आज सकाळी ११ वाजता सिंहगड रस्त्यावर (नरवीर तानाजी मार्ग) 'अभिरुची बागेत' भेटायचे ठरले होते. धमाल्याचा तसा ऑफिशियल फोनच आला होता. मी तर जाम उत्सुक होतो. ठीक ११ वाजता 'अभिरूची'ला धडकलो. सामसूम. ठार शांतता. ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी जाणं आणि इतर सदस्य न आल्याने अर्धा-एक तास लटकणे हे नेहमीचेच. माझे आणि बायकोचे ह्यावरून अनेकदा 'सुखसंवाद' झाले आहेत. (म्हणजे 'सुख' तीला मिळते, मी नुसता वादाचा धनी). तर तिथे कोणीही (मिपाकर) न आल्याने वातावरण तापू लागले होतेच. तेवढ्यात एक जण कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसला/ऐकला. 'हॅलो! अरे मी मनोबा बोलतोय्... हो मी पोहोचलोय्....बरं! बरं...' फोन बंद. हा मनोबा म्हणजे मिपावरील मनोबा तर नाही? मी विचार करत होतो. मीही धमाल्याला फोन लावला, 'अरे काय आहात कुठे? आम्ही पोहोचलोय अभिरुचीला.' हो.. हो .. काका मी निघतोच आहे. तिथे शेखर आलाय का?' 'कोणीही आलेले नाही' मी अम्मळ रागावून. 'येईलच काका तो एवढ्यात, मीही निघतोच आहे.' म्हणजे हा गधडा आत्ता घरून निघतोय. च्यायला ताप आहे. तेवढ्यात तो मनोबा की कोण माझ्या दिशेने आला. स्वतःची ओळख करून दिली. मीही माझी ओळख करून दिली. आमच्या गप्पा सुरू झाल्या. पुणेकर, मुंबईकर, भारतीय राजकारण, इंटरनॅशनल राजकारण आणि काय काय बोललो. सगळे विषय संपले पण कोणी आले नाही. अर्थात त्यामुळे न आलेल्यांचा उद्धार सुरू झाला. (माझ्याकडून हं! मनोबा बिचारा गुणी आहे). तेवढ्यात शेखर आला. बरोबर विनायक पण होता. तसे आम्ही पुढे झालो. एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. येणार्यांसाठी ताटकळत न बसता आपण आपले आत (बागेत) सरकू असा ठराव उभ्या-उभ्या पास केला आणि आम्ही 'अभिरूचीत' दाखल झालो.
नंतर 'छत्रपती' आले, यमी आणि अभीर आले. आनंदयात्री, श्री व सौ धमाल आले. (धमाल्याची पँट मस्त होती बुवा, आवडली आपल्याला). स्वाती राजेश, इनोबा, प्रकाश घाटपांडे वगैरे सर्व जमले. थोडे उशीरा आले पण विजूभाऊसुद्धा पोहोचले. सुरुवातीला आम्ही जवळच्याच खाटल्यांवर बैठका मारून निवांत गप्पा मारल्या. नविन आलेल्यांना आधी ओळख पाहू कोण कोण, कोण कोण आहेत ते असे सांगून आमची स्वतःचीच करमणूक करून घेतली. अशी थोडीफार मजा मजा केल्यावर चहाची तल्लफ आली . (ती दर तासातासाला येतेच म्हणा). पण त्या कित्येक एकराच्या बागेत चहा मिळत नाही ही आमच्या ज्ञानात भर पडली. पुन्हा कधी तिथे गेलात तर सोबत चहाचा थर्मास (भरलेला) घेऊन जा, नाहीतर पंचाईत होईल. शेवटी आंद्याने, धमाल्याने तिथल्या स्वयंपाक घरात कोणाच्या तरी हातापाया पडून १४ कप चहा मिळवला. देव त्यांचे भले करो.(नाही केले तर सांगा मला, बघतोच मी त्याच्याकडे. {आणखिन काय करू शकणार मी पामर}) असो.
पुढचा कार्यक्रम 'कठपुतळी नाच.' अर्थात लग्नानंतर मला तरी त्यात काही नाविन्य राहीले नव्हते. पण अविवाहितांना त्यातही गंमत वाटते. त्या पुतळ्यांचे दु:ख त्यांना काय ठावे? असो. कार्यक्रम तसा विनामुल्य होता, मजा आली. राजस्थानी नर्तकी चमेलीबाई आपला घागरा वर करून (मर्यादीत स्वरूपात) नाचून गेली, पाठोपाठ हृतिक रोषन आपल्या धडावर हलक्या हाताने बसविलेली मान दोन्ही हातांनी (प्रसंगी पायांनीही) धडापासून २ फूट वर उचलून दाखवून गेला. समाजात मान उंचावणे म्हणजे काय मला आज कळले. नंतर चक्रम घोडेस्वार आला. कधी तो घोड्यावर बसून उड्यामारायचा कधी घोडा त्याच्या पाठीवर बसून उड्या मारायचा. तसेच त्या गारूड्याचे. एनिवेऽऽऽ काहितरी टाईमपास हवाच होता. कठपुतळीचा खेळ संपल्यावर आम्ही जादूचे प्रयोग करणार्याकडे वळलो. थोडेफार (चांगले) हातचलाखीचे प्रयोग आणि ढेरसारी बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड बडबड ऐकून घ्यावी लागली. असो.
एवढे सर्व होई पर्यंत २ वाजत आलेच होते. त्यामुळे भरलेले पैसे वस्स्स्सूल करण्याच्या विचाराने मुख्य कार्यक्रमाकडे वळलो. भोजन.
आंबेहळदीचे लोणचे, वाळवून तळलेल्या तुरीच्या शेंगा (मला वाटतं त्या गवारीच्या होत्या), भजी, तळलेल्या पापड-पापड्या, भाकरी, पिठलं (सपक होतं सालं. एखादी हिरवी मिरची हवी होती. नाही मिळाली.),अळूचे फदफदे (वा..वा..वा माझ्यासारख्या भटांसाठी पक्वान्न), शेवयांची भाजी, कढी, कोशिंबीर, खीर, श्रीखंड आणि मसालेभात सदृश काही पदार्थ होता. जेवण चांगलं होतं.
जेवणानंतर यमी, अभीर, स्वाती इत्यादींनी रजा घेतली. आणि विजूभाऊंनी बासरी काढली. त्या वनात, थंड वातावरणात विजूभाऊंनी बासरी वादनाचा एक तुकडा पेश केला.
