(आपण शेवटचा घोट कधी घेतला?)

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in काथ्याकूट
2 Jul 2012 - 12:51 am
गाभा: 

आपण शेवटचा घोट कधी घेतला ?

माझ्याबद्दल सांगायचे तर, मी मुळात पितंच नाही. पण एका मराठी वर्तमानपत्राच्या प्रचारामुळे (दारू म्हणजे वाइन नाही) दोन चार वर्षातून एखादे वेळेस कुणा हुच्चभ्रू लोकांकडे जेवायला गेलो तर ष्टायील म्हणून इवलीशी वाइन चाखत राहतो. जेवणाच्या अगोदर सुरू करूनही ती शेवटपर्यंत संपतच नाही मुळी. चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव एखादा आयुर्वेदिक काढा जसे दाडीमावलेह किंवा द्राक्षासवासारखी लागते.

त्यांच हुच्च्भ्रू लोकांस मी जेवायला आमंत्रित केले असेल तर वाइन ऐवजी त्यांचे स्वागत फळांच्या रसाने किंवा शीतपेयाने करतो.

महाविद्यालयीन काळात व नंतरही आज शेवटची म्हणून पिणारे अनेक जवळचे मित्र आहेत. त्यातील बहुतेक सर्व थोड्या थोड्या काळाने पुन्हा पुन्हा शेवटचा घोट घेत असतात. काही मोठी माणसे शेवटचा घोट घेत घेतच काळाच्या पडद्याआड गेल्याचे ऐकले आहे.

तर मंडळी, "आपण शेवटचा घोट कधी घेतला?" याबद्दल मिपाकरांचे अनुभव वाचायला आवडेल.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Jul 2012 - 1:05 am | मुक्त विहारि

सगळीच मजा आहे राव..

धागा टाकला रे टाकला , की "उपधागे" चालू होतात..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jul 2012 - 1:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमची आवडती रक्त वारूणी (सामान्यतः ही उच्चभ्रूंकडे जेवणाबरोबर असते), त्याचे न्यूट्रीशन इथे पहा. श्वेत वारूणीचे इथे पहा. आणि संत्र्याच्या रसाचे इथे पहा. त्याच संस्थळावर कोक, पेप्सीमधून काहीही पोषण (कॅलर्‍या वगळता) होत नाही असं लिहीलेलं आहे. (कॅफीन फ्री, डाएट ड्रिंकांतून फक्त कार्सिनोजेन्स मिळतात. कॅफीन नसल्यामुळे साधी झोप किंवा मोठा हँगोव्हरही उडत नाहीत.)

कॅलरींचे प्रमाण संत्र्याच्या रसात अधिक आहे, रक्त आणि श्वेत वारूणीच्या प्रमाणाच्या जवळजवळ दुप्पट. संत्रारसातून अ आणि क जीवनसत्त्वं मिळतात जे वारूणीतून अजिबात मिळत नाही. वारूणींमधेही कॅल्सियम आणि लोह मिळतं (रक्त वारूणीतून किंचित जास्त). थोडक्यात काही जीवनसत्त्व मिळतात या बदल्यात संत्रारस जाडा बनवतो.

थोडक्यात माहिती मिळवूनही आम्ही आमच्या रक्तवारूणीत आनंदी आहोत. आमच्याकडे अज्ञानात (पक्षी: माहितीच्या अभावात) आनंद नाही.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 1:20 am | श्रीरंग_जोशी

अरे वा प्रथमच याबाबत वाचतोय, पूर्वी कधी गरजच पडली नाही म्हणा.

बरेच अमेरिकानो लोक तब्येतीने खातात पितात अन नंतर लठ्ठपणा आटोक्यात ठेवण्यासाठी दिवसातून केव्हाही जॉगिंग करत सुटतात ;-).

