आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी.त्यांचे पुण्यस्मरण करुन मि.पा.करांतर्फे प्रार्थना लहानपणी शिकलेल्या ह्या श्लोकाने करते.
तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो
त्वदीय गुणकीर्तनध्वनिसुरम्य कर्णी पडो ,
स्वदेशहितचिंतनाविण दुजी कथा नावडो
तुझ्यासमही आमुची तनुही देशकार्यी पडो.
प्रतिक्रिया
1 Aug 2008 - 4:29 pm | अमोल केळकर
त्या महानायकाच्या चरणी माझे 'विनम्र अभिवादन !'
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
1 Aug 2008 - 4:30 pm | मनस्वी
हेच म्हणते.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
1 Aug 2008 - 4:34 pm | प्रमोद देव
लोकमान्यांच्या चरणी माझीही आदरांजली!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
1 Aug 2008 - 5:06 pm | II राजे II (not verified)
महानायकाच्या चरणी माझे विनम्र अभिवादन !
असे महापुरुष महाराष्ट्रात झाले हेच महाराष्ट्राचे भाग्य !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
1 Aug 2008 - 5:30 pm | मदनबाण
रत्नागिरीस भटकंती करत असताना लोकमान्यांचे जन्मस्थळ पाहण्याचे भाग्य लाभले..तेथील हे फोटो..
सदनाच्या आतील भागातील फोटो काढण्यास मनाई असल्याने तेथील फोटो काढले नाहीत..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
1 Aug 2008 - 5:38 pm | धमाल मुलगा
ह्या जाज्वल्य देशप्रेमाने भारलेल्या महानायकाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!
-(नतमस्तक) ध मा ल.
1 Aug 2008 - 6:08 pm | झकासराव
हा महानायक अजुन काहि वर्षे इन्ग्रजांशी झुंज देण्यास हवा होता असच वाट्त अजुन देखील. प्रत्यक्ष इन्ग्रज सरकारच डोक ठिकाणावर आहे का हे विचारण्याच धैर्य असलेल्या ह्या महानायकाच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
1 Aug 2008 - 8:42 pm | चतुरंग
आपल्याला लाभले हे आपले सुदैव आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आपण समर्थ वाटचाल करु शकलो नाही हे आपलेच करंटेपण!
टिळक आणखी २० वर्षे जगते तर भारताचा इतिहास बदलला असता असे वाटते.
त्यांच्या स्मृतींना अनेक प्रणाम!
चतुरंग
1 Aug 2008 - 8:55 pm | प्राजु
माझीही आदरांजली..
इतिहासा तू वळूनी पाहसी पाठीमागे जरा..
झुकवूनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Aug 2008 - 11:46 pm | विसोबा खेचर
लोकमान्यांना माझाही दंडवत!
तात्या.
2 Aug 2008 - 1:32 am | बिपिन कार्यकर्ते
लोकमान्यांना कृतज्ञतापूर्वक दंडवत.
झकासराव, चतुरंगशेठ यांच्याशी सहमत. लोकमान्य अजून काही वर्षे आपल्याला लाभले असते तर खरंच भारतिय राजकारण आणि समाजकारणाला नक्कीच वेगळे वळण लागले असते. अतिशय कर्तृत्ववान असा हा महापुरूष, एक वेगळेच द्रष्टेपण त्यांच्याकडे होते. जीना आणि त्यांचे संबंध बर्या पैकी होते. गंमत म्हणजे टिळक जहाल पक्षात होते आणि जीना मवाळ पक्षात होते. पुढे गांधी आले आणि जीना काँग्रेसला दुरावले ते कायमचेच. त्यातूनच पुढे पाकिस्तान वगैरे भानगडी झाल्या.
पण राजकारणात एवढा द्रष्टा असलेला हा नेता, समाजकारणात मात्र त्या मानाने कर्मठ / रूढीवादी होता. त्यांचे आगरकरांबरोबरचे वाद, कोल्हापूरच्या ताईमहाराज प्रकरणात घेतलेली भूमिका इ. वरून तरी असेच वाटते.
पण त्यांच्या कार्याशिवाय भारतिय स्वातंत्र्य चळवळीला एक वेग आणि निश्चित अशी दिशा मिळाली नसती. पुढे गांधीजींनी जे कार्य केले त्याची एक प्रकारे पूर्वपिठिकाच त्यानी तयार केली.
आता एक व्यक्तिगत आठवण. माझे आजोबा त्या वेळी १२-१४ वर्षाचे होते. जेव्हा टिळकांच्या निधनाची बातमी आली तेव्हा ते आणि त्यांचे काही मित्र सायकल वरून पुण्याहून मुंबईला गेले होते, त्यांचे अंत्यदर्शन घ्यायला. तेव्हा काही आजच्या सारखी दळणवळणाची साधने नव्हती, टी.व्ही. नव्हता, चॅनेल्स नव्हती आणि अश्या परिस्थितीत भारतासारख्या खंडप्राय देशात खर्या अर्थाने लोकमान्य झाले ते. परत एकदा विनम्र अभिवादन.
