मृत्यु

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in जनातलं, मनातलं
4 Jun 2012 - 6:53 pm

मृत्यु.

जीवनातील एक सत्य.

कधी हलक्या पावलांनी दबकत दबकत येत हलकेच झडप घालणार तर सुसाट वेगाने येऊन पाचोळ्यासारखा उडवुन लावणार. कधी तो यावासा वाटते तर कधी त्याने येऊ नये असे वाटते. पण तो येणार नक्की येणार हे प्रत्येकाला ठाऊक असते. प्रश्न असतो तो फक्त कधी येणार आणि कसा येणार? मृत्यु म्हटले की अनेक कल्पना मनात दाटुन येतात. जीवनाचा शेवट. जगाचा अंत. पण नक्की तो असत्तो का? आपण मेल्यावर जग चालूच रहाणार असते. अगदी मानव वंश निर्वंश होऊन गेला, मानव प्राण्याचा अंत झाला तरी जीवन चालूच राहील. कदाचित रुप बदलेल. पण आपल्या दृष्टीने जीवन संपले असेल. आपल्याला जाणीव सुद्धा होणार नाही. सर्व सुखाच्या, दु:खाच्या संवेदना संपून गेल्या असतील. मी मी म्हणत आज आपण मी माझे असे स्वतःला बजावत असतो पण हा मी च नंतर शिल्लक रहात नाही. सर्व जाणीवा संपून जातात. मग नंतर जग चालू राहिले काय किंवा न राहिले काय?

पण मग अशी जाणीव नाहीसे होणे झोपेत सुद्धा होते. गाढ झोप ही सुद्धा सर्व जाणीवांना स्वतःमधे विलीन करुन टाकते. कशाची सुद्धा शुद्ध रहात नाही. झोप ही एक प्रकारे मृत्युचेच रुप म्हणावे का? फक्त आपण झोपेतुन परत जागे होतो. जाणीव परत येते. मी माझे ही जाणीव परत डोके वर काढते आणि जी सुख दु:ख विहिन आनंदमयी अवस्था होती ती संपून जाते. मग मृत्यु ही झोपेची एक अवस्था म्हणावी का? आनंददायी अवस्था असावी का? सांगता येत नाही. की झोपेच्या पलीकडची अवस्था? जिचे भ्रष्ट रुप झोप आहे? मग झोप हवीसी वाटणारा जीव मृत्युच्या जाणीवेने का घाबरतो?

कधी कधी फावल्या वेळात मी स्वतःच्या मृत्युनंतर जग कसे असेल याचा विचार करतो. पण स्वतःच्या जाणीवांना वगळून विचार करणे का अवघड जाते हे समजत नाही. स्व ला वगळता जगाची कल्पना करणे अवघड जाते. स्व भोवतीच सर्व जग फिरते. नातलग, मित्र, शत्रु सर्व सर्व स्व भोवतीच गिरक्या मारते. स्व ला बाजुला काढता येतच नाही. काढले तरी तटस्थपणे विचार करताच येत नाही. लप्पकन काळीज हलते आणि घशाला कोरड पडते. पाणी पिण्यासाठी हात हलतो आणि पुन्हा वास्तवाच्या जाणीवेने स्व अस्तित्व आकारात येते. बरे वाटते.

मृत्युची कल्पना करणे फार अवघड आहे. त्यापासुन वाचणे फार अवघड आहे. तरी मन पुन्हा पुन्हा मृत्युचाच विचार करते. तो यावासा वाटतो की त्याने यावे असे वाटत नाही.. नक्की सांगताच येत नाही मला काय वाटते ते...

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

4 Jun 2012 - 7:01 pm | जेनी...

वाचणे फार अवघड आहे.

मी आहे अशी जाणीव संपणे म्हणजे मृत्यू. शरीराच्या नाशापेक्षाही ही जाणिव संपणार याची भीती सर्वात मोठी आहे. आणि क्वचित्प्रसंगी का होईना ही भीती ग्रासते, यासंबंधी फारसा विचार न केल्याने या भीतीवर मात कशी करावी हे नाही कळाले. पण भीती वाटते आणि खूप वाटते हे नक्की.

जाणीव संपली त्या क्षणी मीही संपलो. मग भिती कुणाला? अन कशाची? मी आहे याची जाणीव असणे म्हणजे जीवन.

मनुष्य आपले अर्धे आयुष्य भविष्याची चिंता करण्यात घालवितो, अन उरलेले अर्धे भूतकाळात रमण्यात. जगतो केव्हा ते ठाऊक नाही. मग मरण्याची भिती कशाला?

>>जाणीव संपली त्या क्षणी मीही संपलो. मग भिती कुणाला? अन कशाची? मी आहे याची जाणीव असणे म्हणजे जीवन.

तर्कदृष्ट्या बरोबरच आहे, पण तरीही भीती वाटायची ती वाटतेच. कितीही विवेचन केल्याने यात फरक पडेल असे नै वाटत.असो.

आनंदी गोपाळ's picture

6 Jun 2012 - 12:53 am | आनंदी गोपाळ

च्या वयात दिसता..
आयुष्यात मृत्यूला सामोरे जाण्याची 'नॉर्मल' वेळ येते, तोवर पैलतीरी नेत्र लागलेले असतात, अन तुम्हाला जगण्यापेक्षा मृत्यू जवळचा वाटू लागलेला असतो.
तात्पर्य,
त्या भितीची भिती सोडून द्या.

मिड्लैफ क्रैसिस च्या वयात नै हो, चांगला विशीतला युवक है मी :) जगण्यावर मस्त प्रेम है आपलं! बाकी माझ्या 'प्रौढ' विचारांवरून काढलेला हा निष्कर्ष पाहून डोळे पाणावले ;)

तुम्ही म्हणता तसे होत असेलही, त्या त्या वयात गेल्यावर कळेलच अशी आशा आहे.

एक छोटीशी दुरुस्ती: मला भीती वाटते, भीतीची भीती (इन्सेप्शन ;)) नव्हे :)

निखल्या .... :D

तु लैच प्रौड का प्रौढ तसल कै तरि होत चाललायस बर का..
लक्ष ठेव बर का ....

बर का ...... :P

बॅटमॅन's picture

7 Jun 2012 - 11:15 am | बॅटमॅन

ठेवतो हां लक्ष पूजातै ;) पण लक्षात आले की

"माझ्या प्रतिसादांवरून माझ्या वयाचा पत्ताच लागत नै मुळी!!" ;)

कवितानागेश's picture

7 Jun 2012 - 12:10 pm | कवितानागेश

फक्त राहत्या शहराचा पत्ता लागतोय! ;)

कळ्ळं बरं छुपे संपादक कोण ते :P

आनंदी गोपाळ's picture

8 Jun 2012 - 9:17 pm | आनंदी गोपाळ

त्या तै तुम्हाला निख्ल्या म्हण्ल्यात!
आन तुम्चं नांव वटवागूळ म्यान!