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jul 2012 - 1:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्यासारखे काही दुर्दैवी जीव हवा खाऊन बसले तरीही जाडे होतात. नंतर हा माज उतरवण्यासाठी चालू पडतात.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 1:38 am | श्रीरंग_जोशी

अन आमच्याहीसारखे काही दुर्दैवी जीव - बकासुरासारखे खाऊन व कुंभकर्णासारखे निद्रादेवीची आराधना करूनही अंगात भरत नव्हते.

अखेर अमेरिकन हवेचाच काय तो गुण लागला अन आज जरा बरी अवस्था आहे ;-).

"खाद बोकडाची अन कळा माकडाची." ;-)

आता धाग्याबद्दल

आचारी's picture

2 Jul 2012 - 12:29 pm | आचारी

लई भारी!!

नेत्रेश's picture

3 Jul 2012 - 8:35 pm | नेत्रेश

> कॅलरींचे प्रमाण संत्र्याच्या रसात अधिक आहे, रक्त आणि श्वेत वारूणीच्या प्रमाणाच्या जवळजवळ दुप्पट

तुम्हीच दीलेल्या दुव्यानुसार रक्त आणि श्वेत वारुणीतील कॅलरी संत्र्याच्या रसापेक्षा दुप्पट आहेत.

5 Fl Oz संत्र्याच्या रसात फक्त ७० कॅलरीज आहेत. पण तेवढ्याच रक्त आणि श्वेत वारुणीत १२५ कॅलरीज आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2012 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी

लठ्ठपणा वाढू नये म्हणून प्रत्येक गोष्ट नॉन फॅट किंवा लो फॅट घ्यावी लागते आजकाल. मग ते दही असो वा दूध.
तसेच लो कॅलरी स्वीटनर, डायट कोक वगैरे...

शिल्पा ब's picture

2 Jul 2012 - 1:42 am | शिल्पा ब

अजुन काही उपविषय :
किती वेळा दारु सोडली?
एका वेळेस किती ग्लास दारु घेता?
कोणती दारु किती प्रमाणात घेता? कोणाबरोबर का एकटेच?
लोकांना घरी बोलावल्यावर जेवणात वाईन नाही दिली तर वाईट इंप्रेशन पडते का? कारण काय?
हुच्चभ्रु लोकांनी दारु पिणे अन सामान्यांनी दारु पिणे यात नेमका फरक काय?

झालंच तर : सुरुवात ३० मीली. ने का एकदम पटीयाला ?

जेनी...'s picture

2 Jul 2012 - 10:29 am | जेनी...

:D

:P

कुंदन's picture

2 Jul 2012 - 7:20 pm | कुंदन

>>>किती वेळा दारु सोडली?
एका वेळेस किती ग्लास दारु घेता?

किती वेळा जिलबी खाल्ली??
एका वेळेस किती जिलबी खाउ शकता ?

सूड's picture

4 Jul 2012 - 7:57 am | सूड

'एकच जिलबी किती वेळा खाऊ शकता ?'

प्रभाकर पेठकर's picture

2 Jul 2012 - 1:42 am | प्रभाकर पेठकर

अजून जीवंत आहे तेंव्हा 'शेवटच्या घोटाबद्दल' उगाच खोटारडेपणे कसे लिहू?

मुलाला सांगून ठेवीन, माझ्या मृत्यू पश्चात, वेळ नोंदवून ठेव आणि हा धागा तेंव्हा खोल गेला असेल तर वर उचकटून त्यावर 'ती' वेळ लिहून ठेव.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 1:48 am | श्रीरंग_जोशी

सत्यमेव जयते मध्ये काही लोकांनी १० वर्षे किंवा २१ वर्षांपूर्वी आजवरचा शेवटचा घोट घेतल्याचे सांगितले.
हेच प्रमाण महिने, आठवडे किंवा दिवस या प्रमाणातही सांगता येईलच की.

