गँग्स ऑफ वासेपुर हा चित्रपट अनुराग कश्यपच्या कारकिर्दितला बहुचर्चित हुकुमी एक्का. स्नेहा खानवलकर या प्रतिभाशाली मराठी मुलीने या चित्रपटाला संगीतबद्ध केले आहे. "हंटर" आणि "वुमनिया" च्या यशानंतर गँग्स ऑफ वासेपुर २ च्या संगीताकडुन अपेक्षा उंचावल्या होत्या ज्या बर्याच अंशी पुर्ण झाल्या आहेत. स्नेहा खानवलकरच्या वैविध्यपुर्ण आणि रचनात्मक प्रयोगांमुळे चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय झाली आहेत.
१. ची चा लेदर : "दुर्गा" नामक १६ मुलीने हे गाणे गायले आहे. रेल्वेच्या डब्यात गाण्यापासुन ते ची चा लेदर पर्यतचा दुर्गाचा प्रवास रंजक आहे. हे गाणे त्याच्या उड्त्या चालीमुळे, बिहारी लहेजा आणि त्यात चपखल बसणारया शब्दांमुळे लक्षात राहते.
२.काला रे : शब्द - उत्तम, संगीत -उत्तम , गायकी - अप्रतिम. स्नेहाच्या ताज्या दमाच्या आवाजामुळे हे गाणे जमुन आले आहे. ड्रम बीट्स आणि बॅकग्राउंड्ला वॉयलिन हा संयोग मंत्रमुग्ध करतो.
३. इलेक्ट्रिक पिया : तबला, हार्मोनियम व ढोलकीच्या कल्पक मिलापातुन हे गाणे तयार झाले आहे. "रसिका डी राणी" या गायिकेच्या अस्सल आवाजामुळे हे गाणे विशेष लक्षात राहते. याच चित्रपटातील "तार बिजली" म्हणजे या गाण्याची मुळ कलाक्रुती होय.
४. मुरा : हे माझे या ध्वनिमुद्रिकेतले अतिशय आवडते गाणे. या गाण्यात मंडोलिन आणि गिटारचा सुरेख वापर करण्यात आला आहे. गाण्याचे हिंग्लिश बोल ही या गाण्याची जमेची बाजु.
असा हा वेगळ्या धाटणीचा आणि वैशिष्ठ्यपुर्ण प्रयोगांमुळे लक्षात राहिलेला अल्बम. पण प्रत्येकालाच ही गाणी रुचतिल की नाही हा भाग वेगळा...
प्रतिक्रिया
12 Aug 2012 - 1:37 pm | आवशीचो घोव्
वेगळं संगीत असलेली गाणी नक्कीच आवडलीत. गँग्स ऑफ वासेपुर १ मधील "इक बगल" हे पियुष मिश्रांचं गाणं फारच सुंदर आहे.
12 Aug 2012 - 5:46 pm | जाई.
येस्स
ही गाणी वेगळ्या धाटणीची आहेत
12 Aug 2012 - 5:58 pm | बिपिन कार्यकर्ते
लिंक प्लीज!
12 Aug 2012 - 7:30 pm | प्रेरणा पित्रे
http://gaana.com/#!/albums/gangs-of-wasseypur-2
13 Aug 2012 - 10:44 am | ५० फक्त
आय अॅम अ हंटर - हे मला आजपर्यंत शब्द व्यवस्थित कळालेलं इंग्रजीतलं एकमेव गाणं आहे. लई भारी.
14 Aug 2012 - 4:40 am | रेवती
या सिनेमाचा दुसरा भाग आहे हे लक्षात नव्हते त्यामुळे गाण्यांबद्दल इथे समजले.
आपली तुपली आवड वेगळी आहे. ;)
14 Aug 2012 - 9:43 am | वपाडाव
काला रे गाणं मला खुप आवडलंय... मंद अन संथ... सुप्रिम कलाकृती... हे गाणं "देव-डी" मधील "सावरिया" सोबत मिळतं-जुळतं वाटतं...
ची चा लेदर सुद्धा क्लास आहे...
14 Aug 2012 - 10:29 am | प्रेरणा पित्रे
संमोहित करणारं गाणं आहे हे....
