राजश्रिया विराजित, अखंडित लक्ष्मी अलंकृत, सकल राजकार्य धुरंधर, प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर, सकल गुणऐश्वर्यसंपन्न, मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ,सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न, राष्ट्रवादी विश्वासनिधि श्री श्री श्री सम्राटभाउ मोझे यांस,
साष्टांग दंडवत,
पत्र लिहिणेस कारण की,
गेले काही दिवस आपली सुहास्य वदन भित्तिचित्रे पुण्यनगरीच्या कानाकोपर्यात झळकत आहेत. परंतु चित्रे पाहून आंम्हास भित्ती न वाटता अंमळ आनंद जाहला. पुण्यपत्तनास योग्य कारभारी मिळणार, मिळेल, मिळाला पाहिजे अशी चर्चा कैक दिवसांपासोन तारिके अहकामे सकाळगिरी मध्ये चालू होती. त्यामुळे पुण्यनगरीतील प्रत्येक चावडीवर आणी कित्येक ब्राह्मणभोजनातून कारभारी बदलाची गप्पाष्टके आणी खलबते चालू होती. आपल्या प्रकटनाने पुण्यनगरीची अवस्था अजि म्या ब्रह्म पाहिले ऐसी जाहली. पेशवाईचा सुवर्णकाळ पुन्हा येणार येणार ऐशी जोरदार चर्चा सुरू जाहली.
दुसर्या रावबाजीचा काळ ! काय तो वर्णावा ! मनगट बुडेल इतका भात पंगतीत वाढला जात असे. सकाळ सायंकाळ सोमरसाची आचमने चालत असत. नायकिणी, नाटकशाळा यांना उदार राजाश्रय असे. दक्षिणा गोळा करण्यासाठी दूर - दूर वरून ब्रह्मवृंद गोळा होत असे. टोपीकर आला आणी धर्म बुडाला. दक्षिणा मागावी तर लालतोंड्या टोपीकर म्हणतो कसा ? - फक्त विद्वान ब्रह्मणास दक्षिणा मिळेल. आता ब्राह्मण हा जन्मजात विद्वान अस्तोच ! हे त्या विलायती टोपीकरास कसे कळावे ? ब्राह्मणभोजने बंद झाली. पुण्यनगरीचा सत्यानाश झालान.
पुढे टोपीकर बुडाला. स्वकीयांचे राज्य आले. पुण्यपत्तन आनंदले. याव्वचंद्रदिवाकरौ नेहरूबाबाचे राज्य चालो ऐश्या गर्जना पेठा पेठातून घुमू लागल्या. पण चांडाळ नेहरू बिल्कूलच जातीला जागेना. स्वकीयांस ऐतखाउ म्हणू लागला. ब्राह्मणभोजनांस फुकट्चे देणार नाही म्हणून धिक्कारू लागला. त्यानंतर पुण्यनगरीची कळाच गेली. कोणी वाढपी झाला. कोणी कारकून झाला. कोणी दूरदेशी कळा बडवू लागला.
आज आपले ऐश्वर्य पाहिले; अन चौका चौकात उभे राहून ताम्बूलभक्षण करणारे पुण्यनगरीचे नवे कार्यकर्ते आनंदले. आपला राजबिंडा थाट आपल्या उमद्या स्वभावाची साक्ष देतो आहे. आपणास मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ऐसे म्हटले ते त्यामुळेच. पुण्यनगरीची सांस्क्रुतिक संम्मेलने काव्य - शास्त्र - विनोद, सध्या पान टपरी या संगमस्थानी भरतात. भाउ आज तेथे आपल्या उदार आश्रयाला जाण्याची भावना सध्या रंगते आहे. रिकामटेकड्या कार्यकर्त्यांस आपुल्याकडे सढळ हाताने दक्षिणा मिळते ऐसी वदंता आहे.
पुण्यपत्तनाच्या आसपास धाकले राजे दादा साहेब ( जे की खजिनामंत्री महाराष्टर राज्य); यांनी सोन्याचा नांगर फिरवला. जमिनीचे भाव वाढले. त्यास आज गुंठा मंत्री नामक गोमटी फळे आली आहेत. ह्या मंत्रीगणांनी सैन्य जमविण्यासाठी पुनश्च ढाबाभोजनांस सुरवात केली आहे. आता ऐतखाउंचे काही चालत नाही. चौका चौकात सांस्क्रुतिक संगमस्थानी जमून काव्य - शास्त्र - विनोद करणार्या सकल विद्यालंकृत कार्यकर्त्यांसाठी ढाबाभोजने राखिव आहेत. येथेच सकाळ सायंकाळ विलायती सोमरसाची आचमने चालतात. आणी जुन्या पेशवाईच्या आठवणींनी आमुचे डोळे पाणावतात.
सोमरसाच्या कैफात काही प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर कार्यकर्त्यांकडून तुरळक घटना घडतात, पण आपल्यासारख्यांचे न्यायशास्त्रसंपन्न आशिर्वाद असताना कुणाची भिती ?
आपणास पुण्यनगरीच्या नूतन जाणत्या राजाचे आशिर्वाद अवश्य मिळोत; दादामहाराजांची क्रुपा आपल्यावर अखंड राहो; पेशवाईचे दिवस पुन्हा येवोत ही विघ्नकर्त्या गणेशचरणी प्रार्थना.
