मी ३ वर्षापूर्वी कतार ला असताना आमच्या ग्रुप मध्ये राजू मिरचंदानी म्हणून एक टेक्निशियन होता ,वय वर्षे फक्त ६३ ! अतिशय जॉली आणि हसतमुख .अगदी अनोळखी असणाऱ्या व्यक्तीशीही त्याच्या तासनतास गप्पा चालत . इजिप्शियन , फिलिपिनो , थायलंडी , पाकिस्तानी, कतारी, अमेरिकन ,ब्रिटीश कोणीही असो ! ऑफिसर ,म्यानेजर , असो कि झाडूवाला असो ,राजू म्हटलं की सगळ्यांना माहित !
हा राजू मुळचा सिंधी ! फाळणीनंतर वडील मुंबईला स्थाईक झाले . मग राजूचा जन्म .सुमारे १९५० चा ,राजूने इलेक्ट्रीशियन चे शिक्षण घेवून मुंबईत छोट्या-मोठ्या कंपनीत जॉब केले . १९७८ ला सर्वप्रथम कतार ला आलां , लग्न झाले ,पण बायको मुंबईतच! हा सतत बाहेर .वर्षातून २ वेळा घरी यायचा !त्यानंतर मग अबुधाबी/सौदी/ओमान /बहारीन असे अनेक देशात २-२ /३-३ वर्षे काढत १९९२ ला कतार ला मेकॉन कंपनीत जॉईन झाला ,तो आजही तिथेच आहे .मधल्या काळात प्रचंड बदल झाले , कंपनीचे नावही बदलून मेकॉन चे क्यूकॉन झाले .पण राजूभाई जिथल्या तिथेच आहे ! सुरुवातीला आला तेव्हा पगार ५०० रियाल होता ,आता वाढत वाढत १७०० रियाल झालं, ओवरटाईम धरून ३००० रियाल म्हणजे सुमारे ४०,००० रुपयापर्यंत आहे .
पण राजूची हौस दांडगी! दर ६ महिन्यांनी घरी जाताना निम्मा पगार शॉपिंग वर खर्च करणार ! भारतात शेयर बाजारात खूप उलाढाली केल्या आहेत त्याने ! साधा टेक्निशियन असूनही त्याने शेयर्स मध्ये १० लाख गुंतवले होते .हर्षद मेहता फ्रॉड च्या वेळी बरेच नुकसान झाले ,पण परत जिद्दीने पुन्हा तेवढेच पैसे गुंतवले ! पण शेवटी २००८ च्या जबरदस्त मंदी मध्ये त्याचे पूर्ण १२ लाख गेले ! हाती राहिले फक्त दीड लाख! पण ईश्वराचा न्याय पहा ! नेमका त्याच वेळी कतारला कंपनीत एक स्फोट झाला आणि राजूही त्यात सापडला , ४ महिने हॉस्पिटलमध्ये . कंपनीकडून विम्याचे ९ लाख मिळाले . "वो उपरवाला सब देखता है, एक हाथ से देता है ,और दुसरे हाथ से लेता है, लेकिन आदमी कि नियत हमेशा साफ होनी चाहिये ,तो उपरवाला कभी भी आपको गिरने नही देगा !"-राजूचे जीवनविषयक तत्त्वज्ञान !
या हरफनमौला राजूला १ मुलगा आणि १ मुलगी .दोघानाही व्यवस्थित शिकवले ,लग्ने केली ,मुलगा बॉलीवूड मध्ये असिस्टंट डायरेक्टर आहे ! पण विशेष असे कि त्याने ४ वर्षाच्या दोन अनाथ मुलींना दत्तक घेवून वाढवले ,शिकवले आणि लग्नेही लावून दिली , आणि गेल्याच वर्षी आणखी एका ६ महिन्यांच्या अनाथ मुलीला पुन्हा दत्तक घेतले आहे !
"मै जिंदगी का साथ निभाता चला गया".......रफीच्या धुंद स्वरांनी राजूची रास-लफान [कतार] मधली लेबर कॉलनीतील छोटीशी खोली भरून गेली होती , रोज संध्याकाळी २ पेग घेता घेता हिंदी गाणी ऐकणे हा त्याचा विरंगुळा !..................अशा अफलातून माणसाच्या अद्भूत आयुष्याबद्दल काय बोलावे ? कंपनीत मला "साहेब"म्हणणाऱ्या या राजूच्या अद्भूत व्यक्तिमत्त्वाला मी वाकून नमस्कार केला !!!!
प्रतिक्रिया
31 Oct 2012 - 10:39 pm | जेनी...
सॉल्लिडे मंदार मामा त्तु त्तो ;)
1 Nov 2012 - 6:46 am | अत्रुप्त आत्मा
एका जबरदस्त व्यक्तित्वाची ओळख झाली! मस्त एकदम. :-)
1 Nov 2012 - 7:48 am | श्रीरंग_जोशी
एकदम अवलिया दिसताहेत राजू मिरचंदानी.
1 Nov 2012 - 2:27 pm | मंदार कात्रे
प्रतिसादाबद्दल आभार
1 Nov 2012 - 2:34 pm | मी_आहे_ना
भारी आहे अवलिया एकदम!
(जाता जाता एक शंका - ३ वर्षांपूर्वी १९५० च जन्म असलेला माणूस ६३ वर्षांचा कसा असेल?)
1 Nov 2012 - 2:37 pm | चिरोटा
आवडली स्टोरी.
जन्म सुमारे १९५० चा आहे. फाळणीनंतर जन्म आहे. त्यामुळे १९४७/४८/४९ पण असू शकतो.
1 Nov 2012 - 2:57 pm | श्री गावसेना प्रमुख
१)त्यांचा कथेच्या नायकाचा जन्म १/१/४९ चा असु शकतो
२)टायपींग मिस्टेक
३)कथा भविष्यातील असु शकते
४)त्यांच्या कॉम्पुटर वर चुकुन तारीख२०१३ दाखवत असेल.
1 Nov 2012 - 3:53 pm | मी_आहे_ना
माझ्या ('सुमारे' नं वाचून विचारलेल्या) 'सुमार' शंकेचे निराकरण केल्याबद्दल दोघांनाही धन्यवाद.
3 Nov 2012 - 4:55 pm | हिटलर
जीना ईसी का नाम है...
7 Nov 2012 - 9:12 pm | गोंधळी
"वो उपरवाला सब देखता है, एक हाथ से देता है ,और दुसरे हाथ से लेता है, लेकिन आदमी कि नियत हमेशा साफ होनी चाहिये ,तो उपरवाला कभी भी आपको गिरने नही देगा !"
जीवनविषयक तत्त्व ज्ञानआवडले.