संस्कृत आणि संगणक

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in काथ्याकूट
15 Sep 2010 - 7:02 pm
गाभा: 

भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे वारंवार जालावर फिरत असतात त्यांत "संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे" असे एक विधान असते.

बहुधा हे विधान परम संगणकावर काम केलेले डॉ विजय भटकर यांच्या नावे दिलेले असते.

भटकर यांनी असे विधान केले असेल तर ते काय आधारावर केले असावे?
त्यांचे विधान योग्य असेल तर सध्या जगात कोणी ना कोणी संस्कृत भाषा वापरून संगणकाचे प्रोग्रॅमिंग करण्याचा प्रयत्न करीत असणार. त्याबाबत काही माहिती आहे का? स्वतः भटकर तसे काही काम करीत आहेत का?

भटकर यांनी असे विधान केले नसेल तर ते असेच ठोकून दिलेले विधान आहे असे म्हणावे का?

येथे संगणक, प्रोग्रॅमिंग क्षेत्रात काम करणारी खूप मंडळी आहेत. त्यांना काही माहिती असली तर त्याबद्दल प्रतिसादातून लिहावे.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

15 Sep 2010 - 7:12 pm | अवलिया

भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे वारंवार जालावर फिरत असतात त्यांत "संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे" असे एक विधान असते.

असली ढकलपत्रे तुम्हाला येतात हे यातुन समजले

बहुधा हे विधान परम संगणकावर काम केलेले डॉ विजय भटकर यांच्या नावे दिलेले असते.
असेल बुवा. माझ्यापर्यंत असे काही आले नाही त्यामुळे तुमचे म्हणणे मान्य

भटकर यांनी असे विधान केले असेल तर ते काय आधारावर केले असावे?
हे त्यांनाच विचारावे लागेल

त्यांचे विधान योग्य असेल तर सध्या जगात कोणी ना कोणी संस्कृत भाषा वापरून संगणकाचे प्रोग्रॅमिंग करण्याचा प्रयत्न करीत असणार. त्याबाबत काही माहिती आहे का?

नाहि बुवा काहीही माहिती नाही

स्वतः भटकर तसे काही काम करीत आहेत का?
त्यांना विचारुन बघा.

भटकर यांनी असे विधान केले नसेल तर ते असेच ठोकून दिलेले विधान आहे असे म्हणावे का?
जर त्यांनी असे विधान मी केले नाही असे म्हटले तर तुम्ही म्हणता तसे म्हणता येईल

येथे संगणक, प्रोग्रॅमिंग क्षेत्रात काम करणारी खूप मंडळी आहेत. त्यांना काही माहिती असली तर त्याबद्दल प्रतिसादातून लिहावे.
लिहिले

नितिन थत्ते's picture

15 Sep 2010 - 7:23 pm | नितिन थत्ते

सूतशेखर चाटवा हो नानाला कोणी. (नाना भारताचे अभिमानी म्हणून त्यांच्यासाठी इनोऐवजी सूतशेखर).

>>असली ढकलपत्रे तुम्हाला येतात हे यातुन समजले
तुम्ही जालावर ओळख न देता वावरत असल्याने तुम्हाला येत नसावीत.

>>असेल बुवा. माझ्यापर्यंत असे काही आले नाही त्यामुळे तुमचे म्हणणे मान्य
तुमच्याशी कोणी पत्रव्यवहार करीत नसावा त्यामुळे तुमच्यापर्यंत आले नसेल.

>>हे त्यांनाच विचारावे लागेल
भटकरांना विचारण्यासाठी आपली काही मदत होऊ शकेल का?

>>नाहि बुवा काहीही माहिती नाही
इतकी भरपूर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

>>त्यांना विचारुन बघा.
भटकरांना विचारण्यासाठी आपली काही मदत होऊ शकेल का?

>>जर त्यांनी असे विधान मी केले नाही असे म्हटले तर तुम्ही म्हणता तसे म्हणता येईल
लॉजिक परफेक्ट आहे.

>>लिहिले
धाग्यावर किमान एक प्रतिसाद आल्याने धन्य झालो. धन्यवाद.

अवलिया's picture

15 Sep 2010 - 7:29 pm | अवलिया

>>>सूतशेखर चाटवा हो नानाला कोणी. (नाना भारताचे अभिमानी म्हणून त्यांच्यासाठी इनोऐवजी सूतशेखर).

हरकत नाही. आमचे काही मित्र वजा हितचिंतक आम्हाला हेमगर्भाची मात्रा कधी चाटायला देता येईल याच विचारात आहेत.

