सत्य किती सोपंय, किती सहज आहे पाहायचं असेल तर जगात आज एकमेव व्यक्ती आहे, एकहार्ट!
कोणताही चमत्कार नाही, सिद्धाच्या लक्षणांचं कोणतंही अवडंबर नाही. तुम्ही दखल घेतली नाही तर लक्षातही येणार नाही इतका साधा एकहार्ट.
त्याचं पॉवर ऑफ नाऊ प्रकाशित होऊन अनेक वर्ष झाली. तो भारतात येऊन गेला. इथली आध्यात्मिक बजबजपुरी त्यानं पाहिली, त्याबद्दल अवाक्षर काढलं नाही. अनेक वर्ष त्याच्याकडे कुणाचं लक्षही गेलं नाही. एकदा ओप्रा विनफ्रेनं त्याला टॉक शोला बोलावलं आणि तो प्रकाशात आला.
आजही तो इतक्या सादगीनं जगतो की तुम्ही रिसेप्टीव असाल तरच त्याला समजू शकाल. लक्षात आलं नाही तर तुमच्या जीवनातली एक सुरेख संधी हुकेल म्हणून हा लेख.
एकहार्ट : सौजन्य विकीपिडीया
___________________
पॉवर ऑफ नाऊ च्या प्रस्तावनेत त्यानं लिहिलंय, तिसाव्या वर्षापर्यंत तो कमालीची अस्वस्थता आणि आत्महत्येप्रत नेणार्या विमनस्कतेतून जगत होता. एक दिवस ते सगळं पराकोटीला गेलं, त्याला वाटलं `आता मला स्वत: बरोबर जगणं अशक्य आहे.'
तो विचार त्याच्या मनात सतत रुंजी घालू लागला आणि अचानक त्याला त्या विचाराचं आश्चर्य वाटलं, `मी एक आहे की दोन? कोण कुणाबरोबर जगू शकत नाही?'
त्या विचारावर तो इतका केंद्रित झाला की इतर सगळे विचार थांबले. सगळं एकदम शांत झालं.
ती शांतता क्षणोक्षणी इतकी सघन होत गेली की तिच्यात तो असाहाय्यपणे खेचला जाऊ लागला. मग त्याला जाणवलं की ती सर्वव्यापी वैश्विक शांतता बाहेर नाही, त्याच्या आत आहे. बाहेरची आणि आतली शांतता अचानक एक झाली, त्याचं सारं भय संपलं, तो सिद्ध झाला!
पुढे त्यानं लिहिलंय, आज सर्वोच्च काय असेल तर माझा अविभाज्य भाग झालेली ती शांतता.
लोक मला विचारतात, `तुला मिळालंय ते आम्हाला कसं मिळेल? तर मी त्यांना सांगतो, `तुमच्याकडे ते आहेच. तुमचं तिकडे लक्ष जात नाहीये कारण मनाची अविरत बडबड तुमचं लक्ष सतत वेधून घेतेय' ( पॉवर ऑफ नाऊ (१९९७): पाने १ ते ३)
_____________________________
एकहार्ट म्हणतो, "मी बहुदा उद्विग्नतेच्या परमावस्थेला पोहोचलो होतो आणि तिचा परिपाक म्हणजे एका क्षणी माझी जाणीव मन आणि शरीरापासनं वेगळी झाली."
अध्यात्मात याला `सडन एन्लायटन्मेंट' म्हटलंय, तिच्या प्रक्रियेचं विश्लेषण होत नाही.
पाणी इतकं बेहद्द उकळलं की एका क्षणी, अचानक त्याची वाफ झाली. ते निराकार झालं.
अध्यात्मिक जगात हे अपवादात्मक मानलं गेलंय.
स्वतःच्या निराकारत्वाचा बोध क्रमशः देखील होऊ शकतो. ते सर्वात निर्धोक आणि सुनिश्चित आहे.
आपल्या एकेक धारणा, आपल्यावरची मनाची पकड, प्रत्येक आकलनासरशी ढिली होत जाते. दोन विचारांच्यामधे समोरचं स्पष्ट दिसायला लागतं आणि आजूबाजूचं नीट ऐकू यायला लागतं.
एखाद्या अत्यंत निवांत क्षणी समोर कायम उभा असलेला निराकार दिसतो आणि अचानक उलगडा होतो: `तो आणि आपण वेगळे नाही! '
एकहार्टचं सर्व लेखन अशा क्रमशः सिद्धत्वाकडे नेण्याचा प्रयत्न आहे.
__________________________
आजमितीला त्याची फक्त चार पुस्तकं आहेत, पॉवर ऑफ नाऊ, प्रॅक्टीसिंग द पॉवर ऑफ नाऊ, स्टीलनेस स्पीक्स आणि अ न्यू अर्थ.
पॉवर ऑफ नाऊ अध्यात्मातला "निराकार" हा फंडा अफलातून मांडतं. एकहार्टनं त्याला "बिइंग" म्हटलय.
प्रॅक्टीसिंग द पॉवर ऑफ नाऊ रोजच्या जगण्यात निराकाराची उपयोगिता विशद करतं.
स्टीलनेस स्पीक्स तर त्यानं इतकं सूत्रबद्ध आणि बेहद्द लिहिलंय की उपनिषदांची आठवण होते.
आणि `अ न्यू अर्थ' लोक समजू शकले तर एकहार्टला जागतिक शांततेचं नोबेल मिळेल.
__________________________
पॉवर ऑफ नाऊ मधला मला आवडलेला क्लायमॅक्स, जो त्याच्या एनलायटन्मेंटची उकल करतो, तो असाय:
`एनलायटन्ड रिलेशनशिप्स' या प्रकरणात शेवटी त्यानं लिहिलंय:
`तुम्हाला स्वत:शी नातं कशाला हवंय? तुम्ही फक्त `असू' शकत नाही का? ज्या वेळी तुम्ही स्वत:शी नातं जोडता तेव्हा तुम्ही दोन होता, एक तुम्ही स्वत: आणि दोन, ज्याच्याशी नातं जोडलंय तो.
मनाचं हे विभाजन सर्व कलह आणि द्वंद्वाच कारण आहे.
साक्षात्कार म्हणजे स्वत:शी एकरूपता. तुम्ही स्वत:ला जोखत नाही, तुम्हाला स्वत:बद्दल करुणा, अभिमान, प्रेम, तिरस्कार काहीही वाटत नाही. जाणीवेतून होणारं हे स्वविभाजन संपतं.
जाणीव एकसंध होते, पूर्णत्वाला येते, शापातनं मुक्त होते.
ज्याला वाचवायचंय, सजवायचंय, आणि सतत काही तरी हवंय असा कुणी राहत नाही.
तुम्ही सिद्ध होता तेव्हा एकच नातं संपतं, ते म्हणजे तुमचं स्वत:शी असलेलं नातं. एकदा तुमचं ते नातं संपलं की तुमची इतर सर्व नाती प्रेमाची होतात. (पान १४५)
_______________________
स्टीलनेस स्पिक्समध्ये अहंकाराबद्दल (दि इगोइक सेल्फ) एकहार्टनं लिहिलंय:
जेव्हा विचार तुमचं सर्व लक्ष वेधून घेतात तेव्हा तुम्ही मनाच्या बोलण्याशी एकरूप होता, ते बोलणं मग तुम्हाला तुमचं बोलणं वाटायला लागतं.
