अपघात

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
2 Nov 2012 - 8:54 pm

चंदूचं आयुष्य तसं एककल्लीच! सकाळी उठावं, चहा घेवून बाईकला किक मारावी, गल्लीतल्या किराणा मालाच्या दुकानातून १० गुटख्या च्या पुड्या घ्याव्यात,एक तिथेच फोडून तोंडात टाकावी, आणि दिवसाचा शुभारंभ करावा! मग थोडं चावडीवर भटकून इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात आणि बातम्या काढाव्यात. आणि मग सरळ घर गाठावं. अंघोळ-पूजा उरकून आईने दिलेला डबा घेवून मग कंपनी गाठावी....

कोकणातलं समुद्रकिनाऱ्या वरचं गाव! १५ वर्ष पूर्वीच इथं एक परदेशी कंपनी आली, लोकांनी खूप विरोध केला, पण शेवटी कंपनी राहिलीच! मग चंदू ला कंपनीत मुकादम म्हणून काम लागलं. तसा होता चंदू आयटीआय केलेला ! पण कामासाठी बाहेरगावी जायचं तर आई सोडेना, बाबा लहानपणीच सोडून गेलेला, घरची एवढी मोठी बागायत आणि आंब्या-फणस-काजू ची बाग, गुरे –ढोरे! मग आई घाबरली. चंदुला म्हणाली, “बाबा चंदू, गावाजवळ कुठं काम मिळतं का बघ बाबा, मि नाय तुला मुंबईला पाठवणार. इकडं कोण रं करील इतक्या गुरांचं आणि शेती-भाती? “

झालं, मग चंदू ला आपल्या आळशीपणा ला लपवायचं कारणाच मिळालं कि ! पण त्याच्या दुर्दैवाने ही कंपनी सुरु झाली, आणि आईने एका स्थानिक राजकारण्याचा वशिला लावून चंदू ला तिकडे चिकटवला आणि चन्दूची उंडगेगिरी बंद झाली. मग चन्दूची नोकरी सुरु झाली. सकाळीं ९ ते संध्याकाळी ६, मध्ये १ तास सुट्टी-जेवायला! पगार १५०००/- रुपये.

घरावरून कामाच्या ठिकाणी जायला मध्ये लॉन्चने[होडी] खाडी पार करावी लागायची! मग चंदू घरून सायकल वरून बंदरापर्यंत जायचा, लौंच आली, कि सायकल सकट नंदू आत बसायचा, आणि पलीकडच्या धक्क्यावर उतरून पुन्हा सायकलने कंपनीत जायचा, येताना पुन्हा तसेच!

तर झालं असं की एकदा लौंच ने चंदू कंपनीत जात असतानां एक नवीन मुलगी त्याला दिसली. दिसायला छानच होती. मस्त गुलाबी साडी, दणकट बांधा, आणि खाडीच्या वाऱ्यावर उडणारे लांबसडक केस! चंदू ला तर ती स्वप्नातली परीच वाटली! आतापर्यंत आयुष्यात चंदू ने अशी पोरगी पहिलीच नव्हती! दिसता क्षणी प्रेमात पडाव अशी........एकदा तर चंदुला वाटलं जावं आणि नाव विचारावं. पण ते धाडस त्याच्याने होईना! मग तो तसाच एकटक तिच्याकडे पाहत राहिला ,तेवढ्यात किनारा कधी आला आणि बोट धक्क्याला कधी लागली तेही नाही कळल त्याला!

