@जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं
तुमच्यासारखी अनेक तरुण ह्या सिनेमांचे प्रमुख ग्राहक आहेत.( म्हणजे निर्मात्याच्या पैसा वसूल होण्यासाठी खारीचा वाटा उचलणारे )
बोर झाल्यावर आजूबाजूच्या जमावाला क दर्जाचे लेहून आपण मिपावर लिहितो बहुदा ह्या एका निकषावर स्वतःला उच्च अ दर्जाचे समजायचे.
व मग रावडी राठोड सारखा शिणेमा रीतसर पहायचा.
मग आमच्यावर उपकार केल्याच्या थाटात तो शिणेमा किती म्हणजे किती वाईट आहे.
ह्याबद्दल समीक्षा करायची.
तुम्ही तुमच्या सारखे अनेक जण कार्यालयात पकतात. म्हणून तुमचे मनोरंजन व्हावे ह्या शुध्द हेतूने
निर्माते अश्या टुकार शिनेमांची नित्यनियमाने निर्मिती करतात
.
सदर सिनेमातील दुहेरी नायक एक चोर दुसरा पोलीस
मग त्यांची आदलाबदली हा फोर्मुला
अजय देवगण च्या जुन्या शिणेमा दिवाने ( ज्यात नेहा पेंडसे त्याची लहान बहिण दाखवली आहे.) वरून ढापला आहे.
म्हणजे बहुदा त्या दाक्षिणात्य सिनेमाने ढापला आहे. असे नमूद करावेसे वाटते.
भिकार शिणेमा बद्दल आपण लिहिले नाही तरी तो भिकार आणि बेकार aah
माझ्या मते कोणताही सिनेमा उच्च किंवा भिकार दर्जाचा नसतो. तर प्रत्येक सिमेमा हा एका विशिष्ट प्रेक्षक वर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनविला जातो .
आजच्या काळात सिनेमे दोन गटात मोडतात.
१) तो मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन ( ह्यात तेथील महागडी खानपान सेवा ) धरून
पाहण्याजोगा
२) रस्त्यावरून सीड्या विकत घेऊन किंवा आंजा वर फुकट पाहण्यासारखा
येथे अनेकदा सुपरहिट झालेला सिनेमा एखाद्याला दुसर्या गटामध्ये पहावासा वाटू शकतो.तर अनेकदा एखाद्या व्यक्तीला एखादा पडेल सिनेमा असंख्य कारणास्तव पहिल्या गटात जाऊन पहावासा वाटतो.
अनेकदा तर मल्टीप्लेक्स जा जाऊन मिळेल तो सिनेमा पाहण्याकडे अनेकांचा कल असतो. म्हणजे एखाद्या सिनेमाचे तिकीट किंवा वेळ जुळत नसेल तर लगेच दुसरा पर्यायी सिनेमा पहिला जातो.
आता काही मिपाकरांना जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं
त्यावर मिपावर समीक्षा करावयास आवडते..
अश्या सिनेसामिक्षक मिपाकरांचे चाणाक्ष व सुद्य वाचक हे जाणून असतात कि भविष्यात एखादा टुकार किंवा फालतू सिनेमा येणार असेल तर तुम्ही तो न चुकता पाहणार.
तेही फक्त ह्याच जाणीवेने की मिपाकर मंडळींना ह्या चुकार आणि भिकार शिनेमाबद्दल आगाऊ सूचना दिली पाहिजे नाहीतर त्यांच्या वेळ व पैसा फुकट जाईल.
आता असंख्य मिपाकर आणि त्याहून जास्त मूक वाचक ह्यांचा पैसा वाचवायचा म्हणजे
तुम्हाला दरवेळी पदरमोड करून शिणेमा तोही थेटरात जाऊन पाहणे आलेच.
तुमच्या ह्या अनोख्या समाज सेवेस आमचा सादर प्रणाम
प्रतिक्रिया
7 Jun 2012 - 9:41 pm | शुचि
पॉप्कॉर्न, हॉट डॉग, लेमनेड सर्व चालेल. पिटातली जागा पकडून ठेवली आहे. चिल्लर खुर्दा उधळायला खिसा भरला आहे ;)
7 Jun 2012 - 9:54 pm | आशु जोग
यांना 'अजंठा' नावाचा मराठी सिनेमा दाखवा.
ऑस्करच्या तोडीचा आहे
8 Jun 2012 - 10:38 am | अमितसांगली
तुम्ही बघितला का सिनेमाग्रहात जाऊन?
