पाठशिवण!

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
31 Oct 2012 - 11:32 am

सांजेला तसा वेळ होता.

अजुन शिवारात लगबग जाणवत होती.

आताशा पाहुणा म्हणुन आलेल्या मला,

माझ नेहमीच ठिकाण......मोटवन खुणावत होती.

तस तिच माझ नात फार वर्षांच.

आजोळी आईचा पदर धरुन

येउ लागल्यापासुनच

माझ्या आजोबांनीच पहिला हिची ओळख करुन दिली होती

अन,

शाळा कॉलेज संपवुन आलेल्या माझ्या

गद्धेपंचवीशीला निवांतपणासाठी

हिची ओढ होती.

नेहमीसारख मी मोटवनीवरुन

विहिरीत डोकावुन पाहिल.

काळशाऽऽर पाणी खोलवर डुचमळत होत.

क्षणभर भारल्यासारख झाल.....

आजुबाजुचे आवाज विरले.....

"थंड आहे पाणी ते!", मी दचकलो.

मला माहितही नाही आणि माझ्याशेजारी

एक निटस नवयौवना उभी!

नाही म्हंटल तरी जरा मोहरलो...

"खाली जाउन आला वाटत?"

मी जरा मस्तवालपणा केला.

तीने नुसत्याच रिकाम्या नजरेन माझ्याकडे पाहिल

जणु आरपार...

आता मी तिला निरखल

व्यवस्थीत साडी, छोटासा बॉब!

फक्त या सगळ्याला विसंगत

थंड नजर......!

"कुठल्या तुम्ही? या गावच्या?", मी विचारल

लहाणपणच्या प्रत्येक सुट्टीत

मी आजोळीच असे.

अन गावातला प्रत्येकजण तसा माहीतीतला होता.

पण्....ही नव्हती!

"नाही." तिने जवळच्या एका छोट्या शहराच नाव सांगितल

"इथे काय करताय?" या वयात समवयीन भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलायची

भारी हौस नाही?

"नारायणला भेटायला आले."

आता मी उडालो

"नार्‍या? सुताराचा?"

"हो. आडनाव सुतारच आहे."

मी तिला आणखी निरखल.

शांत सेन्सीटीव्ह नार्‍यान चांगली पोरगी पटकावली होती.

"मग? गावात नाही भेटला?" परत्..समवयीन्..भिन्नलिंगी....!!!

आता तिच्याकडे पहाताना वाटल ती कुठेतरी दुऽऽर उभी आहे.

"मी गावाकडे येताना, गावाबाहेर भेटला. त्यानच इथे पाठवल."

"अच्छा! तर तुम्ही त्याची वाट पहाताय!" माझ मन हळहळल.

शहरात राहुन जे मला जमल नाही,

ते या खेडगावच्या नार्‍यान जमवल होत.

"हो." ती थंड.

का कुणास ठाउक, पण मला तेथुन हलवेना.

नाही..हा धबधबा जरी माझ्यावर कोसळणार नसला,

तरी निदान दोनचार शिंतोड्यांची आशा होती.

काही नाही तरी , निदान गेला बाजार

"ये तेरी भाभी" अशी नार्‍या फिल्मी ओळख करुन देइल

अशी अपेक्षा होती.

असाच थोडा वेळ गेला...

अचानक ती चुळबुळली.

"नाही यायचा तो! मला पाहुन दचकला. नाही यायचा तो!"

"एव्हढ अर्जंट आहे भेटण?" मी विचारल.

"उद्या भेटेल, परवा भेटेल."

"नाही, नाही, आत्ताच ! आत्ताच!. मला काही समजत नाही. मी कुठे जाऊ? कशी जाऊ? "

बाजुला काजळणार्‍या दिशा

आता माझ्या ध्यानात आल्या.

अचानक हुंदका देत ती उठली,

अन काय कळायच्या आत

मोटवनीवरुन विहिरीत झेपावली.

"अहो? काय करताय?" मी झटकन पुढे झालो

पण ती कधीच आत झेपावली होती.