दिवसभर मग कंपनीत तिचाच विचार! कामात मन लागेना! तश्याच तिच्या विचारांच्या धुंदीतच दिवस गेला, आणि ...............चन्दूचा डोळ्यावर विश्वासच बसेना! परत येताना बोटीत तीच! अरेच्चा! चंदू तर आनंदाने वेडा व्हायचाच बाकी राहिला! स्वारी एकदम खुश! त्याने ठरवलं, हिची माहिती काढायची! त्याची रात्र मग तिच्याच स्वप्नात गेली ,झोप कधी लागली आणि उजाडलं कधी तेही कळलंच नाही, आईने मोठ-मोठ्याने हाका मारून उठवलं तेव्हा कुठे जाग आली ! चंदू मग पटापट तयार होवून कामावर निघाला. आजही बोटीत ती होतीच. मग चंदूने आपला जिगरी दोस्त परश्याला तिची बातमी काढायला सांगितलं, आणि परत येताना संध्याकाळी बोटीत परश्याला तिला दाखवलंही.

परश्या ने २ दिवसात तिची सगळी माहिती काढली, तिचं नाव मोहिनी. ती त्याच्याच कंपनीत नवीनच कामाला लागली होती . स्टोअर डीपार्टमेंट ला . अन् ती राहायलाही चन्दुच्याच गावात होती, भाड्याने खोली घेवून! चंदू आनंदाने वेडा झालां. मग पुढची सगळी सेटिंग चंदू आणि परश्या ने व्यवस्थित केली, आणि एकदा चंदूने धीर करून तिला विचारलंच!

चंदू तसा दिसायला बऱ्यापैकी होता, त्यात आता प्रेमात पडल्यानंतर त्याने नवीन इस्त्रीचे कपडे, अत्तर इत्यादी छानछोकी करायला सुरवात केली,तो गावात राहूनही आणि वासुगिरी करूनही त्याचं बोलणं गावन्ढळ नव्हतं, त्यामुळे तिलाही तो थोडाफार आवडला होता, पण एकदम होकार देण्या ऐवजी थोडं भाव खावूनच मग तिने होकार दिला.......आणि मग काय मंडळी, पुढच्या दिवाळीतच चंदूच्या लग्नाचा बार वाजला! आईसुद्धा एवढी देखणी आणि नोकरीवाली सून मिळाली म्हणून आनंदात होती! चंदू आता चंद्रावर पोचला होता!

चन्दूचे दिवस मजेत जात होते! असेच ५-६ महिने गेले. पण अलीकडे मोहिनीला कामावरून यायला उशीर होऊ लागला. पूर्वी ते दोघे एकदमच कामावर जात आणि परत येत, आता चंदूने मोटार सायकल पण घेतली होती. पण हल्ली रात्रीचे ८-९ वाजले तरी मोहिनी येत नव्हती, कधी कधी तर ११-१२ सुद्धा .मग उशीर झाला कि कंपनीची बोट तिला सोडायला यायची! चंदूने विचारले तर कंपनीत काम वाढलंय म्हणून संगायची... हळू हळू तिच्या अंगावर अनेक दागिनेही दिसू लागले, चंदूने चौकशी केली तर ओव्हर-टाईम च्या पैश्यातून घेतले आहेत असे सांगायची... तरीही चंदूच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागलीच!

आणि त्या दिवशी तर कहरच झालां, त्या रात्री मोहिनी घरी आलीच नाही. आली ती एकदम दुसऱ्या दिवशी सकाळी! आता मात्र चन्दूचा फ्युज उडाला! इतके दिवस जे मनात खदखदत होतं ते बाहेर आलं, चंदूने मग परष्याला विश्वासात घेवून सगळं सांगितलं. परश्याने २-३ दिवसात जी माहिती आणली त्याने तर चंदूच्या हातापायातील बळच गेलं ,संतापाने त्याच्या मेंदूची लाहीलाही झाली, स्टोअर डीपार्टमेंटचा मनेजर शुक्ला तसा हरामीच! पण दिसायला गोरा-गोमटा आणि बोलायला एकदम गोडगोड! या शुक्ला ने मोहिनी ला आपल्या जाळ्यात ओढली होती, तिच्यावर पैश्याची खैरात करून तो तिला रात्री थांबवायचा आणि नको नको ते रंग उधळायचा!