7 Jun 2012 - 11:27 pm | संपत
दिवाने पाहिला नाही पण मुळ दाक्षिणात्य चित्रपट शत्रुघ्न सिन्हाच्या कालीचरणचा रीमेक आहे. आपण तर 'प्रतिघात' ह्या हिंदी डब वर्जनचे आणि रवी तेजा, अनुष्काचे पंखे आहोत.
8 Jun 2012 - 12:46 am | निनाद मुक्काम प...
ह्या एका फोर्मुल्यावर अनेक सिनेमे तगले
ह्याच साच्यातून अभिनेत्री केंद्रित सिनेमा
नाव आठवत नाही. पण
रेखा ( जुळ्या बहिणी )
जितेंद्र नायक बहुदा
8 Jun 2012 - 3:09 am | शकु गोवेकर
अहो मी हिन्दी सिनेमा (नवे व जुने ) पहात नाहिच
तुम च्या कोणा मिपा करांना ईंग्रजी सिनेमा बद्द्ल व त्यातल्यात्यात जुने म्ह ण्जे साधारण १९६० ते २००० पर्यंत चे बाबत माहिती पाहिजे अस् ल्यास मला लिहावे, थ्यंक्स ----
8 Jun 2012 - 5:07 am | निनाद मुक्काम प...
शकू ताई
तुम्ही हिंदी शिणेमे पाहत नाहीत. हे वाचून आपण भारतातील अल्पसंख्यांक गटातील असाव्यात अशी दाट शंका येते.
ह्या गटाला किनई हिंदी शिणेमे आवडत नाहीत की रुचत नाहीत किंवा झेपत नाही.
पण इंग्रही शिणेमे म्हणजे काय महाराजा
असा त्याचा आव असतो.
दे केन वोक आणि टोक इन इंग्लिश
अवांतर
नैतिकतेची संकल्पना आपल्याकडून समजावून घ्यायला आवडेल.
म्हणजे तुमचा बेसिक इंस्तींग काय म्हणतो ह्या संकल्पनेबद्दल
ते नैतिकतेच्या धाग्यावर कळवले तर मंडळ आभारी राहीन.
8 Jun 2012 - 5:10 am | जेनी...
आता असंख्य मिपाकर आणि त्याहून जास्त मूक वाचक ह्यांचा पैसा वाचवायचा म्हणजे
तुम्हाला दरवेळी पदरमोड करून शिणेमा तोही थेटरात जाऊन पाहणे आलेच.
तुमच्या ह्या अनोख्या समाज सेवेस आमचा सादर प्रणाम
---------------------------------------
माझाही सादर प्रणाम ....
8 Jun 2012 - 9:09 am | शकु गोवेकर
१) हिन्दी शोले - अमिताभ ,जया वगैरे १९७५ -Copied from Hollywood film- The Magnificient Seven
२) पिप ली लाईव्ह (हिन्दी ) - Copied from English film- Invitation to Sucide
३) सट्टे पे सट्टा -अमिताभ्,हेमा ई १९८२ (हिन्दि) - Copied from English film- Seven Brides for Seven Brothers
४) Action Replayy (2010) --copied from Back To Future
५)मुझ से शादी करोगी - कोपी ओफ English film- Anger Management
६) प्यार तो होना ही था -अज य देव गन्,काजल - Copied from English film (scene to scene)- The French Kiss
७) बिच्चु - बाबी देवल्,रानी मुकर्जी bichhoo is copied from a french film Leon. costumes scenes everything
८) जहर- Copied from English film - Out of Town
अशी भर् पुर मो ठी यादी आहे,हा मी फक्त ट्रेलर दाख वला आहे
अधिक माहिती साठी आंतर् जालावर ब्लोग पहा --
www.ajaysi .com
8 Jun 2012 - 1:05 pm | निनाद मुक्काम प...
शकू माउली
गुगल बुआ ला त्रास दिला तर तो सुद्धा यादी विनासायास देतो.
तुम्ही मात्र येथे पाकिस्तानी ए क्यू खान ने ( इराण ,लिबिया , उत्तर कोरिया) ह्यास अणू बॉंब बनविण्याची प्रक्रिया माहित आहे का ? व तो बनविण्याची सामुग्री हवी आहे का? अश्या थाटात आम्हास ह्या उचलेगिरीची उकल करून हवी आहे का ? असे विचारत आहात.