आपला क्रुपाभिलाशी,
वैद्यबुवा
प्रतिक्रिया
2 May 2012 - 4:17 pm | स्पा
मालक
__/\__
साष्टांग हो
2 May 2012 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा. सम्राटभाऊचे सोन्याचे ओझे पाहिल्यावर डोळ्याचे पारणे फिटले. वीस मिनिटं म्हणे त्यांना सोने अंगावर चढवायला लागतात . सम्राट मोझे गुगलला शोधायला लावल्यावर एक व्हिडियो सापडला. आणि व्हिडियो पाहिल्यावर शब्दच फुटेना. आठ किलो सोनं अंगावर. व्वा......!
वर्णन तर आवड्ले. सम्राटभाऊंच्या कर्तृत्वावर अधिक वाचायला आवडेल.
-दिलीप बिरुटे
2 May 2012 - 4:35 pm | सुहास..
लई भारी ओ वैद्यबुवा !!
सम्राटनी वाचल तर लई मजा येईल ...
सम्राटभाऊंच्या कर्तृत्वावर अधिक वाचायला आवडेल. >>>>
तुकाराम महारांजाशी नाते आहे याउप्पर काय परिचयाची गरज !!
2 May 2012 - 4:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>तुकाराम महारांजाशी नाते आहे याउप्पर काय परिचयाची गरज
समजलं नाही. सुहास जरा (उस्कटून) तपशिलवार सांगा ना राव.
-दिलीप बिरुटे
2 May 2012 - 4:49 pm | इरसाल
.
2 May 2012 - 4:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुकारामाचं सॉरी श्री संत तुकोबांचं आडनाव मोरे होतं. हे मोझे आहेत म्हणतात ना ?
गोंधळ नका वाढवू रे...........!
-दिलीप बिरुटे
2 May 2012 - 4:56 pm | यकु
>>>गोंधळ नका वाढवू रे...........!
मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्म इ.स. १५९८
देहू, महाराष्ट्र
समाधी / मृत्यू इ.स. १६५०
देहू, महाराष्ट्र
गुरू चैतन्य महाप्रभू
पंथ / मत चैतन्य संप्रदाय, वारकरी संप्रदाय
साहित्यरचना तुकारामांची गाथा, पाच हजारांवर अभंग
भाषा मराठी
कार्य समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
पेशा वाणी
वडील बोल्होबा अंबिले
आई कनकाई
पत्नी आवळाबाई
तीर्थक्षेत्रे देहू
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%...
2 May 2012 - 5:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यकु मित्रा, पदव्युत्तर अभ्यासक्रमात माझं स्पेशल तुकाराम होतं त्यामुळे तुकोबा थोडे थोडे परिचित आहेत. पण, त्यांचा ओझ्यांशी सॉरी मोझ्यांशी लावलेला संबंध मला कळत नाहीहे. :(
असो, कटतो. धन्यवाद.
राजघराणं साहेब, खूप अवांतर प्रतिसाद खरडल्याबद्दल क्षमस्व.
-दिलीप बिरुटे
2 May 2012 - 5:04 pm | यकु
हॅहॅहॅ
गोंधळ कमी व्हावा म्हणून नव्हे तर गोंधळ वाढावा म्हणूनच लिंक दिलीय ;-)
पळ्ळा नायतर सर आणखी कावणार :p
2 May 2012 - 9:15 pm | इष्टुर फाकडा
यकु, च्यायला बायकोचे नाव आवळाबाई!!!!
भयंकर गल्लत झालीये बहुतेक...आवडाबाई (आवडी) असे ऐकले होते. जाणकारांनी लगेचच प्रकाश टाकावा. ;)
2 May 2012 - 10:18 pm | पैसा
मी हे नाव "आवली" असं ऐकलंय.
3 May 2012 - 7:36 pm | विकास
मी हे नाव "आवली" असं ऐकलंय.
मी देखील असेच ऐकले आहे. मिपावरचाच प्राजूताईंचा हा लेख/पुस्तकपरीचय पहा.
आवडाबाई हे अर्धवटरावांच्या बायकोचे नाव! (रामदास पाध्यांच्या बोलक्या बाहुल्यांमधील अर्धवटराव, मिपासदस्य नाही. :-) )
2 May 2012 - 5:03 pm | सुहास..
क्लु
१ ) तुकाराम महारांजाचे जन्मस्थान
२ ) आजीचे आडनाव
2 May 2012 - 4:38 pm | मुक्त विहारि
ह.ह.पू.वा.
2 May 2012 - 4:40 pm | परिकथेतील राजकुमार
पण ह्या धाग्याची प्रेरणा ही आहे का ?
तसे असेल तर तसा उल्लेख नसल्याचे खटकले.
बाकीचे चालू द्या...
2 May 2012 - 4:44 pm | राजघराणं
तुम्हाला काय कशामुळे खटकतं ते चांगलच ठौक झालय आम्हाला.
2 May 2012 - 4:53 pm | अँग्री बर्ड
अर्थात. कडवे पुरोगामी असोत वा नसोत, पण राजघराण्यांना पुरोगामी असल्याचे दाखवल्याशिवाय गत्यंतर नाही मग सामाजिक समतेच्या कार्यक्रमात लगेच स्थान मिळते. आता करवीरच्याच राजघराण्याचे घ्या ना, ह्याखेरीज सातारा गादी अजून प्रतिष्ठा टिकवून आहे.