ते निखिल वाग्ळे तर न्हैत ना तुम्ही? =))

(सुतावरून सदेह स्वर्गात जाऊन आनंदी झालेला,) गोपाळ

बॅटमॅन's picture

9 Jun 2012 - 1:23 am | बॅटमॅन

आग्दी बरोबर बगा!!! म्हंजे म्या है वटवागूळ म्यान, म्हंजे दिवसभर जनु कै 'म्यान' असनारे अन रात्री सुटनारे वागूळ, किंवा वटवट कर्नारे वागुळ. आता निखिल वागळे कस्ली मर्नाची वटवट कर्तात ते तर म्हैतीच है तुम्हाला, त्यामुळे त्यामुळे "निखिल वट वागळे" अस्ले नाव लै लै समर्पक होईल बगा :P आमाला नस्लं तरिबी तेंना ;)

Nile's picture

9 Jun 2012 - 1:32 am | Nile

म्हंजे दिवसभर जनु कै 'म्यान' असनारे अन रात्री सुटनारे वागूळ,

कृपया असले अश्लील प्रतिसाद देऊ नयेत!

;-)

बॅटमॅन's picture

9 Jun 2012 - 2:16 am | बॅटमॅन

ऐला हा तर श्लेषात श्लेष झाला!!!! माझा इंटेंडेड श्लेष वेगळा आन त्यात परत तुमी अजून वेगळा श्लेष काढलात!! इन्सेप्शनल!! ;)

बाकी अज्याबात अनवांतरः

शंभरी भरली हो ऽ ऽ ऽ ऽ(शीर्षकाला कस्लं सम्मर्पक है नै का )

अंधश्रद्धेबद्दल परत कोणीतरी कोरडे ओढेल - पण शंकराचे कवच रोज म्हणावे तर अपमृत्यूभय नाहीसे होते असे ऐकीवात आहे. मी तरी म्हणते.

अपमृत्यू २ कारणांनी नकोसा वाटतो - स्वतःला वेदनामय मृत्यू नको आणि मुख्य म्हणजे आपल्या जवळपासच्या लोकांना ते पहावयास लागू नये, भोगावयास लागू नये.
________________

अवांतर -

विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम|
वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा
महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६||

महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो. इंद्र त्याच्या समस्त देवगणांसमवेत या संहार समयी डोळे मीटतो. परंतु हे सती अशा महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो.

*कवीने पार्वतीच्या सौभाग्याची स्तुती वरील कडव्यात गायली आहे.

अवांतरः समर्थ रामदासांची एक ओवी यावरून आठवली:

ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | यांसी निर्मी जो थोर |
तो ओळखावा सर्वेश्वर | नाना यत्नें ||

अपमृत्यू २ कारणांनी नकोसा वाटतो - स्वतःला वेदनामय मृत्यू नको आणि मुख्य म्हणजे आपल्या जवळपासच्या लोकांना ते पहावयास लागू नये, भोगावयास लागू नये.

सहमत आहे.

चैतन्य दीक्षित's picture

5 Jun 2012 - 5:26 pm | चैतन्य दीक्षित

शिखरिणी वृत्तातला अत्युत्तम श्लोक वाचायला मिळाला. बरे वाटले.

चित्रगुप्त's picture

8 Jun 2012 - 11:19 pm | चित्रगुप्त

.....अपमृत्यूभय नाहीसे होते ....
म्हणजे आपला मृत्यु हा 'अपमृत्यू' होईल, ही भिती वाटेनाशी होते, की प्रत्यक्षात 'अपमृत्यू' होणे टळते ?

म्रुत्युची कल्पना जिवंत असताना करण म्हनजे , जिवंत असतानाच त्यातले अनमोल क्षण काळजीने ,भितीने ग्रासुन टाकणे
अस वाटतं .म्रुत्युची भिती नैसर्गिक आहे .ती नैसर्गिकरित्या वाटायची तिथे वाटतेच ,मग मुद्दामहुन ते विचार डोक्यात आणन्यात काय अर्थ आहे ?

( कदाचित जे मांडायचय ते नीट मांडता आल कि नाहि माहित नाहि ,पण भिती वाटते म्रुत्युची एवढ खरं )

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jun 2012 - 7:22 pm | परिकथेतील राजकुमार

नान्या आजकाल का बाबा असे वैचारीक कुंथायला लागला आहेस ?

तुझा लेख असला तरी वाचलेला नाही. असल्या गोष्टींवरती वाचायला आवडत नाही.

बाकी ह्या धाग्यावरची ही कमेंट तुला भंकस तर वाटली नाही ना ?

कवितानागेश's picture

4 Jun 2012 - 7:31 pm | कवितानागेश

NDE वाचले तरी भिती जाईल मृत्युची.

माऊ मी NDE खूप वाचले आहेत पण ते मरतेकाळी, मेंदूला रक्तस्त्राव कमी झाल्याने होतात की काय अशी शंका येते ग.

शिल्पा ब's picture

4 Jun 2012 - 9:57 pm | शिल्पा ब

आता ही एन डी इ काय भानगड आहे?

अर्धवटराव's picture

4 Jun 2012 - 11:08 pm | अर्धवटराव

मी पण आताच गुगलुन बघितलं :D

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

5 Jun 2012 - 12:11 am | शिल्पा ब

असं होय!
मग पुण्यात राहणार्‍यांनी पीएमटी तुन प्रवास करावा अन मम्हईवाल्यांनी गर्दीच्या वेळी लोकलमधुन...जगला वाचलात तर पुन्हा भिती म्हणुन वाटायची नाही.

बाकीच्या शहरातील लोकांनी आपापल्या जागा निवडाव्यात.

अर्धवटराव's picture

5 Jun 2012 - 12:32 am | अर्धवटराव

इतकी सर्कस करायची देखील गरज नाहि... मिपावरचे काहि उद्बोधक धागे आणि त्यातल्या काहि खास जीवघेण्या प्रतिक्रीया आठवल्या तरी काम झाले..

अर्धवटराव

कवितानागेश's picture

5 Jun 2012 - 12:38 am | कवितानागेश

मला मृत्यूची नाही, पण पीएमटीची भिती आहे!

मला माझ्या बॉसची लई भिती वाटते . :(

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2012 - 12:55 am | संजय क्षीरसागर

एक झटक्यात सगळे प्रश्न संपतील!

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2012 - 12:58 am | पिवळा डांबिस

पण जर बॉसच बाई असेल तर?
:)

माझी बॉस बाई आहे . :-o
मग आत्ता काय करायचं :(

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2012 - 1:35 am | संजय क्षीरसागर

आपण कामात परफेक्ट असू तर कुणाची भीती वाटत नाही उलट सगळे आपल्याला वचकून असतात

जेनी...'s picture

5 Jun 2012 - 1:37 am | जेनी...

इथेच तर घोडं मार खातं आमचं :(

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2012 - 1:44 am | संजय क्षीरसागर

म्हणजे भीती बॉसची नाही, कामात चूक होईल ही आहे.

कोणतही काम इंटरेस्ट घेतला तर अवघड नाही, जे कामात निष्णात आहेत त्यांच्याकडून एकेक गोष्ट समजावून घ्यायची आणि दोनदा स्वतः करून पाहिली की तिसर्‍यांदा एखाद्या सराईतासारखी जमतेच!

जेनी...'s picture

5 Jun 2012 - 1:48 am | जेनी...

ओक्के :)

संपत's picture

5 Jun 2012 - 4:55 pm | संपत

आमचा बॉस म्हणतो Do It Right First Time! मग दोन वेळा कसे करुन बघणार?