>>>तुम्ही जालावर ओळख न देता वावरत असल्याने तुम्हाला येत नसावीत.

हॅ हॅ हॅ

>>>तुमच्याशी कोणी पत्रव्यवहार करीत नसावा त्यामुळे तुमच्यापर्यंत आले नसेल.

पुन्हा हॅ हॅ हॅ

>>भटकरांना विचारण्यासाठी आपली काही मदत होऊ शकेल का?

नक्की होऊ शकेल. कशा प्रकारची मदत आपल्याला अपेक्षित आहे?

>>>इतकी भरपूर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

कसचं कसचं :)

>>>भटकरांना विचारण्यासाठी आपली काही मदत होऊ शकेल का?

वरती उत्तर आहे

>>>लॉजिक परफेक्ट आहे.

कसचं कसचं

>>धाग्यावर किमान एक प्रतिसाद आल्याने धन्य झालो. धन्यवाद.

घ्या अजुन एक दिला... अजुन हवा असेल तर उद्याला मिळेल. आता संध्येची वेळ झाली.

"संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे"
हे जर खर असेल तर नानाकडे शिकवणी लावावी लागेल :)

विसोबा खेचर's picture

15 Sep 2010 - 7:32 pm | विसोबा खेचर

भटकर यांनी असे विधान केले नसेल तर ते असेच ठोकून दिलेले विधान आहे असे म्हणावे का?

असेच वाटते.. ह्या बहुधा संस्कृतच्या प्रचारक-प्रसारकांच्या कारवाया आहेत..!

तात्या.

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2010 - 7:35 pm | नगरीनिरंजन

प्रत्येक शब्दाला विभक्ती प्रत्यय असल्याने शब्दांचा क्रम बदलला तरी अर्थ बदलत नाही म्हणून संस्कृतचे पार्सिंग (मराठी?) आणि लेक्सिकल अ‍ॅनालिसिस सोपे असावे असे वाटते. बाकी प्रोग्रॅम कोणत्याही भाषेत लिहीला तरी कंपाईल केल्यावर बायनरीतच रुपांतरीत होतो त्यामुळे खास संस्कृत मध्ये प्रोग्रॅमिंग करण्यासाठी कोणी पार्सर आणि कंपाईलर लिहीला असेल असे वाटत नाही.

चिरोटा's picture

15 Sep 2010 - 7:36 pm | चिरोटा

बर्‍याच वर्षापूर्वी जर्मनीत/अमेरिकेत ह्यावर संशोधन चालु आहे असे वाचले होते. इंग्रजी वृत्तपत्रांमध्येही ह्याविषयीच्या बातम्या " Western studies have shown that..." अशा स्वरुपाच्या असतात.सर्च इंजिनमधूनपण माहिती मिळत नाही.
सर्वात योग्य म्हणजे कशी? इतर बोली भाषांच्या तुलनेत की सध्या प्रचलित programming भाषांच्या तुलनेत? बहुतेक बोली भाषांच्या तुलनेतच असणार.

विकास's picture

15 Sep 2010 - 7:40 pm | विकास

१९८७ च्या फोर्ब्सच्या अंकात Sanskrit is the most convenient language for computer software programming. असे म्हणलेले होते. आपण गुगल्यास त्यावरून अनेक भारतीयांनी इंग्रजीतून दिलेली माहीती मिळेल.

त्यांचे विधान योग्य असेल तर सध्या जगात कोणी ना कोणी संस्कृत भाषा वापरून संगणकाचे प्रोग्रॅमिंग करण्याचा प्रयत्न करीत असणार.

जगात म्हणणे हे बरोबर आहे. एकदा नक्की फायदा कळला की भारतात पण केले जाईल याची खात्री आहे. तो पर्यंत आपण त्याला मृत भाषा म्हणूया. ;)

असो, संस्कृतचे संगणकीय संदर्भात आणि पाणिनींच्या व्याकरणामुळे (ज्यातील मला काही कळत नाही हा आधीच डिसक्लेमर!) आकर्षण देखील आहे आणि विविध पद्धतीने मुलभूत संशोधन देखील चाललेले आहे. मात्र असे मूलभूत संशोधन आणि त्याची अ‍ॅप्लीकेशन्स ही पटकन जाहीर पणे मिळत नसल्याने आपल्याला (म्हणजे मला-तुम्हाला वगैरे) काही चालले आहे का नाही ते समजत नाही. दोन-एक वर्षांपुर्वी अशाच एका जागतिक तज्ञांच्या गटाच्या बैठकीस एक भारतातून संस्कृतमधील तज्ञ (पिएचडी आणि प्राध्यापक) व्यक्ती बॉस्टन मध्ये आली होती. ती आमच्याकडे देखील रहायला आल्यामुळे त्या संदर्भात वरवर काही गोष्टी समजल्या होत्या. त्याची आठवण झाली इतकेच...