2 May 2012 - 5:11 pm | राजघराणं
? ह्याचा इथ काय संबंध ?
2 May 2012 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार
एखाद्याला त्याच्या लेखनाचे श्रेय द्यायची लाज का वाटते तुम्हाला ?
मी तुमचे लिखाण चोरलेले आहे असे कुठेही म्हणालेलो नाही. मी फक्त 'प्रेरणा ही आहे का ?' असे विचारले. ते देखील अगदी व्यवस्थीत पुरावा देऊन. त्यात तुम्हाला काय खटकले ते सांगा. मी विचारलेला प्रश्न बाजूलाच राहिला आणि तुम्ही भलतेच काही बडबडत आहात. खर्याला खरे म्हणायला काही हरकत आहे का ? 'हो मला मिळाली प्रेरणा' असे कबूल केलेत तर काय कोणा तुम्हाला फासावर लटकवणार नाही. पण प्रामाणीकपणाच नसल्यावरती मग काय बोलायचे ?
असो....
2 May 2012 - 5:47 pm | राजघराणं
घाबरून पडलो खुर्चीतून. चिमुकल्या जिवावर एव्हढी जहाल टिका नका हो करू - आता अनव्रुत्त पत्र तुम्हालाच : -
कॅफेश्रिया विराजित,अखंडित आंतरजालारूढ, संगणकशास्त्रसंपन्न, मिपाहृदयसम्राट, लेखनमहर्षी, सर्वकंपूसंस्थापक, तिख्तवा़क समरधुरंधर, गोब्राह्मण प्रतिपालक, राजकार्य धुरंधर, रा.घ. क्षय दीक्षित , सकल सत्य अलंकृत श्री श्री श्री पराशेठ यांना,
साष्टांग दंडवत,
पत्र लिहिणेस कारण की,
गेले काही दिवस आपली मज पामरावर वक्रद्रुष्टी झालेली आहे. वास्तविक पाहता माझे स्थान आपल्या साहेबाच्या चरणाशी बसून दूध भात खाण्याचे ! मजकडून अनावधानाने काहि आगळीक झाली असल्या; माउलीच्या ममतेने अपराध पोटात घ्यावा. बालक समजोन माफी करावी.
आपला अजाण अप्रामाणिक,
वैद्यबुवा.
2 May 2012 - 8:42 pm | मृगनयनी
ब्राह्मण पर्या.. गाई कधीपासून पाळायला लागला? ;)
_______
बाकी वरचा "सम्राट मोझे" यांचा फोटो व दृश्य दागिने पाहून त्यांचा "रमेश वान्जळे" यांची कॉपी करून प्रसिद्धी मिळवण्याचा क्षीण प्रयत्न दिसून येतो. बरं ते दागिने पण "खरे" वाटत नाही... (पक्षी: पी.एन.जी. कडचे ब्रॅन्डेड वाटत नाहीत!! ;) )
फेसबुकवरच्या फोटोत आणि इथेही वर पोस्टलेल्या फोटोत नीट पाहिले.. तर ते दागिने प्लेटिन्ग'चे सोडा.. पण धड पितळेचे तरी असतील की नाही... अशी शन्का येते! :) ;) असो!.. 'चकाकते ते सारे सोने नसते' हेच्च खरे! :)
पेशव्यांचे पुणे लुटून, शहरात भ्रष्टाचार माजवून, लोकांच्या जमिनी गिळंकृत करून, पेशव्यांच्या जातवाल्याना नावे ठेवून त्यांची बदनामी करणार्या आणि मागाहून पितळेचे दागिने घालून स्वत:च "श्रीमन्त पेशवे" असल्याच्या आविर्भावात माज दाखवणार्या राष्ट्रवादी'च्या णिष्टावाण कारेकत्र्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार ?
पाटील इस्टेट.. पण आजकाल "श्रीमन्त" होतेय.. याचे श्रेय कुणाला द्यावे? ;)
बाकी 'राजघराणं' यांनी सम्राट मोझे'ची तुलना श्रीमन्त पेशवाई आणि एकन्दर पेशवाईच्या श्रीमन्तीबरोबर करावी.. हे तितकेसे पटलेले नाही... पेशव्यांमुळे पुण्याला "सांस्कृतिक राजधानी"चा दर्जा मिळाला....
नुसते गळ्यात आणि हातात धातूच्या माळा घातल्याने कुणी सुसंस्कृत बनत नाही! .. आणि श्रीमन्त पेशव्यांच्या दर्जाचे तर नाहीच्च नाही! :)
2 May 2012 - 10:21 pm | प्राध्यापक
पेशव्यांमुळे पुण्याला "सांस्कृतिक राजधानी"चा दर्जा मिळाला....
पेशव्यांमुळे पुण्याला "सांस्कृतिक राजधानी"चा दर्जा मिळाला....अनाकलनीय आहे,जर नाटकशाळा बाळगुन आणी रमण्यामधे दक्षिणा वाटुन पुणे सांस्कृतिक राजधानी बनते असे तुम्हाला वाटते का?जरा उत्तर पेशवाइचा कालखंड वाचला तर बरे होइल.
2 May 2012 - 10:32 pm | राजघराणं
दुसर्या बाजीरावाच्या काळात, शनिवारवाड्यात घटकंचुकीचा खेळ खेळला जाई. जाणकार या सांस्क्रुतिक खेळावर प्रकाश टाकतील काय ?
