फोटोशॉप - स्वप्नांना रेखाटण्याचे कैनवास
नमस्कार...
फोटोशॉप ची किमया खुप आहे...
डिजिटल कलेचा मुलभुत भाग बनलेल्या या सॉफ्टवेर ची गरज हल्ली सर्वाना लागते...
दिसत तस नस, असच हे सॉफ्टवेर आहे आणि याचा वापर याच म्हाणीला खर करण्यासाठी बहुदा वापरला जातो..
म्हणजे जे जस दिसत ते त्यापेक्षा सुंदर, छान किंवा विचित्र काही (गरजे नुसार) आपण करू शकतो...
म्हणाव तस सोप्प नाही हे सॉफ्टवेर पण तस कठिणही नाही....
असच अचानक कोल्हापुरहुन येताना ट्रेनमधून काढलेले काही फोटो बघताना त्यातले २ फोटो बघून डोक्यात कुठून कशी tube पेटली माहित नाही, वाटल हे २ फोटो मिक्स करून काहीतरी वेगळ कराव..
ते अस काही झाल की जास्त काही मेहनत न घेता मला अनपेक्षित पण खुप मस्त इफ्फेक्ट मिळाला अणि मी पुढे वेगळ काही करायच थाम्बवुन दिल...
ते कस केल ते या भागात त्याच्या making द्वारे दाखवत आहे..
सर्वाना आवडेल आणि त्यातून कही शिकायला मिळेल अशी अपेक्षा आहे.....
१ पहिला फोटो
२ दूसरा फोटो
३ सर्वप्रथम फोटोशॉप मधे दोन्ही फोटो ओपन करावे, मग एक फोटो पूर्ण (किंवा हवा तेवढा) कॉपी करून दुसर्या फोटोच्या doccument वर पेस्ट करावा, मग तो फोटो बरोब्बर बाजूला लाउन mag Image - canvas size च्या मदतीने कैनवास साइज़ वाढवून घ्यावी...
४
५ मग levels , curves च्या सहाय्याने दोन्ही चा brightness आणि contrast समान करावा
६ मग त्या layer ला मास्क करून overlaping (झाकला गेलेला भाग) erase करून टाकावा फोटो एक वाटण्यासाठी
७ मग सगळ्या layers duplicate करून merge कराव्या आणि त्या layer ला desaturate कराव
८ मग त्या layer ला hue saturate ने एक हवा तो कलर tone द्यावा.... colourized option ऑन करावा यासाठी...
९ मग त्याच layer ला lighting इफ्फेक्ट द्यावा.
१० बस्स झाल..... मस्त रात्रीच वाटणार, काहीतरी वेगळाच फील देणार अस हे दृश्य तयार झाल
शेवटी आलेला इफ्फेक्ट कसा वाटला?? अजुन काही होऊ शकत असेल तर जरुर कोणीतरी प्रयत्न करावेत, बघायला अव्देल वेगळ काहीतरी.....
प्रतिक्रिया
11 Aug 2012 - 5:22 am | भरत कुलकर्णी
सुरूवातीला रूळ बदामासारखे दिसत होते. एखादा बाण, हिरो, हिरवीण असला काहीतरी बॉलीवूडी हंगामा शेवटल्या फोटोत दिसेल असली (फालतू) अपेक्षा होती. तुम्ही जे काही केलेत त्यात तुमची कारागीरी दिसते आहेच त्यात वाद नाही. आपला हात फोटोशॉपवर बसला आहे. आपण गुरू आहात आमचे.
बाकी शेवटल्या फोटोत जे काही दिसते आहे ते पाहून रेल्वेमधील टेक्नीकल लोकं आत्महत्या करतील. रेल्वेचे चार ट्रॅक एकमेकांना एवढ्या कमी कोनातून एकमेकांना छेदत आहे व त्यावरून दोन दोन गाड्या धावत आहे - जे तांत्रीकदृष्ट्या शक्य नाही. मला वाटते यात बदल आवश्यक आहे. स्पष्ट बोललो राग नसावा.
बाकी फोटोशॉप मला शिकवण्यासाठी राग न करता आपण मदत कराल ही अपेक्षा.
11 Aug 2012 - 6:02 am | चौकटराजा
फोटोशॉप हे कल्पकतेचे काम आहे. साधारणतः लग्नाचे अल्बम , राजकीय लोकांची होर्डिंग्ज ई त्याचे सामान्य उपयोग आपल्याला दिसून येतात. पण त्यात फोटोग्राफर फार[डोके चालवीत नाहीत कारण त्याना
काम " उरकायचे" असते.इथे डोके चालविण्यात आलेले आहे. श्री भरत यांचा रूळाच्या कोनाविषयीचा आक्षेप अमान्य ! बदामाचा कोन जवळ जवळ ६५ ते ७० अंशाचा दिसतोय ! युरोपात काही असे बोगदे आहेत जिथे मालगाडी लांव असलेली असेल तर तिचे पहिले काही डबे पूर्वेला धावत असतील तर तिचेच शेवटचे डबे पश्चिमेला धावत असतात. दिसताना या दोन गाड्या आहेत असे दिसते. म्हणजे रेल्वे ट्रॅक कसा असेल कल्पना करा !
11 Aug 2012 - 7:09 am | भरत कुलकर्णी
>>>कोन जवळ जवळ ६५ ते ७० अंशाचा दिसतोय
जरी असल्या कोनातून रूळ एकमेकांना छेदत असतील तरी तेथून जाणारी रेल्वे क्रॉस होवून दिशा एकदम १८० अंश उलट बदलणार नाही.
रेल्वेचे रूळ बदलतांना बर्याच अंतरापर्यंत समांतर धावत असतात व हळूहळू जवळ येत जात नंतर छेदत पुन्हा लांब लांब जात असतात.
>>> युरोपात काही असे बोगदे आहेत जिथे मालगाडी लांव असलेली ......
हो, मी पण इंटरनेटवर असले फोटो बघीतल्याचे आठवते पण त्यावेळी फोटोचा व्ह्यू मोठा असावा लागतो. (फोटोग्राफीचे तंत्र मला अवगत नाही त्यामुळे चुकीचे शब्द वापरल्यास क्षमस्व:)
आणखी एक. दोन्ही रेल्वे रूळांवर असलेल्या फोटोत (प्रोसेस्ड फोटो/ फायनल फोटोत) विद्यूतपुरवठा करणारे खांब व तारा एकाच प्रतलात नाहीत. ते तिरके भासत आहेत. अगदी शेजारी एवढा उतार रेल्वेरूळांचातरी नसतो.
यावर मुद्यांवर तांत्रिक चर्चा आवश्यक वाटते. मिपावरील तांत्रीक मंडळी भाग घेतील ही अपेक्षा. आपल्याला सौरभ उप्स चे उणेदूणे काढायचे नाही किंवा त्याच्या कौशल्याबद्दलही वाद घालायचा नाही. फोटोशॉपमध्ये तो गुरू आहेच.
11 Aug 2012 - 8:42 am | प्रचेतस
मस्तच. :)
11 Aug 2012 - 8:52 am | लीलाधर
मस्तच हो सुरेख :)
11 Aug 2012 - 9:31 am | मदनबाण
सौरभ... हा प्रयोग आवडला ! :)
तू मला एक सांग,लेयरचा वापर करुन फोटो उठावदार करता येतात का ? लेयरचा वापर करुन काय फायदा मिळु शकतो ? यावर तू अगदी डिटेल मधे लिहलेस तर नक्कीच आवडेल आणि माझ्या सारख्या अनेकांना त्याचा वापर तर कळेलच पण काढलेले फोटो अजुन आकर्षक दिसण्यासाठी काय करतात ते देखील कळेल.
माझ्याकडे अजुन फोटोशॉप नाहीये... :(
11 Aug 2012 - 1:46 pm | चौकटराजा
माया , ३डी एस मॅक्स ही थ्री डी अॅनिमेशन मधील पॅकेजेस असोत, फ्लॅश सारखे टू डी अॅनिमेशन असो वा फोटोशॉप सारखे स्टील फोटो एडीटर असोत लेअर चे महत्व अनन्यसाधारण आहे. विडीओ एडीटिंग प्रिमिअर प्रो , लिकवीड अशा सारख्या मधेही फेड इन फेड आउट सारखे इफेक्ट दाखविण्यासाठी लेअर या
साधनाचा वापर करता येतो.अॅनिमेशन मधला मुलभूत नियम असा की एका लेअरवर पृथ्वीवर तरी एकच अॅनिमेशन कंट्रोल निर्माण करता येतो.सबब फ्लॅश मधे ९९९ पर्यंत लेअर निर्माण करता येतात.
साधे उदाहरण देऊन सांगायचे तर - मछरदाणीच्या बाहेर बसलेली व्यक्ती फोटेशॉप मधे " मछरदानीत चल" अशी विनवणी न करता मच्छरदाणीत नेता येते. thanks to layers . !
काढलेले फोटे अधिक चांगले करण्यासाठी जी तंत्रे वापरतात त्याना " लाईटरूम " प्रोसेसेस म्हटले जाते. अलिकडे काही कॅमेर्यातच रिटच ही सोय असते. त्याने काही प्रमाणात फोटो दुरुस्त होतो. फोटॉशॉप वर आधारलेले फोटो ब्रश हे एक चांगले सुधारणा सॉफ्टवेअर आहे. पण फोटोशॉपचाच उपयोग करायचा झाल्यास ब्लर फिल्टर, शार्पन फिल्टर, नॉईज फिल्टर मधील रिमूव्ह नॉईज , डिसपॅकल ई साधनानी फोटो दुरुस्त करता येतो. शिवाय इमेज मेनू मधे एन नंबर शक्यता आहेत. त्या ही वापरून पहा. याख्रेरीज स्टॅम्प टूल वापरून फोटोतून काहीही पळवून लावता येते.
11 Aug 2012 - 9:44 am | स्पा
चला आज वेळ मिळाला तर तुला.. ;)
आधी कौतुक केलेलं होतंच..
परत एकदा करतो ..
लयच भारी काम झालंय :)
11 Aug 2012 - 2:43 pm | आनंदी गोपाळ
www.worth1000.com अशी एक वेबसाईट आठवली..
![Image and video hosting by TinyPic](http://i48.tinypic.com/4kcjd1.jpg)
फोटोशॉप वापरून केलेल्या अप्रतिम कलाकृती तिथे आहेत. बघा एकदा चक्कर टाकून..
11 Aug 2012 - 4:08 pm | ५० फक्त
लई भारी रे.
12 Aug 2012 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा
:)
12 Aug 2012 - 12:43 am | अभ्या..
12 Aug 2012 - 12:47 am | अभ्या..