बासरीवादनानंतर डॉक्टर दाढेंच्या चेहर्यावरील प्रसन्न हास्य म्हणजे बासरीवादन सुश्राव्य होते ह्याची पावतीच.
सखाराम गटणे आणि कोण बरे? ओळख करून घ्यायची राहूनच गेली.
ढँण्टडँण.. ओळखा पाहू?..... नाही न ओळखलेत?.....प्रकाश घाटपांडे.
विजूभाऊ.. बासरी वादनाचा कार्यक्रम छान झाल्याचे लगेच 'घरी' कळवून टाकले. पाहा..पाहा... चेहर्यावरचे ते प्रसन्न हास्य पहा...
'हे काय चाललय काय मिपावर? पुणेकर - मुंबईकर - नागपुरकर? असच चालणार असेल तर कशाला यायचं मिपावर?'
डॉ. दाढे. ह्याला म्हणतात मुत्सदीपणा. वादावादीत भाग नाही घ्यायचा. दूर उभं राहून मंद हास्य फेकायचे.
स्वराज्याचा उपभोग घेताना 'छत्रपती'.
इनोबा आणि छोटा डॉन ह्यांनी दोन बाजूंनी आवर घातल्यामुळे (मधला) 'चित्त' थार्यावर आहे.
'धमाल्या, अरे! संयोजन केले म्हणून इतके हसायचे?
बागेत 'बस स्टॉप' नाहीए.
आमचा फोटो कधीच चांगला येत नाही, इति सौ. धमाल्या आणि सौ. पेठकर.
कथाकथनकार विजूभाऊ.
मंत्रमुग्ध श्रोते.
राऽऽम, कृष्ण, हरी..... कुंभारकला लाईव्ह.
चिखलात बरबटलेल्या बोटांची कलाकुसर्..वाह क्या बात है|
दीपमाळ इन मेकींग. ह्या सदगृहस्थांनी आम्ही स्वखुशीने देऊ केलेले १०० रुपयाचे बक्षिस नाकारले. कुठल्याही प्रकारचे बक्षिस घेत नाही. हॅट्स ऑफ टू हिम....
एकूण 'अभिरूची कट्टा' हसत-खेळत, विविध कलांचा आस्वाद घेत, निसर्गच्या सानिध्यात, उल्हासित वृत्तीत पार पडला.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
24 Aug 2008 - 12:51 am | प्राजु
सह्ही जमला आहे कट्टा. पण मिपा च्या अन्नपूर्णा स्वाती ताईंचा फोटो पहायचा होता.. त्या दिसत नाहियेत.
धम्याची तब्बेत जरा सुधारलेली दिसते.. ;)
फोटो एकदम खासच. एकूणच जबरदस्त मजा केलेली दिसते..
कुंभाराची कलाकुसर अप्रतिम.... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Aug 2008 - 12:52 am | अभिज्ञ
पेठकर काका,
वृत्तांत आवडला. फोटो जबर्याच आलेत.
पण एक कळाले नाहि, आंद्या,धम्या ह्यांचे फोटो दिसत नाहित.
अन तुमचा स्वतःचा एकहि फोटो नाहि. ??
विजुभाईंचा बासरी वादनाचे हे अंग माहित नव्हते.
विजुभाउंमध्ये अजुन काय काय कला लपून आहेत हे एकदा तपासून बघायला पाहिजे.
त्यांच्या बासरीवादनाचे रेकॉर्डींग केलेले आहे का?
कट्ट्याला कोण कोण आले होते हे कळालेच.परंतु इथुन पुढे येतो म्हणून सांगुन ऐनवेळि कट्टेकरांचा "कात्रज" करणार्या
मिपाकरांची नावेहि जाहिर करण्यात यावीत काय?
अभि़ज्ञ.
24 Aug 2008 - 1:20 am | टारझन
कट्टा जबर्या झाला आहे ... पण .. हजर सभासद कमीत कमी २५ असावेत असे कळले होते.. रिपीट फोटूंपेक्षा सगळ्या ग्रुपचे फोटू मज्जा करताना दिसले असते तर कट्टा आम्ही अफ्रिकेतुन अनुभवला असता
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
24 Aug 2008 - 1:53 am | देवदत्त
चांगले चालले आहे.
हॉटेलात चहा नाही?. अरे कोण आहे रे तिकडे? (टाळी) सर कलम कर दो उनका ;)
(स्वगतः च्यायला सर्व शहरे एकाच मार्गावर चाललीत का? २००५ मध्ये बँगलोर मध्ये ३ मित्रांना रात्री १० वाजता फिरविले होते माझी चहाची तल्लफ भागविण्याकरीता)
बहुतेकांचे लेख, प्रतिक्रिया वाचून मनात एक प्रतिमा तयार झाली असते त्याहून बहुतेक जण वेगळे निघाले :)
लिखाणतील आणि प्रत्यक्ष प्रतिसाद ह्यात किती फरक आहे ते तुम्हीच सांगा. पुढे मी ही कधीतरी भेटेनच ;)
24 Aug 2008 - 6:23 am | एकलव्य
ओळखीओळखीचे (चेहरे आणि ठिकाणे दोन्ही) वाचून आणि पाहून आनंद झाला. पेठकर काका वृत्तांत झकास!
पुणेरी टोळीचा दंगा आवडला...
एकलव्य
24 Aug 2008 - 10:41 am | नंदन
असेच म्हणतो, झकास वृत्तांत.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
24 Aug 2008 - 7:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कट्ट्याचे फोटो आणि वर्णन मस्त..
24 Aug 2008 - 8:12 am | भडकमकर मास्तर
पेठकरकाका,
मस्त लिहिला आहे वृत्तांत ,
फोटोही छान...
तो घाटपांडे यांचा ढँण्टडँण.. ओळखा पाहू?फोटो म्हणजे कमाल आहे... सस्पेन्स किती ठेवायचा?? :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
24 Aug 2008 - 9:15 am | भाग्यश्री
सहीच! जबर्या धमाल आलेली दिसतीय.. एखादा जेवणाच्या ताटाचा फोटो नाही काढलात वाटतं(आम्हाला जळवायला??) :)
फोटो मस्तच.. कुंभारकाम तर अप्रतिम! हे नविनच सुरू झालेलं दिसत आहे.. कधी पाहील्याचं आठवत नाही..
बाय द वे, आमराईत फिरकलाच नाही की काय??
24 Aug 2008 - 9:38 am | इनोबा म्हणे
इनोबा आणि विनायक ह्यांनी दोन बाजूंनी आवर घातल्यामुळे (मधला) 'चित्त' थार्यावर आहे.
हे काय काका! माझा डब्बलरोल केला तुम्ही.
