आभाळबाबाची शाळा ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
12 Jun 2010 - 6:45 pm

कडाड कड कड कडाड कड
आभाळबाबाची छडी कडकडे
सैरावैरा मग धावत सुटले
छबकडे नभाचे इकडे-तिकडे.....!

नकोच मजला शाळा आता
नकोच अन ते क्लिष्ट धडे
गाऊ गाणी आनंदाची अन्
चल जावू या बाबा भुर गडे ....!

वारा मास्तर शिळ घालती
कवायतींचे अन् देती धडे
वीजबाई शिस्तीच्या भारी
पाहूनी तया हृदय धडधडे...!

निसर्गसरांचा तास मजेचा
रेखाटू चित्रे मिळूनी गडे
वीज घालीते गणिते अवघड
ढगबाळाला मग येइ रडे...!

माय धरित्री वाट पाहतसे
डोळे तियेचे आकाशाकडे
दांडी मारूनी शाळेला मग
ढगबाळ धावती आईकडे...!

माय-पुतांची भेट अनोखी
सुगंध मायेचा जगी दरवळे
पाऊस आला, पाऊस आला
आनंद होई मग चोहीकडे ....!

ऋतुंमध्ये श्रेष्ठ ऋतुराज "पावसाळा", त्याच्या आगमनाप्रित्यर्थ पावसात खेळायला आवडणार्‍या प्रत्येक बाळ-गोपाळास या पावसाळ्याच्या खुप खुप शुभेच्छा !

विशाल कुलकर्णी.

कविताबालगीत

प्रतिक्रिया

शुचि's picture

12 Jun 2010 - 6:48 pm | शुचि

खूप सुंदर : )

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

रामदास's picture

12 Jun 2010 - 7:08 pm | रामदास

असेच म्हणतो.

अश्विनीका's picture

12 Jun 2010 - 11:28 pm | अश्विनीका

अरे वा ..मस्तच . आभाळ बाबा आणी ढग बाळ -पावसावरील नेहमीच्या कल्पनेपेक्षा वेगळी कल्पना असलेली कविता आवडली.
- अश्विनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2010 - 1:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>आभाळ बाबा आणी ढग बाळ -पावसावरील नेहमीच्या कल्पनेपेक्षा वेगळी कल्पना असलेली कविता आवडली.

-दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी's picture

14 Jun 2010 - 9:56 am | विशाल कुलकर्णी

आभारी आहे मंडळी !

कवितांमधून नेहमीच धरा आणि पाऊस यांच्यामध्ये प्रियकर प्रेयसीचे नाते रंगवले गेले आहे. म्हणुन म्हटलं एक वेगळं नातं रंगवून पाहावं . धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Nov 2012 - 10:17 am | माम्लेदारचा पन्खा

अतिशय वेगळ्या प्रकारे प्रियकर प्रेयसी आता आई बाबा झाल्याची बातमी मिळाली.

अभिनंदन.

जयवी's picture

21 Nov 2012 - 1:19 pm | जयवी

आवडेश :)