✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अकबरुद्दीन ओवेसी या धर्मांधाचे देशाबाहेर पलायन

स
सागर यांनी
Sun, 01/06/2013 - 13:23  ·  लेख
लेख
या विषयावर मिपावर चर्चा झाली आहे असे दिसले नाही म्हणून हा धागा. अलिकडेच हैद्राबादेतील झपाट्याने वाढत असलेला व एम.आय.एम या नावाने प्रसिद्ध असलेल्या पक्षाचा नेता अकबरुद्दीन ओवेसी याने एक अतिशय प्रक्षोभक भाषण केले होते. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काणाडोळा केलेल्या मिडियाला कसे भान आले न कळे. पण त्यांनी या प्रकरणाचा गाजावाजा केला व मग या महाशयांवर केस दाखल झाली. आपल्या भाषणात १०० कोटी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणारे हे अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या इंग्लंडमध्ये परागंदा होऊन भूमिगत झाले आहेत. असो. धार्मिक तेढ वाढवणे हा या धाग्याचा हेतू नसून आपल्या देशात काही असामाजिक तत्वे अतिशय भयानक वेगाने वाढत आहेत हे मिपाकरांच्या वाचकांच्या ध्यानात आणून देणे हा आहे. अलिकडेच एम.आय.एम. चे अनेक नेते महाराष्ट्रात नांदेड मध्ये ही निवडून आलेले आहेत. ही साम्राज्यविस्तारवादी प्रवृत्ती लोकशाही साठी अतिशय घातक आहे. वेळीच या प्रवृत्तींवर कायमस्वरुपी उपाय केला नाही तर येत्या १० वर्षांत प्रत्येक मुस्लिमेतर नागरिकांसाठी आपल्याच देशात मुक्तपणे जगणे हे अशक्य होईल. प्रमुख मुद्दे: १. एकाही मुस्लिम नेत्याने अकबरुद्दीन ओवेसीच्या भाषणाचा जाहीर निषेध केलेला नाहीये. ही सर्वात भयंकर गोष्ट आहे. मुस्लिम समाजाची देशात फूट पाडणार्‍या तत्त्वांना मूक संमती असणे हे येणार्‍या अराजकतेचे मोठे लक्षण आहे. २. आपल्या भाषणात ओवेसीने खूपच चिथावणारी वक्तव्ये केलेली आहेत, जसे रामाची आई कोठे कोठे गेली होती, गाईचे मांस खायला खूप मजा येते, अजंठा वेरुळची नागडी चित्रकला, वगैरे वगैरे. वाचकांसाठी ओवेसीच्या या वादग्रस्त भाषणाचे युट्युबवरचे दुवे देत आहे. भाग १: http://www.youtube.com/watch?v=WI94cm8Zihg भाग २: http://www.youtube.com/watch?v=JDAtxnoWa7U
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24344 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

अहो ते परत आले

कापूसकोन्ड्या
Mon, 01/07/2013 - 09:59 नवीन
अहो ते परत आले बरं! पळून नव्हते काय गेले. ते परत आले. त्यांच्या स्वागताची गर्दी तर पहा. याच्यात कुठे तरी "परिवाराचा" हात आहे असे मात्र म्हणू नका म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments

स्वागत नाही...सुरक्षा

सागर
Mon, 01/07/2013 - 13:49 नवीन
पळून नव्हते काय गेले. ते परत आले. त्यांच्या स्वागताची गर्दी तर पहा. स्वागताची गर्दी नव्हती काय ती. परत त्याच्यावर कोणी गोळ्या झाडू नये म्हणून पुरवलेली ती सिक्युरिटी होती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

ओवेसीचे आक्रमक भाषण त्याआधी

चावटमेला
Mon, 01/07/2013 - 12:23 नवीन
ओवेसीचे आक्रमक भाषण त्याआधी झालेल्या चारमिनारजवळच्या भाग्यलक्ष्मी मंदिराच्या विस्तारीकरणाला झालेल्या विरोधातून (हा वादही बाबरीच्या वळणावर जाऊ नये ही अल्लाहकडे माझी प्रार्थना ) भडकलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर झालंय. असं का? बरं बरं.नाहीतर गरीब गायच जणु आमचा अकबू हो. त्या खटयाळ हिंदूंनीच त्याची खोडी काढली, नाहीतर कुणाला कध्धी म्हणून कध्धी वाकडा नाही बोलायचा हो ;)
  • Log in or register to post comments

ओवेसींचं बोलणं फारसं खटकलं नाही.