2 May 2012 - 10:37 pm | प्राध्यापक
एकदम सहमत आहे,या खेळाशिवाय हि इतर अनेक राजकीय आणी सामाजिक द्रुष्ट्या घातक खेळ खेळले गेले .
3 May 2012 - 12:33 am | यकु
पेशवाईबद्दल माहित नाही, पण या धाग्यावर पानीपत होणार हे निश्चित ! ;-)
3 May 2012 - 12:57 pm | प्यारे१
पप्या तू 'द्रष्टा' लेका!
वाटचाला 'त्या' दिशेने सुरु झाली आहे!
पप्पूमहाराज की .... जय! ;)
3 May 2012 - 11:10 am | परिकथेतील राजकुमार
"येवढी चुकीची माहिती येवढ्या आत्मविश्वासाने देणारा दुसरा कोण ? अहो मास्तर !" असे काहीसे पु. लं. चे एका वाक्य आजकाल फारच आठवायला लागले आहे.
3 May 2012 - 7:08 pm | प्राध्यापक
दुसर्याच्या माहितीला चुकीची म्हणण्यापेक्षा थोडस डोळ्यावरची झापड काडुन बघीतल् तर सत्य दिसेल.....अर्थात पाहायची इच्छा असेल तर म्हणा.....
4 May 2012 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार
हॅ हॅ हॅ
पुढचे 'ह. ना.' तुम्हीच बघा सीग्रेडींचे.
वाक्य संपादित.
3 May 2012 - 11:06 am | परिकथेतील राजकुमार
अहो शनिवारवाडा म्हणजे काय कुणा कुत्रे पण न फिरकणार्या कंपाउंडर कम डॉक्टरचा दवाखाना होता का काय ?
3 May 2012 - 11:57 am | गवि
शिवाय *घटकंचुकी खेळत असतील तर माझ्या दोनेक शंका :
१) कोण कोण खेळायचे? खेळात वेळ घालवण्याची काही गरज होती का? खेळाशिवायही या गोष्टी सहजसाध्य होत्या ना?
२) खेळेनात आतल्या आत काही.. आपापल्या घरात आपण काय खेळतो त्यावर आपली बाहेरची कर्तबगारी ठरते का?
नोटः *घटकंचुकी म्हणजे अनेक कंचुकी एका घटात ठेवून जिची ज्याला मिळेल तिच्याशी रत होणे यासम ढोबळमानाने नियम असलेला खेळ असं समजतो.
3 May 2012 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार
गवि तुम्हाला ह्यातला मुर्खपणा लक्षात येत नाहीये का ?
एकदा म्हणायचे की पेशवे हे अंगवस्त्र बाळगणारे, बाईवेडे, घटकंचुकीचे खेळ खेळणारे इ. इ. होते.
आणि पुस्तक लिहिताना म्हणायचे की 'पेशव्यांच्या रक्तातच पुरुषत्व नसल्याने मग त्यांच्या स्त्रियांचे दरवाजे हे कायम इतर सरदारांसाठी उघडे असायचे.'
दुतोंडी साप आहेत हो हे.
साल आमचा तात्या असता ना आज तशा अशा प्रवृत्तींना कधीच बाहेरचा दरवाजा दाखवून मोकळा झाला असता.
3 May 2012 - 12:33 pm | गवि
ओहो. त्यातलं आहे होय हे.. संदर्भ नव्हता लागला..
मग आमचा फुलस्टॉप..
3 May 2012 - 12:50 pm | बॅटमॅन
>>पेशव्यांच्या रक्तातच पुरुषत्व नसल्याने मग त्यांच्या स्त्रियांचे दरवाजे हे कायम इतर सरदारांसाठी उघडे असायचे.
हा मूर्खपणा आहेच, याबद्दल दुमत असू नये. परंतु दुसरा बाजीराव बाईलवेडा होता यात संशय नाही. "पेशवाईच्या सावलीत" हा त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा लेख वाचावा. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्समध्ये जसे सेक्शुअल वेडाचार चालले होते तसेच यांचेदेखील चालले होते. हे नाकारण्याचे कारण नाहीच. पण पेशवाई म्हटली की तिचे हे उत्तरकालीन मलीन रूपच डोळ्यांसमोर आणले जाऊ नये. आणि तसेही राजे लोक इतके सोवळे कधीपासून झाले? शिवाजीमहाराजांसारखा अपवाद लै विरळा अशा बाबतीत. मग पेशव्यांनीच काय घोडे मारले?
ते असो, बरेच लोक पेशवाईवर सरसकट घसरतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून बाकीचे लोक सरसकट सर्वच गोष्टींवर पांघरूण घालतात, ही यातील खरी मजा आहे.
