ए गोळी मार अनुवादकाला
ढिशक्याँउ
की अनुवादक डोक्यात जातोय
अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू
करेल अनुवादक भरशील तू स्पावडू
शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी आहे स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मामा स्पावडू मामा
ए गोळी मार अनुवादकाला
ढिशक्याँउ
की अनुवादक डोक्यात जातोय
अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू
करेल अनुवादक भरशील तू स्पावडू
शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी आहे स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मामा स्पावडू मामा
वाचन बिचन सोड डोक्याला शॉट तो कशाला
मामा स्पावडू मामा
वाह
आपले काम फक्त काडी मिळाली की सारायला
मामा स्पावडू मामा
आपले काम काडी मिळाली की सारायला
मामा स्पावडू मामा
धक्का धक्का भावानुवादाचा धक्का
फटका फटका दे रे फटका
अनुवादक नाही लाजणार स्पावडू
अजून एक अनुवाद फेकून मारेल स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मा..मा स्पावडू मामा
दिवसा सिद्धान्तांची रात्री अनुवादाची पुंजी वाजवली
प्रतिसादांची कसर उपप्रतिसादांनी भरून काढली
दिवसा सिद्धान्तांची रात्री अनुवादाची पुंजी वाजवली
प्रतिसादांची कसर उपप्रतिसादांनी भरून काढली
अरे हिंदीलिरिक्स साईटला झटका दे
झाडी करून एका गाण्याचा शोध घे
हिंदीची चिंधी करायची स्पावडू
लोकांनी लाज काढली तरी दुर्लक्ष करायचे स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मामा स्पावडू मामा
ए गोळी मार अनुवादकाला
ढिशक्याँउ
की अनुवादक डोक्यात जातोय
अनुवाद वाचशील तर मरशील स्पावडू
करेल अनुवादक भरशील तू स्पावडू
शारीरिक वाढ जास्ती बौद्धिक कमी स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मामा स्पावडू मामा
हा भिकार अनुवाद माझाच आहे.
टूकार प्रेरणा कोणाची आहे, ते तुम्ही ओळखालच!
प्रतिक्रिया
9 May 2012 - 2:23 pm | विनायक प्रभू
माझा नवरा तुझी बायको ह्या पिच्चर ची शीडी प्रिपेड कुरियर ने पाठवल्या गेली आहे.
9 May 2012 - 2:28 pm | प्रचेतस
अगगगगगग्गगगगग्ग.
_/\__/\__/\_
बाजार नुसता.
9 May 2012 - 2:31 pm | यकु
ही आणि मूळ प्रेरणादायी कविता वाचल्याने अनुवादाचा व्यवसाय सोडून अंगाला राख फासणेत येत आहे ;-)
12 May 2012 - 1:40 pm | बिपिन कार्यकर्ते
तुमचं झालं की ते राखेचं भगुनं हिकडं सारा! आन... जरा सरकून घ्या! आमी बी येतोय परिक्रमेला! ;)
@ परा : =))
12 May 2012 - 1:50 pm | यकु
बिका, खरंच एक धागाच टाकतो एवढा चातुर्मास सुरु होऊन संपला की ;-)
विजुभौ, सोकाजी, तुम्ही, मी , ते सत्काराची शाल वाले विटेकर
विलासराव आणि आत्मशून्य ऑलरेडी गेलेले आहेतच
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
9 May 2012 - 2:33 pm | गवि
गोळीच्या भीतीने आम्ही आमची ताजी मराठमोळी रचना:
जेव्हा पण कोणी मुलगी पाहतो माझं हृदय दिवाणं बोले
ओले ओले ओले ओले ओले ओले..
ही रिलीज करण्याचे पुढे ढकलले आहे. या दहशतवादाविरुद्ध संपादक काही कारवाई करणार आहेत की नाहीत?
9 May 2012 - 2:40 pm | मृत्युन्जय
गोळीच्या भीतीने
गोळीच्या भितीने की गोळ्यांच्या भितीने याचा कृपया खुलासा करावा
9 May 2012 - 2:36 pm | मृत्युन्जय
बाजार उठवला, टेंपोत बसवला
9 May 2012 - 2:41 pm | sneharani
कहर....!
_/\_
9 May 2012 - 2:42 pm | वारा
हा हा हा...सुपर डुपर हीट.
चाल लावुन गाउन पाहील, हसुन हसुन अवस्था झालीय.
औषधोपचार रौद्ररस काय?
9 May 2012 - 2:43 pm | राजेश घासकडवी
हा परा लेकाचा इतका निरागस आहे की मी त्याला परागस म्हणतो. किती ते निर्मळ, निर्मम काव्य! वा!
(माझ्या कवितेवर सुरेख सुरेख म्हटल्याबद्दल परतफेड केलेली आहे, सांगून ठेवतो. नंतर हिशेबात घोळ नको.)