'सत्यमेव जयते' मध्ये सर्वजणं 'सत्य'च बोलतात असा भाबडा विचार मी करत नाही. जरी (आज) बोलत असले तरी उद्या किंवा भविष्यात तीच माणसे काय करतील ह्यावर कोणी नियंत्रण ठेवू शकत नाही. भविष्यात त्यातील एखादा कोणी प्यायलाच तर तो काय पुन्हा वाहिनीवर येऊन सांगणार आहे की, 'मी मागे शेवटचा घोट म्हणालो होतो पण आज एक घोट दारू घेतली आणि आता हा घोट शेवटचा मानावा'.

एखादा असेलही सत्यवचनी, मनाने खंबीर जो शेवटपर्यंत त्याचा शब्द पाळेल. पण, मी तेवढा खंबीर नाही. त्यामुळे माझा खोटारडेपणा लवकरच उघडकीस येईल. मग कशाला खोटारडेपणा करा? नाही का?

आनंदी गोपाळ's picture

2 Jul 2012 - 1:50 am | आनंदी गोपाळ

कावळ्याच्या रुपाने 'शिवण्या'साठी वसूल केलेली क्वार्टर?
तिथे मस्णात 'वाहिलेली' चिंटी?
यांचे टाय्मिंग लिव्ले पाहिजे ब्वा!
आन पुनर्जन्म झाला तं? आदिवासी (चुकलो! वनवासी) लोकांत बारशालाच मोहाची दारू ओठाला लाव्तात म्हणे ;)
(पुढील जन्माच्या टायमिंगाच्या चिंतेत कर्मविपाक आनंदी) गोपाळ

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 2:24 am | श्रीरंग_जोशी

धरणे सोडणे अढळ सत्य हे,
नियम हा अपेयपानाचा...

आमची वाहिनी सह्याद्री वाहिनी वरील जन्म-मृत्यू नोंदणीकरणाबद्दलच्या जनहितार्थ जाहिरातीवरून साभार...

अर्धवटराव's picture

3 Jul 2012 - 4:38 am | अर्धवटराव

>>कावळ्याच्या रुपाने 'शिवण्या'साठी वसूल केलेली क्वार्टर?
-- कावळा शिवण्याशी क्वार्टरचा काय संबंध म्हणुन खुप विचार केला आणि मग ५ मि. हसत फुटलो =))))))

अर्धवटराव

आनंदी गोपाळ's picture

5 Jul 2012 - 9:47 pm | आनंदी गोपाळ

जोक समजवून सांगा
(सरदार) गोपाळ

त्यावरुन जोक कळण्याची टक्केवारी समजेल.

अर्धवटराव

आनंदी गोपाळ's picture

6 Jul 2012 - 12:16 pm | आनंदी गोपाळ

'प्रकाश' पडला!
(धप्प्कन आवाजही आला पडण्याचा)

मराठमोळा's picture

2 Jul 2012 - 6:49 am | मराठमोळा

चालु द्या..

दारु पिणारे पिण्याच समर्थन करत राहतील आणि फायदे सांगतील तर न पिणारे त्या विरुद्ध.. थोडक्यात काय मानवी स्वभाव आहे, आपण जे करतो ते बरोबर असते हे दाखवण्याचे. विज्ञानाचे म्हणाल तर ते पिणार्‍यांचेही नाही आणि न पिणार्‍यांचेही, कारण मनसोक्त पिणारे भरपूर निरोगी आयुष्य जगणारे पाहिलेत आणी न पिणारे अकाली जाणारे देखील आनी व्हाईस वर्सा.

प्रश्नाचं म्हणाल तर (नाना स्टाईल) वैयक्तीक प्रश्न. पास. (/नाना स्टाईल)

बाकी आमची सही सगळं काही सांगते. :)

दारु पिणारे पिण्याच समर्थन करत राहतील आणि फायदे सांगतील तर न पिणारे त्या विरुद्ध.. थोडक्यात काय मानवी स्वभाव आहे, आपण जे करतो ते बरोबर असते हे दाखवण्याचे. विज्ञानाचे म्हणाल तर ते पिणार्‍यांचेही नाही आणि न पिणार्‍यांचेही, कारण मनसोक्त पिणारे भरपूर निरोगी आयुष्य जगणारे पाहिलेत आणी न पिणारे अकाली जाणारे देखील आनी व्हाईस वर्सा.

