पहाटे उठून सर्वान्ची स्नाने,पुजा आरती होईपर्यन्त सहा वाजले.रन्गावधुत महाराजान्च्या समाधीचे दर्शन घेउन नारेश्वरचा निरोप घेतला. आश्रमाबाहेर टपरीवर चहा घेउन विनोबा एक्स्प्रेस निघाली.रस्ता चान्गला होता,डाम्बरी. थन्डी चान्गलीच पडली होती.सगळ्याना चालण्याचा हुरुप आला होता.रामनामाचा जप करत मजेत चालत होतो,सहाएक कि.मि. चालले असू ;डेरोली गाव आले.या गावच्या सरपन्चबाई सौ. ज्योतीबेन ठाकूर यानी आग्रहाने बोलावले,सगळी उच्चशिक्षित लोक महाराष्ट्रातुन इतक्या लाम्बुन परिक्रमा करण्यासाठी आलेले पाहुन त्याना फार कौतुक वाटले.त्यान्च्याकडे चहा घेउन शॉर्टकटने पुढे निघालो.
साधारनपणे तीनएक कि.मि. चालल्यावर कोठिया गावात आलो.उन चान्गलेच वर आले होते.इन्दिरा आवास योजनेतील घरे लागली,एका घराच्या ओट्यावर बसुन पाणी प्यायलो,तिथल्या छोट्याशा दुकानातुन शेन्गदाणे-गूळ घेतला,दुकानदार आम्ही परिक्रमावासी म्हणून पैसे घेत नव्हता आम्ही बळेबळेच त्याला पैसे दिले. हातावर पोट असलेल्या गरीबान्कडे असलेली श्रद्धा किती मोठी आहे. नर्मदे हर.पुढे निघालो अशोकभाई पटेल यानी बोलावले,भागवत गेल्यावर्षीही त्यान्च्याकडे गेले होते,तिथे चहा घेतला आणि पुढे निघालो. गुजराथ वॉटर आणि गटर व्यवस्थापन यूनिटच्या मधुन बाहेर पडुन शेतान्च्या बान्धा-बान्धाने चालत तीनएक कि.मि. वरील राणापुर मधील रणछोडराय मन्दिरात आलो. साडेदहा वाजले होते.
पाळीपाळीने सर्वानी कपडे धुतले गवतावर वाळत घातले.इथे खिचडीचे सदाव्रत मिळाले,एका परिक्रमावासीजवळ टमाटे होते.लिलाताईनी चुल पेटवली,मी डाळ-तान्दुळ धुतले.टमाटे चिरुन दिले,विद्याताईनी खिचडी फोडणीस टाकली,परान्जपे आणि माढेकर काका यानी खिचडी शिजवली.तिथे पन्जाबमधील एक ग्रुहस्थ भेटले,ते परिक्रमेत नव्हते पण अशीच भ्रमन्ती करत होते.त्यानी गावातुन खुपसारे ताक आणले.भोजन झाल्यावर पावणेदोन वाजता निघालो.रस्ता दाखवायला ते पन्जाबी भाईसाब आले,त्यानी मैय्याच्या किनार्यावर आणून सोडले.
आता रणरणत्या उन्हात वाळवन्टातुन चालायचे होते,वरती आग ओकणारे ऊन आणि खाली पाऊल बुडेपर्यन्त गरम पुरळ वाळू,कसेतरी पाय उचलत चालत होतो.जवळुन मैय्या सन्थ वाहात होती,तिच्या कडून गार वार्याची झुळूक आली की अगदी स्वर्गसुख मिळत होते.वाटेत एक शेत झोपडी दिसली,ती आम्हा थकल्या जीवाना वाळवन्टातील ओअसीस सारखीच भासली.शेतातुन वाट काढत झोपडीत पोहोचलो,एक आजीबाई बसल्या होत्या;त्यानी हसतमुखाने स्वागत केले,माठातील थन्डगार पाणी सर्वाना दिले.आमची विचारपुस केली जेवण करा म्हणाली,आम्ही जेवण झाल्याचे सान्गितले हा आमचा सन्वाद म्हणजे गम्मतच होती,आजी गुजराथीत विचरायची आणि आम्ही हिन्दीत उत्तर द्यायचो आज हे कळले प्रेम आस्था असेल तर भाषा गौण ठरते विचार समजुन घेण्यासाठी भाषेची मुळीच गरज नसते.
साधारणपणे तीनएक कि.मि. चाललो असु. आजीबाइनी वर टेकडीवर चढुन रस्ता आहे असे सान्गितले होते,पण झाडी इतकी होती की कुठुन वर चढायचे हेच समजत नव्हते,पुढे काहीमुले मासे पकडत होती त्यान्च्या जवळ गेल्यावर विचारले एक मुलगा आम्हाला वाट दाखवायला बरोबर आला,त्याच्या मागून वर चढलो.आता झाडीतिल पायवाटेने चालु लागलो,दमायला झाले होते जवळचे पाणी सम्पले होते,झाडान्च्या सावलीत बसलो तो मुलगा सगळ्यान्च्या बाटल्या घेउन पाणी आणायला गेला.पाणी आल्यावर निघालो,पुन्हा साधारणपणे दोनेक कि.मि. चालल्यावर सुरसामल गावात पोहोचलो.त्या मुलाला खाऊसाठी पैसे दिले तो घेत नव्हता तरी दिलेच.बिस्किटेही दिली.
