माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते

रसप's picture
रसप in जे न देखे रवी...
10 Jun 2012 - 4:50 pm

माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते
माझ्या दु:खाने माझे अंगण कधीच न्हाले होते

मी कोरडवाहू मातीमध्ये बाग फुलवला हसरा
तू फुले वेचता केवळ काटे मला मिळाले होते

क्षण एक जरासा थांब जीवना तुला न्याहळू दे ना
पाऊल तुझे अन माझे सोबत कधी न आले होते

मी डोक्यावरती छप्पर येण्यासाठी धडपड केली
अन पायाखाली जमीन येता सर्व उडाले होते

आयुष्य असावे कसे मला ही जाणिव झाली जेव्हा
तोपर्यंत 'जीतू' जीवन माझे जगून झाले होते

....रसप....
१० जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_10.html

गझल

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

10 Jun 2012 - 9:03 pm | पक पक पक

मस्त मस्त खुप छान ... :) आवड्ले :)

पण हे 'जीतू 'काय प्रकरण आहे रे भाउ...?

धन्यवाद!

गझलच्या भाषेत त्याला 'तखल्लुस' म्हणतात. कवी आपलं नाव 'तखल्लुस' म्हणून शेवटच्या शेरात गुंफतो. ह्या शेराला 'मक्ता' म्हणतात.

मी 'जीतू', 'जीत', 'जितू' असे तखल्लुस घेत असतो.

अमोल केळकर's picture

11 Jun 2012 - 11:05 am | अमोल केळकर

मस्त : शेवटचे कडवे छानच :)

अमोल केळकर

जेनी...'s picture

11 Jun 2012 - 11:20 am | जेनी...

गझलेला दिलेल नाव अतिशय आवडलं.........

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2012 - 4:19 pm | अत्रुप्त आत्मा

वा वा वा..! झकास रे एकदम. :-)

मस्त आहे गझल आवडली.
माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते
सुंदर आहे एकदम ही ओळ.

मतल्यामुळे माझ्या काही ओळी आठवल्या

सार्या उदास वाटा कापीत चाललो मी,
होऊन मेघ काळा शापीत चाललो मी

रसप's picture

12 Jun 2012 - 11:09 am | रसप

धन्यवाद!

क्षण एक जरासा थांब जीवना तुला न्याहळू दे ना
पाऊल तुझे अन माझे सोबत कधी न आले होते>> अतीव सुंदर!

मी डोक्यावरती छप्पर येण्यासाठी धडपड केली
अन पायाखाली जमीन येता सर्व उडाले होते>> अहाहा..! अप्रतीम शब्द गुंफलेत, फार आवडला हा शेर!

धन्यवाद!!

पैसा's picture

19 Jun 2012 - 5:50 pm | पैसा

काही काही ओळी फारच छान आल्या आहेत!

अरुण मनोहर's picture

20 Jun 2012 - 9:04 am | अरुण मनोहर

क्या बात है!

मदनबाण's picture

20 Jun 2012 - 9:25 am | मदनबाण

अप्रतिम !