या मनानं निर्माण केलेल्या `मी'ला सतत अपूर्णता आणि भय वाटत राहतं आणि त्या भयातून आणि अपूर्णतेतून तुम्ही कार्यरत होता.
असं जगणं मग इतरांसाठी आणि तुमच्यासाठी क्लेशदायी होतं. ( स्टीलनेस स्पिक्स, २००३, पान २९)
_____________________
`अ न्यू अर्थ' मध्ये शेवटच्या प्रकरणात एकहार्टनं अभिव्यक्तीबद्दल (अवेकन्ड डूइंग) अफलातून लिहिलंय. मनाच्या सृजनात्मक उपयोगाविषयी तो म्हणतो:
सत्य गवसल्यावर तुम्ही जे करता त्याची सुरुवात आणि शेवट, तुमच्या मानसिक आणि भावनिक स्तरावर आधीच झालेला असतो. त्यामुळे कृत्यातून तुम्हाला काही मिळवायचं नसतं.
तुमचं कृत्य तुम्ही जे आहात त्याची अभिव्यक्ती असते. असं कृत्य कोणतीही अपूर्णता पूर्ण करण्यासाठी नसल्यानं ते कृत्यच आनंद असतो.
प्रत्येक अभिव्यक्तीतून तुम्ही अव्यक्ताला व्यक्त होण्याचा अवसर देता आणि त्यामुळे ज्यांच्यापर्यंत ती अभिव्यक्ती पोहोचते त्यांना ती आनंदित करते.
प्रतिक्रिया
19 Aug 2012 - 12:45 am | मन१
सआधे सोप्या भाषेतील कथन आवडले.
19 Aug 2012 - 1:03 am | बॅटमॅन
+१. असेच म्हणतो. इतर लेखांपेक्षा असे कैतरी लिहिले तर वाचायला मजा येईल.
21 Aug 2012 - 2:11 pm | चैतन्य दीक्षित
सहमत आहे.
धन्यवाद.
22 Aug 2012 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतर लेखांपेक्षा असे कैतरी लिहिले तर वाचायला मजा येईल.
असेच म्हणतो. :)
-दिलीप बिरुटे
23 Aug 2012 - 12:28 am | संजय क्षीरसागर
प्रत्येक लेख वेगवेगळ्या धारणांचं निरसन करण्याचा प्रयत्न आहे.
पैसा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय वेगळ्या दृष्टीकोनातून मांडलाय.
शरीर `नैनं छिन्दन्ति शस्त्राणि' वेगळ्या स्वरुपात सांगितलय
मरुन रोब कथा असली तरी ती वैवाहिक नात्याकडे बघण्याचा एक वेगळा अँगल आहे.
गोल्डफिश मुक्तच्छंद व्यक्तीची अभिव्यक्ती आहे
एकहार्ट एका सामान्य व्यक्तीच्या सिद्धत्वावर आहे
गीतेच्या सगळ्या अध्यायांवर मी निरुपण लिहू शकेन पण ती फक्त चर्चा होईल. त्याचा रोजच्या जगण्याला उपयोग नाही.
जे लिहलय ते लिहितांना मजा आलीये. तुम्ही पुन्हा बघा, तुम्हाला मजा येईल.
23 Aug 2012 - 6:15 pm | प्यारे१
>>>गीतेच्या सगळ्या अध्यायांवर मी निरुपण लिहू शकेन पण ती फक्त चर्चा होईल. त्याचा रोजच्या जगण्याला उपयोग नाही.
भावना पोचल्या.
अभ्यास वाढवा एवढेच सांगू इच्छितो.
धन्यवाद....!
23 Aug 2012 - 6:33 pm | मदनबाण
गीतेच्या सगळ्या अध्यायांवर मी निरुपण लिहू शकेन पण ती फक्त चर्चा होईल. त्याचा रोजच्या जगण्याला उपयोग नाही.
चांगदेव महाराज आठवले ! ;)
23 Aug 2012 - 6:41 pm | नाना चेंगट
बाणा ! भिंत जरा हळू चालव बाबा !
23 Aug 2012 - 6:48 pm | मदनबाण
सध्या पहिलाच गेयर टाकला आहे... नंतर वाटल्यास टॉप गेयर टाकीन म्हणतो ! ;)
23 Aug 2012 - 7:05 pm | संजय क्षीरसागर
खरच लिहू शकतो त्यात काही विषेश नाही. अभ्यासाची तर अजिबात आवश्यकता नाही.
अर्थात तुम्हाला मुद्दा मिळायचा अवकाश, आता पिळायचा असेल तर चालू द्या.
23 Aug 2012 - 7:09 pm | नाना चेंगट
>>>>खरच लिहू शकतो त्यात काही विषेश नाही. अभ्यासाची तर अजिबात आवश्यकता नाही.
लिहा हो खरेच लिहा...
अनेक जण अभ्यास करुन लिहितात, तुम्ही अभ्यास न करता लिहा.
आम्हाला वाचायला आवडेल.
तसेही गीता हा आमचा आवडीचा विषय आहे. येऊ द्या निरुपण... धन्य होऊ आम्ही
24 Aug 2012 - 4:33 pm | मन१
तसेही गीता हा आमचा आवडीचा विषय आहे.
गीता मलाही आवडते. गीतेला मी आवडत नाही.
23 Aug 2012 - 7:09 pm | मदनबाण
खरच लिहू शकतो त्यात काही विषेश नाही.
वैचारिक जिलब्या टाकायला "विशेष" गुण लागत नाहीत !
अभ्यासाची तर अजिबात आवश्यकता नाही.
परत तेच, जिलब्या टाकण्यासाठी अभ्यास कशाला हवा ?
23 Aug 2012 - 10:56 pm | संजय क्षीरसागर
= 'आत्मा सदैव अनावृत्त आहे. तो वस्त्र परिधान करत नाही की त्यागत नाही.'
याला तुमच्याकडे उत्तर नाही.
= कशाची कशाही तुलना? आत्मा एक आहे!
यावर तुम्ही भाष्य करु शकत नाही
24 Aug 2012 - 6:22 am | अर्धवटराव
>>= 'आत्मा सदैव अनावृत्त आहे. तो वस्त्र परिधान करत नाही की त्यागत नाही.'
-- आमचे मिपाकर क्षीरसागर साहेब म्हणतात कि,
ओशोंचं एक अफलातुन वाक्य आहे... "निराकार बिना छुए आकार को संभाले हुए है"
त्याच धर्तीवर... आत्मा स्वतः अनावृत्त राहुन शरीराचे वस्त्र बदलत असतो...
अर्धवटराव
24 Aug 2012 - 11:23 am | संजय क्षीरसागर
यू आर राइट.
19 Aug 2012 - 1:06 am | रेवती
लेखन आवडले.
पॉवर ऑफ नाऊ या पुस्तकाबद्दल अगदी थोडेसेच ऐकण्यात आले होते.
तुम्ही करून दिलेली ओळख आवडली.
19 Aug 2012 - 2:50 am | चित्रगुप्त
......... जगात आज एकमेव व्यक्ती आहे, एकहार्ट....
असहमत.
