भाषांतरीयाचा दृष्टांत

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
25 Apr 2012 - 6:42 pm

कोणी एक भाषांतरी असे. तो भाषांतर करी. हिंद गीत आणिक आंग्लभाषिक वेचे निवडी. अर्थाचा अनर्थ करण्याचा निर्धारु करी. वाक्यागणिक गहन मरहट्ट प्रतिशब्द ठेवी. मग त्या मुळ लिखिताची काशी होई. ही काशी आणिकी जालस्थळाचा आणिकी जालस्थळा पाडी. कुणी वाचक तयास साद देई. कुणी कावून हेच कर्म करुन पलटवार करण्या प्रवृत्त होई. परी भाषांतरी भाष्यकर्माचा वगळ ना करी.

सुत्र : भाषांतरकर्मे आविष्कारु केल्यावीण धनार्जननिवृत्तू प्रसिद्धीस पात्र नव्हे.

शब्दक्रीडाभाषांतर

प्रतिक्रिया

उपवाक्य: कवणे काळी येक धना वाकडियाचा होता. तेणें भाषांतर महाभाष्‍यकारास बहुत छळून उच्छाद मांडिला. तयाचे भेणें महाभाष्‍यकार जालस्‍थळास पारखे झालें.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2012 - 6:50 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! धागा आणि प्रतिसादु दोन्ही उत्तम असे!

बादवे, दृष्टांतु असं हवं ना? ;)

मस्त कलंदर's picture

25 Apr 2012 - 7:25 pm | मस्त कलंदर

तुम्हाला कुणाचे धागे वाचायचे नसतील तर उघडूच नका ना. असा धागा काढून कुणाला टारगेट करणे बरे नव्हे.

धन्या's picture

25 Apr 2012 - 8:01 pm | धन्या

लोकांनी हिंदी गाण्यांची आणि इंग्रजी निबंधांची काशी घातली तरी चालते. आणि आम्ही जरा कुठे बाराव्या शतकातल्या एखादया लीळेवर आधारीत एखादा दृष्टांत लिहीला तर एव्हढं का बरे खटकावे?

त्यांनी भाषांतर केलं तर आविष्कार आणि आम्ही काही खरडलं तर अत्याचार, हा कुठला न्याय म्हणायचा?

प्यारे१'s picture

26 Apr 2012 - 10:46 am | प्यारे१

>>>त्यांनी भाषांतर केलं तर आविष्कार आणि आम्ही काही खरडलं तर अत्याचार, हा कुठला न्याय म्हणायचा?

धागा कर्त्यासाठी :
१. बाब्या, कार्टं ही म्हण माहिती करुन घ्यावी.
२. 'पुराने ताल्लुकात' असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
(सरफरोशः डोन्ट माईन्ड दिल्लीसे हमारे संबंध है)
३. नसतील तर (मुद्दा २)ते तसे बनवावेत आणि लोणचं मुरतं तसे मुरेपर्यंत वाट बघावी.
४. टारगेट्ला टारगेट करणं पण तितकंसं उचित नाही पण ते तसंच असेल असं नाही हे लक्षात ठेवावं...
५. तसं झाल्यास (मुद्दा ४) लेख न उघडण्याचं, उघडला तरी न वाचण्याचं, वाचला तरी गप्प बसण्याचं 'स्वातंत्र्य' आहे असं नम्रपणे सांगावं.
६. आपला तो विधायक कामांसाठी बनलेला समूह्/ग्रुप इतरांचा तो कंपू हे ध्यानात घ्यावं
७. कंपूगिरी बद्दल जुने जाणते बोलतात तेव्हा काहीही म्हणायचं टाळावं.
८. बर्‍याच दिवसांपासून एकाच मताचे लोक एकत्र विचार/डिशेस्/ग्लास/ पैसा इ.इ. ची देवघेव करत असतात त्यांच्यामध्ये एकवाक्यता असते /असू शकते एवढंच लक्षात ठेवावं.
९. तुम्ही तसे करण्याचा (मुद्दा ९) प्रयत्न करु नये. केल्यास तुम्ही कंपूबाज ठरु शकता. (जसे भाजप हा नेहमीच जातीयवादी असतो)
१०. ......
११. ........