हे समजल्यावर चंदू ला काहीच सुचेनासं झालं, आपल्या बायकोनेच आपला विश्वासघात केला, आणि या हरामखोर शुक्ला पायी? चंदूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आणि कधी नव्हे ती त्याची पावलं दारूच्या गुत्त्याकडे वळली. १-२-३-४...चंदू ग्लास च्या ग्लास रिते करीत गेला... आणि मग कधीतरी उशिरा रात्री गुत्त्याबाहेर पडून बाईकला किक मारली... परत येताना नेमका शुक्ला जीप घेवून समोरून आला,आधीच चंदू प्यालेला, त्यात या शुक्लाच्या पायीच आपली बायको आपल्याशी बेईमान झाली या विचाराने तो हैराण झाला. आता या शुक्ला ला धडा शिकवायचाच ! चंदूने आपल्या बाईकचा स्पीड तुफान वाढवला आणि मागचा पुढचा विचार न करता सरळ बाईक शुक्ला च्या जीप वर चढवली !

जाग आली तेव्हा चंदू हॉस्पिटल मध्ये होता, उजव्या हाताला आणि पायाला भलेमोठे ब्यांडेज!उठताही येईना ! तेवढ्यात आई, मोहिनी आणि परश्या समोरून खोलीत आले. डॉक्टर जे म्हणाला ते ऐकून त्या दुखण्यातही चंदूच्या जीवाला फार बरे वाटले –
“अरे चंदू केवढा मोठा एक्सीडेंट रे! नशीब म्हणून वाचलास.. तुझी बाइक रस्त्याच्या बाजूच्या खडकावर आदळली! ठोकर चुकवण्यासाठी त्या शुक्ला साहेबांनी गाडी बाजूला वळवली आणि रस्त्यावरून गाडी नदीत पडली, त्यातच त्यांचा अंत झाला रे!”
इकडे मोहिनी डोळे पुसत होती आणि परश्या मात्र चंदू कडे बघत गालातल्या गालात हसत होता!

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

कलश's picture

2 Nov 2012 - 9:54 pm | कलश

कथा वाचून ही त्रीसुत्री आठवली. रम, रमा आणि रमी.

गणामास्तर's picture

3 Nov 2012 - 10:24 am | गणामास्तर

आपलं काय ठरलं होतं? आठवड्यातून एकचं कथा टाकायची म्हणून..
विसरलात राव ईतक्या लवकर..छ्या..

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Nov 2012 - 10:29 am | श्री गावसेना प्रमुख

नवीन च माहीती कि जिप ला मोटारसायकलने धडक दिल्याने जीप वाल्याचा मृत्यु
1

सौरभ२१११'s picture

8 Nov 2012 - 6:53 pm | सौरभ२१११

हा चंदू हाय ना तो साउथ इंडियन पिच्चर चा हीरो हे ;)

मृत्युन्जय's picture

3 Nov 2012 - 10:41 am | मृत्युन्जय

वा. छानच कथा. मजा आली. कथेची सुरुवात " एक आटपाट नगर होते" अशी झाली असती तर अजुन बहार आली असती. असो. पुलेशु.

सर्वसाक्षी's picture

3 Nov 2012 - 11:07 am | सर्वसाक्षी

ही कथा जनजागृती खातर जनसंपर्क खात्याला पाठवा आणि कथेचे शिर्षक 'म्हणुन हेल्मेट वापरावे'; असे ठेवा. एफ एम गोल्ड १००.७ वर फिट्ट बसेल.

अन्या दातार's picture

4 Nov 2012 - 9:45 am | अन्या दातार

हेल्मेट वापरावे तरी कुणी? दुचाकीवाल्याने का चारचाकीवाल्याने?
(धड्याखालचा अजून एक प्रश्न)

किसन शिंदे's picture

3 Nov 2012 - 11:14 am | किसन शिंदे

कथा(?) वाचून मनात बरेच प्रश्न उत्पन्न झालेत पण आता टंकायचा कंटाळा आलाय. ;)

हर्षद हे काम बरोबर करू शकेल. कुठेतय ५० राव तुम्ही?

आहे इथंच आहे, प्रश्नपत्रिका काढली होती, ती पुढच्या वर्षीच्या ऑटोमोबाईल इंजिनियरिंगच्या फायनल इयरसाठी घेउन गेले भारती विद्यापिठवाले.

सस्नेह's picture

3 Nov 2012 - 2:51 pm | सस्नेह

इंजिनियरिंगच्या धड्याखाली प्रश्न अस्तात काय ५० राव ?

नशीब धड्याखाली प्रश्न असतात का असं विचारलंय, इंजिनियरिंगला धडे असतात काय?, असं नाही विचारलं.

अवांतर - विद्युत वेद/कुराण/बायबल बि.एल.थरेजा मध्ये असायचे वाटते प्रश्न,

सस्नेह's picture

3 Nov 2012 - 3:54 pm | सस्नेह

'थरेजा' नाही हो, थेराजा -- B. L. Theraja'
दहा वेळा लिहा पाहू..

स्पा's picture

3 Nov 2012 - 11:30 am | स्पा

नायकाने स्वतःबरोबर.. त्याच्या बाईक ला पण पाजलेली का काय.. डायरेक्ट जीप ला नदीत पोचवलन ते :D

किंवा नायकाला रजनीकांत ने त्याची गाडी गिफ्ट दिलेली काय? =))

श्रीरंग_जोशी's picture

3 Nov 2012 - 11:36 am | श्रीरंग_जोशी

Rajanikant's bike

किसन शिंदे's picture

3 Nov 2012 - 11:49 am | किसन शिंदे

बाकी हा परश्या सीबीआय मध्ये असावा असा दाट संशय येतोय.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Nov 2012 - 2:45 am | विश्वनाथ मेहेंदळे

किस्ना, परश्या माहीती काढायचा. सीबीआय मध्ये कसा असेल ???

सकाळी उठावं , चहा घेवून बाईकला किक मारावी ,

मग चंदू घरून सायकल वरून बंदरापर्यंत जायचा , लौंच आली ,कि सायकल सकट नंदू आत बसायचा ,आणि पलीकडच्या धक्क्यावर उतरून पुन्हा सायकलने कंपनीत जायचा ,येताना पुन्हा तसेच!

पूर्वी ते दोघे एकदमच कामावर जात आणि परत येत ,आता चंदूने मोटार सायकल पण घेतली होती .

चंदूकडे नक्की बाईक होती की सायकल की मोटार सायकल हे कळले तर उत्तम होईल...

अहो पंधरा हजारांत एवढं सगळं बाळगायला जमलं असेल त्याला.

रोजचा (एकता कपुरी) साबण.. रोजचा (वाचकांच्या तोंडाला येणारा) फेस!

अन्या दातार's picture

3 Nov 2012 - 6:13 pm | अन्या दातार

सायकल स्वत:ची असेल, बाईक दुसर्याची/मित्राची असेल.

आणि मग मोटरसैकल मोहिनीबैंच्या हुंड्यातून आणली असेल..

आणि मग त्या मोटारसायकलीला जीप आडवी गेली म्हणुन तिला राग आला असेल .

मीउमेश's picture

31 Oct 2015 - 12:30 pm | मीउमेश

याला म्हणत्यात वाचक

जेनी...'s picture

3 Nov 2012 - 3:54 pm | जेनी...

श्या :-/

५० ने पूरता मूड ऑफ्फं केला माझा :-/

श्री गावसेना प्रमुख's picture

4 Nov 2012 - 9:23 am | श्री गावसेना प्रमुख

५० फक्त हो ते

जेनी...'s picture

4 Nov 2012 - 10:12 am | जेनी...

फक्त??

श्री गावसेना प्रमुख's picture

4 Nov 2012 - 10:28 am | श्री गावसेना प्रमुख

आता त्यांच नाव ते तिथे मि काय करणार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2012 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रकाटाआ.

गणामास्तर's picture

4 Nov 2012 - 9:55 am | गणामास्तर

दिसायला छानच होती . मस्त गुलाबी साडी ,दणकट बांधा ,आणि खाडीच्या वाऱ्यावर उडणारे लांबसडक केस ! चंदू ला तर ती स्वप्नातली परीच वाटली !

गणामास्तर's picture

4 Nov 2012 - 9:56 am | गणामास्तर

g

मास्तर. लईच हसताय.. मोहिनीबाई 'बुडालेल्या जीपमधल्या' शुक्लासाहेबांकडे तक्रार करतील हां!

गणामास्तर's picture

4 Nov 2012 - 11:51 am | गणामास्तर

स्वप्नातल्या परीचे दणकट वर्णन वाचून फुटलो ना..बाकी 'बुडालेल्या जीपमधल्या' शुक्लासाहेबांकडे
तक्रार केल्याने काही फरक पडत नाही. चंदू कडे केली तर मात्र सायकल्,बाईक, चार चाकी वापरणे
सोडून द्यावे लागेल. :)

जेनी...'s picture

4 Nov 2012 - 11:55 am | जेनी...

इइइइइइइइ .दणकट ? :(

मंदार मामा ..दणकट मुली कशा असतात रे?

फटु टाकना :)

हेमंत लाटकर's picture

31 Oct 2015 - 2:01 pm | हेमंत लाटकर

मंदार मामा ..दणकट मुली कशा असतात रे?

त्यांना उफाड्याची म्हणायचे असेल.

majbhoot
मंदारमामा
ती अशी असेल ना?

अगंगंगं! अशी ही सुंदरी कोकणात.. बोटीत!
धाग्याच्या वर आता वैधानिक इशारा टाकारे कोणीतरी..
हसूनहसून फुटल्यास कं.ज.ना.!...
किंवा मग मं.ज.ना... :-D

चिगो's picture

4 Nov 2012 - 6:43 pm | चिगो

मग पुढे काय झाले? चंदूच्या बायकोला चंदूचा पराक्रम कळला का? कळल्यास त्याच्या बाईक/मोटारसायकल चालवण्याच्या कौशल्यावर ती खुष झाली का? झाली असल्यास तिने चंदूकडे आपल्या चुकांबद्दल क्षमा मागितली का? मागितल्यास चंदूनी तिला माफ करुन पदराखाली (किंवा बाहीखाली ;-) घेतले का?... ह्या आणि अश्या प्रश्नांची दखल घेणारी एखादी कौटूंबिक कथा लिहा की, मंदारराव..

अन्या दातार's picture

4 Nov 2012 - 7:04 pm | अन्या दातार

तिसरा पर्याय, परश्या र्हायलाच कि ओ चिगो! ;-)

चिगो's picture

4 Nov 2012 - 7:51 pm | चिगो

अरे, कौटूंबिक कथा म्हणतोय मी राजा..

तिसरा पर्याय, परश्या र्हायलाच कि ओ चिगो!

हा काय आंबटशौकीनपणा म्हणायचा ?;-)

शैलेन्द्र's picture

4 Nov 2012 - 11:08 pm | शैलेन्द्र

छे छे छे.. मिपाकरांना या निस्वार्थी सेवेचि कदर नाही हेच खर..

मी_आहे_ना's picture

5 Nov 2012 - 9:36 am | मी_आहे_ना

'दणकट' शब्द वाचून 'अशी ही बनवाबनवी' मधला डायलॉग आणि लक्ष्या आठवला.
'चांगली दणकट बायको मिळाली हो तुम्हाला'
:)

बनवाबनवीचा लक्ष्या =))

एकदम सहमत =))

वीणा३'s picture

6 Nov 2012 - 5:38 am | वीणा३

+१

यसवायजी's picture

22 Nov 2014 - 9:49 am | यसवायजी

"दणकट पायजमा मुलायम बंडी" :))

आदिजोशी's picture

5 Nov 2012 - 1:13 pm | आदिजोशी

मिपा मधे चैतन्य फुंकल्याबद्दल कथालेखकाचे आभार

अर्धवटराव's picture

6 Nov 2012 - 2:37 am | अर्धवटराव

पुर्वीचं मिपा राहिलं नाहि हेच खरं.
दिवाळीचे फटाके उडवायला एव्हढी संधी चालुन आलि (लेखकाने फराळाच्या तबकाप्रमाणे आणुन दिली म्हणा हवं तर)... आणि मिपाकरांनी अशा मिळमिळीत प्रतिक्रिया द्याव्यात. छ्या.

अर्धवटराव

जेनी...'s picture

6 Nov 2012 - 3:10 am | जेनी...

छ्या छ्या ...

माझे दोन छ्या ..अर्धवटरावांच्या एका छ्या सोबत :D

अर्धवटराव's picture

6 Nov 2012 - 3:47 am | अर्धवटराव

अर्धवटरावांना पूर्णराव करण्याला तुमचाही हातभार लागतोय म्हणायचा :)

अर्धवटराव

गुमनाम's picture

6 Nov 2012 - 8:18 am | गुमनाम

तो गावात राहूनही आणि वासुगिरी करूनही त्याचं बोलणं गावन्ढळ नव्हतं ............. कोकणी मानसाच्या भाषेला गावन्ढळ संबोधनार्याचा तिव्र निषेध!!!!!!!!

चन्दूचे दिवस मजेत जात होते! असेच ५-६ महिने गेले.

कथेत चंदुचेच दिवस जाण्याचं बोललेलं आहे... मोहिनीच्या दिवसांच काय???
संपुर्ण पुरुष जातीच्या वतीने अतितीव्र निषेध नोंदवत आहे. कात्रेंनी मोहिनीच्या पात्राला लावलेली कात्री काढुन टाकावी अशी समज त्यांना संमंनी द्यावी...

चन्दूचे दिवस मजेत जात होते! असेच ५-६ महिने गेले.

ह्यांगश्शी तर हा अपघात होता होय, इथं सगळ्यांना वाटलं की ते जीप आणि बाईकचं काय झालं.

जेनी...'s picture

7 Nov 2012 - 10:57 pm | जेनी...

=)) . =))

भारीच . =))

रेवती's picture

8 Nov 2012 - 1:36 am | रेवती

देवाऽऽऽ!
आत्ता समजलं काय ते. हसून पुरेवाट.

ह भ प's picture

8 Nov 2012 - 12:43 pm | ह भ प

अशी एखाद दुसरी दणकट घरी असायला हवी राव..!!
काय मज्जा येईल..

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Nov 2012 - 1:14 pm | श्री गावसेना प्रमुख

कशाला अंग दाबुन घ्यायला.की मार खायला?

जेनी...'s picture

8 Nov 2012 - 1:18 pm | जेनी...

=))

ए आता बास करा रे ..

मंदार मामाने एवढा सीरिअस सब्जेक्ट मांडलाय ...
धाग्याचं नाव ' अपघात ' वाचुन काहितरी सीरिअस वाचायला मिळणार :( म्हणुन
आत यावं तर हे असं .:-/

हसुन हसुन वाट लागायची पाळी येतेय =))

खरच बास हं ! :-/

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Nov 2012 - 1:25 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्हाला लय हसु येवु र्‍हायल की पुजाजी.
हसु नका पोट दुखायच
1

उगा काहितरीच's picture

8 Nov 2012 - 1:40 pm | उगा काहितरीच

:) :) :)

गोमट्या's picture

8 Nov 2012 - 3:00 pm | गोमट्या

मग चंदू घरून सायकल वरून बंदरापर्यंत जायचा , लौंच आली ,कि सायकल सकट नंदू आत बसायचा

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Nov 2012 - 5:11 pm | श्री गावसेना प्रमुख

चंदु हाच नंदु आहे,अन नंदु हाच चंदु आहे

ईन्टरफेल's picture

8 Nov 2012 - 8:44 pm | ईन्टरफेल

कथा वाचुन खुप मजा आली !

वपाडाव's picture

6 Dec 2012 - 4:23 pm | वपाडाव

वाचत रहा वरचेवर एखादे दिवशी पास होउन जाल...

स्पा's picture

11 Jul 2013 - 1:47 pm | स्पा

मस्तच

पैसा's picture

11 Jul 2013 - 1:52 pm | पैसा

मी कुठे होते? ही कथा मी कशी वाचली नाही?

त्यावेळी बैंचा तास ऑफ्फ होता, आम्हाला गोंधूळ घालायची फुल्ल परमीशन होती.

बॅटमॅन's picture

11 Jul 2013 - 1:57 pm | बॅटमॅन

आयो......काय पण अपघाते तेच्यायला, दणकट हिरवीण अन तशीच दणकट बाईक पाहून सौथचा पिच्चरच वाटतोय यकदम!!

मंदार कात्रे's picture

11 Jul 2013 - 10:35 pm | मंदार कात्रे

;)

श्रीरंग_जोशी's picture

13 Jul 2013 - 8:26 pm | श्रीरंग_जोशी

हौसला बुलंद असेल तर बाईकने जीपच काय हेलिकॉप्टरही उडवता येते, हा पहा नमुना...

बाईक तर एक साधन आहे, साधक महत्वाचा :-).

मुक्त विहारि's picture

22 Nov 2014 - 6:41 am | मुक्त विहारि

आमच्या नजरेतून हा धागा कसा काय सुटला?

कारण तुमची नजर सगा ऐवढी चांगली नाही.
त्यामुळेच तो भावी संपादक आहे. *wink*

मुक्त विहारि's picture

22 Nov 2014 - 8:55 am | मुक्त विहारि

बाद्वे,

मिपाच्या इतिहासातले असे अप्रतिम प्रतिसाद असलेले धागे कुठले?

जमल्यास लिंका दे...

कथा वाचायची राहून गेली होती, वर आणत आहे!

कपिलमुनी's picture

30 Oct 2015 - 11:13 am | कपिलमुनी

नव्या वाचकांसाठी रेफर्न्स !

प्यारे१'s picture

30 Oct 2015 - 6:10 pm | प्यारे१

अरे काय आहे हे????
कालच खफवर म्हणालो होतो.
हे रत्न आमच्या नजरेतून सुटलं होतं की!

हेमंत लाटकर's picture

31 Oct 2015 - 2:12 pm | हेमंत लाटकर

मंदार कात्रे, अपघात खुपच दणकट झाला.

हेमंत लाटकर's picture

31 Oct 2015 - 2:15 pm | हेमंत लाटकर

मंदार कात्रे, अपघात खुपच दणकट झाला.

मंदार कात्रे's picture

13 Jun 2017 - 7:34 pm | मंदार कात्रे

दाभोळ मधील तलावा शेजारील बांध कोसळला 1 अल्टो 2 टाटा ACE तलावात घसरल्या

दैनिक रत्नागिरी खबरदार
दिनांक १३/०६/२०१७

ती कथा तिथलीच आहे
दाभोळ
:)

सतिश गावडे's picture

13 Jun 2017 - 9:29 pm | सतिश गावडे

टायटॅनिकचेही भविष्य असेच कुणीतरी लिहून ठेवले होते ना हो?
बातमीचा दुवा द्या.