9 May 2012 - 2:43 pm | अन्या दातार
चालीतपण बसतंय की ;)
9 May 2012 - 2:44 pm | प्रीत-मोहर
परा पुणे केकेसी सुटलाय पार!!
9 May 2012 - 2:53 pm | स्पा
औषधोपचार
रौद्ररस
अगगाग्ग्ग्ग
=))
=))
=))
भयाण भयाण बाजार उठल्या गेला आहे
-- धर्मेंद्र मसल गोळे
9 May 2012 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा
@भयाण भयाण बाजार उठल्या गेला आहे>>> +++++++++११११११११११११११११
More Animated Gif - GoodLightscraps.com
@-- धर्मेंद्र मसल गोळे >>>
अरे बास अता... मेलो मेलो मी हसून हसून ... राम राम राम राम ...गोळा..गोळा आला पोटात...
SCRAP ANIMATED SMILIES.
CLICK HERE
9 May 2012 - 10:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय रे मन्या, तुझ्या "धर्मेंद्र मसल गोळे" या नावाचं इंग्लिश भाषांतर करू का?
या असल्या फडतूस भाषांतरांमुळे आजकालच्या पोरापोरींचं हिंदी आणि इंग्लिश बिघडत चाललेलं आहे.
9 May 2012 - 3:07 pm | पहाटवारा
टाकावुतून टिकावू चा ऊत्तम नमुना पेश केल्याबद्दल श्री रा रा परा यांना शाल अन श्रीफळ देऊन अनुवाद नृशंसक संघातर्फे सत्कार !
9 May 2012 - 3:08 pm | संजय क्षीरसागर
प्रतिसादांची कसर उपप्रतिसादांनी भरून काढली!
परा, पोलिसानं भर चौकात`घ्या साइडला' म्हणावं असा प्रसंग अनुवादकावर आला आहे !
9 May 2012 - 3:12 pm | नाना चेंगट
कंपूबाजी करुन अनुवादकाला कोपच्यात घेण्याचा प्रयत्न
9 May 2012 - 3:33 pm | सूड
हे गाणं वाचून आम्हाला अशाच धाटणीच्या 'किम् आगच्छसि खंडाला ?' उर्फ 'आती क्या खंडाला' या गाण्याची आठवण झाली.
(टिमकीचा बाजा)
9 May 2012 - 3:45 pm | अत्रुप्त आत्मा
सूड घेतला..अता...सूड
@'किम् आगच्छसि खंडाला ?' उर्फ 'आती क्या खंडाला' या गाण्याची आठवण झाली.

9 May 2012 - 3:50 pm | प्रचेतस
ए गोळी मार स्मायलीवाल्याला
ढिशक्याँउ
की स्मायलीवाला थांबतच नाही
स्मायली बघशील तर मरशील स्पावडू
टाकेल स्मायलीवाला भोगशील तू स्पावडू
स्मायलीच जास्ती प्रतिसाद कमी आहे स्पावडू
मामा स्पावडू मामा
हे मामा स्पावडू मामा
9 May 2012 - 4:43 pm | मृत्युन्जय
9 May 2012 - 4:37 pm | अत्रुप्त आत्मा
कितना मारो तुम भी मूझे ,हसता मै रहूंगा सदा...

हसने की दवा है ये मेरी स्मायली... मामा.. वल्लू मामा... ए.. मामा वल्लू मामा...
9 May 2012 - 3:36 pm | स्पा
'किम् आगच्छसि खंडाला ?'
=))
सुडक बाजा काका...
आता थांबू नका पण.. एका ओळीवर आम्ही तुम्हाला सोडणार नाहीयोत.. पूर्ण गाण्याचा अनुवाद हवा
आत्ताच्या आत्ता
9 May 2012 - 3:37 pm | प्यारे१
>>>स्पावडू मामा<<<
मेलो मेलो!
किती स्पावडू त्या एका कल्लूमध्ये बसतील ???? ;)
२१ वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी करणार्या परशुरामांच्या भूमिकेत जाऊन अनुवादकरहित, डायरियन्सरहित, प्रतिसादनुत्सुक ब्लॉगर्स नि सदस्यरहित मिपा करण्याचा सातत्यानं प्रयत्न करणार्या 'परा'सरांना मानाचा मुजरा... !
___/\___
अवांतरः बाकी काही खोडं अम्मळ ना जाळण्याच्या कामाची ना फर्निचर बनवायच्या!
9 May 2012 - 10:35 pm | सोत्रि
खपल्या गेले आहे ;)
- (खपलेला) सोकाजी
9 May 2012 - 10:49 pm | सूड
त्या एका कल्लूमागे स्पावडू पाचवेळा लपेल. :D
9 May 2012 - 3:39 pm | पैसा
ढिशक्यांउ..
9 May 2012 - 3:39 pm | सहज
मनाची कवाडे बंद करु नका.
अप्रतिम अनुवादकांचे किस्से, रचना लवकर लिहतील योगप्रभु / गवि बहुदा!