पाच वाजले होते,आजच्या मुक्कामाचे ठिकाण मालसर मोठ्या रस्त्याने ८कि.मि. आणि शॉर्टकट पण अतिशय खराब रस्त्याने ५कि.मि. होते.विद्याताई चालण्या सारख्या नव्हत्या,आम्हीही दमलो होतो,एक अगदी छोटा चढ चढुन पुलावर आलो आणि नेहेमीप्रमाणे मैय्या धावुन आली तिला का आपल्या लेकरान्चे कष्ट बघवतील? श्री. सुरेशभाई पटेल याना तिने पाठवले. नर्मदे हर. तुम्ही बसस्टॉपवर जावुन थाम्बा मी गाडीची व्यवस्था करतो,सुरेशभाई म्हणाले. कसेबसे बसस्टॉपवर गेलो. सुरेशभाईनी जीप आणली,सर्वजण जीपमध्ये बसलो.सुरेशभाईन्चे आभार मानले,ये मैय्याजीकी सेवा है इसमे आभार नही माने जाते.सिर्फ नर्मदे हर.खरेच आहे,नर्मदे हर.आठ कि.मि.मालसरला पोहोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते.
मालसरला पन्चमुखी हनुमान मन्दिराच्या भक्तनिवासात आसन लावले. हातपाय धुवुन दर्शन घेतले. पन्चमुखी हनुमान,श्रीराम लक्ष्मण सीता,जगन्नाथ बलभद्र सुभद्रा येथे स्थानापन्न आहेत. डोन्गरे महाराजान्ची समाधीचे मात्र काही दिसले नाही.महाराज म्हणाले डोन्गरेमहाराजानी जलसमाधी घेतली होती त्यामुळे समाधी वगैरे नाही. येथे अन्नछत्र असल्याने भोजन करुन पण त्याआधी मन्दिरातील सन्ध्यारती नन्तर आमची मैय्याची सायम आरती करुन आता विश्रान्ती.क्रमशः
प्रतिक्रिया
6 Jul 2012 - 4:17 pm | सुजित पवार
वाचतोय मि पन
6 Jul 2012 - 4:22 pm | निवेदिता-ताई
वाचतेय...येउ द्यात अजुन
6 Jul 2012 - 6:54 pm | गोंधळी
वाचतो आहे.
एकदा तरी नर्मदा परीक्रमा करायची ईच्छा आहे.
6 Jul 2012 - 7:02 pm | मन१
सर्वात कमी वेळात सर्वात जास्त भाग गाठलेली मालिका म्हणता यावी.
रंजक.
6 Jul 2012 - 7:19 pm | परिकथेतील राजकुमार
भारती ठाकूरांच्या पुस्तकातले बरेच उतारे इथे अशुद्ध भाषेत वाचल्यासारखे वाटत आहेत.
हे प्रवासवर्णन नक्की तुमचेच आहे ना ?
7 Jul 2012 - 10:50 am | खुशि
नमस्कार परिकथेतील राज कुमार,
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. आपण परिकथेतील राजकुमार असल्यामुळेच वास्तव आणि परीकथा यातील फरक आपणाला न समजणे स्वाभाविक आहे.माझे लिखाण अशुद्धतर अजिबात नाही,भारती ठाकुर याना आम्ही परिक्रमा करताना भेटलो जरुर होतो पण केवळ त्या आमच्या नाशिकच्या रहिवासी आहेत म्हणजे आम्ही एकगाव भगिनी आहोत आणि त्या लेपाघाट येथे चान्गले शिक्षणाचे काम करत आहेत त्याबद्दल अभिनन्दन करण्यासाठी .
परिक्रमेचा मार्ग हा एकच असतो,मी भारतीताईन्चे पुस्तक वाचले आहे अगदी विकत घेउन वाचले आहे.कुठल्याही अन्गाने आमच्या दोघीन्च्या लिखाणात सुतराम साम्य नाही हे कुणीही सान्गेल.उगाच टीका करायची म्हणून करायची ह्याला काहिच अर्थ नाही हे आपणही जाणता. असो.
आम्ही खरच परिक्रमा केली किन्वा नाही याच्याशी आपणाला काही देणेघेणे नसावे खरे ना? आपणाला माझे लेखन आवडत नसेल तर ते आपण वाचु नये हेच श्रेयसकर. धन्यवाद.
7 Jul 2012 - 6:44 pm | परिकथेतील राजकुमार
धन्यवाद.
छानसे उत्तर दिले असते, पण मग ते वाचून परत मिपावरती यायचे पण आपले धाडस झाले नसते. त्यामुळे पास...
8 Jul 2012 - 11:00 am | खुशि
नमस्कार आणि धन्यवाद. मिपाची सभासद मी माझ्या मनाने झाले.मी विनन्ती पाठवली,सम्पादक मन्डळाने ती स्वीकारली आणि मला सभासद केले.मी मराठी आहे त्यामुळेच मी भितरी अजिबात नाही.
1 Feb 2016 - 1:48 am | बोका-ए-आझम
मस्त थोतरीत बसलेली आहे! थोबाड लाल झालं असणार नक्कीच!
1 Feb 2016 - 6:35 am | विजय पुरोहित
धन्यवाद बोकोबा. तुमच्यामुळे इतकी उत्तम लेखमाला वाचायला मिळाली.