यापूर्वीच्या भाग १ मधे आपण तैल रंग आणि रोलर चा उपयोग करून खालील स्थिति गाठली होती:
आता यात दिसणारे- सुचणारे आकार स्पष्ट करत जायचे.
यासाठी ४ नंबरचा गोल ब्रश गडद तपकिरी रंगात बुडवून सुरुवात केली.
आधी काही घुमटासारखे आकार दिसले, आणि काही मंदिरे:
कुठे झाडाची खोडे, मुळे, पारंब्या...
कुठे किल्ल्याची तटबंदी, आणखी काही इमारती:
मग थोडे मध्यंतर, खान-पान, विरंगुळा:
पुन्हा कामाला सुरुवात :
किल्ल्यावर जाणार्या पायर्या, आणि काही मनुष्याकृति:
आणखी काही बारकावे : नको असलेला रंग ब्लेडने खरवडून टाकणे वा रंगाने झाकणे वगैरे:
असे करत करत शेवटी असे बनले हे चित्रः
सध्यातरी मला हे पूर्ण वाटत आहे. कदाचित पुढे कधी मी यावर आणखी काम करेनही... कुणी सांगावे?
प्रतिक्रिया
14 Jun 2012 - 4:15 am | आबा
सुरेख, शब्दच नाहीत !
खालची हिरवट छटा सोडली तर एखाद्या अरेबियन खेडेगावाचं दृष्य वाटतंय..
14 Jun 2012 - 5:56 am | स्पंदना
खुपच छान.
14 Jun 2012 - 6:00 am | नंदन
चित्र-प्रवासाचे दोन्ही भाग आवडले. वाचकांच्या दृष्टीने अतिशय वेगळा आणि सुरेख अनुभव.
15 Jun 2012 - 9:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला व्यक्तिशः पहिल्या भागाच्या शेवटी चित्र जसं सोडलं होतं तेच आवडलं. त्यामधे असणारी अमूर्तता अधिक भावली.
14 Jun 2012 - 7:33 am | कौशी
दोन्ही भाग आवडले...
14 Jun 2012 - 8:14 am | शुचि
अप्रतिम!!!!
14 Jun 2012 - 8:39 am | प्रचेतस
सुरेखच आकारलं गेलंय चित्र.
14 Jun 2012 - 10:33 am | चौकटराजा
चांदोबा त असे किल्ले . त्यातील बारकावे , लांब निमुळत्या पाउलवाटा, अक्राळ विक्राळ झाडे,
हे सारे पाहिले होते. पण ती चित्रे तैल रंगातील नव्हती. हे आपले चित्र त्या चित्रांची आठवण देते पण तैल माध्यमाचा आब काही वेगळाच त्याचा रूबाब औरच !
आपका हुनर हम कुबूल करते है आप हमारा आदाब कुबूल करिये !
14 Jun 2012 - 12:00 pm | चित्रगुप्त
चांदोबातील चित्रे मला अजूनही आवडतात.
लहानपणी बघितलेल्या त्या चित्रांचा माझ्यावर खोल वर प्रभाव पडलेला आहे.
सुदैवाने मध्यंतरी हरवलेला तो खजिना पुन्हा उपलब्ध झालेला आहे.
मराठी "चांदोबा" चे अंक (१९५२ ते २००२) इथे बघा:
http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm
18 Jun 2012 - 2:52 am | बॅटमॅन
सुप्पर डुप्पर लैक बघा चित्रगुप्तजी :) मस्स्स्त चित्र झालंय!
14 Jun 2012 - 10:43 am | प्यारे१
सुप्पर लाईक...!
14 Jun 2012 - 11:07 am | सहज
दोन भागाची ही लेखमाला वाचली. फार आवडली.
जे न देखे रवि ते देखे कवी असे ऐकले होते पण त्या पसरलेल्या रंगातुन तुम्हाला जे काय दिसले ते कोणत्या कवीकल्पनेपेक्षा वेगळे नाहीच. उत्तम.