चैतन्य दीक्षित's picture

6 Jun 2012 - 8:35 am | चैतन्य दीक्षित

>जे कामात निष्णात आहेत त्यांच्याकडून एकेक गोष्ट समजावून घ्यायची आणि दोनदा स्वतः करून पाहिली की तिसर्‍यांदा >एखाद्या सराईतासारखी जमतेच!
हे इतकं सहजसाध्य आहे?

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2012 - 10:38 am | संजय क्षीरसागर

एखादी गोष्ट शिकायला फक्त तीन गोष्टी लागतात : एक- तुमचा इंटरेस्ट; दोन- निष्णात मार्गदर्शक आणि तीन- दोनदा त्या स्किलसेटवर स्वतः काम करणं! तिसर्‍या वेळी ती गोष्ट तुम्हाला येतेच!

कर्ण's picture

4 Jun 2012 - 9:18 pm | कर्ण

नाना, कसं मनातला बोललात.

पैसा's picture

4 Jun 2012 - 9:45 pm | पैसा

भा रा तांब्यांनी फार पूर्वीच उत्तर दिलंय

घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !

फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?

मना, वृथा का भिशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी

याशिवाय "नववधू प्रिया मी बावरते"असो. की "जन पळभर म्हणतिल हाय हाय" असो भा. रा. तांब्यांनी मृत्यूचा विचार कवितांमधे बरेचदा मांडला आहे. पण या कविता त्मृत्यूचा सकारात्मक विचार करतात.

अगदी लहान मुलांनाही मृत्यूची भीती वाटतेच, पण मृत्यूचा विचार कर करून उद्याचं मरण आज ओढवून घेण्यापेक्षा सुदैवाने जो "आज" मिळालाय तोच पूर्ण जगावा ना!

माझ लक्ष कायम डेस्टीनेशनला पोहचण्यावर असायच आणि मी ते भरभर गाठायचा प्रयत्न करीत असे. ते ठिकाण आल की मग आता पुढे काय ? संपला ट्रेक मज्जाच गेली,आणि डेस्टीनेशनच्या नादात प्रवासाचा पण आनंद घेतला नाही. हे लक्षात आल्यावर.... ********////@@@$$$%%%*****
नंतर काही वर्षांनी विषेशत: हिमालयच्या आसपासच्या ट्रेक्सच्या दरम्यान एका गोष्टीची जाणिव झाली की, डेस्टीनेशनला पोहचण्या पेक्षा दर्म्यानचा प्रवासच नेहमी आनंद देऊन गेला....... आता हीच थिअरी आयुष्यात देखिल आमलात आणल्या पासुन लै मजा लुटतोय प्रवासाची.
नानाचेंगट यांना प्रवासाच्या लक्षलक्ष शुभेच्छा

संजय क्षीरसागर's picture

4 Jun 2012 - 11:18 pm | संजय क्षीरसागर

मिळेल तेथे पाणी प्यालो,
जुळेल तेथे खूण जुळवली
तरीही होतो तसाच उरलो

बा. सी. मर्ढेकर

आपण काहीही केलं तरी तसेच उरतो, आपण अक्षय आहोत हे अध्यात्माचं सारसूत्रं आहे आणि ते फक्त माणसालाच समजू शकतं अशी वस्तुस्थिती आहे.

माणसाला ते न समजण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची सगळ्या वरची पकड! जे दिसेल ते, हाती लागेल ते तो पकडून ठेवायचा प्रयत्न करतो आणि मग ती पकड प्रथम मनावर आणि मग शरीरावर काम करते. या पकडण्याच्या मनोवृत्तीचा शरीरावर परिणाम म्हणजे एक एक अवयव आकसत जातो, शरीरात टॉक्सिन्स जमा होतात आणि मग पूर्ण शरीर एक वेदना होतं,... मृत्यूची सगळी मजाच त्यामुळे निघून जाते.

अस्तित्वात एकूण पाच निसर्ग निर्मित आनंद आहेत, म्हणजे ते मिळवण्यासाठी तुम्हाला काहीही शिकायला लागत नाही. एक, भोजन; दोन, विहार; तीन, विश्रांती; चार, प्रणय आणि पाच, उत्सर्ग. हे पाचही आनंद एकमेकांवर अवलंबून आहेत म्हणजे उत्सर्ग आणि भोजन एकमेकांशी निगडित आहेत, विहार आणि विश्रांती एकमेकांवर अवलंबून आहेत, प्रणय या चारही आनंदांचा परिपाक आहे आणि प्रणयाची तर सगळी मजाच देण्यात आहे.

माणसाची पकडून ठेवण्याची वृत्ती त्याला उत्सर्गाच्या आनंदापासून वंचित करते. हे सगळीकडे दिसतं, गाण्यात स्वर लावण्यापेक्षाही स्वर सोडण्याला महत्त्व आहे, पैशाचा सगळा उपयोग साठवण्यात नसून खर्च करण्यात आहे, शरीराचा उपयोग ते टिकवण्यात नसून वापरण्यात आहे, पण माणसाची पकडून ठेवण्याची सवय त्याला सोडून देण्याच्या आनंदापासून वंचित ठेवते.

तुम्ही कधी तरी हा प्रयोग करून बघा. समजा तुम्हाला तीन मजले चढून जायचे आहेत तर उत्छ्वासावर लक्ष ठेवा, श्वासावरची पकड सोडून द्या, जाणीवपूर्वक फक्त उत्छ्वास करत राहा तुम्हाला मोठा मजेशीर अनुभव येईल, तीन मजले चढून सुद्धा तुम्हाला दम लागणार नाही, उलट शारीरिक श्रमाची मजा येईल. ही उत्सर्गाची, पकड ढिली करण्याची मजा आहे!

मृत्यूविषयी माणसाला वाटणारी भीती आणि त्याचं जीवनातलं अत्यंत निषिद्ध स्थान हे माणसाच्या पकडीचं सर्वोच्च परिमाण आहे. शरीराला मृत्यू आहे हे कळण्याची क्षमता फक्त माणसात आहे, मृत्यू अनिवार्य आहे हे पण त्याला माहिती आहे तरीही तो मृत्यू नाकारतो हे आश्चर्य आहे!

माणसाच्या मृत्यू नाकारण्यामागे एक फार महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे आपल्याला समरसून जगायला मिळालेलं नाही असं त्याला नेहमी वाटत राहतं. याचं मूळ कारण फार मजेशीर आहे, जीवनात एकदा स्थैर्य आल्यावर माणूस जगण्यावरची पकड अशी काही घट्ट करतो की तो एकच दिवस पुन्हा पुन्हा जगत राहतो! याचं मानसिक कारण असं आहे की जीवन हा काही सत्तरऎंशी वर्षांचा सलग प्रवास नाही तर तो `एक दिवस अनेक वेळा' असा फिनॉमिना आहे. म्हणजे जगायला, भोगायला, काही करायला तुम्हाला रोज आणि नेहमी एकच दिवस आहे! तुम्हाला आयुष्याचा रंग बदलायचा असेल तर तुम्हाला आज आणि अगदी सरळ सरळ सांगायचं तर आता काही तरी करायला हवं. मला जर गाणं शिकायचं असेल तर आज क्लास लावायला हवा, आता त्याची चौकशी करायला हवी आणि रोज गाण्याचा पाठपुरावा करायला हवा तर एक दिवस मला गाणं येईल. जोपर्यंत माझा आज रंगीत होत नाही तो पर्यंत माझं आयुष्य रंगीत होणार नाही कारण आयुष्य हे दिवसांचा गुणाकार आहे, वर्षांची बेरीज नाही. आज जर मी समरसून जगण्यासाठी काही केलं तरच माझा उद्या जेव्हा आज होईल तेव्हा तो बदलेल असेल, नाही तर माझा उद्या नेहमी आजचीच पुनरावृत्ती असेल.