मी आत वाकुन पाहिल...काहीच नाही.

आतल पाणी तसच काळशार हळुवार डुचमळत होत.

आत्ता झेपावली? अन गेली कुठे?

माझ मलाच समजेना.

मी सरळ उभा राहीलो.

मदतीसाठी कुणालातरी बोलवाव म्हणुन वळलो...

माग सुताराचा नार्‍या....!

"अरे तूझी मैत्रीण! " मला वाचा फुटली

"नाही थांबली ना? थोडी तरी वाट पहायची." तो दु:खी स्वरात उद्गारला.

"अरे आत्ताच तर आत उडी मारली तीने. चल आपण वर काढु."

"आत्ताच? नाही. नाही. आठवडा झाला त्याला." नार्‍या दु:खात नुसता बुडाला होता.

"अरे! मी आत्ताच पाहिली तीला."

" नाही रे! आता ही पाठशिवण अशीच सुरु रहाणार"

"नार्‍या! अरे शुंभा! चल आपण शोधु तिला"

"तशी शांत होती रे! खुप प्रेम करायची. एका दुपारी वहावलो बघ. तशी खुप शांत्र होती रे. संयमी! पोटातल्या चाहुलीन सैरभैर झाली बघ! आता अशीच पाठशिवण!"

नार्‍याच बोलण मला कळत नव्हत.

अन..

नार्‍या पटकन पुढ झाला.

काय कळायच्या आत, तोही आत झेपावला.

मी सुन्न...

पुन्हा आत पाहिल

पाणी शांऽऽऽत!

अख्खी विहीर माझ्यापुढे गरगरली.

कुणीतरी मला माग ओढल

"पाव्हणे घाबरले वाटत?"

माझ्या बंद डोळ्यासमोर माणसांच्या आवाजाची चित्र फिरु लागली

"नार्‍या दिसला वाटत्...लई येळ झाला इकड येउन्....मी पाहिल शेतातुन."

"नार्‍या एकटाच की ती अश्राप पोरगी पण?"

"आठवड्याभरातच तिच्यापाठोपाठ त्यान पण...."

इतक्या माणसांच्या असण्यानही माझी हुडहुडी हटत नव्हती.

तशी आयुश्यातल्या अनोळखी धक्क्याची ही पहिलीच वेळ होती.

__/\__

अपर्णा

मांडणीविरंगुळा

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

31 Oct 2012 - 11:44 am | जेनी...

सुप्पर्ब अप्पु ...

एकेक ओळ वाचताना पूढच्या ओळीत काय असेल ...इतकी आतुरता
एकदम मस्त सांभाळलिय ..
मनाला एकदम चटक लावुन गेलं ..हे जे काय लिहिलयस ते !

प्रशांत's picture

31 Oct 2012 - 12:01 pm | प्रशांत

बेस्ट..!

कवितानागेश's picture

31 Oct 2012 - 12:40 pm | कवितानागेश

भूऽऽऽऽऽऽऽऽत!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Oct 2012 - 12:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुंदरच, एकंदरीत फारच आवडले
पैजारबुवा,

काटा आला! मस्त लिहिलं आहेस..

...
पुन्हा आत पाहिलं..
पाणी शांऽऽऽत!

खासच.

सस्नेह's picture

31 Oct 2012 - 1:06 pm | सस्नेह

आता नार्‍या सुताराची पण गोष्ट येऊदे..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Oct 2012 - 1:50 pm | निनाद मुक्काम प...

हेलोवीन च्या शुभ मुहूर्तावर मस्त गूढ ,अर्थपूर्ण शैलीतील लेखनप्रकार वाचावयास मिळाला.
मजा आली.

निनाद , हेप्पि हेलोविन डे ;)

बॅटमॅन's picture

31 Oct 2012 - 1:53 pm | बॅटमॅन

ईंट्रेस्टिंग!!

चिगो's picture

31 Oct 2012 - 1:54 pm | चिगो

भू ऽ ऽ ऽ त.. हे असं काही होऊ नये म्हणून "संरक्षण" वापरावे, लोक्सहो. पंधरा-वीस रुपये वाचवण्यापाई दोन जीव गेले फुकाच.. ;-)

ताई, भूतकथा भारी हां..

