कुवेत एअरवेज चे फ्लाईट ३११ मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावरून आकाशात झेप घेत होते ,तसतसे आशिष चे विचारही मणामणाचे ओझे उतरावे तसे हलके होत होते . गेले१० महिने आणि त्या काळातल्या घडामोडी एखाद्या चित्रपटासारख्या त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या .गेले एकदोन दिवस नव्हे,तर चक्क १० महिने आपण असे झपाटल्यागत कसे काय वागत होतो? याचा वचार करूनही त्याला उत्तर सापडेना !
रचना ! एखाद्या स्वप्नातल्या परीसारखी ! गोव्याला कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना पहिल्याच दिवशी एक नवीन चेहरा दृष्टीस पडला .नजरानजर झाली ,आणि तिने चक्क स्माईल दिलं! आशिष मनातून खुश झाला .मग रोजच स्माईल ची देवाणघेवाण सुरु झाली .कधी "गुड मॉर्निंग " तर कधी कॉफी, ओळख वाढत गेली . तिचे मनमुराद खळखळून हसणे आणि दिलखुलास स्वभाव याची मोहिनी कधी आशिष वर पडली ,आणि कधी ती त्याच्या स्वप्नात शिरली ,ते आशिष ला कळलंच नाही.
ती पहिल्या वर्षाला होती तर आशिष दुसऱ्या ! आशिष त्याच शहरात लहानाचा मोठा झालेला ,तर ती १०० किमी वरच्या दुसऱ्या गावातून आलेली,होस्टेल ला राहायची! त्यामुळे कॉलेज-जीवनातले, अभ्यासातले बरेवाईट अनुभव त्याने तिच्याशी शेअर केले ,अनेक खाच-खळगे ,प्राध्यापकांच्या सवयी,लकबी आणि शिक्षकान्चे मन जिंकण्याच्या खुबी त्याने तिला समजावून दिल्या ,हळूहळू अभ्यास /नोट्स आणि इतर कारणांनीही भेटीगाठी वाढू लागल्या .तीही हळूहळू त्याच्याकडे ओढली जात होतीच .पण "प्यार का इजहार" मात्र झाला नव्हता.
बघता -बघता २ वर्षे उलटली , आशिषचे कॉलेज संपले ,आणि ती होती शेवटच्या वर्षाला .नोकरी लागल्यावर लग्नाचे विचारायचे असे आशिष ने ठरवले होते . आशिष ला शहराताल्याच एमआयडीसी मध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून जॉब लागला . आणि तो रुळला देखील नव्या नोकरीत ,दिवस मस्त चालले होते ,शनवार-रविवार भेटी-गाठी सुरुचं होत्या आणि शेवटी एका रविवारी संध्याकाळी बीच वर फिरताना आशिष ने लग्नाच गोष्ट काढली .
तिने अतिशय शांतपणे ऐकून घेतले ,आणि म्हणाली,"तु म्हणतोस ते खरे आहे, मीही तुझ्या प्रेमात कधी पडले ते मलाही नाही कळले रे! पण लग्न म्हणजे खूप मोठा निर्णय आहे ,मी अजून घरी काही सांगितलेले नाही ,आणि कॉलेज संपल्यावर मला घरी परत जावे लागेल .मग आपल्या भेटी कशा होणार?" त्यावर आशिष म्हणाला,"मी तुझ्यासाठी इकडेच जॉब बघतो नां,माझ्या आता ओळखी झाल्या आहेत इकडे .तु घरी विषय तरी काढून बघ"
दिवाळीच्या सुट्टीत रचना घरी गेली तेव्हा आई-बाबाना तिने सर्व सांगितले , पण शेवटी जात आडवी आली ,आशिष ब्राह्मण आणि ती इतर समाजातील ! त्यामुळे ब्राह्मण घराण्यात इतर मुलगी कशी चालेल? आशिष चे आईवडील तिला स्वीकारतील का ? याबाबत रचनाचे बाबा साशंक होते . पुढे काय रामायण वाढून ठेवलंय,या विचाराने त्यांना आता तिची काळजी वाटायला लागली .
