सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या.
"पेरु" (खायचा नव्हे :) ) देशाच्या पश्चिम किनर्यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी...
http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/1...
अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे.
प. वि. वर्तकानी या सर्वांचा परामर्ष "वास्तव रामयण" या पुस्तकात घेतला आहे...
https://sites.google.com/site/vvmpune/other-works/about-trident-peru
म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात खरेच विमाने होती की काय?
http://www.2atoms.com/weird/ancient/plane.htm
ही म्हणे धावपट्टी असावी
http://www.billandcori.com/peru/nazcalines.htm
आश्चर्य म्हणजे मी गूगल नकाशात पाहिले असता खरेच काहीतरी अगम्य रेषा दिसतात की!
प्रतिक्रिया
17 Apr 2012 - 7:12 pm | पैसा
लाईन्स कोणी का मारी ना! ;)
17 Apr 2012 - 7:42 pm | कवितानागेश
असे कसे? असे कसे?
आपल्याला कळायला नको का कुठल्या दुसर्या सूर्यमालेतल्या ग्रहावरच्या लोकांनी येउन आपल्या पृथ्वीवर लाइनी मारल्या.
त्यातूनच कळेल की डायनोसोर्स कसे निर्माण झाले! :P
मीसुद्धा वडाची साल पिंपळाला लावू शकते! ;)
17 Apr 2012 - 7:53 pm | प्रास
नाझ्का लाईन्स आहेत तिथेच आहेत. आहेत तिथेच आहेत. तिथेच आहेत. ..आहेत. ..आहेत.
स्वाक्षरी बदला. लिहा,
"ए कोणे बे आमच्या नाझ्कावर लैनी मार्तोय?"
;-)
17 Apr 2012 - 1:26 pm | कपिलमुनी
१. आताचा माउस ==गणपतीचा उंदीर
२.अणु बॉम्ब == ब्रम्हास्त्र
३. मिसाईल्स == इतर अस्त्रे
४. विमाने == पुष्पक
५. अंतराळ प्रवास == नहुष राजाची कहाणी
६. पूल == रामसेतु
७. क्लोनिंग : अहिरावण - महिरावण यांची कथा ( यांच्या रक्ताच्या थेंबा मधून अजुन उत्पन्न व्हायचे म्हणे )
८ . टेस्ट ट्युब बेबी : कौरव (कद्रु आणि विनिता यांच्या गोष्टीमध्ये तर अंडी घालतात ..जे अजुन विज्ञानाला शक्य नाहिये )
९.
१०....
17 Apr 2012 - 8:33 pm | शिल्पा ब
नहुष राजाची काय भानगड ए? जरा संक्षिप्त का होईना गोष्ट सांगता का? मला माहीत नै किंवा आठवत नैये म्हणुन विचारलं.
17 Apr 2012 - 6:24 pm | नितिन थत्ते
हा एक इन्टरेस्टिंग लेख सापडला.
17 Apr 2012 - 7:51 pm | बॅटमॅन
हाच लेख मदनबाण यांनी आधी सादर केलेला आहे.
17 Apr 2012 - 8:02 pm | कवितानागेश
याच लेखातून त्या लेखकांप्रमाणेच बाकी प्रत्येक माणसाला आपल्याला हवे तसे निष्कर्ष काढता येणार आहेत.
म्हणूनच तो विन्ट्रेष्टिन्ग आहे.
त्यातले 'milk cloth' वाचून माझी करमणूक झालीये.
17 Apr 2012 - 10:53 pm | क्लिंटन
त्या मानाने मी या रोचक चर्चेत बरीच उशीरा एन्ट्री मारत आहे तरीही मला मांडायचे मुद्दे मी इथे लिहायचा (जरी पुनरावृत्ती होत असली तरी) मोह अजिबात आवरू शकत नाही.