डावीकडून छोटा डॉन, चित्तर आणि इनोबा(विनायक)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
24 Aug 2008 - 9:46 am | ऋषिकेश
वा! पेठकरकाका,
झकास व्रुतांत!
वाचून इतकी मजा आली तर तिथे असणार्यांना किति आली असेल!!? :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
24 Aug 2008 - 11:06 am | सहज
असेच म्हणतो.
"डबल एजंट" घाटपांडे यांचा फोटो तर खल्लास!!
नुकत्याच केलेल्या विक्रमामुळे डॉ. दाढे यांच्या अंगावर मूठभर मांस चढले असे दिसतेय ;-) [स्वगत- सहजा काय जीभेला हाड वगैरे अजुन दाढा शाबुत ठेवायच्या आहेत ना?]
बाकी श्री व सौ धमाल यांचा फोटो पाहून किंचीत खेद का असुया का काय ते म्हणतात ते झाले, आमच्या वेळी बालविवाह होत नव्हते हो! कृ. ह. घे. :-)
24 Aug 2008 - 11:08 am | मुक्तसुनीत
बाकी श्री व सौ धमाल यांचा फोटो पाहून किंचीत खेद का असुया का काय ते म्हणतात ते झाले, आमच्या वेळी बालविवाह होत नव्हते
हा हा हा !
24 Aug 2008 - 2:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्री व सौ धमाल यांचा फोटो पाहून किंचीत खेद का असुया का काय ते म्हणतात ते झाले, आमच्या वेळी बालविवाह होत नव्हते हो!
हा हा हा हा
24 Aug 2008 - 10:26 am | शितल
फोटो आणि वृत्तांत मस्तच.
पण सगळे मिपाकर जे कट्याला होते त्याचा का नाही फोटो घेतला.
धम्या,
कसला हसतोय :)
24 Aug 2008 - 10:29 am | विसोबा खेचर
सचित्र वृत्तांताबद्दल धन्यवाद पेठकरराव!
चित्रांची एका वाक्यातील कॉमेन्ट्रीही मस्तच! मिपाकरांना पाहून बरं वाटलं! :)
इनोबा आणि छोटा डॉन ह्यांनी दोन बाजूंनी आवर घातल्यामुळे (मधला) 'चित्त' थार्यावर आहे.
अरे वा! मिपा कट्ट्याला काही थोर मनोगतींनीही हजेरी लावली होती हे पाहून आनंद वाटला! :)
आंबेहळदीचे लोणचे, वाळवून तळलेल्या तुरीच्या शेंगा (मला वाटतं त्या गवारीच्या होत्या), भजी, तळलेल्या पापड-पापड्या, भाकरी, पिठलं (सपक होतं सालं. एखादी हिरवी मिरची हवी होती. नाही मिळाली.),अळूचे फदफदे (वा..वा..वा माझ्यासारख्या भटांसाठी पक्वान्न), शेवयांची भाजी, कढी, कोशिंबीर, खीर, श्रीखंड आणि मसालेभात सदृश काही पदार्थ होता. जेवण चांगलं होतं.
क्या बात है! :)
असो, सर्व कट्टेकरींचे मन:पूर्वक अभिनंदन...
तात्या.
अवांतर - चला! आता हा अभिरुचीचा आणि अमेरिकेतला असे लागोपाठ दोन सात्विक कट्टे झाले. आता एखादा कट्टा लिंबूसरबताचा आणि मांसाहारी जेवणाचाही करू! :)
म्हणजे आम्हालाही त्या कट्ट्याला हजेरी लावता येईल! आणि त्यानंतर मस्तपैकी गाण्याची बैठकही करू! :)
तात्या.
24 Aug 2008 - 10:43 am | II राजे II (not verified)
मस्त फोटू !!!
वर्णन एकदम सुरेख... पेठेकर साहब ... आवडलं आपल्याला !!
काय हे साधा चहा मिळत नाही तेथे ? (एकवेळ अमृत ना मिळो पण चहा पाहीजेच ! )
विजु भाउच्या आत अजून काय काय लपलं हाय हे सोधावयाला पाहीजे... नजर राखावी गड्यावर !
डोन्या व ईनो'बा..... जरा गडी बघून तरी बसायचे रे लोकांनो.... त्यांचे चित्त जरा जरी भरकटले व तुम्हाला प्रेमाने (रागाने) आलिंगन दिले तर कुसकरुन टाकेल .. !
दाढे साहेब नुस्ती मजाच बघत बसला की राव.... जरा मुद्दे (गुद्दे) संभाळायचे.... स्मित हास्य म्हणजे काय हे तुमच्याकडून शिकावे म्हणतो ;)
छत्रपती... राजेंचे जिवन असेच हो.. सदा सर्वदा आराम !!!!!
धम्या ..... तुझे हे हास्य.. हत्तीचे दात तर नव्हेत ? दाखवायला एक.. व खायला एक ? लग्न झालेला असे मनमुराद हसू शकतो ? क्या बात है !
फुल्ल्टू मजा केलेली दिसते सर्वांनी !!!!!
यशस्वी कट्ट्याबद्दल सर्वांचे अभिनंदन !!!
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
24 Aug 2008 - 11:24 am | ऋषिकेश
धम्या तुला हसताना काहि दिसतं का रे? ;)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
24 Aug 2008 - 2:19 pm | II राजे II (not verified)
>>>धम्या तुला हसताना काहि दिसतं का रे
=))
एकदम चायनीज हास्य !!
**********
बाकी विजुभाउ ला विचार ले पाहीजे कि कृष्णासारखी फक्त बासुरीच वाजवता की कधी कधी राधेचे रुप पण घेता ;) (खफ वासीयांना समजलेच असेल मी काय म्हणतो आहे ते ;)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
24 Aug 2008 - 4:26 pm | सखाराम_गटणे™
बाकी विजुभाउ ला विचार ले पाहीजे कि कृष्णासारखी फक्त बासुरीच वाजवता की कधी कधी राधेचे रुप पण घेता (खफ वासीयांना समजलेच असेल मी काय म्हणतो आहे ते
नाही ते, पर्यायाने दुसरे रुप घेतात.
सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
24 Aug 2008 - 11:01 am | मुक्तसुनीत
अरे वा !
जोरदार झाला की कट्टा ! वृत्तांत आणि फोटु वगैरे जबरा ! मजा आली !
पेठकरांनी उत्तम लिहिलाय , पण अजून येऊ द्या ! इतरांकडून पुरेसा मसाला आला नाही असे वाटले !