सुट्टी संपल्यावर रचना परत कॉलेजला आली ,आशिषला तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला .आशिष ही काळजीत पडला .प्रेमात पडताना जात-धर्म कोण बघते का? आता पुढे काय? या विचाराने तो धास्तावला !पण दोघानीही प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या होत्या ,आयुष्य एकमेकांबरोबर काढण्याचा दृढ-निश्चय होता ,पुढचे पुढे बघू,म्हणून ती आणि तो आपापल्या कामात व्यग्र झाले .
कॉलेजचे शेवटचे वर्ष संपले आणि रचना फर्स्ट क्लास मध्ये पास झाली ,आणि आशिष च्या ओळखीने एका कंपनीत ट्रेनी इंजिनियर म्हणून जोइन ही झाली .दिवस पुढे सरकत होते ,हळहळू दोघांच्या प्रेमाची कुणकुण आशिषच्या घरी लागली आणि आशीशचे बाबा भयानक संतापले .आम्ही पर-जातीतली मुलगी चालवून घेणार नाही असा थयथयाट केला . तेव्हा पासून आशिष सतत टेन्शनमध्ये राहू लागला .कंपनीतल्या मित्रांनाही हे जाणवले कि आशिष कुठल्यातरी संकटात आहे,त्यांनी धीर दिला .आम्ही लागेल ती मदत करू,घाबरू नकोस .
अशीच दोन वर्षे उलटली .आशिष चा रिझ्युम नौकरी.कॉम वर होताच . त्यामुळे त्याला कुवेतच्या एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीकडून इंटरव्ह्यू साठी कॉल आला .मुंबईत इंटरव्ह्यू झाला आणि गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर त्याची नियुक्ती झाली .आशिष मात्र एका बाजूने आनंदी,तर दुसऱ्या बाजूने रचना पासून दूर जावे लागणार म्हणून दू:खी होता . अशा द्विधा मन:स्थितीतच शेवटी ताने रचनाचा निरोप घेतला . मी तुझी वाट पाहीन, फोन-मेलं द्वारे संपर्कात राहूच! असे ठरले.
आशिष कुवेत ला आला, बघता बघता तिथल्या नवन नोकरीत रमला .कंपनीने अतिशय आधुनिक आणि आरामदायक सोयी-सुविधा दिल्या होत्या .भारत आणि कुवेत मधला जमीन-अस्मानाचा फरक ,याचेच कौतुक करत करत नव्याची नवलाई कधी सरली ते समजलेच नाही आशिषला ,कुएतला एक वर्ष पूर्ण केल्यावर १ महिन्याची सुट्टी मिळणार होती.भारतात जावून लग्न करून घ्यावे आणि मग रचनाला इकडेच आणू,म्हणजे बाबानाही त्रास नको आणि आपल्यालाही ,असा विचार तो करत होता .
सुरुवातीला रचनाशी रोज फोन/मेल द्वारे बोलणे व्हायचे, तिकडचे फोटोही त्याने तिला पाठवले , पण हळूहळू रचनाकडून येणारा प्रतिसाद कमी होऊ लागला .रोज होणारे फोन आठवड्यातून एकदा होऊ लागले ....पुढे पुढे तर आशिषच्या मेल नां उत्तर न देणे ,फोन न उचलणे असेही प्रकार घडू लागले .
त्यामुळे आशिष मनातून धास्तावलेला होता ! आशीशचे कुवेतला एक वर्ष पूर्ण झाले , मुंबईत विमानतळावर उतरल्यावर अजिबात वेळ न दवडता त्याने थेट गावाकडची ट्रेन पकडली आणि घरी आला .
कंपनीतल्या मित्रांकडे रचनाची चौकशी केल्यावर जे कळले त्याने आशिष उडालाच! आशिष कुवेत ला गेल्यावर मधल्या काळात रचना संदीप नावाच्या दुसऱ्या एका मुलाच्या संपर्कात आली होती. तो होता पुण्याचा ,पण शिकायला इकडे होता .हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि मागच्याच महिन्यात त्या दोघांचा साखरपुडा ही झाला !