हेच म्हणतो!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2012 - 9:32 am | अत्रुप्त आत्मा

@आपण शेवटचा घोट कधी घेतला ? >>> पहिल्याच्या नंतर ;-)

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 9:43 am | श्रीरंग_जोशी

बादवे तुमच्या विश्वात पिणे - धरणे - सोडणे हे सर्व चालत असते का हो?

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2012 - 3:01 pm | अत्रुप्त आत्मा

@पिणे - धरणे - सोडणे हे सर्व चालत असते का हो? >>> आमच्या विश्वातं(ही) असू शकतं की... नाकारलय कोणी..? मी दिलेलं (पहिलं) उत्तर सार्वत्रिक,आणी व्यावहारिक आहे... फक्त ते कळ्ळं पाहिजे. ;-)

जेनी...'s picture

2 Jul 2012 - 9:46 am | जेनी...

काय रंगा काका ..
टॉपिक नावामध्ये मेन्शनलं का नै?

कशाचा घोट ते?

आमी टॉपिकाची नावं वाचुन आत घुसणारी मंडळी ......

नाव जरा सेन्सेशनल पायजेल व्हतं .....;)

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 9:53 am | श्रीरंग_जोशी

बाळ हा धागा लहान मुलांसाठी नाय.

जेनी...'s picture

2 Jul 2012 - 9:58 am | जेनी...

/(

\(

कुंदन's picture

2 Jul 2012 - 11:22 am | कुंदन

"कशाचा घोट ते?".. म्हणजे तुला कळु नये ?
दारु चा च असणार ना , जिलबीचा थोडीच असणारे ?

चिंतामणी's picture

2 Jul 2012 - 11:57 am | चिंतामणी

:o

Facebook smileys

चिरोटा's picture

2 Jul 2012 - 10:25 am | चिरोटा

आजपासून विडंबन करणार्‍यांच्या गळ्याचा घोट घ्यायचे ठरवलेय.
खूंदन

चौकटराजा's picture

2 Jul 2012 - 10:30 am | चौकटराजा

आता हा धागा सेक्स च्या धाग्याला मागे टाकणार असे ग्रह सांगतात .

प्रभाकर पेठकर's picture

2 Jul 2012 - 10:49 am | प्रभाकर पेठकर

आता हा धागा सेक्स च्या धाग्याला मागे टाकणार असे ग्रह सांगतात .

असे वाटत नाही. कितीही ओढली तरी, 'पालीची मगर करता येत नाही.'

बेडकी आणि बैलाची उपमा माहिती होती. पण ही उपमा जास्त सयुक्तिक आहे :)

प्रभाकर पेठकर's picture

2 Jul 2012 - 11:14 am | प्रभाकर पेठकर

हा:..हा:.... हि उपमा आमच्या तरूण वयात, एखाद्या यशस्वी 'एकांकिके'चे पडेल 'नाटक' कोणी बनविले की वापरायचो.

आमच्या मित्रांना सांगण्यासाठी उपयुक्त आहे ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Jul 2012 - 12:03 pm | निनाद मुक्काम प...

बेक्कार हसतोय
पेठकर काकांचा प्रतिसाद वाचून ह्या धाग्यावर आल्याचे सार्थक झाले.
पालीची मगर
जबरा
शेवटचा घोट म्हणत असाल तर
इटली विरुद्ध हरलो तेव्हा गम मे रम ह्या उक्तीनुसार घेतला.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2012 - 3:05 pm | अत्रुप्त आत्मा

कितीही ओढली तरी, 'पालीची मगर करता येत नाही.' >>> बाप रे...! पेठकर काका,मेलो...मेलो... आय आय आय आय... बाजार उठवला पार...बाजार!

