नमस्कार मन्डळी,
एक महिना झाला, काही कारणाने गावाला जावे लागले होते त्यामुळे लिखाण करता आले नव्हते, याचा खेद वाटतो. चला, परिक्रमा मान्डवगडावरुन पुढे सुरु करुया.
श्रीरामप्रभुन्चे दर्शन घेउन मान्डवगड उतरायला सुरवात केली.रस्ता अवघड होता,उतार होता सुलाबर्डी येथे गन्गा यमुना आणि नर्मदा असा त्रिवेणि सन्गम आहे.एक कुन्ड आहे मारुतीमन्दीर आहे. पुढे नाल्छा गाव आले. उशीर झाला होता त्यामुळे लुन्हेरा फाट्यावर बसने जायचे ठरवले त्याप्रमाणे आलो.तिथुन किलासराय घाट प्रारम्भ होत होता त्यामुळे महेश्वरलाही बसनेच जाण्याचे ठरवले बस मिळाली,टोलरोड सुरु अशी पाटी होती चला हायवे लागला असे वाटले पण कसलेकाय! रस्ता भयन्कर खराब होता.उतावली,भारुडपुरा अशी काही गावे लागली.येथील जन्गलात बेलाची झाडे खुप होती.
महेश्वरला पोहोचलो त्यावेळी बारा वाजले होते,मैय्याच्या घाटावर पोहोचलो,देवी अहिल्याबाई होळकर यान्चे पवित्र दर्शन घेउन रिक्शाने मन्डलेश्वरला आलो.आमचा अन्दाज होता त्याप्रमाणे दत्तमन्दिरात भागवत आणि मन्डळी भेटली पण ते लगेच पुढे खेडीघाटला जाणार होते,मग त्यान्च्याबरोबरचा देण्याघेण्याचा व्यवहार पुर्ण केला आणि त्याना निरोप दिला.दोघे सुखी हेच खरे.
दत्तमन्दिर साधेसुधे पण प्रशस्त आहे. वासुदेवानन्दसरस्वती स्वामीन्चे शिष्य श्री. जहागिरदार यानी ही वास्तु बान्धली.सुधाकर भालेराव हे येथील पुजापाठ वगैरे व्यवस्था पाहतात. पद्मजा केळकर,नन्दा भोपळे या भोजनाची व्यवस्था पहातात. भागवत मन्डळीन्साठी स्वयम्पाक केलेलाच होता त्यामुळे त्यानी लगेच आम्हाला भोजनप्रसाद दिला.आणि शाळेत जायचे असल्याने त्या गेल्या.
आज आम्ही दोघेच परिक्रमावासी मुक्कामाला आहोत. बहुदा फक्त मराठी परिक्रमावासी येत असावेत.चार वाजता चहा घेउन मन्डलेश्वर दर्शनाला निघालो. भारतीताई ठाकुर याना फोन केला पण त्या काही कामासाठी रावेरला गेल्या होत्या त्यामुळे त्यान्ची भेट होणार नव्हती. योग नव्हता.
काशीविश्वेश्वर मन्दिरात गेलो. येथेच वासुदेवानन्दसरस्वती स्वामी यान्चे वास्तव्य होते.बहुतेक सर्व ग्रन्थरचना स्वामीनी याच ठिकाणी केली.त्यान्च्या कुटीत पादुकान्चे दर्शन घेतले.त्यान्च्या वापरातील वस्तु येथे जतन केलेल्या आहेत. या सर्व वास्तुच्या मालकिणबाई सौ. जहागिरदार वहिनी भेटल्या.त्यानी आस्थेवाईकपणे आमची चौकशी केली,स्वामीन्बद्दल माहिती सान्गितली.पुन्हा आल्यावर त्यान्च्याचकडे मुक्काम करावा असा आग्रहही केला.
तिथून श्रीराम मन्दिरात गेलो.श्रीगोन्दवलेकरमहाराजान्च्या प्रेरणेने हे मन्दिर १९३२ मध्ये बान्धले आहे.भव्य मन्दिर आहे. सुन्दर श्रीराम लक्ष्मण सीता आहेत. नर्मदामैय्याचा प्रशस्त घाट आहे. श्री. मोडक येथील व्यवस्थापक आहेत.त्यानी चहापाणी करुन आमचे आदरातिथ्य केले.
सन्ध्याकाळी आरतीनन्तर दत्तबावनीचा पाठ केला. भोजनाला फक्त आम्ही दोघे आणि भालेरावगुरुजीच होतो पोळ्या शिल्लक होत्या म्हणून वान्ग्याबटाट्याची रस्सा भाजी आणि थोडा भात केला भोजन करुन आता झोपणे. उद्या खेडीघाट.
प्रतिक्रिया
21 Aug 2012 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा
21 Aug 2012 - 11:14 pm | संजय क्षीरसागर
अश्यानं त्या दुसरी परिक्रमा करायला घेतील बर कां!
22 Aug 2012 - 4:22 am | priya_d
खुशीताई,
ब-याच दिवसांपासून आपल्या लिखाणाची वाट पहात होते. खुप छान. आता रोज नेमाने लिहा.
पुलेशु.
प्रिया
22 Aug 2012 - 8:25 am | पैसा
असेच म्हणते. जरूर लिहा.
22 Aug 2012 - 9:06 am | मूकवाचक
+२
23 Aug 2012 - 10:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहित राहा. वाचतोय. छायाचित्रे असतील तर लेखात टाकत चला.
-दिलीप बिरुटे
22 Aug 2012 - 9:32 am | स्पा
+३
22 Aug 2012 - 11:57 am | sagarpdy
-६ = ०
:D
22 Aug 2012 - 12:08 pm | कवितानागेश
खरे तर याबरोबर फोटो हवे होते. तुम्ही फोटो काढले नाहित का?
22 Aug 2012 - 12:18 pm | निनाद
तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा वाचत लिखाण चांगले आहे.
असेच सुरू ठेवावे!
लीमाउजेट यांच्याशी सहमत आहे. चित्रे असली तर जून मजा येईल...
22 Aug 2012 - 9:07 pm | अर्धवटराव
गोंदवलेकर महाराज, टेम्बे स्वामी वगैरे साधुंच्या निगडीत वस्तु/वास्तुंचे फोटु यायलाच हवे होते या धाग्यावर.
अर्धवटराव
22 Aug 2012 - 12:58 pm | सुजित पवार
ज्याना खरेच वाचायचे नाहि त्यानि प्रतिक्रिया तरि का द्याव्यात?
ज्याना वाचाय्चे ते वाचत आहेत, लिखानाच पन स्वातन्त्र्य नाहि का ?
मला आवडला हा हि भाग
22 Aug 2012 - 7:56 pm | बॅटमॅन
+१.
तसेही नाडी वैग्रेंपेक्षा कितितरी सुसह्य आहेत हे लेख.
22 Aug 2012 - 4:42 pm | स्पंदना
नर्मदे हर!