मुक्तक - प्रकटन लेखनप्रकार मुद्दामच निवडला या लेखासाठी. कारण जे काहि टंकलय ते दिसायला जरी धार्मीक वगैरे असलं तरी ते आहे "टंकाव्या चार ओळी अधुन मधुन" याच उद्देशाने.
सध्या क्लिंटन राव देवाच्या रिटायर्मेण्ट सारख्या अत्यंत ज्वलंत आणि जागतीक सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन अत्यंत संवेदनशील अशा उद्योगात पार गुंतुन गेलेत. देवांचा खजीनदार कुबेर अगदी ब्लँक चेक घेऊन क्लींटनरावांच्या दारी आला व "आमची नोकरी वाचवा हो" अशी आर्त विनवणी करु लागला. काय करणार बिचारा... मिपावरचे शांडील्यादी मुनीवर्य बिचर्या देवांच्या पोटावर पाय द्यायला निघलेत म्हटल्यावर देवांना काहि एक्शन घेणं भाग होतं :) तिथे अशी ज्ञानगंगा वाहताना दिसतेय, तेंव्हा आम्हि देखील आमचे हात धुवुन घ्यावे असा अनावर मोहं झाला... आणि टंकल्या चार ओळी.
विषय अर्थात जगातला सर्वात त्रस्त प्राणी, ज्याला बरेच लोक देव म्हणतात, त्याच्याबद्दल आहे.
क्लींटनचा मूळ मुद्दा असा कि 'देव' या 'कल्पनेचा' 'बीग ब्रदर इस वॉचींग यु' यासारखा सकारात्मक उपयोग होत असेल तर तसा उपयोग का करु नये... त्याला सिम्पल उत्तर असं कि त्या 'कल्पनेचा' खरच उपयोग होत असेल तर ज्याचा त्याने अवष्य करावा. राहिला भाग त्या 'कल्पनेच्या' दुरुपयोगाचा, तर उपयुक्ततावादाच्या सर्व मर्यादा (दुधारी तलवारीप्रमाणे स्वघात करणे) या 'कल्पनेला' देखील लागु होतात.
या सर्व वादाचं मूळ म्हणजे 'देव' हि 'कल्पना' म्हणुन स्विकारणे. आणि त्यावादाचं एकमेव सोल्युशन म्हणजे 'देव' हि कल्पना नसुन ते एक 'तत्व' आहे... किंबहुना ते मूळतत्व आहे हा उलगडा.
श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे देव, किंवा भक्ती म्हणुया, या सत्याला अक्षरशः प्रचंड वैविध्यपूर्ण मार्गाने प्रतिपादीत केल्या जाउ शकतं.. किंबहुना तसं केल्या गेलय.
बुद्धाने सत्याला "शुन्य" म्हटलं. पण या शुन्याला "व्होईड" म्हणुन कन्सीडर केल्या गेलं आणि इथेच आकलनाची गोची झाली. तांब्याची तार हवेत धरा, त्यातला करंट "व्होईड" आहे. ती तार "ग्राउण्ड" केली असेल तर तो "झीरो" आहे. बुद्धाने अस्तीत्वाला व्होईड म्हटलेलं नाहि. बुद्धाचा शुण्य (कशाच्याही, कुणाच्याही आत-बाहेर काहिच नाहि) नकारात्मक नाहि, अस्तित्वहीन नाहि... तर तो बॅलेन्स पॉईंट दर्शवणारा आहे. तो सम-आणि-विषमचा मध्य आहे. तो तराजुच्या दोन पारड्याचा इक्वीलिब्रीयम पॉईंट आहे... बुद्धाचा रोख या इक्वीलिब्रीयमवर फोकस करणारा आहे.
शंकराचार्यांनी देखील हेच तत्व मांडलं, पण त्यांचा एम्फसीस या इक्वीलिब्रीयम पॉईंटच्या "युनिफॉर्मनेस" वर आहे. हि युनिफॉर्मीटी सदा-सर्वदा अभंग राहाते कारण मूळतत्व एकमेवाद्वितीय आहे. हाच अद्वैतवाद.
