पौराणिक विमाने

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
14 Apr 2012 - 7:29 pm
गाभा: 

सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या.

"पेरु" (खायचा नव्हे :) ) देशाच्या पश्चिम किनर्‍यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी...
http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/1...

अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे.
प. वि. वर्तकानी या सर्वांचा परामर्ष "वास्तव रामयण" या पुस्तकात घेतला आहे...
https://sites.google.com/site/vvmpune/other-works/about-trident-peru

म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात खरेच विमाने होती की काय?
http://www.2atoms.com/weird/ancient/plane.htm

ही म्हणे धावपट्टी असावी
http://www.billandcori.com/peru/nazcalines.htm
आश्चर्य म्हणजे मी गूगल नकाशात पाहिले असता खरेच काहीतरी अगम्य रेषा दिसतात की!

प्रतिक्रिया

मृगनयनी's picture

14 Apr 2012 - 7:41 pm | मृगनयनी

छान लिन्क्स आहेत..!!!

"पद्माकर वर्तक" इज द ग्रेट मॅन!!!.. आय नो हिम!... सूक्ष्म देहातून मंगळ, गुरु ग्रहांवर ते जाऊन आलेले आहेत... त्यांनी काढलेल्या प्रेडिक्शनचा "नासा"लाही फायदा झालेला आहे.

बाकी आम्हाला रामायणातले "पुष्पक विमान" माहित आहे. :) रावणाने सीतेला याच विमानातून पळवून नेले होते. आणि पुढे याच विमानातून राम-सीता-लक्ष्मण परत अयोध्येस आले... :)

रमताराम's picture

15 Apr 2012 - 12:21 am | रमताराम

आणि पुढे याच विमानातून राम-सीता-लक्ष्मण परत अयोध्येस आले...
एकटेच नाही, बरोबर अनेक लोक होते. इतके सगळे लोक त्या एवढ्याशा विमानात कसे काय बसले या आमच्या प्रश्नावर आमच्या आय आय एम (अहमदाबाद) च्या एका प्राध्यापकांनी 'मग तेव्हा माणसांना सुद्धा झिप (कम्पूटरमधील) करून पाठवायची विद्या आपल्याकडे होती.' असे उत्तर दिले होते. ....................................................
................................................................................................................

खो: खो: खो: शेवटी हसू फुटलंच. तेव्हाही हसू दाबू शकलो नाही नि आजही. असो.

नगरीनिरंजन's picture

15 Apr 2012 - 11:44 am | नगरीनिरंजन

संस्कृतीद्वेष्टे कुठले.
हा धागा वाचून मी प्रचंड ऊर्जा खर्च करून सूक्ष्म रूपाने (कलियुगात हे करायची बंदी असूनही मी हे केलं. पद्माकरने नियम मोडला म्हणून मलाही तो मोडावा लागला.) पाताळातल्या माचूपिचू पर्वतावर जाऊन त्या नाझ्काच्या रेषा पाहून आलो. त्या रेषा पाहतानाच माझे ध्यान लागून मला इन्कांच्या लांबनाकाच्या चाक देवतेने दर्शन दिले. हा चाक म्हणजे अनार्य गणेशाचा सावत्र भाऊ. (आणि हो माचूपिचू वरची मंदिरं माया संस्कृतीची आहेत म्हणतात ते खरे म्हणजे 'मय' लोकांची आहेत. हे मय लोक म्हणजे मयसभा बांधणार्‍या मयासुराचे वंशज. इंद्रप्रस्थ बांधून झाल्यावर तो माचूपिचू पर्वतावर रिटायर झाला होता.)
तर, चाक ने मला दिलेल्या दृष्टांतात तो वापरत असलेले पारदाभिसारीविमान दाखवले. एका उंदराच्या आकाराचे ते महाप्रचंड विमान इतके मोठे होते की एक संपूर्ण गाव त्यात सहज मावले असते. सध्या असलेल्या आयन थ्रस्टर यंत्रांप्रमाणे त्या विमानाच्या पोटात पारदाभिसारी यंत्र (Mercury Vortex Engine) होते आणि त्या यंत्राच्या कर्णकटू आवाजाने ढग गडगडल्याचा भास होत होता आणि त्यातून बाहेर पडणार्‍या धन-ऋण प्रभारीत कणांमुळे विजा चमकण्याचा आभास होत होता. म्हणूनच चाकाला पाताळातला वरुण म्हणतात. ते विमान त्या धावपट्ट्यांवर कसे उतरते हे ही त्याने दाखवले.
विष्णूकडे यापेक्षाही मोठे गरुडविमान होते असेही त्याने सांगितले. त्या गरुड विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला उडण्या-उतरण्यासाठी धावपट्टीची गरज भासत नसे. म्हणूनच भारतात कोठेही अशा धावपट्ट्या दिसत नाहीत. पण कांभोज प्रदेशात ज्याला आजकाल अंगकोर वाट म्हणतात त्या विष्णूच्या स्थानात हे विमान उतरण्यासाठी प्रशस्त जागा आहे हे ही मला दिसले. चाकाचे आभार मानून मी तसाच मनोवेगाने जरा भूतकाळात गेलो. खरं म्हणजे मला खूप मागे जाऊन विष्णूचे दर्शन घ्यायचा मोह होत होता पण कलियुगात एवढे पुण्यबल नसल्याने ते शक्य होत नाही. म्हणून मी १८९५ सालातल्या मुंबईच्या किनार्‍यावर गेलो. तिथे श्री. शिवाकर तळपदेंना एका विमानाची प्रतिकृती करून उडवताना पाहिले. ते विमान काही अंतर जाऊन कोसळले. त्यांनी ऋग्वेदात सांगितल्याप्रमाणे विमान केले होते खरे पण कृतक पद्धतीचेच विमान कलियुगात उडते हे त्यांना माहित नव्हते असे दिसले. सत्ययुगात आवाज न करणारी मंत्रशक्तीवरची विमाने उडायची, त्रेता आणि द्वापारयुगात तंत्रशक्तीची विमानं उडायची पण कलियुगात फक्त यंत्रशक्तीची विमानं उडू शकतात. यंत्रशक्तीची विमाने वेदकालात हीन समजली गेल्याने फक्त पाताळातल्या राक्षसगणांनीच ती वापरली आणि त्याचे पुरेसे वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये नसल्याने आपण तशी विमाने करून या हसणार्‍या लोकांचे तोंड बंद करू शकत नाही. एकदा सत्ययुग येऊ द्या मग दाखवू.

चिगो's picture

15 Apr 2012 - 3:50 pm | चिगो

महाप्रतापी गदावीर धनुर्धर योग-विद्यामंडीत वेदाचार्य कूटनिती़ज्ञ यंत्र-तंत्र-मंत्रविशेषज्ञ श्री श्री परमपुज्य परमआदरणीय प्रातःस्मरणीय ज्ञानी नगरीनिरंजनजी की जय हो.. !! ;-)

ननि, जबरा प्रतिसाद.. भलताच आवडला !

सहज's picture

16 Apr 2012 - 10:55 am | सहज

ननि, जबरा प्रतिसाद..

आता योगप्रभुंजींच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत..

नगरीनिरंजन's picture

17 Apr 2012 - 11:44 am | नगरीनिरंजन

यात कोणाचीही व्यक्तिशः टवाळी करण्याचा किंवा भारताच्या इतिहासावर थुंकण्याचा वगैरे प्रयत्न नसून आयजीच्या जीवावर उदार होणार्‍या बायजी प्रवृत्तीची टिंगल करण्याचा हेतू आहे.
भारताकडे नेहमीच सगळ्या जगाने तत्त्वज्ञानाची जन्मदात्री (Mother of Wisdom) म्हणून पाहिले आहे. भारतात निर्माण झालेल्या विचारधारांनी आणि साहित्यकृतींनी जगाला नेहमीच थक्क केले आहे आणि भारत म्हणजे काहीतरी अद्भुत, गूढरम्य आणि दैवी असा प्रदेश आहे असाही बर्‍याच लोकांचा रास्त समज आहे.
पण ही असली बायजी प्रवृत्ती त्या समजाच्या ठिकर्‍या उडवून भारत म्हणजे उज्ज्वल इतिहास असणार्‍या मूर्खांचा देश आहे असा समज निर्माण करण्यात हातभार लावत आहे.
जग तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूपच पुढे गेले आहे आणि ते तंत्रज्ञान आमच्याकडे आधीच होते असे म्हणणे नुसते हास्यस्पदही नाही चीड आणणारेही आहे. समजा हे तंत्रज्ञान होते आणि नंतर काळाच्या ओघात नष्ट झाले असे मानले तरी काय?
आज जगाला हे तंत्रज्ञान कुठून आले हे नको आहे, आणि भारतानेही तसेच तंत्रज्ञान नव्याने निर्माण करावे अशीही अपेक्षा नाहीय. खूप लोकांनी जगाला मार्ग दाखवण्याची क्षमता भारतात आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रश्न असा आहे की आपण त्या विश्वासाच्या कसोटीवर उतरू की नाही?
अतिप्रगत तंत्रज्ञान असूनही अनेक सामाजिक, आर्थिक, लष्करी आणि राजकीय प्रश्नांच्या भोवर्‍यांमध्ये जग गटांगळ्या खात असताना भारत विकासाच्या नावाखाली पाश्चात्यांनीच केलेल्या चुका करणार की स्वत:चा नवा मार्ग आखून त्यातून जगाला काही धडा देणार हा प्रश्न आहे.
सध्याच्या परिस्थितीत तर पाश्चात्यांचेही अनुकरण धड जमत नाही आणि स्वतःचाही काही विचार नाही असा दिशाहीन भारत पाहताना या गप्पा तर आणखीच चीड आणतात एवढेच.

प्यारे१'s picture

17 Apr 2012 - 12:33 pm | प्यारे१

___/\___

सहज's picture

17 Apr 2012 - 12:41 pm | सहज

हे काय जादुचे प्रयोग चालू असताना जादुगाराच्या क्लुप्त्या उघडून सांगण्यासारखेच! जादूच्या प्रयोगांचा लुत्फ लुटायचा. असो तुमच्या माझ्या प्रतिसादांनी काय होते, काही दिवसांनी पुन्हा मिपावर असाच एक धागा येईल बघा. सदाबहार प्रयोग आहेत हे.

मी खर तर हा धागा अजुन एक आपल्या ऋषिमुनींच्या तपोबलाची महती सांगायला उघडला होता. की त्यांनी केलेल्या तपोबलाने, ग्लोबल वॉर्मिंगही हरले. त्यांनी म्हणलेल्या योग्य मंत्रोच्चाराने तेथे प्रदुषणाची काही मात्रा चालली नाही.

Himalayan glaciers growing despite global warming

अर्धवटराव's picture

18 Apr 2012 - 11:54 pm | अर्धवटराव

नेमक्या शब्दात नेमकं गमक मांडणारा प्रतीसाद !!

अर्धवटराव

मेघवेडा's picture

18 Apr 2012 - 6:58 pm | मेघवेडा

हा हा हा! खणखणीत!

क्लिंटन's picture

15 Apr 2012 - 11:03 pm | क्लिंटन

इतके सगळे लोक त्या एवढ्याशा विमानात कसे काय बसले या आमच्या प्रश्नावर आमच्या आय आय एम (अहमदाबाद) च्या एका प्राध्यापकांनी 'मग तेव्हा माणसांना सुद्धा झिप (कम्पूटरमधील) करून पाठवायची विद्या आपल्याकडे होती.' असे उत्तर दिले होते

नक्की कोणते प्राध्यापक हो ते? आमचे कोणतेही प्राध्यापक असे विधान सिरियसली करणार नाहीत (केलेच असले तर ते मजेत केले असेल) हे म्हणण्याइतपत मी माझ्या प्राध्यापकांना मी नक्कीच ओळखतो.

रमताराम's picture

16 Apr 2012 - 2:06 pm | रमताराम

नांव सांगत नाही (कारण उघड आहे हा ओपन फोरम आहे. शिवाय ते आता तिथे नाहीत, ही आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे नि त्याचवेळी ते निवृत्त व्हायच्या मार्गावर होते. दुसरे असे की आमचा बॉस तिथला विद्यार्थी नि हे त्याचे गुरू त्यामुळे याहून अधिक बोलणे योग्य नव्हे.) दाक्षिणात्य होते इतके सांगतो.

हे विधान पूर्ण गंभीरपणे केले होते. माझ्याबरोबर माझा कट्टर आयन रँड फ्यान होता, तो नि मी आम्हालाही आधी हे गंमत करताहेत असेच वाटले होते. पण ते - आमचा स्केप्ट्सिजम चेहर्‍यावर सहज वाचता येत असल्याने - अट्टाहासाने समजावू लागले. सुमारे दहा मिनिटे त्यांचे हास्यास्पद तर्क ऐकून घेतल्यावर आम्ही दोघेही सुटलो. (त्याबद्दल बॉस अर्थातच नाराज झाला, पण ते जाऊ दे).

जाऊ द्या हो. एवढं गंभीरपणे घेऊ नका. भलेभले लोक अशा दुराग्रहांपायी वाहवत गेलेले पाहिले आहेत. प्रीमियम इन्स्टिट्यूटमधे प्रा. असले म्हणून ते वैयक्तिक आयुष्यात वस्तुनिष्ठ असावेत असे थोडेच आहे. माझ्याच बाबत एरवी अतिशय उत्तम संबंध असताना त्यांचे असले हास्यास्पद दावे मान्य न केल्याने (हो 'लेट्स अग्री टू डिस-अग्री' हे ही पुरेसे नसते, आमचे म्हणणे मान्य केलेच पाहिजे असा आग्रह असतो.) मैत्री तुटलेली एक दोन उदाहरणे आहेत. तेव्हापासून टोकाच्या अस्मिता असणार्‍यांपासून चार... चार काय चारशे हात दूरच राहतो, मग भले तो आईन्स्टाईन का असेना.

तर्कवादी's picture

27 Jul 2022 - 3:39 pm | तर्कवादी

चार काय चारशे हात दूरच राहतो, मग भले तो आईन्स्टाईन का असेना.

आईन्स्टाईनच्या टोकाच्या अस्मिता होत्या काय ? मी तर समजत होतो तो अतिशय मनमोकळ्या स्वभावाचा , जिंदादिल मनुष्य होता.

पुरणपोळी's picture

16 Apr 2012 - 10:50 am | पुरणपोळी

चला आय. आय. ऐम. शी तुमचा काहितरि संबंध होता हे सिद्ध झाल..

रमताराम's picture

16 Apr 2012 - 2:14 pm | रमताराम

आमचा साहेब तिथला. हे त्याचे गुरू. (आणि 'अस्माकं बदरीचक्रं....' म्हणत बळेच संबंध लावायला आम्ही थोडेच जाणार आहोत. )

चित्रा's picture

16 Apr 2012 - 12:51 am | चित्रा

>त्यांनी काढलेल्या प्रेडिक्शनचा "नासा"लाही फायदा झालेला आहे.

ह्याचा काही पुरावा आहे का?

मदनबाण's picture

14 Apr 2012 - 8:15 pm | मदनबाण

या विषयी मी माझा प्रतिसाद आधिच इथे दिला आहे.

साती's picture

14 Apr 2012 - 8:12 pm | साती

त्यांनी काढलेल्या प्रेडिक्शनचा "नासा"लाही फायदा झालेला आहे.
कुठे म्हणे?

रामपुरी's picture

17 Apr 2012 - 4:51 am | रामपुरी

म्हणजे असं की मंगळ हा नक्की अस्तित्वात आहे हे त्यामुळेच नासाला समजलं. मग पुढे त्यांनी ते फालतू यानबिन बनवून सोडलं. आता ही सूक्ष्मदेह वगैरे भानगड नसती तर "मंगळ आहे" हे कसं कळलं असतं? म्हणून अजूनही नवीन प्रकल्प हाती घेण्याअगोदर नासावाले वर्तकांच्या वाड्यात पायधूळ झाडतात.

मृगनयनी's picture

18 Apr 2012 - 11:16 pm | मृगनयनी

वरच्या आणि खालच्या बर्‍याच प्रतिसादांमध्ये "माननीय डॉ.पद्माकर'जी वर्तक" यांच्याबद्दल आणि त्यांच्या महान कार्याबद्दल अनेक उत्कंठापूर्ण प्रश्न विचारले गेले होते. त्यांचा "नासा"शी असलेल्या सम्बन्धाबद्दलही अनेकांना कुतुहल असल्याचे जाणवले ...त्यांच्यासाठी हा खुलासा:-

डॉ. पद्माकर वर्तक- M.B.B.S., F.U.W.A.I., Ph.D.(Literaure) [Washington DC] ( जन्मः- २५ फेब्रु, १९३३),

माननीय पद्माकरजी वर्तक १९५६ साली (पहिल्या प्रयत्नात) M.B.B.S
टिळक आयुर्वेद कॉलेज, पुणे येथे "सर्जरी- लेक्चरर" म्हणून काम सुरु केले. 'सेठ ताराचन्द हॉस्पिटल' पुणे, येथे "असिस्टन्ट सर्जन" म्हणून १९५६ ते १९६९ या कालावधीमध्ये काम केले.

अध्यात्म शास्त्र, योगा, वेद-उपनिषदे इ चा अभ्यास वर्तक'जींनी १९५६ पासूनच सुरु केलेला होता.
"तैत्तरीय उपनिषदा"नुसार (प्रत्येक )मानवी शरीर हे "अन्नमय कोश"असून त्या पूर्ण मुख्य अन्नमय शरीरामध्ये / कोषामध्ये "प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनन्दमय" असे चार प्रकारचे उपशाखीय कोष असतात. अर्थात याची... या कोषांच्या अस्तित्वाची जाणीव अथक साधनेद्वारे, मनोबलाद्वारे मनुष्याला होत असते. पद्माकर वर्तकांनी अनेक वर्षांच्या अभ्यास, योगसाधनेद्वारे या चार कोशांची जाणीव प्राप्त करवून घेतली. स्थूल देहातून सूक्ष्म शरीरात प्रवेश करून त्याद्वारे संपूर्ण "ब्रह्मांडात"- Universe भ्रमण करण्याचेही तन्त्र त्यांना अवगत झाले ही दिव्य दृष्टी- अतिंद्रीय शक्ती त्यांना साधारण १९७५ साली प्राप्त झाली.

या दिव्य दृष्टीद्वारे मंगळ, गुरु या ग्रहांवर जाऊन शोधन करण्यासाठी वर्तक'जींनी ३ मोठे प्रयोग केले.
१९७५ मध्येच वर्तक'जींना असे समजले, की अमेरिका "मंगळा" वर जाऊन बेसिक / प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी एक मोठी स्पेसशीप लॉन्च करते आहे. तो पर्यन्त सर्वांचे असे तर्क वितर्क चालू होते, की " मन्गळावर मनुष्यवस्ती असून भरपूर प्रमाणात पाणीदेखील आहे आणि तेथील शेतीसाठी या पाण्याचा वापर होत असावा" अमेरिकेने उपग्रहांवरून काढलेल्या फोटोंवरून देखील असेच निष्कर्ष काढलेले होते, की" मन्गळावरती शेती आणि पाणी या दोन्हीचेही बर्‍यापैकी प्रमाणात अस्तित्व आहे."

या पार्श्वभूमीवरती "पद्माकर वर्तक" यांनी आपल्या दिव्य दृष्टीद्वारे एक प्रयोग म्हणून "मन्गळा"वर जाण्याचे ठरविले. ती तारीख होती १० ऑगस्ट १९७५.
समाधि-अवस्थेत गेल्यानन्तर पद्माकर'जींना असा एहसास झाला, की ते मन्गळाच्या भूमीवरती उभे आहेत. त्यांना तिथे पाणी, झाडे, जलाशय, समुद्र, नदी, माणसे, पक्षी, पशू, ... इ. इ. पैकी एकही गोष्ट आढळली नाही. फक्त काही ठिकाणी त्यांना असे वाटले, की खूप सार्‍या वर्षांपूर्वी येथे -मन्गळावर पाण्याचे प्रवाह अस्तित्वात असले पाहिजे, कारण वाळून गेलेल्या / पाणी आटलेल्या नदीप्रमाणे काही ठिकाणी खुणा होत्या... मन्गळावरील जमीन पूर्णतः लाल रन्गाची, कोंकणातील लाल मातीप्रमाणे मुरमाड टाईपची, काहीशी पृथ्वीवरील टेकड्यांप्रमाणे भासली. फक्त चन्द्राप्रमाणे येथे ज्वालामुखीमुळे निर्माण झालेली विवरे मात्र अजिबात आढळली नाही.

मन्गळावरील वातावरण कोरडे आणि थोडेसे "डल" होते. तसेच तेथील हवेत एक विशिष्ट सुगन्ध होता. हवा शान्त आणि थन्ड होती. पृथ्वीवरच्यासारखीच मन्गळावरची सन्ध्याकाळही खूप सुन्दर होती. आकाश सुन्दर निळसर होते. आणि त्यामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा हे रन्ग मिक्स झाल्यासारखे वाटत होते. मध्येच एकदा पहिल्या पावसाचा मातीत मिसळलेला गन्ध जसा असतो, तसा वास त्यांना आला.
तेथील कोरड्या पडलेल्या नदीच्या , जलाशयाच्या खुणा जेथे जेथे होत्या..तेथील लाल रन्गांच्या खडकांवर काही ठिकाणी मोठे मोठे डार्क पॅचेस पडलेले होते. तेव्हा पद्माकरजींना वाटले.. की तेथे वाळलेले शेवाळेदेखील असावे. आणि असेही जाणवले, की खूप सार्‍या लाखो वर्षांपूर्वी तेथे मन्गळावर जीवसृष्टी, पाणी, झाडे, वाहणार्‍या नद्या इ. गोष्टी अस्तित्वात होत्या.

ह्या सगळ्या समाधिअवस्थेत मन्गळावर दृष्टीक्षेपात आलेल्या आणि जाणवलेल्या गोष्टी पद्माकर वर्तक'जींनी मनात साठवून ठेवल्या. व समाधीतून बाहेर आल्यावर कागदावर उतरवून ठेवल्या.
आणि त्याचा रिपोर्ट बनवून १९७६ साली २ मराठी मासिकांमधून प्रसिद्ध केला.

"डॉ. पद्माकर वर्तक" यांना मन्गळावर जाणवलेल्या गोष्टींची रिपोर्ट "संतकृपा" आणि "धार्मिक" या दोन मराठी मासिकांमध्ये छापून आला. अनुक्रमे- जून १९७६ आणि जुलै १९७६.

अमेरिकेने मण्गळावर जाण्यासाठी अवकाशयान सोडले.. तो दिवस होता - २१ ऑगस्ट १९७५. आणि ते यान मन्गळावर सुस्थितीत पोहोचले.. तो दिवस होता- २१ जुलै १९७६.
या "याना"ने मन्गळावरून पाठविलेले रिपोर्ट्स आणि पद्माकर वर्तक यांनी दिव्य दृष्टीने काढलेले व प्रसिद्ध केलेले रिपोर्ट्स "टॅली" केले गेले. २१ पैकी २० रिपोर्ट टैली करून ते परफेक्ट मॅच झाल्याचेही अमेरिकेकडून कळवण्यात आले. Smile

२१ वा जो पॉइन्ट होता.. तो म्हणजे- "मन्गळावर लाखो वर्षांपूर्वी नद्या आणि शेवाळे अस्तित्वात होते"..हा वर्तक'जींचा मुद्दा "पाथफाईंडर" कडून टॅली केला गेला.. तो ही १९९७ साली.. म्हणजे तब्बल २२ वर्षांनी.. व तो पॉईन्ट नव्या शोधमोहिमेत परफेक्टली टॅली झाला.