जगात अश्या हजारो-लाखो व्यक्ती असतील, परंतु त्यांनी पुस्तके वगैरे लिहिली नसल्याने वा त्यांचा गवगवा नसल्याने त्यांचेविषयी इतरांना कळत नाही.
माझ्या आयुष्यात अश्या काही व्यक्ती आलेल्या आहेत, आणि मी स्वतःबद्दलही असे म्हणू शकतो.
मलापण अगदी साधं-सोपं असलेलं सत्य गवसलेलं आहे, परंतु त्याचा उल्लेखही मी करत नाही आणि कुणाला ते पटवून द्यायच्या भानगडीतही पडत नाही.
ज्याला ते गवसलंय, त्याला सांगायची गरज नाही, आणि जोवर ते उमगत नाही, तोवर कुणीही पटवून देऊ शकत नाही.
वेळ आली, की ज्याचे त्याला ते उमगते.
19 Aug 2012 - 5:15 am | अर्धवटराव
एकहार्ट वाचावं लागेल.
अर्धवटराव
19 Aug 2012 - 8:36 am | संजय क्षीरसागर
उत्तर द्यावं लागतय.
सर्वस्वी मान्य आहे. पण अशा व्यक्तींचा इतरांना मार्गदर्शक म्हणून उपयोग नाही.
सत्य गवसणं एक आहे आणि त्याची निर्विवाद अभिव्यक्ती अत्यंत वेगळं कौशल्य आहे.
संवाद हे मानवी आकलनाच एकमेव माध्यम असल्यानं अशा व्यक्तींचा इतरांना उपयोग नाही.
बुद्धानं धम्मपद लिहिलं नसतं तर तो सिद्ध होता याचा काहिहि पुरावा उरला नसता. त्याच्या आकलनाचा कुणाला काही उपयोग झाला नसता.
संपूर्ण सहमत. `आपण सत्य आहोत' हेच तर मी सांगतोय
सत्य स्वयं- उदघोषी आहे. सत्य गवसलेल्या प्रत्येकानं त्याची अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न केलाय म्हणून तर उपनिषदं लिहिली गेलीयेत. अष्टावक्राची संहिता आहे. निसर्गदत्त महाराजांचं सुखसंवाद आहे....
अशी मजाये!
वेळ कुठून येणार? केव्हा येणार? सत्याचा आणि वेळेचा संबंध काय?
आता या क्षणी आपण सत्य आहोत.
तुम्ही अभिव्यक्ती कशी देणार? साध्या आठ-नऊ ओळींच्या एका प्रतिसादात तुम्ही हुकलात.
खरं तर सुरुवातीलाच हुकलात.
निराकार एक आहे. ज्याला तो गवसला तो इतकंच म्हणेल : तुम्ही सत्य आहात. भले तुम्हाला ते माहिती नसेल, तुम्ही ते अभिव्यक्त करु शकत नसाल, त्यानं काही फरक पडत नाही.
एकहार्ट सारख्या दिग्गजाच्या विधानांशी, त्याच्या अभिव्यक्तीशी तो कधीही असहमती दर्शवणार नाही.
एकहार्ट अद्वितीय आहे याचा अर्थ बुद्ध अद्वितीय नव्हता, अष्टावक्र अद्वितीय नव्हता असा तो कधीही घेणार नाही.
ज्याला सत्य गवसलंय तो म्हणेल : येस! त्या एकाचीच तो अभिव्यक्ती देतोय. आगदी मला गवसलेलंच तो शब्दात मांडतोय. ती अभिव्यक्ती अद्वितीय आहे. तेच सत्य निर्विवादपणे तो स्वतःच्या आकलनातनं मांडतोय.
त्याला स्वतःला अभिव्यक्ती देता येत नसली तरी दुसर्याच्या गौरवात त्याला इन्फिरिऑरिटी वाटणार नाही.
कारण ज्याचा गौरव होतोय ते सत्य दोघांनाही गवसलय आणि ते एक आहे. असहमतीचा प्रश्नच नाही.
19 Aug 2012 - 11:17 am | मूकवाचक
स्वतः एकहार्ट भगवान रमण महर्षी आणि जे. कृष्णमूर्ति यांचा आपल्यावर खोलवर प्रभाव आहे हे उघडपणे मान्य करतो. श्री. रमणाश्रमाला आणि रमण महर्षी यांचे वास्तव्य असलेल्या अरूणाचल पर्वताला भेट देणे हा त्याच्या भारतभेटीमागचा मुख्य हेतू होता.
या भेटीविषयी "The first pull to visit India was inspired by beloved Sri Ramana Maharshi, divine Indian sage. At his ashram, in the absence of his physical form, Essence spoke clearly, without words, pointing to the Love I had searched for in others most of my life." असे तो म्हणतो.
मराठीतः "भारताला भेट द्यावी अशी आंतरिक ओढ पहिल्यांदा मत्प्रिय श्री. रमण महर्षी या देवतुल्य भारतीय सत्पुरूषाच्याच प्रेरणेने मला लागली. त्यांच्या आश्रमात, त्यांच्या भौतिक देहस्वरूपाच्या अनुपस्थितीतही, नि:शब्दपणे (मौनस्वरूपात) (त्यांच्या शिकवणीचा) गाभा सुस्पष्टपणे बोलत होता. जवळजवळ आयुष्यभर मी इतरेजनांमधे ज्या प्रेमाचा शोध घेत होतो त्या प्रेमाकडेच तो इशारा करत होता".
(संदर्भः http://www.lyndacole.org/RamanaEckhart.html).
'भारतातली अध्यात्मिक बजबजपुरी' पाहून एकहार्टने अवाक्षरही उच्चारले नाही या दुर्दैवी निष्कर्षाला आधार काय?
बाकी मराठी वाचकांना एकहार्टचा परिचय व्हावा या दृष्टीने लेख उपयुक्त आहे.
19 Aug 2012 - 11:35 am | संजय क्षीरसागर
म्हटलय, एकहार्टनं नाही.
कारण पुढे तिनं म्हटलय :
एकहार्टच्या लेखनात रमणांचा आणि जे कृष्णमूर्तींचा उल्लेख येतो पण तो कृतज्ञेनं.
एकहार्ट स्वतः कोणतीही काँट्रावर्सी होऊ देत नाही म्हणून त्यानं कोणतंही मतप्रदर्शन केलं नाही. पण त्याचा हा स्टँड सर्व काही सांगून जातो. इथली आध्यात्मिक बजबजपुरी त्यानं पाहिली, त्याबद्दल अवाक्षर काढलं नाही, हे माझं निरिक्षण आहे.
आभार.
मराठी लोकांनाही ओरिजिनल पुस्तकच वाचावं लागेल.
19 Aug 2012 - 12:26 pm | मूकवाचक
लिंडा कोलनं स्वतःविषयी म्हणलंय - सहमत. तिची निरीक्षणे एकहार्टच्या नावावर खपवणे योग्य नाही. त्याबद्दल क्षमस्व.
इथली आध्यात्मिक बजबजपुरी त्यानं पाहिली, त्याबद्दल अवाक्षर काढलं नाही, हे माझं निरिक्षण आहे. - स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
19 Aug 2012 - 11:12 am | रणजित चितळे
मस्त मी पॉवर ऑफ नाऊ वाचलेले आहे, पण ते जेवढे वाचून समजले नव्हते ते आपला लेख वाचून जास्ती समजले.