आता काही प्रश्न
नेमका किती वेळ लागला?
१) तुमची अशी काही चित्र आधी बघितली आहेत. याचे नेमके असल्यास नाव/ वर्गीकरण काय?
२) ही स्पेशल चित्रगुप्त , सिरीज म्हणता येतील अशी आहेत का?
३) ही मागणीवरुन/ खपतात म्हणुन काढली आहेत काय? म्हणजे अनेक प्रथितयश चित्रकारांनी एक विषय घेउन त्यावर अनेक तश्या प्रकारची चित्र काढली आहेत. तुमचा हे चित्र असेच काढायचा विचार होता की आता ऑर्डर आली आहे असे चित्र काढायचे? तुमच्या मनात होते? अमुक पद्धतीचे फायनल चित्राची कल्पना आधीच होती की हळुहळू चित्र स्व:ताच स्पष्ट होत गेले हे समजुन घेतोय. म्हणजे हा विषय तुमच्या मनात बर्याच कालापासुन आहे व अजुनही मनात आलेले सर्व रंगवून झाले नाही म्हणुन पुन्हा पुन्हा...?
४) स्पेशल अमुक अमुक पद्धतीचे चित्र काढून द्या किंवा चित्रकाराच्या मनात जेव्हा जसे येईल तसे त्याने काढलेले चित्र यात नक्की फरक आहे का? असल्यास काय?
14 Jun 2012 - 1:10 pm | विसुनाना
सुरुवातीला रोलरने चढवलेले रंग तसेच पसरवण्यामागे काही प्रेरणा होती की पसरलेल्या रंगांमधून हे चित्र आपोआप तुमच्या मनात उतरले हे जाणून घ्यायचे आहे. चर्चा सुरू ठेवावी.
अंतिम चित्र उत्तम आहे हे वेगळे सांगायला नको.
16 Jun 2012 - 11:58 am | चित्रगुप्त
१. नेमका किती वेळ लागला?
प्रत्यक्ष रंगलेपन म्हटले, तर चार दिवस प्रत्येकी दोन-अडीच तास, म्हणजे सुमारे दहा तास.
सुमारे आठवडाभर हे चित्र समोर होते, जाता-येता त्याकडे बघण्यातून हळूहळू पुढे काय करायचे, हे सुचत जाते, त्या दृष्टीने एक आठवडा.
सामान्यपणे चित्रकलेचा प्रवास हा वर्णनात्मक चित्राकडून केवल वा अमूत चित्रांकडे झालेला दिसतो. मात्र माझी ही अमूर्तातून वर्णनात्मक चित्र करण्याची पद्धत शोधायला मला वीसेक वर्षे लागली. यात अनेक माध्यमात अनेक प्रयोग केले. खूपशी चित्रे बेकार झाली. शिवाय विद्यार्थीदशेपासून किल्ले, मंदिरे, घाट, जंगले, खेडी, डोंगर-दर्या, धबधबे वगैरे प्रत्यक्ष जागेवर बसून शेकडो रेखाचित्रे, पेस्टल, जलरंग वा तैलरंगात चित्रे केली गेली. या सर्वांचा एकत्रित परिणाम प्रत्येक चित्र-जन्माचे वेळी होत असतो.
२. नाव, वर्गीकरणः या चित्रांना अमूकच काही म्हणावे, असा माझा काही आग्रह नाही. मी आपला मला सुचेल्,रुचेल तशी चित्रे काढत जातो - कुणी काहीही म्हणावे. हे काम समीक्षक, विद्वान यांचे. (हे समीक्षक काहीतरी पुस्तकी पांडित्य वा विक्की-विद्वत्ता दाखवत असतात की काय, असे बरेचदा वाटते)
३. मागणी, खपणे ऑर्डर वगैरे:
ऑर्डर वगैरे प्रमाणे मी आजवर कधीच काम केलेले नाही. माझी उपजीविका ही नोकरीवर झाल्याने मला तशी वेळ कधी आली नाही, आणि गरजही वाटली नाही. तशी वृत्ती पण नाही. (नोकरीत माझे काम आधीची दहा वर्षे म्युझियम मधे मोठमोठी निसर्गचित्रे रंगवणे, असे होते. तेंव्हा फक्त अमूक विषयावर चित्र काढायचे आहे (उदा. अँटार्टिक प्रदेश, वाळवंट, इ.) एवढेच बंधन असे. बाकी पूर्ण स्वातंत्र्य होते).