स्टॅलिनच्या हिंसेचा, त्याच्या पक्षाच्या विचारसरणीचा (जर का असलीच तर) आणि राज्यव्यवस्थेचा मी कट्टर विरोधक आहे. तरीही त्याचे एक वाक्य मला खूपच भावते. आणि ते म्हणजे--"धर्म ही एक अफूची गोळी आहे." आणि ती अफूची गोळी एकदा घेतली की माणूस त्याच्या दैनंदिन आयुष्यातील समोर दिसणारे आणि जास्त त्रास देणारे प्रश्न विसरून जातो आणि त्याचे लक्ष अधिकाधिक वेगळ्याच विश्वाकडे लागते.आता हे "वेगळे विश्व" काहींच्या बाबतीत "जन्ममृत्यूचा फेरा टाळणे" असेल तर काहींच्या बाबतीत कायमच भूतकाळात वावरणे असेल (ज्याला मी वेदकालीन जंगलात भटकणे म्हणतो).त्यातून "आमचा" धर्म आणि "आमची" संस्कृती हा अभिमान डोक्यात शिरला की काही विचारायलाच नको.अशा लोकांसाठी "आमचा" धर्म आणि "आमची" संस्कृती किती किती थोर, आमच्या परंपरा किती चांगल्या, आमचे पूर्वज किती महान इत्यादी इत्यादी गोष्टी बोलणारा माणूस अगदी योग्य वाटतो तर या सगळ्या गृहितकांना आधार काय हे किंवा असे प्रश्न विचारले तर तो माणूस क्षणभरात "जे काही भारतीय असेल त्यावर थुंकणारा", "ज्या काही गोष्टी आपल्या आहेत त्याच वाईट दिसणारा आणि पाश्चिमात्यांचे सगळे काही चांगले दिसणारा", "मेकॉलेच्या परंपरेतला काळा इंग्रज" इत्यादी इत्यादी विशेषणांचा धनी होऊन जातो. माझ्या जवळच्या नात्यात एक गृहस्थ असेच होते.अशांच्या प्रभावामुळे मी सुध्दा अनेक वर्षे अशाच गोष्टी बोलत असे. पण नंतर स्वत:चा विचार केल्यानंतर त्यातला फोलपणा मला जाणवला आणि या सगळ्या प्रवृत्तीचाच मला मनस्वी तिटकाराच नव्हे तर संताप आला.माझ्या परिचयातले काही लोक जेव्हा अशा गोष्टी बोलू लागतात तेव्हा त्यांना बघून मला वाटते की जर उद्याला महंमद अली जीना जरी "भारतीय संस्कृती किती चांगली" असे तोंडदेखल्या बोलायला लागला तर ते पण अशांना योग्य वाटेल पण माझ्यासारखा कोणी जर काही प्रश्न विचारायला लागला तर मी "काळा इंग्रज" ठरायला मिनिटाचाही अवधी लागायचा नाही!!
काही प्रश्न:
१. आमची संस्कृती किती चांगली, आमचे पूर्वज किती महान होते, सगळे शोध त्यांनी कसे लावले होते, "आपल्या" विविध चालीरितींमध्ये विज्ञान कसे आहे इत्यादी गोष्टींचा सतत विचार करून आणि बोलून नक्की काय फायदा होतो? जर का कोणी इंग्रज माणूस "एकेकाळी आमच्या लोकांनी साता समुद्रावर राज्य केले" याचा घोषा लावू लागला तर अशा माणसाला "आताचे काय" हा प्रश्न विचारायचा नाही का?या प्रश्नाचे उत्तर "हो" असेल तर या भारतीय संस्कृतीचा अभिमान धरणाऱ्यांना पण तोच प्रश्न का विचारू नये?