9 May 2012 - 3:47 pm | स्मिता.
मी अनेक वेळा फर्माईश करूनही मी सांगितलेल्या गाण्याचा मराठी, हिंदी आणि संस्कृत गाण्याचा अनुवाद नाही करून दिलास. स्पावड्याच्या फर्माईशीवर मात्र लग्गेच कारवाई केलीस. हा हलकटपणा आहे पर्या!! ( सौ. अशी ही बनवाबनवी मधील सुधीर जोशी)
9 May 2012 - 3:49 pm | मृत्युन्जय
9 May 2012 - 3:58 pm | सुहास झेले
हा हा हा हा ... मायला, मेलो हसून हसून :) :) :)
9 May 2012 - 3:58 pm | यकु
अरारा ! वरची एक विशिष्ट जळपट प्रतिक्रिया फाट्यावर मारण्यात आली होती, कारण ऑलरेडी *भ्रमिष्टाच्या भ्रमात एक भर पडल्याने फारसं काही बिघडणार नाही. :)
काव्याचा लक्ष्य विषय असलेले आदरणीय अनुवादक सिद्धांत वगैरेमध्ये स्वारस्य घेतात, त्याचा पराशेठनी समाचार घेतला आहेच - पण या भ्रमिष्टाला ते कुणी समजावून सांगावं?
पण आता सहज मामांच्या मनातही आम्हीच दिसत असल्याने हे एक्स्ट्रा तोंड वाजवण्याची संधी दिल्याबद्दल आभारच. :)
तुम्ही योगप्रभू आणि गविंचं नाव घेतलंत त्यावरुन खव आणि प्रतिसादांतील संवादाचा आपला अभ्यास दांडगा आहे हे मान्य करावेच लागेल ;-)
योगप्रभू आणि गवि - करा आता काहीतरी.
*साक्षेपी वाचकांना कोण ते लक्षात येईलच, न आल्यास आम्ही शंकानिरसन करु. ;-)
9 May 2012 - 3:59 pm | सुहास झेले
हा हा हा हा ... मायला, मेलो हसून हसून :) :) :)
9 May 2012 - 4:28 pm | गणपा
गोळे काकांना पेश्शल धन्यवाद. :)
9 May 2012 - 4:53 pm | मूकवाचक
=))
9 May 2012 - 9:34 pm | jaypal
स्पावड्याचा चक्क कल्लु मामा केलास.
बाकी कविता अफलातुन्च __/\__
9 May 2012 - 10:11 pm | सुधीर१३७
मेला की रे तो............................................. अनुवादक :wink:
10 May 2012 - 12:32 am | साती
गाण्यच्या निवडीसाठी दहा अनुवादरंजनात्मक ब्लॉग इनाम. :)
जब्बरदस्त अनुवाद. (जाता-जाता- मूळ गाण्यात नसलेले शब्द घुसडल्याने हा अनुवाद नसून स्वैर रूपांतर आहे.)
बाकी रौद्ररसातला औषधोपचार करण्याची संकल्पना भारीच. :)
10 May 2012 - 3:28 am | शुचि
ए प्लीज रे ........ ठार माराल एके दिवशी. "किम आगच्छसी खंडाला" काय =)) =)) मेले ना!!!
मी पण एक अनुवाद करणार आता.
10 May 2012 - 3:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
Look Mum the sun has come in the sky, draping the body (is) a fancy stoll
Saffron has been batchelored on the earth, on top of that he is riding sorry.
देखो मां गगन मे सूरज ये आया, पांघर के अंग पे महंगा शेला
केसर के ये बिनब्याहे डाले धरती पे उन के उपर से ठाट से चले उस की माफी
शेल्याला इंग्रजीत शब्द नसावा म्हणून स्टोलच म्हणून टाकले. कसें?
10 May 2012 - 3:56 am | शुचि
हाहा निवर्तले !!!!
12 May 2012 - 1:49 pm | तिमा
ही दोन भाषांतरे चालीवर म्हणतच माझ्या नातवाला भाताचे गोळे भरवीन हो!
10 May 2012 - 3:28 am | शुचि
ए प्लीज रे ........ ठार माराल एके दिवशी. "किम आगच्छसी खंडाला" काय =)) =)) मेले ना!!!
मी पण एक अनुवाद करणार आता.
10 May 2012 - 7:34 am | ५० फक्त
धन्यवाद परा, चिकन खायला घालतो म्हणुन नुसते वरणातले गोळे खायला घालणा-यांना समज मिळेल अशी अपेक्षा आहे.
18 May 2012 - 7:26 pm | नाना चेंगट
काय झालं मग अनुवादकाचे शेवटी?
18 May 2012 - 7:29 pm | जेनी...
ह्या ह्या ह्या..
माझ्या आवाजात चाल लावुन गायलं मी
लै म्हनता लै मजा आलि बग्गा :D
:D
18 May 2012 - 10:57 pm | किसन शिंदे
धन्यवाद परा! :)