तिन्ही त्रिकाळ घरामधे ह्यांचीच सारखी घाई
काही करायचे म्हटलं, तर माझ्यासाठी वेळ नाही
सकाळी आरामात उठणे कसले आमच्या नशीबात
ब्रेकफास्ट खाऊन लवकर, ह्यांना जायचे ऑफीसात
आज सुट्टीचा रविवार, उठावे आरामात, सुचवता
रोमॅन्टीक मूड ह्यांचा म्हणे पाहू सूर्य उगवता
सुर्य तरी कसला अरसीक, तिन्ही काळ करतो काम
उशीरा का उगवत नाही घ्यायला एक दिवस आराम?
दुपारी हे ऑफीसात, मैत्रीणीशी फोनवर बोलते खूपवेळ
मधूनच ह्यांना आठवण येते, एन्गेज मिळताच घालमेल
संध्याकाळी घरी लवकर, एक दिवस तर बायकोसाठी
पण कसले काय, उशीरा पर्यंत रोज मरमर कामासाठी
रात्र तरी आपली असावी? ह्यांची टेली कॉन्फरन्स उपटते
अमेरीकेत सकाळ असेल हो, पण आमची मात्र झोप उडते.
प्रतिक्रिया
18 Aug 2008 - 5:15 pm | प्राजु
सह्ही आहे.
बाकी
रात्र तरी आपली असावी? ह्यांची टेली कॉन्फरन्स उपटते
अमेरीकेत सकाळ असेल हो, पण आमची मात्र झोप उडते.
हे मात्र खासच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
(स्वगत : अरूणजींच्या बायकोला विचारायलाच हवे.. :? ) ह.घ्या.
19 Aug 2008 - 1:06 am | ऐका दाजीबा
कवितेचं ठीक आहे, पण ही 'तिन्ही त्रिकाळ' काय भानगड आहे? गाईचं 'गोमूत्र' म्हटल्यासारखं...
19 Aug 2008 - 6:19 am | अरुण मनोहर
मराठीत असा अलंकार आहे.
"सारख सारख मला तेच ते सांगू नकोस."
"पुन्हा पुन्हा विचारतोय"
"तिन्ही त्रिकाळ ह्याचा आपला एकच जप"
19 Aug 2008 - 8:47 am | सर्किट ली (not verified)
इट्स देजा वू ऑल ओव्हर अगेन
- योगी बेरा
कासे पिवळा पीतांबर..
- एक आरती
काय नेने, येताय का सकाळच्या मॉर्निंग वॉकला ?
- लेले काका
19 Aug 2008 - 10:14 am | हर्षद आनंदी
दुपारी हे ऑफीसात, मैत्रीणीशी फोनवर बोलते खूपवेळ
मधूनच ह्यांना आठवण येते, एन्गेज मिळताच घालमेल
रात्र तरी आपली असावी? ह्यांची टेली कॉन्फरन्स उपटते
अमेरीकेत सकाळ असेल हो, पण आमची मात्र झोप उडते.
हम्म!!! सत्य आहे. :)