२. "पूर्वीच्या काळी आमच्याकडे सगळे होते" हा विचार करण्यात घालवला जातो त्याच्या १% वेळ जरी नंतरच्या काळात नक्की काय झाले म्हणून आपली पडझड झाली याचा dispassionately विचार करण्यात घालवला तर नक्कीच चित्र वेगळे दिसायला मदत होईल हे नक्कीच. पुराणातली वांगी पुराणात राहू द्या. आपण नंतरच्या काळात नक्की कुठे कमी पडलो हे शोधून काढून ते दोष दूर करायचा प्रयत्न आपण कधी करणार? की स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना असल्या गोष्टींचा विचार करायची गरज वाटत नाही? आणि जर का असे (अडचणीत टाकणारे) प्रश्न विचारणारे लोक क्षणभरात "काळे इंग्रज" ठरतात ते योग्य आहे का?
३. पाच-दहा हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आजच्या काळात कदाचित लागू ठरणार नाहीत. पण मग जे काही लिहून ठेवले आहे त्याचा अभ्यास करून जे relevant आहे तेवढे घेऊन ते पुढे न्यायचा प्रयत्न कोणी करत आहे का? त्यातूनही आजच्या विज्ञानाला न समजलेल्या कोणत्या गोष्टी पूर्वीच्या ग्रंथांमध्ये आधीच लिहून ठेवल्या आहेत हे जगापुढे कोणी आणायचा प्रयत्न करत आहे का?
४. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे "आपला धर्म" आणि "आपली संस्कृती" म्हणजे नक्की काय? माझ्यासाठी तरी जे जे काही मला पटते/भावते/आवडते ते माझे मग ते कुठूनही आलेले असू दे. "आपले ते चांगले" यापेक्षा "चांगले ते आपले व्हावे" असा प्रयत्न का नसतो?
५. मी अमक्या धर्मात/जातीत जन्माला आलो याचा अभिमान का धरावा? त्या धर्मात/जातीत जन्माला यावे यासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचे माझ्या तरी लक्षात नाही. आमच्या संस्थेत वसतीगृहाच्या एकूण २४ इमारती होत्या.त्यातील १९ क्रमांकाच्या इमारतीत मी राहत होतो. एकदा तिथे प्रवेश मिळाल्यावर संस्थाचालकांनी मला २४ पैकी कोणत्याही इमारतीत पाठविले असते. नेमकी तशीच गोष्ट जन्म घेण्याविषयी नाही का? मलाही जन्म कोणत्याही धर्मात/जातीत मिळाला असता. ज्याप्रमाणे "मी १९ क्रमांकाच्या इमारतीत राहत होतो" हा अभिमान धरणे हास्यास्पद आहे त्याचप्रमाणे धर्माचा/जातीचा अभिमान धरणे ही हास्यास्पद आहे असे मला वाटते.
मला अशा भारतीय संस्कृती/धर्माच्या कट्टर अभिमान्याचा आलेला अनुभव सांगतो. माझाच धर्म सगळ्यात चांगला, माझीच संस्कृती सगळ्यात चांगली हा अभिमान माझाच पेशा (इंजिनिअरींग) सगळ्यात चांगला, त्यातही माझेच इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग सगळ्यात चांगले या पातळीवर गेला आणि त्या गृहस्थाने त्याच्या मुलाला आवड नसताना इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगला जायला लावले. तो बिचारा मुलगा गेली अनेक वर्षे त्याच्या वडिलांच्या या वृथा अभिमानामुळे आजही स्ट्रगल करतच आहे आणि त्याच्या हुषारीच्या आणि पात्रतेच्या मानाने त्याची achievement काहीच नाही. हा प्रकार अगदी जवळून बघितल्यानंतर या अभिमान प्रकरणाचा भयंकर संताप आला आहे मला.इतरांच्या आयुष्याचे नुकसान करणारा कसला आलाय अभिमान? चुलीत घाला त्या अभिमानाला!!
असे प्रश्न विचारायची माझी पहिली वेळ नाही. विविध फोरमवर इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून (अगदी मिसळपाववर सुध्दा) मी हे प्रश्न वेळोवेळी विचारले आहेत. त्याची उत्तरे मला कोणाही भारतीय संस्कृतीवाल्याने दिलेली नाहीत. काळा इंग्रजच नव्हे तर "तू ख्रिस्ती का मुसलमान" हा प्रश्नही मला विचारला गेला आहे. माझा या भारतीय संस्कृतीवाल्यांपासून भ्रमनिरास झाला तो अशामुळेच.