मृत्यू हा सरते शेवटी घडणारा प्रसंग नाही तो एका अफलातून जगलेल्या आयुष्याचा परमोच्च बिंदू आहे, जर आयुष्यालाच रंग नसेल तर मृत्यूही बेरंग होईल. मृत्यू हा शेवटचा उत्सर्ग आहे, प्रणयाची मजा ही केंद्रीभूत उत्सर्गामुळे आहे तर मृत्यू हा संपूर्ण शरीराचा उत्सर्ग आहे, यू इजेक्ट द होल बॉडी, दॅट इज डेथ! मृत्यू एका क्षणात तुम्हाला शरीरापासून वेगळं करतो, शरीर लयाला जातं तुम्ही जसेच्या तसे राहता. एका मृत्यूत हजारो प्रणयांची मजा आहे. जीवनावरची पकड ढिली करा तुम्हाला मृत्यूची सार्थकता कळेल!

नो हरकत!

ते उत्सर्ग वगैरे छान पण << एका मृत्यूत हजारो प्रणयांची मजा आहे. जीवनावरची पकड ढिली करा तुम्हाला मृत्यूची सार्थकता कळेल!

हे कशावरुन? का एखादा योगी बाबा भेटला तुम्हालापण?

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2012 - 12:26 am | संजय क्षीरसागर

आणि जे लिहिलय ते सगळं आयुष्यात उतरवलय, मृत्यू माझ्यासाठी अंतीम सार्थकता असेल, अर्थात त्यात काही विषेश नाही, तुम्हा सर्वांना एक वेगळा नजरीया मिळावा आणि तुमच जगणं आनंदाच व्हाव म्हणून लिहिलय, जमवा!

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2012 - 12:34 am | पिवळा डांबिस

मृत्यू हा सरते शेवटी घडणारा प्रसंग नाही तो एका अफलातून जगलेल्या आयुष्याचा परमोच्च बिंदू आहे
करेक्ट!
म्हणूनच मृत्यूची भीती बाळगायची गरज नाही....
तो तर खरा सखा, सोयरा आहे!
सगळ्या ऐहिक क्लेशांतून मुक्ती देणारा आहे!!!
आयुष्यात माणूस जर एका तरी नियर-डेथ अनुभवातून गेलेला असेल तर मग स्वतःच्या मृत्यूची भीती वाटत नाही...

बाकी , आपल्यानंतरच्या जगाचा विचारच करायचा झाला तर कवी म्हणुनच गेले आहेत,
सखे-सोयरे डोळे टिपतील,
पुन्हा आपुल्या कामी लागतील
उठतील, बसतील, हसूनि खिदळतील,
मी जाता त्या भ**चे काय जाय?
:)

सखे-सोयरे डोळे टिपतील,
पुन्हा आपुल्या कामी लागतील
उठतील, बसतील, हसूनि खिदळतील,

सर्वकाही (इतर जग) यथावकाश आपापल्या आयुष्यात सेटल होत असलं तरी मृत्यू हा त्या त्या काळापुरता अत्यंत वाईट, त्रासदायक, अत्यंत दु:खदायक असतो. मरणार्‍यासाठीही आणि आजुबाजूच्या प्रेमाच्या माणसांनाही.

दीर्घकालीन आजाराने वेदनादायक मृत्यू आला असला तर अधिकच दु:खदायक असतो.. अगदी त्या काळात जवळच्या माणसांची जीवनेच्छा आणि जगण्यातलं सौंदर्य मारुन टाकण्याइतका.

मृत्यूला सुंदर किंवा मित्र मानण्याची सध्यातरी इच्छा नाही. तो एक नकोसा कुरुप हिंस्त्र भाग आहे. विशेषत: अकाली आला तर. माझे बाबा माझ्या लहानपणी गेले. त्या प्रसंगाचा घाव गेला पण चरा पंचवीस वर्षांनी अजूनही आहे. लाईफ चेंजिंग घटना होती आणि त्यात सुंदर काही नव्हतं. प्राणांतिक तडफड समोर बघितली. नंतर आजीचं तिच्या मरणाआधी वेदनेने भेसूर ओरडणं आणि श्वासासाठी खूप दिवस धडपडणं पाहिलं. निव्वळ वेदना, मृत्यूची भीती नव्हे. अशा वेळी मृत्यूने सुटका केली म्हणून त्याला मित्र म्हणायचा हे तात्विकदृष्ट्याच ठीक.

ठीक आहे, मृत्यू निसर्गाचा एक भाग आहे. तक्रार नाही. पण त्या मृत्यूला रोमँटिक लेबलं लावायला जमत नाहीये.. जे गेले ते आनंदात दिसत नव्हते. नुसती पिळवटलेली वेदना होती.

ती म्हणजे आपण सदैव दुसर्‍याचा मृत्यू पाहून त्याविषयी कल्पना केलेलीये, स्वत:च्या मृत्यूचा विचार केला नाहीये आणि त्याचं कारण मोठं मजेशीर आहे, कुठे तरी आत आपल्याला माहितीये की `आपण मरत नाही!'

तुम्ही आता या क्षणी पाहा, आपल्याला आपण मरू असं वाटत नाही कारण मृत्यूची सतत जाणीव असती तर जगणं अशक्य झालं असतं. इतर कुणी गेलं (आणि त्यात सुद्धा आपलं!) तरच आपल्याला मृत्यूची प्रखरता जाणवते.

आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हा जोपर्यंत तुमचा अनुभव होत नाही तोपर्यंत शरीरावरची पकड सुटत नाही. शरीर हेच उपभोगाचं साधन असल्यानं, जे मनसोक्त जगले नाहीत त्यांना मृत्यूसमयी शरीर सोडवत नाही (अकाली मृत्यू अपवादात्मक स्थिती आहे आणि तो मान्य करणं हा एकमेव पर्याय उरलेल्यांना आहे). ही शरीरावरची पकड, तो रेझिस्टन्स मृत्यू वेदनादायी करतो कारण शरीर मरतं आणि आपल्याला वाटतं आपणच मरतोय!

दुसरे कसे गेले यावरून मृत्यूची सार्थकता ठरत नाही, आपण कसे जाणार यावर ती ठरते.

इतर कुणी गेलं (आणि त्यात सुद्धा आपलं!) तरच आपल्याला मृत्यूची प्रखरता जाणवते.

आणि ती सत्य असते. आभास नव्हे. म्हणून मृत्यू ही गोष्ट अ‍ॅज अ होल वाईट आहे असं म्हटलं. जो जातो त्याचा एकट्याचाच सहभाग असलेली ती घटना नसते.