संपले सगळे ! आशिषच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला .त्याने गेल्या ३-४ वर्षापासून वाढवलेले प्रेमाचे रोपटे या कुठल्याशा फडतूस संदीप ने पायदळी तुडवले होते. दू:ख ,अपमान, फसवणूक अशा अनेक भावनांचा हल्लकल्लोळ झाला ,आणि रागाच्या भरात त्याने या सगळ्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी रचनाच्या घरी जाण्याचे ठरवले !
दुसऱ्याच दिवशी काही जवळच्या मित्रांना घेवून आशिष रचनाच्या घरी गेला ,घरी रचना ,संदीप,आई-वडील आणि रचनाचा भाउ होता .आशिषला एक शब्दही बोलू न देता दमदाटी करून संदीप आणि रचनाच्या भावाने घराबाहेर काढले .आशिष अतिशय व्यथित झाला .
घरी परत येताना आशिष च्या गाडीला अपघात झाला ,पण सुदैवाने त्याला फार लागले नाही , फक्त डोक्याला मुकामार लागला . २ दिवस हॉस्पिटल मध्ये काढून जेव्हा आशिष घरी आला ,तेव्हा त्याला जाणवले कि काह्तरी बिनसलंय ...त्यानंतर त्याला रात्री नीट झोप येईनाशी झाली ,विचित्र भीतीदायक स्वप्ने पडू लागली .एका रात्री तो ओरडत झोपेतून उठला तेव्हा घराच्यानाही जाणवले काहीतरी बिघडलय .
आशिषच्या बाबांनी त्यांच्या आध्यात्मिक गुरुना आशिषची सर्व कहाणी सांगितली ,ते म्हणाले कि त्या मुलीच्या मित्राने तुमच्या मुलावर काळी जादू केलेली आहे ...मग आशिष आपल्या आई-वडिलांसह नाशिक ला जावून विधी करून आला ,तेव्हा कुठे त्याचे चित्त थारयावर आले! शेवटी आईबाबांना तुम्ही पसंत कराल त्या मुलीशीच मी लग्न करीन,असे वचन देवून आशिषने परतीच्या प्रवासाची तयारी सुरु केली.
...
. या विचारांच्या तंद्रीतून आशिष जागा झाला तो विमानाच्या वैमानिकाने केलेल्या उद्घोषणेमुळे..” थोडीही देर में कुवेत एअरवेज की फ्लाईट ३११ कुवेत अंतर-राष्ट्रीय हवाई अड्डे पर उतर रही है......”.आणि मग विमानतळावर उतरल्यावर त्या गर्दीतालाच एक बनून आशिष हरवून गेला ............................
प्रतिक्रिया
23 Oct 2012 - 4:16 pm | बिपिन कार्यकर्ते
हे नक्की काय आहे?
23 Oct 2012 - 4:25 pm | सस्नेह
हा 'कथा' नावाचा 'विरंगुळा' आहे. (असे समजते)
24 Oct 2012 - 8:29 pm | शैलेन्द्र
काय बिका, अजुन नाही कळाल? जिलेबीच्या गोडीची कथा आहे हो..
23 Oct 2012 - 4:32 pm | चौकटराजा
मागे एकदा उत्तम कथा मग ती भयकथा असो वा विनोदी -तिचे समस्या संघर्ष व नाट्य असे तीन भाग हवेतच असे शन्ना नवरे यानी लिहिले होते. या कथेत तीनही तत्वे आहेत तरीही कथा जमलेली नाही कारण.... नाट्य तुम्ही भलतीकडेच नेले आहे. नाट्यातही लॉजिक असावे .
24 Oct 2012 - 8:17 pm | शैलेन्द्र
काका, समस्या, संघर्ष व नाट्य हे तिनही भाग, किती प्रमाणात असायला हवेत?
(खातय मार आता काकाच्या हातचा..)