छान लेख. मजा आली वाचून.
19 Aug 2012 - 12:33 pm | सस्नेह
'पॉवर ऑफ नाऊ' वाचायला आवडेल.
भारतीय तत्वज्ञानाचा प्रामाणिक पाठपुरावा कुणी केला असेल तर तो एकहार्ट सारख्या परदेशियांनीच.
पॉल ब्रंटन हे यासारखेच आणखी एक व्यक्तिमत्व. त्यांचे 'हिमालय अन एक योगी' हेही पुस्तक असेच स्वनुभवावर आधरित कथन/संकलन आहे. सर्वस्वी वाचनीय.
19 Aug 2012 - 1:49 pm | नाना चेंगट
>>>भारतीय तत्वज्ञानाचा प्रामाणिक पाठपुरावा कुणी केला असेल तर तो एकहार्ट सारख्या परदेशियांनीच.
असहमत.
बाकी चालू द्या
20 Aug 2012 - 2:14 pm | सस्नेह
अर्रर्रर्र.. शब्दरचनेत थोडा घोटाळा झाला.
'भारतीय तत्वज्ञानाचा प्रामाणिक पाठपुरावा केला आहे एकहार्ट सारख्या काही परदेशियांनी ...'
असे हवे
चू. भू. दे. घे.
20 Aug 2012 - 6:22 pm | संजय क्षीरसागर
कुणी का केला असेना, काय फरक पडतो?
तो काय सांगतोय ते पाहा. त्याहुनही पुढे आपल्याला ते शांत व्हायला उपयोगी होतय का पाहा.
तत्व एकच आहे.
तुमच्या अँगलवर सर्व काही आहे. तो व्यक्तीकडे आहे की त्याच्या लेखनाकडे यावर सर्व अवलंबून आहे.
20 Aug 2012 - 6:42 pm | ५० फक्त
मी तर म्हणेन,
भारतीय तत्वज्ञानाचा प्रामाणिक पाठपुरावा कुणी केला असेल तर तो एकहार्ट सारख्या परदेशियांनीच.
या वाक्यातला प्रामाणिक ह्या शब्दाची जागा जरा बदलली तरी चालेल ना ?
१. प्रामाणिक भारतीय तत्वज्ञानाचा प्रामाणिक पाठपुरावा कुणी केला असेल तर तो एकहार्ट सारख्या परदेशियांनीच.
२. भारतीय प्रामाणिक तत्वज्ञानाचा प्रामाणिक पाठपुरावा कुणी केला असेल तर तो एकहार्ट सारख्या परदेशियांनीच.
३. भारतीय तत्वज्ञानाचा प्रामाणिक पाठपुरावा कुणी केला असेल तर तो एकहार्ट सारख्या प्रामाणिक परदेशियांनीच.
20 Aug 2012 - 11:44 pm | संजय क्षीरसागर
झालं!
ते तर आता, इथे ,समोर आहे.
19 Aug 2012 - 2:45 pm | मूकवाचक
अद्वैत, सांख्य, ज्ञानमार्ग याविषयी कधी विपर्यस्त स्वरूपात तर कधी अत्यंत एकांगी स्वरूपात काहीबाही वाचायला मिळते. या गोष्टी मनाला खटकतात. त्यांचा प्रतिवाद करणेही अवघड वाटते/ नकोसे होते. असा अनुभव कित्येकांना येतो.
अध्यात्मविषयक इंग्रजी वाचन करणार्यांसाठी 'बी अॅज यू आर - द टिचींग्स ऑफ श्री. रमण महर्षी' हे डेव्हिड गॉडमन यांनी संकलित केलेले पुस्तक या संदर्भात अत्यंत उपयुक्त ठरेल. या पुस्तकाचे मूल्य रू. २०० असून ते आंजावरून विकत घेता येते.
मराठीत - 'रमण महर्षी अँड द पाथ ऑफ सेल्फ नॉलेज' या आर्थर ऑस्बोर्न यांनी लिहीलेल्या पुस्तकाचा कै. डॉ. हरिहर गंगाधर मोघे यांनी 'श्री. रमण महर्षी - चरित्र आणि तत्वज्ञान' नावाने अप्रतिम अनुवाद केलेला आहे. (प्रकाशकः यशवंत प्रकाशन, ७५३, सदाशिव पेठ हौदाजवळ, पुणे ४११०३०). हे पुस्तकही उपयुक्त ठरेल.
(स्वानुभवावरून झालेले व्यक्तिगत मत. आग्रह नाही).
19 Aug 2012 - 2:58 pm | मन१
अरबिंदो वाचलेत का कुणी?
20 Aug 2012 - 7:11 pm | नाना चेंगट
अद्वैत, सांख्य, ज्ञानमार्ग याविषयी कधी विपर्यस्त स्वरूपात तर कधी अत्यंत एकांगी स्वरूपात काहीबाही वाचायला मिळते. या गोष्टी मनाला खटकतात. त्यांचा प्रतिवाद करणेही अवघड वाटते/ नकोसे होते. असा अनुभव कित्येकांना येतो.
मुळ संस्कृतातील ग्रंथ उपलब्ध असतांना इतरांनी लिहिलेले कशाला वाचायचे?
यावर आक्षेप येऊ शकतो की संस्कृत येत नाही त्यांनी काय करावे? माझे स्पष्ट उत्तर आहे शिकावे, झालाच तर फायदाच होईल.
असो.
20 Aug 2012 - 11:39 pm | संजय क्षीरसागर
ती भाषा म्हणून शिकणं वेगळं आणि सत्य जाणण्यासाठी शिकणं वेगळं.
सत्य म्हणजे स्वतःला जाणणं आणि त्यात एकमेव अडथळा मन आणि धारणा आहेत.
मुळात मन तुमच्या मातृभाषेत तयार झालय तस्मात त्यातनं सुटण्याचा मार्ग मातृभाषेतून सर्वात सुकर आहे.
प्रश्न भाषेचा नाही. वाचकाचा आहे.
आपल्याला कुठे बनारसला जाऊन कुणा संस्कृत पंडीताशी प्रतिवाद करायचाय?
त्यातून इथला कुणी सदस्य बनारसच्या पीठावर संस्कृतमधे प्रतिवाद करण्याचं आव्हान पेलू शकत असेल तर आनंद आहे. पण मग त्याला या संकेतस्थळावर मराठीतून प्रतिवाद करणं काय अवघड आहे?
समजलं ठीक . नाही समजलं तर चर्चा होईल.
21 Aug 2012 - 12:02 am | बॅटमॅन
प्रचंड सहमत! फक्त इतकेच आहे की वरिजिनल, पहिल्या धारेचा माल हा संस्कृतमध्ये जास्त आहे . आणि त्याची गोडी वरिजिनल प्रकारे जास्त खंग्री जाणवते . पण हेही बरोबरच आहे की कुणाला संस्कृत येत नसेल आणि निव्वल कन्सेप्ट शिकायची असेल तर भाषा शिकण्यात फुका वेळ का घालवा.