24 Aug 2008 - 11:53 am | मनिष
मस्तच झालेला दिसतोय कट्ट..मी नाही येऊ शकलो. पण असा सहकुटुंब कट्टा करू पुन्हा, तेव्हा येईन! :)
पुढच्या वेळेस संस्कृती???
24 Aug 2008 - 11:58 am | स्वाती दिनेश
कट्टा मस्त धमाल झालेला दिसतो आहे.. फोटो आणि त्यावरची टिपण्णीही मस्त!
स्वाती
स्वगत- स्वाती,तू नुसतीच आश्वासनं दे.. वॄतांताची.. तुमची ट्रीप आता शिळी झाली तरी येतोय अजून वृतांत..जर्मनीतून मुंबईत पोहोचायला ८ तास लागतात .. म्हणून सहलीचे वर्णन लिहायला ८ दिवस लावते आहेस?
24 Aug 2008 - 12:11 pm | मनिष
'The trouble with being punctual is, there is no one to appreciate it!' हे आठवल, हा माझाही नेहमीचा अनुभव. बाकी अकत्र सगळ्या ग्रुपचा फोटो नाही का?
पेठकर काकांची शैली खासच! :)
24 Aug 2008 - 12:15 pm | विसोबा खेचर
'The trouble with being punctual is, there is no one to appreciate it!'
वा! ही म्हण आवडली.. :)
24 Aug 2008 - 4:32 pm | लिखाळ
वा वा !
मस्त कट्टा झालेला दिसतो.. खुप मजा आली असे दिसतेय ! मस्त !
फोटो सुद्धा छान.. सर्वांचा एकत्र फोटो असता तर अजून मजा आली असती.
--लिखाळ.
24 Aug 2008 - 5:35 pm | मदनबाण
हेच म्हणतो..
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
24 Aug 2008 - 8:07 pm | डॉ.प्रसाद दाढे
मी थोडा उशीरा पोचल्यामुळे माझ्या सगळ्या॑शी डिट्टेल गप्पा काही होऊ शकल्या नाहीत :( बेटर लक नेक्स्ट टाईम (पण एक॑दरीत नूर पाहता सगळ्या गप्पा घुमून फिरून गटणेसाहेबा॑वर येत असाव्यात.. )
मदनबाण, ब्रिटिश टि॑गी या॑नीही फोनवरून हजेरी लावली होती.
पेठकर काका॑नी एक लई भारी कॅमेरा आणला होता टेलीफोटोलेन्सवाला. ज्या क्यामेर्याने ज॑गलात दूरून रानरेड्या॑चे फोटू काढायचे त्यावर आमचे काढल्यामुळे मी एव्हढा प्रच॑ड दिसतो आहे, प्रत्यक्षात मी सडपातळच आहे.. :)
विजूभाऊ बासरी मस्तच वाजवतात (मला गाणे ओळखता आले (त्या॑नी सा॑गितल्यावर) :) ह.घ्या.
शेवटी बरेच मिपाकर पान आणायला म्हणून जे गेले ते बराच काळ वापस आलेच नाहीत (पानवाल्याकडेच गेले की आणी कुणीकडे ? :)
आता पुढचा कट्टा स॑गीत स्पेशल केला पाहिजे (तात्या॑चे गाणे ऐकण्याची बहूत दिवसा॑ची तमन्ना आहे)
24 Aug 2008 - 9:17 pm | प्रभाकर पेठकर
प्राजु,
सह्ही जमला आहे कट्टा. पण मिपा च्या अन्नपूर्णा स्वाती ताईंचा फोटो पहायचा होता.. त्या दिसत नाहियेत.
स्वाती आणि यमी (सहकुटुंब) जेवल्या-जेवल्या सटकणार आहेत ह्याची मला कल्पना नव्हती. मी म्हंटले निवांत जेवल्यावर फोटो काढू. त्यामुळे ते फोटों बाहेर घरंगळले.
धम्याची तब्बेत जरा सुधारलेली दिसते..
ह्याला म्हणतात 'मायक्रोस्कोपिक' नजर.
अभिज्ञ,
पण एक कळाले नाहि, आंद्या,धम्या ह्यांचे फोटो दिसत नाहित.
आंद्या छायाचित्र क्रमांक १४ आणि धम्या छायाचित्र क्रमांक १२.
अन तुमचा स्वतःचा एकहि फोटो नाहि. ??
मी चौकटीत मावत नाही. माझ्या साठी 'सिनेमास्कोप' लागतो. हा:हा:हा:!
विजुभाईंचा बासरी वादनाचे हे अंग माहित नव्हते.
आम्हालाही तो एक सुखद धक्का होता.
त्यांच्या बासरीवादनाचे रेकॉर्डींग केलेले आहे का?
मोठे कलाकार परवानगी देत नाहीत. म्हणून आम्ही प्रयत्नही केला नाही.
कट्ट्याला कोण कोण आले होते हे कळालेच.परंतु इथुन पुढे येतो म्हणून सांगुन ऐनवेळि कट्टेकरांचा "कात्रज" करणार्या मिपाकरांची नावेहि जाहिर करण्यात यावीत काय
हा प्रांत संयोजकांचा. मी निव्वळ फोटोग्राफर.
टारझन,
कट्टेकरी उशिरा जमल्यामुळे लगेच जेवले आणि सुस्तावले. आणि कमी उपस्तिथीच्या तांत्रीक कारणामुळे रिपीट फोटो काढावे लागले.
देवदत्त,
माझा स्वतःचा फोटो नसण्याचे तेही एक कारण आहे.
एकलव्य, नंदन आणि डॉ. बिरुटेसाहेब,
धन्यवाद. तुम्ही कधी हजेरी लावताय एखाद्या कट्ट्याला? आता 'तामसी' कट्टाही होऊ घातला आहे असे ऐकले.
भडकमकर मास्तर,
ढँण्टडँण.. आहेच जबरा.
भाग्यश्री,
एखादा जेवणाच्या ताटाचा फोटो नाही काढलात वाटतं(आम्हाला जळवायला??)
अजून काही (इतरांनी काढलेले) फोटो आहेत. त्यांचे वृत्तांतही येतीलच सफोटो...
फोटो मस्तच.. कुंभारकाम तर अप्रतिम! हे नविनच सुरू झालेलं दिसत आहे.. कधी पाहील्याचं आठवत नाही..
गेली तीन वर्षे तरी मी पाहतो आहे. आधीचे माहित नाही.
बाय द वे, आमराईत फिरकलाच नाही की काय??