मागणी, खपणे वगैरेबद्दलही असेच म्हणता येइल. आपल्याला मार्केटिंग वगैरे जमत नाही, अशी खंत सुरुवातीला मला वाटायची, पण आता वाटत नाही. कलाक्षेत्रातील कंपुबाजी, धंदेवाइकपणा, राजकारण, यापासून अलिप्त राहिल्याने माझे काही नुकसान झाले, असे मला वाटत नाही. मी आपल्या मस्तीत जगत असतो.
४. माझी अन्य प्रकारची चित्रेही खूप आहेत. हा प्रकार मला आवडतो, कारण मी केलेली भटकंती, स्केचिंग, लहानपणापासूनचे अद्भुतरम्यतेचे आकर्षण, वगैरे असावे.
या चित्राची अगदी सुरुवात केली, तेंव्हा म्हणजे दोन-तीन रंग काढून रोलर फिरवायला सुरुवात केली, तेंव्हा पुढे काय होइल, याची काहीच कल्पना नव्हती. हे एक अमूर्त वा मानवाकृती असलेले चित्र पण होऊ शकत होते. मात्र पुढे जे काही रंग-आकार-पोत इ. येत गेले, त्यातून हळूहळू मनात चित्र साकार होत गेले. त्याला प्रत्यक्ष रूप देण्यात आधीच्या सर्व अभ्यासाचा उपयोग व परिणाम झाला.
५. चित्र वा गीत-संगीत रचनेच्या बाबतीत मलासे वाटते की कलावंताच्या मनात अनेकानेक कल्पना ठासून भरलेल्या असतात. या 'बारूद' वर 'चिन्गारी' पडायचाच काय तो अवकाश असतो. कधी ही ठिणगी आंतरिक ऊर्मीने पडेल, कधी रसिकांच्या अपेक्षेमुळे, कधी पैश्यासाठी काम करायचे म्हणून, कधी सौदर्य-दर्शनाने, कधी कुणाची भव्य-निव्य निर्मिती बघून भारून गेल्याने, कधी निव्वळ सृजनशीलतेच्या झपाट्यामुळे, तर कधी आणखी काही कारणाने.
मलासे वाटते प्रश्नांची उत्तरे दिली गेली, आणखी प्रश्न असल्यास अवश्य विचारावेत.
16 Jun 2012 - 5:10 pm | सहज
होय उत्तरे मिळाली, धन्यवाद.
आता कृपया "मी चित्रकार कसा बनलो - आठवणी" किंवा "कला, कलावंत आणि आपण : जाणिजे चित्रकर्म" या तुमच्या लेखमालेतला पुढचा भाग लिहा ना. तुमच्या चित्रांबरोबर, तुमच्याकडे तुमच्या आठवणी, तुमचे म्युझीयम मधले काम, चित्रकलेतील विविध विषयांवर विवेचन हाही एक खजीना आहे. मिपाकरांवर जरा उधळा :-)
14 Jun 2012 - 11:14 am | ५० फक्त
शब्द नाहीत कौतुक करायला. खुप खुप धन्यवाद हा सगळा चित्र प्रवास इथं उलगडुन दाखवल्याबद्दल.
14 Jun 2012 - 11:34 am | ऋषिकेश
कौतूक आहेच.. माझ्याप्रमाणे असा अनुभव बहुतांश वाचकांसाठीही नवा असावा.
अनेक आभार!
बाकी सहजरावांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत मी ही आहेच!
14 Jun 2012 - 11:40 am | पियुशा
सलाम !!!!!