धन्या's picture

26 Apr 2012 - 3:10 pm | धन्या

आताही म्हणतो. तुम्ही धन्य आहात महाराज. :)

रेवती's picture

25 Apr 2012 - 8:03 pm | रेवती

सहमत.

यकु's picture

25 Apr 2012 - 8:04 pm | यकु

कुणाशी?

मकशी सहमत. आपल्याला नाही आवडत तर ती गोष्ट वाचू नये. वाईट साईट नाही ना काही मग झालं तर.;)
बाकी तुमचा कंटाळा पळून गेलेला दिसतोय. अतर्क्य विचारही कमी झालेले दिसतायत. आम्हाला उगीच काळजी लावलीत.;)

>>> मकशी सहमत.

@ धन्या: बस आता बोंबलत :p

>>>बाकी तुमचा कंटाळा पळून गेलेला दिसतोय. अतर्क्य विचारही कमी झालेले दिसतायत. आम्हाला उगीच काळजी लावलीत.
--- हॅहॅहॅ :)
काही विशेष नव्हतं हो, उगीच आपला रुचीपालट म्हणून.
थँक्स.

धन्या: बस आता बोंबलत.

का बरं? आम्ही आमचा आविष्कार व्यक्त केला. :)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 11:47 am | परिकथेतील राजकुमार

तुम्हाला कुणाचे धागे वाचायचे नसतील तर उघडूच नका ना. असा धागा काढून कुणाला टारगेट करणे बरे नव्हे.

मके ?
हा धागा उघडून तू असे लिहावेस? ;)

आपल्याला काय करायचे आहे कोण काय करते त्याच्याशी ? जे चालू आहे ते योग्य आहे का बरोबर आहे ते ठरवण्यासाठी संपादक मंडळ आहे की नेमलेले. आपण चांगलेपणा देखील घेऊ नये आणि वाईटपणा देखील घेऊ नये. :)

बाकी तुला अधिक सां. न. ल.

@धन्याशेठ :- अविष्कार आवडला. अर्थात तुम्हाला चार दिवस काही मान्यवर लोकांची शिकवणी लावणे आवश्यक आहे असे सुचवतो. असे लिखाण जरुर करावे, पण ते असे असावे की समोरच्याला 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार'. म्हणजे मग आपल्यावरती दोषारोप होत नाहीत आणि कार्यभाग देखील साधून जातो.

काय बोल्ताव ?

अर्थात तुम्हाला चार दिवस काही मान्यवर लोकांची शिकवणी लावणे आवश्यक आहे असे सुचवतो. असे लिखाण जरुर करावे, पण ते असे असावे की समोरच्याला 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार'. म्हणजे मग आपल्यावरती दोषारोप होत नाहीत आणि कार्यभाग देखील साधून जातो.

सल्ल्यासाठी धन्यवाद. आम्हाला अशी एक व्यक्ती माहिती आहे. त्यांना भेटायला या विकांताला निंबाळकर तालमीत जातो. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Apr 2012 - 10:37 pm | llपुण्याचे पेशवेll

चला म्हणजे आता पर्‍याला जालावरील अवतार कार्याची समाप्ती करण्यास हरकत नाही. :)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Apr 2012 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

चला म्हणजे आता पर्‍याला जालावरील अवतार कार्याची समाप्ती करण्यास हरकत नाही.

प्रतिसादाची तारिख आणि वेळ पाहून डोसक्याला हात मारुन घेतला आहे. तेज्यायला, तुला नको ते सगळे वरे लक्षात राहते बे.

असो...

' पुप्या, आपले काय ठरले आहे...' हे वाक्य लिहिण्याचा मोह कटाक्षाने टाळलेला आहे.

पैसा's picture

25 Apr 2012 - 8:05 pm | पैसा

उत्तम असे, परंतु अल्पाक्षरी जहाला.

