प्रेम करतो मी तुझ्यावर मनात

वडा खालचा वडा's picture
वडा खालचा वडा in जे न देखे रवी...
21 Apr 2012 - 7:27 pm

प्रेम करतो मी तुझ्यावर मनात
हे काही सांगता येईना तुझ्या कानात |
सांगावे हे तुजला घेउनी हातात हात
म्हणुनी मी आलो घेउनी लाल गुलाब ||

पण पहिले तर आधीच होता लाल गुलाब तुझ्या हातात
मग मी हिरमुसलो मनातल्या मनात |
कारण झाला होता उशीर प्रेम व्यक्त करण्यात
मग मी विचार केला काय अर्थ या जगण्यात ??||

निघून गेलो समुद्रा पाशी प्राण त्यागण्यास ''
मग मात्र परत आले माझ्या लक्षात |
काय आहे हरकत
जिने
सकाळी हा "लाल गुलाब" दिला हातात तिलाच हो म्हणण्यात ?? ||

मोरया .....

हास्यकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Apr 2012 - 6:16 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कळळ नाय!!
कशाचा कशाला काही संदर्भच लागत नाहीये!!

कोणी तरी रसग्रहण करा रे!!

फक्त कविता म्हणून न वाचता मुक्तक म्हणून वाचायचं.

हा कवीचा "प्रेमाचा गुलकंद" टाईप अजरामर काव्य लिहिण्याचा फसलेला प्रयोग असावा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Apr 2012 - 3:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे तुम्हाला कळले आणि तुम्ही ते मला समजावून सांगितलेत त्याबद्दल तुमचे कसे बरे आभार मानू? ;)
कवीला माझे शतशः आभार, असे काव्य दुर्मिळचं.
माझी बुद्धी खरचं कमी पडते हो अशा ठिकाणी. :(

हे तुम्हाला कळले आणि तुम्ही ते मला समजावून सांगितलेत त्याबद्दल तुमचे कसे बरे आभार मानू?

कसचं कसं.

कवीला माझे शतशः आभार, असे काव्य दुर्मिळचं.

हे अगदी लाखमोलाचं बोललात. :)

माझी बुद्धी खरचं कमी पडते हो अशा ठिकाणी.

हरकत नाही. सांभाळून घेतल्या जाईल. ;)

चैतन्य गौरान्गप्रभु's picture

23 Apr 2012 - 4:11 am | चैतन्य गौरान्गप्रभु

ही कवीता म्हणजे स्वानुभवाचा मुक्ताविष्कार आहे असे दिसते. कवीला जो अनुभव आलाय तो तो स्पष्ट लिहून मोकळा झालाय. शेवट सकाळी गुलाब देणा-या व्यक्तीस 'हो' म्हणण्याचा अतीशय उत्तुन्ग आशावाद व्यक्त केला आहे. सकाळी उठून केलेला अभ्यास, सकाळी केलेला व्यायाम, सकाळी केलेली पूजा ज्याप्रमाणे फळते, त्याप्रमाणेच सकाळी भेटलेली व्यक्ती च आयुष्याचे सार्थक करू शकते, असे मतही यातून व्यक्त करण्यात आले आहे.