मुस्लीम या विषयावर बोलतांना ९०% लोक हे पुर्वाग्रहाचे किंवा मागील घटनांचा किंवा अनुभवाचा आधार घेउनच चर्चा करतात. यामुळे त्याचं ते बोलणं लावून घेणारे मिपाकर आणि फेसबुकवाले लक्ष न देता सोडुन द्यावे.
तसे पाहता बर्‍याच वेळा प्रश्न पडतात......
१ . मोदींबद्दल हिंदुंमध्ये सुध्दा सॉफ्ट कॉर्नर का?
२ . अल्पसंख्यांक नसतांना सुध्दा अल्पसंख्यांक वा तत्सम ढालींचा वापर का करावा लागतो?

श्रीगुरुजी's picture

7 Jan 2013 - 10:01 pm | श्रीगुरुजी

पाकिस्तान निर्मितीत सक्रीय सहभाग असणारा "मुस्लीम लीग" हा काँग्रेसचा मित्रपक्ष आहे. तसाच "एमआयएम" हा देखील काँग्रेसचा मित्रपक्ष होता/आहे म्हणे. नक्की कोणाला माहिती आहे का? काँग्रेसची या पक्षाबरोबर मैत्री असल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

श्रीगुरुजी's picture

7 Jan 2013 - 10:10 pm | श्रीगुरुजी

नुकतेच आंतरजालावर वाचले की एमआयएम या पक्षाने गेली अनेक वर्षे काँग्रेसला केंद्रात व राज्यात पाठिंबा दिलेला होता. नुकताच त्यांनी तो पाठिंबा काढला. पण हैद्राबाद महानगरपालिकेत काँग्रेस व एमआयएमची युती अजूनही अभेद्य आहे. यावरून असं लक्षात येतंय की या अकबरूद्दीनवर कोणतीही गंभीर कारवाई होणार नाही. काही दिवसातच याविषयावरची चर्चा आपोआप थंडावेल आणि हिंदूंविरूद्ध अत्यंत प्रक्षोभक व हिडीस वक्तव्ये करूनसुद्धा याच्या केसालाही धक्का लागणार नाही.

आशु जोग's picture

7 Jan 2013 - 10:31 pm | आशु जोग

सागर
इतर लोक भाऊ आणि हारुन मात्र हारुनभाई असं का !

हा वेगळेपणा आधी तुमच्या मनातून काढून टाका

सागर's picture

7 Jan 2013 - 11:30 pm | सागर

आशु,

नोंद घेतलेली आहे. :)
कदाचित लहानपणापासूनच्या सवयीचा तो परिणाम असावा

प्रसाद गोडबोले's picture

8 Jan 2013 - 12:19 am | प्रसाद गोडबोले

तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || पांडुरंग ||

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Jan 2013 - 10:06 am | श्री गावसेना प्रमुख

सेना मनसेची मान्यता का रद्द करु नये अशी कोर्टाने विचारणा केल्याचे ऐकु आले,धन्य धर्मनिरपेक्ष भारत जय हो
सेक्युलर ओवेशीचे पायघड्या घालुन स्वागत केल्याबद्दल हैद्राबादी नागरीकांचे हार्दिक अभिनंदन

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2013 - 10:53 am | अत्रुप्त आत्मा

@सेना मनसेची मान्यता का रद्द करु नये अशी कोर्टाने विचारणा केल्याचे ऐकु आले,धन्य धर्मनिरपेक्ष भारत जय हो
सेक्युलर ओवेशीचे पायघड्या घालुन स्वागत केल्याबद्दल हैद्राबादी नागरीकांचे हार्दिक अभिनंदन>>> वर्षानुवर्षे सरकारच्या या बेशरम वृत्ती आणी चोंभाळूपणातूनच विखारि हिंदुत्वाची बीजं बाहेर पडत आहेत.

अर्धवटराव's picture

8 Jan 2013 - 11:09 am | अर्धवटराव

=)) =)) =))
जन्म-मृत्युच्या सीमीवरील अत्रुप्त जगातील आत्म्यांच्या शब्दकोषातले बाकी शब्दही येऊ देत बोर्डावर. काय लिहीता बुवा.. वाह :)

अर्धवटराव

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2013 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.............धवट.....राव....! काय अर्थ लागला हो तुंम्हाला त्या शब्दाचा. ??? ;-)

अर्धवटराव's picture

8 Jan 2013 - 11:50 pm | अर्धवटराव

जो काहि अर्थ लागला तो इथे टंकता येणार नाहि... उगा संपादक मंडळाला तसदी कशाला द्या :D

अर्धवटराव

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2013 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा

@उगा संपादक मंडळाला तसदी कशाला द्या smiley>>> =)) ब्वार, मग व्यनीत पाठवा...अर्थ/शब्दार्थ ;-)

आमच्या अगाध प्रतिभेने आम्हि अनेक अचाट चावट अर्थ काढले त्या शब्दाचे =)) ... एकाच शब्दात किती अर्क ओतला तुम्ही... कौतुक वाटले

अर्धवटराव

सागर's picture

8 Jan 2013 - 6:47 pm | सागर

संदर्भ : एबीपी माझाची बातमी
टाईम्स ऑफ इंडियाची बातमी

शेवटी सकाळच्या मेडिकल टेस्टने हे सिद्ध केलेले दिसते आहे की ओवेसी धडधाकट आहे आणि त्याने एअरपोर्टवर दिलेला मेडिकल टेस्ट चा रिपोर्ट खोटा होता... ;)

रणजित चितळे's picture

8 Jan 2013 - 8:03 pm | रणजित चितळे

सावरकरांचे सहा सोनेरी पाने परत वाचायला घेतली आहेत. व त्यात पाचव्या सोनेरी पानात ह्या मानसीकते बद्दल काय सुंदर विवेचन केले आहे. प्रत्येक भारतीयांनी ते वाचायलाच पाहिजे असे आहे.

ह्या वर एक लेख खूप पूर्वी लिहिला होता त्याची लिंक देत आहे कारण तो इंग्रजीत आहे. तो परत ब्लॉगवर देत आहे.

http://rashtravrat.blogspot.in/2013/01/the-bane-of-population.html

रणजित चितळे's picture

8 Jan 2013 - 8:03 pm | रणजित चितळे

सावरकरांचे सहा सोनेरी पाने परत वाचायला घेतली आहेत. व त्यात पाचव्या सोनेरी पानात ह्या मानसीकते बद्दल काय सुंदर विवेचन केले आहे. प्रत्येक भारतीयांनी ते वाचायलाच पाहिजे असे आहे.

ह्या वर एक लेख खूप पूर्वी लिहिला होता त्याची लिंक देत आहे कारण तो इंग्रजीत आहे. तो परत ब्लॉगवर देत आहे.

http://rashtravrat.blogspot.in/2013/01/the-bane-of-population.html

ठरलं का कुणी कोणाला संपवायचं ते, ठरलं असेल तर लिस्ट करून घ्या, संपवा लगेच,
म्हणजे आम्ही उरलेले तरी सुखानं जगू म्हणतो चार दिवस..

पैसा's picture

12 Jan 2013 - 6:12 pm | पैसा

२१ आणि २३ डिसेंबर २०१२ पण येऊन गेले.

बापू मामा's picture

14 Jan 2013 - 5:06 pm | बापू मामा

नीच उत्तर साहणॅ ! प्रत्योत्तर न देणे ! आला क्रोध सावरणे ! तो सत्वगुण !!

श्रीगुरुजी's picture

16 Jan 2013 - 8:27 pm | श्रीगुरुजी

या धर्मांध ओवेसीने अटकेत असताना आता नवीनच पवित्रा घेतलेला आहे.

http://www.thehindu.com/news/states/andhra-pradesh/owaisi-noncooperative...

ते भाषण मी केलेलेच नाही, ध्वनिफितीतला आवाज माझा नाही व या भाषणाबद्दल मला काहीही आठवत नाही असे त्याने पोलिस कस्टडीत सांगितले. त्यामुळे पुढे कोणताही तपास न करता त्याची मिळालेली पोलिस कस्टडी पोलिसांनी स्वतःहून सोडून दिली व त्याला न्यायालयीन कोठडीसाठी पुन्हा न्यायालल्याच्या ताब्यात दिले आहे.

एकंदरीत त्याला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे असं दिसतंय. काही दिवसातच तो जामिनावर सुटुन बाहेर आल्यास व नंतर हा खटला अनंत काळापर्यंत लांबणीवर पडल्यास आश्चर्य वाटणार नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Jan 2013 - 10:33 am | श्री गावसेना प्रमुख

त्याच्यावर बोलणार्या हिंदु धर्मगुरुंना तत्काळ अटक व कोठडीत रवानगी आणी हा मजा मारतोय्,जय हो.
याच्याशिवाय दुसर काय होणार होत्,बी जे पी शासीत राज्यात बोलायला हव होत याने.बाकी व्हिडीयो क्लीप हा पुरावा नाही होउ शकत का?

मोगा's picture

11 Feb 2016 - 3:04 pm | मोगा

ओवेसीच कंट्रोलमध्ये येइइना.

मग दाउद , पाकिस्तानचा बंदूबस्त कसा करणार म्हणे ?