धन्या's picture

25 Apr 2012 - 8:13 pm | धन्या

परंतु अल्पाक्षरी जहाला.

क्षमस्व. पण काय करणार भाषांतराच्या आविष्काराला मुळ साहित्याच्या मर्यादा पडतात. ;)

महानुभाव पंथाच्या लीळाचरीत्र ग्रंथामध्ये "गुळहारीयाचा दॄष्टांत" म्हणून एक लीळा (म्हणजेच रुपक/लघूकथा वगैरे) आहे. ती एव्हढ्याच लांबीची आहे. :)

रच्याकने, ही मुळ लीळा खुप सुंदर आहे. तिचा सुत्र म्हणून जो एक वाक्याचा भाग आहे तो तर खुपच अर्थगर्भ आहे, "मळकर्मे निवर्तलेयावीण जीवू कृपेशी पात्र नव्हे".

मस्त कलंदर's picture

25 Apr 2012 - 8:47 pm | मस्त कलंदर

प्रत्येक व्यक्तीचा काही छंद असतो. तो दुसर्‍या प्रत्येकालाच आवडतो असं नाही. पण म्हणून सतत त्या लोकांच्या धाग्यावर जाऊन वाकुडेपणाने निषेध नोंदवायलाच हवा असं नाही. स्वतः रोज अवांतराची रांग लावणार्‍या आणि नियमित रतीब घालणार्‍या कंपूने दुसर्‍या कुणी किंवा नवख्याने काही लिहिलं की तिथे लगेच जिलेबी म्हणून येणं, जर्रा काही दिसलं की पाड विडंबन करणं इ. इ. मलाही नाही आवडत. पण मग दुसरे काहीतरी करतात म्हणून गळे काढण्यापेक्षा आपण तेवढंतरी करतो हा विचार करते आणि तशा धाग्यांवर काट मारते.

तुमच्या आतापर्यंत टोमणे मारणार्‍या प्रतिक्रिया होत्या तोवरही मी काहीच म्हटलं नव्हतं, पण आता त्यासाठी खास गुळाहारियाचाच बळी दिलेला पाहून राहावलं नाही. असो.

तुमच्या आतापर्यंत टोमणे मारणार्‍या प्रतिक्रिया होत्या तोवरही मी काहीच म्हटलं नव्हतं, पण आता त्यासाठी खास गुळाहारियाचाच बळी दिलेला पाहून राहावलं नाही.

अशा पद्धतीचे लेखन इतरांकडूनही आधी झालंय तेव्हा अशी जळजळ जाणवली नव्हती.

असो. :)

सुहास..'s picture

26 Apr 2012 - 12:23 pm | सुहास..

धन्या , धाग्यापेक्षा तु व्यक्त केलेले विचार आवडले.

काही लोक्स आधी ते स्वता काय ( आणि काय काय) झक मारत होते हे विसरले आहेत ;)

टिआरपी करिता ह्याची लाल, आणी त्याची टवाळी न करणारा, स्पष्ट
वाश्या

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Apr 2012 - 12:06 am | विश्वनाथ मेहेंदळे

मकी मावशी मुद्दा पटला. एकदम १००%. पण हीच गोष्ट अजून जुना कंपू पण करायचा / करतो, त्यांना माफ का ??

हे म्हणजे "ये करे तो बलात्कार और वो करे तो चमत्कार" अशातला प्रकार झाला.

तसं नव्हे, ते एक गाणं आहे ना वो करे तो रासलीला ;)

आज्जे, तुला नक्की कोणाचं मत पटलंय ते ठरव एकदा ! ;)

मी फक्त त्याच अर्थाचं दुसरं गाणं सुचवलं. ;)
खरं तर दोन्ही बाजूचे म्हणणे मान्य आहे.
दोन्ही बाजूच्या म्हणण्यात थोडे तथ्य आहे.

>>>खरं तर दोन्ही बाजूचे म्हणणे मान्य आहे.
दोन्ही बाजूच्या म्हणण्यात थोडे तथ्य आहे.