सल्ला
आपण परा ह्यांचे मार्गदर्शन घेतले. तर मला तुमची अनुदिनी न पाहता मी खात्रीने सांगू शकतो की त्यांच्या कडील माहितीमुळे तुमची आहे ती यादी दुप्पट होईल.
जाहीर सवाल
गुगल बुआच्या कुबड्या घेऊन फुशारक्या मारू नका
आंजा वर शोधून सापडणार नाही अशी एक उचलेगिरी ( किंवा मूळ प्रेरणा )
बीस साल बाद ( जुना ) कश्यावरून घेतला आहे
हे सांगा बरे.
@ श्रीरंग
तुम्हाला मी शिणेमा असे लिहिले ते खटकत नाही का हो ?
अहो ध चा मा करण्याची आपली फार मोठी परंपरा आहे.
9 Jun 2012 - 10:06 am | श्रीरंग_जोशी
निनादराव - तुम्ही सिनेमाला शिणेमा असे उपहासाने जाणून बुजून म्हटले असावे असे मला वाटले.
अवांतर - इतरांनी केलेल्या उच्चारांबाबत आक्षेप घेण्यास मी आजकाल चाचरतो आहे ; -).
9 Jun 2012 - 2:05 pm | निनाद मुक्काम प...
श्रीरंग राव
तुम्हाला योग्य वाटले अहो सर्व शीर्षकात उपहास आहे.
बाकी ते चाचरणे बाबत तर अगदी योग्य मत आहे.
त्याचे कसे आहे ,कोण कसे लिहितो किंवा व कसा उच्चार करतो ह्यापेक्षा कैक पटीने
महत्वाचे आहे की काय लिहित अथवा बोलत आहे.
आता बहिणाबाई लौकिक अर्थाने अशुद्ध बोलत असतील त्यात त्या निरक्षर .
पण त्यांचे विचार ,त्यांच्या ओव्यातून त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सारेच अचंबित करण्यासारखे आहे.
उद्या सिधुताई सुरेश भटांची गजल म्हणतील तेव्हा दबक्या आवाजात त्यांच्या उच्चारांची समीक्षा करणाऱ्या लोकांना तुम्ही काय म्हणाल?
तेव्हा तुमचे चाचरणे सर्वथा योग्य आहे.
8 Jun 2012 - 5:47 pm | फारएन्ड
पण कल्पना घेऊन त्याचे भारतीयीकरण/ मराठीकरण करून बनवलेले चित्रपट कधी कधी मूळ चित्रपटापेक्षा सरस झालेत. सत्ते पे सत्ता ची मजा सेव्हन ब्राईडस.. ला नाहीच. अगं बाई अरेच्चा व्हॉट वीमेन वाँट पेक्षाही धमाल आहे. कायद्याचं बोला हा माय कझिन विनी इतका नसला तरी बीयर गाल यायच्या आधीच्या मकरंद अनासपुरेने धमाल उडवून दिलेली आहे. हे चित्रपट न बघता तुम्ही फक्त मूळ हॉलीवूड वालेच बघितलेत काहीतरी मिस करत आहात हे नक्की.
आणि हॉलीवूडचे सुद्धा बरेच इतर कोठूनतरी कल्पना घेऊन बनवलेले असतातच.
आणि शोलेचे उदाहरण तुम्ही दिलेले आहे. एखाद्या वयस्कर व्यक्तीने चोर वगैरे वापरून मोठ्या व्हिलनचा खात्मा करणे ही कल्पना त्याहीपेक्षा प्राचीन आहे. शोले वर वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट पासून ते क्लिंट ईस्टवूड वाले वेस्टर्न्स पर्यंत अनेक चित्रपटांवरून बेतल्याचे आरोप झालेत. काही कल्पना उचलल्याही असतील पण असा कोणता हॉलीवूड चित्रपट असेल की जो पाहिल्यास शोले नाही पाहिला तरी चालेल?
8 Jun 2012 - 6:21 pm | मृत्युन्जय
+१११११
8 Jun 2012 - 6:45 pm | निनाद मुक्काम प...
रिमेक च्या बाबतीत भट्ट साहेबांचा हात कोणीही धरू शकत नाही.
त्यांचे काही प्रयत्न लोकांना आवडले नाही.