या दिव्य दृष्टीद्वारे मिळालेल्या मन्गळावरच्या अनुभूतीदरम्यान पद्माकर वर्तक'जींना याची पूर्ण जाणीव होती.. की त्यांचे अन्नमय शरीर हे त्यांच्या पृथ्वीतलावरील घरात आहे. आणि तरीही मन्गळावर असताना त्यांना स्वतःच्या शरीरातच असल्याचा आभास होत होता. आणि ते शरीर म्हणजे तैत्तरीय उपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे आणि इकडे वरती नमूद केल्याप्रमाणे वर्तक'जींचे "विज्ञानमय कोषा"तील शरीर होते. या विज्ञानमय कोषाचा बेस / मूळ आहे - "महालोक"... पृथ्वीवर ज्याप्रमाणे "मृत्यूलोक" असते.. गुरुत्वाकर्षण, हवेचा दाब, पाण्याची उताराकडे वाहण्याची दिशा.. इ नियम मृत्यूलोकात असतात. पण "महालोकात" मा' त्र हे नियम लागू नसतात. सौरगंगेतील पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे जी काही पोकळी असते... ती म्हणजे- "महालोक"!!! जिथे "विज्ञानमय" कोषयुक्त सूक्ष्म शरीराला सन्चार करणे सहज शक्य असते..

मन्गळावरील प्राथमिक संशोधन यशस्वी झाल्यामुळे या पहिल्या यशानन्तर पद्माकर वर्तक'जींना अमेरिकेकडून अनेक आव्हाने निर्माण केली गेली. त्यांपैकी एक आव्हान त्यांनी पेलायचे ठरविले. ते म्हणजे- अवकाशयान १ आणि अवकाशयान २ हे दोन्ही अध्या अवकाशात आहेत. तर त्यांची पुढची दिशा नक्की कोणती असेल.. व त्यांचे काय होईल?.
हे चॅलेन्ज पद्माकरजींनी स्वीकारल्यावर १२ ऑगस्ट १९७६ रोजी रात्री १० वाजता त्यांनी समाधिअवस्थेतून दिव्य दृष्टी लावली. व ते पुन्हा मन्गळावर पोचले. तेव्हा त्यांना तिथे असे दिसले- की """ मन्गळावर देखील रात्र होती. आकाशात पूर्णपणे अन्धार होता. आणि बॅकग्राऊंडला २ ताम्बूस लालसर कलरचे गोळे वर्तक'जींच्या उजवीकडून डावीकडे जात होते. त्यापैकी डावीकडचा गोळा छोटा आणि गोलाकार होता आणि दुसरा बर्‍यापैकी आयताकृती व मोठा होता. अर्थात नन्तर पद्माकरजींना समजले, की ते दोन गोळे महणजेच अवकाशयान होते. डावीकडचे छोटे गोलाकार यान हे अवकाशयान क्र, १ होते, तर दुसरे आयताकृती मोठे यान अवकाशयान क्र. २ होते.
नन्तर त्यांनी पाहिले, की अवकाशयान क्र. १ थाम्बलेले असून ते अवकाशयान २'ला भेटायला पुन्हा मागे येत आहे.................................

Continue.............................................................................

मृगनयनी's picture

18 Apr 2012 - 11:21 pm | मृगनयनी

Continue........................

तिथे अवकाशयान १ आणि २ यांमध्ये एकप्रकारची सर्क्युलर अरेन्जमेन्ट केल्यासारखे दिसत होते. अवकाशयान १ पुढे होते व २ त्याच्या मागे होते. आणि त्यांची रचना अशी केली होती.. की अ.या. १ मागे वळून अ.या.२ च्या पुढे स्पर्श करू शकेल. अ.या.१ ची दिशा अशी होती.. की ते अ.या. २ ला साधारण ४५ अंशात स्पर्श करेल.. व त्यांचे योग्य रीतीने डॉकिन्ग होऊ शकेल
इतक्यात अवकाशयान १ एकदम पद्माकर'जींच्या समोरून वरून खालच्या दिशेने गेले.. तर अवकाशयान २ खालुन वरती पद्माकरजींच्या दिशेने आले. व त्यांचे परफेक्टली डॉकिन्ग होत असतानाच काहीतरी झाले.. व अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी त्यांचा प्लॅन आयत्या वेळी चेन्ज केला. व तो प्रयोग पोस्टपोन्ड केला गेला आणि अवकाशयान १ ... अ.या.२ पासून डीटॅच केले गेले.. अ.या. १ सेपरेट होऊन पद्माकरजींच्या डावीकडून वेगाने निघून गेले. आणि मोठे आयताकृती अ.या. २ त्या अ.या.१ ला हळूहळू फॉलो झाले.
अ‍ॅक्चुली हा एक्सपेरिमेन्ट सक्सेसफुल होणारच होता. पण शास्त्रज्ञांना या प्रयोगात काहीतरी चूक झाल्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी अवकाश यान १ सेपरेट केले.

आणि यानन्तर पद्माकर वर्तक समाधी अवस्थेतून बाहेर पडले. व त्यांनी असे अनुमान काढले, की अमेरिकेचा हा प्रयोग आधी पोस्ट्पोन्ड होईल.. आणि नन्तर कॅन्सल होईल.
आणि मग त्यांनी दोन्ही अवकाशयानांबद्दल पाहिलेले भविष्य २२ ऑगस्ट १९७६ रोजी "तरूण भारत" या वृत्तपत्रात प्रकाशित केले. आणि त्याची कॉपी "डिरेक्टर ऑफ अमेरिकन अ‍ॅम्बासी" ला पाठविली. तेव्हा तेथील "मि. बायेस" यांनी पद्माकर वर्तक यांना त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांची स्तुती केली अनेक धन्यवाद दिले आणि असेही उत्तर पाठविले, की "" पद्माकर वर्तक यांचे संशोधन काही अंशी चुकीचे आहे. वर्तक यांनी समाधिअवस्थेत पाहिलेले अ.या. १ आणि अ.या. २ चे कोणतेही प्रयोग अद्यापि ठरलेले नाहीत.. किन्वा या दोन्ही यांनां'चे एकमेकांना भिडण्याचे चान्सेसदेखील नाहीत. :( !!!!""
आणि पुढे गम्मत अशी झाली, की ७ सप्टेम्बर १९७६ रोजी "नासा" ने ही बातमी प्रसारित केली, की अ.या.१ आणि अ.या. २ यांची धडक होण्याचा प्रयोग १२ सप्टेम्बर १९७६ रोजी मंगळावर आयोजित केलेला आहे... "नासा" ने सांगितले, की अवकाशयानांची दिशा पूर्व- पश्चिम असेल.. अर्थात हेही पद्माकरजींनी आधी वर्तविलेले होतेच.
आणि पुढे काही दिवसांनी हा यानांच्या डॉकिन्ग'चा प्रयोग कॅन्सल झाला. आणि हा "पद्माकर वर्तक" यांचा सर्वांत मोठा विजय होता. त्यांच्या "मन्गळा"वर गेलेल्या 'विज्ञानमय कोषा'तल्या शरीराने समाधि अवस्थेत जे जे काही भविष्य पाहिले होते... ते ते सर्व तंतोतंत खरे ठरले... 'नासा' कडून त्यांना त्याप्रमाणे पत्रदेखील आले.. जे आजही पद्माकर वर्तक'जींकडे आहे...

आता पाहू या वर्तक'जींचा गुरु ग्रहावरील समाधिअवस्थेतील प्रवास आणि त्यांच्या प्रेडिक्शन्सला "नासा" कडून मिळालेला दुजोरा:-

'नासा'ने जेव्हा गुरु-ग्रहावर "व्हॉयगर" हे अंतराळयान सोडण्याचा विचार केला, तेव्हा मंगळा'प्रमाणेच "गुरु" ग्रहाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वर्तक'जी समाधिअवस्थेतून गुरु ग्रहावर गेले.आणि त्यांनी दिव्य दृष्टी लावली... तो दिवस होता- २७ ऑगस्ट १९७७. दुपारी साधारण १ वाजता तेध्यानास बसले.. ते रात्री १.१५ पर्यन्त त्याच अवस्थेत होते. त्या १२ तासांमध्ये त्यांनी 'गुरु' ग्रहाची सैर केली. एका क्षणात साधारण ५०० लाख किलोमीटर प्रवास केल्यासारखे पद्माकरजींना वाटले. गुरु ग्रहावर गेल्यानन्तर आपण तरंगत असल्याचा आभास पद्माकरजींना झाला... जे की मन्गळ ग्रहावर त्यांना त्यांच्या विज्ञानमय कोषातील शरीराद्वारे उभे राहिल्याचे जाणवत होते... तसे ते गुरुवर व्यवस्थित उभे राहू शकत नव्ह्ते.

गुरुवर "आकाश" हे ढगाळलेले अन्धारुन आल्यासारखे त्यांना वाटले. तसेच त्यांना तिथे अतिशय डीम लाईट असल्यासारखे वाटत होते. तेथील ढग पण खूपच घट्ट आणि जाड असल्यासारखे वाटत होते..ते ढग खूप सारे एकत्र येऊन वेगाने एकमेकांपासून विलग होत होते. आणि विरून जात होते. आकाशात पिवळा आणि जांभळा हे दोन रन्ग प्रामुख्याने दिसत होते. ढग मात्र जांभळ्या रन्गाचे होते. वर्तकजींनी आधी आकाशात गुरुचे ३ पूर्ण चन्द्र त्रिकोणाकारात पाहिले.. नन्तर ४ पूर्ण चन्द्र आयताकारात दिसले. मग पुढे ६ अर्ध-चन्द्र त्यांना दिसले. हे ६ अर्धचन्द्र व्हर्टिकली अर्धे होते.. म्हणजे आपल्याला पृथ्वीवरून नॉर्मली शुक्ल चतुर्थी ते शुक्ल दशमी या तिथींचे चन्द्र हॉरीझोन्टली अर्धे दिसतात... म्हणजे आडवे दिसतात... पण गुरुवर ते उभे दिसत होते. तसेच त्या चन्द्रांचा अर्धा व्हिज्युअल पोर्शन बर्‍यापैकी ब्राईट होता.. नॉर्मली आपल्या पृथ्वीवरून दिसणार्‍या चन्द्रापेक्षा तो कमी ब्राईट होता आणि आकारानेही अपल्याला दिसणार्‍या चंद्राच्या ३/४ व्यासाचा होता.

नन्तर वर्तक'जींनी छोट्या छोट्या काळ्या रन्गाच्या विन्चवाच्या शेपटीच्या आकाराच्या काही आकृती पाहिल्या. ते काळे खडक होते. गुरु'वरती धूळ अजिबात नव्हती. तसेच कोणत्याही प्रकारचा सुवास किन्वा दुर्गन्ध तेथे नव्हता. तसेच कोणताही आवाज त्यांना ऐकू येत नव्हता. तसेच कोणत्याही प्रकारचे जीव किन्वा पाणी तेथे अस्तित्वात नव्हते. आणि त्यापूर्वी देखील कधी जीवसृष्टी अस्तित्वात असल्याच्या खुणाही नव्हत्या.. जश्या की मन्गळावर अस्तित्वात होत्या.
गुरुच्या हवेतील घनता आणि दाब हा पृथ्वीवरच्या धनता आणि दाबापेक्षा खूप जास्त होता. मग रात्री १.१५ वाजता वर्तक'जी समाधिअवस्थेतून बाहेर आले.

'गुरु' वरील हे सगळे निरीक्षण मग पद्माकरजींनी मराठी मासिक- "श्री" मध्ये २९ ऑक्टोबर १९७७ मध्ये प्रकाशित केले. "सन्तकृपा" या दिवाळी स्पेशल मासिकात नोवेम्बर १९७७ मध्ये प्रकाशित केले. "तरूण भारत" मध्ये ५ फेब्रुवारी १९७८ मध्ये प्रकाशित केले. तर "इन्डियन एक्सप्रेस" मध्ये २२ मे १९७८ रोजी प्रकाशित केले.

वर्तक'जींनी 'गुरु'वर जाऊन तेथील स्थितीचा अनुभव घेतल्यानन्तर "नासा"ने २ वर्षांनी म्हणजे- १९७९ मध्ये "व्हॉयगर"ने गुरुवर जाऊन घेतलेला रिपोर्ट प्रकाशित केला. आणि आश्चर्य म्हणजे वर्तक'जींनी काढलेल्या रिपोर्टमधल्या १८ पैकी ९ पॉईन्ट्स हे "नासा" ने काढलेल्या प्रेडिक्शनशी तन्तोतन्त मिळत होते.

व्हॉयगर'ने वर्तक यांनी काढलेल्या रिपोर्टमधील - गुरुची घनता, जडत्व, ढग, जाम्भळा रन्ग,ढगांच्या हालचाली, काळे खडक, त्यांचे शेपटीसारखे दिसणारे पुन्जके, गुरुवरील वातावरण, जीवसृष्टीचे अस्तित्व नाकारणे, वादळेविरहित स्टेडी अ‍ॅटमॉसफिअर ..इ. गोष्टी टॅली करण्यात आल्या... आणि त्या परफेक्ट मॅच झाल्याचेही "नासा" कडून ऑफिशियली डिक्लेअर करण्यात आले..

त्यामुळे आपल्या देशातले, अमेरिकेतले आणि सम्पूर्ण जगभरातले शास्त्रज्ञ चाट पडले.. कारण 'नासा' सारख्या सन्स्थेने "गुरु" ग्रहावरील निरीक्षणे डिक्लेअर करण्याच्या आधी तब्बल दोन वर्ष अगदी तन्तोतन्त रिझल्ट पद्माकर वर्तक'जींनी सांगितलेले होते.

१२.४ मिलियन्स किलोमीटरवरून "व्हॉयगर"ने गुरुच्या अर्ध चन्द्रांचा फोटो काढून तो नासा'ने पब्लिश केलेला होता. ज्यामध्ये वर्तकजींनी सांगितल्याप्र्माणे त्या चन्द्रांचा अर्धा भागच थोडाफार प्रकशित दिसत होता. जे गुरुचे "अर्ध चन्द्र" १२.४ मिलियन कि.मी. वरून व्हॉयगर'ने पाहिले होते.. ते चन्द्र वर्तक'जींनी स्वतः गुरुवर जाऊन पाहिले होते.

" विज्ञानमय कोष" गुरुवर अस्तित्वात असल्याचे हे अतिज्वलन्त उदाहरण आहे, असे डॉ. पद्माकर वर्तक मानतात. या कोषामुळे हजारो मैल अन्तर एका क्षणात पार करता येते. त्याचा वेग प्रकाशवेगापेक्षाही खूपच जास्त असल्याने प्रकाशापेक्षा जवळजव्ळ वीस मिनिटे आधी 'विज्ञानमय कोष' मन्गळ आणि गुरुवर पोचू शकतो. हेही वर्तक'जींनी नमूद केले.

_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_~_

अश्याप्रकारे ध्यानयोगातून, समाधि द्वारे आपल्या दिव्य दृष्टीने "पद्माकर वर्तकजी" मंगळ, गुरु ग्रहांवर यशस्वीरीत्या जाऊन आले.. व त्यांनी दिलेल्या रिपोर्ट्सला "नासा"ने देखील मान्यता दिलेली असून त्यांच्या या अनमोल योगदानाबद्दल अनेक धन्यवाद दिलेले आहे........

:) || ओम नमः शिवाय ||

मृगनयनी's picture

18 Apr 2012 - 11:29 pm | मृगनयनी

माननीय डॉ. पद्माकरजी वर्तक यांच्या कार्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी जागा राखून ठेवत आहे..

___

___

___

:)

दादा कोंडके's picture

19 Apr 2012 - 12:00 am | दादा कोंडके

आवरा!

मंगळावर जाउन येण्यापेक्षा या देशातच काय करायचं ते करा म्हणावं. देशाचं सोडा, महाराष्ट्राचं घ्या. दुष्काळ, आत्महत्या, मुंबई हल्ला, घोटाळे, भारनियमन, माने प्रकरण, आणि आता जेष्ठ नागरीकांना मारहाण. :)

की असल्या संकुचीत गोष्टी त्यांच्या खिजगणतीतच नाहीत आणि समस्त मानवकल्याण करायचं असलं तर मग प्रश्नच मिटला.

नासा वगैरे म्हणल्यावर लोकांची बोलतीच बंद होते. खातरजमा कशी करणार? पण त्यांनी इस्त्रोला काही मदत केली आहे का?

बाकीची लोकं जाउ देत, अगदी साईबाबांनी देखिल विझलेल्या राखेतून आग काढणे वगैरे असले फुटकळ चमत्कार केले असतील तर त्यापेक्षा तात्कालीक सामाजिक मोठ्या समस्या का सोडवल्या नाहीत? असा प्रश्नं साईभक्तांना पण पडत नाही का?

शिल्पा ब's picture

19 Apr 2012 - 1:36 am | शिल्पा ब

साईबाबा नै ओ तर ते सत्यसाईबाबा म्हणजे ओरीजिनल साईबाबांचा पुनर्जन्म घेणारे...उगाच साईबाबांच्या नावावर सत्यसाईबाबाची बिलं कशाला फाडायची!!

इतरः श्री श्री वर्तक 'जी यांच्याबद्दल मृगनयनीतैंनी मोलाची माहीती दिल्याने या इथल्या संस्कृतीभंजन करणार्‍या लोकांच्या डोक्यात थोडातरी प्रकाश पडेल अशी आशा आहे. लोकांना आपल्या प्राचीन भारतीय ज्ञानाचा मुळीच अभिमान नाही याची खंत वाटते.

दादा कोंडके's picture

19 Apr 2012 - 11:10 pm | दादा कोंडके

उगाच साईबाबांच्या नावावर सत्यसाईबाबाची बिलं कशाला फाडायची!!

हा चमत्कार शिर्डी साईबाबांबद्दलच आहे. त्यांच्यावरच्या एक्-दोन सिनेमात लहान असताना बघितला आहे पण पक्कं लक्षात आहे.

बाकी सत्यसाईबाबां भंपक माणूस असेनाका पण काही हॉस्पिटलं तरी बांधलीयेत. तुमच्या "सबका मलिक एक" वाल्यानी काय केलय सांगा? ;)

शिल्पा ब's picture

20 Apr 2012 - 4:05 am | शिल्पा ब

लोकांना १००रु. ना फसवुन १रु. परत दिला तर त्यात काय मोठं!! अन दिला तो दिला वर अजुन त्याची टिमकी वाजवायची!!

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Apr 2012 - 11:24 pm | पुण्याचे वटवाघूळ

या धाग्याचे काश्मीर होणार असे दिसत आहे. लगे रहो.

http://www.drpvvartak.com/research.asp
http://www.drpvvartak.com/publishings/PanchKosh.pdf

या लिंकवरून भाषांतरित करताय का?
दोन्हि वर्तकांच्या नांवाच्या आणि त्यांचा उदो उदो करणार्‍याच आहेत. या बातम्या कंन्फर्म करण्याचा वरिल लिंक आणि विकीपिडियावर काही लोकांनी यांतून केलेले कॉपीपेस्ट याशिवाय एखादा रिलायबल सोर्स आहे का?

बाकी सर्जन असून नंतर आध्यात्मिक गुरू बनून लोकाना आपल्या नादाला लावणारे आणखीही एक डॉक्टर मला माहिती आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Apr 2012 - 4:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

साती, I think therefore I am च्या चालीवर I claim therefore I did it. एवडं शिंपल बी समजंना तुमा डॉक्टर लोकांना!

चीपो आंतरजालाच्या जमान्याततर असं काहीही, कोणीही लिहीलं तर त्यावर विश्वास ठेवावा का? पाचशे-हजारात एक डोमेन नेम आणि एवढी वेबस्पेस वर्षभरासाठी भाड्याने मिळते. फक्त "मी सांगते" (किंवा सांगतो) यावर कधीपासून वैज्ञानिक सत्य ठरत नाहीत. लोकं आजही आईनस्टाईनची जनरल रिलेटीव्हीटी खोटी का खरी यावर संशोधन करतात.

अवांतर माहितीची देवाणघेवाण--
१. जिओव्हान्नी शियापरेल्ली नामक इटालियन खगोलाभ्यासकाने १८७७ साली मंगळाची प्रतियुती (मंगळ -- पृथ्वी -- सूर्य अशी रचना, ज्यात मंगळ पृथ्वीपासून सर्वात जवळ येतो, रात्रभर आकाशात दिसतो.) असताना मंगळाची निरीक्षणं केली. त्यात त्याला मंगळावर canale असण्याचा भास झाला. या "कनाली"चं इंग्लिश भाषांतर "चॅनल" अथवा पाणी वहाण्याच्या खुणा असं झाल्यामुळे मंगळावर पाणी वाहिल्याच्या खुणा आहेत असा समज दीर्घकाळ होता. पर्सिव्हल लॉव्हेल (ज्यांनी प्लूटोचे नाव शोधाआधीच प्लूटो ठेवले होते) यांचा या पाणी वहाणे, कालवे खणलेले असणे वगैरे सिद्धांतांवर फार विश्वास होता. आधुनिक दुर्बिणींनी हे सर्व आभास होते हे सिद्ध केले.

मंगळावर पहिलं मानवनिर्मित यान १९७२ मधे उतरलं तरी साठीच्या दशकात अमेरिका आणि तेव्हाचे यू.एस.एस.आर./ मराठीत "रशिया" या दोन्ही देशांची अनेक फ्लायबाय, जवळून जाऊन चित्रं घेणारी यानं, मिशन्स कार्यरत होती.

पृथ्वीपेक्षा मंगळाचे वातावरण फारच विरळ आहे. (वातावरणाचा दाब ३०-१२०० पास्कल एवढा आहे. पृथ्वीवर समुद्रसपाटीवर हा दाब १०० किलोपास्कलच्या थोडा वर असतो. थोडक्यात मंगळावरच्या वातावरणाचा अधिकतम दाब हा समुद्रसपाटीवर असणार्‍या दाबापेक्षा साधारण १०० पट अधिक) वर्तकांना ही गोष्ट जाणवली नसेल तर त्यांची कातडी फारच जाड असली पाहिजे. एवढ्या कमी दाबामुळे मानवी शरीराचा स्फोट होऊ शकतो. 'Total recall' या आर्नीपटाच्या क्लायमॅक्सच्या (गलिच्छ) सीनमधे ही गोष्ट सोदाहरण दाखवलेली आहे; डोळे बाहेर येणं फारच गचाळ दिसतं.
वर्तक जर विदेह मंगळावर गेले असतील तर सुगंध वगैरे गोष्टी त्यांना कशा समजल्या हा प्रश्न आहेच.

चंद्रावर फारशी ज्वालामुखीजन्य विवरं शिल्लक नाहीत. ज्वालामुखीतून होणार्‍या पायरोक्लास्टीक प्रवाहाचा परिणाम म्हणा, किंवा जमिनीखालच्या घडामोडी म्हणा किंवा अशनी-आघातामुळे चंद्रावरची बहुतेकशी विवरं ही अशनी-आघातातून तयार झालेली आहेत असं समजलं जातं. मंगळाचीही तीच गोष्ट.
मंगळाच्या फोटोंमधे काळ्या मोठ्या रेषा दिसतात, त्या मंगळाच्या भूगर्भातील हालचालींमुळे, प्लेट टेक्टॉनिक्समुळे एकावर एक थर चढल्यामुळे तयार झालेल्या रचना आहेत.

शिवाय सातीने दिलेल्या पहिल्या दुव्यात हे सापडलं:

... The famous ring of Saturn is made of some material like slurry or mud along with floating rocks. There are no land marks on the Saturn because there is no formation of land. ...

मराठीत (हे भाषांतर शब्दशः नाही; हा मला समजलेला अर्थ आहे.):

शनीची कडी चिखल किंवा तरंगणार्‍या दगडांची बनलेली आहेत असे श्री. वर्तक यांना आपल्या शनीभेटीतून समजले.

जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१-१८७९) या स्कॉटीश भौतिकशास्त्रज्ञाने १८५७-१९५९ साली, दोन वर्ष या गोष्टीचा अभ्यास करून, गणिताच्या आधारे शनीच्या कड्यांचा प्रश्न सोडवला. शनीची कडी ही एकसंध वस्तू नसून अवकाशात द्रायू (द्रव+वायू/fluid) अवस्थेत असतील तर स्थिर असतील. निरीक्षणांतून असं दिसत नसल्यामुळे ही कडी धूळीचे आणि दगडांचे कण असतील असं प्रतिपादन त्याने केलं. व्हॉयेजर (व्हॉयेगर असा उच्चार मी प्रथमच इथे वाचते आहे) आणि पायोनियर, आणि पुढे कसिनी वगैरे यानांनी फोटो काढून मॅक्सवेलचा सिद्धांत खरा असल्याचे सिद्ध केले.
संदर्भ विकीपिडीयाचे हे पान.

मॅक्सवेलने हे संशोधन अ‍ॅबरडीनच्या विद्यापीठात असताना केले. त्यानंतर तो लंडनच्या किंग्ज कॉलेजात लागला. तिथे त्याने विद्युतचुंबकीय क्षेत्रावर मूलभूत काम केले. हे काम आज मॅक्सवेलच्या समीकरणांच्या रूपात आता भौतिकशास्त्राचे सर्व विद्यार्थी पायाभूत म्हणून शिकतात.

आणि हो, गुरूवर काळे खडक नाही. एक घन वस्तू, जिला सर्वजण शूमेकर लेव्ही-९ असं म्हणतात, ती गुरूवर आदळली तेव्हा गुरूने ती गिळंकृत केली आणि काही दिवसात त्याचं नामोनिशाणही राहिलं नाही हे आपल्यापैकी बहुतेकांनी कुठे ना कुठे पाहिलं असावं.
शिवाय गुरूवर एक रक्तवर्णी, प्रचंड मोठा ठिपका आहे. हे गुरूवरचं वादळ आहे असं नासाचे आणि इतरही शास्त्रज्ञ समजतात. तेव्हा वर्तकांना गुरूवर वादळं दिसली नसतील तर ते चुकीच्या बाजूला उतरले असं खेदाने नमूद करते.

असो. आता बाकीचं लिहायचा कंटाळा आला.
माझा प्रतिसाद फारच पकाऊ आहे, त्यापेक्षा धाग्यावरचे इतर अनेक प्रतिसाद फारच उद्बोधक आणि विनोदी+करमणूकप्रधान आहेत. तेव्हा आवरते. ही सगळी माहिती नासाची संस्थळं, विकीपीडीया वगैरे ठिकाणी आहेच, मी तिथूनच उचलून आणली आहे. फार खोदकाम न करताच अशी बरीच "पकाऊ" माहिती मिळेल.

वर्तकांच्या व्यक्तिगत सहलींबद्दल (vacations) मला काहीही घेणंदेणं नाही; पण वर्तकांच्या जन्माआधीच ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञाने शनीच्या कडी एकसंध नसणं सिद्ध केलेले आहे.

मृगनयनी's picture

19 Apr 2012 - 3:55 pm | मृगनयनी

@ साती.. & others... :-

या आणि य व्यतिरिक्त बर्‍याच लिन्क्स मलाही माहित आहे. तसेच या कुणीही पाहू शकते. यामध्ये देखील "मा. डॉ. पद्माकर वर्तक" यांनी काढलेले प्रेडिक्शन्स "नासा" च्या रिपोर्टबरोबर मॅच होतात.. असेच लिहिले आहे.
मुद्दा असा होता/ आहे, की साती- तुम्ही आणि इतर अनेकांनी- "नासा" व "डॉ. वर्तक" यांचा अन्योन्य संबध काय? असा प्रश्न मला विचारलेला होता... जर तुम्ही किन्वा इतर प्रश्नकर्त्यांनी जर या लिन्क्स पाहिल्या असात्या.. तर कदाचित असा प्रश्नच विचारलाच नसता.. कारण या लिन्क्स मध्ये पद्माकर वर्तक- मन्गळ व गुरुवर गेल्याची डेट, टाईम... तसेच त्यांचा रिपोर्ट वेगवेगळ्या रिलायबल न्यूजपेपरला पब्लिश झाल्याची डेट, आणि त्यानतर दोन वर्षांनी नासा'च्या रिपोर्टबरोबर टैली झालेले पॉईन्ट्स.. या सर्व गोष्टी मांडल्या गेलेल्या आहे... :)
किन्वा मग या लिन्क्स व तेथील इन्फॉर्मशन "इन्ग्लिश"मध्ये असल्याकारणाने कदाचित मला असा प्रश्न विचारणार्‍यांनी इतकी पाने वाचायचा कन्टाळा केला असावा.. किन्वा मग त्यांना "इन्ग्लिश" डायजेस्ट झाले नसावे.. असे मला वाटले... म्हणून सुलभ- मराठी भाषेत अत्यंत सोप्या पद्धतीने "डॉ. वर्तकां"चे कार्य.. त्यांच्या दिव्य दृष्टीचे महत्व, त्याद्वारे मन्गळ-गुरु ग्रहावरील त्यांचा अद्भुत प्रवास ... इ. गोष्टी मला टंकित कराव्या लागल्या.... असो.

इच्छुकांनी त्यात नमूद केलेल्या वृत्तपत्रांशी, मासिकांशी सम्पर्क साधून वर्तकांचे संशोधन आणि नासा'चा रिपोर्ट यांची शहानिशा करून घ्यावी.. अर्थात इन्डियन एक्सप्रेस'सारख्या न्यूजपेपरवरतीही जर विश्वास नसेल .तर मग अश्या महाभागांबरोबर बोलणेच खुन्टले!!! :)

पद्माकर'जीं वर्तक यांना मी व्यक्तिशः ओळखत असल्याने आणि माझे या विषयावरती त्यांच्याशी वैयक्तिक बोलणे झाले असल्याने तसेच तैतरीय उपनिषदातील विज्ञानमय, मनोमय, आनन्दमय.. इ. मानवी देहाच्या कोषांविषयी मला ज्ञान आणि विश्वास असल्याने पद्माकर'जींचा मन्गळ, गुरु वगैरे ग्रहांवरचा प्रवास कसा झाला असेल.. हे मी समजू शकते.
आणि सध्यादेखील एका दुसर्‍या सूर्यमालेतील ग्रहावर त्यांचे दिव्य दृष्टीद्वारे संशोधन चालू आहे.

तसेच याआधीदेखील अनेक खगोलशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या ग्रहांवर संशोधन केलेले आहे.. त्याचे रिझल्टदेखील अचूक आलेले आहेत.... याबद्दल कोणतेच दुमत नाही. इथे मुद्दा आहे.. तो वर्तकांचा.. डॉ. वर्तक समाधिअवस्थेदारे दिव्य दृष्टीतून मन्गळ, गुरु, शनी वगैरे ग्रह कसे बघू शकतात...हा प्रश्न कुणालाही पडणे साहजिकच आहे. आणि त्याची सगळी उत्तरे वर साती' यांनी नमूद केलेल्या डो. वर्तक'जींच्या सन्दर्भातील लिन्क्समध्येच सापडतात.

त्यामुळे ज्यांना उपनिषदे, मानवी देहातील अन्नमय कोष, प्राणमय कोष या सगळ्याबद्दल माहिती नाही.. आणि ते माहिती करून घ्यायची इच्छा नाही .. किंवा कदाचित कुणाची तशी क्षमताही नसते.. अश्या लोकांना "ग्रहांवर गेल्यावर तेथे मानवी व्हिजिबल शरीर नसतानासुद्धा सुगन्ध कसा येऊ शकतो.. "हे नाही समजू शकणार!!!! :)

ज्यांना मानवी देहाच्या या चार कोषांबद्दल कुतुहल आहे.. आपण आपले मूळ शरीर पृथ्वीवर सुरक्षित ठेवून 'विज्ञानमय कोषाद्वारे' महालोकातून ग्रहांवर कसे काय प्रवास करू शकतो.. या बद्दल जिज्ञासा आहे.. अश्यांनी डॉ. वर्तकांची डयरेक्ट भेट घेणे केव्हाही उचित ठरेल..

असो.. पद्माकरजीं'चे कार्य, दिव्य दृष्टीद्वारे त्यांचा ग्रहांवरचा प्रवास, त्यांची नि:स्पृह वृत्ती हे सगळे पाहिले.. की खरोखर त्यांच्याविषयी आदर दुणावतो. बरं.. इतके सारे संशोधन केले असूनही त्यांच्यामध्ये तिळमात्रही गर्व दिसून येत नाही..

तसे आजकाल आम्हीदेखील "क्षमाशील वृत्तीचे बनत चाललेलो आहोत.. अगदी..काही दिवसांपूर्वीच -आधी मिपा'ला आणि नतर आम्हाला स्वतःहून शरण आलेल्या काहीजणांना आम्ही उदार मनाने माफ केले बरं!.. भले आता ते शरणागत कितीही दात दाखवत असले.. तरी आमच्या गुरुंची आज्ञा होईपर्यंत आम्ही त्यांच्या "मन्गळावरच्या पाण्याला" 'लाल वारुणि' पण म्हणू ..वाटल्यास तांबड्या समुद्राचा रन्ग हा "निळा" असतो.. असेही म्हणू.. ;) ;)

त्याचं काय आहेना... "जोकराची टोपी" कितीही उलटी करून फिरविली तरी ती जोकराचीच टोपी असते. आणि सर्कशीतले जोकर सर्कशीतच चान्गले वाटतात.. असे आम्हाला आमचे "गुरुजी" सांगतात आणि आमच्या गुरुजींना भावभक्तीने दिलेला घास हा "गोडच" लागतो... :)

घास कडू लागणारे... ते जोकर-टोपीवाले रिन्गमास्तर!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Apr 2012 - 9:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"नासा" व "डॉ. वर्तक" यांचा अन्योन्य संबध काय? असा प्रश्न मला विचारलेला होता

नाही. वैज्ञानिक संशोधनात 'नासा'ला वर्तकांचा कसा फायदा झाला आहे असा प्रश्न होता.
वर्तकांनी सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी आधीपासूनच (पाश्चिमात्य संस्थांमधील संशोधनामुळे) मानवजातीला माहितच होत्या असं जे मी माझ्या वरच्या प्रतिसादात लिहीलेलं आहे त्याबद्दल काही टिप्पणी मिळाल्यास आनंद होईल. किंवा सुगंध समजतो पण हवेचा दाब कमी आहे हे समजत नाही असं का? याचंही उत्तर समजून घेण्याची इच्छा आहे.

सर्वसामान्यत: संशोधनात दुसर्‍याच्या कामाचा फायदा झाल्यास, आपल्या संशोधनात त्या संशोधनाचा उल्लेख करतात. याला citation असं म्हटलं जातं. 'नासा'ने वर्तकांशी काही वेगळा संपर्क केला असल्यास त्याची प्रत पहावयास मिळेल का? आपला मराठी माणूस आहे म्हणून अधिक आपुलकी, दुसरं काय!

आणि सध्यादेखील एका दुसर्‍या सूर्यमालेतील ग्रहावर त्यांचे दिव्य दृष्टीद्वारे संशोधन चालू आहे.

वर्तकांना कदाचित या, या किंवा या विदागाराचा उपयोग होईल. शिवाय OGLE या प्रकल्पात याच विषयावर काम सुरू आहे. प्रसिद्ध केलेले सोडून शेकडो ग्रह त्यांच्या कन्फर्म करण्याच्या यादीत आहेत. (खासगी संपर्कातून मिळालेली माहिती.)

मृगनयनी's picture

19 Apr 2012 - 10:55 pm | मृगनयनी

आपण डॉ. वर्तकांशी सम्पर्क साधून उचित माहिती मिळवू शकता.... आपल्याला पाहिजे असलेल्या प्रती, पुरावे त्यांच्याकडेच सापडू शकतात.

बाकी

आपला मराठी माणूस आहे म्हणून अधिक आपुलकी, दुसरं काय!

हे वाक्य वाचून =)) अश्या स्माईली टंकण्याचा मोह आवरला..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Apr 2012 - 1:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण डॉ. वर्तकांशी सम्पर्क साधून उचित माहिती मिळवू शकता.... आपल्याला पाहिजे असलेल्या प्रती, पुरावे त्यांच्याकडेच सापडू शकतात.

ओक्के.

हे वाक्य वाचून =)) अश्या स्माईली टंकण्याचा मोह आवरला..

जियो!

साती's picture

21 Apr 2012 - 2:34 pm | साती

त्यांनी काढलेल्या प्रेडिक्शनचा "नासा"लाही फायदा झालेला आहे.
कुठे म्हणे?
असा प्रश्न मी माझ्या प्रतिसादात विचारला होता.
त्याचं उत्तर आपण दिलेल्या लिंकांत सापडलेले नाही. काही अधिक इंग्रजी येणार्‍या लोकांनाही मी त्यांचा अर्थ विचारलापण त्यांनाही या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही.
बाकी आपल्या तीव्र निष्ठांचा आणि तुम्ही दुसर्‍यांना अपमानास्पद भाषेत उत्तरे देऊन त्या निष्ठांचं केलेल्या समर्थनाचा अनुभव (जरी स्वानुभव नसला तरी)असल्याने यापुढे या विशयावर आपल्याशी विवाद करायची इच्छा नाही. धन्यवाद.

मंगळावर तर जाऊ द्या शेजारच्या बंद खोलीतल्या १० वस्तू ओळखून दाखवण्याचे आव्हान अंनिस ने दिले होते...त्याचे आजतागायत उत्तर वर्तकांनी दिले नाही......

साती's picture

19 Apr 2012 - 12:14 am | साती

काय हो, असली बारिक सारीक आह्वाने स्विकारायला वर्तक स्वतः येतील काय? त्यांना मंगळावर आणि गुरूवर जाण्यातून वेळ तरी मिळायला पाहिजे ना! :)
उद्या मी माझ्या बाळाचं मोडलेलं खेळण्यातलं विमान दुरूस्त करायला तुमच्या त्या नासाच्या डायरेक्टराला बोलावल्म तर येईल का तो? गेलाबाजार इस्त्रोवाला तरी येईल का? ;)

Nile's picture

19 Apr 2012 - 1:17 am | Nile

पण मला बोलावलेत तर मी येईन हो! दोन वेळचं जेवण आणि चहापाणी मिळेल तोवर विमान दुरुस्त करायला जरूर येईन. ;-)

साती's picture

21 Apr 2012 - 2:23 pm | साती

नक्की या.तुमच्या अन्नमय कोषाला अन्नाचा पुरवठा करायची जबाबदारी माझी. :)

अर्धवटराव's picture

19 Apr 2012 - 12:19 am | अर्धवटराव

माहितीबद्दल धन्यवाद !!
आमचा आळस आड येतो हो... नाहि तर या सर्व उपद्व्यापाची शहानीशा करायला आवडले असते. असो... मीपा वरचे शास्त्रज्ञ हे काम करतीलच.

अर्धवटराव

Nile's picture

19 Apr 2012 - 2:21 am | Nile

"तैत्तरीय उपनिषदा"नुसार (प्रत्येक )मानवी शरीर हे "अन्नमय कोश"असून त्या पूर्ण मुख्य अन्नमय शरीरामध्ये / कोषामध्ये "प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनन्दमय" असे चार प्रकारचे उपशाखीय कोष असतात.

ते डागदर अजून जिवंत आहेत का गेले हो? नाही एक प्रश्न विचारायचा होता.

माझं शरीर अन्नमय कोश असून सूद्धा ठराविक प्रकारचे अन्न खाल्ल्यावर मला जुलाब का होतात?

परिकथेतील राजकुमार's picture

19 Apr 2012 - 4:08 pm | परिकथेतील राजकुमार

माझं शरीर अन्नमय कोश असून सूद्धा ठराविक प्रकारचे अन्न खाल्ल्यावर मला जुलाब का होतात?

निळ्या तुझ्यावरती बहूदा कोणीतरी करणी केली असावी.

Nile's picture

19 Apr 2012 - 8:58 pm | Nile

तूच असशील तो!

मृगनयनी's picture

19 Apr 2012 - 4:30 pm | मृगनयनी

ते डागदर अजून जिवंत आहेत का गेले हो? नाही एक प्रश्न विचारायचा होता.

माझं शरीर अन्नमय कोश असून सूद्धा ठराविक प्रकारचे अन्न खाल्ल्यावर मला जुलाब का होतात?

नाईल... हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही हयात असून सुस्थितीत आहेत. :)
आणि प्रत्येक जिवन्त माणसाचे / प्राण्याचे...किन्वा कोणत्याही सजीवाचे शरीर हे एक अन्नमय कोशच असते. त्यामुळे आपोआपच त्यास नॉर्मल शरीरधर्मातल्या - भूक, तहान, मैथुन, सुख, दु:ख, आनन्द, सन्ततीनिर्मिती.. इ सगळ्या गोष्टी लागू होतत.. त्यामुळे आपले "जुलाब होणे" नॅचरल आहे. वेळीच औषध घेऊन उपचार करा.. नाहीतर तुमच्या अन्नमय कोषातली जीवशक्ती कमी होऊन इन्द्रिय शैथिल्य व बुद्धिमान्द्य इ. व्याधी उद्भवू शकतात.

तुमचा 'अन्नमय कोष" जितका शुद्ध आणि पवित्र असेल.. तितक्या लवकर तुम्हाला तुमच्याच विज्ञानमय कोशाची माहिती होऊन तुम्हीदेखील मन्गळावर जाउ शकाल!!! :)

Nile's picture

19 Apr 2012 - 8:55 pm | Nile

हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही हयात असून सुस्थितीत आहेत.

अरेरे..आपलं.. अरे वा!

आणि प्रत्येक जिवन्त माणसाचे / प्राण्याचे...किन्वा कोणत्याही सजीवाचे शरीर हे एक अन्नमय कोशच असते. त्यामुळे आपोआपच त्यास नॉर्मल शरीरधर्मातल्या - भूक, तहान, मैथुन, सुख, दु:ख, आनन्द, सन्ततीनिर्मिती.. इ सगळ्या गोष्टी लागू होतत.. त्यामुळे आपले "जुलाब होणे" नॅचरल आहे. वेळीच औषध घेऊन उपचार करा.. नाहीतर तुमच्या अन्नमय कोषातली जीवशक्ती कमी होऊन इन्द्रिय शैथिल्य व बुद्धिमान्द्य इ. व्याधी उद्भवू शकतात.

=)) =)) सदर तत्वज्ञान वाचून आमची सगळीच इंद्रीयं शिथिलपडली आहेत. बुद्धीचं तर विचारूच नका. (बाकी सुक्ष्मरुपात कोणाला तिथे धाडून इंद्रियांत पुन्हा चैतन्य आणता येईल का हे विचारायला पाहिजे. ;-) )

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Apr 2012 - 10:29 am | विश्वनाथ मेहेंदळे
हे डॉक्टर मि. वर्तक अजूनही हयात असून सुस्थितीत आहेत.

अरेरे..आपलं.. अरे वा!

अत्यंत थर्ड क्लास रिमार्क. ज्यांची बुद्धी केवळ पचनसंस्थेच्या दुसऱ्या टोकावरचे विनोद करण्याइतकी आहे त्यांच्या तोंडी लागण्यात काही हशील नाही, तरी केवळ निषेध व्यक्त करतो.

प्यारे१'s picture

20 Apr 2012 - 10:42 am | प्यारे१

जान दे ना विमे... कि फर्क पैंदा???? :)

मदनबाण's picture

20 Apr 2012 - 12:36 pm | मदनबाण

जान दे ना विमे... कि फर्क पैंदा????
+
ओय पापे क्यो द्यान देता है यार ! ;)

Nile's picture

21 Apr 2012 - 12:25 pm | Nile

दोआकाटा

Nile's picture

20 Apr 2012 - 8:46 pm | Nile

अत्यंत थर्ड क्लास रिमार्क.

तुम्ही बरोबर ओळखला!

ज्यांची बुद्धी केवळ पचनसंस्थेच्या दुसऱ्या टोकावरचे विनोद करण्याइतकी आहे त्यांच्या तोंडी लागण्यात काही हशील नाही, तरी केवळ निषेध व्यक्त करतो.

वा! तुमच्या सारखे लोक नसत तर मिसळपावचे काय झालं असतं नाही! तुमचे महान कार्य असेच चालू ठेवा. मिसळपावसाठी तुम्ही म्हणजे जंगलातल्या मागासलेल्या जमातीसाठी अंधारातले काजवेच जणू!

सद्ध्यातरी तुमच्या लोकांना विमान वगैरे संज्ञांचा अर्थ समजावण्याच्या महान कार्यात माझा खोडा झाला म्हणून स्वारी म्हणतो! चालू द्या!

दादा कोंडके's picture

14 Apr 2012 - 8:30 pm | दादा कोंडके

विमानंच का? दळणवळाच्या साधनात अजुनही पुढं काही नवीन शोध लागतील. मग ते सुद्धा पुर्वीच कसे होते ती सांगणारे लेख येतील. पण ते तेंव्हाच येतील आत्ता येणार नाहीत, कारण मग त्याचा उपयोग होईल ना! :)

बाकी रामायणात मारुती एक रोबो होता, किंवा गणपती म्हणजे डेस्कटॉप संगणकच होता (कान म्हणजे दोन स्पीकर, पोट म्हणजे मॉनिटर आणि डोकं म्हणजे सिपीयु. हे कमी म्हणून दोन्ही समोर उंदीरच असतो म्हणे) वगैरे थिअरीज ऐकण्यात आहेत!

प्राध्यापक's picture

14 Apr 2012 - 9:24 pm | प्राध्यापक

या विषया संबधात प्रा.सुरेशचन्द्र नाडकर्णी यांच्या 'पृथ्वीवर माणुस उपराच' या पुस्तकात सविस्तर माहीती आहे ,या विषयावर सर्वप्रथम लेखन एरीक व्हॅअन डेनिकन या संशोधकाने केलेले आहेत ,सदर पुस्तकात पृथ्वीवर मानवाच्या अगोदर ही एक प्रगत संस्कृती अस्तीत्वात होती असा दावा करण्यात आलेला आहे.सुमारे १२/१३ वर्षापुर्वी सकाळ वर्तमान पत्रात एअक लेखमाला हि नाडकर्णी यांनी चालवली होती.

शिल्पा ब's picture

14 Apr 2012 - 9:41 pm | शिल्पा ब

पेरु मधील त्या मोठ्ठ्या आकृत्या म्हणजे आकाशातुन देवांना दिसावं की खाली लोकं त्यांचे भक्त आहेत म्हणुन काढलेल्या आहेत असं डिस्कव्हरी चॅनल वर पाहीलेलं आहे.