3 May 2012 - 3:50 pm | योगप्रभू
दुसरा बाजीराव विलासी होताच, पण तसा तो एकटाच नव्हता. बहुतेक सरदार/संस्थानिक तसलेच होते. पुढे इंग्रजांच्या तैनाती फौजेचा स्वीकार करुन या लोकांनी अय्याशीत कालक्रमणा केलेली आहे. एखादेच सयाजीराव गायकवाडांसारखे प्रजाहितदक्ष राजाचे उदाहरण वेगळे. पेशवाई बुडाल्यानंतरच्या काळात भारतातील विविध संस्थानिकांनी जे विलास आणि चैनी केल्या त्यावर एक पुस्तक माझ्या वाचनात आले होते. त्यात भारतातल्या बहुतेक संस्थानिकांच्या कामलीला, लंपटपणा, मूर्खपणाचे जे किस्से वर्णन केले होते त्यापुढे बाजीरावाचे छंद काहीच नाहीत. गुजरात प्रांतातील एका संस्थानिकाला कुत्रा-कुत्रीची लग्ने लावण्याचा नाद होता. त्यावर त्यांनी बरीच दौलत उधळली. रजपुतान्यातील एक संस्थानिक इतके रसिक होते, की त्यांना रात्री तलावात पोहायचा नाद होता. हा तलाव बांधीव पायर्यांचा होता आणि महाराज येताना दुतर्फा नग्न दासींची रांग उभी असे. या दासींच्या पोटावर चामड्याच्या पट्ट्याने मेणबत्त्यांचे स्टँड अडकवलेले असत. खाली तलावात तर महाराजांच्या आवडत्या गोपींचे रासनहाण सुरु असे.
बाजीरावाच्या कामक्रीडांबद्दल प्रथम लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख) यांनी लिहिले. (मजेची गोष्ट म्हणजे यावेळी बाजीरावसाहेब ठणठणीत जिवंत होते व ब्रह्मावर्तास पेन्शन खात मजेत होते. वयही साठीच्या पुढे गेले होते. त्यांना कुणीतरी या लेखनाबाबत सांगितले, पण बाजीरावाने तिकडे फार लक्ष दिले नाही.)अर्थात लोकहितवादींचे पुढे प्रसिद्ध झालेले 'ऐतिहासिक नवलकथा' हे पुस्तक ऐकीव किश्शांवर आधारित असल्याने रंजकता सोडल्यास फार विश्वसनीय मानता येणार नाही. त्या पुस्तकात उल्लेखलेल्या किश्शात बाजीराव एकटाच कृष्ण आणि बाकी सार्या गोपी असत, असे वर्णन आहे. म्हणजे हा 'घटकंचुकी'चा खेळ नसावा. पुन्हा दुसरा बाजीराव शनिवारवाड्यात फारसा राहिला नव्हता. नारायणरावाचे भूत तिथे वावरते, या समजुतीने त्याने बुधवार वाडा आणि शुक्रवार वाडा हे स्वतंत्र वाडे बांधून घेतले होते. त्यामुळे हे विलासी प्रकार शनिवार वाड्यात सुरु असतील का, याबाबत शंका आहे.
3 May 2012 - 4:16 pm | बॅटमॅन
अगदी बरोब्बर. "महाराजा" नामक एक पुस्तक घरी आहे, त्यात या सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे. एका मध्य/उत्तर भारतातील संस्थानिकांची (नाव विसरलो ) लग्नाची गोष्ट अशीच आहे. राजाला लग्न करायचे होते, त्याने जाहिरात दिली- "अमुक जातीतील अमुक गोत्राची दिसायला सुंदर इ.इ.इ. मुलगी पाहिजे". झालं. इतके अर्ज आले की मुलगी खरोखरच "उच्च" रक्ताची/कुलाची आहे का, याची तपासणी करण्याकरिता दवाखाने टाकले गेले!! तपासणीच्या नावाखाली डागदरांनी निवांत हात धुवून घेतले. त्यावर बरीच आरडाओरड झाली, पण ते सर्व दडपण्यात आले. शेवटी २५० मुलींमधून ४ जणी निवडल्या गेल्या. सर्वजणींना एकेकदा भोगून झाल्यावर त्यांपैकी एक राणी झाली व बाकीच्यांची (म्हणजे ४ हा ;)) रवानगी जनानखान्यात झाली.
अवांतरः "लंडन येथील बड्या लोकांची गुप्त कृत्ये" हे २० व्या शतकाच्या पूर्वार्धात अतिशय पॉप्युलर असलेले पुस्तक सध्या कुठेही कुणाकडेही मिळण्याची शक्यता आहे काय? तत्कालीन अनेक लोकांच्या आत्मचरित्रांत त्याचा उल्लेख वाचून उत्सुकता चाळवल्या गेली आहे. मीना प्रभूंच्या "माझं लंडन" मध्येपण त्याचा उल्लेख आहे.
3 May 2012 - 5:39 pm | यकु
>>>>लंडन येथील बड्या लोकांची गुप्त कृत्ये" हे २० व्या शतकाच्या पूर्वार्धात अतिशय पॉप्युलर असलेले पुस्तक सध्या कुठेही कुणाकडेही मिळण्याची शक्यता आहे काय?
---- हे पुस्तक मी एका पुस्तक प्रदर्शनात पाहिलंय. पण त्यावेळी मी भलताच लाजाळू असल्याने, पुस्तक विक्रेता मला अश्लील मुलगा समजेल म्हणून मी ते विकत घेतलं नाही ;-) नुसतं चाळून पाहिलं होतं.
मी तर या पुस्तकाचं नावही विसरुन गेलो होतो.