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Sep 2010 - 8:30 am | llपुण्याचे पेशवेll

विकास यांच्याशी सहमत आहे. मध्यंतरी पाणिनीय व्याकरणाबद्दल असे वाचले होते की पाणिनीय व्याकरण हा अत्यंत साक्षेपी ग्रंथ आहे. साक्षेपी म्हणजे कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ सामावणारे लेखन. जे नेटके आणि सुगमही असते. आजही अभ्यांसकांमधे पाणिनीचा साक्षेप हा अभ्यासाचा विषय आहे.
बाकी सदर धागाप्रवर्तक आणि तथाकथित संस्कृत प्रचारकांवर आसूड ओढणारे लोक याना काही प्रश्न विचारावेसे वाटतात.
१. आपण स्वतः प्रोग्रॅमिंग करता का? असाल तर ठीक नसाल तर "भटकर यांनी असे विधान केले असेल तर ते काय आधारावर केले असावे" हे विधान कोणत्या आधारवर? जर तुम्हाला प्रोग्रॅमिंग मधले ओ का ठो कळत नसेल तर भटकरांच्या विधानाला ज्यांनी त्या क्षेत्रात चांगल्यापैकी कर्तृत्व दाखवले आहे याला आपण हा प्रश्न कसा विचारू शकता.
२. आपण या विषयातली काही इतर माहीती घेतलीत का? का माहीती घेण्यासाठी धागा काढला आहे.
जर माहीती मिळवण्यासाठी धागा काढला असेल तर "भटकर यांनी असे विधान केले नसेल तर ते असेच ठोकून दिलेले विधान आहे असे म्हणावे का?" अशा विधानांची काय गरज. माहीती घेऊन जर निष्कर्ष म्हणून वरील वाक्य लिहीले असतेत तर ठीक होते.
३.येथे संगणक, प्रोग्रॅमिंग क्षेत्रात काम करणारी खूप मंडळी आहेत. त्यांना काही माहिती असली तर त्याबद्दल प्रतिसादातून लिहावे. हे वाक्य लिहून माहीती मिळवण्याचा उद्देश आहे असा नुसता देखावा करायचा . त्यात "भटकर यांनी असे विधान केले नसेल तर ते असेच ठोकून दिलेले विधान आहे असे म्हणावे का?" अशी टीआरपीखेचक वाक्यं टाकायची स्वतःची टोकाची मतं मांडायची. याला काय म्हणायचे? सध्या चान चान असे म्हणतो. चालुद्या.

नितिन थत्ते's picture

17 Sep 2010 - 9:52 am | नितिन थत्ते

>>आपण स्वतः प्रोग्रॅमिंग करता का?
नाही.

>>आपण या विषयातली काही इतर माहीती घेतलीत का? का माहीती घेण्यासाठी धागा काढला आहे.
माहिती घ्यायचा प्रयत्न केला. माझ्या ओळखीतल्या लोकांना विचारले. शिवाय आजतागायत अमुक सॉफ्टवेअर/अ‍ॅप्लिकेशन/संगणक भाषा संस्कृत भाषेवर आधारित बनवली आहे असे कुठे वाचायला मिळाले नाही. म्हणून इथे विचारले.

>>वाक्य लिहून माहीती मिळवण्याचा उद्देश आहे असा नुसता देखावा करायचा .
तुम्ही दिलेल्या या प्रतिसादा पूर्वीच दिलेला हा प्रतिसाद पाहिला असेल तर माहिती मिळवण्याच्या उद्देशाचा देखावा नसल्याचे कळले असेलच. मला हवी असलेली माहिती धनंजय यांच्या प्रतिसादात मिळाली.

भटकर यांनी ठोकून विधान केले असे विचारले नसून भटकर यांच्या नावाने इतरांनी ठोकून दिलेले विधान आहे का हे विचारले आहे.

अन्यत्र फोर्ब्स च्या अंकात असे विधान कधीच नव्हते अहीही माहिती मिळाली.

भारतीय लोक संगणक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच संस्कृत ही भारतीयांच्या परिचयाची भाषा आहे. आणि संस्कृत ही संगणकासाठी सर्वात सुटेबल भाषा आहे असे असताना संस्कृत भाषेत प्रॉग्रॅमिंग सुरू झाले आहे का ही माहिती मिळवायचा प्रयत्न केला.