मन१
Mon, 01/07/2013 - 13:59 नवीन
त्यावरचा गजहब, विशेषतः मोदींचे फेसबुकी फॅन आणि बहुसंख्य मिपाकर ह्यांच्या अशा विषयांबाबतच्या प्रतिक्रिया जर प्रातिनिधिक मानल्या तर ओवेसी ह्या राजकारण्यानं असं काही प्रत्युत्तर भारतासारख्या देशात सध्या बोलणं फारसं धक्कादायक नाहीच. मात्र त्याचं ते बोलणं लावून घेणारे मिपाकर आणि फेसबुकवाले पाहून आश्चर्य वाटतय. . "आम्ही" त्यांना ठेचून काढू, किंवा "त्यांना घालवून द्यायला पाहिजे", "समूळ उच्चाटन वगैरे केले पाहिजे" असे विचार आणि ह्याहून अतिजहाल, भडकाउ, आक्रमक म्हणता येतील असे कित्येक गोष्टी "आमच्या" बाजूने आम्ही बोलतोच. जर तो "त्यांच्यातलाच" आहे तर त्यानेही "याच तुम्ही, तुम्ही आम्हाला हाणाल तर आम्हीही त्याच्या कैकपट करुन दाखवू" असा टोन लावलाय. "त्यांना चिरडून टाकू" किंवा "त्यांना चिरडून टाकायला पाहिजे" हा तुमचा टोन असेल तर "त्यांनी" काय प्रतिक्रिया द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे? "या या, आम्ही पालथे पडलोत, संपवा आम्हाला" असा त्यानं cakewalk तुम्हाला ऑफर करावा का? . इतरवेळी ज्यांचं लेखन, प्रतिसाद मला प्रचंड आवडतं, आणि वैयक्तिक पातळीवर चांगले परिचितही आहेत असे लोकही "त्यांच्याविरुद्ध" आक्रमक प्रतिसाद देतात इथे.ते प्रतिसाद मला आवडत नाहित. . आता तुम्ही "त्यांना चिरडून टाकावा असं आमचं मत नाहिच", "आम्ही कध्धीच तसे बोललो नाही" वगैरे म्हणाल तर मी प्रत्येक सोडून्मागे घ्यायला तयार आहे.
  • Log in or register to post comments

त्या भाषणाची सुरुवातीची चाळिसेक

मन१
Mon, 01/07/2013 - 14:00 नवीन
त्या भाषणाची सुरुवातीची चाळिसेक मिनिटॅ मी ऐकलेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

प्रचंड सहमत. 'आपण' आणि 'ते'

पिंपातला उंदीर
Mon, 01/07/2013 - 20:25 नवीन
प्रचंड सहमत. 'आपण' आणि 'ते' ही फाळणी इथे जाणवण्यातपत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

+१

अर्धवटराव
Mon, 01/07/2013 - 23:07 नवीन
पर्फेक्ट बाकी मी पूर्ण २ तास ते व्हीडीओ बघितले. अकबर भाई भाषण ठोकतोय कि स्टॅण्डअप कॉमेडी करतोय हेच कळेना, इतकं हसायला आलं त्या क्लिप्स बघताना. जगभरातल्या मुस्लीमांच्या समस्या मांडुन, भारतात अल्पसंख्यकांवर होणारे अत्याचार-"मोदीवीजय" चं पारायण संपवुन अकबर साहेब आपण कसे मसीहा आहोत या मूळ मुद्यावर आले आणि हे ट्रांझीशन अगदी केवीलवाणं हास्यास्पद वाटलं... कुछ जम्या नहि भाय को. उर्दु (बहुतेक उर्दुच असावी...) भाषेत प्रभावी वगैरे भाषण करता करता साहेब अस्सल हैद्राबादी टोन वर घसरले आणि माझा हास्य कडेलोट झाला... एकदम "द अंग्रेझ"मधल्या सलीम फेकुची आठवण झाली आणि विचारावसं वाटलं... "नींद मे से आंख कब खुली बाप सलीम तेरी" =)) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

