फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......
कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाही
डोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही
किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडू
तुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू
येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेस
स्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस
आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहून
तरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन
माझं काय विचारतेस आता माझी कविताही थकली आहे
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......
प्रतिक्रिया
14 Aug 2008 - 12:05 pm | अरुण मनोहर
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे......
हष॑द आनंदी, वाचकांसाठी देखील तुमची लेखणी झीजू द्या. वाचक दुवा देतील.
अजून येऊ द्या.
14 Aug 2008 - 12:08 pm | अनिल हटेला
हेच म्हणतो !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
14 Aug 2008 - 12:11 pm | सुचेल तसं
हर्षद,
माफ करा, पण ही देखील कविता तुमचीच आहे का? नसल्यास तुम्ही सदर कवि/कवयित्रीची परवानगी घेतली आहे का इथे प्रकाशित करण्यापुर्वी? ही कविता खालील संकेतस्थळांवर देखील आहे.
http://sujayvkulkarni.blogspot.com/2007/02/blog-post_3853.html
http://ranjitnpawar.blogspot.com/2007/05/blog-post_5892.html