असो.
(मेकॉलेच्या परंपरेतला काळा इंग्रज) विल्यम जेफरसन क्लिंटन
17 Apr 2012 - 11:11 pm | शिल्पा ब
<<<इतरांच्या आयुष्याचे नुकसान करणारा कसला आलाय अभिमान? चुलीत घाला त्या अभिमानाला!!
१००% + अशा आंधळ्या "अभिमाना"तुनच तालिबानी वृत्ती येते असं आमचं मत आहे. अजुनही आपली हिंदु संस्कृती चांगले निरोगी गुण राखुन आहे. उदा. कौटुंबिक जवळीक, वडीलधार्यांना मान देणे. यांची जपणुक करता येईल. अर्थात दोन्ही बाजुंनी आदर ठेवला तरच. इतर गोष्टी जशा स्वयंपाकघरातल्या वस्त उदा. हळद, आले वगैरे घरगुती उपचार ही सुद्धा एक प्राचीन परंपराच आहे.
आता जुन्या काळातील चांगल्या रुढी आपण जतन करु शकतो उदा. जुन्या प्रदुषणविरहीत प्रकारे सण साजरे करणं. पण अशा गोष्टी अवघड असल्याने केल्या जात नाहीत. अन नुसताच अभिमान घेउन कुरवाळत बसल्याने काहीही प्रगती होत नाही.
जुन्या पोथ्यांचे जतन केले तर तो एक सांस्कृतीक ठेवाच असेल ज्यातुन जे लिहिले गेले त्याकाळचे जीवनमान वगैरे लक्षात येइल. इतिहास समजायला मदत होईल. नाशिकला काही तरुण मुले-मुली असा प्रयत्न करताहेत हे दोन -तीन वर्षांपुर्वी टीव्हीवर बघितलं होत. त्याविरुद्ध भांडारकर संस्थेची नासधुस वगैरे त्याविषयी संस्कृतीभीमानी लोकांनी कीमान निषेध केला का? जे कोण राजकीय हस्तक होते त्यांच्यापर्यंत तो निषेध अन त्याची कारणे पोहोचली का?
17 Apr 2012 - 11:47 pm | विकास
स्टॅलिनच्या हिंसेचा, त्याच्या पक्षाच्या विचारसरणीचा (जर का असलीच तर) आणि राज्यव्यवस्थेचा मी कट्टर विरोधक आहे. तरीही त्याचे एक वाक्य मला खूपच भावते. आणि ते म्हणजे--"धर्म ही एक अफूची गोळी आहे."
"religion is the opiate of the masses." अथवा "धर्म ही एक अफूची गोळी आहे." हे वाक्य मला वाटते कार्ल मार्क्सचे आहे.
17 Apr 2012 - 11:54 pm | सुनील
नावात काय आहे असे तुकाराम म्हणून गेलेच आहेत! :)
असो, मीदेखिल सदर वाक्य मार्क्सचे आहे असेच वाचले आहे.
बाकी क्लिंटन ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत!
18 Apr 2012 - 12:11 am | विकास
नावात काय आहे असे तुकाराम म्हणून गेलेच आहेत!
फुलास पाषाण
म्हणे जरी कोण
सुगंधची नाम
तुका म्हणे
अशाच काहीशा त्या ओळी होत्या ना? :-)
18 Apr 2012 - 12:18 am | सुनील
यू सेड इट!! अशाच काहीशा होत्या त्या ओळी, असे वाटते :)
18 Apr 2012 - 8:08 am | नितिन थत्ते
१. आमची संस्कृती किती चांगली, आमचे पूर्वज किती महान होते, सगळे शोध त्यांनी कसे लावले होते, "आपल्या" विविध चालीरितींमध्ये विज्ञान कसे आहे इत्यादी गोष्टींचा सतत विचार करून आणि बोलून नक्की काय फायदा होतो?