रंगराव हा धागा स्वतःच ताणुन ताणुन मोठा करणार हे नक्की ;) .....पालीची मगरच काय डायनासोर करायची ताकत आहे त्यांच्यात :crazy:

लगे रहो रंगोबा :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 10:58 pm | श्रीरंग_जोशी

काय राव उगाच गरिबाची खेचताय?

उगा एक माशी मारायची ऐपत नाही आमची अन गोष्ट करता मगरीची ;-) ?

रंगा काका आगे बढो
हम तुमारे साथेय ;)
पालिकी मगर मगर्का डायनासूर करेंगे :D

मोहनराव's picture

2 Jul 2012 - 1:48 pm | मोहनराव

असं नाय वाटत, तितकासा धागा सेक्सी नाय!

त्यातील 'चिअर्स' या अमेरिकन मालिकेतील क्लिफ क्लेविन या पात्राच्या तोंडचा एक संवाद.
" हे बघ नॉर्म त्याचं असं आहे की म्हशींचा कळप हा त्या कळपातील सर्वात हळू म्हशीच्या वेगाने पुढे सरकतो. आणि जेव्हा या कळपावर शिकारी धावा बोलतात तेव्हा हीच सर्वात हळू म्हैस शिकार बनते. या नैसर्गिक नियमामुळे असं होतं की कळपाची सर्वसाधारण गती व शारिरीक क्षमता सुधारण्यास मदत होत राहाते. तसच मानवी मेंदू हा त्यातील सर्वात हळू पेशींच्या क्षमतेप्रमाणे कार्य करतो. आपल्याला माहिती अहेच की अल्कोहोलचे अतिसेवन केले तर मेंदुच्या पेशी नाश पावतात. पण अर्थातच सर्वात हळू/अकर्यक्षम पेशी प्रथम मारल्या जातात. त्यामूळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. हेच कारण आहे की २-३ बियर प्यायल्यावर आपल्याला ताजेतवानं वाटतं :-)

अमृत

आणि जेव्हा या कळपावर शिकारी धावा बोलतात...

(मराठीचा धावा पाहून) डोळे पाणावले ;)

आनंदी गोपाळ's picture

5 Jul 2012 - 9:50 pm | आनंदी गोपाळ

हरर्र् रररररर म्हाद्येव!
बोला धावा.
सहमत!
आनं(दीऽन दीऽन) गोपाळ

म्हाद्येवाला बोलावतायसा वरडून जनू ;)

बोला धावा !!! बुधिया की जय!

(कुंतलत्वग्विच्छेदनतज्ञ) बॅटमॅन.

रमताराम's picture

6 Jul 2012 - 4:30 pm | रमताराम

कुंतलत्वग्विच्छेदनतज्ञ _/\_

आनंदी गोपाळ's picture

8 Jul 2012 - 1:14 am | आनंदी गोपाळ

अन पा य ला गू
कै तरि चुक्तंय

मला वाटले शेवटचा घोट म्हण्जे तो तुळशी पत्रासोबतचा की काय..म्हणुन न्हटलं शेवटचा घोट घेतलेल्या कोणकोणत्या भुतांच्या प्रतिक्रिया आल्यात ते तरि ढुंकुन पाहुन यावे म्हणुन धागा उघडल्या गेला.. ;)

सातबारा's picture

2 Jul 2012 - 11:46 am | सातबारा

उद्या विचाराल व्हर्जिनिटी (शेवटी एकदाची) कधी गेली. तुझ्या जिभेला काही हाड?

-३.१४

>>(शेवटी एकदाची)
म्हणजे अशी किती वेळा जाते म्हणे ?

सातबारा's picture

2 Jul 2012 - 1:06 pm | सातबारा

अशी किती वेळा जाते या बद्दल माहीती नाही अथवा तसा काही विदाही माझ्याकडे नाही.

पण काहींची जाता जात नाही, त्यांच्या दृष्टीने गेली (शेवटी एकदाची , हुश्श), असे वाचावे.
-
-
-

(प्रतिसादाच्या विडंबनाचा प्रयत्न हुकला काय ?)

