विडंबनाला मिळणारा लोकाश्रय बघून कविला वाटले आपणही लिहावी एक कविता. करा विडंबन.
१६ ऑगस्ट.
त्या टिळकांचे काही ऐकू नको.
टाक पंचांगासकट टरफले
बापू म्हणाले.
बहुराष्ट्रीय कचराकुंडीत.
* * *
चार जीव ठाण मांडून
पिपात पडले.म्हणले,
येऊ द्या टरफले
बरी पडतात चघळायला
रंग दे ...च्या मध्यंतरात.
अहो असे कसे ,बाहेर या.
आसेतु हिमाचल भारतवर्षाचा
एकसष्ठावा..
राहू द्या हो कारभारी,
काय खाजगी
काय सरकारी.
एकसष्ठ बासष्ठ करायला.
साठी झाली पुरेशी.
* * *
निर्देशांक आधारीत नैतीकतेचे
नेसू सैल झाले
बापू या पंच्याचे.
सुटायला आला
सब प्राईम राष्ट्रीयतेचा काष्टा.
* * *
एकविस दिवस
चित्तशुद्धी उपोषण
करून या मेळघाटात.
बाविसाव्या दिवशी
काश्मीरी कॅक्ट्सचा काढा.
* * *
प्रतिक्रिया
16 Aug 2008 - 9:10 am | विसोबा खेचर
मान गये रामदासबापू!
लै भारी कविता...:)
अवांतर : सध्या मी विडंबनांना प्रतिसाद द्यायच बंद केले आहे परंतु जर कुणी विडंबनकार या कवितेचं विडंबन करणार असेल तर ते मी वाचण्यास व त्याला प्रतिसाद देण्यास उत्सुक आहे! :)
कविता लै भारी असे पुनश्च एकद म्हण्तो! जियो रामदासबापू....!
( काकूंना म्हणावं, उत्तमपैकी रगडा-पॅटीस तैय्यार ठेवा, तात्या येणार आहे!:) )
तात्या.
16 Aug 2008 - 9:23 am | मदनबाण
जर कुणी विडंबनकार या कवितेचं विडंबन करणार असेल तर ते मी वाचण्यास व त्याला प्रतिसाद देण्यास उत्सुक आहे!
हेच म्हणतो..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
16 Aug 2008 - 9:13 am | पिवळा डांबिस
टाक पंचांगासकट टरफले
बापू म्हणाले.
बहुराष्ट्रीय कचराकुंडीत.
क्या बात है!!!
एकविस दिवस
चित्तशुद्धी उपोषण
करून या मेळघाटात.
बाविसाव्या दिवशी
काश्मीरी कॅक्ट्सचा काढा.
खरं आहे!!!!
काय खाजगी
काय सरकारी.
एकसष्ठ बासष्ठ करायला.
साठी झाली पुरेशी.
बापरे!! तुमच्या धैर्याची दाद देतो!!!
:)
मस्त, पुन्हा असंच येऊद्यात!!
नवीन फ्रेश हवा हवीहवीशी वाटते....
16 Aug 2008 - 9:31 am | सहज
आवडले.
क्लास!
16 Aug 2008 - 3:10 pm | सर्वसाक्षी
अफाट प्रकार आहे. आता विडंबन पाहुया!
17 Aug 2008 - 7:02 pm | ऋषिकेश
अतिशय नेमके सुटसुटीत मार्मिक काव्य! खूप आवडले
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
18 Aug 2008 - 6:47 am | धनंजय
असेच म्हणतो.
21 Aug 2008 - 8:53 pm | स्वाती दिनेश
असेच म्हणते,
आणि ह्या काव्याचे विडंबन वाचण्यास उत्सुक .. तेव्हा मिपावरील विडंबन कारांनो हे चॅलेंज स्वीकारा आणि एक सकस विडंबन येऊ द्या ...
स्वाती
21 Aug 2008 - 11:00 pm | रामदास
चॅलेंज नाही.विडंबन आले आहे.
21 Aug 2008 - 11:56 pm | चतुरंग
विडंबनाशिवाय सुने राहील अशी शंका आलीच कशी तुम्हाला? (ह.घ्या.)
मिपाचे विडंबक जागे आहेत! केसुशेठचा पठ्ठा टुकारशेठने हा गड कधीच फत्ते केलाय! ;)
चतुरंग
18 Aug 2008 - 7:01 am | मुक्तसुनीत
करंदीकरांच्या "आजचा दिवस साजरा करू दे" या विरूपिकेची आठवण आली. कवितेतील व्यंग जहरी आहे. मर्ढेकरांची प्रतिमा , चालू काळातील आर्थिक-राजकीय-सामाजिक कराल वास्तव , वर्तमानातील चित्रपट आणि इतर मनोरंजनातील घटकांचे छोटे छोटे फ्रॅगमेंटस यांचे कोलाज सिनिक , उपहासात्मक अशा रसायनात रंगविलेले आहे. वर्मस्थानावर प्रहार करणारी कविता.
21 Aug 2008 - 7:33 pm | लिखाळ
जबरीच आहे काव्य !
--लिखाळ.
मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
21 Aug 2008 - 8:34 pm | मुशाफिर
सद्य परिस्थितीवर फार छान भाष्य केले आहे आपण.
21 Aug 2008 - 11:49 pm | नंदन
आणि प्रभावी कविता.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी