मी बोर्ड बोलतोय बोर्ड,बरेच वर्षापुर्वी एका पुढाय्रा कडुन लागलेला...बोर्ड॥ध्रु॥
त्या दिवशी जोरदार सोहळा होता,रंगवलेला शिवाजी आणि शेजारी १मावळाही होता।
हार तुरे पेढे अगदी काहिही कमी नव्हतं,पुढाय्राच्या पुढे उभी होती १फोर्डं॥
माझ्यावर काय लिहितात मजकुर,मला माहित नसतो काय?पण १दिवस उलटला की लीहीणारे म्हणतात बायबाय।
जसा रंगाचा ब्रश असतो ना,......तसच यांचं मन कोरडं॥
मी दुकानाचा असलो ना,की वाईट वाटत नाही,पण संघटनेचा असलो ना,की खटकतं।
बाजार संपताच उठुन जातात........ऊरतं मोकळं मार्केटयार्डं॥
परवाच एका कुत्र्यानी माझ्यावर शू केली,त्या निमित्तानी जमलेली धुळ जरातरी कमी झाली।
तुम्हाला अईकताना खिन्नता वाटेल,........पण लांबुन हसत होतं १ थेरडं॥
अता मला ह्या चऊकात चांगली ५०वर्ष झालीयेत,मला रंगवलेल्यांची तर पोरंही कामाला आल्येत।
त्यांच्यातल्याच एकानी चिकटवलं पर्वा...."पुढारी कसे व्हाल?"या कोर्सचं कार्ड॥
कसली समाजसुधारणा अन कसला आलाय मान?माझ्या खांबाचचं थुंकुन केलय पिकदान।
पण पुढच्याच चऊकात दिसतो डोंबाय्राचा खेळ,२मिनिटात तो शिकवतो कशी जमवायची भेळ।
............................नव्यातलं नवं देतानाही वापरावं जुनं कार्डं॥
अता समाजसुधारणा कशी होईल याची मला चिंता नाहि,निरोप घेता घेता सांगतो मीही काही।
एक दिवस भाषण अईकण्यापेक्षा.....रोज वाचा हे मनोगत फर्डं॥
पराग दिवेकर......
प्रतिक्रिया
25 May 2011 - 9:06 pm | टारझन
वाह ! सहज ... सुंदर काव्य ... ह्या विषयावर असंही काही लिहीता येऊ शकेल हे आम्हा पामरांच्या स्वप्नीही नव्हतं.. पण पराग जी दिवेकर ... ह्यांनी काय किमया साधली आहे बघा ना ..
खरं तर बोर्ड आपल्या रोजच्यापहाण्याला .. दिवसभर आपण त्याच्या आजुबाजुनं जातो , बर्याचदा बोर्ड तिथे असुनही तो आपल्यासाठी नसतोच मुळी .. त्याच्या मनी काय असतं ह्याचा कोणी विचार तरी करतं का ? त्याचं मन रुक्ष झालंय कोरडं झालंय ह्याची तुम्ही जी दखल घेतली आहे त्याबद्दल काय बोलु ?
तसं पाहिलं तर बोर्ड ही एवढी इंपॉर्टंट गोष्ट नाही.. पण तुम्ही ज्या पद्धतीने जिवंत देखावा सादर केलाय , काय सांगावं .. आम्ही तर कर्जदार झालो तुमचे.
कुत्र्याचं शु करणे , प्रसंगी शी करणे , त्याच बरोबर लोकांचंही पानं किंवा तमाखुगुटखे खाऊन पचापच थुंकणं .. काय वाटत असेल त्या बोर्डाला .. पण एक सांगुका ? हे शांतरसा ऐवजी करुणरसात असायला हवं .. कारण कविता वाचुन खाली येता येता माझ्या हृदयाला ज्या असह्य वेदना होऊ घातल्यात .. त्याने श्वास घेणं ही मुश्किल होऊन बसलंय ..
किती बरं समरस झालात तुम्ही कविता लिहीताना .. मी आज पासुन तुमच्या कवितांचा चाहता आहे .
एका आगळ्यावेगळ्या विषयावर एवढी टची कविता कशी लिहीतात हे पराग सर च जाणो.
मला तुमच्या चहात्यांच्या यादीते एक स्थाण द्या प्लिज .
खरंच .. मनापासुन आवडली कविता .. खुप खुप हृदयस्पर्षी ..
कृपया पु.क.शु
- पचाक थुंकेकर
28 Mar 2012 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा
प्र.का.टा.आ.
28 Mar 2012 - 3:58 pm | प्रचेतस
इतकं सुंदर काव्य, इतका सुंदर टार्याचा प्रतिसाद, त्याहूनही अधिक उदात्त तुमचा उपप्रतिसाद.
प्रकाटाआ का हो केलंत.
28 Mar 2012 - 4:29 pm | ५० फक्त
आता या परत पेठेत बासुंदी प्यायला मग सांगतो, बासुंदी आहे का भांग घातलेली थडाई आहे ते कळायचं की नाही.
28 Mar 2012 - 4:46 pm | अत्रुप्त आत्मा
. <<< हम पहिले से तय्यार थे,कहिसे भी आओगे ये भी जानते थे :-p
>>>>>>>>>>>>>>>>
@आता या परत पेठेत बासुंदी प्यायला मग सांगतो, बासुंदी आहे का भांग घातलेली थडाई आहे ते कळायचं की नाही. >>>
ए ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका हेहे हे हे,ए ए ए ए...
ए ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका हेहे हे हे,ए ए ए ए...
28 May 2011 - 6:27 am | गोगोल
:):):)
25 May 2011 - 9:19 pm | माझीही शॅम्पेन
धन्य झालो तुझ्या काव्य-प्रतिभेने !