आता तुम्हाला कुठे आढळलं तर तुम्ही दोन प्रती घ्या, मला आढळलं तर मी घेऊन ठेवीन :)
3 May 2012 - 6:21 pm | बॅटमॅन
ऐला!!!! कुठल्या पुस्तक प्रदर्शनात पाहिलं हो ते? बै द वे ते पुस्तक एका इंग्लिश पुस्तकाचे भाषांतर आहे असे वाचल्याचे स्मरते :) मी पाहतो, मिळाले तर घेऊच ;)
3 May 2012 - 6:25 pm | यकु
बॅटमॅण,
सापडलं! मागवा बरं पटकन :
http://www.bookganga.com/eBooks/Book/4949855723603900143.htm
च्यायला आजवर या पुस्तकाचं नावच आठवत नव्हतं, असं पुस्तक आहे हे माहित होतं. आत्ता तुम्ही नाव सांगितलंत त्यावरुन सर्च मारला तर फटक्यात मिळून गेलं ना.. :)
3 May 2012 - 6:30 pm | बॅटमॅन
हे ए ए धत्तड तत्तड धत्तड तत्तड !!!!! अनेकोत्तम धन्यवाद यक्कू!!!! (आक्रमण!!!! सोबत एक **की स्माइली ;) )
3 May 2012 - 6:36 pm | यकु
<पाताल विजयममधल्या राक्षसाचा टोन सुरु>
ही: हा: हा: हा:
ही: हा: हा: हा:
<पाताल विजयममधल्या राक्षसाचा टोन बंद/>
मूळ इंग्रजीपुस्तक पण फटक्यात सापडलं.. धत्तड् धत्तड् धत्तड् धत्तड्
http://books.google.de/books?id=pmUOAAAAQAAJ&printsec=frontcover&hl=de&s...
3 May 2012 - 6:51 pm | बॅटमॅन
हा प्रतिसाद देण्याचे एकमेव कारण म्हणजे मिपाच्या पेज लेआऊट मध्ये कमेंट्स जास्तीत जास्त किती नेस्टेड होतात, हे पाहणे आहे ;)
3 May 2012 - 6:57 pm | यकु
एक एक अक्षर टांगले जाईपर्यंत आणि प्रतिसादकांचा जीव जाईपर्यंत मिपा टिकून राहू शकते. ;-)
आणखी एकदोन प्रतिसाद झाले की झिरमाळ्या लटकायला लागतीलच ;-)
3 May 2012 - 6:59 pm | मी-सौरभ
खरचं की काय?
बघुया काय होतं ते. ;)
3 May 2012 - 7:01 pm | यकु
बॅटमॅण आता तुमचा येऊ द्या.
आंदो , आंदो, आंदो.. ;-)
3 May 2012 - 8:14 pm | गणपा
काय मंडळी झाली का मज्जा करुन?
की थकलात इतक्यातच? ;)
3 May 2012 - 8:16 pm | यकु
नाय हो
आम्हाला वाटलं बॅटमॅन, यकु आणि राजघराणं यांच्यावर मिपामार्शल चालणार आता ;-)
पण आता तुम्ही आल्याने थोडा धीर आला आहे.
तुम्हीच इथे कात्री चालवली आहे असे शेरलॉक होम्सच्या भिंगातून पाहिल्यावर दिसत आहे ;-)
3 May 2012 - 8:21 pm | मदनबाण
यकु मॄत्यू म्हणजे काय रे ? ;)
3 May 2012 - 7:00 pm | राजघराणं
+१
5 May 2012 - 4:55 pm | अप्पा जोगळेकर
शिवाजीमहाराजांसारखा अपवाद लै विरळा अशा बाबतीत
शिवाजीराजांची देखील आठ लग्ने झाली होती. आता त्याचा आधार घेउन त्यांच्यावरसुद्धा एखाद्याला शिंतोडे उडवायचे असतील तर उडवोत बापडे.
स्त्री ही उपभोग्य वस्तू ही परंपराच सबंध जगात आत्ताआत्तापर्यंत रुढ होती. अर्थातच त्या अनुषंगाने झालेले अपराध त्या त्या व्यक्तींच्या माथी मारण्यात काही हंशील नाही.
3 May 2012 - 12:50 pm | राजघराणं
एकदा न्हवे तिनदा मागितली माफी. आता काय करू मी ?
१) मी सरसकट पेशव्यांविषयी न बोलता; केवळ दुसर्या बाजीरावाविषयी बोलत होतो.
२) आणी मी दुतोंडी साप का आहे ? ते क्रुपया सांगा.
डॉ अभिराम दीक्षित
3 May 2012 - 11:40 am | इस्पिक राजा
नाटकशाळा बाळगुन आणी रमण्यामधे दक्षिणा वाटुन पुणे सांस्कृतिक राजधानी बनते असे तुम्हाला वाटते का
*तर तर पेशवाई बुडवली हो त्या बाजीरावाने मस्तानीपायी.
* एका शनिवारी शनिवारवाड्यासमोर एका सज्जन युवकाकडुन बाजीरावाची आईबहीण काढुन उद्धार होत असताना ऐकलेली ही थोर माहिती वाचुन कान तृप्त झालेला.
3 May 2012 - 1:31 pm | मृगनयनी
ह्म्म.. म्हण्जे एकतर तो युवक 'सज्जन' नक्कीच्च नसणार! किन्वा मग "पेशव्यांचा शनवारवाडा" ओरिजिनल असून तो 'लाल महाला'पेक्षा बराच मोठा आहे.. हे सत्य बहुधा त्यास पचले नसावे! ;)
किंवा मग तो युवक 'अफजलखान कबर संरक्षण समिती'चा आजीवन सदस्य असावा... त्यामुळे मस्तानी'सारखी मुस्लिम सुन्दरी एका तेजस्वी ब्राह्मणाला (पक्षी: पहिल्या बाजीरावांना) कशी काय वश झाली, याचा मत्सरयुक्त सल त्याच्या मनात असावा!
