आहेस तू जगी हे दाखव कधी कधी..
आहेस तू जगी हे दाखव कधी कधी
दगडास अंतरीच्या जागव कधी कधी
होतो जरा सुखाचा वर्षाव अन पुन्हा
वठल्या मनास होते पालव कधी कधी
नुसत्या हताशतेला गोंजारसी किती?
अंगार अंतरीचा पेटव कधी कधी
का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते
तूही करून बघ ना आर्जव कधी कधी
स्वप्नांत रंगताना, पडला विसर असा
बघते सहल म्हणुन मी, वास्तव कधी कधी
मी एरवी तशीही, असतेच शांत पण
नसते विचार करती, तांडव कधी कधी!
आतूर मीच होते तुज पाहण्यास का?
आतूरतोस तूही, भासव कधी कधी!
ध्यानात ठेव 'प्राजू' हरलीस तू जरी
जेत्यापरी स्वत:ला वागव कधी कधी
-प्राजु
नितांत सुंदर आहे गझल. विशेषतः
सुरेख कविता...
चुकून - आहेस तू `जागी' हे दाखव कधी कधी
सगळीच कडवी अर्थपूर्ण वाटली
आतूर मीच होते तुज पाहण्यास
छान लिहिली आहे गझल..
खुप मस्त ..बर्याच दिवसांनी
मस्त
वाह प्राजु, सुंदरच... नुसत्या
छान लिहिली आहे कविता. आवडली.
कविता नेहमीसारखी मस्तच
छान..!
वा ! क्या बात है ! !