तुझ्याकडे कविता करण्याचा क्रश कोर्स असेल तरी नक्की सान्ग ! :) (फी तू देणार की मला द्यावी लागेल हेही सांग )
(सगळा प्रतिसाद हलका घेणे )
25 May 2011 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा
तुम्ही प्रतिसाद हलकेच घ्यायला सांगितलाय...तेंव्हा तुम्हाला कविता येण्याचा उपायही हलकाच देतो...वर मधेच टाकलेलं "हसरं" लिंबू असं काही लिहावसं वाटलं की हलकेच स्वतःच्या तोंडात पिळावं,आणि प्यावं देखिल...हा उपाय केल्यावर हलकं वाटलं तर नक्की कळवा...तिच फी आहे...तुम्ही द्यायची...आणि हो,ते एक ह्रायलं...कवीला नको तिथे क्रश करु नका...म्हणजे तुमचा कोर्स आपोआप सुरु होईल...हलकेच...नाही का?
18 Jun 2012 - 11:44 pm | मोदक
बुवा हे तुमचे मत आहे???
डोळे पाणावले हे वाचून. ;-)
19 Jun 2012 - 12:36 am | बॅटमॅन
माझेपण ;)
19 Jun 2012 - 9:11 am | प्रचेतस
आणि माझेपण. :)
26 May 2011 - 2:11 am | अरुण मनोहर
पापड तुम्ही कुरकुरीत लिहीत जा, आम्ही कुरकुर न करता वाचत जाऊ.
-कोर्ड
26 May 2011 - 1:06 pm | अत्रुप्त आत्मा
तुम्ही कीत्ती कुरकुरीत प्रतिसाद दिलात...वाहव्वा...छान...धन्यवाद..
26 May 2011 - 2:16 pm | गणेशा
विषय छान...
मात्र कमी शब्दात जास्त आशय येवुद्या...
लिहित रहा... वाचत आहे
26 May 2011 - 2:47 pm | गणेशा
.
28 Mar 2012 - 4:19 pm | चौकटराजा
मला वाटलं एस एस सी बोर्डाची , झालंच तर एमेसीबी बोर्डाची व्यथा बिथा आहे का काय ?
प्रतिभा दाट आहे.
मस्त
भन्नाट
क्लास
वर दोन विषय सुचविले आहेत .
येउ द्या
येत रहा
28 Mar 2012 - 4:37 pm | अत्रुप्त आत्मा
@झालंच तर एमेसीबी बोर्डाची व्यथा बिथा आहे का काय ? >>> तुम्ही कशाला व्यथाबिथा बघत बसताय,तुम्ही आपले...प्रति-साद-उप-प्रतिसाद खेळत बसा
28 Mar 2012 - 7:35 pm | चौकटराजा
आयला, ईनजान झालं म्हून डब्याला येवडं खाली पघायचं ? आन परतिसादाचा डबा नसल तर इंजानला इचारतो कोन म्हंतो म्या ?
28 Mar 2012 - 4:53 pm | वपाडाव
धागा ज्या कारणासाठी बोर्डावर वर आणलाय ते काही साध्य होताना दिसत नाही....
-(खिन्न) वपाडाव
28 Mar 2012 - 5:19 pm | ५० फक्त
आता फक्त वेळ आली आहे काळ नाहि, खिन्न नका होउ.
28 Mar 2012 - 7:05 pm | सांजसंध्या
ही कविता पराग दिवेकरांची आहे का ?
या अशा विषयावर चांगलंच लिहीलंय कि..
28 Mar 2012 - 8:16 pm | प्रचेतस
हो. हो . तेच ते पराग दिवेकर. सध्या अत्रुप्त आत्म्यामध्ये रूपांतरित झालेत.
28 Mar 2012 - 8:01 pm | सोत्रि
वारलो हे वाचून! बोर्डावरची धूळ कमी झाली....आग्ग्गागागागा...
किती भला थोरला कुत्रा असावा ह्याचा विचार करता करता गतप्राण झालो :D
टार्यालाही ह्या निमित्ताने दंडवत!
- (जिलब्या रिचवणारा) सोकाजी
28 Mar 2012 - 8:15 pm | प्रचेतस
धूळ कमी होत नाय हो, उलट ओघळावर नवीन धूळ बसून अजूनच ब्येक्कार दिसतं.
18 Jun 2012 - 10:38 pm | मुक्ती
आत्मारामपंत, तुम्ही अशा सामाजिक आशयाच्या कविता लिहीत चला हो. ती मेली विडंबनं लिहिता आणि नवकवी बिचारे पळत सुटतात मग!
18 Jun 2012 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा
ठिक आहे... --^--
19 Jun 2012 - 10:24 am | ५० फक्त
कितव्यांदा वर आला म्हणायचा हा बोर्ड ? अतिक्रमणवाले पुढच्या गल्लीत गेले की लगेच वर येतो.
19 Jun 2012 - 11:03 am | प्रचेतस
अहो बोर्डच तो,
मधून मधून बाणेदारपणा दाखवत वर येणारच की तो.
22 Jun 2012 - 8:25 pm | बॅटमॅन
आपली बोली, आपला बाणा....कसे वल्लीशेठ? :P
22 Jun 2012 - 9:43 pm | प्रचेतस
मग काय तर. :)
19 Jun 2012 - 11:19 am | स्पा
:)
22 Jun 2012 - 9:40 am | नाखु
"लवासा" सारखे "अ भय " असल्याने तो कायम वर येत राहील....
तसा "साहेबांचा" आदेश च आहे....
22 Jun 2012 - 9:49 am | जेनी...
बोर्डावर लै धुळ झालिये
काय तरी करा राव ;)
:D
22 Jun 2012 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा
बालिके... तू बोर्डाशी खेळ म्हणजे धूळ कमी होइल...