14 Jun 2012 - 11:50 am | विनीत संखे
ऑसम!
14 Jun 2012 - 1:08 pm | गणपा
खल्लास !!!
चित्रामागचा प्रवास फार फार आवडला.
14 Jun 2012 - 1:23 pm | प्रास
कोर्या कॅनवासचं रुपांतरण भन्नाट आहे नि चित्र खूपच सुंदर!
पहिल्या भागामध्ये निर्माण झालेल्या रंगसंगतीमधून हे असं काही साकारेल याची शक्यता शून्य होती पण कलाकाराची दृष्टी म्हणजे नेमकं काय, ते यावरून काहीसं लक्षात येतं, असं वाटतं.
वरती सहजरावांनी काही प्रश्न विचारले आहेतच त्यात थोडी माझी भर...
चित्रकाराने आधी कधीतरी पाहिलेल्या प्रतिमांचा तो काम करत असलेल्या चित्रांमधल्या आकारांच्या पूर्ततेवर किती परिणाम होतो? म्हणजे असं आहे की तुमच्या आत्ता पूर्ण केलेल्या चित्रामध्ये मला वृंदावनातल्या राजस्थानाकडल्या भागाची झाक दिसल्यासारखी वाटते. तसेच डोंगर, किल्लेसदृश्य मंदिरे, बैठी घरं आणि झाडं. शिवाय आजुबाजुचा जंगलसदृश्य हिरवट प्रदेश. तो काहीसा वरसाना, नंदग्राम जवळचा. हे प्रदेश तुम्ही नक्कीच कधीतरी पाहिले असावेत. मग हे चित्र रंगवताना त्या स्मृती कितपत चित्रकलेवर परिणाम घडवतात?
आमची उगीच जिज्ञासा.....
14 Jun 2012 - 2:29 pm | मुक्त विहारि
सुंदर...
14 Jun 2012 - 2:35 pm | स्मिता.
पहिल्या भागात अजिबात कल्पना नव्हती की फायनल चित्र असं दिसेल. कलाकाराची नजरच वेगळी!
14 Jun 2012 - 3:03 pm | बिपिन कार्यकर्ते
खल्लास! फ्लोअर्ड!! दंडवत!!!
कुठून निघालो आणि कुठच्या कुठे पोचलो! निव्वळ सुंदर प्रवास! हा इतका सुंदर अनुभव दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. _/\_
अवांतर : पायाशी खेळणारा विरंगुळा बेष्टच आहे! :)
14 Jun 2012 - 4:38 pm | प्यारे१
ऑसम...!
जबर्याच.
14 Jun 2012 - 4:41 pm | sneharani
सुंदर! वेगळाच प्रवास चित्राचा!!
:)
14 Jun 2012 - 9:25 pm | जाई.
क्लास!!!!
14 Jun 2012 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा
क्लास...क्लास...हायक्लास...!
सुरवाती पासून शेवट पर्यंत झालेल्या प्रत्येक टप्यासाठी...
फक्त....
सलाम...! सलाम...! आणी सलाम...! :-)
14 Jun 2012 - 10:22 pm | टुकुल
या भागाची वाटच पाहत होतो, कि काय चित्र साकारता तुम्ही आणी खुपच सुंदर चित्र साकारल तुम्ही. सलाम.
--टुकुल
14 Jun 2012 - 10:59 pm | अर्धवटराव
हाताने कॅन्व्हासवर आणि प्रतिभेने मनात हे चित्र कसं उतरलं असेल... मला हे सगळं अद्भूत वाटतं
खुप सुंदर.
अर्धवटराव
15 Jun 2012 - 1:30 am | सुमीत भातखंडे
.
15 Jun 2012 - 9:37 am | JAGOMOHANPYARE
छान
15 Jun 2012 - 12:18 pm | नगरीनिरंजन
छान आणि वेगळा धागा!
पाहताना किती सोपं वाटतं सगळं, पण याच्यामागे बरीच मेहनत आणि सराव दडलेला असणार याची कल्पना आहे.
