भावनांच्या आधारे केलेले वार
सगळेच रिकामे नव्हते,
जखमा भरुन यायला वेळ लागला
इतकच !
'हळव्या' शब्दालाहि
हसण्यामागे अर्थहिन बनवलं,
हसरि म्हणुन मिरवलं
इतकच!
मनात का कोण जाणे,
बरच दडलं होतं ,लाव्हाच थोडक्यात,
कधीतरी आसवानी मदत केली
इतकच!
नातं काहिच नव्हतं,
तरिहि आपल्यात बरच काहि,
मी बहुतेक जपलं
इतकच!
प्रतिक्रिया
24 Oct 2012 - 7:47 am | श्रीरंग_जोशी
हि रचना आवडली.
एक गोष्ट नेहेमी लक्षात ठेव - मंजिलें और भी हैं!!
24 Oct 2012 - 9:23 am | सुधीर
शेवटच कडवं आवडलं.
24 Oct 2012 - 9:52 am | अभ्या..
:(
24 Oct 2012 - 10:52 am | शैलेन्द्र
आवडली..
इतकचं :)
24 Oct 2012 - 12:38 pm | michmadhura
कविता आवडली.
24 Oct 2012 - 12:45 pm | इरसाल
केलेले वार,शब्दालाहि
कोण जाणे,काहिच नव्हतं
इतकच........
24 Oct 2012 - 2:07 pm | सस्नेह
काव्य तर आहे मस्त. पण जीवन नव्हे बरं का....इतकंच !
24 Oct 2012 - 2:21 pm | पैसा
कविता आवडली. नेहमी असं लिहित नाहीस ही तक्रार आहे, इतकंच!
24 Oct 2012 - 9:55 pm | सोत्रि
पैसातैशी सहमत.
- ('आता इतकंच' असे म्हणणारा) सोकाजी
24 Oct 2012 - 2:22 pm | अत्रुप्त आत्मा
चला..., बालिका ख.फ.वरची रंगीत तालिम सोडून येकदाची श्टेजवर आली...! :-)
अता इथे काय ती बाकिची रणधुमाळी (पण) होऊ द्या. ;-) :-))
25 Oct 2012 - 11:48 pm | ५० फक्त
कोकमांचं उकळुन केलेलं सार
पातेले रिकामेच झाले होते
शेवटचा भात यायला वेळ लागला
इतकच !
जिलब्या सारख्या पदार्थालाही
नवलेखकांनी आंबटचिट्ट बनवलं
प्रतिभा म्हणुन मिरवलं
इतकच!
आंतरजालावर का कोण जाणे,
बरंच पडलं होतं, जिलब्याच थोडक्यात
कधीतरी संपाद्कांनी मदत केली
इतकच!
नातं काहिच नव्हतं,
तरिहि आपल्यात बरच काहि,
प्रत्येक चमच्याला जपलं
इतकच!
26 Oct 2012 - 12:39 am | जेनी...
=)) ५० रुपये , जा बाबा कट्टी :-/
24 Oct 2012 - 6:05 pm | जेनी...
:) ..धन्यवाद !
24 Oct 2012 - 6:56 pm | प्रचेतस
मस्त रचना.
24 Oct 2012 - 7:05 pm | रेवती
छान जमलीये गं कविता.
नेहमी का लिहीत नाहीस?
24 Oct 2012 - 8:20 pm | मालोजीराव
.....पण इतकिच ? अजुन वाढवली असती तर अजून मजा आली असती.
24 Oct 2012 - 9:17 pm | मदनबाण
छान कविता !
24 Oct 2012 - 10:29 pm | पिवळा डांबिस
आवडली...
'हळव्या' शब्दालाही
हसण्यामागे अर्थहीन बनवलं,
हसरी म्हणुन मिरवलं
इतकंच!
सुरेख!!
25 Oct 2012 - 6:15 am | स्पंदना
बरच काही आहे
पण थोडक्यात
इतकच !
25 Oct 2012 - 9:04 am | जेनी...
सगळ्यांचे आभार . :)
25 Oct 2012 - 9:16 am | ज्ञानोबाचे पैजार
छान लिहीली आहे कविता. आवडली
सध्या तरी इतकच.
पैजारबुवा,
25 Oct 2012 - 4:33 pm | चेतन माने
फार सुंदर, आवडली कविता :)
26 Oct 2012 - 1:27 am | अर्धवटराव
हे "इतकंच" प्रत्येकाच्या नशिबी येत नाहि.. आलं तरी ते कळत नाहि, कागदावर उतरत नाहि.
अर्धवटराव
26 Oct 2012 - 1:05 pm | गणामास्तर
छान कविता. . ! !
पु.क.शु.
26 Oct 2012 - 4:03 pm | सूड
बर्यापैकी बरी कविता !!
30 Oct 2012 - 12:35 pm | निश
पूजा पवार जी, कविता उत्तम झाली आहे.
30 Oct 2012 - 12:43 pm | कवितानागेश
छान.
31 Oct 2012 - 4:33 am | जेनी...
पून्हा एकदा खुप खुप धन्यवाद सगळ्यांचच :)