मित्र :)

रसायन's picture
रसायन in जे न देखे रवी...
6 Dec 2012 - 10:53 pm

अकस्मितपणे त्याची
तिच्याबरोबर भेट झाली
पहिल्या भेटीतचं जणू
ती त्याला आपली वाटू लागली

वरचेवर होऊ लागल्या
त्यांच्या भेटीगाठी
वाटले त्याला ती,
फक्त बनलीय त्याच्यासाठीचं

मनातं त्याच्या आलं
सालं एक्दाचं धाडसं करावं
आपल्या मनातलं प्रेम
तिच्यापुढं व्यक्त करावं

धाडसं करूनं तो म्हणाला,
"स्विकारशीलं का माझ्या प्रेमा?"
पण मित्र बनवून तिने
त्याचा पुरता केला मामा

ठाऊक नव्हतं बिचार्‍याला
प्रेम करायचं सूत्र
आयुष्यभरं बनूनं राहीला
तो तिचा "मित्रं" :):):);)

(कविता- स्वरचित)

हास्यकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2012 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा

@आयुष्यभरं बनूनं राहीला
तो तिचा "मित्रं" >>> ह्हा...!ह्हा...!ह्हा...! आंम्हाला दिसले आपल्या मनीचे ;-) चित्र :D

ह भ प's picture

7 Dec 2012 - 9:16 am | ह भ प

हळुवार.. नर्मविनोदी कविता..
रसायनशेठ.. भारीच भट्टी जमवता राव तुम्ही शब्दांची अन भावनांची..
आपल्याला तर आवडेश..

सर्वज्ञ's picture

7 Dec 2012 - 9:21 am | सर्वज्ञ

बोलायला शब्दच राहीले नाहि अप्रतिम मित्रा:)

रसायन's picture

7 Dec 2012 - 9:30 am | रसायन

:);)

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Dec 2012 - 10:49 am | श्री गावसेना प्रमुख

नाव तीच घेण्यासाठी सांगु किती लोका लोका
गेली माझी वाचा देवा झालो मी मुका मुका
दादा

अनिल तापकीर's picture

13 Dec 2012 - 10:13 am | अनिल तापकीर

एकदम सही जमलीय वा....................

रसायन's picture

17 Dec 2012 - 3:38 pm | रसायन

;)