;) ;) ;)
6 May 2012 - 3:03 pm | सुकामेवा
माझ्या माहिती प्रमाणे ती मुसलमान नव्हती, राजा छत्रसाल या हिंदू राजाची मुलगी होती. तिची आई मुसलमान होती.
3 May 2012 - 5:06 pm | राजघराणं
आमच्या भाउंना काय बोलायचा नाय हां !
2 May 2012 - 4:45 pm | अँग्री बर्ड
" मनसेचे दिवंगत आमदार गोल्डमॅन रमेश वांजळे यांच्यानंतर राजकीय क्षेत्रात एक नवीन गोल्डमॅन उदयास येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं नावं आहे सम्राट मोझे....त्याच्या अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं आहे. पुण्यात राष्ट्रवादीकडून पुणे मनपा निवडणूक उमेदवारी मागण्यासाठी सम्राट मोझे हा साडे आठ किलो सोनं घालून राष्ट्रवादीच्या मुलाखाती करता हजर होता. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेचा सोन्याचा रेकॉर्डही त्याने ब्रेक केल्याचं सांगितलं जातं आहे. अंगावर दोन किलो सोनं असलेल्या रमेश वांजळे यांना राष्ट्रवादीनं तिकीट नाकारलं होतं. सम्राट पुण्याच्या संगमवाडीच्या प्रभाग क्रंमाक 13 मधून निवडणूक लढविणार आहे. आपण केलेल्या सामाजिक कार्यामुळे अजित पवार हे आपल्यला पुणे महानगर पालिका निवडणुकीची तिकीट देणारच असा विश्वास सम्राट मोझो यांनी व्यक्त केला आहे. आता या नव्या गोल्डमॅनला पुणे मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी तिकीट देणार का , याकडे सवांर्चं लक्ष लागलं आहे. "
हे त्याने स्वतः टाकलेले फेसबुकचे स्टेटस वाचा.. मनपा निवडणुकीपूर्वी :D :D :D
2 May 2012 - 4:50 pm | अँग्री बर्ड
बाकी जरी विडंबन , खिल्ली इत्यादी जरी असले तरी राजश्रिया विराजित, अखंडित लक्ष्मी अलंकृत, सकल राजकार्य धुरंधर, प्रौढ़ प्रतापवंत, समरधुरंधर, सकल गुणऐश्वर्यसंपन्न, मोक्षश्रियाविराजित अर्थशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष ,सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न ह्या पदव्यांचा अपमान होऊ नये. त्या ज्यांच्यासाठी होत्या त्यांच्यासाठीच राहाव्यात . बाकी पेशवाईचा आणि ह्याचा ओढूनताणून संबंध जोडला नसता तरी चालले असते असे म्हणतो.
2 May 2012 - 5:00 pm | राजघराणं
ह्या पदव्या कोणासाठी राखीव होत्या ते कळेल का ?
आणी (उत्तर) पेशवाईचा संबंध जुळवण्यासाठी - पुणे शहराचे वर्णन हे समकालीन पुस्तक वाचावे.
2 May 2012 - 5:04 pm | गणपा
चोरट्यांनी देवाला चोरण्या पेक्षा यालाच उचलले असते तर इतरांनी उलट दुवाच दिला असता. ;)
2 May 2012 - 6:25 pm | नाना चेंगट
चोरटा चोराला उचलत नसतो. एक म्हण.
2 May 2012 - 6:38 pm | चिंतामणी
:D
2 May 2012 - 6:36 pm | श्रीरंग
http://www.facebook.com/media/set/?set=a.163836267010015.38322.100001509...
सम्राटभाऊंचा जयंती सोहळा!!
2 May 2012 - 7:06 pm | अत्रुप्त आत्मा
खहपलो आहे...
2 May 2012 - 7:57 pm | रेवती
बापरे! यांना आहे का कोणाची भिती?
आम्हाला मेली अर्ध्या तोळ्याची साखळी घालून फिरताना जीव जाईल काय असं वाटतं.
3 May 2012 - 1:49 pm | सूड
>>आम्हाला मेली अर्ध्या तोळ्याची साखळी घालून फिरताना जीव जाईल काय असं वाटतं.
असं वाटणार्यांचे दागिने खरे असतात गं आज्जे. याचे १८ कॅरेटचे असले तरी फार. भावीण नाचत्ये म्हणून न्हावीण नाचलीच पाह्यजे अशी गत ह्यांची.
3 May 2012 - 7:36 pm | रेवती
१८ कॅरेटचे असले तरी फार
हात्तिच्या! म्हणजे इथेही कमी क्यारटाचा घोळ आहेच.
काय नाय रे, यांचं सगळं चालून जातं.
2 May 2012 - 8:44 pm | पैसा
वैद्यबुवांची बखर फार आवडली.
3 May 2012 - 7:54 pm | मदनबाण
मस्त लिहलय ! :)
सुवर्णमयी (आयडी नाही हो)मोझे ला पाहण्याची परत एकदा इच्छा झाली ! ;)
मग जालावर हा फोटु सापडला !
बाकी केरळातल्या पोरीशी लगीन केल तर होलसेल मधे सोन गावतया !
