मुसमुसण्याने तिच्या जाग आली मला,
जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके मुसमुसायला?'
शिरली अलगद कुशीत माझ्या, लागली हमसाहमसून रडायला,
कळेचना मलाही कसे शांत करू मी हिला,
कवटाळून हृदयाशी थोपटले किंचीत इथे तिथे,
राहिचना, शेवटी मस्त चुंबून गालावर, थोपटले जरा कुल्ह्यांवर,
जमेचना शांत करणे, तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो,
.
.
.
.
.'अग! सांभाळ जरा आपल्या छकुलीला, दुपटे बदल तिचे'..
प्रतिक्रिया
17 May 2012 - 1:54 pm | बॅटमॅन
ahem :P
17 May 2012 - 2:28 pm | संजय क्षीरसागर
आता तुम्ही `हास्यरस' म्हणताय आणि कवितेच नांव `स्री-मन आहे म्हणून विचारतो
>कवटाळून हृदयाशी थोपटले किंचीत इथे तिथे,
राहिचना, शेवटी मस्त चुंबून गालावर, थोपटले जरा कुल्ह्यांवर,
जमेचना शांत करणे, तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो,
.
.
.
पत्नी घरात असताना हे डेरिंग?
17 May 2012 - 3:17 pm | दादा कोंडके
सर्वात शेवटची ओळ पांढर्या अक्षरात टाकल्यामुळे तुम्ही वाचली नसेल. :)
17 May 2012 - 4:04 pm | संजय क्षीरसागर
तरी मला संशय होताच! पण कवितेचं नांव `स्त्री-मन' म्हटल्यावर प्रभाकरजी काय टर्न घेतायत ते कळेना. आता त्यांनी व्य. नि. केलाय त्यामुळे खुलासा झाला पण पांढर्या शाईपेक्षा (कंसातला मजकूर) बरा. आता प्रतिसादावर उपप्रतिसाद आल्यानं तो बदलता येत नाहीये म्हणून इथे मनःपूर्वक सॉरी म्हणतो.
17 May 2012 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार
आवडेश.
धाग्याला पंख लागू नयेत अशा शुभेच्छा.
17 May 2012 - 3:10 pm | प्रचेतस
मस्त. :)
17 May 2012 - 3:29 pm | मुक्त विहारि
कूरकूरण्याच्या मूळे त्रास झाला मला,
जवळ घेऊन म्हणालो,' काय झाले बाई ग, इतके कूरकूर करायला?'
अलगद घेतले मी तिला हातात,
उघडून बघू लागलो मी तिचे अंग न अंग.
द्रव पदार्थ तर होता व्यवस्थित.
तेंव्हा हाक मारून पत्नीला म्हणालो,
.
.
.
.
.
.'अग! नीबच तूटलय ह्या पेनाची,जरा नविन नीब आणायला पैसे दे'..
17 May 2012 - 4:31 pm | ऋषिकेश
:)
17 May 2012 - 7:32 pm | पैसा
:) मजेशीर! मिपाच्या मुख्य पानावर एकही कविता दिसत नाहीये असं कालच माझ्या लक्षात आलं. कवितेसाठी धन्यवाद पेठकरकाका!
18 May 2012 - 5:28 pm | स्पंदना
खल्लास हो पेठकर काका. एकदम ख मं ग !
19 May 2012 - 11:08 am | यशोधरा
पेठकरकाका :)
19 May 2012 - 2:12 pm | प्रभाकर पेठकर
बॅटमॅन, संजय क्षीरसागर, दादा कोंडके, परिकथेतील राजकुमार, वल्ली, मुक्त विहारि, ऋषिकेश, पैसा, aparna akshay आणि यशोधरा तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.