पण हे सदा सम अवस्थेत राहाणारं, अभंग आणि एकमेवाद्वितीय तत्व आहे तरी काय? भक्तीचा एम्फसीस याच तत्वाच्या "कंटेण्ट"वर आहे... आणि ते कंटेण्ट म्हणजे "चैतन्य". मूळतत्व १००% "जीवंत" आहे, ते बत्थड नाहि. जीवनानी परीपूर्ण रसरसलेलं चैतन्य, उत्पत्ती-प्रलय आदि क्रिडा करुन देखील आपलं अभंगत्व टिकवुन ठेवते कारण त्याची प्रेरणाच मुळी आनंद आहे. "सदा-सर्वदा इक्वीलीब्रीयम जोपासणारं (बुद्धाचा शुण्यवाद), युनीफॉर्म (शंकरचार्यांचा अद्वैतवाद) असं हे सच्चीदानंद (खरं, निरंतर, आनंदमय) चैतन्य आहे" हा भक्तीचा गाभा होय. मानवी (किंवा कुठल्याही सजीवाच्या) मनात या सच्चीदानंद तत्वाची जी प्रतीमा उमटते, वा स्फुरण तरंग उमगतात त्यालाच "प्रेमाभक्ती" म्हणतात. "प्रेम" दुसरं तिसरं काहिही नसुन "कनेक्शन"ची भावना आहे, जाणीव आहे. "जो विभक्त नाहि तो भक्त" हे भक्तीमार्गीयांचं स्लोगन याच "कनेक्शन" प्रेरणेवर आधारीत आहे. दुर्दैवाने त्याचं नीट आकलन न झाल्यामुळे त्यात विरोधाभास दिसतो. कनेक्शन कोणाचं ? आणि कोणाशी? तर ते माणसाचं (जीवाचं) त्या सच्चीदानंद तत्वाशी. "डिस्कनेक्ट" भासल्यामुळे "जन्म मृत्युचा फेरा". हे "डिस्कनेक्ट" संपलं कि आवरणात असलेलं चैतन्य मूळ चैतन्यात मिसळलं... एज सिम्पल एज दॅट.
या चैतन्यतत्वाची आणखी एक मोठी खासीयत... कि त्याला आपल्या स्वतःचं पूर्ण "ज्ञान" आहे. It knows itself. चैतन्य सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट अशा दोन्ही भुमीका स्वतःच निभावतं... आणि म्हणुनच ते भिन्नत्व आणि अभिन्नत्व या दोन्ही कसोट्या लिलया पार पाडतं. हाच तो "विशिष्टाद्वैतवाद"... एक असुनही अनेक, वा अनेक असुनही एक.
भक्तीमार्ग समजुन घेताना इतक्या सर्व बाबी ध्यान्यात घ्याव्या लागतात... कारण भक्ती इतर सर्व आकलनांचा सुपरसेट आहे. कुठल्याही मार्गाने गेलं तरी त्याची परिणीती भक्तीतच होते... मौज म्हणजे, या परिणीत अवस्थेला भक्ती म्हणतात याचचं ज्ञान अनेकदा होत नाहि... पण "भक्ती" हा शब्द महत्वाचा नाहि, ति अवस्था महत्वाची, आणि ज्या सच्चीदानंदाशी "भक्त" व्ह्यायचं तोच तो परमेश्वर.
आता दुसरा मुद्दा... कि असं जर असेल तर कर्मकांड, पूजाअर्चा, वगैरे वगैरे सगळं येतं कुठुन? पूजेबद्दल आपली कल्पना काय? तर मंदीरात घंटा बडवणे, आरती नामक गीत गाणे... पण पूजेचा अॅक्च्युअल अर्थ "पूज्य भाव प्रकट करणे" इतका सरळ आहे. पूज्य भावाच्या मूळाशी "इंड्युसमेण्ट" आहे. या इंड्युसमेण्ट्चा विकास भक्तीत होणे अशी ति प्रोसेस. आता मूळात इंड्युसमेण्टच नसेल तर कितीही अवडंबर केलं तरी हाती गोंधळाशीवाय काय लागणार? मग त्याचा दोष पूजेला का द्यावा?
