पाऊस असा हा झरतो ,धारांतुन गाणी गातो
नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो..
ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो
रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो..
थेंबात ये रुपेरी, घेई हवेत झोके
मातीतुनी उगवती , त्याची अनंत रुपे..
पाऊस आसमंती, पाऊस अंतरात
पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त...
प्रतिक्रिया
11 Aug 2008 - 5:15 pm | आनंदयात्री
>>ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो
>>रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो..
ऑस्सम !!! अजुन काय म्हणु ? ओल्या मनात माझ्या खासच :) .. तुझ्या कवितेच खासियत अशी की ती कविता त्यातल्या अशाच एखाद्या युनिक कल्पनेमुळे लक्षात रहाते !!
लै लै आवडले.
12 Aug 2008 - 1:48 am | बेसनलाडू
नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो..
ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो
रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो..
थेंबात ये रुपेरी, घेई हवेत झोके
या ओळी फारच छान. खूप आवडल्या.
कविता अगदी चिंब करणारी आहे :)
(ओलाचिंब)बेसनलाडू
12 Aug 2008 - 3:11 am | प्राजु
मन ओलंचिंब भिजवून गेली. सुंदर कविता... आणखी काय सांगू?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Aug 2008 - 12:29 pm | मदनबाण
ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो
रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो..
या ओळी तर फारच आवडल्या..
(चिंब भिजलेला)
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
12 Aug 2008 - 4:47 pm | अजिंक्य
पाऊस आसमंती, पाऊस अंतरात
पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त...
फारच छान!
प्रत्येक ओळीतून हळूहळू उंची वाढवत नेऊन, झकास शेवट केलाय.
सुरेख कविता!
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
12 Aug 2008 - 7:25 pm | राघव१
म्हणतो. खूप आवडलं!!! असेच लिहित रहा :)
12 Aug 2008 - 6:42 pm | शितल
कवितेची प्रत्येक ओळ सुंदर
:)
12 Aug 2008 - 10:47 pm | यशोधरा
फुलवा, छानच लिहितेस गं!
13 Aug 2008 - 10:56 pm | मनीषा
कविता छान आहे... अगदी तुझ्या नावासारखी
पाउस...
नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो..
सुंदर !!!
29 Oct 2010 - 11:22 am | राघव
पाऊस आसमंती, पाऊस अंतरात
पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त...
अजून काय म्हणणार.. ब्येश्टेश्ट!!