आहेस तू जगी हे दाखव कधी कधी
दगडास अंतरीच्या जागव कधी कधी
होतो जरा सुखाचा वर्षाव अन पुन्हा
वठल्या मनास होते पालव कधी कधी
नुसत्या हताशतेला गोंजारसी किती?
अंगार अंतरीचा पेटव कधी कधी
का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते
तूही करून बघ ना आर्जव कधी कधी
स्वप्नांत रंगताना, पडला विसर असा
बघते सहल म्हणुन मी, वास्तव कधी कधी
मी एरवी तशीही, असतेच शांत पण
नसते विचार करती, तांडव कधी कधी!
आतूर मीच होते तुज पाहण्यास का?
आतूरतोस तूही, भासव कधी कधी!
ध्यानात ठेव 'प्राजू' हरलीस तू जरी
जेत्यापरी स्वत:ला वागव कधी कधी
-प्राजु
प्रतिक्रिया
17 Jun 2012 - 10:59 am | किसन शिंदे
नितांत सुंदर आहे गझल.
विशेषतः पहिले आणि चौथे कडवे खुप आवडले.
17 Jun 2012 - 12:43 pm | योगप्रभू
प्राजुताईंनी बहुतेक 'मिलती है जिंदगी में मुहब्बत कभी कभी' गाण्याचा पुनःप्रत्यय घेतलेला दिसतोय.
गंमत अलाहिदा. कविता सुरेख जमलीय. :)
17 Jun 2012 - 5:21 pm | संजय क्षीरसागर
वाचलं आणि लिंक उघडली, सॉरी!
17 Jun 2012 - 5:31 pm | जेनी...
सगळीच कडवी अर्थपूर्ण वाटली ,
आवडली. :)
17 Jun 2012 - 6:27 pm | मदनबाण
आतूर मीच होते तुज पाहण्यास का?
आतूरतोस तूही, भासव कधी कधी!
वाह, क्या बात कही है |
18 Jun 2012 - 9:53 am | अक्षया
छान लिहिली आहे गझल..
अर्थपूर्ण..:)
18 Jun 2012 - 10:15 am | डावखुरा
खुप मस्त ..बर्याच दिवसांनी मिपावर ..
18 Jun 2012 - 11:51 am | sneharani
मस्त!!
:)
18 Jun 2012 - 3:15 pm | वेणू
वाह प्राजु, सुंदरच...
नुसत्या हताशतेला गोंजारसी किती?
अंगार अंतरीचा पेटव कधी कधी>> अत्यंत सुंदर शेर!
का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते
तूही करून बघ ना आर्जव कधी कधी>> फारच आवडला हा, सोपा आणि थेट!
आतूर मीच होते तुज पाहण्यास का?
आतूरतोस तूही, भासव कधी कधी!>> कातील शेर झालाय!
18 Jun 2012 - 3:17 pm | प्रचेतस
छान लिहिली आहे कविता. आवडली.
19 Jun 2012 - 6:14 pm | ज्ञानोबाचे पैजार
कविता नेहमीसारखी मस्तच आहे,
आम्ही सातपुते या सिनेमातल्या "घे पाउल पुढ जरा" या गाण्याची चाल या कवितेला फिट बसते.
20 Jun 2012 - 7:28 pm | उपटसुंभ
आतूर मीच होते तुज पाहण्यास का?
आतूरतोस तूही, भासव कधी कधी!
छान..!
21 Jun 2012 - 8:34 pm | निरन्जन वहालेकर
" का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते
तूही करून बघ ना आर्जव कधी कधी "
वा ! क्या बात है ! ! खुप छान ! ! !