ही शरीरावरची पकड, तो रेझिस्टन्स मृत्यू वेदनादायी करतो कारण शरीर मरतं आणि आपल्याला वाटतं आपणच मरतोय!

शरीरावरची पकड सोडायची म्हणजे नेमकं काय हे कॅन्सरच्या वेदनांनी तडफडणार्‍या मृत्युशय्येवरच्या माणसाला किंवा बर्न्स वॉर्डमधल्या ९५% भाजलेल्याला सांगूया का? त्याची वेदना अस्सल शारिरिक वेदना असते. शरीराची पकड सोड , तू मरत नाहीयेस, शरीर मरतंय.. इत्यादि तत्वज्ञानाने ती कमी होत असती तर मॉर्फिनचा शोध लागला नसता.

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2012 - 2:17 pm | संजय क्षीरसागर

इतर कुणी गेलं (आणि त्यात सुद्धा आपलं!) तरच आपल्याला मृत्यूची प्रखरता जाणवते.

>आणि ती सत्य असते. आभास नव्हे. म्हणून मृत्यू ही गोष्ट अ‍ॅज अ होल वाईट आहे असं म्हटलं. जो जातो त्याचा एकट्याचाच सहभाग असलेली ती घटना नसते.

= पण त्याला स्विकाराशिवाय काय पर्याय असतो? आपण मृत्यूला कितीही वाईट म्हटलं तरी परिस्थिती बदलत नाही, द ओन्ली वे टू गेट आउटाव इट इज टू अ‍ॅक्सेप्ट.

>...असती तर मॉर्फिनचा शोध लागला नसता.

= वेदनाशामक औषध आणि संपूर्ण शरीर सोडताना (मृत्यू) होणारा क्लेश यात फरक आहे. आपण शरीरापासून वेगळे आहोत हा माझा वैयक्तिक अनुभव असला तरी अनाठायी शरीरपिडनात काय हशिल आहे? दात दुखायला लागला तर मी देखील काँबीफ्लॅम घेतो.

वेदनाशामक औषधं वेदनेची जाणीव मेंदूपर्यंत पोहोचू देत नाही आणि तो वैद्यकाचा मानवतेवर उपकार आहे, वेदना असताना तुम्ही इतर गोष्टी करू शकता, ती तुमचं सगळं अवधान वेधून घेत नाही . अध्यात्म हा मानवतेवर अल्टीमेट उपकार आहे, शरीर जातय ही जाणीव (मेंदूमार्फत) `तुम्हाला' होते आणि तुम्ही शरीरावरची पकड सहजपणे सोडता कारण तुम्ही मनसोक्त जगलेले असता, जेजे शरीरानं उपभोगायचय ते उपभोगून झालेलं असतं!

ओशोंचं एक अफलातून विधान आहे `Right now when I am speaking to you, my presence has a body, at the time of death, the presence will be there but it will have no body' (From Medication to Meditation)

तुम्ही जी उदाहरणं दिलीत त्याला वैद्यकीय इलाजच हवा पण मी सजग मृत्यू विषयी सांगतोय आणि ती स्टोरी नाहीये, इट इज समथींग रियली वर्थ ट्राइंग!

सर जी, तुम्हाला म्हणायचय कि सहज मृत्युचा प्रयोग करता येतो?

अर्धवटराव

आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत, आपल्याला शरीराची `जाणीव' आहे, आपण शरीर `झालेलो' नाही याचं स्मरण मृत्यू सहज करतं.

पिवळा डांबिस's picture

6 Jun 2012 - 3:29 am | पिवळा डांबिस

शरीराची पकड सोड , तू मरत नाहीयेस, शरीर मरतंय.. इत्यादि तत्वज्ञानाने ती कमी होत असती तर मॉर्फिनचा शोध लागला नसता.
अवो गवि, तुमी सवता घाबरून कन्फूज झालाय आनि दुसर्‍याला बी कन्फूज करताय!!!
अवो "शरीराची पकड सोड , तू मरत नाहीयेस, शरीर मरतंय.. इत्यादि तत्वज्ञान" हे इस्पेश्श्यल भारतीय तत्व़ज्ञान हाये!
आनि मॉर्फिनचा शोध त्या समद्या पाखंडी फिरंग्यांनी लावला हाये!!! का ते पन आपल्याकडं हुतं रामाच्या काळांत?
:)
बाकी कदी मॉर्फिन टोचून घ्यायचा आणुभव हाये का?
आमाला हाये!!!! लई जबराट फिलींग आसतंय त्ये!!!
(त्यावर एकांदा लेख पुन्हा केंव्हातरी, पब्लिकची इंटरव्हेन्शनची नशा उतरल्यावर!!!)
:)

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jun 2012 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार

आनि मॉर्फिनचा शोध त्या समद्या पाखंडी फिरंग्यांनी लावला हाये!!! का ते पन आपल्याकडं हुतं रामाच्या काळांत?

रामाला आणि लक्ष्मणाला तेच दिले होते आणि मग बेशुद्ध करून पाताळात नेले होते.

भिमाला पण लाडवातून हेच दिले होते आणि मग तलावात बुडवले होते.

पिवळा डांबिस's picture

6 Jun 2012 - 9:23 pm | पिवळा डांबिस

रामाला आणि लक्ष्मणाला तेच दिले होते आणि मग बेशुद्ध करून पाताळात नेले होते.
भिमाला पण लाडवातून हेच दिले होते आणि मग तलावात बुडवले होते.
इथे नानाच्या धाग्याचा खफ व्हायला नको म्हणून तुमच्या खरडवहीमध्ये उत्तर देत आहे.
जिज्ञासू मिपाकरांनी पराची खव पहावी...
(चोरांनो, तुम्ही काय सोडताय?)
:)

अर्धवटराव's picture

5 Jun 2012 - 12:39 am | अर्धवटराव

मृत्युचं माहित नाहि , पण जगण्याला सुंदर बनवणारे एकदम स्वच्छ तत्वज्ञान.
अप्रतीम.

अर्धवटराव

खुप सुंदर प्रतिसाद, धन्यवाद.

संपत's picture

5 Jun 2012 - 5:01 pm | संपत

तुमचे अध्यात्मावरचे प्रतिसाद नेहमीच खुप छान असतात..

मृत्यू मध्ये घाबरण्यासारखे काय आहे. आला...........संपले. या जगातील भोग संपले.
दुसरा जन्म असेल? किंवा दुसर्‍या विष्वात जाणे असेल जे असेल ते घडेल. मृत्यू ही अशी एकच गोष्ट आहे जी निश्चीत आहे.
अवांतरः एका मृत्यूत हजारो प्रणयांची मजा आहे.
आँ......... नक्की अर्थ काय लावायचा याचा? मृत्यूचे भय वाटू नये म्हणून त्यात गम्मत आहे हे सांगायला प्रणयाचे आमिश! धन्य आहे.
दिल मे है ख्वाहीश ए जन्नत और जाहीर मे शौक ए इबादत............

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2012 - 9:35 am | संजय क्षीरसागर

>नक्की अर्थ काय लावायचा याचा?

= सगळा लेख नीट शांतपणे पुन्हा वाचला तर अर्थ कळेल, एखादं वाक्य संदर्भसोडून काढलं तर नाही समजणार, उदाहरणार्थ :

मृत्यू हा शेवटचा उत्सर्ग आहे, प्रणयाची मजा ही केंद्रीभूत उत्सर्गामुळे आहे तर मृत्यू हा संपूर्ण शरीराचा उत्सर्ग आहे, यू इजेक्ट द होल बॉडी, दॅट इज डेथ! मृत्यू एका क्षणात तुम्हाला शरीरापासून वेगळं करतो, शरीर लयाला जातं तुम्ही जसेच्या तसे राहता. एका मृत्यूत हजारो प्रणयांची मजा आहे

>मृत्यू मध्ये घाबरण्यासारखे काय आहे. आला...........संपले. या जगातील भोग संपले.

= तुम्हाला मृत्यू म्हणजे `या जगातले भोग संपले' असं वाटतय या मागची मानसिकता क्लेश दर्शवते असं वाटत नाही का?

>दिल मे है ख्वाहीश ए जन्नत और जाहीर मे शौक ए इबादत

= इसी दुनिया को जन्नत बना लिया है हमने
अब ना कोई इबादत है ना आरजू-ए-जन्नत

प्रसन्न शौचे's picture

5 Jun 2012 - 9:19 am | प्रसन्न शौचे

नाना
जीवनाचा क्षण आनन्दाचा क्षण असे मानून जीवन बघीतले तर जीवनात मॄत्युचे भय वाटू नये असे माझे मन म्हण्ते

sneharani's picture

5 Jun 2012 - 1:25 pm | sneharani

छान मुक्तक!!
बाकी सुचना खवत करेन.
:)

सस्नेह's picture

5 Jun 2012 - 2:22 pm | सस्नेह

सुन्दर वर्णन आहेमृत्युचे ..
कुणा न माहित सजा किती ते
कोठून आलो ते नच स्मरते,
सुटकेलाही मन घाबरते,
जो आला तो रमला...
मृत्यु ही तर नवीन जीवनाची सुरुवात. सध्यापेक्षा चांगल्या. उत्क्रांतीचा नियमच आहे ना, दिवसेंदिवस प्रगत जीवन!
मग घाबरायचे का ?

मृत्यु ही तर नवीन जीवनाची सुरुवात. सध्यापेक्षा चांगल्या. उत्क्रांतीचा नियमच आहे ना, दिवसेंदिवस प्रगत जीवन!

दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है..!! :)

सस्नेह's picture

5 Jun 2012 - 2:52 pm | सस्नेह

का बरं ?
Law of conservation of energy वर विश्वास नाही का तुमचा गविसाहेब ?
मृत्यूनन्तर चैतन्य दुसर्‍या रूपात (आणि वरच्या श्रेणीच्या ) रुपांतरित का नाही होणार ?

होऊ तर काहीही शकतं. त्यासाठी विश्वास ठेवण्याची गरजच नाही. आपण आख्खे शरीर अन जाणिवेसकट जर चक्क जन्माला येऊ शकतो तर मरणानंतर शिल्लक राहात असू, इतकंच नव्हे तर आणखीही अक्षरशः काहीही होऊ शकत असेल याला तत्वत: मान्यता द्यायलाच हवी पण मग,

मृत्यूनन्तर चैतन्य दुसर्‍या रूपात

हेही ओके.. पण,

(आणि वरच्या श्रेणीच्या )

रुपांतरित का नाही होणार ?

नक्की वरच्या श्रेणीच्याच का बरं ? कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या सिद्धांतात असं कुठे आहे?

सस्नेह's picture

5 Jun 2012 - 3:12 pm | सस्नेह

पण डार्विनच्या उत्क्रांतिवादात आहे ना ?
अमीबा, मग शेवाळ, मग वनस्पती, मग प्राणी..
प्राण्याचा अमीबा झालेला कुणी नाही सांगितला...

अर्धवटराव's picture

5 Jun 2012 - 9:30 pm | अर्धवटराव

उत्क्रांतीवादात मृत्युला स्थान नाहि. निसर्गाशी जुळवुन घ्यायची टेंडन्सी म्हणा, अगर कुठल्याही कारणाने जेनेटीक लेव्हलला पर्म्युटेशन-कॉम्बीनेशन म्हणा... त्यात उत्क्रांतीवादाचे बीज आहेत... तिथे मृत्युला स्थान नाहि. लॉ ओफ कन्सर्व्हेशन ऑफ एनर्जी देखील शरीराच्या बायोकॅमीकल मास वर काम करते... तिथेही मृत्युचा संबंध नाहि.

अर्धवटराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2012 - 2:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, आनंदात जगण्याचे झकास विषय काढायचे तर या नानाला मरणाचे विषय सुचतात. आमचा एक असाच मित्र आहे. घोट दोन घोट झाले, जरा डोक्याला मुंग्या यायला लागल्या, डोक्यावरुन हात फिरवला की अधून-मधून आपण मेल्यावर काय होईल असा विषय काढून उगाच गंभीर होतो आणि समारोपाला जे होईन ते होईन ते म्हणून 'भरा लवकर' म्हणतो. असो. :)

माणसाला मरणाचे भय वाटते ते जगण्यावरचे प्रेम वाढल्यावर. हे राहीलं , ते राहीलं आत्ता आत्ता तर सेटल होत आहे. आत्ताच तर पोरं मोठी व्हायला लागली आहेत. आत्ताच तर जरा बॅलेन्स पडू लागला आहे. यशा च्या चढत्या पायरीवर ही मरणाची भीती कधीतरी डोकावून जाते. किरकोळ कारणाने छातीत कळ निघाली तरी वाटतं. काही गडबड तर नै. आणि ही मरणाची भीती जावी म्हणून तर ॠषि मुनींनी चांगलं जीवन जगावं आणि अशा जीवनानंतर मोक्ष मिळतो अशी एक वाट टाकून दिली. जीवन मरणाच्या फेरीतून सुटका होते. सुटका यासाठी की जीवन जगतांना प्रचंड दुःख येतात म्हणून ही कटकटच नको पेक्षा मोक्ष बरा. किंवा माणसाचे शरीर नष्ट झाले तरी आत्मा अमर असतो, असे समजल्यामुळे मरणाचे भय वाटत नाही.

सुखानं मरु द्या असं आपण जे म्हणतो त्यात आता सर्व सुखं भोगून झाली आहेत, आता कधीही बोलावणं आलं तरी आपण तयार आहोत,असे म्हणनारे सापडतील तसेच आयुष्यात आलेल्या निराशेने, आजारी, असे लोक म्हणतात उचल देवा आता. एखाद्याचा आजार बरा होत नसला की आपण म्हणतो देवा, आता याची सुटका कर किती हा त्रास. पण, देव काही कोणाचं काही ऐकत नाही.

असो. नानू लेका, लेखनात आनंदाचे विषय घेत जा रे बाबा. :)

-दिलीप बिरुटे

सिद्धार्थ ४'s picture

6 Jun 2012 - 6:44 pm | सिद्धार्थ ४

Death is the ultimate state of LIFE

काय नानबा.. वेळ जात नाही का रे? ;)

प्यारे१'s picture

5 Jun 2012 - 3:09 pm | प्यारे१

कैलासवासी , वैकुंठवासी, बुद्धवासी, पैगंबरवासी, ख्रिस्तवासी, वाहे गुरु वासी....

आणखी काही असतं का?
नाना यायचं का?