23 Oct 2012 - 4:33 pm | इरसाल
हे कुवेत फ्लाईट ३११ चे मुंबईहुन कुवेतपर्यतच्या प्रवासामधील आशिषच्या मनातील विचारांचे तांडव आहे.
तो काळ्या जादुतुन वाचला याचा आनंद व्यक्त करायचा सोडुन भलत्याच (कु)शंका घेत आहात ?
माझीपण एक कुशंका : काळी जादु केलीच होती तर घरातुन दम्दाटी करुन काढायची काय गरज होती.
23 Oct 2012 - 4:43 pm | कवितानागेश
नौकरी.कॉम वर रिझ्युम टाकला की कुवेतच्या एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीकडून इंटरव्ह्यू साठी कॉल येउन मुंबईत इंटरव्ह्यू होउन गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीवर नियुक्ती होते, इतके मला कळले.
धन्यवाद.
23 Oct 2012 - 5:01 pm | कपिलमुनी
आजच डकवावा म्हणतो !
23 Oct 2012 - 4:49 pm | स्पा
बर मग?
23 Oct 2012 - 5:12 pm | आदिजोशी
उमलत्या वयात झालेल्या प्रेमाचा असा रसभंग होणे आणि त्यामुळे घडणार्या मनातल्या घडामोडी तुम्ही फार समर्थपणे उभ्या केल्या आहेत. वाचता वाचता कथेशी इतका एकरूप झालो की हे सगळं प्रत्यक्षा घडताना बघत असल्याचं फिलींग आलं. आशीषची कहाणी तुम्ही प्रचंड ताकदीने वाचकांपर्यंत पोहोचवली आणि वाचक कथेशी एकरूप झाले ही सगळ्यात मोठी पावती.
तुमची लेखनशैली आवडली. अनेक प्रसंग जसेच्यातसे डोळ्यासमोर उभे राहिले. आशीषची वेदना आम्हीही अनुभवली. कुठेही विस्कळीतपणा अथवा विसविशीतपण येऊ न देता तुम्ही त्या दोघांच्या नात्याच्या इतका वर्षांचा प्रवास उभा केलात. दोघांच्याही मनातील संघर्ष, त्याचं प्रेमात झोकून देणं, तिने नाईलाजाने स्विकारलेली प्रॅक्टीकल वाट, अशा अनेक वळणांना तुम्ही स्पर्श केलात. पण कुठेही कथा कंटाळवाणी झाली नाही.
कसलेल्या लेखकाप्रमाणे तुम्ही कथेची उत्तम मांडणी केली. कथा आणि लिखाणावरील तुमची पकड कौतुकास्पद आहे.
आणि मग विमानतळावर उतरल्यावर त्या गर्दीतालाच एक बनून आशिष हरवून गेला ............................
हे वाक्य तर खास काळीज हलवून गेले.
अर्थात, इतक्या मोठ्या कालखंडावर आणि इतक्या नाजूक विषयावर इतकी गुंतागुंतीची कथा लिहिल्यावर वरच्या प्रतिसादकाप्रमाणे ती अनेकांना कळणार नाही हे ओघाने आलेच. म्हणून मीच कथेचे सार म्हणता येईल असे मुद्दे काढून देत आहे. पुढच्या वाचकांना कथेचा आस्वाद घेण्यासाठी उपयोगी पडतील ही आशा. अर्थात कथा हे लेखकाचे अपत्य असल्याने माझ्या मुद्द्यांमधे सुधारणा करण्याचा लेखकाला अधिकार आहेतच हे.वि.सां.न.ल.
मुद्दे
१.
आई-बाबांना विचारल्याशिवाय प्रेमात पडू नये. मुलगी परजातीतली असेल तर तो विचारच टाळावा.
२.
चुकून माकून प्रेमात पडलातच तर त्या प्रेमाची परिणीती लग्नात व्हावी असा हट्ट धरू नये. प्रेम करण्यासाठी फक्त प्रेम गरजेचे आहे. लग्न होवो न होवो, प्रेम करता येतंच.
३.