अवलिया's picture

17 Sep 2010 - 11:58 am | अवलिया

पुपे सदस्य क्र ३८५ म्हणजे बरेच माहिती असायला हवे तुम्हाला. अभ्यास करा.

पुष्करिणी's picture

15 Sep 2010 - 7:42 pm | पुष्करिणी

कदाचित संगणकाला तोंडी कमांड द्यायच्या असतील तर हा ऑपशन चांगला असावा असा विचार असेल.

संस्कृत जशी लिहितात तसेच उच्चार असतात ( सायलेंट अक्षर वगैरे अशी काही भानगड नाही )
आणि वर नगरीनिरंजन यानी लिहिल्याप्रमाणे कर्ता कर्म क्रियापद यांच्या जागा बदलल्या तरी वाक्याचा अर्थ तोच राहतो.

इंटरनेटस्नेही's picture

15 Sep 2010 - 7:46 pm | इंटरनेटस्नेही

काय गरज आहे पण संस्क्रुत मधुन प्रो. करण्याची? इंग्रेही भाषा इज सो फॅमिलीअर...

विसोबा खेचर's picture

15 Sep 2010 - 7:49 pm | विसोबा खेचर

काय गरज आहे पण संस्क्रुत मधुन प्रो. करण्याची?

आणि अहो मुळात त्या करता संस्कृत समजलं तर पाहिजे ना? त्यातलं व्याकरण तर जाम कळत नाही आपल्याला!

विकास's picture

15 Sep 2010 - 7:53 pm | विकास

इंग्रेही भाषा इज सो फॅमिलीअर...

इंग्रजी असे आमुची खाद्यभाषा* जरी आमुची मायबोली नसे. ;)

* ज्या भाषेचा वापर केल्याने पोट भरते ती भाषा.

"संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे"

संस्कृत मध्ये प्रोग्रॅम लिहिताना तो प्रोग्रॅम लिहिणार्‍याचे काय हाल होतील ह्या विचारानेच हसू येत आहे. शेवटी कॉम्प्युटरला फक्त 'शून्य' आणि 'एक' ( '0' and '1') ह्यांचीच भाषा कळते हे विसरलात काय?
संस्कृत ही भाषांची जननी आहे असे म्हणतात, कारण इतर कोणत्याही भाषेपेक्षा भाषेची समृद्धता संस्कृत भाषेत आहे. ह्याचा अर्थ लोक असाही काढतात की जगातल्या सर्व भाषा संस्कृत पासून उगम पावल्या आहेत. हे लोक भाषांचा इतिहास नीट वाचत नाहीत असे दिसते.
संस्कृत भाषेचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून लोक काहीपण बोलायला लागले आजकाल..!!

विसोबा खेचर's picture

15 Sep 2010 - 8:03 pm | विसोबा खेचर

कारण इतर कोणत्याही भाषेपेक्षा भाषेची समृद्धता संस्कृत भाषेत आहे.

असहमत...

कुसुमाग्रज मराठीतूनच लिहायचे. संपला विषय..!

धन्यवाद,

तात्या.

इन्द्र्राज पवार's picture

16 Sep 2010 - 12:24 am | इन्द्र्राज पवार

"कुसुमाग्रज मराठीतूनच लिहायचे. संपला विषय.......!"

एखादा नामवंत वकील एक सहस्त्र वाक्यात जे सांगू शकला नसता, ते तात्यांनी वरील वाक्यात सांगितले.
या एकाच वाक्याबद्दल श्री.विसोबा खेचर (तात्या) "मॅन ऑफ द मॅच" किताबास पात्र आहेत.

इन्द्रा

विसोबा खेचर's picture

16 Sep 2010 - 10:05 am | विसोबा खेचर

धन्यवाद इन्द्रा!

(कुसुमाग्रजांचा भक्त) तात्या.

"संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे"

हे वाक्य संदिग्ध आहे.
अर्थ १ : प्रोग्रॅम लिहायची भाषा म्हणून सर्वात योग्य.
हे ठीक नसावे. मराठी, इंग्रजी, या कुठल्याही भाषेपेक्षा सोयीची नाही. संगणकाच्या आज्ञावलीची भाषा कृत्रिम आणि मर्यादित असते. त्या कृत्रिम भाषेसाठी ध्वनी वाटेल त्या भाषेतून घेतले तरी फरक पडत नाही. सध्या ध्वनी इंग्रजीतल्या काही शब्दांशी जुळतात. मात्र पुढील लेखन "इंग्रजी" आहे असे म्हणण्याचे धाडस मला तरी होत नाही
- - -