कसं ?
ते असं...
छ्या लयं मोठा चानस घालवला म्या ! ;)
3 May 2012 - 8:04 pm | मृगनयनी
मदनबाण'जी... लयी भारी!!!
सम्राट मोझे' यांचा फोटो, दागिने, स्पेशली हातातल्या बान्गड्या आणि पोटावर हात ठेवून बसण्याची स्टाईल ...एकन्दर चेहर्यावरचे एक्सप्रेशन्स पाहून "डोहाळेजेवण" असल्याचा आभास होतोय!!! फक्त एका मुकुटाची कमी आहे! ;)
खालच्या फोटोतल्या केरळी सुकुमारीं'ना टफ देताहेत सम्राट मोझे!!!
बाकी मिसळपाव'वाल्यांचे साऊथ इन्डियन सुन्दर्यांकडे भारीच हो लक्ष!!! ;) ;)
3 May 2012 - 8:12 pm | मदनबाण
चेहर्यावरचे एक्सप्रेशन्स पाहून "डोहाळेजेवण" असल्याचा आभास होतोय!!! फक्त एका मुकुटाची कमी आहे!
<पकाका मोड ऑन> हॅहॅहॅ हॅहॅहॅ<पकाका मोड ऑफ> ;)
बाकी मिसळपाव'वाल्यांचे साऊथ इन्डियन सुन्दर्यांकडे भारीच हो लक्ष!!!
खी खी खी ! सुंदर्यांकडे लक्ष द्यायच नाय तर कोनाच्याकडं लक्ष द्यायच ? ;) तसेही मिपाकरांना अनुष्का वहिनी ठावुकच आहेत म्हणा ! ;)
2 May 2012 - 11:30 pm | आशु जोग
आपल्या 'सोन्यासारख्या माणसाचे' हे भाच्चे आहेत काय ?
3 May 2012 - 2:06 pm | अमोल केळकर
सम्राट मोझे यांचे मोजे ही सोन्याचे आहेत का? नाही त्यांचे पाय दिसत नाहीत :)
अमोल
3 May 2012 - 3:23 pm | इरसाल
की मोझेस भौंचा मार्ग इतका जिलेबी सारखा सरळ वळणाने जातो.
बाकीचे भौ/तै धाग्याला द्रौपदीची साडी समजू र्हायले काय ?
3 May 2012 - 5:14 pm | फारएन्ड
सरकारी खर्चाचे सामान्य माणसाला न कळणारे असे काहीतरी गहन अर्थ दडलेले असतात. सरकार करते ते जसे सर्व योग्यच असते तसेच काही हे असावे. आपल्याला झेपत नाही म्हणून आपण टीका करतो. खात्रीशीर सूत्रांकडून समजते की हे सीबीआय चे अंडरकव्हर एजंट असून पुण्यात वाढत्या दागिनेचोरीच्या घटनांना आळा बसावा म्हणून डीकॉय दागिने घालून शहरभर (फ्लेक्सरूपे) वावरत आहेत. कोणी हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला की लगेच सापडेल. मग लोकांना समजेल त्याची उपयुक्तता!!!
3 May 2012 - 6:02 pm | गणपा
या धाग्यावरचा आवडलेला एकमेव प्रतिसाद. :)
3 May 2012 - 8:08 pm | वेताळ
मजा आली वाचुन...........दुसर्यांची लफडी एकायला खुप मजा येते.
4 May 2012 - 11:17 am | निनाद
हे तर चालते फिरते सोन्याचे दुकान वाटते आहे.
पुण्यात काय सर्व्हिसेस तयार होतील काही सांगता येत नाही!
5 May 2012 - 12:08 am | विकास
खरे आहे...
नाव सम्राटभाऊ, हाती सोन्याचा वाळा, गळी सोन्याच्या माळा... :-)
5 May 2012 - 12:17 am | यकु
आज पुन्हा एकदा फोटो पाहून राजकुमारने बप्पी लाहिरीचे दागिने पाहून मारलेला डायलॉग आठवला -
जानी, सिर्फ मंगलसूत्र की कमी है ! ;-)
सम्राटभाऊंसमोर कुणीतरी पुणेकराने हा डायलॉग मारावा आणि पळून यावे ;-)
5 May 2012 - 1:19 am | रेवती
कुणीतरी पुणेकराने हा डायलॉग
औरंगाबादकरही चालतात हे बोलायला........आणि सुचवणीही तिकडूनच आलीये म्हणताना त्यांनी बिन्धास्त जावे असे आम्ही सुचवतो.;)
5 May 2012 - 1:22 am | विकास
पेशवाईचे दिवस पुन्हा येवोत ही विघ्नकर्त्या गणेशचरणी प्रार्थना.
विघ्नकर्त्या का विघ्नहर्ता?
5 May 2012 - 9:01 pm | बालगंधर्व
समरत भाऊनी तिकिट मिलन्यसाठी फत्क दागिन्याचे प्रदर्शन करावे. पन नन्तर निवडुम्न आल्यनन्तर ते सगळे दागिने दान करावेत गोर्गरीबाना. वाट्ल्यास त्याचे पैसे करून तो पैसा जन्तेसा/थी वापरावा. त्यमाध्येच पूर्ण देशाचे हित समावले गेले आहे.
6 May 2012 - 12:19 pm | गणामास्तर
चान चान..
चालुद्या..