तक्षकयाग : एक सुरेख नाटक.

मनोज श्रीनिवास जोशी's picture
मनोज श्रीनिवास जोशी in जनातलं, मनातलं
9 Dec 2012 - 10:42 pm

संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो असे म्हणतात ! अनेक संघर्ष एकवटून “तक्षकयाग” हे प्रा.ल. मयेकर यांच्या कसदार लेखणीतून साकारलेले सुरेख नाटक काल पहिले.
सहकुटुंब “ मुद्दाम पहावे” अश्या शिफारासीने ही हया नाटकाची ओळख !

महांकाळ व हब्बाल हे दोन समाज एका देशात राहत आहेत राहत आहेत. ओमर (?) नी धर्माच्या आधारावर देशाची फाळणी रचली आहे हीच नाटकाची सुरवात ! फाळणी पासून सुरु होणारे नाटक लेखकांच्या मनाचा ठाव घेत घेत पहिल्या अंकात सापते तेंव्हा सेश स्वतंत्र झालेला असतो. दुसऱ्या संकट स्वतंत्र देशाचे नवे राजकारण सुरु होते आणि दहशतदाशी येवून थांबते.
फाळणी पासून सुरु होणारे नाट्य मोजक्याच पण कमालीच्या उंच व्यक्तिरेखांनी नटलेले आहे . महाराज “मलयकेतू” हे शांती व निधर्मी प्रवृत्तीचे शासक आहेत. ह्याच राज्यात “ महागुरू भानुगुप्त” हा प्रखर राष्ट्रवादी धर्म गुरु आहे. मलयकेतू ने असहायपणे फाळणी स्वीकारली आहे आणि हब्बाल जमातीचे नेते “कौसर” हे फाळणीस अत्यंत उतावीळ झाले आहेत. महागुरू भानुगुप्त त्याला विरोध करून राहिलेले आहेत. हया विरोधाचा शेवट भानुगुप्ताना “कारावासात”टाकण्यामध्ये होतो.

महाराज मलयकेतू यांचा पुत्र “युवराज कुणाल” हा महागुरू भानुगुप्त ह्यांचे विचार शिरसावंद्य मानणारा आहे. महागुरू भानुगुप्त यांची तेजस्वी कन्या “वृषाली” शी युवराज कुणालचे प्रमाचे नाते फुलते आहे. तोवर फाळणी , जातीय दंगली भोगून देश स्वतंत्र झाला आहे. एकीकडे दोस्तीचा डाव रचत “कौसर” युद्धाची तयारी करत आहेत. ह्यावेळी मात्र महागुरू भानुगुप्त कल्पकतेने महाराज मलयकेतू ना कैदेत टाकतो व “युवराज कुणाल” राजा होतो.
पुढे देशात काय होते ? युवराज कुणाल व वृषाली यांच्या प्रमाचे काय होते ? महागुरू भानुगुप्त पुढे काय होते ते जाणून घेण्यासाठी नाटक जरूर पहावे.

अत्यंत ओजस्वी भाषा , नेपथ्य व वेशभूषा ही नाटकाची बलस्थाने आहेत. सगळ्या कलाकारांच्या भूमिका समर्पक ! अविनाश नाराकारांचे दिग्दर्शन व महागुरू भानुगुप्त चे मध्यवर्ती भूमिका अफलातून !

महागुरू भानुगुप्त ही स्वा.सावरकरांचे विचार ( कवीहृदय , मुलीवरचे प्रेम , कारावास म्हणून जीवनही ) परावर्तीत करणारी भूमिका आहे . तर महाराज मलयकेतू ही गांधीजी व पंडित नेहरू यांची आठवण करून देणारी भूमिका ! हयादोन विचारामधील आणि इतर अनेक संघार्षानी ठासून भरलेले हे नाट्य “मुद्दाम पहावे” अश्या शिफारासीने संपवतो !

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

चांगले नाटक आलेले दिसते..
पात्रांची कुणाशीही तुलना न करता पहाणे खरं तर चांगले ..पण कठीण होईल.
इतर कलाकार कोण कोण आहेत?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Dec 2012 - 8:31 am | अत्रुप्त आत्मा

कालच मी मराठी वाहिनीवर नाटकाचं रिपोर्टिंग आणी काहि दृष्य बघितली,अता तुंम्ही दिलेल्या वृत्तांतामुळे पहाणे होइलच.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2012 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार

ओळख आवडली.

मात्र 'अविनाश नाराकर' उर्फ ज्यु. विक्रम गोखले हे नाव दिसले आणि नाटकावरती काठ मारली. सतत विक्रम गोखलेच्या अभिनयाची कॉपी मारणारा, तसेच पॉज घेणारे अविनाश नारकर आणि कुठल्याही प्रसंगात कॅमेर्‍याकडे बघत हसणारी त्यांची अर्धांगिनी हे दोघेही डॉक्यात जातात.

तिमा's picture

10 Dec 2012 - 6:45 pm | तिमा

परा, माझे टंकण्याचे कष्ट वाचवलेत.

आदिजोशी's picture

10 Dec 2012 - 7:30 pm | आदिजोशी

प्रतिसादावर प्रतिसादः
सुंभ जळला तरी पीळ नाही गेला = पुणेकर नाही राहिला तरी पुणेरीपणा नाही गेला