21 Aug 2012 - 12:23 am | संजय क्षीरसागर
गीतेच्या दुसर्या अध्यायातल्या (सांख्ययोग) "नैनं च्छिंदती शस्राणी" या प्रसिद्ध श्लोकाचं, ओशोंच हिंदी रुपांतरण पाहा
जहां घट रहा है वहां समझनेकी कोई संभावना नही है
और जहां समझ रहा है वहां कुछ होने की संभावना नही है
आणि आता हे मराठी बघा :
शरीराला काही कळण्याची शक्यता नाही
आणि जाणीवेला काही होत नाही
21 Aug 2012 - 2:43 pm | नाना चेंगट
गीतेच्या त्या श्लोकाचं हिंदी आणि मराठी रुपांतर पाहून धन्य झालो.
असो.
21 Aug 2012 - 3:47 pm | संजय क्षीरसागर
भाषांतर काय कुणीही भाषातज्ञ करु शकतो.
तो अर्थ आहे आणि शब्दापेक्षा अर्थ महत्त्वाचाय
ज्याला सत्य शोधायचय तो अर्थाकडे लक्ष देतो आणि ज्याला भाषा शिकायचीये तो शब्दाला धरुन बसतो.
21 Aug 2012 - 3:56 pm | नाना चेंगट
तो अर्थ आहे? वा !! पुन्हा एकदा धन्य झालो.
असो.
चालू द्या
21 Aug 2012 - 5:54 pm | मूकवाचक
'stillness speaks' चे भाषांतर 'थिजलेपणा बरळतो' असे होते.
21 Aug 2012 - 6:49 pm | संजय क्षीरसागर
एकतर सत्याचा आणि भाषेचा काहीएक संबंध नाही याची कल्पना नाही
मग उगीच भलतेसलते रेफरन्स देऊन धागा भरकटवण्याचा प्रयत्न
तिथे उघडं पडलं की माफी
मग पुन्हा संस्कृतचे दाखले. तिथे पुन्हा अर्थाची बोंब.
आणि इंग्रजी तर इतकं दिव्य की क्या बात है!
हे वाक्य पुन्हा उधृत करावं लागतय
21 Aug 2012 - 6:55 pm | नाना चेंगट
>>मग पुन्हा संस्कृतचे दाखले. तिथे पुन्हा अर्थाची बोंब.
सांगा मग नैनं छिन्दन्ति शस्त्राणी या श्लोकाचा सरळ अर्थ.
सत्य वगैरे राहु द्याबाजुला....
21 Aug 2012 - 6:57 pm | मदनबाण
नानुडीशी सहमत !
21 Aug 2012 - 7:43 pm | संजय क्षीरसागर
पहावा
20 Aug 2012 - 2:24 pm | अमोल केळकर
छान माहिती. धन्यवाद :)
अमोल केळकर
21 Aug 2012 - 3:35 am | Dhananjay Borgaonkar
सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय ॥
त्यातच देहाला दुखणे । म्हणजे दुःखाचा कळस होय ॥
मिठाचे खारटपण । साखरेचे पांढरेपण ।
यांस नसे वेगळेपण । तैंसे देह आणि दुःख जाण ॥
देहाने जरी सुदृढ् झाला । तेथेही दुःखाचा विसर नाही पडला ॥
सांवली जशी शरीराला । तैसा रोग आहे शरीराला ॥
रामकृष्णादिक अवतार झाले । परी देहाने नाही उरले ॥
स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई । परि वियोगाचे दुःख अनिवार होई ॥
देहदुःख फार अनिवार । चित्त होई अस्थिर ॥
देहाचे भोग देहाचेच माथी । ते कोणास देता येत नाहीत । कोणाकडून घेता येत नाहीत ॥
आजवर जे जे काही आपण केले । ते ते प्रपंचाला अर्पण केले । स्वार्थाला सोडून नाही राहिले ॥
अधिकार, संतति, संपत्ति । लौकिकव्यवहार, जनप्रीति, ।
या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते । अखेर दुःखालाच कारण होते ॥
जो जो प्रयत्न केला आपण । तेच सुखाचे निधान समजून ।
कल्पनेने सुख मानले । हाती आले असे नाही झाले ॥
ज्याचे करावे बहुत भारी । थोडे चुकता उलट गुरगुरी ।
ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन । हे ओळखून वागावे आपण ॥
प्रपंचात आसक्ती ठेवणे । म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे ।
म्हणून आजवर खटाटोप खूप केला । परि कामाला नाही आला ॥
विषयातून शोधून काढले काही । दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही ॥
म्हणून प्रपंचाने सुखी झाला । ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ॥
ज्याची धरावी आस । त्याचे बनावे लागे दास ॥
दास विषयाचा झाला । तो सुखसमाधानाला आचवला ॥
ज्या रोपट्यास घालावे खतपाणी । त्याचेच फळ आपण घेई ॥
विषयास घातले खत जाण । तरी कैसे पावावे समाधान ? ॥
प्रपंचातील संकटे अनिवार । कारण प्रपंच दुःखरूप जाण ॥
आजवर नाही सुखी कोणी झाला । ज्यानी विषयी चित्त गुंतविले ॥
कडू कारले किती साखरेत घोळले । तरी नाही गोड झाले ।
तैसे विषयात सुख मानले । दुःख मात्र अनुभवास आले ॥
प्रपंचातील उपाधि । देत असे सुखदुःखाची प्राप्ति ॥
संतति, संपत्ति, वैभवाची प्राप्ती, । जगांतील मानसन्मानाची गति, ।
आधुनिक विद्येची संगति, । न येईल समाधानाप्रति ॥
प्रपंचातील सुखदुःखाची जोडी । आपणाला कधी न सोडी ॥
नामातच जो राहिला । नामापरता आठव नाही ज्याला ।
परमात्मा तारतो त्याला । हाच पुराणीचा दाखला ॥
21 Aug 2012 - 8:04 am | संजय क्षीरसागर
देह निर्दोष आहे.
इथे प्रतिसाद दिला होता, पुनरावृत्ती नको म्हणून दुवा देतोय
21 Aug 2012 - 7:42 pm | संजय क्षीरसागर
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२३।।
(आत्म्याला) शस्त्र छेदू शकत नाही, अग्नी दग्ध करु शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा शुष्क करु शकत नाही.
आता तुम्ही आत्मा म्हणजे काय ते सांगा
21 Aug 2012 - 8:12 pm | मदनबाण
आता तुम्ही आत्मा म्हणजे काय ते सांगा
ज्या प्रकारे आपण कपडे बदलतो त्याच प्रमाणे जो देह बदलतो तो आत्मा !
21 Aug 2012 - 10:50 pm | संजय क्षीरसागर
तरीही ...
आत्मा सदैव अनावृत्त आहे. तो वस्त्र परिधान करत नाही की त्यागत नाही.
21 Aug 2012 - 11:01 pm | संजय क्षीरसागर
पण त्यांचे मृत्यूबद्दलचे विचार वाचण्यासारखे आहेत:
21 Aug 2012 - 11:01 pm | मदनबाण
आत्मा सदैव अनावृत्त आहे. तो वस्त्र परिधान करत नाही की त्यागत नाही.
आपणस तुलना केल्याचे कळले नसावे बहुधा...
असो... हा शेवटचा प्रतिसाद !
21 Aug 2012 - 11:05 pm | संजय क्षीरसागर
आहो, आत्मा एक आहे!