एकंदरीत पांढर्या कॅनव्हासवर चित्र साकारताना पाहताना मजा आली.
15 Jun 2012 - 3:31 pm | सौरभ उप्स
खूप छान, किती सहजपणे मांडलिये हि कलाकृती आपण... सलाम...
15 Jun 2012 - 8:33 pm | शिल्पा ब
भारीच!!
15 Jun 2012 - 8:49 pm | llपुण्याचे पेशवेll
अशा कॅनव्हासवर आकार बघण्यासाठी तशी चित्रकारी नजरच पाहीजे.
15 Jun 2012 - 9:16 pm | मेघवेडा
सुरेख! मजा आली सगळा प्रवास अनुभवायला.
17 Jun 2012 - 1:43 pm | प्रभाकर पेठकर
अप्रतिम.................. बाकी काही शब्दच सुचत नाहीएत.
शाळेत असताना चित्रकलेची आवड होती पण 'एलिमेंटरी ड्रॉईंग' परीक्षेच्या पुढे काही ती जोपासली गेली नाही. शाळे नंतर काढलेली मोजकीच (२-३) पेन्सिलचित्रं आहेत पण त्यांचा दर्जा पाहता मिपावर टाकून 'कलादालन' काळवंडण्याचं धाडस कधी केलं नाही. असो.
आमची 'चित्र', 'गुप्त' ठेवणेच इष्ट.
19 Jun 2012 - 10:23 am | चित्रगुप्त
आयुष्याच्या धकाधकीत असे होते हे खरे, परंतु मलासे वाटते याखेरीज आणखी एक कारण असते.
आपण आपल्या कलेची तुलना महान कलावंतांच्या निर्मितीशी कळत - नकळत करत असतो, त्यातून एक प्रकारची निराशा येत असते. मला स्वतः ला अनेक वर्षे ती जाणवत होती.
मला 'अमेरिकन स्कूल' मधे काही काळ चित्रकला शिकवण्याचा योग आला होता. तिथे आठवड्यातून दोनदा सर्व मुलांना आरश्यात बघून 'सेल्फ पोर्ट्रेट' बनवण्याचा तास असे. याचे मला फार आश्चर्य वाटले होते. कारण हे फार अवघड असते... परंतु मुले जी चित्रे काढत, ती बघून मी चाट पडलो, कारण पोर्ट्रेट पेंटिंगचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण नसता प्रत्येक जण आपापल्या परीने स्वतःचे चित्रण अतिशय भन्नाट करत असे, आणि विशेष म्हणजे त्यात त्याचे व्यक्तिमत्व साकार झालेले असे... पुढे मोठी झाल्यावर हीच मुले तसे करू शकणार नाहीत असे वाटले, कारण तेंव्हा मग ती तुलना करू लागतील.
लहान मूल नैसर्गिक ऊर्मीने जसे नाचते, बागडते, तशी कला असावी. अशी कला करत राहिले पाहिजे.
19 Jun 2012 - 3:23 pm | प्रभाकर पेठकर
आपण आपल्या कलेची तुलना महान कलावंतांच्या निर्मितीशी कळत - नकळत करत असतो, त्यातून एक प्रकारची निराशा येत असते.
आपला मुद्दा चांगलाच आहे. ह्यावर प्रत्येक चित्रकाराने जरूर विचार करून ह्या वैचारिक सापळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठ्या चित्रकारांची चित्रे मार्गदर्शनार्थ अभ्यासावी, हतोत्साहित होण्याचा धोका टाळावा.
माझ्या बाबतीत असे काही झाले नाही. चित्रकला विषयाला महत्त्वच कमी दिलं गेलं. ह्याला माझ्या इतकेच, मला लाभलेले, चित्रकलेचे शिक्षकही जबाबदार असावेत. माझ्याहून कितीतरी पटीत सुंदर चित्रं काढणारा माझा सृजनशिल वर्गमित्र होता त्याचेही कधी विशेष कौतुक केल्याचे, प्रोत्साहन दिल्याचे, त्याच्यातून महान चित्रकार वगैरे घडविण्याचे प्रयत्न आमच्या शिक्षकांनी केल्याचे स्मरत नाही. तर अशा सांघिक निरुत्साही प्रयत्नातून माझ्यातून फक्त एक कारकून घडला आणि भारतिय चित्रकला विश्वाचं फार मोठं नुकसान झालं. असो.