प्रभावी वगैरे भाषण करता करता

बॅटमॅन
Tue, 01/08/2013 - 00:10 नवीन
प्रभावी वगैरे भाषण करता करता साहेब अस्सल हैद्राबादी टोन वर घसरले आणि माझा हास्य कडेलोट झाला... एकदम "द अंग्रेझ"मधल्या सलीम फेकुची आठवण झाली आणि विचारावसं वाटलं... "नींद मे से आंख कब खुली बाप सलीम तेरी"
+१११११११११११११११११. मोडी, अरे कउन है मोडी, आ जाव रे तुम लोगा हैदराबादकू वगैरे सुनल्यामुळे तर हहहहहहहहपुवा झाली एकदम =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

कॉमेडी शो बद्दल दुमत नाहीच...

सागर
Tue, 01/08/2013 - 18:44 नवीन
अर्ध्या अरे तो ओवेसी कॉमेडी शो करतो त्याबद्दल वादच नाहिये. आणि ती मुळात आपली चिंताही नाहिये. खरी चिंता आहे ती त्याने जी बेसूर सतार वाजवायला सुरुवात केली आहे त्या सुरात सुर मिळवणारेही वेगाने वाढत आहेत. जंगलाचा कायदा तर माहिती आहेच ना तुला. संख्याबळ असेल तर जंगलाच्या राजालाही पळून जावे लागते. हैद्राबादेतील वा नांदेडमधील भारतीय म्हणून जगणार्‍या प्रत्येकाला या मूर्खांची झळ पोहोचू नये हा खरा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हि झळ टाळता येणार नाहि मित्रा.

अर्धवटराव
Tue, 01/08/2013 - 21:27 नवीन
शासनाचा अनागोंदी कारभार, जनतेच्या ऐहिक उत्कर्षाप्रती उदासीनता, शत्रु/शेजारी राष्ट्राची कागाळी... एक ना अनेक कारणांनी शासन व्यवस्थेचा बोर्‍या वाजल्याची उदाहरणे आपण इतिहासात पावलोपावली बघतो. तेच सर्कम्स्ट्न्सेस नित्य उपद्व्याप घडवत असतात. आजची परिस्थिती देखील त्याला अपवाद कसा असेल? ओवेसी च्या करामाती कितीही दु:खद, उपद्व्यापी असल्या तरी त्या अस्वाभावीक नाहित. आणि त्याला जबाबदार आपणच आहोत. तुमच्या-माझ्या सारखे जाणते लोक लोकशाही व्यवस्थेने बहाल केलेल्या शक्तीप्रती उदासीन आहोत. त्यामुळे एकुणच कारभारात गलथानपणा आला आहे, लोकांना उज्वल भविष्याची आशा असेल जर शासन चोख असेल तर ९९% लोक असल्या आगवाली भानगडीत पडत नाहि. उरलेल्या १% लोकांना त्यांचेच धर्मबांधव/समाजबांधव नीट समजाऊन-दटावुन कंट्रोलमध्ये ठेऊ शकतील. त्याही उपर कुणी दिवटा निपजलाच तर शसन व्यवस्था त्याचा बंदोबस्त करायला सफीशियण्ट असेल.. आणि तरिही पाणि डोक्यावरुन जायला लागलं तर पब्लीक अशा गणंगांना ठेचुन काढतील. ओवेसी सारखे लोक मूळ समस्या नाहि... आपण त्यांना तसं करु देतो हि मूळ समस्या आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

मार्मिक प्रतिसाद

सागर
Tue, 01/08/2013 - 21:42 नवीन
येस्स.. एकदम पटेश. ओवेसी सारखे लोक मूळ समस्या नाहि... आपण त्यांना तसं करु देतो हि मूळ समस्या आहे. - पूर्ण सहमत. पण येथे अजून एक मुद्दा जोडावासा वाटतो तो हा की सरकारची भूमिका अशा प्रवृत्तींना कठोर कारवाईने नियंत्रणात आणण्याबद्दल अत्यंत बोटचेपी वा उदासीन आहे. (पतपेट्यांच्या राजकारणाची लाचारी असावी. पण देशहित जिथे येते तिथे पक्षीय राजकारणाबाहेर आपले राष्ट्रीय पक्ष जाऊ शकत नाहीत हा एक दुर्दैवाचा भाग आहे. ) राजकीय पक्षांची याबद्दल सकारात्मक भूमिका दिसत नसल्यामुळे सर्वसामान्य मतदारांपुढे खेळणे बनणे हा एकच पर्याय सारखा बिंबवला जातो. त्याचा फायदा अशा लोकांना मिळतो. अवांतरः ओवेसीची शैली आणि राज ठाकरेंची शैली यात बरेच साम्य आढळले. कौन मोदी, किधर का मोदी, हैदराबाद आओ तो बता देंगे. (लालू ला पण राज ठाकरेंनी याच शब्दांत सुनावले होते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