असो, ते नासाला कसा अन काय फायदा झाला ते लिंकवलं तर आमचंही ज्ञान वाढेल तरी मृगनयनी तैंनी हे मनावर घ्यावंच. खरंतर अशी देवभोळी लोकंच देशाची संपत्ती आहेत. नैतर पाश्चिमात्यांनी आपले सगळे पुराणकालीन शोध चोरुनदेखील आपल्याला कळले नसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Apr 2012 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>देवभोळी लोकंच देशाची संपत्ती आहेत.

कृपया, देवभोळ्या लोकांची टींगल करु नये ही नम्र विनंती.

-दिलीप बिरुटे
(देवभोळा)

चित्रगुप्त's picture

14 Apr 2012 - 10:13 pm | चित्रगुप्त

"नासाला कसा अन काय फायदा झाला ते लिंकवलं तर आमचंही ज्ञान वाढेल तरी मृगनयनी तैंनी हे मनावर घ्यावंच"
....अगदी असंच म्हणतो.

तसंच......."पद्माकर वर्तक" इज द ग्रेट मॅन!!!.. आय नो हिम.......... तर मग खालील खुलासा अपेक्षित आहे:

वर्तक साहेबांना "ब्रम्हर्षी" ही पदवी कुणी दिली, हे जाणून घेण्यास उत्सुक आहे, कारण पुराणकाली ही पदवी मिळवण्यासाठी विश्वामित्र ऋषींनी घनघोर तपश्चर्या केली होती, आणि स्वतः "ब्रम्हर्षी" असलेले वसिष्ठच केवळ त्यांना ते सर्टिफिकेट देउ शकत होते. असे असताना या कलियुगात वर्तकांना ही पदवी देण्यारा कोण बुवा हा नरपुंगव ? अशी जिज्ञासा वाटणे सहाजीकच...
...की... उदाहरणार्थ त्याकाळी "पुणेकर" नावाची एक जमात असे, ही मंडळी अखिल जगतातील यच्चयावत नियमांना हुबेहुब अपवाद वगैरे असत ..... तसे काही आहे काय?

नुस्तं धावपट्टीगत काहीतरी दिस्लं की हा विमान होता याचा पुरावा मानायचा?

असो.. एक इनोद............

एकदा एक चिनी मानूस आणि एक हिंदुत्ववादी मनुष्य उत्खनन करत फिरत असतात.

आधी चीन मध्ये जातात. तिथे उकरतात तर एक टेलिफोनची केबल मिळते.. चिनी मानुस म्हणतो.. यावरुन हे सिद्ध होते की आमच्या देशात प्राचीन काळी टेलिफोन होते.

मग भारतात उकरतात, तर काहीच मिळत नाही.. चिनी मानुस तुच्छतेने म्हणतो.. तुमच्या देशात तर साधी केबलसुद्धा मिळाली नाही.

तेच तर... यावरुन हे सिद्ध होते की प्राचीन काळी आमच्या देशात मोबाइल आणि वायरलेस होते.... हिंदुत्ववादी गर्वाने म्हणतो.. :)

रमताराम's picture

15 Apr 2012 - 12:23 am | रमताराम

पुरावे मागायचे नसतात असे, देशद्रोही, संस्कृतीद्रोही कुठले. मुकाट्याने उचलून फेसबुकावर टाका नि गावभर लाईक करा असा जोगवा मागायला सुरवात करा बघू.

chipatakhdumdum's picture

15 Apr 2012 - 12:37 am | chipatakhdumdum

जरा मिसळपाव सोडून इतर काहीतरी वाचत जावा की राव.
निदान बेळगावी पुस्तक तरी......

वर्तकांच्या वास्तव रामायणात या पौराणिक विमानांच्या बाबतीत वर्तक म्हणतात पाहा पृ.क्र. १३८ शेवटचा उतारा पाहा. पुष्पक विमानातून उतरल्यानंतर रामाला चांगलं विमान मिळालं होतं. पण, रामानं त्या विमानाच्या ड्रायव्हरला विमान घेऊन जा ''वैश्रवणाला तू नेत जा ! मी तुला आज्ञा देतो, जा. (यु.१२७)असे सांगितले आणि ते विमान निघून गेलं. वर्तकांच्या भाषेत '' रामाची ही वृत्ती खास भारतीय माणसाचीच वृत्ती आहे. रामापासून आजपर्यंत भारतातील माणसे अशीच वागली आहेत, म्हणूनच आपल्या देशाचे व संस्कृतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जगात कुठलीही वस्तू दिसली की ती मिळविण्याचा व तशीच वस्तू भारतात बनविण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तरच जगातील स्पर्धेत आपण टिकून राहू . आपल्याला हे जमणार नाही' असे म्हणून हातपाय गाळून बसण्याची वृत्ती आता तरी सोडून दिली पाहिजे''

विमान रामाच्या ताब्यात असूनही आपल्या ताब्यात ठेवलं नाही. तसं दुसरं विमान बनविण्याचा विचार सुद्धा आला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या वर्तकांच्या विचारांवरुन असे म्हणता येते की, रामाकडे हजार वर्ष पुढे पाहण्याची दृष्टी नव्हती, याबद्दल माझ्याही मनात आता कोणती शंका उरली नाही.

बाकी, विमानाला इंधन म्हणून पार्‍याचा वापर होत होता आणि पुढे पारा दुर्मिळ झाल्यामुळे इंधनसमस्या निर्माण झाली आणि अशी विमानं नष्ट झाली हा वकिली मुद्दा पटण्यासारखा आहे. आज पेट्रोल-डिझेल नष्ट झाल्यावर आपल्यालाही आजची वाहतूक साधनं हजार वर्षानंतर दिसणार नाही तशीच परिस्थिती झाल्यामुळे त्या काळातील विमानं आज दिसत नाही.

असो, थकलो आता. कोणाला जिज्ञासा असेल तर अजून माहिती डकवीन.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2012 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

मिपावरील ही असली संस्कृतीभक्षक आणि संस्कृतीला अपमानस्पद विधाने बघून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

अहो विमानाचे काय घेऊन बसलात, त्याकाळातील (रामायण, महाभारत इ.) युद्धात वापरल्या गेलेल्या अग्नीअस्त्र, पर्जन्यास्त्र, पाशुपत, ब्रह्मास्त्र इ. अस्त्रांमुळे निर्माण झालेला संहार आणि हानी वाचा. आजकालच्या अण्वस्त्रांमुळे होणार्‍या हानीच्या वर्णनाशी अगदी तंतोतंत जुळतात. रामायणात समुद्र ओलांडून जाणाच्या पहिल्या प्रयत्न केलेल्या सुग्रीवाने केलेले पृथ्वीचे वर्णन आणि आज सॅटेलाईट पाठवत असलेले पृथ्वीचे वर्णन किती जुळते ते स्वतःच तपासा.

ररा आणि शिल्पाबैं सारख्या संस्कृतीभक्षकांना मिपावरुन ७ दिवसांसाठी निलंबीत करावे आणि सदर धाग्याची आणि वर्तकांची खिल्ली उडवणार्‍या ननींचे सदस्यत्व महिनाभरासाठी निलंबीत करावे असा प्रस्ताव मी मांडत आहे. हे सर्व लोक परकीय शक्तींचे हस्तक असून, भारतीय संस्कृतीचे पाळे मूळे उपसण्यासाठीच भारतात कार्यरत आहेत.

रामजोशी's picture

15 Apr 2012 - 4:18 pm | रामजोशी

शास्त्रज्ञ परा (पारा नव्हे, नाहीतर लागाल उडायला !)
आणि तेही आपण विसरलात.... माकडांनी टाकलेली दगडं पाण्यात कशी तरंगली असे हे नतद्रष्ट लोक विचारतात, पण लोखंडाची एवढी मोठी जहाजे पाण्यावर कशी तरंगतात हे यांना माहीत नाही काय .......
निलंबनाबद्दल पाठिंबा...........
सकाळमधे एका शास्त्रज्ञ बाईंनी घटत्कोच एक रोबो होता असे सिद्ध केल्याबद्दल वाचल्याची आठवण झाली. अर्थात तो त्यांचा दुर्दैवाने शेवटचा लेख ठरला त्याचेही कारण तेच... परकीय हस्तकच आहे...
नाहीतर त्या बाईंनी जगातील एकूण एक शोध भारतातच कसे लागले होते हे सिद्ध करायचा विडाच उचलला होता...

आनन्दा's picture

16 Apr 2012 - 9:03 am | आनन्दा

आपण रामसेतूची उपग्रह प्रतिमा पाहिली आहे का? अगदी सरळ सुस्पष्ट आहे हो.. मी पण चकित झालो!

http://maps.google.com/maps/place?cid=5287905973995940885&q=RamSetu,+Tam...

आणि सहज एक प्रश्न मनात आला. जर हा खरेच मानवी निर्मिती असेल तर इथेच सगळ्यात कमी अंतर आहे हे कसे कळले?

रमताराम's picture

16 Apr 2012 - 2:49 pm | रमताराम

एक विचार करून पहा. बघा पटतोय का. असं घडणं शक्य आहे का? (असंच घडलं असा माझा दावा नाही, इतर कोणाचा आहे का हे ही ठाऊक नाही.)

मुळात एकसंध, सलग असलेला भूभाग, मधे कुठेतरी खाचखळगे असणारच (सपाट भूभाग शक्य आहे तसेच खाचखळग्याचा, किंबहुना जो भूभाग पाहतो तो जितका मोठा घ्याल तितकी दुसरी शक्यता जास्त, बरोबर ना?) काही कारणाने (विज्ञानवादी म्हणतील हिमयुग संपताना हिम वितळल्याने, पण आपण त्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही. कोण्या रामाने बाण मारून असे केले असेही समजू शकतो) समुद्राच्या पाण्याची पातळी उंचावली. यामुळे नैसर्गिक खळग्यांमधे पाणी भरले गेले नि भारत नि श्रीलंका असा सलग भूभाग, मधे भरल्या गेलेल्या पाण्यामुळे विलग झाला. मधल्या भागात जो उंचवट्याचा भाग होता (कदाचित पर्वतरांगांचा) तो त्याच्या उंचीमुळे खळग्यांपेक्षा वर दिसतो. आज समजा पुण्याचा परिसरात पूर्ण पाणी भरले गेले नि पुणे हा एकच जलाशय झाला (बरेच लोक खुश होतील पण ते जाऊ द्या) आणि अ. नगर नि मुंबई वेगळे झाले तर काही शतकांनंतर मधल्या - पाण्यात असणार्‍या पण शहरापेक्षा उंच असल्याने वरून पुलाप्रमाणे दिसणार्‍या - पर्वतराजीला मानवनिर्मितीत पूल असे म्हणता येईल का?

केवळ सलग दिसतो एवढा पुरावा मानवनिर्मित आहे हे सांगण्यास पुरेसा कसा काय ठरतो?

समजा तो मानवनिर्मित आहे नि रामानेच बांधला. बरं मग, आता त्याचं काय करायचं? काढा फोटो, टाका फेसबुकवर नि आणा पाच-पंचवीस लाईक्स. बसा हाटेलात नि मारा गफ्फा 'आपल्याकडे कसं सग्गळ ग्रेट होतं नै' च्या.

या फालतू अस्मितेच्या प्रश्नात अडकून राहण्यापेक्षा जर खरेच आपल्याकडे पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान होते असे समजत असू तर मग उरलेले जे अजूनही अंधारात आहे ते उजेडात आणून पाश्चात्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न आपण का करीत नाही? तिकडे लागलेले शोधच वरातीमागून घोडे फिरवत 'आमचेच होते बरं का' म्हणणे ही आत्मसंतुष्ट वृत्ती आपल्याला नक्की काय देते? एरवी वैयक्तिक आयुष्यात पाश्चात्यांनी लावलेल्या शोधांच्या मागे धावायचे, त्यांनीच निर्माण केलेली केवळ सुखोपभोगाची साधने गोळा करायची नि वर दांभिकपणे आपली संस्कृती वगैरेच्या गप्पा मारायच्या कशाला.

मृत्युन्जय's picture

16 Apr 2012 - 3:03 pm | मृत्युन्जय

पटले अगदी १०० टक्के पटले. आपले पुर्वज लै भारी म्हणत बसण्यात काहीच अर्थ नाही. आज ९९% शोध परदेशात लागत असतील तर पुर्वजांच्या पराक्रमावर आपण आपल्या मिशीला पीळ देण्यात काहीच अर्थ नाही.

पण मला मुळात कळत नाही की जर आपला इतिहास दैदीप्यमान असेल तर त्याचा अभिमान बाळगण्यात काय चूक आहे. हे शोध आम्च्या पुर्वजांनी लावलेच नव्हते असा गैरसमज करुन घेण्यात तरी काय हशील आहे. नक्की कसला न्यूनगंड आहे आपल्याला? इतिहासातून काहितरी शिकता आले तर शिका ना? नसेल येत शिकता तर काही हरकत नाही पण किमान तो इतिहास नाकारण्यात काय अर्थ आहे? पुर्वजांच्या पुण्याईवर जगुन आपली प्रगती नाही होउ शकणार हे सोळा आणे सत्य आहे. पण मग त्यांची पुण्याई नाकारुन ते लागणार आहेत का? आपल्याकडे एक प्रगत इतिहास होता आणि आपण माती खाल्ली म्हणुन आज या अव्स्थेवर पोचलो आहोत आणि इथुन पुढे आपल्यालाच यातुन मार्ग काढायचा आहे हे मनाशी ठरवले तर पुर्वजांचा पराक्रम आपल्याला थोडी का होइना प्रेरणा, आत्मविश्वास देणार नाही का? आणी समजा नसेल देणार तर ज्यांना मिळु शकते त्यांची टिंगलटवाळी करण्यात काय हशील?

आपण आपलाच प्रगत इतिहास का नाकारतो आहोत? तो गोंजारत बसुन प्रगती साधणार नाही तसा तो नाकारुनही साधणार नाही. मग तो मान्य करुन जर काही बरे साध्य होत असेल तर का नाही?

असो राहता राहिली गोष्ट लंकेच्या पुलाची तर तो रामाने बांधलेला नाही हे मान्य करणे सद्यपरिस्थितीत जास्त शहाणपणाचे पण त्या पूलाचे आणि रामायणाचे काहितरी कनेक्शन नक्की आहे ना? नेमका तिथेच पूल होता हे आपल्या अडाणी. अशिक्षित पुर्वजांना कसे कळाले. त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न त्यांनी केला असे आपण तुर्तास मानुयात पण मुळात नुसत्या डोळ्यांना न दिसणारा पूला त्यांनी कधी आणि कुठे आणि कसा शोधला आणॉ तो जर त्यांना ज्ञात होता तर ते नक्कीच थोडीतरी प्रगती केलेले होते की नाही?

नितिन थत्ते's picture

16 Apr 2012 - 3:41 pm | नितिन थत्ते

>>असो राहता राहिली गोष्ट लंकेच्या पुलाची तर तो रामाने बांधलेला नाही हे मान्य करणे सद्यपरिस्थितीत जास्त शहाणपणाचे पण त्या पूलाचे आणि रामायणाचे काहितरी कनेक्शन नक्की आहे ना?

ज्याला श्रीलंका म्हणतात त्या लंकेचे आणि रामायणाचे कनेक्शन देखील शंकास्पद आहे. रामायणातली लंका ही मध्यप्रदेशात असावी असा निष्कर्ष असल्याचे इरावती कर्व्यांच्या पुस्तकात वाचले आहे.

बाळ सप्रे's picture

16 Apr 2012 - 5:10 pm | बाळ सप्रे

एक शंका--
तरंगत्या दगडांचा पूल पाण्याखाली कसा गेला??

JAGOMOHANPYARE's picture

16 Apr 2012 - 5:39 pm | JAGOMOHANPYARE

:)

ऋषिकेश's picture

17 Apr 2012 - 9:47 am | ऋषिकेश

अवं त्यावर हन्मानाने श्रीराम पेंटल्याने ते तरंगत नव्हते का?
इतक्यावर्षात कन्चाबी पेंट निघतोय की! :)

इरसाल's picture

17 Apr 2012 - 10:20 am | इरसाल

ते नल-नील व्हते.

असुद्या.

बादवे : संभवामि युगे युगे कोणी वाचल्येय काय ?
त्या नुसार...... चंद्रावर प्रथम पाय लावणारा होता नील आर्मस्ट्राँग आणी आपल्या पुराणांनुसार चंद्रावर प्रथम पाउल ठेवणारा बाहुबली होता.त्याने केलेले वर्णन आणी आता उपग्रहांनी काढलेले पृथ्वीचे फोटो ह्यात बरेच साम्य आहे.

आता योगायोग हा की बाहुबली = आर्मस्ट्राँग.
विशेष म्हणजे मी ह्यातुन काही सिद्ध करत नाहीये.

तर्कवादी's picture

27 Jul 2022 - 4:53 pm | तर्कवादी

पण मला मुळात कळत नाही की जर आपला इतिहास दैदीप्यमान असेल तर त्याचा अभिमान बाळगण्यात काय चूक आहे.

सहमत .. इतिहास दैदीप्यमान असेल तर त्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही.
पण ज्या शोधांचे पुरावे वा तत्वतः पटणारे विवेचनही देवू शकत नाही त्या गोष्टी कपोलकल्पितच मानायला हव्या. विमान होते म्हंटल्यावर, ते कसे उडायचे ? त्याचे तंत्रज्ञान नेमके कसे होते, इंधन कोणते वापरले जायचे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
रामायण व महाभारतापुरतं म्हणायचं तर या कथांना अधिकृतपणे फक्त महाकाव्य म्हंटलेले आहे, इतिहास नव्हे. ( संदर्भ : मराठी विश्वकोष)
तसेच रामसेतू बद्दलही : (संदर्भ )
रामाचा सेतू : भारत–श्रीलंका यांदरम्यानच्या सागर भागातील ३० किमी. लांबीची प्रवाळ खडकांची रांग. तिलाच ॲडम्स ब्रिज (आदमचा पूल) किंवा सेतुबंध असेही म्हणतात. भारताच्या आग्नेय किनाऱ्यावरील रामेश्वरम् (पांबन) बेट व श्रीलंकेतील मानार बेट यांना जोडणारी ही खडकांची रांग काही ठिकाणी तुटलेली आहे. रामायणातील युद्धकांडात वर्णन केलेला, लंकेवर स्वारी करण्यासाठी नल वानराकरवी रामाने व वानरसेनेने बांधलेला सेतू तो हाच, असे मानले जाते. यावरूनच रामाने लंकेत प्रवेश करून रावणाचा पराभव केला व सीतेची सुटका केली, अशी कथा आहे. भूवैज्ञानिक अभ्यासानुसार मात्र रामाचा सेतू ही खडकांची रांग म्हणजे प्रवाळांपासून तयार झालेली प्रवाळशैलभित्ती आहे
बाकी अभिमान बाळगण्याबद्दल - -: अनेक गोष्टी आहेत - स्थापत्यशास्त्राचे अत्युत्कृष्ट नमुने आहेत (कोणार्कचे वा इतर अनेक भव्य मंदिरे, अंजिठा सारख्या लेणी , विविध स्तुप, ताजमहालसारख्या वास्तु). मोहंजोदडो आता पाकिस्तानात असले तरी ते भारतातील सिंधू संस्कृतीचा भाग होते. तिथली आधुनिक नगररचना (रस्ते, सांडपाण्याचा निचरा ई) अतिशय अभिमानास्पद नाहीत का ? भारतीयांच्या धातुविज्ञानाचा पुरावा असणारे अशोक स्तंभ अभिमानास्पद आहे. याशिवाय शुन्याची संकल्पना, दशमान पध्दती ई अनेक अभिमानास्पद गोष्टी असताना विमानाच्या विनोदाचा अट्टहास कशाला ?

श्रीगुरुजी's picture

27 Jul 2022 - 9:48 pm | श्रीगुरुजी

पु्ण्यात डॉ. सुरेश विश्वनाथ भावे नावाचे वैद्यकीय व्यवसाय असलेले एक संशोधक होते. त्यांचे स्वत:चे एक लहान विमान होते. त्यातून पौराणिक, ऐतिहासिक वर्णनांची पडताळणी करण्याचा प्रयत्न करायचे.

आषाढस्य प्रथम दिवसे या महाकवी कालिदासाने लिहिलेल्या संस्कृत प्रहसनात अशी कल्पना केली आहे की कालिदास पत्नीपासून दूर रामटेकेमध्ये असतो व पत्नीच्या विरहाने व्याकुळ होऊन आषाढ मासारंभी नागपूरपासून मध्यप्रदेशकडे चाललेल्या एका मेघासोबत तो पत्नीसाठी निरोप पाठवितो. तो मेघ ज्या ज्या प्रदेशांवरून जातो त्या प्रदेशांचे विहंगम वर्णन कालिदासाने केले आहे.

याचा पडताळा घेण्यासाठी एक दिवस डॉ. भावे आषाढ मासारंभी स्वतः आपल्या विमानात बसून त्या भूप्रदेशावरून गेले व कालिदासाने वर्णन हकेलेले बहुतांशी भूप्रदेश वर्णनाप्रमाणे दिसतात असे त्यांना आढळले.

श्रीरामसेतूवर सुद्धा त्यांनी बरेच संशोधन केले, नासाची त्या भागाची छायाचित्रे पाहिली, स्वतःच्या विमानातून त्या भागावर उड्डाण करून सेतू कोठे असावा हे समुद्राच्या पाण्याच्या रंगात पडलेल्या फरकावरून नक्की केले.

एक दिवस ते स्वतः एका नावेतून समुद्रात सेतूपर्यंत पोहोचले. त्यांचा एक सहाय्यक वरून विमानातून त्यांना मार्गदर्शन करीत होता. शेवटी श्रीरामसेतू तेथे आहे असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर सावधगिरी बाळगून नावाड्याच्या मदतीने ते समुद्रात पाण्यात उतरले. त्यांना अक्षरशः चार साडेचार फुटांवर पायाला खडकासारखा आधार मिळाला. त्यावर ते उभे राहिल्यानंतर ते छातीपर्यंत बुडले होते परंतु पायाखाली एखादी भिंत किंवा खडकांची सलग रांग असल्याचे त्यांना लक्षात आले. ते त्यावर थोडे अंतर चालले. नावाड्याने त्यांची प्रकाशचित्रेही घेतली. नंतर ते परत आले व आपल्या अनुभवांवर त्यांनी एक दीर्घ लेख लिहिला होता. आकाशातून चित्रण केले तर त्या जागी श्रीलंकेपर्यंत पाण्याखाली गडद रंगाचा अरूंद पट्टा दिसतो. श्रीरामसेतू म्हणतात तो हाच असे त्यांचे म्हणणे होते.

त्यावर ही Times of India ची बातमी -

https://m.timesofindia.com/city/pune/re-tracing-ramas-footsteps/articles...

आषाढस्य प्रथम दिवसे या महाकवी कालिदासाने लिहिलेल्या संस्कृत प्रहसनात अशी कल्पना केली आहे की कालिदास पत्नीपासून दूर रामटेकेमध्ये असतो व पत्नीच्या विरहाने व्याकुळ होऊन आषाढ मासारंभी नागपूरपासून मध्यप्रदेशकडे चाललेल्या एका मेघासोबत तो पत्नीसाठी निरोप पाठवितो. तो मेघ ज्या ज्या प्रदेशांवरून जातो त्या प्रदेशांचे विहंगम वर्णन कालिदासाने केले आहे.

