तिन्ही त्रिकाळ
घेतो चिकार
नेहमीच ... तुझ्यामुळे
घालतो घोळ
पांजरपोळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
कानांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
गाली ठसे
(होते हसे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
शब्दांचा जाच
शब्दांना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
पहिली धार
चढते फार
नेहमीच ... तुझ्यामुळे
सोड्याचा वीट
घेतोय नीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
बनीची भेट
विडंबन रेट
नेहमीच ... तुझ्यामुळे
- बिनडोक बनी
प्रतिक्रिया
4 Aug 2008 - 7:10 pm | आनंदयात्री
सही रे बनी .. मस्त मस्त !!
4 Aug 2008 - 7:55 pm | शितल
एक सो एक विडंबन आहेत :)
एकाच कवितेवर ३ विडंबन :)
बेसनलाडु , तुमची कविता काय होती हो (विसरले ना मी हे विडंबन वाचुन ) :?
4 Aug 2008 - 8:36 pm | ब्रिटिश टिंग्या
छान आहे विडंबन!
(सर्वव्यापी) टिंग्या ;)
अवांतर - चारोळ्या सोडुन एकदम विडंबनात कशी काय शिरली तु?
4 Aug 2008 - 9:36 pm | बेसनलाडू
कानांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
गाली ठसे
(होते हसे!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
हाहाहाहा! भारी!
(हसरा)बेसनलाडू
5 Aug 2008 - 12:50 am | विसोबा खेचर
बने, मस्त विडंबन गं! :)
अवांतर - तुझा आयडी खूप आवडला... :)
5 Aug 2008 - 2:03 am | संदीप चित्रे
>> शब्दांचा जाच
शब्दांना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
पहिली धार
चढते फार
नेहमीच ... तुझ्यामुळे
हे तर फारच उच्च..... जियो !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
5 Aug 2008 - 5:04 am | सर्किट (not verified)
गाली ठसे
आणि सोड्याचा वीट, घेतोय नीट
हे आवडले.
- सर्किट
5 Aug 2008 - 6:14 am | चतुरंग
(स्वगत - बनी ग बनी काय तुझ्या मनी? चारोळ्यांचे विडंबन आरोळ्या असे होईल का? :W :? )
चतुरंग
5 Aug 2008 - 10:21 am | इनोबा म्हणे
मस्तच विडंबन गं!
आणि आयडी सुद्धा...
-बिनधोक इन्या
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
5 Aug 2008 - 5:28 pm | अनिल हटेला
सोड्याचा वीट
घेतोय नीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
हे जास्त पटले !!!!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
14 Aug 2008 - 5:04 pm | छोट्या
पण
शब्दांना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
पहिली धार
चढते फार
नेहमीच ... तुझ्यामुळे
हे भारी होतं... :D :D :D