स्वगतः च्यायचं ह्या नान्याच्या! स्वतः उभा राहून मजा बघत बसला असेल. म्हणजे खरंच 'बसला ' असेल!

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2012 - 3:16 pm | संजय क्षीरसागर

अनिवासी ... (किंवा वनवासी सुद्धा!)!

आता लेखकाचं काय म्हणणंय ते वाचायला आवडेल

मृत्यु हा परमोच्च उत्सर्ग असू शकेल, नाहीतर भ्रमिष्ट झाल्यावर किंवा अंथरूण धरलेल्या आणि बेड सोअर्स वगैरे झालेल्या अवस्थेत खंगत खंगत झालेला अटळ शेवट. या गोष्टी कुणाच्या हातात नसतात, त्यामुळे मृत्युबद्दल कल्पनाविलास करणे मला तरी निरर्थक वाटते. धन्यवाद.

विनायक प्रभू's picture

5 Jun 2012 - 4:26 pm | विनायक प्रभू

नान्या आणि डी. के. शेट ह्यांच्या वयात किती अंतर आहे ते कुणास ठाउक आहे का?

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2012 - 4:40 pm | परिकथेतील राजकुमार

बोस डी. के. ?

विनायक प्रभू's picture

5 Jun 2012 - 4:43 pm | विनायक प्रभू

नान्या दोस्त असल्यामुळे त्याला भाग म्हणता येत नाही. नाइलाज आहे.

श्रावण मोडक's picture

5 Jun 2012 - 6:08 pm | श्रावण मोडक

मेलो... ;-)

विटेकर's picture

5 Jun 2012 - 8:27 pm | विटेकर

चर्चा सत्र आवडले...!
श्री. सन्जय क्षीरसागर यांची प्रतिक्रिया एकदम आवडली.
मृत्युची भिती हे अज्ञान आहे.. या अज्ञानामुळे मृत्युची भिती वाटते . आणि आपली सुखे भोगण्याची संधी संपली म्हणून भिती वाटते .
जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे परिधान करणे म्हणजे मृत्यु हे तर सार्यांना माहितच आहे , आणि खरे तर तेच सत्य आहे .. ते तितकेच सहज आहे .
श्री. सन्जय क्षीरसागर यांनी म्हटल्याप्रमाणे .. आपली प्रमाणाबाहेरिल गुंतवणूक आपल्या दु:खाला आणि तदानुषंगिक भितीला कारणीभूत आहे ! There is joy in giving up !
आपण आगगाडीने प्रवास करतो .. सोबतच्या प्रवाश्यांच्या बरोबर आपला स्नेह निर्माण होतो .. खाद्यपदार्थांची देवाण -घेवाण होते.. गाडी घाटांतून जाताना आपण तो आनंद एकत्र लुटतो... अचानक क्रोसिंग साठी गाडी थांबली एकत्रच वैतागतो ..
पण म्हणून त्याच्या स्थानक आल्यावर आपण दु:खी होतो का ?आपले ही स्थानक येणार आहेच की !
समर्थांनी म्हटले आहे ..............
तुवां भोगिल्या पुनरावृत्ती| ऐसीं मायबापें किती |
स्त्री कन्या पुत्र होती| लक्षानलक्ष ||दासबोध ३-१० -५१||
कर्मयोगें सकळ मिळालीं| येके स्थळीं जन्मास आलीं |
तें तुवां आपुलीं मानिलीं| कैसीं रे पढतमूर्खा ||दासबोध ३-१० -५२||

भिती वाटते .. ती या सहयोग्यांचा वियोग होईल .. साहचर्य संपेल ... म्हणून ! किती व्यर्थ आहे ते ?
खरे तर मृत्यु "येत" वगैरे नाही.. तो आपल्या बरोबर आपल्या जन्मापासून च असतो ... आपण गाडीत चढल्यापासून आपण उतरेपर्यंत आपले तिकिट आपल्या बरोबर असते ना ? तसेच !
तेव्हा आपले स्थानक आले की .. सहप्रवाशांना हसून निरोप द्यावा.. उतर्वून घेण्यासाठी आलेल्या मंडळींच्या आनंदात सहभागी व्हावे ! आपल्या रिकाम्या जागेवर पुढचा प्रवाशी येणारच आहे ! तो कदाचित नवा चढेल किंवा जुनाच प्रवासी येऊन बसेल .. फार तर काही काळ रिकामी राहील ! गाडी सर्व प्रवाशांना गन्तंव्य स्थळी सोडणार च आहे ! आपण चिंता का करायची?
भितीचे आणखी एक कारण म्हणजे आपण केलली दुष्क्रुत्ये /पापे ! अचानक त्याची आठवण होते .. खरे तर ती सतत बरोबर असतेच ! आपण नेमके कसे वागलो याची प्रत्येकाला जाणीव असते .. आपल्या मनात आपला लेखा- जोखा तयारच असतो .. त्यात पापचे पारडे जड असेल तर .... भिती वाटणे स्वाभाविक आहे ! कारण वाईटाचा परिणाम वाईट हे आपल्याला पक्के माहित असते ! परमेश्वर दयाळू नाही .. न्यायी आहे याची ती भिती असते ! ( अर्थात हे सर्वांच्याच बाबतीत खरे असेल असे नाही ! There are always exceptions ! )
आणि म्हणून ..बाबांनो .. पापायं पर पीडनं ...कोणाला दुखवू नका .. त्रास देऊ नका .. " बरवेपण " राखा ! म्हणजे गाडीतून उतरताना भिती अथवा दु:ख वाटणार नाही ! आणि उतरण्यासाठी कायम तयार रहा ! आपले गाठिडे बांधून तयार रहा ! उतरा म्हंटले की दोन पावले पुढे असायला हवे .. अजिबात मागे न रेंगाळता .!

आपणास आहे मरण| म्हणौन राखावें बरेंपण |
कठिण आहे लक्षण| विवेकाचें ||दासबोध १२. २. २६||

- विटेकर

शुचि's picture

5 Jun 2012 - 8:39 pm | शुचि

खूप सुंदर प्रतिसाद!!

पण तुम्हाला जे सांगायचय तो माझ्या प्रतिसादाचा अर्थ नाही. मी वस्तुस्थिती सांगतोय दिलासा देत नाहीये. आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत त्यामुळे आपण मरत नाही आणि हे सर्वांच्या बाबतीत सारखंय त्याचा वर्तणुकीशी संबंध नाही.

थोडक्यात आपण गाडीत बसतच नाही (शरीर गाडीत बसतं किंवा शरीर हीच गाडी आहे) त्यामुळे उतरायचा वगैरे प्रश्नच येत नाही. पाप, पुण्य, देव या मानवनिर्मित कल्पनांना माझ्या लेखी थारा नाही, याचा अर्थ मी बेबंद वागतो असा नाही तर समयोचित वागतो आणि त्यामुळे मला कधीही मागे पहावं लागत नाही.

५० फक्त's picture

6 Jun 2012 - 8:38 am | ५० फक्त

गोखलेंची एक चारोळी आठवली....

मरण दाराशी आल्यावर म्हणलं,
तुला शंभर वर्षे आयुष्य आहे..
मरण देखील चाट पडलं..
म्हणालं, काय मनुष्य आहे.