पण दिल हे के मानता नही हा कळस साध्य
आपल्या मुलीला नर्गिस किंवा त्या आधी साकार केलेल्या अजरामर अभिनेत्री ची भूमिका देणे व सिनेमा क्लासेस व मासेस च्या गळी उतरवणे निव्वळ अफलातून
त्या काळात अमीर स्टार असला तरी परिपूर्ण हा शिक्का अजून त्यांच्या माथी बसला नव्हता. पण त्याच्या जोडीने रघु जेटली ने धमाल उडवून दिली होती.
भट साहेबांची पाकिस्तानी धार्जिणी वृत्ती जरी नापसंद असली तरी त्यांच्या शेत्रातील त्यांची कामगिरी अव्वल आहे.
आणि काही भारतीय सिनेमे व त्यातील अभिनय हा मूळ इंग्रजी सिनेमाहून अधिक उत्तम झाला आहे.
उदा रिबेका ह्या सिनेमातील दाई चे पात्रांच्या अभिनयापेक्षा
कोहरा मध्ये ललिता पवार चा अभिनय उच्च कोटीचा आहे.
ह्याच सिनेमाच्या दिग्दर्शक बिरेन नाग ने कोहाराच्या दोन वर्ष आधी बीस साल बाद सिनेमा दिला.
8 Jun 2012 - 9:25 am | श्रीरंग_जोशी
ठ चा ट केला की हो....
9 Jun 2012 - 12:23 am | शकु गोवेकर
बीस साल बाद(१९६२) हा विश्वजीत्,वहिदा यांचा हिन्दितील चित्रपट The Hound of the Baskervilles या ईंग्रजी चित्र पटा वरुन घेत लेला आहे , माझा विशय कोप्या कर ण्याबाबत नाहि, परंतु चांगली नक्क्लल करा व जनतेला कळु द्या कि हि कुठ्ल्या ईंग्रजी फिल्म ची कोपी आहे, म्हण जे आन्तर जालाची मदत घेण्याची पाळी येणार नाहि,त्याबाबत तुम्चे प्रश्न काय आहेत ? ता.क. निनाद मु यांचा पंचतारांकित हा ब्लोग मी पाहिला,पण ओब्जेक्ट एरोर असे काहि दाखवत आहे,त्यामुळे पेज उघडु शकत नाही
9 Jun 2012 - 1:46 am | निनाद मुक्काम प...
@परंतु चांगली नक्क्लल करा
माझ्या वरील प्रतिसादात चांगली नक्कल ह्यावर खरडले आहे व त्याच्याशी सहमत आहे:
पण सध्या सिनेमा पाहणारा वर्ग झपाट्याने वाढतोय
छोट्या शहरात व गावांमध्ये तो फोवावत आहे: त्यांना टार्गेट करून हाउस फुल " सारखे( भाग एक व दोन) काढले जात आहेत:
व भाग 2ने नुकतेच १०० कोटी कमावले आहे
आता रावडीच्या सिनेमाचे प्रोमोज पाहून हा ३ इडियट किंवा विकी डोनर, उडान किंवा तोमर सिंग च्या जातकुळीतला सिनेमा नसणार ह्याची जाणीव सर्वांना असते.
गल्लाभरू सिनेमा पाहायला जायचे म्हणजे आजच्या भाषेत डोके बाजूला ठेवून सिनेमा पहायचा आणि आता त्यात दर्जा शोधायचा आणि अभिनेत्रीने अभिनय केला नाही म्हणून आवई उठवायची ह्या मागील लॉजिक कळत नाही.
हिंदी सिनेमात पुर्वी अभिनय करणारा एक वर्ग ज्यात शबाना , जया, स्मिता अश्या अभिनेत्र्या होत्या. तर परवीन , झीनत अश्या अभिनेत्र्या डोळ्यांना सुख देण्यासाठी असायच्या. आजही प्रत्येक अभिनेत्री वर एक शिक्का असतो.
अभिनय करणाऱ्या अभिनेत्र्यांचे सिनेमे पहायचे असतील तर विद्याचे पहा.
ती खर्या अर्थाने स्मिता पाटील ची वारसदार आहे. मराठी माध्यमांनी उगाच ओढून ताणून सोनाली (जेष्ठ )ला तिचा वारसदार घोषित करू नये असे वाटते.
उद्या मल्लिका च्या सिनेमाला जायचे वर तिने सिनेमात काहीच अभिनय केला नाही म्हणून कांगावा करणे कितपत योग्य आहे.
दिवटे साहेबांच्या भाषेत उगाच ताकाला जाऊन ....
बाकी खरडवहीत खरडतो.