जेवल्यावर 'ईऽऽ कमोड पे जाते है, कुछ सुऽऽऽऽऽऽस्त कदम रस्ते...' अशी अवस्था होती. आमराईत कोण जातोय. पण मुद्दा विचार करण्यासारखा आहे. पुढच्यावेळी लवकरात लवकर जमून मस्ऽऽऽत भटकलं पाहिजे.
विनायक,
सॉरी इनोबा, चूक झाली खरी. अभिज्ञने ती मला व्यनीतून कळवली आणि मीही ती तात्यांना तत्परतेने कळवून सुधारली.
सॉरी, छोटा डॉन, पहिली चूक समजून अभय द्यावे ही थरथरती विनंती.
ऋषिकेश,
खरंच खूप मजा आली.
सहज,
"डबल एजंट" घाटपांडे यांचा फोटो तर खल्लास!!
नुसता फोटो बघूनच खल्लास? म्हणजे माणूस जबरदस्त 'डेंजरस' असणार.
नुकत्याच केलेल्या विक्रमामुळे डॉ. दाढे यांच्या अंगावर मूठभर मांस चढले असे दिसतेय
कुठला विक्रम बाबा? मी गेले कित्येक दिवस (आणि रात्री) मिपावर फिरकू शकलो नाही त्यामुळे अज्ञानात आहे.
बाकी श्री व सौ धमाल यांचा फोटो पाहून किंचीत खेद का असुया का काय ते म्हणतात ते झाले, आमच्या वेळी बालविवाह होत नव्हते हो! कृ. ह. घे.
प्राजुच्या म्हणण्यानुसार धमाल्या (तरी निदान) आता गुटगुटीत होऊ घातला आहे. आणि 'कृ. ह. घे.' कोणाला? मला? मी कशाला जड घेईन? असो.
शितल,
काही मिपाकर मध्येच 'कल्टी' मारणार आहेत हे मला माहित नव्हते.
विसोबा खेचर,
सचित्र वृत्तांताबद्दल धन्यवाद पेठकरराव!
लाजवताय राव तुम्ही आम्हाला धन्यवाद-बिन्यवाद मानून.
आता एखादा कट्टा लिंबूसरबताचा आणि मांसाहारी जेवणाचाही करू!
मांसाहारी जेवणाबरोबर लिंबूसरबत? गर्भितार्थ जरी उमगला तरी ताकाला जाऊन भांडे लपविणे कशापायी. सुरापान आणि सामिष भोजन म्हणा की ....
राजे,
लग्न झालेला असे मनमुराद हसू शकतो ?
अहो अजून पहिलंच वर्ष आहे. नंतर येईलच आपल्या खांद्यावर दोन अश्रू ढाळायला. तेंव्हा मध्ये 'खंबा' घेऊन बसू आणि 'सामुदायिक अश्रूपतन' कार्यक्रम सादर करू.
मुक्तसुनित,
इतरांकडून पुरेसा मसाला आला नाही असे वाटले !
होय. मीही वाट पाहतोय.
मनिष,
असा सहकुटुंब कट्टा करू पुन्हा
आम्हा पामरांचे मत विचाराल की नाही?
स्वाती दिनेश,
मी सुद्धा स्वाती (राजेश)च्या कट्टा रेसिपीची (आय् मिन्...वृत्तांताची) वाट पाहतो आहे.
लिखाळ,
सर्वांचा एकत्र फोटो असता तर अजून मजा आली असती.
पुढच्या वेळी पारंपारीक 'ग्रुप फोटो' नक्की.....
मदनबाण,
"First, believe in the world-that there is meaning behind everything."
खांद्यांवरून गेले.
आपणा सर्वांस प्रेमळ धन्यवाद.
24 Aug 2008 - 10:50 pm | चतुरंग
आमचं प्रतिसादाचं घोडं ह्यावेळी वरातीमागून आलंय लोकहो त्यामुळे क्षमस्व! L)
पेठकरकाका सचित्र वृत्तांत एकदम देशी स्टाईलने खणखणीत! :D
पहिल्या फोटोत मला विजूभाऊंच्या बासरी वाजवणार्या मूर्तीवर एक मोरपिसांचा मुकुट आपोआप दिसला! B) माणूस बाकी रसिक हां शायरी काय, कविता काय, बासरी काय कमाल आहे! :)
दुसर्या फोटोतले डॉ.दाढे साहेब अंमळ अमोल पालेकरच्या जवळ जाणारे भाव राखून आहेत :P (डॉ.साहेब ह.घ्या. नाहीतर माझे दात घशात घालाल! ;) ). हाताची घडी, तोंडावर परीटघडी!
प्रकाश घाटपांडे काका तर मला पोलीसी हेअरकटवरुनच अंदाज आला, खात्यातल्या सवयी जात नाहीत हेच खरे! :T :O (काका ह.घ्या. नाहीतर माझा गेम कराल!)
पुढच्या चित्रातलं विजूभाऊंचं हास्य म्हणजे एकदम मंदतरल स्मित, कोणतं स्वप्न बघत होते कोण जाणे? 8>
सखाराम गटणे आणि अनामिक काय गहन चर्चा चालली आहे? :|
हॅमॉकवर पहुडलेल्या छत्रपतींचा 'स्वराज्याचा विस्तार' अगदी नजरेत भरण्याजोगा आहे खरा! :> :? (छत्रपती पामराला माफ करा, न राहवून शब्द सांडून जातात कधी कधी! ;) )
छोटा डॉन, चित्त आणि इनोबा फारच 'चित्तथरारक' फोटू! :D :S
धमाल! अरे काय खळखळून हसतोयस! :)) (लग्नानंतरही सौ. धमाल ने ह्याला वास्तवापासून दूर ठेवलेले दिसते! येईल, येईल लवकरच भूतलावर :''( . आम्ही वाट बघायला तयार आहे.)
सौ.धमाल आणि सौ. पेठकर काकू, ह्म्म.. चार अनुभवाचे बोल ऐकवलेत की नाही लेकीला? ;;) #o
कथाकथनकार विजूभै!! एकदम रंगात येऊन चाललेली दिसते कथा! :W :?
चावडीला पारावर बसलेली मंडळी एकदम ग्रामपंचायतीतली वाटतात! एकदम झक्कास फोटू! O:)
पेठकरकाका, बाकी पदार्थांचं वर्णन एकदम फर्मास हो! =P~ =P~
आंबेहळदीचे लोणचे, वाळवून तळलेल्या तुरीच्या शेंगा (मला वाटतं त्या गवारीच्या होत्या), भजी, तळलेल्या पापड-पापड्या, भाकरी, पिठलं (सपक होतं सालं. एखादी हिरवी मिरची हवी होती. नाही मिळाली.),अळूचे फदफदे (वा..वा..वा माझ्यासारख्या भटांसाठी पक्वान्न), शेवयांची भाजी, कढी, कोशिंबीर, खीर, श्रीखंड आणि मसालेभात सदृश काही पदार्थ होता. जेवण चांगलं होतं.