अशा विचित्र परिस्थीतीत पडल्यावर आपल्या ग.फ./बॉ.फ. ला देवाच्या भरवशावर सोडून परगावी नोकरीला जाऊ नये. कधीही पत्ता कट होण्याचे चान्सेस असतात.
४.
रविवारी संध्याकाळी बीचवर फिरताना प्रपोज करू नये. रविवार + संध्याकाळ + बीच हे अत्यंत अपशकूनी काँबीनेशन आहे.
५.
नौकरी डॉट कॉम वरून गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या मिळतात.
६.
आपल्या परजातीतल्या बायकोला घेऊन परगावी गेले तर 'पर' आणि 'पर' एकमेकांना नलिफाय करतात आणि घरच्यांना त्याचा त्रास होत नाही
७.
डोक्याला मार लागल्यावर झोप उडू शकते, भयानक विचित्र स्वप्न पडू शकतात. म्हणून प्रवासाला जाताना डोके घरी ठेऊन निघावे.
८.
काळ्या जादूवर अक्सीर इलाज नाशीकला आहे. त्यामुळे भुते शांत होतात आणि तुम्हीही.
९.
कुवेत विमानतळावरही आपल्या विमानतळाप्रमाणेच गर्दी असते. गर्दीतला एक झाल्याने अनेक त्रास टळतात.
१०.
आपल्याला लिखाण जमत नसल्यास कुत्सीतपणे प्रश्न विचारू नये. आपणच उघडे पडतो. आणि उघडे पडलो की काचेच्या घरात राहता येत नाही.
मुद्दे संपले. धन्यवाद.
23 Oct 2012 - 5:15 pm | ५० फक्त
अरेरे दोघांचंही फेसबुक अकाउंट नव्हतं वाटतं, नाहीतर लगेच कळालं असतं काय चालु आहे ते, आणि कुवेतमधल्या मिपाकरांना मदतीचा धागा टाकला असता तरी चाललं असतं, शेजाराच्या लग्नाच्या बायकोच्या बोक्याला प्रेझेंट दिलेल्या गुलाबजामुनच्या उरलेल्या पाकाबद्दल मदत करुन मिपाकर दाढीवाल्याबाबापासुन मुक्त करुन पुन्हा यशवंत हो असा आशीर्वाद देउ शकतात तर ही असली प्रकरणं म्हंजे किस झाड की पत्ती.
असो, पुढच्या वेळी धागा उडण्याची भिती न बाळगता धागा काढा.
23 Oct 2012 - 5:58 pm | मंदार कात्रे
कथा ही कथा असते ...
रसग्रहणा बद्दल आदिजोशी यान्चे आभार ...
poetry is spontaneous overflow of powerful feelings असे कोणीतरी म्हणाले आहे :०
24 Oct 2012 - 3:06 am | अरुण मनोहर
रसग्रहणाचा (^^^) प्रकार आदिजोशी ह्यांनी शिकवला!
24 Oct 2012 - 8:26 pm | शैलेन्द्र
"कथा ही कथा असते ..."
भले शाब्बास पठ्ठे..
बाकी मिपावर प्रतिक्रिया या प्रतिक्रीया असतात, जस आम्ही तुमच्या कथांना हलके घेतो तसच तुम्ही प्रतिक्रीयांना हलके घ्या.. घाणा चालु राहणे महत्वाचे..
आणी त्या रसग्रहनाबद्दल खरच विचार करा, सगळ्या सुचना लाख मोलाच्या आहेत..
25 Oct 2012 - 4:32 pm | सुबक ठेंगणी
poetry is spontaneous overflow of powerful feelings हे बरोबर आहे पण पुढचं recollected in tranquility विसरलात वाटतं :p
23 Oct 2012 - 7:10 pm | मराठे
प्रयत्न केला तर यापेक्षा चांगले लिहु शकाल. इथे सगळा पिच्चर फास्टफॉरवर्ड करत बघितल्यासारखा वाटला. त्यामुळे गुंतवून ठेऊ शकला नाही. पुढील लेखनसाठी शुभेच्छा!
23 Oct 2012 - 7:48 pm | मंदार कात्रे
धन्यवाद आणि आभार सर्व प्रतिसादांबद्दल !
