शुभकार्य..

वारा's picture
वारा in जनातलं, मनातलं
21 Aug 2010 - 1:47 pm

एक शुभकार्य थोड्याच दिवसात येउ घातलेल आहे. यानिमीत्ताने काहीतरी दान धर्म करावा अशी इच्छा मनात घर करु लागली आहे. त्याचबरोबर हे दान धर्म सर्वसमावेशक असाव, व कुठल्या स्पेसिफीक वर्गाला किंवा व्यक्तीला याचा लाभ मिळणे मर्यादीत न राहता बहुजनास लाभ मिळावा अशी इच्छा आहे.

माझ्या मते काही पर्याय सुचत आहेत ते खालीलप्रमाणे,

१) स्मशानभुमी व तेथील जागेमधे गरज असणारे एखादे उपकरण. उदा. पाण्यासाठी कुलर, लाकडे वाहण्यासाठी ट्रॉली, ई.
कारण : या जागी येण्याचा योग कधी येतो हे सर्वांना माहीती आहेच, अशा प्रसंगी एखादी गोष्ट मिळाली नाही तर लोकांना मनस्ताप फार होतो.

२) पी. एम. (Post mortem center) ईथे लागणारी एखादी सुवीधा.
कारण : पी. एम. जनरली अ‍ॅक्सीडेंटल किंवा संदीग्ध केस मधे कराव लागत. ईथल वातावरण फारच भयानक असत व शहाण्या माणसाने ईथे जाउ नये अशीच ईथली अवस्था असते.

मिपावर जर कोण जाणकार असेल तर क्रुपया मार्गदर्शन करावे, तसेच आजुन काही पर्याय असल्यास सुचवावेत.

(अवांतर : आमची मदत अगदी लाखात वगैरे नसेल पण पाच आकडी नक्कीच असेल. शुभ कार्यावेळी असले उद्योग घरी आवड्तील की नाही माहीती नाही , पण काहीतरी नकीच करु.)

समाजमदत

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

21 Aug 2010 - 4:53 pm | अमोल केळकर

शुभ कार्य करताना त्याचा गाजावाजा न करणे उत्तम

अमोल

अप्पा जोगळेकर's picture

22 Aug 2010 - 12:53 am | अप्पा जोगळेकर

शुभ कार्य करताना त्याचा गाजावाजा न करणे उत्तम
गाजावाजा करुन शुभ कार्य केले तरीही उत्तमच.

भारतीय's picture

21 Aug 2010 - 6:01 pm | भारतीय

अजून एक पर्याय=
==अनाथ बालकांसाठी करा काहीतरी..

(अवांतरः- शुभकार्यानिमित्त दान धर्मासाठी स्मशानभूमी व पोस्ट मार्टेम असलेच पर्याय का सुचले हो? )

तुमचा विचार चांगला आहेच..

पण मदत जिवंत माणसांकडे वळवलीत तर जास्त बरं.. म्हणजे आनाथाश्रम वगैरे..

वेताळ's picture

21 Aug 2010 - 7:16 pm | वेताळ

मदत करणे ही चांगली गोष्ट आहे.

अहो ते मेलेल्या माणसाला नाही मदत करत आहेत, मेलेल्याला आता कोणीही मदत नाही करु शकत , पण ही मदत त्या वेळी अत्यंत दु:खात असणार्‍या त्याच्या नातेवाइकांसाठी आहे.

(काय बाइ तर माणस? सांगायला गेल तर टांगायला नेत्याती?)

वारा's picture

21 Aug 2010 - 11:56 pm | वारा

धन्यवाद...@aparna akshay
अगदी हेच म्हणायचे आहे, खरतर मेलेल्या माणसाला काहीही सुख दु:ख नसत खरी गरज तर नातेवाईकांनाच असते.

ते अनाथ आश्रम वगैरे आपल्याला काही पटत नाही बाबा,
हे असल काहीतरी करणारी लोकं करुन करुन भागली आणि देवपुजेला लागल्यापैकी असतात. आणि काय अनाथ आश्रमाला मदत म्हणजे आरुन फिरुन व्यभीचारालाच मदत अस आपल स्पस्ट मत आहे.

काय आहे , अनाथ आश्रमात वगैरे जाण्याचा योग शोबाजी करणार्यांनाच येतो.
पण स्मशानात तर एक ना एक दिवस प्रत्येकाला जावच लागत , आणि जायचेच आहे पण या गोष्टीकडे सहसा दुर्लक्षच होत.
काही काही जागी ईतके विचीत्र प्रकार बघायला मिळतात की बास सांगायलाच नको.. असो

बाकी कोल्हापुरात हे सगळ फुकट होत आणि न बोलावता लोक जमा होतात. ईतर शहरात जरा अवघडच आहे, पुण्यातला अनुभव अजुन घेतलेला नाही पण पुण्यात विद्युत दाहीनी वगैरे आहे अस ऐकुन आहे.

असो माहीतीच्या प्रतिक्षेत.

>>हे असल काहीतरी करणारी लोकं करुन करुन भागली आणि देवपुजेला लागल्यापैकी असतात.
>>अनाथ आश्रमाला मदत म्हणजे आरुन फिरुन व्यभीचारालाच मदत
>>अनाथ आश्रमात वगैरे जाण्याचा योग शोबाजी करणार्यांनाच येतो.

काही कळलं नाही ब्वॉ आपल्याला काय म्हणायचय. वरील वाक्यांचा अर्थ जाणुन घेण्यास उत्सुक आहे
या धाग्यावर चर्चा नको असेल तर व्यनीतुन अथवा खरडीतुन करता येइल.

शानबा५१२'s picture

22 Aug 2010 - 1:55 am | शानबा५१२

कौतुकास्पद विचार आहेत आपले.

ज्या ठीकाणी तुम्ही बोलत आहात तिथे येणा-यांची ऐपत असते की ते त्यांना तिथे काही सुविधा नाही मिळाल्या तरी ते काहीतरी करु शकतात.आणि अशा ठीकाणी तशी माणसांची रहदारी कमी व आपल्या मदतीचा लाभ जास्तजणांना होणार नाही.

त्यापेक्षा आपण आश्रमात ह्या सुविधा दील्यात तर फार फायदा होईल्,कींवा
१.एसटी स्टॅन्डवर व तत्सम ठीकाणी पाण्याची सोय करा.
२. एखादी newspaper agency काढुन एखाद्या गरजु व्यक्तीला द्या व ती चालवायला गरजु मुलांना कामावर घ्या.
३.गरीब वस्तीत शौचालय बांधा.

मिसळभोक्ता's picture

24 Aug 2010 - 3:25 am | मिसळभोक्ता

स्मशानभूमी च्या बाहेर एक वडापावाचा स्टॉल हवा.

आनंदवनाला पैशांची गरज आहे असं ऐकलं होतं. मध्ये मिपावर धागापण आला होता. त्यांना मदत करा. १००% योग्य मदत आणि मनाला प्रचंड समाधान.

लाल टोपी's picture

17 Dec 2012 - 5:21 pm | लाल टोपी

काही वर्षापूर्वी ससूनच्या पोस्ट्मार्ट्म विभागात जाण्याचा प्रसंग आला होता. खरोखरीच अतिशय मदतीची आवश्यकता असणारी आणि दुर्लक्षीत अशी जागा आहे.आग्रहाची विनंती आहे की येथेच काही करा. अगदी सत्पात्री दान ठरेल

दोन वर्षांपूर्वी त्यांची जी काय मदत करायची ती करुन झालेली असताना अजूनही मदतीच्या सूचना येत आहेत?

ऑ?