थोडं पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्माविषयी...
तसं बघितलं तर भक्ती, पुनर्जन्म, पाप-पुण्य... या अतिशय भिन्न बाबी आहेत. पण त्यांची सरमिसळ करुन एकत्र विचार करायची आपली खोड आहे. पुनर्जन्म, स्वर्ग-नरक म्हणुन जे काहि आहे त्याचे सो कॉल्ड वैज्ञानीक पुरावे मिळणे अवघड आहे... पण कन्सेप्ट्च्युअली ते समजुन घ्यायचं असेल तर त्याला दोन प्रिकंडीशन आहे... १) "निसर्ग एक लाईव्ह सीस्टीम आहे" हा विश्वास.
२) माणसाला आपले (भविष्य आकारण्याचे) कर्मस्वातंत्र्य आहे हा विश्वास
आपण जे काहि कर्म केलय... कुठल्याही उद्देशाने, त्याची निसर्गात "नोंद" झाली आहे, व निसर्ग एक लाईव्ह सिस्टीम असल्यामुळे आपल्या कर्माला प्रतिउत्तर मिळेलच मिळेल, अगदी मृत्यु देखील त्यात आडकाठी आणु शकत नाहि. हे जर उमगलं तर मरतेळी एक शरीर सोडलं, तरी निसर्ग आपली ट्रान्सफर "दुसरीकडे कुठेतरी" करेल आणि आपला हिशोब चुकता करेल. हे "दुसरीकडे कुठेतरी" म्हणजेच स्वर्ग-नरक वगैरे स्टेशनं... व हा हिशोब चुकता होताना सुख जाणवतय कि दु:ख यावरुन आपण पाप पेरलं होतं कि पुण्य याचे तर्क.
राहता राहिलं हे अवतार वगैरे भानगड काय आहे... सोप्या शब्दात सांगायचं तर सच्चीदानंद तत्वाने एक विशिष्ट रुप घेउन केलेलं प्रकटन म्हणजे अवतार. पण हे शक्य आहे काय? टेक्नीकली यस... चैतन्याचा पसारा आपल्या लॉजीकमध्ये कधी बसणार नाहि... त्याला जर वाटलं अवतार वगैरे घ्यावा तर आपण आडकाठी करु शकत नाहि :) आपल्याला नाहिच पटलं कि मूळतत्व असल्या भानगडीत पडत असेल तर अवतार संकल्पना आपल्यापुरती तरी बाद...
पण मग हे सच्चीदानंदाच्या नवाने हेवेदावे, भांडण तंटा, अगदी एकमेकांचा जीव घेण्याइतपत गोंधळ का? यालाही एकच उत्तर... असला गोंधळ घालणे माणसाची हौस आहे. १०००० मुलं निवडा... देवा-धर्मापासुन अगदी अलिप्त वातावरणात जगातल्या सर्वात नाववंत वैज्ञानीकांच्या देखरेखेखाली त्याचं पालनपोषण करा. मोठी झाल्यावर त्यांच्यात भांडण तंटे वगैरे गोष्टींची प्रॉबॅबीलीटी धार्मीक वातावरणात वाढलेल्या मुलांइतकीच आढळेल.... माणसाची हौस, बाकी काहि नाहि.
प्रतिक्रिया
28 Nov 2012 - 4:09 pm | नाना चेंगट
मस्त लेख.
एकदा अध्यात्म आणि विज्ञान यावर लेख लिहावा अशी नम्र विनंती.