जेव्हढ्या वेळा ऑपरेशन करु तेवढ्यांदा... ;)
सूडराव, गुगलून पहा.. :P

-सूर्यपुत्र.

अविनाशकुलकर्णी's picture

2 Jul 2012 - 12:09 pm | अविनाशकुलकर्णी

चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव एखादा आयुर्वेदिक काढा जसे दाडीमावलेह किंवा द्राक्षासवासारखी लागते.
====================================

श्रीरंग_जोशी's picture

3 Jul 2012 - 9:06 pm | श्रीरंग_जोशी

याच साठी टाकले होते हे वाक्य :hat:.

यन्जॉय... :beer:.

अविनाशकुलकर्णी's picture

2 Jul 2012 - 12:10 pm | अविनाशकुलकर्णी

.

दारु प्रत्यक्षात सोडणारे किंवा त्या दिशेने वारंवार प्रयत्न करणारेच "शेवटच्या" घोटाबद्दल सांगू शकतील. कारण अशा लोकांच्याच खोलवर लक्षात असतात हे दारुशी निगडीत दिवस अन तारखा..

ज्याला सोडण्याची खरंच गरज आहे, अर्थात जो अल्कोहोलिक झालेला आहे त्याला ती सोडण्याची इच्छा दोन एपिसोड्सच्या मधे तीव्रतेने होत असते पण सोडता येत नाही. हे अल्कोहोलिक व्यक्तीचं मुख्य लक्षण आहे.

दारु सोडावी अशी अधूनमधून उपटणारी इच्छा ज्याला अजिबात होत नाही, दारु सोडण्याचा ज्याचा लाँग किंवा शॉर्ट टर्म प्लॅन नाही तो अद्याप दारुड्या झालेला नाही असं निर्धोकपणे समजावं. अशा व्यक्तींना आपण शेवटची कधी प्यायली तो दिवस आणि पुन्हा कधी पिणार याची तारीख या दोन्ही आवर्जून लक्षात राहात नाहीत.

मी त्यातलाच एक.

अर्थातच दारु ही चांगली सवय नव्हे. ती आनंददायक गोष्ट आहे, अ‍ॅट इट्स ओन कॉस्ट. ते निसरड्या रस्त्यावर धावणं आहे असंही म्हणता येईल.. काहींच्या पायात चांगल्या ग्रिपचे शूज असतात तर काहींच्या पायात स्लीपर्स..

एकदा मद्य प्यायला लागलेला मनुष्य मद्यपीच. वीस वर्षापूर्वी दारु सोडलेला मनुष्य वीस वर्ष "व्यसनमुक्त"असतो. निर्व्यसनी नाही. त्याने दारु तब्बल वीस वर्षं टाळलेली असते...

प्यारे१'s picture

2 Jul 2012 - 2:18 pm | प्यारे१

>>>>दारु सोडावी अशी अधूनमधून उपटणारी इच्छा ज्याला अजिबात होत नाही, दारु सोडण्याचा ज्याचा लाँग किंवा शॉर्ट टर्म प्लॅन नाही तो अद्याप दारुड्या झालेला नाही असं निर्धोकपणे समजावं. अशा व्यक्तींना आपण शेवटची कधी प्यायली तो दिवस आणि पुन्हा कधी पिणार याची तारीख या दोन्ही आवर्जून लक्षात राहात नाहीत.

मी त्यातलाच एक.<<<

<श्रामो मोड >ह्या शेवटच्या वाक्यापर्यंत बरोबर वाटत होतं. शेवटचं वाक्य वाचल्यावर उगाचच समर्थन असावं का अशी शंका मनी दाटली. अर्थात म्हणायचं काहीच नाही पण समर्थन करण्याचं देखील काही वाटलं नाही <श्रामो मोड > ;)

हॅ हॅ..समर्थनाविषयी तुम्हाला आलेली शंका रास्त आहे..

मी (आत्तापर्यंत तरी) त्यातलाच एक,तस्मात मला शेवटच्या घोटाची तारीख लक्षात (राहात) नाही.. असं वाचावं.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Jul 2012 - 12:13 pm | निनाद मुक्काम प...