म्हणजे
१) ज्यू - पॅलेस्टाईन
२) भारत पाकिस्तान (काश्मीर )
३) ब्रिटीश - आयरीश
४) मराठी अमराठी
५) पोलीस - आर्मी

आणि..

जुना कंपू व नवीन कंपू हे वाद जगाच्या अंतापर्यंत चालू रहाणार तर... :-)

मी भित्री आहे हे खरेच पण तू ब्रह्मराक्षस आहेस काय मोदका?;)
सारखा आपला पाठलाग करतोय.;)
तरीही सांगतेच आता तुला.
मकची बाजू घेतलीये कारण ती आमच्या किंवा मी त्यांच्या पाशवी ग्यांगमध्ये आहे.
धनाजीरावांना दुखावून चालणार नाही कारण पहिल्या नंबरात आलेल्या माझ्या मन हेलावून टाकणार्‍या कवितेचे बक्षिस अजून मिळायचे आहे.

मोदक's picture

28 Apr 2012 - 10:01 am | मोदक

वाईड बॉल.

>>>मी भित्री आहे हे खरेच पण तू ब्रह्मराक्षस आहेस काय मोदका?
वयाने मोठी (कृपया वयस्कर असे वाचू नये) आणि पिकलेली* झाडे कमी झालीत आजकाल. :-)

>>सारखा आपला पाठलाग करतोय.
मी..? कधी..? कुठे..? केव्हा..? :-)

* पुलंचा छान पिकत जाणारे म्हातारपण नावाचा लेख

हलके घे गं आज्जे.. नंतर कधीतरी वचपा काढू नको - पुढचे बोलणे खवत करुया. धनाजीराव पेटले तर तुझे बक्षीस माझ्या गळ्यात मारतील. :-D

धनाजीरावांना दुखावून चालणार नाही कारण पहिल्या नंबरात आलेल्या माझ्या मन हेलावून टाकणार्‍या कवितेचे बक्षिस अजून मिळायचे आहे.

ए आज्जे, असं नातवंडांना खोटं नाही पाडायचं. मी तुला तेव्हाच "कोशिंबीरीच्या १०१ अभिनव रेसीपीज" म्हणून पुस्तक पाठवणार होतो. तूच नको म्हणालीस. :)

बरं ते सुडच्या वधूसंशोधन कुठपर्यंत आलं? ते हातावेगळं झालं की सांग, आमच्या एका भाषांतरकार मित्राला मार्गी लावायचं आहे. काही खुळचट प्रश्न पडतात त्याला. अगदी लोकांनी वेडयांच्या डॉक्टरला दाखवून घे म्हणण्याईतके. ;)

नाही नाही. तुम्हाला खोटं ठरवत नाहिये. तुम्ही आग्रहच केला होता.
खरं सांगायचं तर ते पुस्तक टोपणनावाने मीच लिहिलय. अज्याबात खपलं नाही.
ज्यांनी विकत घेतलं त्यांनी 'पैसे परत नकोत पण पुस्तक आवरा' म्हणून मला पाठवून दिलं.
तुम्हीही आणखी एक कॉपी दिली तर ........ म्हणून नको म्हटलं.;)

५० फक्त's picture

26 Apr 2012 - 7:21 am | ५० फक्त

सहमत, अगदी १००%. हे म्हणजे हॉस्टेलच्या शिनियर्सनी फायनल इयरची परीक्षा आहे म्हणुन ज्युनियरनी ३१ साजरी करु नये असं म्हणण्यासारखं आहे.

मै करु तो साला कॅरॅक्टर ढिला है,

अवांतर - धनाजीराव परवाच तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या की ओ, असो. ती जुनी एक्सेल फाईल हरवली काय ? माझ्याकडे एक कॉपी आहे, देउ का पाठवुन.

अगदी हेच लिहायचा विचार चालला होता, पण मग विचार सोडून दिला. कारण इथे कसं आहे की.......असो. फार काय बोलायचं.

@विमे

मागे म्हटल्याप्रमाणे.. तुमचे मिपावरील वयोमान साडेतीन ते साडेचार वर्षे असल्याशिवाय तुम्ही चमत्कारास पात्र नाही...