18 Jun 2012 - 4:16 pm | प्रभो
मस्त!!!
19 Jun 2012 - 1:21 am | धनंजय
तुमच्याबरोबर सफर करताना मजा आली.
अशा प्रकारच्या घरा-देवळांचे गजबजलेले दृश्य तुमच्या खास शैलीतले आहे.
24 Jun 2012 - 11:49 am | मनोज श्रीनिवास जोशी
चित्रगुप्त ,
आपले लेख वाचले .खूप आवडले. चित्र समजण्यास तुमचे लिखाण उपयोगी पडणारे आहे. मी मी.पा. वर २ वेळाच आलो आहे आणि म्हणून विनंती करतो की आपले इतर लेख कसे वाचावे ते सांगा.
चित्र कलेचे हे लेक्चर -डेमो खूप आवडले. आणि कळ कृती तर खासच.
आपण चित्रकलेचा छान आनंद घेता आणि टो लेखातून आणि चित्रातून परावर्तीत होतो.
रसिकांना तर ही पर्वणीच!
मनोज.
24 Jun 2012 - 12:07 pm | विलासराव
_/\_.
27 Oct 2013 - 8:49 pm | चित्रगुप्त
नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा.
28 Oct 2013 - 12:29 pm | गजानन५९
एका सुंदर कलाकृतीचा अतिशय सुंदर प्रवास
28 Oct 2013 - 3:30 pm | प्रसाद गोडबोले
मला शिकवाल का हो चित्रकला ?
लहानपणी आमचा मामेभाऊ अप्रतिम चित्र काढायचा अन तेव्हा मला त्याचा हेवा वाटायचा ... आज तुमचा हेवा वाटतोय .
आज परत एकदा शिकायची इच्छा झालीये ... तेव्हा शिकवाल का जरा ?
28 Oct 2013 - 6:01 pm | चित्रगुप्त
अवश्य. पण कसे ? तुम्ही कुठे असता?
यापूर्वीचे चित्रकलेवरील काही लेखः
मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...
http://www.misalpav.com/node/18587
चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १)
http://www.misalpav.com/node/18741
कला, कलावंत आणि आपण : जाणिजे चित्रकर्म (भाग २)
http://www.misalpav.com/node/19482
चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी
http://www.misalpav.com/node/25414
25 Jan 2018 - 5:08 pm | चित्रगुप्त
नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा.
29 Jan 2018 - 2:48 pm | श्वेता व्यास
लाजवाब!! या लेखाशी ओळख करून दिल्याबद्दल तुमचे शतश: धन्यवाद. एका अप्रतिम कलेचा जन्मापासूनचा प्रवास अनुभवण्याचा आनंद उपभोगता आला. आपले सगळे लेख वाचत आहे. आपल्यातल्या श्रेष्ठ कलाकाराला मनापासून वंदन!
अवांतर : नातू फार गोड तर आहेच पण समंजसदेखील वाटतोय. आमची या वयाची भाचरं इतक्या शांततेत पुस्तकसुद्धा वाचू देत नाहीत, मग त्यांच्यासमोर चित्र वगैरे काढणं तर फार दूरची गोष्ट!
21 Sep 2019 - 12:50 pm | यशोधरा
सुंदर धागा.
चित्रजन्माची कथा फारच देखणी. चित्र फार फार सुंदर.
अवांतर: छोटा चित्रकार भलताच गोड आहे!
22 Sep 2019 - 11:42 pm | चांदणे संदीप
या उत्खननाबद्दल धन्यवाद यशोताई! :)
हरवून गेलो मी...
सं - दी - प