मान्य कराच नाहीतर भांडण होईल .. ते आपली हौस हो .. बाकी काही नाही :)
28 Nov 2012 - 4:22 pm | अर्धवटराव
ह्म्म्म.. म्हणजे ही वैज्ञानीक जिलब्या पाडायची हौस म्हणावी का नानासाहेब???? :)
अर्धवटराव
28 Nov 2012 - 4:40 pm | नाना चेंगट
शांतम् पापम् शांतम् पापम्
अहो जिलब्या अध्यात्मिक असतात... वैज्ञानिक ते समाज प्रबोधन का काय म्हणतात ते...
28 Nov 2012 - 10:16 pm | विकास
थोडक्यातः
विज्ञान - म्हणजे सगळ्यात काय आहे आणि कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न करण्यास उद्युक्त करते ते
अध्यात्म - जे कुणाच्या अध्यात अथवा मध्यात न रहाण्यासाठी उद्युक्त करते ते.
आता प्रश्न असा पडतो, की विज्ञानवादी म्हणून समजणार्याच्या कृतीत विज्ञानाला अपेक्षीत असलेली शोधक वृत्ती कितीदा असते आणि स्वतःस अध्यात्मिक समजणार्या अशा किती व्यक्ती आहेत ज्यांचे इतरत्र (पक्षी: इतरांच्या भानगडीत) लक्ष जात नाही? ;)
29 Nov 2012 - 4:15 am | अर्धवटराव
मुद्दे मांडावे ते विकासरावांनीच :)
अर्धवटराव
28 Nov 2012 - 4:19 pm | कवितानागेश
पुढचा विषय, देवाची अॅप्लिकेशन्स. :P
28 Nov 2012 - 4:24 pm | अर्धवटराव
मिपावर ढिगाने लेख पाडायला विषय मिळाला... जगाची बौद्धीक संपदा किती वाढली त्यामुळे... हे एव्हढं अप्लिकेशन बस झालं कि :)
अर्धवटराव
28 Nov 2012 - 4:31 pm | श्री गावसेना प्रमुख
चित्रगुप्त महाराजांची डायरी सापडलीये,
क्लिंटन रावांविषयी लिहील्याच दिसतय,पुर्ण वाचुन बघतो
भस्मासुराला क्लिंटनरावांसाठी जिवंत करण्याची देवांची योजना आहे.
28 Nov 2012 - 4:37 pm | अर्धवटराव
ते ही थोडं बघा कि... मटक्याचे नंबर वगैरे ???
अर्धवटराव
28 Nov 2012 - 4:41 pm | श्री गावसेना प्रमुख
वाचतच होतो तेव्हढ्यात हिसकवली की हो.
म्हणाले धंदा बुडल खत्र्याच्या मानसांचा
28 Nov 2012 - 6:11 pm | क्लिंटन
बाप रे आली का पंचाईत.आता काय करावे बरं?बाय द वे, भस्मासूर म्हणजे ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचे भस्म करणाराच ना?
28 Nov 2012 - 6:23 pm | श्री गावसेना प्रमुख
होय तोच पण तुम्ही नका घाबरु हो,मोनीका आहे ना तिला समोर घेउन बसा.
28 Nov 2012 - 9:32 pm | दादा कोंडके
प्रतिसाद आवडला नाही. धन्यवाद.
29 Nov 2012 - 9:52 am | विकास
मला एकदम हेच चित्रगुप्त वाटले. ;)
28 Nov 2012 - 5:48 pm | कवितानागेश
चैतन्याचा पसारा आपल्या लॉजीकमध्ये कधी बसणार नाहि
हे बरोबर आहे.
कारण लॉजिक हे अनुभवावरुन ठरते आणि अनुभव कायमच तोकडा असतो.
तेंव्हा उगाच पूर्ण विश्वाच्या पसार्याबद्दल विचार करण्यापेक्षा आपापाल्या घरातला पसारा... आपले ते हे .... :P...... आपल्या आयुष्याची व्याप्ती जिथवर आहे, तिथे सगळे आलबेल कसे राहिल हे पाहवे.