राजकारण्यांची भुमीका

अर्धवटराव
Tue, 01/08/2013 - 21:57 नवीन
सत्ताधार्‍याची/सत्तेची अभिलाषा करणार्‍याची भुमीका सदैव अशीच असते मित्रा. संपूर्ण जगाचा, मानवजातीचा इतिहास आणि वर्तमान याच वृत्तीने व्यापला आहे. आपले भाग्य तरी वेगळे कसे असु शकेल... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

दुर्दैवाने ते खरे आहे मित्रा

सागर
Wed, 01/09/2013 - 12:05 नवीन
इतिहासाचे अवलोकन करुन आपण शहाणे होत नाही ते नाहीच :( आंधळ्यासारखे या नेत्यांच्या मागे जातो. मतांची ताकद काय असते याबाबत प्रत्येक मतदार जोपर्यंत सुज्ञ होणार नाहीत तोपर्यंत अशा भावना भडकवणार्‍यांचे दुकान जोरात चालणार यात शंकाच नाही. क्वचित एखादे स्फुल्लिंग पेटते ज्याला रयतेच्या सुखाची आणि निर्भय आयुष्य जगण्याची काळजी असते. असा राजा पुन्हा होणे नाही हेच खरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

चे फेसबुकी फॅन आणि बहुसंख्य

सासुरवाडीकर
Mon, 01/07/2013 - 16:24 नवीन
चे फेसबुकी फॅन आणि बहुसंख्य मिपाकर ह्यांच्या अशा विषयांबाबतच्या प्रतिक्रिया जर प्रातिनिधिकमानल्या तर ओवेसी ह्या राजकारण्यानं असं काही प्रत्युत्तर भारतासारख्या देशात सध्या बोलणं फारसं धक्कादायक नाहीच. मात्र त्याचं ते बोलणं लावूनघेणारे मिपाकर आणि फेसबुकवाले पाहून आश्चर्य वाटतय. 100% सहमत.
  • Log in or register to post comments

मनातील

जानु
Mon, 01/07/2013 - 18:01 नवीन
हिंदु मुस्लीम या विषयावर बोलतांना ९०% लोक हे पुर्वाग्रहाचे किंवा मागील घटनांचा किंवा अनुभवाचा आधार घेउनच चर्चा करतात. यामुळे त्याचं ते बोलणं लावून घेणारे मिपाकर आणि फेसबुकवाले लक्ष न देता सोडुन द्यावे. तसे पाहता बर्‍याच वेळा प्रश्न पडतात...... १ . मोदींबद्दल हिंदुंमध्ये सुध्दा सॉफ्ट कॉर्नर का? २ . अल्पसंख्यांक नसतांना सुध्दा अल्पसंख्यांक वा तत्सम ढालींचा वापर का करावा लागतो?
  • Log in or register to post comments

काँग्रेसचा मित्रपक्ष ?

श्रीगुरुजी
Mon, 01/07/2013 - 22:01 नवीन
पाकिस्तान निर्मितीत सक्रीय सहभाग असणारा "मुस्लीम लीग" हा काँग्रेसचा मित्रपक्ष आहे. तसाच "एमआयएम" हा देखील काँग्रेसचा मित्रपक्ष होता/आहे म्हणे. नक्की कोणाला माहिती आहे का? काँग्रेसची या पक्षाबरोबर मैत्री असल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments

काँग्रेसचा मित्र

श्रीगुरुजी
Mon, 01/07/2013 - 22:10 नवीन
नुकतेच आंतरजालावर वाचले की एमआयएम या पक्षाने गेली अनेक वर्षे काँग्रेसला केंद्रात व राज्यात पाठिंबा दिलेला होता. नुकताच त्यांनी तो पाठिंबा काढला. पण हैद्राबाद महानगरपालिकेत काँग्रेस व एमआयएमची युती अजूनही अभेद्य आहे. यावरून असं लक्षात येतंय की या अकबरूद्दीनवर कोणतीही गंभीर कारवाई होणार नाही. काही दिवसातच याविषयावरची चर्चा आपोआप थंडावेल आणि हिंदूंविरूद्ध अत्यंत प्रक्षोभक व हिडीस वक्तव्ये करूनसुद्धा याच्या केसालाही धक्का लागणार नाही.
  • Log in or register to post comments

भाई

आशु जोग
Mon, 01/07/2013 - 22:31 नवीन
सागर इतर लोक भाऊ आणि हारुन मात्र हारुनभाई असं का ! हा वेगळेपणा आधी तुमच्या मनातून काढून टाका
  • Log in or register to post comments

मुद्दा बरोबर आहे.

सागर
Mon, 01/07/2013 - 23:30 नवीन
आशु, नोंद घेतलेली आहे. :) कदाचित लहानपणापासूनच्या सवयीचा तो परिणाम असावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

तुका म्हणे उगी रहावे | जे जे

प्रसाद गोडबोले
Tue, 01/08/2013 - 00:19 नवीन
तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || पांडुरंग ||
  • Log in or register to post comments

सेना मनसेची मान्यता का रद्द

श्री गावसेना प्रमुख
Tue, 01/08/2013 - 10:06 नवीन
सेना मनसेची मान्यता का रद्द करु नये अशी कोर्टाने विचारणा केल्याचे ऐकु आले,धन्य धर्मनिरपेक्ष भारत जय हो सेक्युलर ओवेशीचे पायघड्या घालुन स्वागत केल्याबद्दल हैद्राबादी नागरीकांचे हार्दिक अभिनंदन
  • Log in or register to post comments

@सेना मनसेची मान्यता का रद्द

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/08/2013 - 10:53 नवीन
@सेना मनसेची मान्यता का रद्द करु नये अशी कोर्टाने विचारणा केल्याचे ऐकु आले,धन्य धर्मनिरपेक्ष भारत जय हो सेक्युलर ओवेशीचे पायघड्या घालुन स्वागत केल्याबद्दल हैद्राबादी नागरीकांचे हार्दिक अभिनंदन>>> वर्षानुवर्षे सरकारच्या या बेशरम वृत्ती आणी चोंभाळूपणातूनच विखारि हिंदुत्वाची बीजं बाहेर पडत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

चोंभाळूपणातूनच

अर्धवटराव
Tue, 01/08/2013 - 11:09 नवीन
=)) =)) =)) जन्म-मृत्युच्या सीमीवरील अत्रुप्त जगातील आत्म्यांच्या शब्दकोषातले बाकी शब्दही येऊ देत बोर्डावर. काय लिहीता बुवा.. वाह :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/08/2013 - 23:31 नवीन
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.............धवट.....राव....! काय अर्थ लागला हो तुंम्हाला त्या शब्दाचा. ??? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हाहाहा

अर्धवटराव
Tue, 01/08/2013 - 23:50 नवीन
जो काहि अर्थ लागला तो इथे टंकता येणार नाहि... उगा संपादक मंडळाला तसदी कशाला द्या :D अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@उगा संपादक मंडळाला तसदी

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/08/2013 - 23:58 नवीन
@उगा संपादक मंडळाला तसदी कशाला द्या smiley>>> =)) ब्वार, मग व्यनीत पाठवा...अर्थ/शब्दार्थ ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आता किती शब्दार्थ पठवावे बुवा तुम्हाला

अर्धवटराव
Wed, 01/09/2013 - 00:54 नवीन
आमच्या अगाध प्रतिभेने आम्हि अनेक अचाट चावट अर्थ काढले त्या शब्दाचे =)) ... एकाच शब्दात किती अर्क ओतला तुम्ही... कौतुक वाटले अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अकबर ओवेसीला अटक

सागर
Tue, 01/08/2013 - 18:47 नवीन
संदर्भ : एबीपी माझाची बातमी टाईम्स ऑफ इंडियाची बातमी शेवटी सकाळच्या मेडिकल टेस्टने हे सिद्ध केलेले दिसते आहे की ओवेसी धडधाकट आहे आणि त्याने एअरपोर्टवर दिलेला मेडिकल टेस्ट चा रिपोर्ट खोटा होता... ;)
  • Log in or register to post comments