सहमत
मला एका लग्नाची ,दुसरी गोष्ट ह्या मालिकेतील आनंद लुटणे ही संज्ञा प्रचंड आवडली आहे.

तिमा's picture

2 Jul 2012 - 2:41 pm | तिमा

शेवटचा घोट ? हा विचार सुद्धा कधी मनांत आणणार नाही.

प्रदीप's picture

2 Jul 2012 - 5:40 pm | प्रदीप

'दारू पिणे हे मर्दुमकीचे लक्षण आहे, ती न पिणारे केविलवाणे' ही टोकाची भूमिका जितकी तिरस्करणीय आहे तितकीच 'मी दारू अजिब्बात पीत नाही' ह्याचा गर्व करण्याची, दुसर्‍या टोकाची भूमिका देखिल.

आपण दारू पीत नाही, ही आपली वैयक्तिक बाब आहे, त्याविषयी काही म्हणायचे नाही. पण आपणास घरी पार्टीस निमंत्रीत करून वाईन ऑफर करणार्‍यांना तुम्ही 'हुव्च्चभ्रू' असे कुत्सित संबोधन देता आहात, ते खटकले. तुम्ही त्यांना स्वतः दारू पीत नाही, असे सांगितले असतांनाही ते आग्रह करून तुम्हाला ती पिण्यास भाग पाडतात काय? (आणि असे हे एकच कुणी नव्हेत, तर तुमच्या लिखाणावरून अनेक असावेत असे दिसते)?

हाच स्वतःच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीचे ढोल वाजवणारा धागा अजूनही पुढे चालवीता येईल!

पण आपणास घरी पार्टीस निमंत्रीत करून वाईन ऑफर करणार्‍यांना तुम्ही 'हुव्च्चभ्रू' असे कुत्सित संबोधन देता आहात, ते खटकले

सहमत.. हेच जाणवलं होतं पण त्यावेळी दुर्लक्ष केलं. शिवाय त्या हुच्चभ्रूंकडची वाईन लेखक थोडीथोडी का होईना पण पितात.. तेव्हा अजिबात पीत नाही असंही नाही.. किंवा मग धड नीटसे पिण्यातली दिलखुलास मजाही नाही.. असा अवघडलेला अप्रोच वाटला. पण हलकंफुलकी सुरुवात आहे आणि मूळ मुद्दा पुढे आहे हे गृहीत धरुन पुढे वाचलं.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 5:50 pm | श्रीरंग_जोशी

आपल्या परखड प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

या धाग्याचे शीर्षक कंसात आहे याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.

प्रदीप's picture

2 Jul 2012 - 6:23 pm | प्रदीप

आहे, हे मला माहिती आहे. तरीही लेखातून जाणवणारा, कुणी दारू पिणार्‍यांविषयींचा तिरस्कार (आणी तेही तुम्हास घरी भोजनास बोलावणारे) असह्य आहे. 'त्यांनी मला दारू ऑफर केली, मी नकार दिला, व अगदी फ्रूट ज्यूस पीत राहिलो, इतर सर्व वेगवेगळ्या प्रकारची मद्ये घेत राहिले') असे काहीसे चालले असते. त्यांची 'हुच्चभ्रू' अशा शब्दांत टिंगल कशाला? तुमच्या मते हा जर विनोद असेल तर ते चुकिचे आहे, असे निदर्शनास आणू इच्छितो.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 6:33 pm | श्रीरंग_जोशी

मला तरी वाटत नाही की धाग्यात कुणाचाही तिरस्कार करण्यात आलेला आहे.

मी हुच्चभ्रू म्हंटले आहे, उच्चभ्रू नव्हे. हा शब्द मिपावर विशेष अर्थाने वापरला जातो.

तरीही आपल्या मताचा आदर करतो. यापूढेही परखड मत मांडल्यास मला मनापासून बरे वाटेल ही खात्री बाळगा.