याचा पडताळा घेण्यासाठी एक दिवस डॉ. भावे आषाढ मासारंभी स्वतः आपल्या विमानात बसून त्या भूप्रदेशावरून गेले व कालिदासाने वर्णन हकेलेले बहुतांशी भूप्रदेश वर्णनाप्रमाणे दिसतात असे त्यांना आढळले.

अरे वा... मग कालिदासाच्या कल्पनाशक्तीला सलाम... वर मी उल्लेखलेल्या अभिमानास्पद बाबींत कालिदास सारख्या प्रतिभावान कवीचाही सामावेश व्हायला हवाच.
असो. बाकी कालिदासानेही कुठे विमानाचा दावा केला नाही त्यामुळे तो प्रश्न येत नाहीच. आणि तरीही एकंदरीत विमानाच्या दाव्याबाबत चर्चा करायची असेल तर मी वरच्या प्रतिसादात उल्लेखलेले प्रश्न (विमानाचे तंत्रज्ञान, कोणत्या तत्वावर ते चालायचे, इंधनाचा प्रकार ई ई) टाळून पुढे जाता यायचे नाही.

श्रीरामसेतू म्हणतात तो हाच असे त्यांचे म्हणणे होते.

हो असे अनेकांचे म्हणणे आहे. पण त्याबद्दल विश्वकोषातले अधिकृत विवेचन मी वर उद्धृत केले आहे. असो.
माझ्या मते आपल्या संस्कृतीबद्दल न्यूनगंड बाळगणारे लोकच बहूधा विमानाच्या वा तत्स्म अचाट कथा पसरवित असणार. आणि इतर अनेक गोष्टी (ज्या मी वरील प्रतिसादात उल्लेखल्या आहेत) ज्यांच्या करिता कोणत्याही नव्या पुराव्याची गरज नाही, ज्या अगदी सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट दिसत आहेत त्यांचे महत्व बहुधा या मंडळींच्या लक्षात येत नसावे किंवा त्या गोष्टींचा अभिमानही वाटत नसावा म्हणून त्या गोष्टींचा उल्लेखही न करता ते केवळ काही अचाट /कपोलकल्पित बाबी पुढे रेटण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत असतात.

सहज's picture

16 Apr 2012 - 10:53 am | सहज

जब ज़ीरो दिया मेरे भारत ने
भारत ने मेरे भारत ने
दुनिया को तब गिनती आयी
तारों की भाषा भारत ने
दुनिया को पहले सिखलायी

देता ना दशमलव भारत तो
यूँ चाँद पे जाना मुश्किल था
धरती और चाँद की दूरी का
अंदाज़ा लगाना मुश्किल था

सभ्यता जहाँ पहले आयी
पहले जनमी है जहाँ पे कला
अपना भारत वो भारत है
जिसके पीछे संसार चला
संसार चला और आगे बढ़ा
यूँ आगे बढ़ा, बढ़ता ही गया
भगवान करे ये और बढ़े
बढ़ता ही रहे और फूले-फले

- गीतकार इंदीवर, मुळ प्रेरणा देशप्रेमी भारतकुमार वर्तक

कवितानागेश's picture

15 Apr 2012 - 2:46 pm | कवितानागेश

अय्या, पुराऽऽऽणेऽऽऽऽऽऽ !!!?
आपले पूर्वज कित्ती थापाडे आणि अडाणी होते हे माहित नाही का तुम्हाला?
आपण तर बाबा विज्ञानवादी आणि सत्यान्वेषी!
( स्वतःचेच गालगुच्चे घेणारी एखादी स्मायली मिळेल का इथे?)

मुक्त विहारि's picture

15 Apr 2012 - 5:17 pm | मुक्त विहारि

ग्रुहीत धरु या की हे सगळे शोध भारतात लागले.

मग जेंव्हा पहिले परकीय आक्रमण आले.(माझ्या आठवणी प्रमाणे अलेक्झांडर, त्याच्या आधी माहित नाही, कुणी सांगीतल्यास उत्तम).तर मग आपल्या कडे ही विमाने का न्हवती? (कारण अलेक्झांडरने कुठल्याही विद्यापीठाचा नाश केलेला वाचनांत आले नाही.... विद्यापीठे तोडल्या गेली ती मुसलमानी राजवटीत.)

माझ्या अंदाजाने,

व्यास आणि वाल्मिकी , हे फार कल्पक विज्ञान कथा लेखक आणि तत्ववेत्ते असावेत.
ह्या पैकी व्यास जास्त....कारण..

१. टेस्ट ट्युब बेबी...१०० मूले एका वेळी.. (पुढे मागे हे पण होवू शकेल)
२. दूर चित्र वाणी.... संजय आणि ध्रुतराष्ट्र
३. मयसभा.... आज-काल अशी घरे निर्माण होवु शकतात
४. जमिनीला न टेकणारा रथ... चुंबकीय तत्वावर चालणारी गाडी
५. अणू बाँब...

पण व्यास ह्यांनी अजुन एक मोठे काम केले ते म्हणजे "गीता".... म्हणजे व्यास हे वैद्य पण होते असे समजायला हरकत नाही. कारण मनो-विज्ञान शास्त्र आणि गीतोपदेश काही वेगळे नाही वाटत.

(हेच सुत्र अजुन चांगल्या प्रकारे चाणक्याने वापरले....."कौटिल्याचे अर्थशास्त्र "आणि गीतेतील "राजाची कर्तव्ये " जवळ जवळ सारखीच आहेत... आणि कौटिल्याने त्यात काळानुरुप बदल पण केला आहे....कौटिल्याचा उल्लेख न करण्याचा मोह टाळता आला नाही, कारण "कौटिल्याचे अर्थशास्त्र " हे पुस्तक वाचल्या शिवाय भगवत्-गीतेचा अभ्यास पुर्ण होत नाही.)

रमताराम's picture

16 Apr 2012 - 2:30 pm | रमताराम

कासरा आवरा हो, गाडी अंमळ जोरात सुटली.
जरा तपशीलात गफलत आहे हो.

१. १०० मुले गांधारीचीच नाहीत नि एका वेळची तर मुळीच नाहीत. चौदा मुले गांधारीची ती ही वेगवेगळ्या वेळी जन्मलेली.
गीता ही व्यासांच्या महाभारताचा भाग नव्हे.

मयसभेच्या अस्तित्वाबाबत कोणतीही शंका/आक्षेप घेतलेला आमच्या पाहण्यात आलेला नाही.

....."कौटिल्याचे अर्थशास्त्र "आणि गीतेतील "राजाची कर्तव्ये " जवळ जवळ सारखीच आहेत...
आँ. जाऊ दे हा मुद्दा इतरांना प्रतिवाद करण्यास सोडून देतो.

व्यास हे वैद्य पण होते असे समजायला हरकत नाही.
खो: खो: खो:
हे असं आहे बघा. चांगले सुश्रुत, वाग्भट नि चरक यांच्यासारखे दिग्गज आपल्याकडे होऊन गेलेले असताना नि त्यांचे श्रेय जगन्मान्य असताना उगाचच मानसशास्त्राचे श्रेयही लाटण्याचा प्रयत्न करून हास्यास्पद का व्हावे. सर्वसामान्य वर्तणुकीचे चार नियम नि मानसशास्त्र यात जमीन-अस्मानाचा फरक आहे हो सायबा. हे म्हणजे सीतेने काढलेल्या रावणाच्या अंगठ्यावरून कैकेयीच्या दासीने उरलेला सारा रावण चितारावा तसं दिस्तंय राव. लैच हुशार की हो तुम्ही. ;) (ह. घ्या हे वे. सां. न. ल.)

मृत्युन्जय's picture

16 Apr 2012 - 2:49 pm | मृत्युन्जय

१०० मुले गांधारीचीच नाहीत नि एका वेळची तर मुळीच नाहीत. चौदा मुले गांधारीची ती ही वेगवेगळ्या वेळी जन्मलेली.
गीता ही व्यासांच्या महाभारताचा भाग नव्हे.

तार्किक दृष्ट्या हेच बरोबर वाटते. पण महाभारतात तर्काच्या पट्टीवर पटणार्‍या फारच कमी गोष्टी आहेत. १ महिन्याच्या अंतराने जन्मलेली गांधारीची १०१ मुले (१०० मुलगे + १ मुलगी) हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार. १४ मुलांची थियरी महाभारतात नाही. दु या आद्याक्षराने नावे असले १४ मुले तेवढी गांधारीची बाकी सगळी दासींची मुले हा निष्कर्ष भैरप्पांच्या पर्व मधला. ती १४ मुले (ली) अशी:

Duryodhana, Duhsasana, Duhsaha, Duhshala, Durmukha, Durdharsha, Dushpradharshana; Durmarshana, Dushkarna, Durmada, Dushpradharsha, Durvirochana; Duradhara, Dushala (Daughter)

महाभारतातली कथा मोठी चमत्कारिक आहे आणी ऐकणे नक्कीच हास्यास्पद वाटेल पण महाभारतानुसार ती सर्व १०१ मुले माठात मांसाचा तुकडा ठेवुन त्यातुन जन्माला आली. Saomething like Test Tube Baby असे काही जणांचे मत आहे.

रमताराम's picture

16 Apr 2012 - 2:56 pm | रमताराम

१४ मुले तेवढी गांधारीची बाकी सगळी दासींची मुले हा निष्कर्ष भैरप्पांच्या पर्व मधला.
हा तर्क - तुम्ही म्हणता म्हणून तर्क - असलाच तर भैरप्पापूर्व ( :) )आहे. कारण शांताबाईंच्या आणि/किंवा, इरावतीबाईंच्या लेखांमधूनही याचा उल्लेख आहे. नेमके संदर्भ आठवत नाहीत. पर्व वाचण्यापूर्वीपासून मी गांधारीची चौदा मुले हेच गृहित धरून चाललो होतो. बहुधा अरुणाताईंचीही एक युयुत्सुवरील कथा आहे युद्धोत्तर काळावर, त्यातही असाच उल्लेख आहे. संदर्भ शोधून सापडले तर इथेच लिहिन.
परंतु हा घाऊक १००-१०१ मुले जन्माला येण्याचा भाग मूळ महाभारतात नसावा (पौराणिक असावा) किंवा प्रक्षिप्त ठरवला गेलेला असावा.

मृत्युन्जय's picture

16 Apr 2012 - 3:24 pm | मृत्युन्जय

नाही हो. संदर्भ मूळ मानल्या जाणार्‍या महाभारतातही असाच आहे आणि तो प्रक्षिप्त मानला गेलेला नाही. युगांत किंवा व्यासपर्व मध्ये हे वाचल्यासारखे वाटत नाही तरी परत वाचुन खात्री करुन घेतो. आणि कसेही असले तरी तो एका आधुनिक (भैरप्पा, भागवत, कर्वे आधुनिक बरंका :) ) लेखकाचा निष्कर्ष आहे. मूळ महाभारतातला नाही :)

गीता व्यासानी नाही लिहिली, मग कुणी लिहिली?

( शंकराचार्यानी का? )

आता या प्रतिसादाला काही ही म्हणा :) पण सध्या अशाच काहीश्या संदर्भात उकराउकरी चालू आहे त्यामूळे आलाच लेख नजरेत तर लिहून टाकतो.
बाकी मुद्दे बाजूला राहू दे
१) त्या चमकत्या त्रिशूलाचा उल्लेख रामायणातही आहे, दुसरं म्हणजे तो अशा दगडात कोरलेला आहे की तो फार ठिसूळ असतो मग हे कोरीव काम कुणी आणि कसे केले ?
२) नाझ्का लाईन्स नुसत्याच रेषा नाहीत तर आजूबाजूला काही चित्रेही आहेत जी उंचावरूनच स्पष्ट दिसतात मग हा उपद्व्याप कुणी आणि का केला ?
३) आजही बर्फ नसलेल्या उत्तरध्रूवाचे नकाशे उपलब्ध नाहीत तरीही बर्फाखाली झाकलेल्या भूभागाचा एक हरणाच्या कातडीवर रेखाटलेला नकाशा पुरातन काळात माणसानेच बनवलेला आहे.
या सगळ्या गोष्टींकडे नक्की कुठल्या नजरेने पहाणार आपण ?

पण त्या माणसाने हरणाचे कातडे का वापरले? कागद नव्हता का? म्हणजे त्या काळात विमान होते पण कागद पेन नव्हते असे म्हणायचे आहे का? मग विमान तयार करायचा आराखडा कातड्यावरच होता का? :)

प्राचीन काळात ऋषी-मुनी आपले लिखाण भूर्जपत्रांवर करत, तर राजाज्ञा कापडावर लिहून प्रसृत केली जाई. मात्र दूत पाठवून तोंडी निरोप देण्याची पद्धत सर्रास वापरात होती. नंतर कागदाचा शोध भारतात लागला. आपण तो चीनने लावला, असे वाचत आलो, परंतु नव्या संशोधनानुसार चीनच्याही आधी भारतात कागद वापरला जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. याबाबतचा माहितीपूर्ण लेख 'विमर्श' या त्रैमासिकाच्या जानेवारी ते मार्च १२ काळातील 'इतिहास प्रबोधन' विशेषांकात श्री. गोसावी यांनी लिहिला आहे. अभ्यासकांनी जरुर वाचावा.

मन१'s picture

15 Apr 2012 - 9:31 pm | मन१

मुद्दा क्र.३ बद्दल अधिक माहिती मिळेल काय?
नीटसे कळाले नाही.

एरव्ही मौनव्रती

गणामास्तर's picture

16 Apr 2012 - 8:13 pm | गणामास्तर

डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या "पृथ्वीवर माणूस उपराच" या पुस्तकात यासंबंधी माहिती दिली आहे. अ‍ॅडमिरल पिरी रीस (हा बहुतेक फ्रेंच होता) याने खूप पूर्वी हरणाच्या कातड्यावर जगाचा नकाशा बनवला होता, जो आजच्या जगाच्या नकाशाशी तंतोतंत जुळतो आणि तसा नकाशा उपग्रहाच्या मदती शिवाय बनवणे शक्य नाही. तो नकाशा आज हि पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

नक्की मनोबा ,
अ‍ॅडमिरल पिरी रीस यांनी अंतराष्ट्रीय भौगोलीक दिनाच्या निमित्ताने सोळाव्या शतकातले काही नकाशे संयुक्त राष्ट संघटनेने भरवलेल्या प्रदर्शनात मांडले होते. ते त्यांना तुर्कस्थानात टोपीकापी की काहीश्या नावाच्या राजवाड्यात मिळाले त्यात तो नकाशा होता, तसेही त्यांचे दोन नकाशे आजही बर्लिन च्या स्टेट लायब्ररीत आहेत.

अर्थात माझी माझ्या कामाच्या संदर्भात चाललेली काहीशी उकराउकरी आहे ही बाकी पुराणात विमानं होती की नाही हे वाद चालू राहू दे न जाणो चर्चेतून इथेच एखाद्या मर्क्युरी व्हर्टेक्स इंजिनाचा आराखडा तयार व्हायचा :)

जमोप्या तो नकाशा बनवणारा कार्टोग्राफर होता ना ! त्याला ऐन वेळी कागद मिळालाच नसेल मग काय समोर हरीण दिसलं काढला त्यानं त्याच्यावरच नकाशा :)

ऋषिकेश's picture

16 Apr 2012 - 9:40 am | ऋषिकेश

हा हा हा!
असो!

मृत्युन्जय's picture

16 Apr 2012 - 10:30 am | मृत्युन्जय

च्यामारी एवढ्या महान गोष्टींचे शोध भारतात लागले? काहितरी काय राव? सर्व महत्वाचे शोध पल्याड लागतात . म्हणुन तर आपल्याकडचे विद्वान लोक आताशा तिकडे जातात ना? इथे आता उरलय कोण विद्वान आणि पुर्वीतरी कोण होते? उगाच कचर्‍याच्या ढीगात हिरे शोधायचे प्रयत्न का करताय राव? लायकीत रहावा ना आपल्या. तुमच्या देशात दळभद्री लोकच काय ते जन्मले. शोधकर्ते सगळे हुष्षार गोर्‍यांच्या देशात जन्मल हे सत्य जेवढ्या लवकर पचवाल तेवढे बरे आहे तुमच्यासाठी नाहितर इनोच्या बाटल्याच्या बाटल्या संपवाव्या लागतील.

राहिता राहिला प्रश्न पुराणात केलेल्या उल्लेखांचा तर ती तर चक्क बकवास आहे. काही उत्तम कल्पनाशक्ती असलेल्या माणसांनी लिहिलेल्या कादंबर्‍यांचा नसता उदोउदो करुन त्यातल्या खोट्या खोट्या गोष्टी खर्‍या मानण्याची बाळबोध वृत्ती पाहिली की खरेच हसावे की रडावे ते कळत नाही. जग कुठे चालले आहे आणि तुम्ही कुठे स्वप्नांच्या दुनियेत हरवुन बसला आहात आणि वर वावड्या उडवा की रश्याननांना वेदांमध्ये विज्ञानाची महान सूत्रे दिसली म्हणे. आणि दिसली तर दिसली ते ही तसलेच येडे नाहित काय? स्वतःच्या देशाला वाचवु शकले काय मुर्ख लेकाचे? अमेरिकेतल्या शहाण्या लोकांसमोर त्यांचा काय पाड.

असो. जागे व्हा. जागो रे जागोरे जागो. सिर्फ उठो नही जागो. वाटल्यास तो जागो चहा प्या. नसेलच तर ब्रेकफास्ट टी प्या (आमच्या गोर्‍या मालकाच्या देशातला) नसेलच तर स्टारबक्सची कॉफी प्या पण जागा.

आमच्याकडं आहे असलं एक विमान, पण लायसन नाही म्हणुन उडवत नाही. जाउदे उगाच नॉल्स्टेजॉलिव्ह्करृकिसद्क व्हायला होतं.

अरे देवा.. शिवकर, वर्तक आदि परतले...?!

बरं..

पहाटवारा's picture

16 Apr 2012 - 2:04 pm | पहाटवारा

अरे देवा ,
आधीच महाभारत काय कमी झालेय म्हणून आता रामायण हि आता जोडिला ..
बरं .. येऊ द्या ..

वा दोन टोकाची चार मते वाचून मजा आली.
(चांगलं ते स्वीकारणारा ) गण्या.

मूकवाचक's picture

16 Apr 2012 - 5:51 pm | मूकवाचक

+१
(श्रुती/ स्मृती/ पुराणोक्तवाल्यांना जाउ द्या बारा गडगड्याच्या विहीरीत. त्यांच्या विरोधात असलेल्यांचीही भली मोठी परंपरा या भारतवर्षात आहे आणि ती वेदांच्याही पूर्वीची आहे असे हल्ली वारंवार वाचनात येते. या विरोधक (तथाकथित सांख्य, चार्वाकवादी, इहवादी, बुद्धीप्रामाण्यवादी वगैरे वगैरे) लोकांनी वेदपूर्व काळ ते इ.स. २०१२ पर्यंत कोणकोणते वैज्ञानिक शोध लावले, त्यातले आजरोजी किती व्यावहारिक वापरात आहेत यावर कुणी लेख/ लेखमाला लिहीली तर वाचायला आवडेल.)

पुण्याचे वटवाघूळ's picture

16 Apr 2012 - 1:15 pm | पुण्याचे वटवाघूळ

आपल्या पुराणांमध्ये सगळे काही आहे. पुराणात "तैतियान" नावाची बोट बुडाल्याचा उल्लेख आहे. बरोबर १०० वर्षांपूर्वी Titanic नावाची बोट बुडली पण आमच्या पूर्वजांनी ते कित्येक शतके आधीच सांगून ठेवले होते. :)

JAGOMOHANPYARE's picture

16 Apr 2012 - 5:08 pm | JAGOMOHANPYARE

पुराणंच कशाला? सत्यनारायणाच्या पुस्तकात सुद्धा बुडालेली आणि परत वर आलेली बोट आहे.

बोईंग, एअरबस, अन्तोनोव, गेलाबाजार किमान बीचक्राफ्ट किंगएअर किंवा सेस्ना सायटेशनच्या लेव्हलचं तरी.... असं पूर्ण देशी बनावटीचं एकही प्रवासी विमान बनवू न शकलेल्या देशाने पोथ्यांतील अभिमान कितीकाळ बाळगावा? तो एक सारस विमानाचा प्रकल्प पाहताना धुगधुगी वाटली होती पण तोही बनत बनत कोसळलाच..

अर्थातच जुन्या काळात भारतात काहीच ज्ञान नव्हतं असं म्हणणं म्हणजे निव्वळ हास्यास्पद मूर्खपणा ठरेल. पण आता पश्चिमेस शोध लागला की नंतर मग आपल्याकडेही तो फार्फार पूर्वी लागून हरवला होता असं बाडं चापसून सांगण्याची वृत्ती सोडून आपण नवीन निर्मितीस लागू तो उत्तम दिवस.

होतं ना मर्क्युरी आयन व्होर्टेक्स इंजिन आपल्याकडे.. ठीक. पण आता नाही ना सापडत ते.? अरे.. मग आत्ता आजरोजी जे आयन प्रपल्शनचं ज्ञान अस्तित्वात आहे तेवढं तरी आत्मसात करुया की... का नुसतं नासाच्या शंभर वर्षं आधी आम्ही हे केलं होतं असं म्हणून आत्ता कॉलर टाईट करत बसायचं..?? आयन प्रपल्शनच्या ताकदीवर निर्वातात सूक्ष्म हालचाली जेमतेम करता येतात. वातावरणात विमानाला उचलू किंवा ढकलू शकेल अशी शक्ती त्यातून उभी राहू शकत नाही हे वास्तव आजरोजी दिसत असतानाही आपल्याकडे असलेलं (तळपदेंचं) विमान आयन प्रपल्शनवर चालायचं असा विश्वास का बाळगावा? विशेषतः त्याची रिप्रोड्युसिबल नोंद शिल्लक नसताना?

इथेच मार खातो आपण..

सुहास..'s picture

16 Apr 2012 - 1:54 pm | सुहास..

होतं ना मर्क्युरी आयन व्होर्टेक्स इंजिन आपल्याकडे.. ठीक. पण आता नाही ना सापडत ते.? अरे.. मग आत्ता आजरोजी जे आयन प्रपल्शनचं ज्ञान अस्तित्वात आहे तेवढं तरी आत्मसात करुया की... का नुसतं नासाच्या शंभर वर्षं आधी आम्ही हे केलं होतं असं म्हणून आत्ता कॉलर टाईट करत बसायचं..?? आयन प्रपल्शनच्या ताकदीवर निर्वातात सूक्ष्म हालचाली जेमतेम करता येतात. वातावरणात विमानाला उचलू किंवा ढकलू शकेल अशी शक्ती त्यातून उभी राहू शकत नाही हे वास्तव आजरोजी दिसत असतानाही आपल्याकडे असलेलं (तळपदेंचं) विमान आयन प्रपल्शनवर चालायचं असा विश्वास का बाळगावा? विशेषतः त्याची रिप्रोड्युसिबल नोंद शिल्लक नसताना?

विमान डोक्यावरून गेले ;)

केवळ धागाकर्त्यासाठी :: अजुन एक 'विकीपिडीत' ;)

वरती चर्चेत त्या (पक्षी: आयन प्रपल्शन) तंत्रज्ञानाचा उल्लेख अनेकदा आलेला पाहून मी अधिक संदर्भ न देता तो उल्लेख केला.