समाज म्हणून एक व्यवस्था तयार होताना, प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीचा एकमेकांवर परिणाम होतो, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कुठलातरी 'x' बडगा हवाच. जशी हत्तींच्या कळपात एक 'मोठी आई' असते.
माणूस जास्त गुंतागुंतीचा आणि कल्पक आहे, त्यामुळे त्यानी त्याच्या समूहासाठी एक 'अदृश्य जगदंबा' आहे असे मानले.
पण तरी एक प्रश्न पुन्हा उभा राहतो की, ही अशी 'कल्पना' कुठून आली?
कल्पना देखिल तर्काप्रमाणेच अनुभवावर आधारीत असते का?
च्यायला, खरोखरच जगदम्बा असली तर?? आणि तिनी ही सगळी चर्चा वाचली तर???
असो.
अर्धवट राव, द्या बरे उत्तरे. :)
28 Nov 2012 - 6:01 pm | नाना चेंगट
>>>कारण लॉजिक हे अनुभवावरुन ठरते आणि अनुभव कायमच तोकडा असतो.
नक्की का? तर्क नेहमीच अनुभवावरून असतो का?
>>>तेंव्हा उगाच पूर्ण विश्वाच्या पसार्याबद्दल विचार करण्यापेक्षा आपापाल्या घरातला पसारा... आपले ते हे .... smiley...... आपल्या आयुष्याची व्याप्ती जिथवर आहे, तिथे सगळे आलबेल कसे राहिल हे पाहवे.
का? सगळे आलबेल रहावे ही अपेक्षा सोडून पूर्ण विश्वाच्या पसार्याबद्दल विचार करणे गैर का मानावे?
>समाज म्हणून एक व्यवस्था तयार होताना, प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीचा एकमेकांवर परिणाम होतो, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कुठलातरी 'x' बडगा हवाच. जशी हत्तींच्या कळपात एक 'मोठी आई' असते.
हत्ती आणि मनुष्य यांच्यात मनुष्य हा विचार करणारा प्राणी असा फरक असेल तर कुठला तरी बडगा असावा अशी अपेक्षा बाळगणे हे त्या विचार करणार्या मनुष्याच्या एकंदर क्षमतेला कमी लेखणारे आहे असे वाटत नाही का? विना बडग्याची व्यवस्था होऊ शकणार नाही का?
>>माणूस जास्त गुंतागुंतीचा आणि कल्पक आहे, त्यामुळे त्यानी त्याच्या समूहासाठी एक 'अदृश्य जगदंबा' आहे असे मानले.
मानले की मानावे लागले की माना असे लादले गेले की अजून काही?
>>>पण तरी एक प्रश्न पुन्हा उभा राहतो की, ही अशी 'कल्पना' कुठून आली?
कुणाच्या तरी डोक्यातून आली असावी असा तर्क करता येतो
>>>कल्पना देखिल तर्काप्रमाणेच अनुभवावर आधारीत असते का?
पूर्णपणे नसली तरी आधार असावा अशी शक्यता नेहमी दिसून येते
>>च्यायला, खरोखरच जगदम्बा असली तर?? आणि तिनी ही सगळी चर्चा वाचली तर???
आम्ही तुम्हालाच जगदम्बा समजत होतो. आता गृहीतके बदलून मांडणी करावी लागणार.. हर हर..
>असो.
तर असो
>>अर्धवट राव, द्या बरे उत्तरे. smiley
आम्ही पण अर्धवट असल्याने मधेच घुसलो आणि आमच्या नसलेल्या ताटावर बसून उष्टं केलं. आता आमचं झालेलं ताट उचलतो आणि कोपर्यात बसून निवांत खात बसतो. अर्धवट रावांना नवं ताट वाढा पटकन.