आमच्या पूर्वजांना सग्ग्ळे सग्ग्ळे ज्ञान होते, आपल्या विविध चालीरीतींमध्ये विज्ञान आहे असे एस्टॅब्लिश करण्यात यश आले तर आमच्या पूर्वजांनी अमके श्रेष्ठ आणि अमके कनिष्ठ हे सुद्धा त्या अतिप्रगत ज्ञानाच्याच आधारे सांगितले होते असे नाही का एस्टॅब्लिश होणार? मग "आम्ही श्रेष्ठ आणि पतित झालो तरी पूजनीय" आपोआप सिद्ध होते.
२. नंतरच्या काळात नक्की काय झाले म्हणून आपली पडझड झाली याचा dispassionately विचार करण्यात घालवला तर नक्कीच चित्र वेगळे......
अहो मुसलमानांचे आक्रमण नाही का झाले नंतर? काय राव !! परत परत सांगायला लागतं तुम्हाला. :(
३. पाच-दहा हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आजच्या काळात कदाचित लागू ठरणार नाहीत. पण मग जे काही लिहून ठेवले आहे त्याचा अभ्यास करून जे relevant आहे तेवढे घेऊन ते पुढे न्यायचा प्रयत्न कोणी करत आहे का? त्यातूनही आजच्या विज्ञानाला न समजलेल्या कोणत्या गोष्टी पूर्वीच्या ग्रंथांमध्ये आधीच लिहून ठेवल्या आहेत हे जगापुढे कोणी आणायचा प्रयत्न करत आहे का?
त्यासाठी उच्च तपोबल असलेल्या सात्विक योग्यांची आवश्यकता आहे. पण पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे, फास्टफूड आणि कोकाकोलाच्या सेवनामुळे (आणि त्यापूर्वी मुसलमानी आक्रमणामुळे स्त्रिया भ्रष्ट झाल्याने) असे लोक मिळत नाहीत. ;)
४. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे "आपला धर्म" आणि "आपली संस्कृती" म्हणजे नक्की काय? माझ्यासाठी तरी जे जे काही मला पटते/भावते/आवडते ते माझे मग ते कुठूनही आलेले असू दे. "आपले ते चांगले" यापेक्षा "चांगले ते आपले व्हावे" असा प्रयत्न का नसतो?
हॅ हॅ हॅ
५. मी अमक्या धर्मात/जातीत जन्माला आलो याचा अभिमान का धरावा?
पुन्हा हॅ हॅ हॅ. जगात जाती दोनच. एक माझी जात आणि दुसरी इतर. असं कोणत्याही जातीच्या माणसाने म्हणायचं असतं.
18 Apr 2012 - 10:31 am | गवि
ठ्ठो....!!!!
18 Apr 2012 - 10:47 am | अर्धवटराव
सध्या एव्हढच !!
अर्धवटराव
20 Apr 2012 - 11:47 am | जयंत कुलकर्णी
+२२२२
18 Apr 2012 - 10:44 am | अर्धवटराव
१. आमची संस्कृती किती चांगली, आमचे पूर्वज किती महान होते, सगळे शोध त्यांनी कसे लावले होते, "आपल्या" विविध चालीरितींमध्ये विज्ञान कसे आहे इत्यादी गोष्टींचा सतत विचार करून आणि बोलून नक्की काय फायदा होतो? जर का कोणी इंग्रज माणूस "एकेकाळी आमच्या लोकांनी साता समुद्रावर राज्य केले" याचा घोषा लावू लागला तर अशा माणसाला "आताचे काय" हा प्रश्न विचारायचा नाही का?या प्रश्नाचे उत्तर "हो" असेल तर या भारतीय संस्कृतीचा अभिमान धरणाऱ्यांना पण तोच प्रश्न का विचारू नये?