गूगलबाबांच्या जमान्यात न समजण्यासारखं काही उरलंय का?

गूगलबाबांच्या जमान्यात न समजण्यासारखं काही उरलंय का? >>

:)

बघतो आहे !! एखादा लेहमन टर्म मध्ये लिखाण येवु द्यात की , समजायला सोप्पे पडेल :)

आबा's picture

16 Apr 2012 - 2:55 pm | आबा

शब्दा-शब्दाशी सहमत,
मोठ मोठ्या उच्चशिक्षित लोकांना असे दावे करताना पाहून हसावं की रडावं कळत नाही !

रम्या's picture

16 Apr 2012 - 5:05 pm | रम्या

गविंशी पुर्णपणे सहमत, कुठल्याही तंत्रज्ञानाची तांत्रिक माहीती पुराणात उपलब्ध नसताना, ओढून ताणून अर्थ काढून आमच्या कढे ह्यांव होते नि त्यांव होते असा फुकाचा अभिमान बाळगून स्वतःचीच पाठ स्वतःच थोपटवून घेण्याच्या वॄत्तीची किव करावीशी वाटते.

गवि's picture

16 Apr 2012 - 5:20 pm | गवि

धन्यवाद..

असं पहा, ते पुराणकालीन ग्रंथात असेलही.. न सापडलेल्या अवस्थेत.. ते सापडलं आणि त्या आकृत्या / तंत्र वापरुन खरं उदा. आयनच्या प्रॉपेल्शनने चालणारं विमान बनवता आलं तर तो सर्वोत्तम योग असेल.

पण सध्या काय होतंय की एक ब्रेकथ्रू, (उदा, हवेत उडता येण्याचं तंत्र,) सापडणे या बिंदूपासून सव्वाशी वर्षांची टाईमलाईन पाहिली तर त्यात एका समूहाने (लोकसमूह, देश ही रचना कृत्रिम का असेना पण आपण मानली आहेच म्हणून तेच धरुनच बोलू..) चारशे लोकांना घेऊन अर्धी पृथ्वी पार करणारे प्रचंड यंत्र बनवलं आणि दुसरा समूह फक्त आपण ते "आधी" शोधलं होतं या विधानाखेरीज काही फार करु शकला नाही. भले दोन समूहांची आर्थिक राजकीय स्थिती वेगवेगळी असेल.

आता आपण मागे का राहिलो याचं कारण देताना, पुन्हा शिवकर तळपदेंच्या विमानाचं उदाहरण घेतल्यास, असं म्हटलं जातं की हे संशोधन उपेक्षित राहिलं आणि विमानाचा प्रोटोटाईप तळपदेंच्या नातेवाईकांनी रॅली ब्रदर्स कंपनीला विकला.

समजा त्या संशोधनात पार्‍याच्या आयन्सनी प्रपल्शन करुन विमान उडवण्याचं पोटेन्शियल असतं तर रॅली ब्रदर्स त्याच्यावर बसून राहिले असते का? ते संशोधन सयाजीराव, टिळकांसहित अनेकांनी पाहिलं पण तरीही विस्मरणात अन अडगळीत गेलं, याचा अर्थ ते व्हायेबल नव्हतं असं सध्या का समजू नये?

आणि मग आज काय व्हायेबल आहे ते पाहून काही बनवून बाहेर विकण्याइतका दर्जा का प्राप्त करु नये?

यकु's picture

16 Apr 2012 - 1:42 pm | यकु

हे अफाट आहे.

योगप्रभू's picture

16 Apr 2012 - 3:19 pm | योगप्रभू

गविंच्या वरील प्रतिक्रियेतील हे वाक्य त्यांच्यासाठीच उत्तम उत्तर आहे.

पुराणांतील/जुन्या धर्मग्रंथांतील संदर्भ देणार्‍यांची इतकी टवाळी करण्याचे कारण नाही (ओक-वर्तक राहू दे बाजूला).
जुन्या भारतीय साहित्यातील नोंदींना प्रचंड व्यापारी महत्त्व आहे. हळद आणि कडुलिंबाच्या पेटंटचा लढा आपण अशाच जुन्या नोंदींच्या आधारे जिंकला आहे. आपले पारंपरिक ज्ञान जतन करुन ठेवण्यात आपण कमी पडतो आहोत, हे खरे असले तरी कुठेतरी सुरवात तर झाली आहे. चीनने आपल्या सर्व पारंपरिक वनौषधी व उपचार तपशिलांचे डॉक्युमेंटेशन यापूर्वीच पूर्ण केले आहे. भारतात डॉ. माशेलकरांच्या प्रेरणेने सीएसाआरआयने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

पारद इंधन विकसित करण्याबाबत नासामध्ये संशोधन सुरु असल्याचे वाचले होते. नासामध्ये जर कुणाचा संपर्क असेल तर कृपया अधिकृत माहिती द्यावी. काही वेळा आपण आपलाच हक्क प्रस्थापित करण्यात मागे पडतो आणि नंतर त्याचे परिणाम पाहून हळहळतो. गोमूत्रापासून बनवलेल्या ६० हून अधिक उत्पादनांपैकी तब्बल ४० पेटंट बाहेरच्या देशांनी घेतली आहेत. (जपान आघाडीवर आहे) भारतात याबाबतची सर्वाधिक पेटंट (१० की १२) वर्ध्याच्या गोसेवा प्रतिष्ठानकडे आहेत. गाईचे शेण, गोमूत्र यांचा औषधोपचारातील वापर आयुर्वेदात नमूद आहेच, परंतु त्यापासून उत्पादने विकसित करण्यावर लक्ष न दिल्याने ही पेटंट बाहेर गेली आहेत. कोल्हापुरी चपलांचे पेटंटही अलिकडेच दुसर्‍या गावाकडे गेल्याचे वर्तमानपत्रांत आले होते.

गोगलगाईच्या वेगाने होणारी प्रगती ही चिंताजनक बाब आहेच, परंतु त्यातही संताप येण्याजोगी गोष्ट म्हणजे आपलेच करप्ट मानसिकतेचे गुलाम लोक. जे कायम परकीयांच्या प्रगतीचे दाखले देऊन भारतीयांवर थुंकण्याचे काम करतात. असल्या लोकांकडून अवसानघात होतोच, पण इनोव्हेटिव्ह काही घडत नाही. असल्या परधार्जिण्यांपेक्षा एकवेळ परके परवडले, जे मुंबईच्या अशिक्षित डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाला सलाम करायला मुद्दाम येथे येतात आणि मास मॅनेजमेंटची संकल्पना समजून घ्यायला या डबेवाल्यांना हार्वर्डला बोलवतात.

टवाळी नाही हो.. पुराणकालीन काही शोधण्याचा प्रयत्न थांबवावा असं नव्हे.. पण एक पाय चालू काळातही असावा..

फक्त त्या पुराणकालीन नोंदीतच अडकून पुढे सरकणं नाकारण्यामुळे आपलं नुकसान होतंय. पाश्चात्य देशांना सुदैवाने ही अडचण नाही..

माझे आजोबा उत्तम प्रयोगशील शेतकरी होते अन त्यांनी पेरणीयंत्र शोधलं होतं असं म्हणत म्हणत मी आणि माझ्या पुढच्या पिढ्यांनी आजोबांच्या फडताळातल्या वह्यांवर (वह्या सापडल्या तर उत्तम ..खरंतर आजीने सांगितलेल्या आजोबांच्या कथांवर) लक्ष जास्त आणि प्रत्यक्ष शेतात लक्ष शून्य असा प्रकारही करायला नको हो..

बाजूच्या शेतातला ज्याचे आजोबा शास्त्रज्ञ नव्हते तो शेतकरी औताला बैल लावून जितकं पीक काढतोय तितकं तरी मी काढायला हवं ना?

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका कल्पक उद्योजक शेतकर्‍याने द्राक्षापासून कृत्रिम मध तयार केला. हा मध नैसर्गिक मधाइतकाच उत्तम आहे, पण द्राक्षाचा बेस असल्याने काही वेगळ्या प्रॉपर्टीज पण आहेत. मी वर्तमानपत्रात ही बातमी वाचली. त्या शेतकर्‍याचे कौतुक केले व विसरुन गेलो. मध्यंतरी चाणक्याचे अर्थशास्त्र वाचत असताना मला त्या काळातील शेतकरी द्राक्षापासूनही मध तयार करत असत, हा संदर्भ मिळाला. आता त्या शेतकर्‍याला पेटंट घ्यायला ही नोंद महत्त्वाची नाही का ठरणार?
उद्योजकतेच्या फार मोठ्या संधी आपल्याच पारंपरिक ज्ञानात दडल्या आहेत. भारतीय लोक खूप काही करत असतात. गेल्याच महिन्यात मी म्हैसूरच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फूड रिसर्चमधील एका ज्येष्ठ संशोधकाशी बोललो. त्याने भारतीयांच्या पारंपरिक खाद्य व पाककला ज्ञानावर इतका बारीक अभ्यास केला आहे, की मी थक्कच झालो. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे काही नाही. भारतात खूप काही होत असते. आपल्यापर्यंत पोचलेले नसते इतकेच.

तुम्ही म्हणताय ते चांगलं आणि खरंच आहे. मी फक्त विमाने या विषयातील मर्यादित पॉईंट धरुन बोलत होतो. जगात सगळीकडे वापरात येतील अशी उत्पादने (एअरबस, बोईंग ही विमाननक्षेत्रातली उदाहरणे) आपल्याकडे बनावीत अशा अर्थाने.

पुराणकाळातली मधाची नोंद निश्चित अत्यंत उपयुक्त आहे. तिच्याविषयी हीनत्व अजिबात नाही.

पण आजच्या शेतकर्‍याने त्या नोंदीवर अवलंबून न राहता सभोवतीच्या ज्ञानाने नवा मध शोधला याचं मला जास्त कौतुक असेल. मग त्याला जुना लिखित आधार मिळाला तर मधाहून गोड..

उगाचच आपल्या परंपरेशी केवळ ती जुनी आहे म्हनून नाळ तोडण्यात किंवा तिजवर थुंकण्यात आनंद बाळगणं हा अशा विचारसरणीमागचा उद्देश नाही हे स्पष्ट व्हायला हरकत नसावी..

मुद्गल पुराणात तर विमांनांचा संदर्भ बर्‍याच वेळा वाचनात येतो...
असो...
सध्या इतकेच.

रमताराम's picture

16 Apr 2012 - 4:20 pm | रमताराम

टवाळी नाही हो..
सांगून उपयोग नाही गवि. मुद्दे संपले की गुद्दे सुरू होतात. मुद्दे खोडले की कांगावा. एकदा तुम्ही टवाळी करताय असा शिक्का मारला नि आपल्या वैयक्तिक अस्मितांना बळंच भारतीय संस्कृतीशी वगैरे जोडून घेतले की अर्धी चड्डीवाली बरीच पोरेबाळे लाठ्याकाठ्या घेऊन जमा होतात. मग जमावाच्या बळावर तुम्हाला नामोहरम करणे सोपे जाते.

आमचा तोच प्रश्न - तिसर्‍यांदा - 'स्वयंघोषित संस्कृतीप्रेमींसाठी' : अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही तुम्ही उजेडात कधी आणणार? त्यासाठी काय प्रयत्न करणार.

आणि हे जे काही असेल ते मूलभूत वेगळे असावे अशी अपेक्षा आहे. आफ्रिकेत कुठल्याशा कंदाची मुळी उपचारार्थ वापरली जाते इथे हळद असते. त्यामुळे हळदीचा शोध एकमेवाद्वितीय वगैरे नसतो, जसा विमानाचा असतो. माणूस कधीही नैसर्गिकपणे आकाशात उडू शकत नव्हता ते विमानाने त्याला साध्य करून दिले. इतका मूलभूत नवा शोध जेव्हा भूतकाळातील पुस्तकांच्या आधारे लावला जाईल (नुसते पुष्पक विमान होते या मोघम उल्लेखापलिकडे त्याची साग्रसंगीत माहिती मिळायला हवी.) तेव्हा त्याचे स्वागत करणारा मी पहिला असेन. सध्या तरी आत्मसंतुष्टांच्या तांड्यात सामील व्हायची आपली इच्छा नाही.

मृत्युन्जय's picture

16 Apr 2012 - 4:31 pm | मृत्युन्जय

आमचा तोच प्रश्न - तिसर्‍यांदा - 'स्वयंघोषित संस्कृतीप्रेमींसाठी' : अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही तुम्ही उजेडात कधी आणणार? त्यासाठी काय प्रयत्न करणार.

ररा तुमच्या तर्कशुद्ध विचारांचा आदर आहे. परंतु हे वाक्य थोडे आगाऊपणाचे वाटले. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात त्यामुळे या शब्द्दाबद्दल तुमची माफी देखील मागतो. परंतु एक गोष्ट सांगा ररा, आपल्या संस्कृतीबद्दल गळे काढणारे तरी असे किती लोक आहेत ज्यांनी पाश्चात्यांना न जमलेले असे काही करुन दाखवले आहे. अतिशय पर्सनल प्रश्न विचारतो. तुम्ही काय केले आहे? तुमच्यामते आम्ही तर अगदी निरुद्योगी निरुपयोगी लोक आहोत. तुम्ही तर वेगळ्या विचारसरणीचे आहात ना? तुम्ही वेगळा शोध असा काय लावलाय?

तुमचा अनादर करण्याच्या हेतुन हा प्रश्न विचारलेला नाही आहे. तर फक्त हे सांगण्यासाठी विचारला की अजुन अंधारात असलेले आणि पाश्चात्यांना न जमलेले काहितरी करण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अभिमान नसणे गरजेचे नसते. अभिमान असणे कदाचित प्रोत्साहनकारक ठरु शकेल.

रमताराम's picture

16 Apr 2012 - 5:20 pm | रमताराम

यात आगाऊपणाचे काय आहे कळले नाही. पुट अप ऑर शटप अशा आमच्या पाश्चात्यांच्या किंवा 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशा तुमच्या भाषेत म्हटले आहे.

परंतु एक गोष्ट सांगा ररा, आपल्या संस्कृतीबद्दल गळे काढणारे तरी असे किती लोक आहेत ज्यांनी पाश्चात्यांना न जमलेले असे काही करुन दाखवले आहे.

आमचाच मुद्दा आहे हा. काहीतरी गफलत झालेली दिसते.

तुमच्यामते आम्ही तर अगदी निरुद्योगी निरुपयोगी लोक आहोत.
कैच्याकै. टोकाला जायचं काय कारण? आम्ही अस्मितेचा मुद्दा नाकारलाय नि जे तो महत्त्वाचा मानताहेत त्यांना आजवर नाही तर नाही भविष्यात आपण न वापरलेले शोध वापरू शकतो का नि त्या निमित्ताने आपला मुद्दा सिद्ध करू शकतो का हा प्रश्न विचारला यात तुम्हाला निरुद्योगी नि निरुपयोगी ठरवण्याचा प्रश्न येतो कुठे. उगा त्रागा कशाला.

तुम्ही तर वेगळ्या विचारसरणीचे आहात ना? तुम्ही वेगळा शोध असा काय लावलाय?
काहीही नाही असे आपण गृहित धरून चालू. समजा असलाच तरी काय फरक पडतो. मी काही धागे काढून बसलो नाही, माझ्या मताच्या विरोधकांना संस्कृतीबद्दल तुच्छता बाळगणे वगैरेच्या इक्ववॅलेंट कोणत्याही शिव्या दिल्या नाहीत. इतरांनी अमूक केले नाही 'इथेच आपण मार खातो' असली इतरांनी माझ्या मताप्रमाणे वागावे अशी अगोचरपणाची अपेक्षा ठेवत नाही. माझे मत तुम्ही मान्य करा नाहीतर तुम्ही कसलेतरी द्रोही असा शिक्का मारला नाही.

पाश्चात्यांना न जमलेले काहितरी करण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अभिमान नसणे गरजेचे नसते. अभिमान असणे कदाचित प्रोत्साहनकारक ठरु शकेल.
अगदी सहमत. पण त्याचबरोबर आपले मत न पटणार्‍यांना तुच्छतावादी न समजता त्यांचे मुद्दे समजावून घेतले तर नुसत्या प्रोत्साहनाबरोबरच आत्मसंतुष्टता दूर व्हायलाही मदत होते.

मृत्युन्जय's picture

17 Apr 2012 - 10:55 am | मृत्युन्जय

यात आगाऊपणाचे काय आहे कळले नाही. पुट अप ऑर शटप अशा आमच्या पाश्चात्यांच्या किंवा 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशा तुमच्या भाषेत म्हटले आहे.

हॅ हॅ हॅ. मग ठीक आहे. काय आहे हिरव्या देशात गेल्यावर इथले सगळे काळे दिसायलाच लागते त्यामुळे तुमचे चालु देत.

परंतु एक गोष्ट सांगा ररा, आपल्या संस्कृतीबद्दल गळे काढणारे तरी असे किती लोक आहेत ज्यांनी पाश्चात्यांना न जमलेले असे काही करुन दाखवले आहे. आमचाच मुद्दा आहे हा. काहीतरी गफलत झालेली दिसते.

हॅ हॅ हॅ. तुम्ही योग्य तो गैरसमज करुन घेतला आहे. संस्क्रूतीबद्दल गळे काढणारे म्हणजे संस्कूती शब्द उच्चारला रे उच्चारला की तो त्याज्य, अग्राह्य शब्द असल्यासारखे गळे काढणार्‍यांबद्दल बोलतो आहे मी. म्हणजे असे की भारतीय संस्कृतीने काही करुनच दाखवलेले नाही असे गळे काढणार्‍या आणि भारतात जन्मलेल्या तरी किती लोकांनी असे काही सो कॉल्ड भरीव करुन दाखवले आहे ते ऐकायला आवडेल मला.

कैच्याकै. टोकाला जायचं काय कारण? आम्ही अस्मितेचा मुद्दा नाकारलाय नि जे तो महत्त्वाचा मानताहेत त्यांना आजवर नाही तर नाही भविष्यात आपण न वापरलेले शोध वापरू शकतो का नि त्या निमित्ताने आपला मुद्दा सिद्ध करू शकतो का हा प्रश्न विचारला यात तुम्हाला निरुद्योगी नि निरुपयोगी ठरवण्याचा प्रश्न येतो कुठे. उगा त्रागा कशाला.

स्वतःला उपेक्षेने मारुन तरी काय डोंबलाचे शोध लावले जाणार आहेत असे आम्ही विचारतो आहे. योगप्रभूंनी दिलेले उदाहरणच घ्या. द्राक्षापासून मध बनवता येतो आणि ते प्राचीन पुस्तकात देखील लिहिले आहे. पण जर मूळात ते कोणी वाचणारच नसेल (कारण ते त्याज्य आणि निरुपयोगी आहे असे मत असणे) असे काही होउ शकते आपल्याला कळणारही नाही. अर्थात २० वर्षांनी असे शोध जेव्हा कोणी लावेल तेव्हा आपण म्हणु अर्रे अमुक तमुक पुस्तकात तर आधीच तसे लिहिलेले आहे. की मग तर झाले स्वतःला आणी संस्कृतीचा अभिमान असणार्‍या सर्वांना उपेक्षेने मारु इच्छिणार्‍या लोकांना बोंबा मारायचे अजुन एक साधन मिळणार की तुमच्या पुस्तकात लिहिले आहे म्हणुन नुसतेच म्हणता. उपयोग काय? अहो ते जे लिहिलेले आहे ते डोळसपणे वाचा. चार कल्पना मिळतील. मान्य आमच्याकडे युजर मॅन्युअल्स नाहित. हे असे होते असे वक्तव्य तर आहेत. त्या आधाराने काही करता येते का ते बघा. पण ती पुस्तके, तो विचार, त्या कल्पनाच एकदा टाकाऊ मानल्या की प्रश्नच मिटला. कायमस्वरूपी आम्ही गोर्‍यांनी बघा कसे जमवले ही स्तुती करण्यात धन्यता मानणार आणि वर सर्वज्ञपणाचा आव आणुन एतद्देशीय लोकांना सांगणार की बघा तुमची पुस्तके आणी पुराणे आणि संस्कृती कशी निरुपयोगी आहे. चंमतगच आहे.

काहीही नाही असे आपण गृहित धरून चालू. समजा असलाच तरी काय फरक पडतो.

असेल तर सांगा. उगाच खुप काही शोध लावल्याचा आव नको. असेल तर आम्हाला आनंदच आहे. असाही तुमच्याबद्दल आणि तुमच्या तर्कशुद्ध प्रतिसादांबद्दल आम्हाला तुमचा आदरच आहे. तो द्विगुणीत होइल. हे मी अतिशय सरळपणे बोलतो आहे. कुत्स्तितपणे नाही.

मी काही धागे काढून बसलो नाही,

धागे मीही काढत बसलेलो नाही आहे. पण प्रतिसाद आपन दोघेही देत आहोत. मुळात तुमचे म्हणणे काय आहे? द्गागे काढणार्‍यांना संस्कृतीचा अभिमान असण्याचा किंवा त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही इतर सर्वांना आहे. असे काय? नाही दोन्हींचा संबंध नीटसा कळला नाही म्हणून विचारतो आहे

माझ्या मताच्या विरोधकांना संस्कृतीबद्दल तुच्छता बाळगणे वगैरेच्या इक्ववॅलेंट कोणत्याही शिव्या दिल्या नाहीत.

त्या तुम्ही प्रतिसादातुन दिल्याच की नंतर. सुरुवात नाही केली म्हणुन काय झाले? प्रतिसादांची तीव्रता थोडी कमी आधिक एवढेच.

इतरांनी अमूक केले नाही 'इथेच आपण मार खातो' असली इतरांनी माझ्या मताप्रमाणे वागावे अशी अगोचरपणाची अपेक्षा ठेवत नाही.

मला वाटते हे मत प्रथम गविंनी मांडले ते तुमच्याच मताचे आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात काय?

माझे मत तुम्ही मान्य करा नाहीतर तुम्ही कसलेतरी द्रोही असा शिक्का मारला नाही.

असा शिक्का मारावा म्हणुन या धाग्यावर तरी तुम्हीच पहिल्यांदा प्रयत्न केला. मग लोकांना अशी चिथावणी दिल्यावर अजुन काय अपेक्षित होते तुम्हाला?

अगदी सहमत. पण त्याचबरोबर आपले मत न पटणार्‍यांना तुच्छतावादी न समजता त्यांचे मुद्दे समजावून घेतले तर नुसत्या प्रोत्साहनाबरोबरच आत्मसंतुष्टता दूर व्हायलाही मदत होते.

अगदी सहमत. त्यामुळेच जिथुन प्रोत्साहन घ्यायचे तिथुन ते घ्यावे जिथुन मार्ग सापडु शकेल अश्या इतर शक्यतांचाही विचार करावा. हे जर मान्य असेल तर मग प्रथम स्वतःच्या इतिहासाबद्दल स्वतःला अभिमान हा असलाच पाहिजे. त्याशिवाय हे कसे साध्य होणार?

'स्वयंघोषित संस्कृतीप्रेमींसाठी' : अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही तुम्ही उजेडात कधी आणणार? त्यासाठी काय प्रयत्न करणार.

