काल घरात बसून अगदी कंटाळा आला होता..
गाडी काढली आणि लॉंग ड्राईव्हला गेलो..
जवळच अतिशय अप्रतिम जागा आहे..
सुंदर समुद्र,शांत परिसर..
एकही घर नाही आसपास..
बाजूला डोंगरांची रांग, वळणदार घाट..
सूर्याच्या उन्हात चकाकणारी मऊसर वाळु,
कधी धीरगंभीर, शांत तर कधी उधाण आलेला समुद्र !
उगीच आपल्या पायात पाय कराणारे धीट सीगल्स..
एखाद-दुसरी फॅमिली/कपल खूर्च्या टाकून निवांत बसलंय,
कधी एकमेकांच्या विश्वात तर..
कधी नुस्तंच शांतपणे
समोरचं सुंदर निसर्गचित्र डोळ्यात साठवत, हळूहळू बुडणारा सूर्य पाहात..
कोणी हौशी फोटोग्राफर येऊन फोटो काढत बसलाय..
कोणी चित्र काढताना दिसलं नाही..
कदाचित ते मनोरम दृश्य चितारणे फक्त वरच्यालाच जमेल..
आपण फक्त तिथे जाऊन आस्वाद घ्यायचा..
दुसरं काय करू शकतो नाहीतरी आपण?
प्रतिक्रिया
14 Aug 2008 - 10:39 pm | शितल
सर्वच फोटो सुंदर.
तु़झ्या फोटोग्राफीला सलाम :)
14 Aug 2008 - 10:45 pm | यशोधरा
फोटो क्रमांक २, ४, ६, ८ आणि ९ विषेशतः आवडले.
14 Aug 2008 - 10:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वच फोटो जब्रा !!!
14 Aug 2008 - 11:16 pm | नारायणी
फोटोज सुरेख यात तर काही वादचं नाही.पण ही जागा कुठली हेही सांग ना.
14 Aug 2008 - 11:30 pm | भाग्यश्री
धन्यवाद शितल,यशोधरा आणि बिरूटे सर..
थँक्स नारायणी..
नाव ऍज सच नाहीये.. पण लॉस एंजिलिस मधे मालिबू नावाच्या सुंदर बीचेस असलेल्या गावाकडे जातानाच्या रस्त्यात हा बीच लागतो.. (किती मोठं वाक्य ते!) मालिबूचा झुमा बीच फेमस आहे.. हा त्याच्या बराच आधी लागतो, आणि हा पण छान आहे..
14 Aug 2008 - 11:42 pm | टारझन
छायाचित्र क्र. १,३,४,७ जबरा , सुंदर फोटुग्राफी...
पण असे छायाचित्र नेट वर पण पहायला भेटते, अपेक्षा असते ती चित्र एखाद्या सुंदर किश्श्यासकट मनात ऊतरवण्याची ती पुर्ण झाली नाही.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
15 Aug 2008 - 12:12 am | भाग्यश्री
ह्म्म.. बरोबर आहे तुझं.. पण ती अशी जागा आहे ना, की फक्त शांतता अनुभवायची,फक्त समुद्राचा आवाज ऐकायचा. कधी कधी आम्ही आणि पक्षी सोडून कोणी नसतं.. अशा ठीकाणी काय किस्सा होणार रे? :)
15 Aug 2008 - 12:20 am | धमाल सर्किट (not verified)
कधी कधी आम्ही आणि पक्षी सोडून कोणी नसतं.. अशा ठीकाणी काय किस्सा होणार रे?
प्रयत्न केला तर किस्सा होऊ शकतो, पण इथे लिहिण्याजोगा नाही ;-)
(ह. घ्या.)
- (चावट) सर्किट
15 Aug 2008 - 12:24 am | भाग्यश्री
:)) लिहीताना वाटलंच काहीतरी चुकतंय.. आधीच चेंज करायला हवं होतं..आता जाऊदे.. :|
15 Aug 2008 - 12:21 am | टारझन
मग तर तुला मोकळ रान होत लिवायला... प्रसंग ऊभा करायला माणसांची नाही विचारांची गर्दी हवी ..बोल काय म्हणतेस ? .. आयला ... तु नुसतं वरच एक वाक्य बोललीस माझ्या मनात प्रसंग ऊभा राहिला.. मला वाटलं ते बोललो.. आणि मला वाटतं तु झकास लिहू शकशिल म्हणून सांगितलं ..
कुपया लोभ असावा ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
15 Aug 2008 - 12:26 am | भाग्यश्री
नाही ना तेव्हढी प्रतिभा! जे दिसलं ते टीपलं इतपतंच जमतं.. जे नाही दिसत ते कागदावर उतरवणं अजुन नाही जमलेलं मला! एनीवेज, फार अवांतर होतंय.. प्रतिसादासाठी धन्यवाद!
15 Aug 2008 - 12:13 am | प्राजु
सुर्यास्ताचे चित्र... अप्रतिम..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Aug 2008 - 12:15 am | ब्रिटिश टिंग्या
सही फोटो टिपलेत!
15 Aug 2008 - 12:52 am | विसोबा खेचर
सर्वच चित्रे लै भारी! कुठला हो समुद्रकिनारा आहे हा?
तात्या.
15 Aug 2008 - 9:44 am | सूर्य
चित्रे निव्वळ अप्रतिम आलेली आहेत. पहिले आणि तिसरे व चौथे चित्र खवळलेल्या लाटांमुळे छान दिसत आहेत. दुसर्या चित्रात सुर्यकिरणे, पाण्यातले सुर्य प्रतिबिंब, चमकणारे पाणी यामुळे स्वर्गीय आनंद देत आहे. तसेच सुर्यास्त होत असतानाची चित्रे सुद्धा अतिसुंदर आहेत. शेवटच्या १-२ चित्रांमधे विजेचे खांब व तारा आल्या नसत्या तर अजुन छान दिसले असते. परंतु सर्वच छायाचित्रे अप्रतिम.
अजुन अशी काही चित्रे टाकावित व आम्हाला निसर्गसौंदर्याचा आनंद लुटु द्यावा :)
-सूर्य.
15 Aug 2008 - 9:58 am | मदनबाण
सर्वच चित्रे मस्त आहेत.
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
15 Aug 2008 - 10:53 am | भाग्यश्री
धन्यवाद मदनदा,सूर्य आनि तात्या!
15 Aug 2008 - 11:51 am | स्वाती दिनेश
सर्व फोटो सुंदर आलेत.
पहिल्या ५,६ चित्रात चमकती संध्याकाळ दिसते आहे तर ७व्या चित्रात कातरवेळेची चाहूल आणि ८ , ९ व्या चित्रात त्यातली हुरहुर दिसते आहे.सूर्यास्त तर सुरेख आहेच.
स्वाती