प्रदीप's picture

2 Jul 2012 - 7:26 pm | प्रदीप

मी हुच्चभ्रू म्हंटले आहे, उच्चभ्रू नव्हे. हा शब्द मिपावर विशेष अर्थाने वापरला जातो.

'उच्चभ्रू' चे मुद्दाम डिस्टॉर्शन करून 'हुच्चभ्रू' हा शब्द बनला आहे, आणि तसे कुणासही टिंगलीच्या सुरातच म्हटले जाते, असा अर्थ मलातरी समजतो. आणि मिपावरही तो ह्याच 'विशेष अर्थाने' वापरला जातो असा माझा अंदाज आहे. ह्यापलिकडे अजून त्याचा काही सौम्य अर्थ असेल तर तो कृपया सांगावा!

तुमचा तथाकथित विनोद 'खाजरा' होता.

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 8:45 pm | श्रीरंग_जोशी

असेलही, जे काही होते ते माझ्या स्वतःच्या मित्रांबाबत. अन मैत्रीमध्ये चेष्टा मस्करी होऊ शकत नसेल तर मग ती मैत्रीच कसली? अन चेष्टा मस्करीतल्या गोष्टींवर एवढा खोलवर विचार करू नये असे मला वाटते. चु भू. द्या. घ्या.

बादवे - सर्व प्रतिसादांत एक मुद्दा दुर्लक्षित राहिलाय.

>> पण एका मराठी वर्तमानपत्राच्या प्रचारामुळे (दारू म्हणजे वाइन नाही)

काही वर्षांपूर्वी फार गाजावाजा करून राज्याचे वाइन धोरण आखण्यात आले होते. वाइनला सर्वसामान्यांनी मान्यता द्यावी यासाठीच्या प्रयत्नांत एक प्रसिद्ध मराठी वर्तमानपत्र आघाडीवर होते. वाइन वाणसामानाच्या दुकानातून विकता यावी यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू होते. यातून शेतकऱ्यांना लाभ होईल असे मलाही वाटत होते.

पण दुर्दैवाने नेहमीप्रमाणेच अंमलबजावणीत धरसोड असल्याने सगळाच बट्ट्याबोळ झाला.

मराठे's picture

2 Jul 2012 - 9:50 pm | मराठे

>>(आपण शेवटचा घोट कधी घेतला?)

हा आत्ताच संपवला तो शेवटचाच्च!

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 10:14 pm | श्रीरंग_जोशी

आपण तर मिचिगन मध्ये राहता न. हापिसात बसून चहा, किंवा कॉफी गेलाबाजार एखादे ज्युस पित असणार ... ;-)

का कुणास ठाऊक पण हा विषय निघाला की हा धागा आठवतोच. :)

श्रीरंग_जोशी's picture

2 Jul 2012 - 10:12 pm | श्रीरंग_जोशी

मी गेल्या वेळी जेव्हा वाचली होती तेव्हा ती इंग्रजी मध्ये होती.
आज प्रथमच मराठीत वाचायला मिळाली.

धन्यवाद!!

एमी's picture

3 Jul 2012 - 5:16 am | एमी

+१ हा हा हा

शेवटचा घोट घ्यायला अवकाश आहे अजून....

अभी तो रात जवाँ है प्यारे,
आख़री जाम की बात क्यूं करें
साथ में हो वो कमसिन तो,
बुढापे की बात क्यूं करे?

-ररा पुणेकरी

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jul 2012 - 6:21 pm | अत्रुप्त आत्मा

र.रा... बहुत बढिया ....! http://mimarathi.net/smile/congrats.gif

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2012 - 11:47 pm | श्रीरंग_जोशी

ररांचा रसिक प्रतिसाद!

पाटील हो's picture

26 May 2015 - 10:08 am | पाटील हो

आताशी सुरवात झालिया आणि तुम्ही शेवटच्या घोताचा विचरतय.
शेवटचा घोट शेवटीच घेणार ( कवळ्या बरोबर )