असो. आता वरील वक्तव्य औद्धत्यपुर्ण का वाटले ते सांगतो. जर अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना न जमलेले असे काही स्वयंघोषित संस्कृतीप्रेमी करुन दाखवु शकलेले नसले तर ते तसे स्वयंघोषित संस्कृतीद्वेष्टे तर नक्कीच करुन दाखवु शकलेले नाहित. आता जे स्वतःला जमत नाही त्यासाठी संस्कृतीला दोष देण्यात काय मतलब. त्याअतुन झालाच तर फायदाच होइल. तोटा नाही होणार.

असो. माझ्यामते हा मुद्दा अजुन ताणण्यात फारसा अर्थ नाही कारण बरेच पर्सनल कमेंट्स होउ शकतील. जी माझ्याबाबत झाली तर माझी हरकत नाही. परंतु तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने आणि विचाराने ज्येष्ठ आहात आणि तुमच्या तर्कशुद्ध विचारांबद्दल मला आदरदेखील आहे. त्यामुळे तुमच्याबद्दल माझ्या हातुन असा अजुन काही प्रमाद घडल्यास मला नाही आवडणार.

असो. काही उणेआधिक झाले असल्यास माफी मागतो.

धन्यवाद.

रम्या's picture

17 Apr 2012 - 9:11 am | रम्या

रमतारामांच्या सडेतोड युक्तिवादाला सलाम!

जे कायम परकीयांच्या प्रगतीचे दाखले देऊन भारतीयांवर थुंकण्याचे काम करतात.
एकदम योग्य बोललात प्रभुजी !
लंडनमधल्या म्हातार्‍या व्यक्तीने केली की ती आत्मियतेने केलेली चौकशी आणि हिंदुस्थानातील म्हातार्‍या व्यक्तीने केली की हिरवेपणा असा गळा काढणारे मंडळीही पाहिली आहेत...
असो...
भारतीयांवर थुंकण्याचे काम भारतीयच करतात हे आता नवीन नाही ! ही तर फॅशन आहे आपण फार विचारवंत आहोत असा आव आणणार्‍यांची.

प्राचीन काळातल्या आजतरी अनुपलब्ध असणार्‍या डॉक्युमेंटचा आधार घेताघेता वर्तमानकालीन प्रगतीची कास सोडू नये इनफॅक्ट चालू ज्ञानाने तरी पाश्चात्य देशांच्या बरोबरीत रहावे किंवा पुढे जावे.. आपली परंपरा आपल्याला पुढे घेऊन जावी, तिने आपले पाय मागेच धरुन ठेवू नयेत अशा विचारसरणीला भारतीयांवर थुंकणे असा शब्दप्रयोग केल्यावर बोलणेच खुंटले.

ओक आणि वर्तकांच्या लेखनाचे उदाहरण देऊन अनेकजण भारतीय पुरातन संस्कृतीविषयी नेहमी तुच्छता व्यक्त करतात, या रागातून भावनेच्या भरात थुंकणे हा शब्द वापरला गेला. तो वैयक्तिक नव्हता. तरीही गवि मी सॉरी म्हणतो.

रमताराम's picture

16 Apr 2012 - 4:11 pm | रमताराम

ओक आणि वर्तकांच्या लेखनाचे उदाहरण देऊन अनेकजण भारतीय पुरातन संस्कृतीविषयी नेहमी तुच्छता व्यक्त करतात,
ओक नि वर्तक प्रभृती लोकांचे लिखाण वाचून आत्मसंतुष्ट राहणारे लोक त्यांच्या मतांची थट्टा ही भारतीय पुरातन संस्कृतीविरोधी तुच्छता आहे अशी मखलाशी करतात, तुमच्यासारखे. कारण यातून आपल्यामागे मोठा जमाव जमवता येतो. तुमच्या वांझोट्या अभिमानाच्या स्थांनांची सांगड भारतीय संस्कृतीशी घालण्याची चलाखी करू नका. आमच्यासमोर तरी चालणार नाही. डोन्ट मिक्स अ‍ॅपल्स अँड ऑरेंजेस मि, प्रभू. (आता पाश्चात्यांचे हस्तक म्हटलेच आहे तर त्यांची भाषा वापरू या.)

योगप्रभू's picture

16 Apr 2012 - 8:20 pm | योगप्रभू

प्रकाटाआ..

ओ विहारी कौनो गजबवा हुई गवा का ?
अरे हमार प्रतिसाद कोनो इतर मंडली के लिये था, तोहार वास्ते नाही,
जिनको समझना वह तो समझ गये...देखो तो वो सुहास कौनो कारण हस रहा है... ;)

गवि माझा प्रतिसाद आपल्यासाठी नाही...

सुहास..'s picture

16 Apr 2012 - 3:45 pm | सुहास..

लंडनमधल्या म्हातार्‍या व्यक्तीने केली की ती आत्मियतेने केलेली चौकशी आणि हिंदुस्थानातील म्हातार्‍या व्यक्तीने केली की हिरवेपणा असा गळा काढणारे मंडळीही पाहिली आहेत... >>.

=)) =)) =))

रमताराम's picture

16 Apr 2012 - 4:06 pm | रमताराम

प्रभूजी यू टू? नाही म्हणजे आपली तुपली मते जुळत नाहीत हे खरे. पण प्रतिवाद करण्याची ही पद्धत? टवाळी करतो आहे सबब उत्तर देणे हे आमच्यावर बंधनकारक नाही असे म्हणून शेपूट सोडवून घ्यायची?

. मुळातच गृहितकावर जगणार्‍या नि इतरांनीही तसेच करावे असे मानणार्‍यांची थट्टा करण्यापलिकडे काय करता येते? अनेकदा पुरावे मागूनही दिले गेले नाहीत तर काय केवळ एका पुस्तकात लिहिले म्हणून ग्राह्य मानायचे.
आणि हळद वगैरे मुद्दे आणून वडाची साल पिंपळाला का लावताय? हळद ही केवळ पुस्तकात होती म्हणून नव्हे तर आजतागायत आपण वापरत होतो म्हणूनच त्याबाबत आपण सत्यता मानली. गेलाबाजार पुस्तके वाचून का होईना एखाद्याने त्याचे पुनर्निर्माणाचे प्रयत्न का करू नये. का बोईंग कडे जावे, का मिग वाल्यांकडे जावे. करा ना तयार इथे विमाने. का करत नाहीत. संघासारख्या राष्ट्रवादी विचारांच्या संघटना नक्कीच त्यासाठी पैसा उभा करतील अयोध्येतील मंदिरासाठी जमवला तो यासाठी वापरला असता तर अधिक उपयुक्त ठरला नसता का? इथे 'शब्दप्रामाण्य' मानायला लावायचे नि अस्मितेच्या प्रश्नावर वांझोटे लढे लढवायचे हा दांभिकपणा कशाला.

माझ्याच अन्य प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, 'अजून अंधारात असलेले नि पाश्चात्यांना ज्ञात नसलेले असे उजेडात आणण्याचे कष्ट का घेत नाही कोणी'. तुमच्यासारखे पाच-पन्नास लोक एखादा गट स्थापन करून चिकाटीने हे काम करीत नाहीत. उगा फुका तोंडच्या नि अस्मितेच्या वाफा का दवडाव्यात.

थट्टा तर करणारच. दिवसभर उगाच पारावर बसून इड्या फुकत बसलेल्या गण्या-गणपाने 'ती समुरची हवेली हाय ना त्या परिस म्होटी हवेली होती आमच्या आज्याची' म्हणत फुशारक्या का माराव्यात. आज ती दाखवू शकत नसेल वा नवी उभारू शकत नसेल तर त्याच्या बोलण्याचे मोल ते काय. नि त्याची थट्टा केल्याचा राग तरी का यावा? होती की नाही हा भूतकाळातला प्रश्न झाला. आज नि पुन्हा उभी करता येत नसेल तर तिचे अस्तित्व असून
नसल्यासारखेच.

उठसूठ नासाचे नाव ऐकले की ह. ह. पु. वा. होते. या फेका मारणार्‍यांना नासा नक्की काय काय करते हे समजून घेण्याची गरज आहे. रामसेतूला विरोध करताना 'नासा तिथले थोरियम ढापेल' हे ऐकून मी गार पडलो होतो. (थोरियम नि युरेनियम यांचा तुलनात्मक अभ्यास करावा असा अनाहुत सल्ला). 'संस्कृत ही कम्पूटरला योग्य भाषा आहे.' या मूर्ख विधानाला (कुणी सिद्ध केल्यास माझे विधान आनंदाने मागे घेईन) देखील नासाची साक्ष काढली जाते. अयोध्येच्या मंदिराबाबत सुद्धा. अरे नासा काय रिकामटेकडे लोक आहेत का आज भाषा नि कम्प्युटर संबंध तपासताहेत नि उद्या रामसेतू कसा दिसतोय पाहताहेत. सॅटेलाईट इमेजेस नि नासाचा घंटा काही संबंध नस्तो. नासाच्या साईट्वरील सॅटेलाईट इमेजेस - निदान पाच वर्षांपूर्वीपर्यंत - या भारतीय रिमोट सेन्सिंग सॅटेलाईटने दिलेल्याच असायच्या. (पण हा अभिमानाचा मुद्दा नसतो. अभिमानाचे मुद्दे सगळे पुराणा-कुराणात शोधायचे असतात ना.)

'संस्कृत ही कम्पूटरला योग्य भाषा आहे.' या मूर्ख विधानाला (कुणी सिद्ध केल्यास माझे विधान आनंदाने मागे घेईन) देखील नासाची साक्ष काढली जाते.
उगाच गुगल बाबाशी खेळुन पाहिले...
http://www.parankusa.org/SanskritAsProgramming.pdf

http://www.hinduwisdom.info/Sanskrit.htm

मदनबाण साहेब, तुम्ही दिलेली लिंक वाचली. तो पेपर बकवास आहे. जे सांगायचे ते त्याला नीट सांगता नाही आले. पण ते सोडा.संस्कृत आणि प्रोग्रामिंग यांचा काहीतरी संबंध आहे किंवा नाही? हा मुख्य मुद्दा. तर संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य ते हे की पाणिनीने तिचे व्याकरण अतिशय अचूकपणे सांगितले-कुठेही संदिग्धतेला वाव नाही. आणि प्रोग्रामिंग साठी जी भाषा लागते, तिच्यामध्ये असे गुणधर्म लागतात ही गोष्ट खरी आहे. पण त्यापलीकडे जाऊन संस्कृतवर आधारलेली प्रोग्रामिंग लँग्वेज काढणे म्हणजे काय? ही कल्पनाच संदिग्ध आहे. =, +, सॉर्टिंग इत्यादी एकदम बेसिक कल्पना तर काही बदलणार नाहीत. मग "संस्कृत" कुठून येणार त्यात? सारांश, संस्कृत भाषेचे काही असी वैशिष्ट्य नाही, की ज्यामुळे प्रोग्रामिंग साठी मराठी अथवा तमिळ पेक्षा संस्कृत वापरल्यास काही फायदा होईल.

बर मग लोक जे म्हणतात त्यातले निके सत्व कोणते? तर पाणिनीचा विकी पहा. तिथे लिहिलंय:

http://en.wikipedia.org/wiki/P%C4%81%E1%B9%87ini

Pāṇini's grammar is the world's first formal system, developed well before the 19th century innovations of Gottlob Frege and the subsequent development of mathematical logic. In designing his grammar, Pāṇini used the method of "auxiliary symbols", in which new affixes are designated to mark syntactic categories and the control of grammatical derivations. This technique, rediscovered by the logician Emil Post, became a standard method in the design of computer programming languages.[22] Sanskritists now accept that Pāṇini's linguistic apparatus is well-described as an "applied" Post system. Considerable evidence shows ancient mastery of context-sensitive grammars, and a general ability to solve many complex problems. Frits Staal has written that "Panini is the Indian Euclid."

संस्कृतचे व्याकरण लिहिताना पाणिनीने जी पद्धत वापरली, तीच पद्धत नंतर काही शास्त्रज्ञांनी वापरली (म्हणजे पुन्हा स्वत: शोधली,rediscovered by the logician Emil Post)आणि आता जगभर प्रोग्रामिंग लँग्वेज तयार करण्यात तिचा वापर केला जातो. म्हणजे ती पद्धत शोधून काढणे हे पाणिनीचे श्रेय आहे. आणि ती पद्धत त्याने संस्कृत व्याकरणाला वापरली, म्हणून संस्कृतचे लेबल त्याला लागले. महत्व आहे ते त्या पद्धतीला, संस्कृतला नाही. समजा पाणिनी चीनी किंवा तमिळ असता, तर मग लोक म्हटले असते, की प्रोग्रामिंग साठी चीनी किंवा तमिळ भाषा योग्य आहे :)

आनन्दा's picture

16 Apr 2012 - 6:02 pm | आनन्दा

असे ऐकले आहे की "नैसर्गिक भाषा हाताळणी" साठी संस्कृत चांगली आहे..

नितिन थत्ते's picture

16 Apr 2012 - 4:46 pm | नितिन थत्ते

>>उगाच गुगल बाबाशी खेळुन पाहिले...

त्याऐवजी मी मिपाशीच खेळून पाहिले.

रमताराम,
मी ओक आणि वर्तक यांच्या लेखनाचाच उल्लेख केला होता. बाकी रास्वसं/ हिंदुत्ववादी विचारसरणी यांच्याशी माझा संबंध नाही. तेव्हा भारतीय पुरातन संस्कृतीचा चिकित्सक अभ्यास करणे म्हणजे संघवाला, असले सोपे शिक्के मारणारे बरेच पोस्टमन मी बघितलेत. बाकी ते शेपूट वगैरे काय म्हणालात ते समजले नाही. मला म्हणत असाल तर मान्य करतो. नाहीतरी आमचे पूर्वज शेपूटवालेच होते.
दरवेळी 'याचा उल्लेख आमच्या साहित्यात सापडतो' असा क्षीण आवाज करणार्‍यांवर एकदम पाश्चात्य विचारांची काठी घेऊन तुटून पडण्याचे कारण नाही. असले दांभिक बरेच सापडतात. त्यांनाच विचारावेसे वाटते, की दरवेळी परदेशी कंपन्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करुन दाखवण्याची हमाली करण्यापेक्षा एक तरी अभिनव उत्पादन/संशोधन करुन दाखवा. युरोपिअन ज्ञानाचा इतका एकांगी अभिमान खुद्द तेही बाळगत नसतील. गुलाम भारतीयांनी निदान युरोपीय विद्वानांच्या मांदीयाळीत तरी मानाचे स्थान मिळवून दाखवावेत.
पाच पन्नास लोकांचा गट घेऊन काहीतरी करुन दाखवा, असे आव्हान तुम्ही देताय. हो. मला मंजूर आहे. फक मला स्वतंत्र गट स्थापन करण्याची गरज नाही. असे शेकडो गट भारतात याआधीच स्थापन झाले आहेत. मी त्यांच्याशी नाळ जोडेन. माझी वैचारिक बांधीलकी ओक आणि वर्तक यांच्याशी नसून माशेलकर/भटकर यांच्याशी आहे, इतके नमूद करतो.
विमानांचा उल्लेख केलात म्हणून सांगतो, की स्वतंत्र विमाने विकसित करण्यासाठी जी महाप्रचंड गुंतवणूक करावी लागते ती करण्याची भारताची क्षमता आतापर्यंत नव्हती. आजही नाही. पुन्हा अट्टहासाने ते करण्याची काही गरज नाही, असे मला वाटते. नुकतीच एका भारतीय कंपनीने अचूक मारा करणारी प्रणाली रशियन विमानांवर यशस्वी स्थापित केली आहे. अशी लहान इनोव्हेशनही सध्या पुरेशी ठरावीत. गुलामगिरीची मनोवृती आणि भ्रष्टाचार यांचा विळखा देशाला पडलेला असताना प्रगतीचा वेग मोजण्यापेक्षा काही तरी सुरु राहणे महत्त्वाचे असते.
बाकी अयोध्येचे मंदिर, रामसेतू हे तुमच्या आवडीचे विषय असतील. मला त्यात रस नाही. मी केवळ उद्योजकता आणि अभिनवता याच दृष्टीकोनातून या विषयाकडे बघतो आहे.

(बाकी तुमची इतर आगपाखड फालतू दर्जाची आहे. मी त्याची कवडीइतकीही दखल घेत नाही.)

रमताराम's picture

16 Apr 2012 - 5:34 pm | रमताराम

माझा शेवटचा प्रतिसाद. कारण तुम्ही इतके फाटे फोडत आहात की मूळ मुद्दा केव्हाच हरवून जातोय.

१. मी तुम्हाला संघवाला म्हटलेले नाही संघासारखी राष्ट्रवादी संघटना यासाठी नक्की पैसा उभा करेल असे म्हटले आहे. असलीच ती ही संघाची स्तुती आहे असा आमचा तुच्छ समज आहे.
२. माझ्या प्रतिसादात शेपूट हा शब्द सापडला नाही, कृपया शोधून देणे.
३. एकदम पाश्चात्य विचारांची काठी घेऊन तुटून पडण्याचे कारण नाही.
'आपल्याकडच्या' गोष्टींवर टीका करायाला पाश्चात्य काठीच लागते हा तुमचा टोकाचा विचार वाचून मौज वाटली. (जे आपले नाही ते पाश्चात्य आहे असा यातून सूर निघते ही अंमळ गम्मत तुमच्या लक्षात येते का?) ही पुन्हा दुसरी सोयीची मखलाशी. एकदा आम्ही पाश्चात्य विचाराचे म्हटलो की त्यांचे दोष आमच्या माथी मारता येतात. किती अपलाप कराल. जरा फापटपसारा वाढवून गोंधळ वाढवण्यापरिस आम्ही मांडल्या मुद्द्यावरच चर्चा कराल तर बरं होईल. बादवे, सांख्य, चार्वाक बौद्ध, जैन हे सारे भारतीयच होते त्यांनीही भारतातील अनेक चालीरीती वगैरेंवर टीका केल्या आहेत. हे सारे पाश्चात्य विचारांचे होते काय हो? (तस्मात त्रागा सोडा नि मुद्याला धरा)

असे शेकडो गट भारतात याआधीच स्थापन झाले आहेत. मी त्यांच्याशी नाळ जोडेन.
असे असेल तर स्वागतार्हच आहे, पुन्हा हेच सांगेन हवेतल्या गप्पा मारण्यापेक्षा अधिक माहिती द्या.

विमानाचे उत्पादन हा माझा मुद्दा कधी होता. ती 'एक' निर्मिती आहे. माझा मुद्दा आजवर न निर्माण झालेल्या नि आपल्या ग्रंथात, इतिहासात असलेल्या 'पण' पाश्चात्यांना आजवर निर्माण करता न आलेल्या गोष्टींबद्दलचा होता. इथे विमानांच्या उत्पादनाचा प्रश्न कुठे आला.

(बाकी तुमची इतर आगपाखड फालतू दर्जाची आहे. मी त्याची कवडीइतकीही दखल घेत नाही)
धन्यवाद. याला आम्ही चोराच्या उलट्या बोंबा म्हणतो.

योगप्रभू's picture

16 Apr 2012 - 8:17 pm | योगप्रभू

(हे बघा तुमचे वाक्य.)

<<प्रभूजी यू टू? नाही म्हणजे आपली तुपली मते जुळत नाहीत हे खरे. पण प्रतिवाद करण्याची ही पद्धत? टवाळी करतो आहे सबब उत्तर देणे हे आमच्यावर बंधनकारक नाही असे म्हणून शेपूट सोडवून घ्यायची?>>

रमताराम's picture

16 Apr 2012 - 10:19 pm | रमताराम

अहो हा वाक्प्रचार आहे हो. म्हटले आम्ही तुम्हाला शेपूट कधी लावली. बरं तुमचं म्हणणं बरोबर.

प्रभूजी आता पुरे हां. नायतर खरंच लठ्ठालठ्ठी व्हायची राव आपली. जौ द्या. ते विमान आणि काय ते नेऊन घाला की हो तिकडे .... काय तरी चांगलं गाण्यागिण्याचं बोला की हो.

-रमतारावसाहेब उर्फ रमराव हरिहर

योगप्रभू's picture

17 Apr 2012 - 11:32 am | योगप्रभू

हळूहळू विमानांकडून रावणाची नाचगाणी, वैभव, सुंदर राक्षशिणी अशा विंटरेश्टिंग विषयांकडे वळणार होतो तेवढ्यात रमतारामाचा हल्ला झाला लंकेवर.

हनुमान दोन बायकांचा नवरा होता आणि त्याला एक मुलगाही होता, ही नवलकथा ऐकलीय का?
रावणाच्या अद्याप लपवलेल्या मृत शरीर आणि अफाट खजिन्याबद्दल ऐकलंय का?

लय मज्जा हायेत आमच्या पुराण आन् महाकाव्यांमधी. भन्नाट टीपी व्हतुया बगा..

जयंत कुलकर्णी's picture

16 Apr 2012 - 7:21 pm | जयंत कुलकर्णी

प्रभुजी,
मी अत्यंत साधेपणाने विचारतोय -
१ श्री माशेलकर यांचे संशोधनातील कार्य काय...म्हणजे त्यांनी किती पेटंट्स मिळवली आहेत व त्यांना सगळ्यात महत्वाचे असे कुठले (नोबेल सारखे) मिळवले आहे का ? पेटंट बरेच जण मिळवतात त्यात मला विशेष रस नाही. काही मोठा शोध वैगेरे लावला आहे का ?
२ श्री भटकरांनी अमेरिकेने सूपर काँप्युटर नाकारला म्हणून त्यांनी येथे तयार केला अशी बरीच टिमकी वाजवली गेली. असे जर असेल तर ही मशिन्स भारतात कोठे कोठे बसविली आहेत ? त्याचे जगातील इतर मशीन बरोबर Benchmarking झाले आहे का ? CDAC मधे जर एवढे महत्वाचे संशोधन झाले होते तर ते मधेच थांबवून तेथे भारतीय भाषांचे फाँटस असे फालतू काम का चालू झाले....
मला दुसर्‍या मुद्द्याबद्दल बर्‍याच शंका आहेत. कोणी प्रकाश टाकतील तर बरे होईल.

जयंत,
मी वैचारिक बांधीलकी म्हटलो आणि त्याचा अर्थ इतकाच, की सार्वजनिक जीवनात या व्यक्ती जे विचार मांडत आहेत त्याच्याशी मी सहमत आहे. ओक आणि वर्तक यांच्या तुलनेत ही बांधीलकी स्पष्ट करण्याचे कारण म्हणजे 'पोपचे निवासस्थान हे पूर्वीचे श्रीस्थान (सिस्टाईन चॅपेल) होते.' किंवा 'मी स्वप्नावस्थेत मंगळावर सूक्ष्मदेहाने विहार करुन आलो' असल्या दाव्यांपेक्षा मला भारतीय तरुणांनी आपल्या पारंपरिक ज्ञानसाठ्याचा शोध घेऊन समाजाभिमुख अभिनव उत्पादने विकसित करावीत, हा विचार जास्त महत्त्वाचा वाटतो. आपले प्रश्न आपण त्याच प्रभृतींना विचारावेत व शंकानिरसन करुन घ्यावे, ही विनंती.

माशेलकरांनी कुठले पेटंट मिळवले आहे किंवा माईलस्टोन रिसर्च केले आहे हा प्रश्न मला 'अण्णा हजारेंनी कधी निवडणूक लढवली आहे, त्यांना संसदीय प्रणालीचा काय अनुभव?' यासारखा वाटतो. अशा प्रश्नांची थेट उत्तरे मला मिळवावीशी वाटत नाहीत. 'पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा' ही तरुणांची अपेक्षा ते पूर्ण करत आहेत. बस्स. पुरेसे आहे.