14 Aug 2012 - 10:52 am | कॉमन मॅन
ही गाणी कुठे ऐकता येतील?
14 Aug 2012 - 11:39 am | प्रेरणा पित्रे
त्यावर ही गाणी एकता येतिल.. आणि फ्री डाउन्लोड पण करता येतिल.
14 Aug 2012 - 6:17 pm | रमताराम
शीर्षकात असलेले 'समीक्षण' कुठे दिसले नाही, लपून बसले की काय?
गाण्याचे हिंग्लिश बोल ही या गाण्याची जमेची बाजु.
'अरे टाईम्स हॅव चेन्ज्ड पुर्ष्या' असे म्हणणार्या चितळे मास्तरांची आठवण झाली.
खुद के साथ बातां*: कथा, अभिनय वगैरे गोष्टी दुय्यम होऊन सिक्स पॅक, झीरो फिगर, आयटेम साँग, हिरो सलमान आहे की शारुक, चुंबनदृश्ये किती आहेत इ. इ. कलाबाह्य निकषांवर चित्रपट चालण्याचे दिवस आलेत तिथे संगीतानेच काय पाप केले आहे. त्याचेही निकष बदलणारच की ररा. उद्या गाण्याच्या शब्दांना अर्थ आहे किंवा ते चक्क 'गायले' आहे ही देखील जमेची बाजू म्हणून गणली जाईल, कारण सध्या नुसतेच ठेक्यावर कुठलेतरी शब्द बसवून त्याला गाणे असा ष्टांप लावण्याची फ्याशन आहे, रेकणार्याला गायक म्हटले जाते तिथे काव्य अथवा शब्दार्थ नि गायकी वगैरे केव्हाच अडगळीत पडली की. तस्मात म्हातार्या किरकिर करू नकोस.
*प्रताधिकारः चतुरंग
14 Aug 2012 - 7:26 pm | कॉमन मॅन
प्रतिसाद फारच आवडला.. :)
15 Aug 2012 - 10:05 am | प्रेरणा पित्रे
आपण पुर्वग्रहदुषित नजरेने बघत असल्याने व गाणी न एकताच प्रतिसाद दिल्यामुळे त्यावर काही भाष्य करण्याची गरज वाटत नाही..(सिनेमाच्या नावामुळे कदाचित आपणास संगीत निम्न दर्जाचे वाटु शकते) सगळ्यांना सारखीच गाणी आवडायला हवीत असे काही नाही..
असो.. आपल्या मतांचा आदरच आहे..
या विषयावर पहिला लेख लिहितांना या सर्व प्रतिक्रियांची तयारी ठेवली आहे...
15 Aug 2012 - 4:21 pm | श्रीरंग
प्रत्येक शब्दाशी पूर्णतः सहमत. अगदी नेमकं लिहिलं आहेत, रमताराम.
15 Aug 2012 - 2:09 am | मोदक
पुलेशु :-)
15 Aug 2012 - 9:35 am | भडकमकर मास्तर
समीक्षण जे आहे ते रोचक आहे..
"हंटर" आणि "वुमनिया" च्या यशानंतर गँग्स ऑफ वासेपुर २ च्या संगीताकडुन अपेक्षा उंचावल्या होत्या ज्या बर्याच अंशी पुर्ण झाल्या आहेत
हे वाक्य विशेष आवडले...
अवांतर : आपण त्यांच्या ओळखीच्या आहात काय?
15 Aug 2012 - 4:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रत्येकालाच ही गाणी रुचतिल की नाही हा भाग वेगळा...
सहमत आहे. मलाही ही गाणी काही झेपली नाहीत, रुचली नाहीत. केकेएल आणि मुरा ऐकलं. नेमकं काय चालु आहे, तेही काही कळलं नाही. पण, श्रोत्यांच्या आवडी निवडी वैविध्यपूर्ण असतात माझ्या पिढीतील श्रोत्यांची अशीही एक आवड आहे, हे कळलं. मनःपूर्वक आभार.
चहा पिता पिता गेल्या पिढीतील ''अरे ओ शोख कलियो मुस्कुरा देना ओ जब आये'' हे गाणं ऐकायला घेतलं. :)
-दिलीप बिरुटे