कोणी तरी म्हटलं देवाला आता रिटायर करा
मी म्हणालो नस्त्या भानगडी कशाला ?
रिटायर करायला आधी त्याला कामावर कोण ठेविल ?
अन्स्किल्ड लेबर ला अजकाल जॉब नाय भेटत भाउ.
साधे भुकंप आणी वादळ ज्याला थांबवता येत नाहीत.
आपत्ती देवाच्या कोपाने होते हे भाव थोपवता येत नाहीत
त्याच्याविरुद्ध कोणी वागला तर ज्याच्या भावना काबूत रहात नाहीत
असल्या मत्सरी देवाला आपण नाय कामावर ठेवणार
माणुसकीच ग्रॅज्युएशन नापास झालेल्याला कोण दील काम ?
त्यात पास व्हायला आधी तर्काची शाळा पास व्हावी लागते भौ
दोन जमातींचे देव वेगळे असू शकत नाहीत एव्हढही त्याला कळत नाही
काफिर आणी दलितांना जन्म देणारा तो महामूर्ख
स्वतःच्याच हाताने हीन दीन पेगन बनवणारा तर्कदुष्ट
शहाणपणाची बाराखडी येत नसेल तर; शाळेत कोण घील ?
स्वतःच निर्मिलेल्या कफिरांविरुद्ध जिहाद,
हीदनांविरुद्ध क्रुसेड आणी अवर्णांशी धर्मयुद्ध
करण चुकीच आहे हे साध बालवाडी ज्ञान मिळवायला
विश्वाच्या अंतिम दिनापर्यंत थांबाव लागत त्याला
असल्या मतिमंदाला बाराखडी तरी कशी यील.
बाराखडी येण्यासाठी आधी जन्म घ्यावा लागतो भौ
बोला - ज्याचा जन्मच झालेला नाही - त्याला रिटायर कसं करायच ?
प्रतिक्रिया
15 Nov 2012 - 9:52 pm | शैलेन्द्र
विचार सुंदर आहेत, पण मांडनी राजघराण या नावाच्या हिशोबाने जर्रा कमी पडली :)
15 Nov 2012 - 10:41 pm | अर्धवटराव
मनुष्य नावाच्या प्राण्याचे गोंधळलेले मनोगत चांगले मांडलेत.
अर्धवटराव
15 Nov 2012 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा
डॉक्टर्स स्पेशल ;-)
सुपर शॉट 99
पीने के बाद ही पता चलेगा के तुम पीये हो! ;-)
15 Nov 2012 - 11:03 pm | जेनी...
नय बाबुमोशायर नय ....
पिने के बाद तो पि हूई हय ये पता चलने को शुद्धी मे आणा मंगताना :D
( अवांतर : रेवा आज्जीच्या विमानातल्या मैत्रिणीची जाम आठवण आली लिहिताना =)) )
;)
15 Nov 2012 - 11:33 pm | डावखुरा
काय मांडायचंय नक्की?
15 Nov 2012 - 11:44 pm | एस
...प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
15 Nov 2012 - 11:53 pm | आनंदी गोपाळ
बरंय.
16 Nov 2012 - 1:05 pm | निश
राजघराण साहेब, कविता अत्युत्तम पण....
देवावर सगळ्या गोष्टिची जबाबदारी टाकुन अजुन आपण प्रत्येक जण किती काळ आपल्या जबाबदारीतुन पळण्याचा प्रयत्न करणार?
16 Nov 2012 - 6:38 pm | प्रकाश घाटपांडे
प्रत्येकाचा देव वेगळा कस काय रिटायर करणार?
16 Nov 2012 - 8:18 pm | llपुण्याचे पेशवेll
हा हा . ज्याची त्याची विचारशक्ती. :)
16 Nov 2012 - 8:19 pm | तिमा
देवाला 'रिटायर' करता येणार नाही कारण तो 'थ्री टायर' आहे. ईश्वर्,अल्ला आणि येशु. वरचे दोन बंद केले तरी एक उरतोच! तिसरा पण बंद करता आला असता तर आपण सगळे एका लेव्हलला आलो असतो आणि मग त्याची जरुरच पडली नसती कोणाला!
16 Nov 2012 - 10:16 pm | मराठी_माणूस
देवाला रिटायर करा म्हणणारे अल्ला आणि येशु च्या बाबतीत मुग गिळुन गप्प बासतात
17 Nov 2012 - 10:15 am | श्री गावसेना प्रमुख
+१००००००० टक्के सहमत
16 Nov 2012 - 11:07 pm | पैसा
विशेषतः
हे फारच!
17 Nov 2012 - 12:07 pm | केदारविदिवेकर
ज्याचा जन्मच झालेला नाही - त्याला रिटायर कसं करायच ?
अनादि, अनन्त तो
ऋषीच कुळ अन मूळ शोधू नये म्हणतात...
17 Nov 2012 - 12:20 pm | अत्रुप्त आत्मा
अनेकांना मतित अर्थापर्यंतहि पोहोचता येत नाहीये,याचा खेद वाटतो.
अता या काव्याचे रसंग्रहण मांडायलाच हवे. ;-)
17 Nov 2012 - 3:23 pm | शैलेन्द्र
+११११११
17 Nov 2012 - 12:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो डाक्टर साहेब, देवाच्या खुर्चीला एकविसाव्या शतकातला प्रतिसाद पाहता अजून हजार पाचशे वर्ष काही धोका नाही असे वाटते.