जयंत कुलकर्णी's picture

16 Apr 2012 - 9:27 pm | जयंत कुलकर्णी

मला फक्त कोणाला माहिती पाहिजे असल्यास पाहिजे होती.
अर्थात अण्णांची आणि त्यांची तुलना चुकिची आहे हे जाताना नमूद करतो. असो ही माहिती मला का पाहिजे आहे हेही जाता जाता नमूद करतो. या दोन लोकांच्या कार्यामुळेच त्यांच्या विचारांशी बांधिलकीचा प्रश्न सामान्यजनात उद्भवतो. त्यामुळे त्यांचे कार्य काय हा प्रश्न मनात उभा राहिला म्हणून विचारला. सरळ सरळ साधा प्रश्न. त्यातून कृपया कसलाही अर्थ काढू नये. यासाठी मी एक वेगळा धागा काढीन. आपल्या प्रतिसादात यांचे नाव वाचले म्हणून वाटले की आपाल्याला काही माहीत असेल.
तुमचा प्रतिसाद ठीक वाटला.

विकास's picture

17 Apr 2012 - 11:59 pm | विकास

केवळ वरील प्रतिसादात विचारलेली माहिती म्हणून माशेलकरांच्या संदर्भातील खालील प्रतिसाद वाचावा. यातून पुर्वीच्या काळात विमाने होती अथवा नव्हती असे काहीच सिद्ध करण्याचा या प्रतिसादाचा उद्देश नाही. ;)

श्री माशेलकर यांचे संशोधनातील कार्य काय...

माशेलकरांची पब्लीकेशन्स आणि त्याचे कितीवेळेस सायटेशन केले गेले आहे, याचा अंदाज येथे येऊ शकतो.

म्हणजे त्यांनी किती पेटंट्स मिळवली आहेत

विकीवरील माहितीप्रमाणे, ‘Managing Intellectual Property’ च्या २००३ - २००५ च्या जागतीक सर्वेक्षणानुसार माशेलकर हे पेटंटक्षेत्रातील जगातील पन्नास दिग्गजांपैकी एक आहेत. त्यांनी भारतात या संदर्भात सरकारपासून औद्योगिक क्षेत्रात जागृती आणली.

भारतातील (आणि तेच इतरत्रही) अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीचे पेटंट करण्याचा घाट आंतर्राष्ट्रीय कंपन्यांनी घातला होता/ आहे. त्यातील भारतासंदर्भात प्रसिद्ध असलेल्या घटना म्हणजे हळद आणि बासमती... या दोन्हींच्या संदर्भात त्यांच्या नेतॄत्वाखाली युएस (सरकारी) पेटंट संस्थेत आणि आंतर्राष्ट्रीय पेटंट संस्थेत त्यांनी लढत दिली. परीणामी हळद आणि बासमती वाचलेच पण नैसर्गिक साधन संपत्तीचे पेटंट कसे करावे आणि नाही करावे या संदर्भात नवीन धोरणे तयर झाली, ज्याची मदत इतर विकसनशील राष्ट्रांनाही झाली. पेटंट देताना अधिकारी आधी ते ज्ञान उपलब्ध

माझ्या लेखी त्यांनी हे काम अ‍ॅक्टीविझम/चळवळेपणा करण्याऐवजी, सध्याच्या नितीनियमांनुसार केले. सरस्वती आणि लक्ष्मी या एकत्र नांदायला हव्यात, थोडक्यात इंटलेक्चुअल प्रॉपर्टीचे रक्षण होऊन त्यातून वैभव निर्मिती होयला हवी असे काहीसे त्यांचे मत होते/आहे, जे त्यांनी त्यांच्या मर्यादीत क्षमतेत उद्योग आणि सरकारमधे जागृत केले आहे असे वाटते.

त्यांना सगळ्यात महत्वाचे असे कुठले (नोबेल सारखे) मिळवले आहे का ?

आपल्याला त्यांना पारीतोषिक मिळाले आहे का असे विचारायचे असावे. नोबेल मिळाले म्हणजेच फक्त उत्तम असे आपले म्हणणे नसावे असे गृहीत धरतो. टाटा मोटर्सचे डायरेक्टर म्हणून फोर्ब्स मधे दिलेल्या माहितीनुसारः

Dr. R A Mashelkar: Dr. Mashelkar is an eminent chemical engineering scientist and has retired from the post of director general from the Council of Scientific & Industrial Research. Dr. Mashelkar is the President of the Indian National Science Academy, National Innovation Foundation, Institution of Chemical Engineers, UK and Global Research Alliance, a network of 60,000 scientists from five continents and has been honoured with honorary doctorates from 26 universities, including Universities of London, Salford, Pretoria, Wisconsin and Delhi. Dr. Mashelkar has also been elected as Fellow/Associate of Royal Society, London, National Academy of Science, USA, US National Academy of Engineering, Royal Academy of Engineering, U.K. and World Academy of Art & Science, USA. Dr. Mashelkar has won over 50 awardsand medals at national and international levels, including the JRD Tata Corporate Leadership Award and the Stars of Asia Award (2005). Dr. Mashelkar through leadership of various organizations/ Government Committees has propagated innovation and intellectual property rights and India?s science and technology policies. He is a Padmashri (1991) and Padmabhushan (2000) winner, and also a winner of the ?Punyabhushan Award? in 2008. He was appointed as a Director of the Company on August 28, 2007. He is also on the board of directors of various multinational companies, including Hindustan Unilever Limited, Reliance Industries Limited, Piramal Life Sciences Limited, KPIT Cummins Infosystems Limited and ICICI Knowledge Park.

यात नसलेल्या पण विकीवरील माहितीप्रमाणे त्यांना भारतापुरते वैज्ञानिकांमध्ये प्रतिष्ठीत मानले गेलेले शांतीस्वरूप भटनागर पारितोषिकही मिळालेले आहे. त्या व्यतिरीक्तः Pandit Jawaharlal Nehru Technology Award (1991), G.D. Birla Scientific Research Award (1993), Material Scientist of Year Award (2000), IMC Juran Quality Medal (2002), HRD Excellence Award (2002), Lal Bahadur Shastri National Award for Excellence in Public Administration and Management Sciences (2002), World Federation of Engineering Organizations (WFEO) Medal of Engineering Excellence by WFEO, Paris (2003), Lifetime Achievement Award by Indian Science Congress (2004), the Science medal by the Academy of Science for the Developing World (2005), Ashutosh Mookherjee Memorial Award by Indian Science Congress (2005), etc.

जयंत कुलकर्णी's picture

19 Apr 2012 - 6:52 am | जयंत कुलकर्णी

माहितीसाठी धन्यवाद. अशीच काही भटकरांविषयी आहे का ?

विकास's picture

19 Apr 2012 - 7:22 pm | विकास

अशीच काही भटकरांविषयी आहे का ?

त्यांचे विकीपान दिसले. जालावर अजून नक्की असेल. शोधा म्हणजे सापडेल. :-)

माशेलकरांबद्दल आधी ऐकलेले होते म्हणून देऊ शकलो.

श्री भटकरांनी अमेरिकेने सूपर काँप्युटर नाकारला म्हणून त्यांनी येथे तयार केला अशी बरीच टिमकी वाजवली गेली.

ती टिमकी नाही तर वास्तव इतिहास आहे. (वास्तव रामायण नाही ;) ) रेगन आणि पहील्या बूशच्या काळात भारत-अमेरीका संबंध रसातळाला होते असे मला वाटते. त्याचे कारण अर्थातच शीतयुद्ध आणि आपले कम्युनिस्ट रशियाशी असलेली जवळीक आणि अमेरीकेशी असलेला दुरावा. सुपरकाँप्यूटर हे जसे विकासकामासाठी वापरले जाऊ शकतात तसेच अण्वस्त्रांसाठी देखील. म्हणून तत्कालीन बूशसरकारने ते आपल्याला देण्यापासून अमेरीकन "क्रे सुपरकाँप्यूटर" कंपनीस अटकाव केला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ते मनावर घेतले आणि प्रथम हजारो कोटी रुपयांची सरकारी गुंतवणूक केली. त्याचाच एक भाग म्हणून सीडॅ़कची स्थापना झाली आणि त्याचे पहीले नेतृत्व हे भाटकरांकडे सोपवले. पुढचा इतिहास आहे. भारत त्यावेळेस स्वतःचे सुपरकाँप्यूटर्स असलेला जगातील तिसरा देश होता (अमेरिका आणि जपान हे उर्वरीत दोन). भारताने त्यावेळेस इतर प्रगत देशांकडून ऑर्डर्सपण मिळवल्या.

मात्र असले प्रकल्प हे सरकारी अनुदानावर चालतात. दुर्दैवाने आत्तापर्यंत सर्वच सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या मागे असलेला चीन पुढे गेला... अर्थातच सरकारी संस्थेचे संचालक म्हणून (अजून आहेत का माहीत नाही) भाटकरांना आणि त्या संस्थेस सरकारच्या ध्येयधोरणाशी संलग्न असलेले प्रकल्प राबवणे भाग होते. सरकारच्या दृष्टीने (आणि आजकाल अनेक मोठ्या खाजगी कंपन्या देखील असेच म्हणतात पण धंदा म्हणून!) ग्रामिण जनतेसाठी आयसीटी अर्थात "इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी" चा पुरस्कार महत्वाचा होता. काही अंशी त्याचे फायदे देखील पहात आहोत. त्या अनुषंगाने त्यांनी भारतीय भाषांचे फाँट्स आणि "Education to Home Mission" चालू केले. ते जेंव्हा चालू केले तेंव्हा जालावर देवनागिरी अथवा इतर भारतीय भाषांचे फाँट्स सहज उपलब्ध नव्हते. पण नंतर सगळेच सहज उपलब्ध झाले आणि त्या प्रकल्पाचे ते महत्व राहीले नाही. आता काय चालू आहे मला तरी माहीत नाही.

हे काही भाटकर अथवा आधी माशेलकरांच्या बचावात अथवा स्तुतीपर लिहायच्या उद्देशाने लिहीलेले नाही. मी कुणाचाच व्यक्तीपूजक नाही. पण भाटकर-माशेलकरच नाही तर जे अशी कामे करतात त्यांचे कुठलेच काम कमी महत्वाचे नसते. विशेष करून ज्यानी देशाच्या विकासास दिशा आणि गती मिळते... असो.

१८९५ ला शिवंकर बापूजी तळपदे यांनी मरुत्सखा नावाचे मानवरहित विमान उडवले.

http://articles.timesofindia.indiatimes.com/2004-10-18/mumbai/27162445_1...शोव

आता हे विमान आत्ताच्या अर्थाने विमान होते की नव्हते? हा वेगळा मुद्दा आहे. किमानपक्षी काहीतरी झाले होते हे नक्की.

लोकांचा दावा असतो की "वैमानिक शास्त्र" नामक ग्रंथाच्या आधारे प्राचीन भारतातील विमानाचे अस्तित्व सिद्ध होते. पण तो ग्रंथ कुठे मिळेल? त्यासंबंधी नेटवर शोध शोध शोधले, पण ज्या लिंक्स मिळतात, त्यामध्ये ४-५ आकृत्या आणि "वैमानिक शास्त्रात असे असे लिहिले आहे" यापलीकडे घंटा काही मिळत नाही. आय आय एस सी च्या काही लोकांनी एक पेपर त्यावर पब्लिश केलाय, तो इथे पहा.

http://cgpl.iisc.ernet.in/site/Portals/0/Publications/ReferedJournal/ACr...

नाशिकला विविध पोथ्यांचा डिजिटाइझ्ड संग्रह बाळगणारे श्री. दिनेश वैद्य यांना मी याबद्दल विचारले तर ते म्हणाले की बडोद्यातील सयाजी युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये त्या ग्रंथाची हस्तलिखित पोथी आहे आणि ती मिळवण्याचा ते प्रयत्न करताहेत. काही दिवसांनी माझा एक मित्र नाशिकला गेला असताना त्यांना भेटण्याबाबत मी त्याला सांगितले. तो भेटला, त्यांच्याकडे त्यावेळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते हस्तलिखित डिजिटाइझ्ड रूपात होते, पण मित्राला काही ते बघता आले नाही. दिनेश वैद्य यांच्याशी मी आधी फोनवर बोललो आहे आणि मला माणूस प्रामाणिक वाटला. त्यांच्याबद्दलची बातमी इथे पहा. कुणाला कुतूहल असल्यास त्यांचा मोबाइल नंबर देखील आहे तिथे.

http://www.thinkmaharashtra.com/index.php?option=com_content&view=articl...

आता त्या पेपरच्या संदर्भाग्रंथांत दिल्लीच्या एका प्रकाशकाने वैमानिक शास्त्र प्रकाशित केले आहे असे दिसते. ते पहिले पाहिजे. मूळ पोथीवर भर देण्याचे कारण म्हणजे त्यामुळे हा प्रकार किती जुना आहे त्याची थोडी तरी कल्पना येईल. बाकी त्या पेपर मध्ये जे २-४ श्लोक दिलेत, त्यावरून वाटते की लेखकाला विमान या प्रकारची थोडी कल्पना असू शकते. विमान ज्या तत्वावर चालते, त्याची चर्चा ग्रंथाचा आधार देऊन अतिशय त्रोटकपणे केली आहे. त्यामुळे नक्की काहीच सांगता येत नाही. आता गविंसारखे लोक इथे असताना मी विमानाबद्दल काय बोलणार? पण हे आग्रहाने सांगावेसे वाटते की लोकांचे दावे ज्या ग्रंथावर आधारलेले असतात, त्या ग्रंथाचा अभ्यास करूनच दूध का दूध आणि पाणी का पाणी केले पाहिजे म्हणजे या विषयाचा एकदा काय तो कंडका पडेल.

थोडक्यात:
१. वैमानिक शास्त्र या ग्रंथाची मूळ संहिता म्हणजे पोथी किंवा गेलाबाजार इंग्रजी भाषांतर मिळविणे.
२. त्या आधारे नेमके काय लिहिले आहे आणि ते विमान तयार करण्यासाठी/उडवण्यासाठी लागणाऱ्या सध्याचा आपल्या ज्ञानाच्या तुलनेत ते कसे आहे? लिखाण किती अंशी सूचक आणि किती अंशी डायरेक्ट? सूचक लिखाणाला फारशी किंमत देऊ नये या मताचा मी आहे. काही अंशी तरी का होईना डायरेक्टपणा पाहिजेच.
३. केसरीच्या कार्यालयात जाऊन तळपद्यांची बातमी नेमकी काय होती ते पाहणे.

हे केले पाहिजे. १ आणि २ सोडले तरी ३ करण्यासारखे आहे. जमल्यास मीच करेन ते कधीतरी. असो.

पण हे आग्रहाने सांगावेसे वाटते की लोकांचे दावे ज्या ग्रंथावर आधारलेले असतात, त्या ग्रंथाचा अभ्यास करूनच दूध का दूध आणि पाणी का पाणी केले पाहिजे म्हणजे या विषयाचा एकदा काय तो कंडका पडेल.

तुमचा प्रतिसाद आणि विचारपद्धती अत्यंत योग्य आहे. मी जे म्हटलंय त्यात छद्म लगेच दिसेल पण तुम्ही संयत शब्दात ते म्हणून योग्य मुद्दा पुढे आणला आहे.

यात एकच अ‍ॅडिशन अशी, की ते ग्रंथ १. मिळून २. त्यानुसार प्रयोग करुन ३. उडणारं विमान किंवा तत्सम ब्रेकथ्रू मिळेपर्यंत, चालू ज्ञान वापरुन किमान जगाच्या लेव्हलला रहावे. तळपदे प्रयोग करुन गेले त्यानंतर सव्वाशे वर्षांत राईटच्या कापडी/लाकडी फ्लायरपासून सुपरसॉनिक जेट्सपर्यंत प्रगती झाली.. एअरबस ३८० आली.. आपण भारतीयांनी याच सव्वाशे वर्षात जी विमानं देशात आणली ती सर्व आयात केलेली किंवा इंजिन आणि बॉडी असे महत्वाचे भाग आयात करुन इथे फक्त जोडलेली.. हे कसं विसरायचं ?

रमताराम's picture

16 Apr 2012 - 5:42 pm | रमताराम

ये हुई ना कुछ बात. फेसबुकावर फुकाचे फकाणे फेकण्यापरिस हे केले तर काही महत्त्वपूर्ण हाती येईल नि नवे निर्माणही होईल आणि आमच्यासारख्या चिंतातुर जंतूंनादेखील जमावाचा भाग होण्याचे भाग्य लाभेल. उगा खातापिता अस्मितेचे ढेकर देऊन काय साधणार?

यांत्रिकी शोंधाचा एकंदरीतच इतिहास मनोरंजक असतो. शोध कसे लागतात, इतर क्षेत्रातल्या शोधांचा उपयोग करून एखाद्या क्षेत्रास प्रगती कशी होते हे पाहिल्यास या प्रकारच्या दाव्यांचा पोकळपणा नीट दिसून येतो.

विमानाच्या शोधाला आय सी इंजीनच्या शोधामुळे महत्त्वाचा फायदा झाला. त्या आधी विमानांच्या मानाने इंजिनचे वजन फार असल्याने विमान उडवण्यात फारसे कोणी यशस्वी झाले नाही. आय सी इंजीनचा शोधही एका रात्रीत लागला नाही. अनेक वर्षे अनेक लोकांनी प्रयोग केले, थर्मोडायनॅमिक्सचे अद्द्ययावत ज्ञान आणी कुशलतेने काम करणारी मशिने (ड्रील्स इ.) अशा अनेक कारणांमुळे हलके आणि इफिशीयंट इंजिन बनवणे शक्य झाले. ह्याच इंजिनचा वापर करून सुरुवातीची विमानं उडवण्यात यश आलं. पुढे विमानांसाठी खास बदल करून नविन इंजिने बनवली गेली त्यामुळे इंजिनांची कार्यक्षमता वाढली. त्याच बरोबर धातूंवर संशोधन होऊन नवनविन 'अलॉय' बनवीले गेले आणि विमानाचे 'डेड-वेट' कमी करण्यात यशं आलं.

भारतात अशा प्रकारचं विमान बनलं असेल तर त्याला पुरक असे इतर कोणते संशोधनही दिसले असते. अयशस्वी प्रयोगांचे दाखले दिसले असते. वगैरे. त्यामुळे भारतात अशा प्रकारे विमान बनवलं गेलं यावर माझातरी विश्वास नाही. तरीही कोणी ते दावे सप्रमाण देणार असेल तर वाचायला आवडेल.

जगात इतक्या काँस्पीरसी थेरीज आहेत की प्रत्येकांची सत्यता पडताळण्यासाठी त्यांचे ग्रंथ शोधा, ग्रंथाची सत्यता पडताळा इ. गोष्टी करणं अव्यवहारीक आहे. पण कोणी असं करणार असेल तर त्याला शुभेच्छा आणि काय होईल हे जाणण्याची उत्सुकता दाखवतो.

राघव's picture

26 Jul 2022 - 11:39 pm | राघव

आज हा एक लेख वाचनात आला. यातले संदर्भ एका पुरातन ग्रंथावर भाष्य करतात.

https://epaper.tarunbharat.net/article.php?mid=Asmpage_2022-07-24_a8638b...

आता यासाठी कोणती यंत्रे वापरली असतील ते ग्रंथ वाचल्यावरच समजेल बहुदा. पण एक इंटरेस्टींग रीड म्हणायला हरकत नसावी.

धर्मराजमुटके's picture

27 Jul 2022 - 1:47 pm | धर्मराजमुटके

लेख वाचला. रोचक आहे. तथ्य तपासायला तो ग्रंथ प्रत्यक्ष (सुर्यसिद्धांत) वाचला पाहिजे आणि मुख्य म्हणजे संस्कृत चा चांगला अभ्यास हवा.

बॅटमॅन's picture

16 Apr 2012 - 3:56 pm | बॅटमॅन

गवि, तुमच्याशी १००% सहमत. इतिहासाची वर्तमानाशी गल्लत कधीच करता कामा नये हे तर नक्कीच. लोक म्हणतात त्याप्रमाणे प्राचीन भारतात विमान जरी असले तरी सध्या आपली अवस्था खराब आहे हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे तूर्तास चांगल्या गोष्टींची आयात करणे हे मस्ट, पण सोबत उकराउकरी सुरु ठेवावी , म्हणजे काय होते ते तरी कळेल. इतिहासाबद्दल उत्सुकता आणि वर्तमानाबद्दल सजगता या गोष्टी सेम नसल्या तरी परस्परपूरक देखील असू शकतात, योगप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे. बस इतकेच :)

आनन्दा's picture

16 Apr 2012 - 5:55 pm | आनन्दा

कागद लवकर खराब होतो.. कातडे त्या मानाने बरेच दिवस टिकते नाहि का?

अकबर --------
बिरबल ---------------

हुप्प्या's picture

17 Apr 2012 - 1:38 am | हुप्प्या

राम हा खरोखरीच एक राजा होऊन गेला का तो एक काल्पनिक व्यक्ती होता? वाल्मिकीच्या प्रतिभेतून जन्मलेला?
खरोखर असेल तर त्याच्या काळातील नाणी, शिलालेख, गाडगी-मडकी, दागिने, मणी असे काही अवशेष का सापडले नाहीत? निव्वळ लेखी वा तोंडी पुरावे का खरे मानायचे? डायनॉसॉर वगैरे जीवाष्म जे (बहुधा) रामापेक्षा प्राचीन आहेत, अशांचे अवशेष मिळाले आहेत. त्यावरुन त्यांचा अभ्यास झाला आहे. मग रामायण महाभारताचे घोडे कुठे पेंड खाते आहे? नाही म्हणायला पाण्याखाली द्वारका सापडली आहे असे वाचले आहे पण त्यावर उत्खनन्, संशोधन झाल्याचे ऐकिवात नाही.

लंका, रामसेतु, दंडकारण्य, पंचवटी ह्या जागा खर्‍या आहेत. पण वाल्मिकीने खर्‍या जागांवर आधारित ही काल्पनिक गोष्ट कशावरुन लिहिली नसेल?
दा विन्ची कोड ह्या काल्पनिक गोष्टीत खर्‍याखुर्‍या जागा उल्लेखिलेल्या आहेत म्हणून ती गोष्ट खरी होत नाही.
ज्यूल्स व्हर्नने पाणबुडी, रॉकेट, अंतराळप्रवास ह्या गोष्टींबद्दल त्यांचा प्रत्यक्ष शोध लागायच्या आधीच लिहिले आहे. म्हणून ज्यूल्स व्हर्नच्या काळात हे सगळे होतेच असे म्हणत नाही.
प्राचीन काळात भारतात विमाने उडत होती असे खरोखरच सिद्ध झाले तर मला आनंदच होईल, अभिमानही वाटेल पण पुराव्याअभावी आज तरी तसे म्हणवत नाही.

पाषाणभेद's picture

17 Apr 2012 - 3:08 am | पाषाणभेद

पीक वर्तूळ (Crop Circles) या बाबत काय म्हणता येईल?

प्यारे१'s picture

17 Apr 2012 - 10:30 am | प्यारे१

शतकासाठी फक्त....!

म्या काय ह्यो धागा वाचत नाय, वाचनार बी न्हाय!

कवितानागेश's picture

17 Apr 2012 - 11:47 am | कवितानागेश

शेवटी काय ठरले?
त्या नाझ्का लाईन्स कुणी मारल्या म्हणे?