हल्लीच मी

रणजित चितळे
Tue, 01/08/2013 - 20:03 नवीन
सावरकरांचे सहा सोनेरी पाने परत वाचायला घेतली आहेत. व त्यात पाचव्या सोनेरी पानात ह्या मानसीकते बद्दल काय सुंदर विवेचन केले आहे. प्रत्येक भारतीयांनी ते वाचायलाच पाहिजे असे आहे. ह्या वर एक लेख खूप पूर्वी लिहिला होता त्याची लिंक देत आहे कारण तो इंग्रजीत आहे. तो परत ब्लॉगवर देत आहे. http://rashtravrat.blogspot.in/2013/01/the-bane-of-population.html
  • Log in or register to post comments

हल्लीच मी

रणजित चितळे
Tue, 01/08/2013 - 20:03 नवीन
सावरकरांचे सहा सोनेरी पाने परत वाचायला घेतली आहेत. व त्यात पाचव्या सोनेरी पानात ह्या मानसीकते बद्दल काय सुंदर विवेचन केले आहे. प्रत्येक भारतीयांनी ते वाचायलाच पाहिजे असे आहे. ह्या वर एक लेख खूप पूर्वी लिहिला होता त्याची लिंक देत आहे कारण तो इंग्रजीत आहे. तो परत ब्लॉगवर देत आहे. http://rashtravrat.blogspot.in/2013/01/the-bane-of-population.html
  • Log in or register to post comments

ठरलं का कुणी कोणाला संपवायचं

अर्धवट
Sat, 01/12/2013 - 11:41 नवीन
ठरलं का कुणी कोणाला संपवायचं ते, ठरलं असेल तर लिस्ट करून घ्या, संपवा लगेच, म्हणजे आम्ही उरलेले तरी सुखानं जगू म्हणतो चार दिवस..
  • Log in or register to post comments

हौ.

पैसा
Sat, 01/12/2013 - 18:12 नवीन
२१ आणि २३ डिसेंबर २०१२ पण येऊन गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

नीच उत्तर साहणॅ ! प्रत्योत्तर

बापू मामा
Mon, 01/14/2013 - 17:06 नवीन
नीच उत्तर साहणॅ ! प्रत्योत्तर न देणे ! आला क्रोध सावरणे ! तो सत्वगुण !!
  • Log in or register to post comments

ओवेसी सुटणार

श्रीगुरुजी
Wed, 01/16/2013 - 20:27 नवीन
या धर्मांध ओवेसीने अटकेत असताना आता नवीनच पवित्रा घेतलेला आहे. http://www.thehindu.com/news/states/andhra-pradesh/owaisi-noncooperative-sent-back-to-judicial-custody/article4311751.ece ते भाषण मी केलेलेच नाही, ध्वनिफितीतला आवाज माझा नाही व या भाषणाबद्दल मला काहीही आठवत नाही असे त्याने पोलिस कस्टडीत सांगितले. त्यामुळे पुढे कोणताही तपास न करता त्याची मिळालेली पोलिस कस्टडी पोलिसांनी स्वतःहून सोडून दिली व त्याला न्यायालयीन कोठडीसाठी पुन्हा न्यायालल्याच्या ताब्यात दिले आहे. एकंदरीत त्याला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे असं दिसतंय. काही दिवसातच तो जामिनावर सुटुन बाहेर आल्यास व नंतर हा खटला अनंत काळापर्यंत लांबणीवर पडल्यास आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments

त्याच्यावर बोलणार्या हिंदु

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 01/17/2013 - 10:33 नवीन
त्याच्यावर बोलणार्या हिंदु धर्मगुरुंना तत्काळ अटक व कोठडीत रवानगी आणी हा मजा मारतोय्,जय हो. याच्याशिवाय दुसर काय होणार होत्,बी जे पी शासीत राज्यात बोलायला हव होत याने.बाकी व्हिडीयो क्लीप हा पुरावा नाही होउ शकत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

. अगागागा

मोगा
गुरुवार, 02/11/2016 - 15:04 नवीन
ओवेसीच कंट्रोलमध्ये येइइना. मग दाउद , पाकिस्तानचा बंदूबस्त कसा करणार म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा