असतेस घरी तू जेव्हा.....

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
3 Nov 2012 - 1:37 pm

(संदीप सलील यांची माफी मागून सगळ्या हतबल पुरुषांसाठी नवीन स्त्रीसूक्त)

असतेस घरी तू जेव्हा...
जीव उंदराएवढा होतो.....
कुत्रं लागल्यागत मागे...
मी इकडे तिकडे पळतो....

भूत पाहून बोबडी वळावी
बर्फाळ तसा मी होतो...
तुझी नजरच खलास करते..
अन देहच आडवा होतो........

येतात शेजारी दारापाशी....
उत्साहाने उजळती तोंडे........
कुणी हळूच डोकावले घरी....
तर त्यालाही प्रसाद मिळतो....

तव भीतीत थरथरणार्या...
मज स्मरती हजार वेळा........
मार खाऊनच बाहेर पडावे...
हा असाच शेवट होतो.....

तू संग सखे मज काय
मम गुन्हाच नक्की कसला?
आयुष्याचा हा एक त्रास
न कळेना कधी हा संपतो??

जरी झालो तुझाच नवरा
ना शूर मी अजुनी झालो.......
दर वेळी जाणवत राहते....
मी कायमचा अडकलो.....!!

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

बायको भलतीच गरम डोक्याची दिसते. तुमच्याकडचा पंखा चालू करा, डोकं थंड होईल.

माम्लेदारचा पन्खा साहेब, कविता मस्त झाली आहे.
काही दिवसानी बहुतेक पती मुक्ती सेना काढतील त्रासलेले काही पती लोक.
असो विडंबन मस्त जमल आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

3 Nov 2012 - 3:23 pm | श्री गावसेना प्रमुख

काही दिवसानी बहुतेक पती मुक्ती सेना काढतील त्रासलेले काही पती लोक.
सगळ्याच बायका तशा नसाव्यात
1

जेनी...'s picture

3 Nov 2012 - 3:59 pm | जेनी...

काय पण :-/
बायकांची अ‍ॅलर्जिये का ओ ??

विडंबन म्हणुन चालवुन घेतोय आम्ही ...

लेकीन याद रखना . आगेकू बाई के बारे मे लिख्तेवक्त सावधानी बरतो :-/

;)

सस्नेह's picture

5 Nov 2012 - 3:27 pm | सस्नेह

अगं पूजा, 'अदखलपात्र' गुन्ह्यांची कशाला इतकी फिकिर करतेस ?

माम्लेदारचा पन्खा's picture

3 Nov 2012 - 4:10 pm | माम्लेदारचा पन्खा

कवितेतला पुरुष इतका अगतिकपणे विनवतोय हा समस्त स्त्रीजातीचा विजयच नव्हे काय ?

मनातले विचार मांडायला कायद्याने सुद्धा परवानगी दिलेली आहे....

मला वाटलेच होते की काही शक्ती ह्यावर प्रतिसाद देतील म्हणून नजर रक्षा कवच विकत घेतलं आणि मगच विडंबन प्रकाशित केलं !

कवितेतला पुरुष इतका अगतिकपणे विनवतोय हा समस्त स्त्रीजातीचा विजयच नव्हे काय ?

हॅ हॅ... एवढं एक्स्प्लेनेशन देताय.. घाबरलात की काय?

घाबरायचं नाही. आपण शांतताप्रिय आहोत ना? मग शांततामय मार्गाने निर्भीडपणे आणि ठामपणे आपलं मत मांडायचं..

विश्वेश's picture

5 Nov 2012 - 3:05 pm | विश्वेश

तव भीतीत थरथरणार्या...
मज स्मरती हजार वेळा........
मार खाऊनच बाहेर पडावे...
हा असाच शेवट होतो.....

वा क्या बात ... (X 3)

गवि,तुमचं म्हणणं रास्त आहे पण तरीही असं करावं लागतं....

गांधींनी सुद्धा सत्याग्रह केला पण त्यानाही ब्रिटिशांच्या लाठ्या चुकल्या नाहीत !

आपण शाकाहारी असलो तर वाघ आपल्याला खायचं सोडेल का?

गांधींनी सुद्धा सत्याग्रह केला पण त्यानाही ब्रिटिशांच्या लाठ्या चुकल्या नाहीत !

म्हणून त्यांनी लाठीच्या भीतीने "पहा आम्ही सर्वजण तुमच्यावर शस्त्र न उगारता मैदानात शांतपणे उपोषणाला बसलो आहोत म्हणजे हा तुमचा विजयच झाला" असं ब्रिटिशांना म्हटलं नाही.. लाठ्या पडल्या तरी बेहत्तर.. :)

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Nov 2012 - 4:30 pm | माम्लेदारचा पन्खा

आज जिहाद करायच्या उद्देशानेच आलेले दिसताय !