तुमची मर्जी.
22 Aug 2012 - 5:46 pm | नाना चेंगट
हम्म. सरळ अनुवाद योग्य आहे.
सरळ अनुवाद काय आहे हेच आमच्यासारख्या काही जणांना महत्वाचे असते, त्यावर अमुक तमुक यांचे काय म्हणणे आहे हे पहाणे आवश्यक वाटत नाही. त्यामुळे सरळ अनुवादाला तुमच्यासाठी अर्थ नसला तरी आम्हास तो गरजेच वाटतो.
>>>>आता तुम्ही आत्मा म्हणजे काय ते सांगा
आत्मा ह्या शब्दाची वेगवेगळ्या तत्वज्ञांनी केलेली व्याख्या तुम्हाला त्यांच्या साहित्यातुन मिळेल.
असो.
22 Aug 2012 - 6:57 pm | संजय क्षीरसागर
प्रत्येक शब्द फक्त निर्देश करतो. ज्याच्याकडे निर्देश आहे ते समजलं की झालं .
ज्याला सांगितल जातय त्याला कळणं महत्त्वाचय. भाषा संस्कृत आहे की इतर हा मुद्दा व्यर्थ आहे.
आपण दोन वेळा `धन्य झालो' वगैरे प्रतिसाद दिल्यामुळे विषय वाढला.
ते तुम्ही सांगू शकत नाही हे सूचित केल्याबद्दल आभार.
22 Aug 2012 - 7:13 pm | नाना चेंगट
>>>आपण दोन वेळा `धन्य झालो' वगैरे प्रतिसाद दिल्यामुळे विषय वाढला.
शक्य आहे
>>>ते तुम्ही सांगू शकत नाही हे सूचित केल्याबद्दल आभार.
सहमत आहे.
22 Aug 2012 - 10:26 pm | संजय क्षीरसागर
धन्यवाद!
23 Aug 2012 - 6:40 pm | नाना चेंगट
तुम्ही आमच्या प्रामाणिकपणाला दाद दिल्यामुळे धन्य झालो.
24 Aug 2012 - 12:03 pm | गोंधळी
माननिय संजय सांगतायत ते बरोबर कि माननिय एक्कु जी सांगतायत ते बरोबर?
कि दोघेही बरोबर?
कि दोघेही चुक?
???????????????
कानांनी जे ऐकतो तेच खर मानायच ?
कि डोळ्यांनी जे पहतो तेच खर मानायच ?
कि स्पर्शा ने होनाय्रा जाणिवेला खर मानायच?
कि आपल(स्वतःचे) मन जे सांगत तेच खर मानायच?
कि जे आपल्या अल्प बुद्धिला जे पटत ते खर मानायच?
24 Aug 2012 - 12:17 pm | सहज
सध्या जाउ दे हो! माननीय एकहार्ट, सन्माननीय क्षीरसागरसाहेब व आदरणीय यक्कु तिघांच्या आत्म्याचा एखादा मिपाकट्टा होईल त्याचा कोणतरी सचित्र वृत्तांत टाकेल तेव्हा आपण काय ते बघू , कसे?
24 Aug 2012 - 12:20 pm | कुंदन
सहज रावही येणार असतील तर आम्ही प्रायोजित करु हा कट्टा.
24 Aug 2012 - 12:24 pm | सहज
खर सांगा आत्मा काही खात पीत नाही व कसली सुविधा पुरवावी लागत नाही अश्या समजुतीपायी प्रायोजीत करायला तयार झालास ना?
24 Aug 2012 - 12:36 pm | मूकवाचक
ते ठीक आहे, पण आत्मा सदैव अनावृत्त असल्याने आपल्या प्रतिगामी, दांभिक वगैरे वगैरे असलेल्या देशात वेगळाच पेचप्रसंग निर्माण व्हायचा! (कृ. ह. घ्या...)
24 Aug 2012 - 12:40 pm | नाना चेंगट
पण सगळ्यांचे आत्मे एक असतात की अनेक?
एक असल्यास कोण कुणाला प्यार्टी देणार? कोण प्रायोजित करणार?
अनेक असल्यास कोणत्या पद्धतीनुसार सांख्य की जैन की अजुन कोणी?
मग माझे काय होणार मी तर अनात्मिक बौद्ध !
एकंदर सगळाच गोंधळ ;)
24 Aug 2012 - 4:44 pm | मन१
तुमच्या भावना संतांच्या शब्दांतः-
आता शरण कोणा जावे। सत्य कोणते मानावे।।
नाना पंथ नाना मते। भू-मंडळी असंख्याते।।
एक मानिती स-गुण। एक म्हणती निर्गुण।।
एकी केला सर्व-त्याग। एक म्हणती राजयोग।।
रामदास सांगे खूण। भक्तिवीण सर्व शीण।।
.
25 Aug 2012 - 11:26 am | राघव
मनराव,
अतिशय योग्य अन् समर्पक.
संजयशेठ,
एकहार्टची ओळख आवडली. लेख वाचून त्याच्याबद्दल वाचायची ईच्छा झाली यातच सारे आले.
बाकी आपली अध्यात्मिक मते पटत नाहीत त्यामुळे त्यावर इथे काही लिहिण्यात अर्थ नाही.
राघव
24 Aug 2012 - 12:57 pm | संजय क्षीरसागर
येस, देअर यू आर!
स्वतःच्या निर्णयाची जवाबदारी सर्वस्वी स्वतःवर ठेवा.
मग चुकलात तर तुम्ही दुसर्याला दोषी धरणार नाही.
सत्य गवसलं तर जो उपयोगी पडला त्याला धन्यवाद द्याल.
सत्य एकच आहे.
ते गवसता क्षणी तुम्हाला कळेल कारण सत्य आणि आपण दोन नाही.
जर हुकलात तर अस्वास्थ्य कायम राहिल आणि तुम्हाला सत्याची ओढ लावत राहिल.
24 Aug 2012 - 1:32 pm | गोंधळी
संजयजी यावर आपण टप्या टप्याने बोलु
सत्य गवसण्यासाठि पाप आणि पुण्य याचा कहि संबंध असतो का?
तुम्हाला ते गवसल कारण तुम्हि पुण्यवान
व मला ते जाणवत नाही म्हणजे मी पापी अस मानायच का?
24 Aug 2012 - 1:54 pm | संजय क्षीरसागर
त्याचा सत्य गवसण्याशी सरळ संबंध नाही.
पाप-पुण्या ऐवजी प्रामाणिक आणि अप्रामाणिक ही शब्दयोजना योग्य होईल.
पाप-पुण्याला बाह्य कसोटी आहे पण प्रामाणिक (किंवा अप्रामाणिकपणा) तुम्हाला कृत्य करतानाच कळतो.
एकहार्टची बुद्धिमत्ता पाहा
जे तुम्हाला स्वतःपासनं दूर नेतं ते पाप आणि जे स्वतःप्रत आणतं ते पुण्य किंवा
प्रामाणिकपणा तुम्हाला एकसंध करतो आणि अप्रामाणिकता दुभंगवते.
या अँगलनं पाहा म्हणजे रोजच्या जगण्यात नक्की कसं वागावं हे तुम्हाला कळेल आणि अशा स्वास्थ्यपूर्ण जगण्यात तुम्हाला सत्य गवसेल.