फक्त 'शेवयांची भाजी'?? ये बात कुछ हजम नहीं हुई, बहुदा शेवग्याची भाजी असावे! :W
अजून उरलेले फोटू आपापल्या मसाल्यासहित टाका राव!! B)
चतुरंग
24 Aug 2008 - 11:07 pm | प्रभाकर पेठकर
फक्त 'शेवयांची भाजी'?? ये बात कुछ हजम नहीं हुई, बहुदा शेवग्याची भाजी असावे
च्यायला दूसरी चूक. 'शेवयांची' नाही, 'शेवेची' भाजी. खानदेशी टाईप पण अज्जाबात तिखट नाही, तेलाचा तवंग नाही. त्यामुळे 'शेवेची ड्युप्लिकेट खानदेशी भाजी' म्हणयला हरकत नाही.
24 Aug 2008 - 11:18 pm | चतुरंग
पण शेवेच्या भाजीला ना तेल, ना तिखट? म्हणजे बिन ग्लोव, बिन पॅडचा सचिन तेंडुलकर म्हणा की? ;)
चतुरंग
24 Aug 2008 - 11:21 pm | प्रभाकर पेठकर
अरे ती शेवही 'मऊऽऽऽऽ' पडली होती.
25 Aug 2008 - 9:27 am | अनिल हटेला
चांगली मजा केलीये मंडळी !!
अजुन माल मसाला असेन तर येउ देत !!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Aug 2008 - 9:41 am | आनंदयात्री
है भाय है .. अजुन डान्या अन स्वातीताईचे फोटु यायचेत !
25 Aug 2008 - 9:39 am | अमोल केळकर
सचित्र वर्णन वाचायला मजा आली. फोटोमुळे मिपाकर सदस्यांची ओळख झाली.
अमोल
(स्वगतः कट्टे भरवण्यात मात्र पुणेकरांनी मुंबईकरांवर मात केलेली दिसत आहे. आता आपण मुंबईकरांनी देखील वेळ काढुन भेटायला पाहिजे )
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
25 Aug 2008 - 9:55 am | गणा मास्तर
डॉ दाढे आणि विजुभौ 'दो हंसोका जोडा' दिसत आहेत एकदी.
द्रुष्ट नाही लागली म्हणजे मिळवली
25 Aug 2008 - 10:11 am | मिंटी
पेठकर काका वॄत्तांत आवडला..........
मी पुण्यात आसुन येऊ शकले नाही याची खंत वाटतीए फक्त..........
पण खुप मज्जा केलेली कळतीए फोटोवरून..............
सुरेख वृत्तांत आणि फोटोंसाठी धन्यवाद............. :)
26 Aug 2008 - 6:19 pm | प्रभाकर पेठकर
सितारोंके आगे जहाँ और भी है....! अजून भरपूर सात्विक आणि असात्विक कट्टे व्हायचे बाकी आहेत. आगामी आकर्षण मुंबै कट्टा....(कोणीतरी वर म्हणत होते बुवा!)
25 Aug 2008 - 10:21 am | विजुभाऊ
हे बघा वरातीमागुन घोडे http://www.misalpav.com/node/3208
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
25 Aug 2008 - 12:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी पण फोटो काढले ... हे घ्या!
http://picasaweb.google.com/sanhita.joshi/Abhiruchi
ऋचा सॉरी हा ... तुझे फोटो जरा उजेडात काढायला हवे होते किंवा फ्लॅश मारायला हवा होता ... पण माझा आळस!
अदिती
25 Aug 2008 - 1:14 pm | आनंदयात्री
मस्त !!
26 Aug 2008 - 6:21 pm | प्रभाकर पेठकर
ऋचा सॉरी हा ... तुझे फोटो जरा उजेडात काढायला हवे होते किंवा फ्लॅश मारायला हवा होता
एवढी काही ऋचा काळी वाटली नाही. (फोटोतही नाही आणि प्रत्यक्षातही नाही).
26 Aug 2008 - 6:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ऋचाचे फोटो यायला पहिजेत तेवढे क्लीयर नाहीयेत, म्हणून सॉरी! ती काळी नाहीचे, वाटणार कुठून?
26 Aug 2008 - 7:18 pm | प्रभाकर पेठकर
हा: हा: हा: जस्ट गंम्मत.
26 Aug 2008 - 8:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहा ... मला कळलीच नाही! काका, तुमच्या वयाचा माणूस गंमतपण करू शकतो वाटलंच नाही! ;-)
26 Aug 2008 - 9:15 pm | प्रभाकर पेठकर
काय करणार? प्रॅक्टीस ठेवावी लागते वय झालं तरी... कळेल म्हणा कधीतरी हे कटू सत्य तुला.
27 Aug 2008 - 10:53 am | धमाल मुलगा
अदिती,
ह्याचा अर्थ 'तुमने काका को पैचानाच नहीं|'
काका एखाद्याला पकडुन एकदा चालु झाले ना की त्या माणसाला पळता भुई थोडी करुन टाकतात :)
सध्या संसाराच्या भवसागरात पोहण्याचे क्लिष्ट धडे मी काकांकडुनच 'हसत खेळत शिक्षण' पध्दतीनं घेतोय. काय काका, बरोबर बोल्लो ना? ;)
27 Aug 2008 - 11:14 am | विसोबा खेचर
अगं अदिती, आमचा प्रभाकर हा एक नंबरचा डांबिस माणूस आहे! :)
27 Aug 2008 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
लोकहो, पेठकर काकांना प्रत्यक्षात आणि जालावर भेटल्यानंतरच मी हा "विनोद" केला ... क्रूपया हसा! ;-)
25 Aug 2008 - 1:22 pm | अनिल हटेला
यमी आजीच दर्शन नाय झाल !!
कुठली दुर्बीण वापरावी लागेल ?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Aug 2008 - 1:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वातीच्या कॅमेय्रात माझे दातपण आहेत, तेव्हा हे तिलाच विचारा! ;-)
25 Aug 2008 - 2:02 pm | पक्या
कट्टा छान रंगलेला दिसतोय. सचित्र वृत्तांत वाचून मजा आली. पुढच्या वेळेस मलाही हजेरी लावायला आवडेल.
25 Aug 2008 - 10:25 pm | धनंजय
खूप मजा केलेली दिसते आहे. फोटो आणि टिप्पणी तर मस्तच!