29 Nov 2012 - 2:42 am | अर्धवटराव
तर आम्हि म्याउ ला पुढे करु ;)
अर्धवटराव
28 Nov 2012 - 6:04 pm | क्लिंटन
मला तत्वज्ञान वगैरे फारसं समजत नाही. फारसं काय अजिबात समजत नाही.त्यातून मी तर एक फायनान्सवाला. दर तासाचे पैसे मिळतात म्हणून रविवारी पण क्लासमध्ये जाऊन शिकविणारा अगदी मनी-माईंडेड मनुष्य.तेव्हा या चर्चेत फार काही लिहिण्यासारखे माझ्याकडे नाही.तरी माझा लेख हा या लेखाचे तात्कालिक कारण असेल आणि त्यातून इतरांना काही उपयोग होत असेल तर मात्र उगीच माझ्याच अंगावर मूठभर मास चढल्यासारखे वाटले :)
असो. ते द्वैत्/अद्वैत ही तत्वज्ञाने,शंकराचार्य, बुध्द वगैरे मंडळींशी माझा तर दुरून दुरून संबंध नाही.एखादी वाईट गोष्ट केल्यास त्याचा परिणाम कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भोगावा लागेल ही गोष्ट माझ्यासाठी अगदी ऑबव्हियस आहे.त्याचा पुरावा माझ्याकडे आहे का? नाही. पण तरीही मला ही गोष्ट अगदी स्वाभाविक वाटते.मग ती अंधश्रध्दा आहे का? असेलही कदाचित. हू केअर्स? पण एक गोष्ट नक्कीच जाणतो की मी कोणाला तरी अकाऊंटेबल आहे ही भावना भविष्यात माझ्या हातून होऊ शकत असलेल्या किमान अर्ध्या चुका तरी टाळेल.बस. माझ्यासारख्यासाठी ते खूप झाले :)
28 Nov 2012 - 6:32 pm | प्यारे१
ह्याचं नाव बदला रे कुणीतरी....!
क आणि ड आणि क लेख. छानच.
आर्त- मदत म्हणून हात पसरणारे,
अर्थार्थी- काहीतरी मिळो काहीतरी देईन चा बिझनेसवाले,
जिज्ञासू- मी कोण कुठून आलो ह्या जिज्ञासेपोटी शोध घेणारे
नि
भक्त- 'तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला हो आम्हासी' म्हणण्याच्या पातळीवर ज्ञान प्राप्ती झालेली असतानाची भूमिका मांडणारे भक्त.
(सत्य तू सत्य तू सत्य तू विठठला म्हणणारा तुकोबा त्रिकालाबाधित परब्रह्माला विठठलाच्या मूर्तीरुप सगुणावतारात पाहात असताना त्याच्या निर्गुण अधिष्ठानाचा मागोवा देखील घेतो.)
अशा श्रेणींमध्ये झालेलं तथाकथित भक्तांचं वर्गीकरण मुळात भक्तीच्या नावाखाली होणार्या वेगवेगळ्या 'प्रोसेसेस' मांडतं स्पष्ट करतं.
तात्कालिक कारणामुळं आलेलं स्मशान वैराग्य देखील थोडंसं ह्याच मार्गातल एक छोटंसं पाऊल म्हणावं लागतं.
बरंचसं छान उलगडलं गेलंय.