छोटा डॉन's picture

31 Oct 2012 - 1:56 pm | छोटा डॉन

छान आणि नेमके लिखाण.
आवडले.

- छोटा डॉन

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Oct 2012 - 2:00 pm | बिपिन कार्यकर्ते

वा! जमलीये....

आम्हाला आमचीच 'या!!!' आठवली! :)

ज्ञानराम's picture

31 Oct 2012 - 2:06 pm | ज्ञानराम

मस्तच.... :)

प्रभाकर पेठकर's picture

31 Oct 2012 - 2:08 pm | प्रभाकर पेठकर

लेखन पद्धत आवडली. शेवट अपेक्षित होता. किंSSSचित विरस झाला.

सहज's picture

31 Oct 2012 - 2:55 pm | सहज

कथा आवडली.

मदनबाण's picture

31 Oct 2012 - 3:29 pm | मदनबाण

भारी लिवलयं ! :)

अभिजितमोहोळकर's picture

31 Oct 2012 - 3:31 pm | अभिजितमोहोळकर

आवडलं.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2012 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

जबराट.....!

इष्टुर फाकडा's picture

31 Oct 2012 - 3:48 pm | इष्टुर फाकडा

काटा!!!

मूकवाचक's picture

31 Oct 2012 - 4:06 pm | मूकवाचक

जबराट!!!

मी_आहे_ना's picture

31 Oct 2012 - 4:25 pm | मी_आहे_ना

हॅप्पी हॅलोवीन! ... जबरी प्रकटन/कथा/भयकथा/भय-मुक्तक

गणपा's picture

31 Oct 2012 - 4:27 pm | गणपा

झक्कास.

अक्षया's picture

31 Oct 2012 - 4:59 pm | अक्षया

छान लिहीलय आवडले !! :)

पैसा's picture

31 Oct 2012 - 5:19 pm | पैसा

थोड्या शब्दात मस्त जमलीय कथा!

अगदी सोप्पी भूतकथा आवडली.
एकानं यायचं बदकन् पाण्यात पडायचं. दुसर्‍यानं यायचं बदकन् पाण्यात पडायचं. ;)
सर्वांना ह्याप्पी ह्यालोविन.

स्पंदना's picture

1 Nov 2012 - 11:24 am | स्पंदना

बयो!
अग देव आनि भुत अशी बदकनच दिसतात.तिन तासाचा पिक्चर नसतो तो. सोप्पी तर सोप्पी! भुतकथा हाय कीनी? बास!

स्वाती दिनेश's picture

31 Oct 2012 - 11:05 pm | स्वाती दिनेश

भूतकथा आवडली,
हॅपी हॅलोविन!
स्वाती

मराठे's picture

1 Nov 2012 - 1:51 am | मराठे

सॉल्लिड्ड!

हॅलोविनचा मुहुर्त साधण्यासाठी योग्य, पण फारच अपेक्षित वाट फक्त वाटेवरच्या पाट्य नविन रंगवलेल्या त्या आवडल्या.

प्रचेतस's picture

1 Nov 2012 - 8:31 am | प्रचेतस

अपेक्षित शेवट असूनही संवादांच्या सुयोग्य वापराने प्रभावी ठरलेली भयकथा आवडली.

लीलाधर's picture

1 Nov 2012 - 8:47 am | लीलाधर

ज ह ब रा मस्त आवडेश. भारी लिवलीय कथा :)

स्पंदना's picture

1 Nov 2012 - 11:23 am | स्पंदना

धन्यवाद मंडळी.
खरतर हॅलोवीनसाठी कुणीतरी लिहिल अस फार वाटत होत.पण कुणीच काही तंकल नाही म्हणुन माझ्या कडुन धापैशाच हे लेखन प्रपंचाच धाडस.

सुहास..'s picture

1 Nov 2012 - 12:31 pm | सुहास..

भुतकथा आवडली ...साधी आणि सोप्पी !!