#include
class vehicle
{
int wheels;
float weight;
public:
virtual void message(void) {cout << "Vehicle message\n";}
};
class car : public vehicle
{
int passenger_load;
public:
void message(void) {cout << "Car message\n";}
};

...
- - - (स्रोत : http://sundog97.tripod.com/tutorial_cpp/VIRTUAL4.CPP)

त्याऐवजी

{#स्वीकार <येजाप्रवाह.मू>
वर्ग वाहन
पूर्णांक चाके
बिंदुअंक वजन
सार्वजनिक :
...
}


असे लिहिले तरी कम्पाइलरला समजावून देणे सहज शक्य आहे. मात्र याला तरी "मराठी" म्हणता येईल काय? तर नव्हे. संस्कृत चिह्ने वापरली तरी चालेल. मात्र ती संस्कृत भाषा नव्हे.
--------------------------------------------------------

अर्थ २: ज्या भाषेचे वर्णन संगणकाच्या प्रणालीत लिहायला सोयीस्कर आहे.
अंततोगत्वा असे काही नाही. मराठी भाषेचे वर्णनही संगणकीय प्रणालीत लिहिता येईल. पण त्यासाठी पहिली पायरी अशी : मराठी भाषेतील सर्व शब्दप्रयोगांचे अ‍ॅल्गोरिद्मिक वर्णन केले पाहिजे. दुसरी पायरी : अ‍ॅल्गोरिदमची संगणक प्रणाली बनवायला पाहिजे.

संस्कृतात पहिली पायरी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. पाणिनीची अष्टाध्यायी अशा प्रकारचे अ‍ॅल्गोरिद्मिक वर्णन आहे. त्यात काही बारीकसारीक चुका होत्या. बारीक नजरेने कात्यायन आणि पतंजली यांनी त्या चुका शोधून काढल्या आहेत. बगफिक्सेस सुचवलेले आहेत.

त्यावरून संगणकीय प्रणाली बरेच लोक लिहीत आहेत. जेरार युए या फ्रेंच-राष्ट्रीय संस्कृत-पंडिताने पाणिनीचा अ‍ॅल्गोरिदम बर्‍यापैकी पूर्ण लिहिलेला आहे. त्या प्रणालीचे दृश्य रूप येथे बघता येईल :
http://sanskrit.inria.fr/
(हे फक्त उदाहरण. अन्य लोक सुद्धा आहेत, भारतातसुद्धा आहेत, हे सांगणे नलगे.)

--------------------------------------

भटकर वगैरे प्रश्नांबद्दल मला काही माहीत नाही.

संदीप चित्रे's picture

15 Sep 2010 - 11:27 pm | संदीप चित्रे

अभ्यासपूर्ण आणि डोक्याला खुराक देणारा प्रतिसाद आवडला.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Sep 2010 - 8:34 am | llपुण्याचे पेशवेll

आणि खूपच चांगली माहीती दिली आहे.

हे विधान भटकरांनी केले कि नाही माहीत नाही, पण ते कुणीही असेच ठोकून दिले असेल असे वाटत नाही. नगरीनिरंजन यांनी केलेली मीमांसा मला योग्य वाटते.
मी हे विधान ढकलपत्राव्यतिरिक्त असेही खूप वेळा ऐकले / वाचले आहे. पण कधी खोलात जाऊन विचार नाही केला. थोडे फार Google केल्यावर मला एक शोधनिबंध येथे सापडला. आत्ता वाचायला वेळ नाही. पण 'नासा' च्या एका (अभारतीय) शास्त्रद्याने लिहिला आहे यावरून ह्या विधानातली गंभीरता कळते.
हा धागा काढल्याबद्दल तुमचे आभार!

धनंजय's picture

15 Sep 2010 - 11:56 pm | धनंजय

संस्कृत वैयाकरणांनी केलेले भाषेचे वर्णन उत्तम आहे खरे.

(मात्र तशा प्रकारचे वर्णन कुठल्याही भाषेचे करता येते. पीडीएफ मधील ब्रिग्स निबंधात त्या प्रकारचे विश्लेषण इंग्रजी वाक्यांचेसुद्धा करून दाखवलेले आहे.)

असेल बुवा! मला अजूनही तो पूर्ण वाचायला वेळ नाही मिळाला.
असेही विधान सत्य आहे की नाही याबद्दल मत मांडण्याइतका अभ्यास मी केला नाही.
माझा मुद्दा एवढाच आहे कि ते (भटकर किंवा इतर कोणी) ठोकून दिलेले नसावे. ज्या अर्थी फारशी शोधाशोध न करता हा निबंध सापडला त्या अर्थी आणखी खोलात गेल्यास कदाचित अजूनही माहिती मिळेल. म्हणजे ह्या शक्यतेची अनेकांनी दखल घेतली असावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2010 - 11:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला या संस्कृतच्या...!
कोणाच्या डोक्यातून काय निघेल काय सांगता येत नाही.
संस्कृत ही भाषा संगणकासाठी खूप सोपी आहे अशा बातम्या अधून मधून पेप्रात वाचायला मिळतात.
पण मलाही हे संस्कृत प्रचार-प्रसारकाचे रिकामे उद्योग असावेत असे वाटते.

अवांतर : संस्कृतचा विषय निघाला की मला एका आंतरजालीय मैत्रीणीची खूप आठवण येते. हल्ली ती कुठे आहे कोणास ठाऊक ?

-दिलीप बिरुटे

हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास संपादित केला तरी चालेल.

संस्कृत विषयी मला कल्पना नाही, पण मराठीवर आम्ही काम करत आहोत.
माहितीचा वापर सामान्य मराठी भाषिक माणसाला करता यावा म्हणून मी व माझा मित्र सुमेध या संदर्भात SQL वर काम करत आहोत.

आम्ही एक सुरुवात केली आहे. माहिती ही बहुदा विदागार किंवा डेटाबेस स्वरूपात असल्याने, मराठी विदा मराठीतच एस क्यु एल द्वारे शोधता येईल अशी प्रणाली विकसित केली आहे.

म्हणजे समजा विद्यार्थी शोधण्यासाठी एक एस क्यु एल विधान लिहिले जाईल जसे select * from students हे बर्‍यापैकी तसेच निवडा * यामधून विद्यार्थी असे लिहिता येते आहे.
यावर 'आपण नेहमी बोलतो तशा मराठी मधूनच हे लिहिता यावे यासाठी सुमेध प्रयत्नशील आहे. म्हणजे ते असे होऊ शकेल "* यामधून विद्यार्थी निवडा"

या प्रणालीचा उपयोग जेथे प्रामुख्याने काम मराठीतून होते तेथे उत्तम प्रकारे होऊ शकेल.

* जसे पोलिस स्टेशन - बहुदा मराठीचा वापर होतो - व्यक्तीच्या नावाचा विदा मध्ये शोध मराठीत घेता येईल.
* मराठी वाचनालये - मराठी पुस्तके सहजतेने मराठीतून शोधता येतील.

इतरही अनेक उपयोग होऊ शकतील... मात्र सध्या याचे स्वरूप 'शैक्षणिक' इतकेच मर्यादित आहे, याची मला कल्पना आहे.
तसेच हा प्रकल्प म्हणजे बॅकएंड आहे. फ्रंट एंड बनवणे तसे सोपे आहे असे आम्ही मानतो आहोत.

यात इतर भाषाही यात अंतर्भूत करणे शक्य आहे, किंवा त्यावर कामही करत आहोत पण वेळे अभावी ते रखडले आहे.

रस असल्यास http://www.vibhasha.com/index.html येथे भेट देऊन पाहा. तुम्हालाही मराठी मधून विधान लिहिता येईल.
या प्रयोगात तुम्ही एका SQL सर्व्हरला मराठी मध्ये एक छोटी आज्ञा द्याल आणि ती आज्ञा वापरून तुम्ही मराठी मध्ये उत्तर मिळवाल.

हा विभाषा प्रकल्प पूर्णपणे विकी किंवा फायरफॉक्स धर्तीवर लोकांचा लोकांसाठी करण्याचा प्रयत्न आहे.

तुम्हाला एखाद्या शाळेत प्रकल्प 'एस क्यु एल शिकवण्यासाठी' वापरायचा असेल तर स्वागत आहे!
आम्ही सर्व तांत्रिक मदत करू!

आपल्याला काही सूचना असतील तर अवश्य कळवा.
आमचा प्रकल्प संपर्क - vidabhasha@gmail.com

(सध्या तेथे कॉपीराईटची नोटीस आहे, कारण साईट उभी केल्यावर लगेच हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. मग कॉशन म्हणून मी जे सुचेल ते टाकून ठेवले आहे! :) या प्रकल्पावर आम्ही एका कालखंडात जोरदार काम केले. पण सध्या वैयक्तिक आजारपणे व जॉब यातून वेळ मिळेनासा झाल्याने रखडले आहे. आपला उत्साही उपक्रमी ऋषिकेशने यात रस घेतला आहे, पण मीच त्याच्या संपर्कात कमी पडलो आहे. या प्रकल्पात पोटँशियल खुप मोठे आहे. यावर स्वतंत्र लेख लिहायचा आहे, पण जमेल तसे...)

-निनाद

विकास's picture

16 Sep 2010 - 8:08 am | विकास

छानच प्रक्ल्प आहे हा! मनःपूर्वक शुभेच्छा!

बेसनलाडू's picture

16 Sep 2010 - 9:04 am | बेसनलाडू

हार्दिक शुभेच्छा!! कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास नि:संकोच कळवावे; यथाशक्ती करेन.
(सहाय्यक)बेसनलाडू

मी ऋचा's picture

16 Sep 2010 - 10:58 am | मी ऋचा

+१ असेच म्हणते.

+२ छान संकल्पना आहे.
अजुन वाचायला आवडेल, जरुर लिहा.

नितिन थत्ते's picture

16 Sep 2010 - 10:16 am | नितिन थत्ते

धनंजय, निनाद व इतरांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

मूळ वाक्य वाचल्यावर मनात आलेला अर्थ हा धनंजय यांनी अर्थ१ म्हणून जो सांगितला तसाच काहीसा होता. म्हणजे फोर्ट्रान, कोबोल, सी++ वगैरे कृत्रिम भाषा निर्माण करून प्रोग्रॅमिंग करण्या ऐवजी "सरळ संस्कृत भाषा वापरून प्रोग्रॅम लिहिणे" असाच आला.

भाषांचे संगणकीकरण करायचे झाल्यास संस्कृतचे करणे सगळ्यात(?) सोपे जाईल कारण त्या दिशेने कराव्या लागणार्‍या कामापैकी बरेच काम आधीच पाणिनी वगैरेंनी केले आहे असा अर्थच घेणे योग्य वाटते. पण संस्कृत ही रोजवापरातली भाषा नसल्याने तिचे संगणकीकरण करण्याची गरज कदाचित भासणार नाही.

निनाद यांच्या अत्यंत उपयुक्त प्रकल्पास सदिच्छा.

इन्द्र्राज पवार's picture

16 Sep 2010 - 10:50 am | इन्द्र्राज पवार

"पण संस्कृत ही रोजवापरातली भाषा नसल्याने तिचे संगणकीकरण करण्याची गरज कदाचित भासणार नाही."

~~ हे धागाकर्त्यांनीच म्हटल्यामुळे आता मतांतरांची आवश्यकता नाही....(जरी असे गृहीत धरले की, संस्कृत वापरण्याकडे डॉ.भटकरांनी कल दिला होता....तसल्या ढकलपत्रात म्हटल्याप्रमाणे.)

श्री.निनाद यांना स्वप्नपूर्तीसाठी मंगलकामना......(आजारपणदेखील मागे पडावे)
"या प्रकल्पात पोटँशियल खुप मोठे आहे. यावर स्वतंत्र लेख लिहायचा आहे, पण जमेल तसे..."
~ जरूर लिहा...खूप उत्सुकता आहे सविस्तर वाचण्याची....ब्लॉगवर टाकला तरी इथे नोटिफाय करावे.

इन्द्रा

आनंदयात्री's picture

16 Sep 2010 - 11:30 am | आनंदयात्री

चर्चेवरचे प्रतिसाद उत्तम आहेत.
धनंजयराव डाक्टरी सोडुन अजुन काय काय करतात याचे कुतुहल वाटते. का धनंजय हा आयडी वापरणारे अनेकजण ?
१. डॉक्टर
२. ललित लेखक कवी
३. संस्कृतचा अभ्यासक
४. सॉफ्टवेअर इंजिनिअर
४. माळ्यावरचे पाळणे शोधणारा मनुष्य

बाकी प्रोग्रॅमिंग हळुहळु अ‍ॅस्पेक्ट ओरिएंटेड होत आहे. आपले साध्य संगणकाकडुन करुन घ्यायला भाषा अपुरी पडत आहे.
एखाद्या प्रोग्रँममधे इंटेलिजन्स आणनारे कंडिशनल लॉगिक्स, लुप्स आता अगदी प्रार्थमिक कल्पना म्हणुन मोजल्या जातात. प्रोग्रँमिंगच्या नव्या पिढीकडे ओब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग, लॅमडा एक्प्रेशन्स, रेग्युलार एक्प्रेशन्स ई.ई. नवीन शस्त्रे आहेत. ज्यामुळे प्रोग्रॅम्स लहान होत आहेत, एस्पेक्ट ओरिएंटेड होत आहेत.

आपण प्रोग्रमिंग्साठी इंग्रजी भाषा वापरतो ?
छे छे .. आपण तर फक्त इंग्रजी मुळाक्षरे वापरतो. प्रोग्रॅमिंग च्या अनेक भाषा आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या खासियत आहेत, आपापल्या जागी त्या उपयोगी आहेत. (सी शार्प, जावा, पर्ल ही काही उदाहरणे).
पण या भाषा अपुर्‍या आहेत, अजुनही आपल्याला हवे ते काम संगणक (किंवा गृप ऑफ संगणक्स) कडुन करुन घ्यायला लाख्खो ओळींचा कोड लिहावा लागतो, तो सतत बदलावा लागतो. आपल्याला एका प्रोग्रॅमची गरज आहे जो स्वतःला बदलु शकेल, जो इंटेलिजंट असेल. या क्षेत्रात काम करणार्‍यांनी या अपेक्षेसाठीच्या गरजा, जसे एक उत्तम प्रोग्रॅमिंग भाषा, ओळखल्या असतील आणी पाणिनीने केलेले संस्कृतवरचे काम कदाचित त्यांच्या उपयोगी येत असावे.

काही वर्षांपूर्वी वाचल होत जर्मनीत प्रयत्न होत आहेत for such programming.
Anyway as an oldest language, it has lot of hidden potential.....अमेरिकेत संशोधन चालू असणार..... इच्छुकानी प वि वर्तक ह्यांची पुस्तके वाचवीत...जी त्यांनी खास परत भाषांतरित केली आहेत.

सुनील's picture

17 Sep 2010 - 7:20 am | सुनील

वाचतोय!!

विजुभाऊ's picture

17 Sep 2010 - 11:47 am | विजुभाऊ

संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे"
हे वाचून उद्या कोणी म्हणेल की संस्कृत ही केवळ प्रोग्रामिंग साठी निर्माण केली गेलेली भाषा होती.
आणि त्यातील सुभाषिते ही लायब्ररी फन्क्षन मोड्यूल्स आहेत

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Sep 2010 - 11:53 am | llपुण्याचे पेशवेll

:) हिहा हा हा हा.. :)
:P
तसं या विजुभाऊंच्या जोक मधे काही दम नाही पण ते आमचे मित्र आहेत म्हणून आम्ही आपलं हसून घेतलं.

युयुत्सु's picture

19 Sep 2010 - 1:32 pm | युयुत्सु

"संस्कृत आणि संगणक" हे लग्न ज्यामुळे लावण्याचे प्रयत्न झाले त्याचे श्रेय डॉ भाटकरांचे नसून ते नासा मध्ये काम करणा-या एका रिक ब्रिग्ज नावाच्या संशोधकाचे आहे. डॉ. भाटकरांना 'रामः रामौ रामा:' हे न अडखळता म्हणण्या इतके तरी संस्कृत येते का हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. रिक ब्रिग्जच्या ज्या निबंधामुळे "संस्कृत आणि संगणक" ही लाट देशात आली तो निबंध या दुव्यावर पहायला मिळेल.

http://www.aaai.org/ojs/index.php/aimagazine/article/view/466/402

या लाटेवर ऐशीच्या दशकात अख्खा भारत देश स्वार झाला होता. या लाटेने काय साधले हे समजण्यासाठी ही लाट येण्या अगोदर संगणकाला भारतीय समाजाने किती विरोध केला हे समजाऊन घेणे आवश्यक ठरेल. मला तर पुण्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने संगणकाला विरोध करण्यासाठी पुण्यात डेक्कन जिमखान्या वरील गुडलक च्या चौकात केललं आंदोलन अजून आठवतं आहे. अमेरीकेतील भाषाशास्त्राचे एक अभ्यासक प्रा. अरविंद जोशी यांची एकदा मला मुलाखत घ्यायची
संधी मिळाली होती. ही मुलाखत देताना प्रा. अरविंद जोशी अत्यंत नाखूष होते. बराच प्रयत्न करून ते ’मूड’मध्ये येईनात तेव्हा मी एक बॉम्ब त्यांच्यावर टाकायचे ठरवले. मी त्यांना विचारले "संस्कृत आणि कंप्युटर" आणि "गणपती दूध पितो" या एकाच मानसिकतेतून निर्माण झालेल्या घटना आहेत असं तुम्हाला वाटतं नाही का?

त्यावर त्यांनी बराच वेळ धरून ठेवलेले मौन अचानक सोडले आणि होकारार्थी स्मित केले...

तात्पर्य - सूज्ञांस अधिक सांगणे न लगे...

बॅटमॅन's picture

14 May 2012 - 12:01 pm | बॅटमॅन

युयुत्सु आणि धनंजय यांचे प्रतिसाद आवडले. निकाल लागला तर याचा शेवटी.