श्री. संजयजी,

तुमचा प्रतिसाद आवडला इतकच आणि ए व ढच माझं म्हण्ण आहे .. विशेषत: तो सोडून देण्याबद्दलचा मुद्दा !

बाकीचे माझे मुद्दे हे माझेच आहेत , त्यात तुमचे म्हणणे पुन्हा उकलून सांगण्याचे प्रयोजन अजिबात नाही. अस्तु .

>>>> आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत त्यामुळे आपण मरत नाही आणि हे सर्वांच्या बाबतीत सारखंय त्याचा वर्तणुकीशी संबंध नाही. >>>>>

आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हे तर खरच आणि "आपण " मरत नाही हे ही खरे ! पण त्याचा वर्तणुकीशी जरुर संबंध आहे .. तसे असेल तर आपण कर्म विपाकाचा सिद्धांत ( आणि न्यूटनचा २ रा नियम ) नाकारता आहात असे होईल. आपल्याला मिळणारा जन्म अथवा पुनर्जन्म .. जन्माच्या दरम्यान असणार्या जरा .. व्याधी .. भोग .. सुख .. दु:ख हे सारे आपल्याच वर्तणुकीशी स्म्बंधीत आहे ! .

>>>>>थोडक्यात आपण गाडीत बसतच नाही (शरीर गाडीत बसतं किंवा शरीर हीच गाडी आहे) त्यामुळे उतरायचा वगैरे प्रश्नच येत नाही. पाप, पुण्य, देव या मानवनिर्मित कल्पनांना माझ्या लेखी थारा >>>>>>>>

आपण गाडीत बसत नाही? जन्म घ्यावा लागे वासनेच्या पोटी .. म्हणजे शरीर सोडल्यावर ज्या शिल्लक वासना आत्म्याला चिकटून आत्म्याबरोबर येतात त्यामुळे जन्म घ्यावा लागतो.. आणि जोपर्यंत वासना क्षय होत नाही तोपर्यन्त पुनरपि जननं ..पुनरपि मरणं .. ! तेव्हा शरिराचा ( मग योनी कोणतिही असो .. ) जन्म वासनेमुळे आणि वासना ह्या आत्म्याच्या बरोबर आत्म्याला चिकटून असतात( जरी त्या आत्म्याला मलीन करीत नसल्या तरिही.. जसे की स्वच्छ शरिरावर घाणेरडे कपडे ) . फक्त "विदेही " अवस्थेत च ( जी केवळ अत्त्युच्च साधनेमुळे योग्यांनाच केवळ साध्य होते ) आत्मा हा जिवंत शरिराबाहेर असतो.

पाप , पुण्य या सम्कल्पना तर सोडा शरिर च मानवनिर्मित आहे ! ते नाकारले तर या सार्या संकल्पना नाकरता येतील , जोपर्यंत शरिर आहे तो पर्यंत शरिर धर्म आहे आणि तोपर्ञंत समाजाने धारण केलेले नियमही लागू आहेत .. वेदांत सांगितले म्हणून (विद्याविनय्स्म्पन्ने , ब्राह्मणे गवि हस्तिनी| शुनि चैव श्वपाकेच , पंण्डिता: समदर्शिन:|| गीता ५-१८ ||) आपण श्वानाला कवटाळायला जात नाही !
संतानी सांगितल्या प्रमाणे .. निर्गुणाकडे जाण्याचा सोपा मार्ग सगुणाकडूनच आहे .. म्हणून तर ऋग्वेदकालीन हिरण्यगर्भ ब्राह्मण कालात आणि पुराणात कधी विष्णु , शिव तर कधी शक्ती स्वरुपात प्रगट झाले.

माझी भूमिका स्पष्ट आहे ..भारतीय पूर्वसुरिंनी या सार्याचा सुसुत्र आणि सुसंगत विचार केला आहे आणि त्याप्रमाणेच ( धर्म -अर्थ- काम - मोक्ष ) वागण्यात शहाणपणा आहे ! उगाच फ्याशन म्हणून मी त्यातील काहीही नाकारत नाही.

ज्याचा जन्मच होत नाही त्याला मरण कसलं? तस्मात माझा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यामुळे :

आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

याच्याशी मी असहमत आहे

आत्म्याला जरी जन्म आणि मरण नसले तरी मिपावर ज्ञानोत्सर्ग करणार्‍याला आहे.
त्यामुळे आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!! हे बरोबर वाटते.

स्वानन्द's picture

6 Jun 2012 - 3:27 pm | स्वानन्द

याचा अर्थ मी बेबंद वागतो असा नाही तर समयोचित वागतो आणि त्यामुळे मला कधीही मागे पहावं लागत नाही.

बेबंद का वागत नाही?
समयोचित वागता म्हणजे नक्की कसे वागता?

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2012 - 6:23 pm | संजय क्षीरसागर

समयोचित वागता म्हणजे नक्की कसे वागता?

या सगळ्या एकातेक गोष्टी आहेत म्हणजे आपण निराकार आहोत हा अनुभव झाल्यापासनं जीवनात एक "मोकळीक आणि तोल" दोन्ही एकदम आलेत. मोकळीक असल्यानं स्वच्छंद जगता येतं आणि तोल नेहमी स्वत:शी कनेक्टेड ठेवतो, जरा कुठे बोलण्यात, वागण्यात, प्रसंगात, खाण्या-पिण्यात, व्यक्तीगत संबंधात किंवा कृत्यात काही वावगं व्ह्यायला लागलं की लगेच तो फिल येतो आणि लगोलग करेक्शन होऊन पुन्हा स्वत:शी संलग्नता साधते आणि तोल सावरला जातो.

मोकळीक असल्यानं स्वच्छंद जगता येतं

म्हणजे नेमकं कसं? मनात येईल ते काहीही? नैतीक असो वा अनैतीक, काहीही? की त्यावर काही फिल्टर असतो? असलाच तर त्याचा निकष कोणता व का?

विचारण्याचे कारण: आपण निराकार आहोत, आणि आपण अबाधित आहोत हा तुमचा बोध. मग एखादं कृत्य हे वावगं का ठरावं? कुठल्या निकषावर हे ठरवता? परीणामांची चिंता का?

संजय क्षीरसागर's picture

6 Jun 2012 - 7:56 pm | संजय क्षीरसागर

सर्व प्रकटीकरण द्वैतात आहे म्हणजे आकार आणि निराकार मिळून अस्तित्व आहे. आपण विदेह आहोत हा अनुभव असला तरी `देह आहे' ही जाणीव देखील आहे त्यामुळे स्वरुपानं अबाधित असलो तरी देहावर परिणाम होणार याची दखल आहे आणि मन हा देहाचाच एकसंध भाग असल्यानं प्रत्येक घटनेचा मनावर परिणाम होणार याचीही कल्पना आहे.

आता या परिस्थितीत निती-अनिती सारखे बाह्यनिकष व्यर्थ आहेत तरीही शरीराला अपाय होईल किंवा निष्कारण क्लेश होईल अशा प्रसंगाची लगेच जाणीव होते आणि त्यातून प्रत्येक वेळी उत्स्फूर्त निर्णय घेतले जातात त्यामुळे मागे पहावं लागत नाही आणि असं क्षणोक्षणी जगण्याची मजा येते.