23 Oct 2012 - 8:48 pm | बहुगुणी
मला वाटलं बर्याच काळानंतर मी लिहिलेली याच नावाची (देस-परदेस) कथा कुणीतरी वाचून, प्रतिसाद देऊन वर आणली, :-) पण लेखकाचं नाव बघितल्यावर लक्षात आलं की ही दुसरीच, वेगळ्याच विषयावरची आहे. विषय कदाचित वास्तविक असेल, पण मांडणी अवास्तव वाटली, थोडा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असता तर या लेखकाला ती वेगळी करता आली असती असं वाटलं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
23 Oct 2012 - 11:19 pm | पक्या
कथेवरून एवढाच बोध होतोय की 'झट मंगनी पट ब्याह' हेच खरे. एकदा का बात जमून आली की वेळ दवडण्यात अर्थ नाही. आणि लाँग डिस्टन्स रिलेशनशीप चे काही खरे नसते.
24 Oct 2012 - 7:50 am | संजय क्षीरसागर
ही कथा की धडाधडा वाचलेला धडा?
24 Oct 2012 - 12:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे
लिखाण आवडले. जरा खुलवता आले असते तर उत्तम झाले असते.
अवांतर :- Constructive criticism असेल तिथे लक्ष द्यावे अन्यथा दुर्लक्ष ही सर्वात मोठी शिवी आहे :-)
24 Oct 2012 - 4:10 pm | श्री गावसेना प्रमुख
नवीन लेखकांचा हिरमोड करणार्या प्रवृत्तींचा जाहीर णीशेद...
24 Oct 2012 - 6:26 pm | माझीही शॅम्पेन
झकास कथा आवडली , पु. ले. शु. :)
24 Oct 2012 - 7:59 pm | वाटाड्या...
हे बरयं !!!
पाहिजे तिथे पाहीजे तेव्हा प्रेमात पडता येतं ते पाहुन...तु नही तो आर सही ह्या कॉलेजमधल्या म्हणीची उगीच आठवण आली ;)
एकुण नळ गळावा तसं प्रेम गळत असावं..कुणीही या बादली भरुन मिळेल...(पु.लं.ची आठवण आली)..
- (गळका) वाट्या..
24 Oct 2012 - 8:07 pm | जेनी...
कुणीही या बादली भरुन मिळेल
_____________________
गळकी वाटी घेऊन जायचा विचार दिसतोय तुमचा :)
=))
25 Oct 2012 - 5:43 am | स्पंदना
छान लिहिलय.
पु.ले.शु.
25 Oct 2012 - 4:14 pm | पियुशा
अरेरे !!!! अस नवलेखकांना निराश करु नये शिकतील तेही हळुहळू हे कधी कळणार हो तुम्हा मिपाकर्सना ;)
25 Oct 2012 - 4:43 pm | एम.जी.
आशिष ला शहराताल्याच एमआयडीसी मध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून जॉब लागला
गोव्यामधे एम आय डी से चे हापिस काय करतेय...?
25 Oct 2012 - 4:54 pm | इरसाल
म्यानेजिंग गायरेक्टर,
तुम्हाला भारीच शंका हो !!!!!!!
26 Oct 2012 - 11:52 am | चिगो
ये क्या हो रहा है? काय, चाललंय काय ?
26 Oct 2012 - 1:35 pm | मृत्युन्जय
सध्या मिपावर कोणीतरी काळी जादू केलेली आहे. नीलकांतने नाशिकला जाउन योग्य ते विधी करुन घ्यावेत अशी कळकळीची विनंती. नंतर जमल्यास कुवैतला जाउन विमानतळावर अपले दु:ख पण हलके करुन घ्यावे.
26 Oct 2012 - 10:24 pm | किसन शिंदे
सर्वात ब्येष्ट प्रतिक्रिया. :D :D
29 Oct 2012 - 2:09 pm | भडकमकर मास्तर
कथेचे शीर्षक
" काळी जादू- पुढचे पुढे बघू"