असो बाकी चालू द्या ....

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2012 - 10:49 am | अत्रुप्त आत्मा

आपल्याला अजुन किती वर्षे आहेत? :-p

रामपुरी's picture

25 Apr 2012 - 11:20 pm | रामपुरी

आवडलं नाही. फालतूपणा आहे... :) :)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2012 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

संजय क्षीरसागर's picture

26 Apr 2012 - 12:55 am | संजय क्षीरसागर

धन्या, यकु की पोस्ट?

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2012 - 7:11 am | अत्रुप्त आत्मा

@धन्या,यकु की पोस्ट >>> धागा व त्यावर होणारी उत्तर-क्रीया पाहुन,आंम्ही स्वत:च निर्वाण पावलो आहोत. ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Apr 2012 - 3:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझी पावली कमी असल्यामुळे मूळ दृष्टांत उमगत नव्हता. हा दृष्टांत वगळण्यामुळे पूर्णांक वळण* बोसॉनप्रमाणे बेचव असणारे आमचे आयुष्य आता अर्ध-पूर्णांक वळणी** फर्मिऑनप्रमाणे रोचक बनले आहे. अशा निरस आणि बेचव आयुष्यापासून आम्हांस वाचवण्याबद्दल धन्यामहाराज माऊली यांची मी अतिशय आभारी आहे.

आमच्या आयुष्यात यापुढे कधीही चंद्रशेखर*** मर्यादेचा भंग झाला तरीही मुळातल्या अर्ध-पूर्णांक वळणी फर्मिऑनचे रुपांतर बेचव पूर्णांक वळणी बोसॉनमधे होऊ नये. आमेन.

* integer spin
**spin-half particles
***हे चंद्रशेखर मनुष्य होते आणि मराठी भाषिक नव्हते.

हा दृष्टांत वगळण्यामुळे पूर्णांक वळण* बोसॉनप्रमाणे बेचव असणारे आमचे आयुष्य आता अर्ध-पूर्णांक वळणी** फर्मिऑनप्रमाणे रोचक बनले आहे.

बा**ला, वाचणार्‍याच्या डोक्याची मंडई झाली तरी चालेल, पण आपला भाषांतराचा अट्टाहास पुर्ण झाला पाहिजे अशा मताच्या दिसताय तुम्ही. ;)

अशा निरस आणि बेचव आयुष्यापासून आम्हांस वाचवण्याबद्दल धन्यामहाराज माऊली यांची मी अतिशय आभारी आहे.

आम्ही प्रसिद्धीहव्यासी | आलो याच कारणासी ||

कवितानागेश's picture

27 Apr 2012 - 1:23 pm | कवितानागेश

पूर्णांक वळण =* integer spin ??!!
भयानक!! :D :D :D

btw, integral spin असतंय ते...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Apr 2012 - 1:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हां, मग प्रसिद्धी काय एकट्या धन्यालाच मिळावी का? आम्ही काय घ्वाडं मारलंय का कोणाचं? मला पण प्रसिद्ध व्हायचंय.

btw, integral spin असतंय ते...

ते भारतीय इंग्रजीत. मी इंग्लिश 'बोलायला' सायबाच्या देशात शिकले त्यामुळे त्यांच्यासारखंच बोलते.

All observed bosons have integer spin, as opposed to fermions, which have half-integer spin. विकीपिडीयाच्या बोसॉनच्या पानावरून.

वरील दृष्टांताचा धडा आठवीत की नववीतल्या बालभारतीच्या (मराठीच्या) पुस्तकात होता असे आठवते. नक्की कोणत्या यत्तेत होता कुणाला माहीत आहे काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2012 - 7:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्येक व्यक्तीचा काही छंद असतो. तो दुसर्‍या प्रत्येकालाच आवडतो असं नाही. पण म्हणून सतत त्या लोकांच्या धाग्यावर जाऊन वाकुडेपणाने निषेध नोंदवायलाच हवा असं नाही.

