रत्नांच्या बघ राशी झाल्या..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
5 Jun 2012 - 11:42 pm

रत्नांच्या बघ राशी झाल्या,
माझ्या काचखड्यांच्या
काटे भरल्या वाट होती ,
मखमल पायघड्यांच्या

ओले हिरवे झाले माझे,
मौसम निष्पर्णाचे
निळे जांभळे फ़ूल श्रावणी,
देही गोकर्णाचे

तुझ्यासोबती वाटा सार्‍या,
यमनामधले गाणे
घमघमणार्‍या सुरावटींशी,
नाते लोभसवाणे

रोमरोमी भिजते मीही,
हळवा श्रावण दे
ओघळते मी प्राजक्तासम,
भिजलं अंगण दे

उधाणू दे ना सागरलाटा,
तुझ्या किनार्‍यावरी
तुझी पौर्णिमा होऊन आले,
तुझ्याच मी अंबरी

-प्राजु

शृंगारकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2012 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

@तुझी पौर्णिमा होऊन आले,
तुझ्याच मी अंबरी >>> मस्त :-)
शेवट भावला.

अक्षया's picture

6 Jun 2012 - 9:47 am | अक्षया

छान आहे कविता :)

नाना चेंगट's picture

6 Jun 2012 - 3:28 pm | नाना चेंगट

प्राजुने तिचा आयडी काय वापरायला दिला आहे का कुणाला?

प्राजु या नावाला साजेशी कविता/काव्य नाही.
नीट जमले नाही... काहितरी कमी पडले आहे

नाना चेंगट's picture

6 Jun 2012 - 3:28 pm | नाना चेंगट

प्राजुने तिचा आयडी काय वापरायला दिला आहे का कुणाला?

प्राजु या नावाला साजेशी कविता/काव्य नाही.
नीट जमले नाही... काहितरी कमी पडले आहे

शैलेन्द्र's picture

6 Jun 2012 - 4:46 pm | शैलेन्द्र

"रत्नांच्या बघ राशी झाल्या,
माझ्या काचखड्यांच्या
काटे भरल्या वाट होती ,
मखमल पायघड्यांच्या"

छान.. आवडली कविता..

("काटे भरल्या वाट होती".. "वाटा" असं म्हणायच होत का?)

जेनी...'s picture

6 Jun 2012 - 7:20 pm | जेनी...

फारशी आवडली नाही ..
काही ठिकाणी तर फक्त यमक जुळवायचा प्रयत्न केलाय अस वाटलं.

राग नसावा .

पू. ले. शु .

मदनबाण's picture

7 Jun 2012 - 5:34 pm | मदनबाण

छान... :)

निरन्जन वहालेकर's picture

7 Jun 2012 - 8:12 pm | निरन्जन वहालेकर

छान ! ! ! आवडली कविता ! ! !

मृगनयनी's picture

8 Jun 2012 - 10:36 pm | मृगनयनी

प्राजु ताई!!!.. आय लव्ह यु! :)

ओले हिरवे झाले माझे,
मौसम निष्पर्णाचे
निळे जांभळे फ़ूल श्रावणी,
देही गोकर्णाचे

उधाणू दे ना सागरलाटा,
तुझ्या किनार्‍यावरी
तुझी पौर्णिमा होऊन आले,
तुझ्याच मी अंबरी

लवली... अप्रतिम!!!!!.... नशा आहे गं........

.. सूर्यास्तानंतर कातरवेळी सुंदर सन्धिप्रकाशात कोकणातल्या एखाद्या अस्पर्श सागरकिनार्‍यावर खूssssssप दिवसांनी भेटलेल्या आपल्या अतिप्रिय सख्याच्या हातात हात घालून त्याच्या खान्द्यावर डोके ठेवून ...समुद्राच्या लाटांशी स्पर्धा करू पाहणार्‍या डोळ्यांतल्या आसवांना वाट करून देताना.........नारळाच्या, केळीच्या बागांचा, सुरन्गी- जाईजुईचा मिश्र सुगन्ध नाकात भरून घेताना... ही वरची दोन कडवी खूपच्च प्रकर्षाने आठवतात....

तुझी पौर्णिमा होऊन आले... तुझ्याच मी अंबरी!!!..... सुपर्ब!!!... वाट लावते गं ही ओळ!!!.... :) आपल्या नश्वर आयुष्यानन्तरही आपले प्रेम शाश्वतच राहणार... याची खात्री वाटत राहते!! :)
थॅन्क्स प्राजु ताई!! :)