26 Aug 2008 - 11:42 am | धमाल मुलगा
कट्ट्याला हजेरी लावलेल्या मंडळीनी आमच्या विनंतीचा मान ठेऊन आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत :)
सखाराम गटणे आणि कोण बरे? ओळख करून घ्यायची राहूनच गेली.
काका, तो सखाराम बरोबर बसलाय तो वरद. उशीरा आला तो. आणि तब्येत बरी नव्हती त्यामुळे एकदम मलुलच होता. त्यामुळे त्याची ओळख करुन द्यायची राहिली.
धम्याची तब्बेत जरा सुधारलेली दिसते..
खरं सांगतेस प्राजुताई? थ्यांक्यु थ्यांक्यु...वाचुनच लगेच २० ग्रॅम मांस चढलं अंगावर.
=))
आमच्या लग्नाच्या वेळी आमचे तिर्थरुप म्हणाले होते, खिशात जरा लायसन्स वगैरे ठेवा दोघांची. उगाच पोलीस आले म्हणजे बालविवाह लावताय म्हणुन आम्हालाच अटक करायचे :)
धम्या ..... तुझे हे हास्य.. हत्तीचे दात तर नव्हेत ? दाखवायला एक.. व खायला एक ? लग्न झालेला असे मनमुराद हसू शकतो ? क्या बात है !
नाय हो...शप्पथ नाय. खोटं वाटत असेल तर भडकमकर मास्तरांना विचारा, त्यांना ठाऊक आहे माझ्या दातांची हिश्ट्री-जॉग्राफी.
धम्या तुला हसताना काहि दिसतं का रे?
=)) ॠष्या, कुणीकडुन बोललास रे? माझ्या डावीकडे की उजवीकडे???
हसताना मला ऐकुपण नीट येत नाय.
शेवटी बरेच मिपाकर पान आणायला म्हणून जे गेले ते बराच काळ वापस आलेच नाहीत (पानवाल्याकडेच गेले की आणी कुणीकडे ?
डॉक्टरसाहेब, माफी असावी. तो पानवाला लेकाचा शिकाऊ उमेदवार होता..एकेक पान लावायला तब्बल १० मिनिटे घेत होता.तिथे त्याचं काम होईपर्यंत नुसता वैत्ताग आला.
अवांतरः डाक्टर, तुम्ही एकदम 'रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा' मधुन 'लकी' झाल्यामुळे पाहिल्या पाहिल्या तुम्हाला ओळखलंच नव्हतं मी ;)
जेवल्यावर 'ईऽऽ कमोड पे जाते है, कुछ सुऽऽऽऽऽऽस्त कदम रस्ते...' अशी अवस्था होती.
???? =))
काका...अशक्य आहात तुम्ही! खरोखर!
अहो अजून पहिलंच वर्ष आहे. नंतर येईलच आपल्या खांद्यावर दोन अश्रू ढाळायला. तेंव्हा मध्ये 'खंबा' घेऊन बसू आणि 'सामुदायिक अश्रूपतन' कार्यक्रम सादर करू
हा हा हा!!! मी तर आत्ताही तयार आहे ह्या कार्यक्रमाला. पण अजुन बायको परवानगी देत नाही. सध्या 'सात च्या आत घरात' चालु केलंय माझ्यासाठी. :(
घाटपांडे काकांचा फोटो कसला कल्ला काढलाय. एकदम जेम्स बॉन्ड.
पेठकर काकांचा कॅमेरा लै लै भारी होता बॉ.
काका, मी इतका येड्यासारखा हसतानाचा फोटो कुठे आणि कधी काढलात हो? मला तर कळलंच नाही.
बाकी, पेठकर काकुंची आणि आमच्या सौ.ची छान गट्टी जमली असं दिसतंय. घरी गेल्यावरही काकुंचे गोडवे गाणं चालु होतं. :)
(धमाल्याची पँट मस्त होती बुवा, आवडली आपल्याला).
खोटं सांगताहेत काका,
ते म्हणाले, "धमाल्यानं चुकुन माझी पँट नाही ना घातली? केव्हढी मोठी आहे ती...त्या पँटच्या वजनानं त्याला चालता येत नाहीय्ये नीट"
मी, आंद्या, डान्या, इनोबा ही चांडाळ चौकडी आणि आमच्या ग्यांगचा ब्रेन विजुभौ - आम्ही मस्त दंगा केला :) मजा आली.
आणि हो, ह्या कट्ट्याची सगळी तयारी करणं, बुकींग करणं वगैरे सगळं सगळं शेखरभाऊंनीच पाहिलं. मी नुसत्याच उंटावरुन शेळ्या हाकल्या.
शेखरभाऊ....पेश्शल थ्यांक्यु टु यू !!!
बाकी, पेठकर काका, मनोबा आणि मंडळी, त्यादिवशी मला जरा लैच्च उशीर झाला यायला, आय याम यक्श्ट्रीमली स्वारी!!!
आता पुढचा कट्टा....संगीत कट्टा!!!!
काय तात्या, घेताय ना मनावर?
26 Aug 2008 - 1:04 pm | विसोबा खेचर
आता पुढचा कट्टा....संगीत कट्टा!!!!
काय तात्या, घेताय ना मनावर?
नक्कीच! सध्या जरा गणेशोत्सवाची १० दिवसांची गडबड संपू दे, मग पितृपक्षात आपल्या सोबत कावळ्यालाही दोन थेंब पाजून पितरांनाही मिपा सांगितिक कट्टा घडवू! :)
आपला,
(काकप्रेमी) तात्या.
27 Aug 2008 - 1:40 pm | भडकमकर मास्तर
मी नुसत्याच उंटावरुन शेळ्या हाकल्या.
तरीच म्हटलं ते उंट स्टॉप काय प्रकार आहे ?? आत्ता कळालं....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
26 Aug 2008 - 2:08 pm | डोमकावळा
ते तुमच्या सोबत दोन थेंब प्यायला तर आम्ही कधीच तयार आहोत....
पण ते पितरांचं जरा अवघड दिसतय बॉ... त्या करता आम्हाला एकदा (की एकदाचं ?) त्यांना भेटायला जावं लागेल. ;)
आपला,
(थेंबप्रेमी) डोम
26 Aug 2008 - 6:02 pm | मन
अख्खा कट्टा मस्तच कव्हर केलात की.
बाकी अजुनही कही फोटु मिशिंग असावेत असं वाटतय.