आणि
कुणाचे धागे वाचायचे नसतील तर उघडूच नका ना. असा धागा काढून कुणाला टारगेट करणे बरे नव्हे.
आणि

नवख्याने काही लिहिलं की तिथे लगेच जिलेबी म्हणून येणं, जर्रा काही दिसलं की पाड विडंबन करणं इ. इ. मलाही नाही आवडत.

कोणत्याही काळात म. आंजालावर उपयोगी पडणारा विचार.

-दिलीप बिरुटे

मस्त कलंदर's picture

26 Apr 2012 - 5:59 pm | मस्त कलंदर

विमे, धन्या
हा प्रकार जुने जाणते करोत अथवा नवखे याने मला फरक पडत नाही. हे असे धागे आधीही निघाले असतील आणि मी वाचले नसतील तर नक्कीच मी तिथे हा प्रतिसाद दिला नसेल्/नाही.

परा,
शीर्षकावरून अर्थाचा बोध होत नाही, त्यामुळे धागा उघडला गेला. आणि एकाच व्यक्तीकडून(उदा. आपण स्वतः) अतिशय सकस तसेच अतिटुकार लेखन येऊ शकते याची आम्हाला जाणीव असल्याने मी लेखकाचे नांव पाहून धागा सहसा टाळत नाही. (अशा लोकांची यादी वेगळी आहे) त्यामुळे धागा वाचण्याचे आणि निषेध करण्याचे पातक घडले.

प्यारे१ आणि सुहास...
भावना पोचल्या. मी स्वतः जे काही लिहिते त्याचीच जबाबदारी माझी आहे. म्हणजेच माझ्याशी मित्रसंबंध असणारे आयडी धारक काय करतात व लिहितात तेच माझे म्हणणे आहे असे नाही. यापूर्वी मी लेखन आशय चांगला असेल पण सादरीकरण्/लेखन नीट होत नसेल तर नक्कीच लिहिले आहे पण कुणाच्या लेखनप्रकारावरून कुणाला टारगेट करण्याचे प्रकार केलेले नाहीत.
तेव्हा बाब्या आणि तत्सम वगैरे नेहमीचीच यशस्वी वाक्ये फेकू नका. आणि माझ्या मित्रमैत्रिणींसोबत असणारे तुमचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्कोअर्स माझ्याशी सेटल करण्याचा प्रयत्न तर मुळीच करू नका!!!

प्यारे१'s picture

27 Apr 2012 - 10:48 am | प्यारे१

औद्धत्याबद्दल क्षमस्व मककाकू!

धन्याचे इतर धागे पाहता तो कधीही उगाचच 'जास्त' करीत नाही एवढंच सांगू शकतो.
त्याउप्पर वरचे सगळे लिखाण धन्याला देखील लागू पडतेच की! आणि धन्यालाच का? सगळ्यांनाच.
मग सगळ्यांच्या धाग्यांवर 'अशा' प्रतिक्रिया द्यायचं 'पातक' घडत नाही याचंच आश्चर्य वाटत होतं.
आणि म्हणूनच बाब्या वगैरे . याउप्पर असो आणि असोच.

सुहास..'s picture

27 Apr 2012 - 10:44 am | सुहास..

भावना पोचल्या. >>>

मग पाच सवाष्णांकडुन सत्कार करून घ्या मग पोचल्यालांचा !! :)

मी स्वतः जे काही लिहिते त्याचीच जबाबदारी माझी आहे. >>>

अर्थातच !! हे सांगायची पाळी यावी लागली , यातच सर्व आले

म्हणजेच माझ्याशी मित्रसंबंध असणारे आयडी धारक काय करतात व लिहितात तेच माझे म्हणणे आहे असे नाही. >>>

आम्ही असे कधी म्हणालो ब्वा !! आणि असले तरी तुमच्या म्हणण्याशी आम्हाला काय घेणे-देणे ?

