प्रातः स्मरणीय सदगुरु केशवसुमारांना वंदुन ही आजची टुकारी.
आमची आजची प्रेरणा परममित्र बेसनलाडु यांची नेहमीच ... तुझ्यामुळे
तिन्ही त्रिकाळ
खाई मिसळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
वृत्तातले घोळ
शब्दांचे ते खेळ
नेहमीच ... तुझ्यामुळे
ओठांत धूर
डोळ्यांत पूर
नेहमीच ... तुझ्यामुळे
अनुभव ..
आत्मचरित्रं
(होते हसं!)
नेहमीच ... तुझ्यामुळे
कविंचा जाच
कविंना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
प्रतिसादांना धार
प्रतिसादांचे वार
नेहमीच ... तुझ्यामुळे
मालकाचा वीट
भांडायचा धीट
नेहमीच ... तुझ्यामुळे
टुकाराशी भेट
विडंबनच थेट
नेहमीच ... वृत्तामुळे
प्रतिक्रिया
4 Aug 2008 - 6:12 pm | अमोल केळकर
एकदम मस्त
आवडले
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
4 Aug 2008 - 6:13 pm | शितल
विडंबन वाचताना मजा आली.
:)
4 Aug 2008 - 6:20 pm | केशवसुमार
टुकारशेठ,
कविंचा जाच
कविंना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
प्रतिसादांना धार
प्रतिसादांचे वार
नेहमीच ... तुझ्यामुळे
हे एकदम जबरा.. चालू द्या..
(निवॄत्त) केशवसुमार
4 Aug 2008 - 9:33 pm | बेसनलाडू
म्हणतो
(नेमका)बेसनलाडू
4 Aug 2008 - 6:25 pm | मनस्वी
कविंचा जाच
कविंना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
प्रतिसादांना धार
प्रतिसादांचे वार
नेहमीच ... तुझ्यामुळे
मस्त हो टुकारपंत!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
4 Aug 2008 - 6:27 pm | सहज
टुकारचंद लई भारी!!
आवडले. :-)
4 Aug 2008 - 6:28 pm | चतुरंग
टुकारशेठ छान चालले आहे!
(स्वगत - रंगा, आता कसं शांत शांत वाटतंय नाही? कोणीतरी हात घातला शेवटी मुद्द्याला! ;) )
चतुरंग
5 Aug 2008 - 1:00 am | विसोबा खेचर
टुकारशेठ छान चालले आहे!
हेच म्हण्तो! :)
4 Aug 2008 - 6:34 pm | राधा
खुप छान झालय............
4 Aug 2008 - 6:43 pm | प्राजु
सह्ही बनलं आहे विडंबन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Aug 2008 - 6:51 pm | साती
विडंबन(च) आवडले.
साती
4 Aug 2008 - 7:02 pm | इनोबा म्हणे
केटूशेठ लय भारी बरं का!
च्यामारी, मानला भौ तुला.....!
कविंचा जाच
कविंना जाच
नेहमीच ... तुझ्यामुळे
प्रतिसादांना धार
प्रतिसादांचे वार
नेहमीच ... तुझ्यामुळे
लय मस्त...
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
4 Aug 2008 - 10:49 pm | सर्किट (not verified)
वा ! मस्त विडंबन !
- सर्किट
4 Aug 2008 - 11:32 pm | मनुजा
विडंबन आवडले, गायचे असेल तर चाल कोनति लावयची?
5 Aug 2008 - 9:11 am | आनंदयात्री
अरे बापरे, हा चालीचा प्रश्न विचारुन आपण आमची अंमळ गोचीच केली आहे :)
कदाचित याबाबतीत आमचे याक्षेत्रातले वरिष्ठ बेला, सर्किट किंवा सदगुरु केशवसुमार हे काही मार्गदर्शन करु शकतील.
5 Aug 2008 - 1:25 am | ब्रिटिश टिंग्या
टुकारा,
सही चाललेय!
आजची टुकारी आवडली!
(टुकारयात्री) टिंग्या :)
5 Aug 2008 - 5:33 pm | अनिल हटेला
टुकारा,
सही चाललेय!
आजची टुकारी आवडली!
चलू देत टूकारपणा !!!
(आय एस आय मार्कवाला टूकार )
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
5 Aug 2008 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विडंबन वाचतांना मजा आली.
आता थांबायचं नाही, और भी आने दो.