आपलाच,
मनोबा
26 Aug 2008 - 6:46 pm | प्रभाकर पेठकर
पक्या,
कट्टा छान रंगलेला दिसतोय. सचित्र वृत्तांत वाचून मजा आली. पुढच्या वेळेस मलाही हजेरी लावायला आवडेल.
धम्या नांव नोंदवून घे. सात्विक की असात्विक कट्टा ह्याचे स्पष्टीकरण करून घे.
धन्यवाद धनंजय.
धमाल मुलगा,
काका, तो सखाराम बरोबर बसलाय तो वरद. उशीरा आला तो. आणि तब्येत बरी नव्हती त्यामुळे एकदम मलुलच होता. त्यामुळे त्याची ओळख करुन द्यायची राहिली.
ओके. धन्यवाद धमाल मुला. आणि सॉरी वरद.
मी तर आत्ताही तयार आहे ह्या कार्यक्रमाला. पण अजुन बायको परवानगी देत नाही
'परवानगी मागतो आहेस' म्हणजेच अजून कच्चा नवरा आहेस.
घाटपांडे काकांचा फोटो कसला कल्ला काढलाय. एकदम जेम्स बॉन्ड.
पेठकर काकांचा कॅमेरा लै लै भारी होता बॉ.
बऽऽस काऽऽऽऽय..! म्हणजे सगळं क्रेडीट कॅमेराला?
हे म्हणजे नवदांपत्याला पहिला मुलगा झाला की, 'त्यांच्याकडे मस्त सागवानी पलंग आहे' असे म्हणणयासारखे झाले.
मी इतका येड्यासारखा हसतानाचा फोटो कुठे आणि कधी काढलात हो?
हा: हा: हा: अरे सहज गावलास फ्रेम मध्ये.
पेठकर काकुंची आणि आमच्या सौ.ची छान गट्टी जमली असं दिसतंय. घरी गेल्यावरही काकुंचे गोडवे गाणं चालु होतं.
सावधान! हार्ड डिस्क करप्ट होऊ शकते. भरपूर व्हायरस आहेत.
"धमाल्यानं चुकुन माझी पँट नाही ना घातली? केव्हढी मोठी आहे ती...त्या पँटच्या वजनानं त्याला चालता येत नाहीय्ये नीट"
खर पाहता, पँट स्वतःच्याच वजनाने खाली सरकेल असे मी म्हणालो होतो. पण पँट मला आवडली हे सत्यच.
पेठकर काका, मनोबा आणि मंडळी, त्यादिवशी मला जरा लैच्च उशीर झाला यायला, आय याम यक्श्ट्रीमली स्वारी!!!
पुढच्या कट्ट्याला किती वेळेवर पोहोचतोस त्यावर अवलंबून आहे 'यक्श्ट्रीमली सॉरी' स्विकारायची की नाही ते.
26 Aug 2008 - 6:52 pm | कुंदन
>>पुढच्या कट्ट्याला किती वेळेवर पोहोचतोस
धम्याला उशीर होणारच काका, नवीन नवीन लग्न झालय. समजुन घ्या जरा .
27 Aug 2008 - 10:59 am | धमाल मुलगा
धम्या नांव नोंदवून घे. सात्विक की असात्विक कट्टा ह्याचे स्पष्टीकरण करून घे.
नोंद करणेत आलेली आहे.
पक्याभाय, माफी असावी, पुर्वकल्पना देण्यास चुकलो.
बऽऽस काऽऽऽऽय..! म्हणजे सगळं क्रेडीट कॅमेराला?
नाही हो...ती दोन वेगवेगळी वाक्यं आहेत. चुकुन एकत्र झाली असावीत. तुमच्या पर्फेक्ट फ्रेमिंगच्या कौशल्याबद्द्ल आम्ही पामरांनी काय बोलावं?
हे म्हणजे नवदांपत्याला पहिला मुलगा झाला की, 'त्यांच्याकडे मस्त सागवानी पलंग आहे' असे म्हणणयासारखे झाले.
=))
__/|\__
सावधान! हार्ड डिस्क करप्ट होऊ शकते. भरपूर व्हायरस आहेत.
असुद्यात हो...फार तर फार काय होईल? माझा पेठकर काका क्र.२ होईल...आवडेल की ते मला :)
पण पँट मला आवडली हे सत्यच.
धनन्यवाद्स :)
पुढच्या कट्ट्याला किती वेळेवर पोहोचतोस त्यावर अवलंबून आहे 'यक्श्ट्रीमली सॉरी' स्विकारायची की नाही ते.
आयला, सॉल्लीड पाचरच मारुन ठेवलीत की राव तुम्ही...
जरा कुंदनशेठचं ऐका ना :)
27 Aug 2008 - 12:10 pm | डॉ.प्रसाद दाढे
पेठकर काका तुम्हा॑ला साष्टा॑ग द॑डवत! तुम्ही कधी कुणाची आणि कशी विकेट काढाल ते सा॑गण॑ ब्रम्हदेवालाही अशक्य आहे!
31 Jan 2010 - 10:24 am | विजुभाऊ
जुने फोटो पुन्हा पाहिले की कसे नॉस्टॅल्जीक व्हायला होते.
खरेच त्या कट्ट्या सारखी मजा परत आणायचीय पुन्हा एकदा
1 Feb 2010 - 6:58 am | सुधीर काळे
पेठकरसाहेब,
पुढच्या 'मिपा' कट्टा स्नेहसंमेलनाबद्दल जरा आधीपासून कळवावे. मलाही बांसरी वाजवायची विजूभाऊंसारखी आवड आहे. त्यांच्याइतकी नसेल पण बरी वाजवतो. मला आवडेल 'मिपा'च्या स्नेहसंमेलनात वाजवायला!
------------------------
सुधीर काळे
Parkinson's Laws
1. Work expands to occupy time available.
2. Bureucrats add subordinates, not rivals.
3. In meetings, time spent on a point is inversely proprtional to its importance!
11 Oct 2013 - 3:04 pm | विजुभाऊ
मिपाकरांचे स्नेह सम्मेलन असे होते.
11 Oct 2013 - 3:21 pm | प्रचेतस
हे असं पण होते बरं का. ;)
http://www.misalpav.com/node/21411
11 Oct 2013 - 3:31 pm | प्रमोद देर्देकर
पण आत्ता ते फोटो का बरे दिसत नाहीयेत? आणि आम्हाला आमन्त्रण का नव्हते बुवा?
11 Oct 2013 - 5:29 pm | पिलीयन रायडर
तुम्ही आलात २ महिन्या पुर्वी... ते झालय ५ वर्षांपुर्वी.. कसं बोलवायचं बुवा?!