यापूर्वी मी लेखन आशय चांगला असेल पण सादरीकरण्/लेखन नीट होत नसेल तर नक्कीच लिहिले >>>

=)) =)) आपण नेमुन दिलेल्यापैंकी सपांदक/ समीक्षक कोणी तरी एक आहात हे माहीत नव्हतच !! अभिनंदन !! ... वाचक म्हणुन जबाबदारी घेत असाल , तर पध्दत साधी आहे की वाचु नये ...( सोप्प्या भाषेत काड्या करू नये ! )

आहे पण कुणाच्या लेखनप्रकारावरून कुणाला टारगेट करण्याचे प्रकार केलेले नाहीत.>>>>

ते कंपुच्या आडून करावे लागते , चार जण इकडून- तिकडुन बोलवावे लागतात. ;) ( नाही तर " डोक्यावर पडणे " ई. वाक्प्रचार मिपावर रूजू झाले नसते. ), सध्या कंपुच नाही म्हटल्यावर कसे करणार ?

तेव्हा बाब्या आणि तत्सम वगैरे नेहमीचीच यशस्वी वाक्ये फेकू नका. >>>

मोठ्ठे व्हा ,! मी तर बाब्या वगैरै काहीच म्हटलेले नाही....शिवाय कोणाचे ही नाव घेतलेले नाही ....स्पष्ट लिहीलेले आहे ...

आणि माझ्या मित्रमैत्रिणींसोबत असणारे तुमचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्कोअर्स माझ्याशी सेटल करण्याचा प्रयत्न तर मुळीच करू नका!!! >>>>

सल्ल्या बद्दल धन्यवाद !! हे असले ( भिकारचोट ...सल्ले भिकारचोट म्हणतो आहे ..)सल्ले एकायचे की नाही हे आम्ही आमच पाहुन घेवु !!

बाकी राहिली स्कोअर्स सेटलमेंट बाबत : TIT FOR TAT हे फक्त शाळेतल्या बोर्डावर असते असे नाही ..

मस्त कलंदर's picture

27 Apr 2012 - 11:05 pm | मस्त कलंदर

मी धन्या यांना दिलेला प्रतिसाद एक वाचक म्हणून होता, त्यासाठी संस्थळावर कोणतेही पद असणे गरजेचे नाही.

ते कंपुच्या आडून करावे लागते , चार जण इकडून- तिकडुन बोलवावे लागतात. ( नाही तर " डोक्यावर पडणे " ई. वाक्प्रचार मिपावर रूजू झाले नसते. ), सध्या कंपुच नाही म्हटल्यावर कसे करणार ?

हे असले प्रकार मी कधीही केलेले नाहीत. पण माझे मित्रमैत्रिणी जे करतात ते अप्रत्यक्षपणे मीही केले असेच तुम्ही वरच्या ओळीतून सुचवत आहात त्यामुळेच वरचे " मी लिहिते तीच फक्त माझी जबाबदारी " हे लिहिणे भाग पडले.

बाकी राहिली स्कोअर्स सेटलमेंट बाबत : TIT FOR TAT हे फक्त शाळेतल्या बोर्डावर असते असे नाही ..

याबद्दलही माझ्या वरच्याच प्रतिसादातली वाक्ये परत लिहित नाही.

असो... मुद्दे नसल्यावर केवळ गुद्द्यांनीच बोलता येते. अर्थातच ज्यांना सभ्य भाषा वापरता येत नाही, त्यांना मला याउप्पर काही उत्तर द्यायचे नाहीय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Apr 2012 - 1:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मके, तुलाही अंमळ गुरूची गरज आहे. डोक्यावर पडण्याचे परिणाम दिसण्याआधी आणि गुरू सूर्यतेजात लुप्त होण्याआधी गुरूदर्शन घे; ते नाही जमलं तरी (ओरिगिनल) गुर्जींचा हा धागा वाच. आपली मराठीच आहेस म्हणून जादा काळजी हो तुझी!

सुहास..'s picture

28 Apr 2012 - 9:58 am | सुहास..

मी धन्या यांना दिलेला प्रतिसाद एक वाचक म्हणून होता, त्यासाठी संस्थळावर कोणतेही पद असणे गरजेचे नाही. >>>

आणि त्याच प्रकारे कोणी काय लिहावे आणि काय लिहु नये हे याचं ही स्वातंत्र्य आहे.

