लवचिक

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
20 Aug 2008 - 1:02 pm

५० वर्शे झाली मराठी भाशेच्या प्रेमामध्ये पडुन. तसुभरही कमी झालेले नाही. रोजच्या कामामध्ये इंग्रजीचा जास्त वापर असतो. मला आवडो वा न आवडो. पालकांची आवड. काय करणार?
किती लवचीक. किति सर्वसमावेशक. किती अर्थपुर्ण. अर्थामध्ये अर्थ. त्या अर्थामध्ये आणखीन एक अर्थ. इंग्रजीला जोडा आणखीन एक अर्थ. हिंदी ला जोडुन वेगळा अर्थ.
ह्या सर्व अर्थकारणामधे मला पहिल्यापासुन खुपच रस.
मराठी च्या तासाला मास्तरला फेफरं आणणे कायम्चा उद्योग.९वीत असताना "औशध नलगे मजला" चा तिसरा अर्थ लागतो ची टीपणण्णी खुप महाग पडली होती.शालेय पत्रिकेत माझा लेख (क्रिप्टीक) डिलिट केल्यामुळे सपादक मंड्ळाला लिहिलेल्या निशेध पत्रात मुद्दाम अनुस्वाराचा घोटाळा केला होता.( समपादक) इतर भाशेमधील शब्दाचे मराठी अर्थ.
कश्ट्मर = ज्याच्या करिता कश्ट करुन मरावे लागते तो.
बॅलन्स शीट=( धंदेवाल्याकरिता) बॅलन्स कश्ट्मरकडे , ह्यांच्याकडे फक्त शिट वा शीट्
आउट स्टॅडींग= जे वसूल करताना कश्ट्मर् च्या दरवाजा बाहेर जे करावे लागते ते
अशा अर्थकारणात मि.पा वाल्यांनी भर घालावी.
जाता जाता : शेपटीवाल्या प्राण्याची पुर्वी भरली सभा हे बालगीत नसुन एक गुढ सुचना आहे. म्हणा आणि अर्थ शोधा.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

ऍडीजोशी's picture

20 Aug 2008 - 1:44 pm | ऍडीजोशी (not verified)

शेपटीवाल्या प्राण्याची पुर्वी भरली सभा हे बालगीत नसुन एक गुढ सुचना आहे. म्हणा आणि अर्थ शोधा.

मदारी (बॉस) ज्यांना आपल्या तालावर नाचवतो त्या माकडांची (कर्मचारी) सभा भरली होती आणि पोपट (पुस्तकं वाचून पोपटपंची करणारे मार्केटींग वाले) काँफरंस रूम च्या मध्यभागी उभे होते.

जमतंय का भाउ???

विनायक प्रभू's picture

20 Aug 2008 - 1:57 pm | विनायक प्रभू

चालेल. पण गुढार्थ कळ्ण्यास कल्पना शक्तिचा विहार करावा लागेल.
वि.प्र.