प्रतिमा, सगुणावतार, ईश्वर नि त्याउप्पर ब्रह्म अशी मांडणी समर्थांनी सांगितलेली आहे. ह्या प्रत्येका मध्ये देव आहेच. तो देव आपण आपापल्या भूमिकेवर पाहावा. :)
नाना साहेबांनी विनंती केलेली आहेच. वाट पाहत आहे. :)
28 Nov 2012 - 9:36 pm | अर्धवटराव
आम्हाला तसं सहसा कोणि गंभीर प्रश्न विचारत नाहि. आता नानांनी विज्ञान आणि आध्यात्मवर तुलनात्मक लिहा म्हटलं (भलेही फिरकी घ्यायच्या उद्देशाने म्हटले असेल :) ) तो चान्स पे डास्न करुनच घ्यावा :)
१) जीवनाचा कारण रुपाने विचार केला तर ते विज्ञान आणि उद्देश रुपाने विचार केला तर ते आध्यात्म. " का रे बाबा, तु इथे कसा?" या प्रश्नाचं कारणरुपी उत्तर विज्ञान देतं - सेक्स नामक प्रोसेसने माझ्या वडीलांच्या क्ष-य क्रोमोसोम्स चे सेट माझ्या आईच्या क्ष-क्ष क्रोमोसोम्स सेट शी संयोग करते झाले. त्याच्या फलनाला पाणि, कार्बन कम्पाउण्ड्स, आणि इतर खनिजांचा वेळच्यावेळी खुराक मिळाला आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मी हा या रुपात इथे आलो
" का रे बाबा, तु इथे कसा?" या प्रश्नाचं उद्देशरुपी उत्तर अध्यात्म देतं - मी तर स्वयंभू आहे, काळातीत आहे. माझ्यात कर्मशक्ती आहे. या शक्तीच्या जोरावर मी जे कर्म केलेत तिचे उत्तर प्रकृती देणार आहे. ते उत्तर झेलायला मी हा असा इथे आलोय.
दोन्हिही उत्तरे बरोबर आहेत.
२) विज्ञानाचाचं कार्यक्षेत्र म्हणजे एनर्जीचे ट्रान्स्फॉर्मेबल फॉर्म्स . एक फॉर्म दुसर्यात परावर्तीत कसा होतो याचे गुणोत्तर शोधण्यात विज्ञान मग्न असते. अध्यात्माचं कार्यक्षेत्र म्हणजे एनर्जीच्या अॅब्सोल्युट फॉर्म (अॅब्सोल्युट्नेस म्हणा हवं तर). या एनर्जीला आपल्या अॅब्सोल्युट्नेसची जाणीव कशी होईल हे पाहाणं आध्यात्माचं काम.
३) काळ आणि स्थळ (टाईम अॅण्ड स्पेस) या दोन बेसीक फॅक्टरच्या आधारे सर्व घटक-घटनांची व्युत्पत्ती लावता येते हा विज्ञानाचा अटळ विश्वास. कारण त्याच्या मते हे दोन फॅक्टर एनर्जीला हरप्रकारे प्रभावीत करतात. त्याच्या उलट, आध्यात्म स्थळ काळ अबाधीत अशा एनर्जीच्या अॅब्सोल्युट्नेसवर आधारीत असल्यामुळे स्थळ काळाच्या प्रभावाला वाकवणार्या कर्मशक्तीवर अध्यात्माचा अटळ विश्वास.
४) प्रयोगातुन रिपीटॅबिलीटी साधुन निश्कर्श माण्डणे हि विज्ञानाची पद्धत, तर केवळ स्वानुभुती हि आध्यात्माची
बाकी आध्यात्म आणि विज्ञानात कॉमन फॅक्टर देखील आहेत... जसं "मीच खरा, तु तद्दन खोटारडा आणि फालतु" असा स्वाभिमान :). बेसीकली सायन्स एकच आहे... तेच उर्जेच्या परिवर्तनीय रुपांचा अभ्यास करते (मटेरीयल सायन्स) आणि तेच उर्जेच्या अपरिवर्तनीय स्वरुपाचा अभ्यास करते (स्पिरिच्युअल सायन्स). भांडणारे मात्र या दोहोंच्या नावाने आपली हौस भागवत असतात :)
अर्धवटराव
29 Nov 2012 - 3:03 am | priya_d
अर्धवटराव
लेख आवडला.विचार अथवा मनन करण्याजोगे अनेक मुद्दे आहेत. लिहीण्याच्या निमित्ताने तुमचेही भरपुर मनन-चिंतन झाल्याचे जाणवते. तुमच्या म्ह्णण्याप्रमाणे ह्या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. पुलेशु.
प्रिया
30 Nov 2012 - 9:59 am | मूकवाचक
+१
29 Nov 2012 - 5:56 am | स्पंदना
तुमच चालु द्या.