हे असले प्रकार मी कधीही केलेले नाहीत. पण माझे मित्रमैत्रिणी जे करतात ते अप्रत्यक्षपणे मीही केले असेच तुम्ही वरच्या ओळीतून सुचवत आहात त्यामुळेच वरचे " मी लिहिते तीच फक्त माझी जबाबदारी " हे लिहिणे भाग पडले. >>>

दिसताहेत याच धाग्यावर माश्या घोंघावत आलेल्या !!

द्दे नसल्यावर केवळ गुद्द्यांनीच बोलता येते. अर्थातच ज्यांना सभ्य भाषा वापरता येत नाही, त्यांना मला याउप्पर काही उत्तर द्यायचे नाहीय. >>>

सगळ्याच गोष्टी सभ्य भाषेत सांगायच्या नसतात . कुछ लाथों के भूत .....असो

बाकी : एक म्हण सदैव लक्षात राहिल आमच्या ...करून करून भागले अन देवपुजेला लागले.

दादा कोंडके's picture

27 Apr 2012 - 11:11 pm | दादा कोंडके

डीड समबडी से टीट? :)

शिल्पा ब's picture

28 Apr 2012 - 1:29 am | शिल्पा ब

काय चाल्लंय मला काहीच समजलं नाही. :~

काय चाल्लंय मला काहीच समजलं नाही.

चष्मा लावलाय का? तपासा बरं एकदा :p

'दुर्बिणी' तून बघा ;-)

किंवा

' पैसे' खर्च करा ;-)

आता तर काहीच कळणार नाही :p

धन्या सोड रे... स्वभावाला औषध नाही ! असं कोणी तरी म्हणुन गेलय बघ ! ;)
किंवा गिरे तो भी टांग उपर अशी सुध्दा एक म्हण आहे ना ? ;)

कंपुबाजी करणार्‍यांची मी फक्त मजाच बघतो ! ;) कीव येते बिचार्‍यांची ! ;)

असो... ;)

राजेश घासकडवी's picture

28 Apr 2012 - 9:17 am | राजेश घासकडवी

कोणी एक विडंबकी असे. तो विडंब करी. मरहट्ट गीत, कविता आणिक जालसाहित्य निवडी. अर्थाचा अनर्थ करण्याचा निर्धारु करी. वाक्यागणिक दारू, गिलासू, कजागपत्नीचेष्टा व प्रेयसीचे बापूंनी दियेले पोकलबांबू फटकारू ठेवी. तेणेकरोनि विडंबनेचीही विटंबना होई. आणिकी ही विटंबना जालस्थळा पाडी. कुणी वाचक तयास साद देई. परंतु बहुतेकु कावूनि अपुलेचि मस्तकु फोडण्या प्रवृत्त होई. 'जाहले इतुके पुरे' म्हणोनि शंख करी. परी विडंबकी विटंबकर्माचा वगळ ना करी.

सूत्र : विडंबकर्मे पाडिल्याने विटंबकास 'घटु भिंदी पटु छिंदी' न्यायु लागोनि प्रसिद्धी प्राप्त होय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Apr 2012 - 10:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुठली जुनी मढी उकरतोस रे? इथे दिवसागणिक नवनवे ....... पडत आहेत.

प्रेयसीचे बापूंनी दियेले पोकलबांबू फटकारू ठेवी.

आज जीवन सफल झाले. बाराव्या शतकातील मराठी आणि एकविसाव्या शतकातील मराठीचा असा अनोखा संगम, सुंदर मिलाफ पाहायला मिळाला.

नं मास्तर लय चांगला लिवलाव बोल. :)

साती's picture

28 Apr 2012 - 3:21 pm | साती

लेख आवडला.

आम्ही पार जुन्या काळातील असल्याने हा सिद्धांत आमच्या अभ्यासक्रमात नव्हता. त्यामुळे काही संदर्भ लागले नाहीत.
उदा.
ही काशी आणिकी जालस्थळाचा आणिकी जालस्थळा पाडी.