बिपिन.
2 Aug 2008 - 2:00 am | चतुरंग
पण राजकारणात एवढा द्रष्टा असलेला हा नेता, समाजकारणात मात्र त्या मानाने कर्मठ / रूढीवादी होता. त्यांचे आगरकरांबरोबरचे वाद, कोल्हापूरच्या ताईमहाराज प्रकरणात घेतलेली भूमिका इ. वरून तरी असेच वाटते.
अधोरेखित भागाबाबत असहमती.
ताईमहाराज प्रकरणात ते दुर्दैवाने ओढले गेले असे वाटते आणि आपण दिलेला शब्द खोटा न पडावा ह्यासाठी आयुष्यातली काही अतिशय मोलाची वर्षे त्यांना ह्याकामी खर्चावी लागली. आपल्याच लोकांनी त्यांना सहकार्य न करुन फारच मनस्ताप दिला आणि त्यात ते फसत गेले. त्यांच्यासारख्या समाजधुरीणाने त्या प्रकरणातून अंग काढून घेतले असते तर लोकांना त्यांच्यावर ठपका ठेवायला एक मोठे कारण मिळाले असते त्यामुळे लोकमान्यांना ती केस लढावी लागली.
"टिळकांचा अस्त आणि गांधींचा उदय हा भारताच्या इतिहासातला फार मोठा अपघात आहे!" अशा शब्दात आचार्य अत्र्यांनी टिळकांच्या अकाली जाण्याच्या घटनेचे वर्णन केले आहे.
चतुरंग
2 Aug 2008 - 3:33 am | विकास
जीना आणि त्यांचे संबंध बर्या पैकी होते. गंमत म्हणजे टिळक जहाल पक्षात होते आणि जीना मवाळ पक्षात होते.
जीना लोकमान्यांचे वकील होते. लोकसंग्रह कसा करावा यात त्यांचा हातखंडा होता. टिळक स्वतःहे ब्रिटीशांशी कसा व्यवहार करावा या संदर्भात जहाल होते पण आपल्या माणसांशी संबंध तयार करताना ते मवाळ होते. दुर्दैवाने मवाळ पुढारी मात्र या बाबत नेमके उलटे होते त्यामुळे ते जास्त आपल्याच माणसांशी हट्टाने वागले.
पण राजकारणात एवढा द्रष्टा असलेला हा नेता, समाजकारणात मात्र त्या मानाने कर्मठ / रूढीवादी होता. त्यांचे आगरकरांबरोबरचे वाद, कोल्हापूरच्या ताईमहाराज प्रकरणात घेतलेली भूमिका इ. वरून तरी असेच वाटते.
टिळकांना कर्मठ आणि रूढीवादी "प्रच्छन्न सुधारक" म्हणायचे कारण सुधारणांना विरोध नव्हता. आगरकरांशी त्यांचा जो वाद होता तो सुधारणा असाव्यात का नाही या संदर्भात नव्हता तर त्या कधी कराव्यात त्या संदर्भात होता - टाईमिंग महत्वाचे हे त्यांच्यातील राजकारण्याला वाटायचे. त्या दोघांचा वाद जाहीर होण्यासाठी आगरकरांचे प्रथम जाहीर लेखन कारणीभूत झाले. नंतर टिळकांनी अर्थातच प्रत्युत्तर दिले. पण मैत्री विसरायला ते तयार नव्हते हा इतिहास आहे. कर्मठपणा संदर्भात "चहा ग्रामण्य" वाद ज्यात रानड्यांसारख्या सुधारकाने माघार घेऊन कर्मठांची माफी मागितली तर टिळकांनी बहीष्कृत होणे पसंद केले. कारण काय तर पाद्र्याच्या हातून चहा प्यायला (ते पण अप्रत्यक्ष)
ताई महाराज प्रकरणाविषयी आत्ता लिहायला वेळ नाही... पण त्यांनी ताई महाराजांच्या यजमानांना मरण्याआधी ट्रस्टी होऊन सर्व व्यवस्थित मार्गी लावीन म्हणून शब्द दिला होता. त्या संदर्भात दत्तक विधान हे योग्य पद्धतीने झाले नव्हते म्हणून वाद सुरू झाला. त्यात ब्रिटीश ताईमहाराजांच्या बाजूने होते. हा प्रसंग मोठा आहे आणि त्यातून ब्रिटीश कोर्टातून त्यांची सन्मान्य सुटका झाली.
अजून बरेच काही पण वेळे अभावी येथेच थांबतो.
2 Aug 2008 - 3:06 am | बिपिन कार्यकर्ते
चतुरंग, आधी हे स्पष्ट करतो की मी हे विधान खूपच ढोबळमानाने केले होते. तुम्ही म्हणता तसे ताई महाराज प्रकरणात एखादे वेळेस ते ओढले गेले असतील (काही संदर्भ ताजे करावे लागतील). पण टिळक तुलनेने तसे कर्मठच होते असे वाटते.
अत्र्यांचे वाक्य मात्र आवडले, आणि सहमत.
बिपिन.