-- निश्चित असे प्रश्न विचारावेत. किंबहुना त्याशिवाय ज्ञान/संस्कृती/समाज प्रवाहीत राहात नाहि. तुम्हाला खरच असा एकही संस्कृतीरक्षक मिळाला नाहि कि जो या मुद्द्यांकडे उघड्या डोळ्यांनी बघेल? मला नाहि वाटत. आणि तसं असेल तर तुमचं सँपलींग चुकलय , बाकी काहि नाहि.
२. "पूर्वीच्या काळी आमच्याकडे सगळे होते" हा विचार करण्यात घालवला जातो त्याच्या १% वेळ जरी नंतरच्या काळात नक्की काय झाले म्हणून आपली पडझड झाली याचा dispassionately विचार करण्यात घालवला तर नक्कीच चित्र वेगळे दिसायला मदत होईल हे नक्कीच. पुराणातली वांगी पुराणात राहू द्या. आपण नंतरच्या काळात नक्की कुठे कमी पडलो हे शोधून काढून ते दोष दूर करायचा प्रयत्न आपण कधी करणार? की स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना असल्या गोष्टींचा विचार करायची गरज वाटत नाही? आणि जर का असे (अडचणीत टाकणारे) प्रश्न विचारणारे लोक क्षणभरात "काळे इंग्रज" ठरतात ते योग्य आहे का?
-- डोळ्यावर पट्टी बंधणारे संस्कृतीरक्षक हे "खाली दीमाग शैतानका घर" याच कॅटेगरीचे असतात... आणि अशे सैतानी दीमागवाले सर्वकाळी - सर्वदेशी - सर्वक्षेत्री सापडतील. आणि त्या त्या क्षेत्रातले विचारवंत ( मग ते क्षेत्र धार्मीक असो वा सामाजीक वा राजकीय... कुठेलेही) अशा दांभीकतेवर नेहमीच प्रहार करतात. बरोबर ना? ज्यांना खरच प्रगती करायची आहे ते आपापल्यापरीने आपापल्या क्षेत्रात झोकुन देऊन काम करतच असतात. मग टवाळखोरांना उगा महत्व का द्यावे?
३. पाच-दहा हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आजच्या काळात कदाचित लागू ठरणार नाहीत. पण मग जे काही लिहून ठेवले आहे त्याचा अभ्यास करून जे relevant आहे तेवढे घेऊन ते पुढे न्यायचा प्रयत्न कोणी करत आहे का? त्यातूनही आजच्या विज्ञानाला न समजलेल्या कोणत्या गोष्टी पूर्वीच्या ग्रंथांमध्ये आधीच लिहून ठेवल्या आहेत हे जगापुढे कोणी आणायचा प्रयत्न करत आहे का?
-- हा प्रश्न तुमच्यातल्या जिज्ञासेला पडला आहे का? हे तुमचं तुम्हीच ठरवु शकाल, आणि त्यातुनच या प्रश्नाचं उत्तरदेखील मिळेल. माहिती दळवळणाच्या प्रचंड वेगवान जगात अशी माहिती मिळवणं खरच कठीण नाहि.
४. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे "आपला धर्म" आणि "आपली संस्कृती" म्हणजे नक्की काय? माझ्यासाठी तरी जे जे काही मला पटते/भावते/आवडते ते माझे मग ते कुठूनही आलेले असू दे. "आपले ते चांगले" यापेक्षा "चांगले ते आपले व्हावे" असा प्रयत्न का नसतो?
- लाख मोलाचा विचार. किंबहुना धर्मसंस्था वगैरे भानगडी याच प्युरीफीकेशन प्रोसेसला केंद्रस्थानी ठेऊन जन्माला आल्यात. आता १०० पैकी ५ जण हा गाभा उचलतात, उरलेले ९५ त्यावर मारामारी, दुराभीमान, खुटी उपाडपणा करतात. काय करावे ? अहो जग जर एव्हढं आयडीअल वागलं असतं तर मग काही प्रश्नच नव्हताना.