24 Aug 2012 - 2:17 pm | गोंधळी
पाप-पुण्या ऐवजी प्रामाणिक आणि अप्रामाणिक ही शब्दयोजना योग्य होईल.
पाप-पुण्याला बाह्य कसोटी आहे पण प्रामाणिक (किंवा अप्रामाणिकपणा) तुम्हाला कृत्य करतानाच कळतो.
संजयजी प्रामाणिक व अप्रामाणिक हे कशाच्या आधारावर ठरवायचे?
प्रामाणिक (किंवा अप्रामाणिकपणा) तुम्हाला कृत्य करतानाच कळत नसेल तर? आणि अस का होते?
24 Aug 2012 - 4:27 pm | संजय क्षीरसागर
ते प्रामाणिक कृत्य
अंतिम विश्लेषणात सत्य म्हणजे परमस्वास्थ्य आहे.
त्यामुळे तुम्ही जितके अस्वस्थ तितके सत्यापासनं (किंवा स्वतःपासनं ) दूर.
हे असंभव आहे.
ओशो म्हणतात " जिंदगी नगदका व्यवहार है, यहां उधारी नही चलती. जैसे अभी आगमे हाथ डालो, अभी जल जायेगा "
इथे हिशेब ठेवणारा कुणी नाही. त्या भंपक कल्पना आहेत
अप्रामाणिकपणा करणारा करतांनाच मनातून दुभंगतो. वरुन तो काहीही दाखवू दे.
24 Aug 2012 - 5:28 pm | गोंधळी
तुमच्या मुद्द्यांना प्रतिसाद देणे म्हणजे अस्वलाच्या अंगावरिल केस काढण्यासारखे आहे.जे कधी संपणार नाहित.
त्यावरुन अजुन नविन प्रश्न निर्माण होतात.
त्यामुळे अस काहितरी सांगा,अगदी सोप्या भाषेत जे सर्वांना सम्जेल.
जसे पुर्वी प्रुथ्वी सपाट(flat) आहे असा समज होता.पण आंतरिक्षातुन जेव्हा त्याचे फोटो काढुन दाखवन्यात आले.
तेव्हा सगळ्यांना समजले कि प्रुथ्वी गोल आहे.
24 Aug 2012 - 7:22 pm | संजय क्षीरसागर
तुमचा पहिला प्रश्न पाहा:
मग पुढे तुम्ही काय विचारताय ते पाहा:
आणि शेवटी
तुम्हाला थोडक्यात उत्तर हवं असेल तर इथे दिलय
24 Aug 2012 - 9:14 pm | गोंधळी
काय करु तुमचे मुद्दे नाहि पटत आहेत.
24 Aug 2012 - 5:41 pm | सहज
जे करताना तुम्ही स्वस्थ असता, मनाची चलबिचल होत नाही
ते प्रामाणिक कृत्य
अंतिम विश्लेषणात सत्य म्हणजे परमस्वास्थ्य आहे.
त्यामुळे तुम्ही जितके अस्वस्थ तितके सत्यापासनं (किंवा स्वतःपासनं ) दूर
इथे हिशेब ठेवणारा कुणी नाही. त्या भंपक कल्पना आहेत
------
हे असेच वाय झेड पाठ पठवून कसाबला पाठवला. कचाकचा गोळ्या घालून लोकांना मारताना त्या "सत्य गवसलेल्या" इसमाच्या मनाची चलबिचल झाली नाही.
हे असे कसाब व त्यांचे वायझेड तत्वज्ञान शिकवणारे गुरु आहेत म्हणून लोकांचे आयुष्य धोक्यात आहे. म्हणून बाकी लोकांना यांचा हिशोब ठेवावा लागतो. लोकहो तुम्ही यांना म्हणा नो एन्ट्री, पुढे धोका आहे..
----------------------------------------
The problem with the world is that the intelligent people are full of doubts and the stupid people are full of confidence.
24 Aug 2012 - 7:19 pm | संजय क्षीरसागर
ज्यांना समज आहे आणि संवेदनाशिलता आहे अशांशी मी सत्याची चर्चा करतोय.
कुठलाही मुद्दा कशाशीही जोडणं व्यर्थ आहे
25 Aug 2012 - 9:12 am | llपुण्याचे पेशवेll
मग त्याला जाणवलं की ती सर्वव्यापी वैश्विक शांतता बाहेर नाही, त्याच्या आत आहे. बाहेरची आणि आतली शांतता अचानक एक झाली, त्याचं सारं भय संपलं, तो सिद्ध झाला!
अगदी खरं आहे बघा. उगाच लोक वैश्विक शांततेच्या पोकळ पुंग्या वाजवित असतात.
आमची तर इच्छा आहे माणसाने आतून शांत रहावे. बाहेर मग किती का युद्ध होईनात किती का रक्ताचे पाट, मांसाचा चिखल होईना.
वरील वाक्यंच फक्त पटली .
27 Aug 2012 - 1:00 am | संजय क्षीरसागर
सध्या व्यावसायिक कामात व्यस्त असल्यानं उत्तराला उशीर होतोय.
बिफोर आय रिप्लाय :
माझ्या विरोधात इथे बरच काही लिहिलं गेलंय आणि त्याचा सर्वसाधारण सूर `लेखन अनाकलनीय आहे' असाये.
ईशावास्य उपनिषादात एक अत्युच्च श्लोक आहे:
पूर्णं अदः पूर्णं इदं पूर्णात पूर्णं उदच्यते,
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णं इव अवशिष्यते
श्लोकाचा मथितार्थ असाय की अस्तित्व पूर्ण असल्यानं त्यातलं प्रत्येक प्रकटीकरण पूर्ण आहे आणि ते उत्पत्ती किंवा लयीनं अनाबाधित आहे.
थोडक्यात, आपण सत्य आहोत.
तुम्ही गीता घ्या की उपनिषादं की अष्टावक्र संहिता सर्व अध्यात्मिक ग्रंथ केवळ हीच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे मांडतात.
एकहार्ट त्या पूर्णतेला बीइंग म्हणत असेल, बुद्ध शून्य म्हणत असेल, मी निराकार म्हणत असेन, उपनिषदं पूर्ण म्हणत असतील किंवा ब्रह्म म्हणत असतील. निर्देश एकाच वस्तुस्थितीकडे आहे.
ओशो तीच वस्तुस्थिती ' एन्लायटन्मेंट इज द स्टफ वीथ वीच द एक्झिसटन्स इज मेड' अशी मांडतात ( तंत्रा द सुप्रीम अंडरस्टँडिंग)
इतक्या थोर लोकांनी इतक्या निर्विवादपणे `तुम्ही सत्य आहात' सांगितलय त्यामुळे मी स्वतःला सत्य समजतो. ती वस्तुस्थिती मला मान्य आहे. या उप्पर स्वतःला सत्य मानणं किंवा न मानणं तुमच्या हातात आहे.
याचे दोन अर्थ निघू शकतात : मी अहंकारी आहे. किंवा मी एकच गोष्ट सांगतोय पण तुम्हाला समजत नाहीये. आणि त्याचं कारण तुम्ही स्वतःला सत्य मानायला तयार नाही.
तुमचा अर्थ तुमच्या आकलनाची दिशा ठरवेल.
हा विरोधी सूर म्हणून प्रातिनिधिक प्रतिसाद आहे.
आपण बुद्धाची शांतता बघणार की बाहेर चाललेली युद्ध हा तुमचा निर्णय आहे.
मी तर कैक वेळा `युद्ध कोणत्याही मानवी प्रश्नाचं उत्तर नाही' हे लिहिलय.
कुणी कितीही निरर्थक आणि विरोधी लेखन केलं तर त्यानं मला काहीएक फरक पडत नाही. ती त्यांची समज आहे. पण प्रत्येकाला उत्तर देण्यात मला स्वारस्य नाही.
ज्यांनी विधायक प्रतिसाद दिलेत आणि ज्यांना समजू शकत होतं त्यांच्या बाबतीत मात्र माझा नाईलाज आहे.
27 Aug 2012 - 1:14 am | शिल्पा ब
<<कुणी कितीही निरर्थक आणि विरोधी लेखन केलं तर त्यानं मला काहीएक फरक पडत नाही. ती त्यांची समज आहे.
अगदी सहमत आहे. असे बरेच लेखकु मिपा इ. संस्थळांवर आहेत जे निरर्थक अन विरोधी प्रतिक्रियांना न जुमानता कायम पुरुषमुक्तीच्या भविष्याची नाडी धरुन पुनर्जन्माच्या अन स्वत:लाही न. सम, जलेल्या ! गोष्टी कायम लिहित असतात.
बाकी आपण स्वत:ला अन एकहार्ट नामिक माणसाला बुद्ध अन उपनिषदांच्या रांगेत बसविलेले पाहुन मनात अतीव आदर दाटला.
असेच लिहित चला.
27 Aug 2012 - 11:39 am | संपत
माझा पुढील प्रतिसाद हा प्रामाणिक असून क्रुपया त्यात उपहास शोधण्याचा प्रयत्न करू नये.
मला अध्यात्माबद्दल थोडेबहुत कुतूहल नेहमीच होते. मी एकाहार्ताचे 'पावर ऑफ नाऊ' तसेच ओशोंची काही
भाषणे ऐकली. दोन्ही मला रटाळ आणि कंटाळवाणी वाटली. काय बोलताहेत तेच कळत नवते. क्षीरसागर
साहेबांचे लेखांबद्दल देखील तेच, पण त्यांच्या लेखान्वरची साद प्रतिसादाची जुगलबंदी वाचायला मात्र मजा येते.
पण त्यांच्या लेखनामधून एक मुद्दा वारंवार येतो तो म्हणजे अध्यात्म कशासाठी? शांत, आनंदी मनाने
जगण्यासाठी.. मला वाटते कि म्हणूनच कदाचित जे लोक आधीच शांत, आनंदी आयुष्य जगात आहेत त्यांना
ह्याच्याशी रिलेट करता येत नाही.
म्हणजे असे बघा कि प्रेमात पडण्याआधी सर्व प्रेमगीते, विरहगीते काय मेलोड्रामा आहे असेच वाटते.. पण
प्रेमात पडल्यावर मात्र ह्या कवीला माझ्या मनातल्या भावना नक्की कशा कळल्या ह्याचे आश्चर्य वाटते.
तसेच काहीसे अध्यात्माचे असावे.. अशांत मनाला आपली उत्तरे अध्यात्मात मिळत असावीत. शांत मनाला
असे प्रश्नच पडत नसल्याने हा बुवा काय बोलतोय तेच कळत नसावे..
मला अध्यात्म न समजण्याचे ही एक शक्यता असू शकते.. दुसरी शक्यता माझ्या (सुमार) बुद्धीशी संबंधित
असल्याने त्याबद्दल विचार करत नाही :)
27 Aug 2012 - 7:06 pm | संजय क्षीरसागर
ही शक्यता म्हणून मान्य आहे पण कोणतही वर्तमानपत्र उघडा, टीवी ऑन करा, सामाजिक किंवा जागतिक परिस्थिती पाहा. " लोक आधीच शांत, आनंदी आयुष्य जगात आहेत" आणि म्हणून "त्यांना ह्याच्याशी रिलेट करता येत नाही." हे खरंय का बघा.
सत्य बहुमतानी निर्णायक ठरणारा विषय नाही. ते एक आहे , तिथे मतदानाचा प्रश्न नाही.
सत्य उघड आहे. ते एकतर समजलं किंवा नाही समजलं.
वर एक मजेशीर प्रतिसाद आहे
आता लेखात मी माझं एकहार्टबद्दलचं आकलन लिहिलंय. तो अनुवाद नाही. ते वाचून एकहार्ट वाचायची इच्छा झाली पण माझी मतं पटत नाहीत!
लेखनाचा आनंद वाटला तर मी लिहिन. याचा अर्थ विरोधात लिहिणारे यशस्वी झाले असा नाही. निरर्थक वाद-प्रतिवादात मला रस नाही.
तर, असो!
28 Aug 2012 - 12:09 am | राघव
माझ्या प्रतिसादाचा विशेष उल्लेख करण्याचं कारण समजूनही लिहितोय.
निरर्थक वाद-प्रतिवादात मला रस नाही.
मीही अगोदरच्या प्रतिसादात अगदी याच भावनेनं सांगीतलं - "बाकी आपली अध्यात्मिक मते पटत नाहीत त्यामुळे त्यावर इथे काही लिहिण्यात अर्थ नाही."
एकहार्टबद्दल वाचायची ईच्छा झाली ती तुम्ही चांगल्याप्रकारे त्याची ओळख सांगीतलीत म्हणून. ते प्रामाणिकपणे सांगण्यासाठी तुमची मतं पटण्याची मला गरज नाही. पटली असतीत तर तेही प्रांजळपणे सांगीतले असते.
खरंच असो.
राघव
27 Aug 2012 - 3:36 pm | संपत
ही शक्यता म्हणून मान्य आहे पण कोणतही वर्तमानपत्र उघडा, टीवी ऑन करा, सामाजिक किंवा जागतिक परिस्थिती पाहा. " लोक आधीच शांत, आनंदी आयुष्य जगात आहेत" आणि म्हणून "त्यांना ह्याच्याशी रिलेट करता येत नाही." हे खरंय का बघा.
हे मान्य. माझा प्रतिसाद वैयक्तिक होता. तुम्ही किंवा ओशो, एकहार्ट बिन महत्वाचे लिहिता असे म्हणायचे नवते. ते मला अपील का होत नाही याची केलेली कारणमीमांसा होती. मला डायबिटीस नाही म्हणून डायबिटीसवर उपचार करणारे डॉक्टर मुर्ख ठरत नाहीत.
27 Aug 2012 - 7:04 pm | संजय क्षीरसागर
माणूस सत्याचा शोध अनंत कालापासून घेतोय.
बुद्ध राजपुत्र होता, त्याला अंत्ययात्रा पाहिल्यावर, तर अर्जुन धनुर्धारी होता, त्याला रणांगणावर विषाद जाणवला. एकहार्ट कारण विशद करत नाही.
याचा अर्थ विषाद वेगवेगळा आहे असा नाही. तो केव्हा जाणवेल ते सांगता येत नाही.
पण एक नक्की, ज्याला मृत्यूची अनिवार्यता लक्षात आली त्याला तो जाणवतो.