५. मी अमक्या धर्मात/जातीत जन्माला आलो याचा अभिमान का धरावा? त्या धर्मात/जातीत जन्माला यावे यासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचे माझ्या तरी लक्षात नाही. आमच्या संस्थेत वसतीगृहाच्या एकूण २४ इमारती होत्या.त्यातील १९ क्रमांकाच्या इमारतीत मी राहत होतो. एकदा तिथे प्रवेश मिळाल्यावर संस्थाचालकांनी मला २४ पैकी कोणत्याही इमारतीत पाठविले असते. नेमकी तशीच गोष्ट जन्म घेण्याविषयी नाही का? मलाही जन्म कोणत्याही धर्मात/जातीत मिळाला असता. ज्याप्रमाणे "मी १९ क्रमांकाच्या इमारतीत राहत होतो" हा अभिमान धरणे हास्यास्पद आहे त्याचप्रमाणे धर्माचा/जातीचा अभिमान धरणे ही हास्यास्पद आहे असे मला वाटते.
-- जन्माला येणं ही गोष्ट एव्हढी रँडम नाहि. पण तो फिलॉसॉफीचा विषय झाला, त्यावर चर्चा इथे नको. कर्तुत्व नसता उगाच अभीमान बाळागणे हा दंभीकपणा आहे, एकदम मान्य... आणि कर्तुत्व असुन देखील अभीमान न मानणे हा नम्रपणा. ही दुनीया अशाच दांभीक आणि नम्र लोकांचा समुह आहे... किंबहुना प्रत्येक व्यक्तीत हे गुणावगुण मिसळलेले दिसतील.
मला अशा भारतीय संस्कृती/धर्माच्या कट्टर अभिमान्याचा आलेला अनुभव सांगतो. माझाच धर्म सगळ्यात चांगला, माझीच संस्कृती सगळ्यात चांगली हा अभिमान माझाच पेशा (इंजिनिअरींग) सगळ्यात चांगला, त्यातही माझेच इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग सगळ्यात चांगले या पातळीवर गेला आणि त्या गृहस्थाने त्याच्या मुलाला आवड नसताना इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगला जायला लावले. तो बिचारा मुलगा गेली अनेक वर्षे त्याच्या वडिलांच्या या वृथा अभिमानामुळे आजही स्ट्रगल करतच आहे आणि त्याच्या हुषारीच्या आणि पात्रतेच्या मानाने त्याची achievement काहीच नाही. हा प्रकार अगदी जवळून बघितल्यानंतर या अभिमान प्रकरणाचा भयंकर संताप आला आहे मला.इतरांच्या आयुष्याचे नुकसान करणारा कसला आलाय अभिमान? चुलीत घाला त्या अभिमानाला!!
-- तुमचाच प्रश्न आणि तुमचच उत्तर. खरा प्रोब्लेम धर्म/संस्कृती/अभीयांत्रीकी नाहि तर सारासार विचार न करण्याची/दुसर्याचे मन समजुन न घेण्याची वृत्ती आहे.
असे प्रश्न विचारायची माझी पहिली वेळ नाही. विविध फोरमवर इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून (अगदी मिसळपाववर सुध्दा) मी हे प्रश्न वेळोवेळी विचारले आहेत. त्याची उत्तरे मला कोणाही भारतीय संस्कृतीवाल्याने दिलेली नाहीत. काळा इंग्रजच नव्हे तर "तू ख्रिस्ती का मुसलमान" हा प्रश्नही मला विचारला गेला आहे. माझा या भारतीय संस्कृतीवाल्यांपासून भ्रमनिरास झाला तो अशामुळेच.
-- माझा अनुभव देखील फार वेगळा नाहि. पण जी थोडीफार दुनीया मी बघीतलीय त्यात मला तुम्ही म्हणताय तसे "संस्कृतीरक्षक" देखील भेटलेत आणि ज्यांच्यापुढे आदराने नतमस्तक व्हावे असे संस्कृतीप्रेमीही भेटलेत. तुमच्या हाती स्वच्छ पाण्याचा गडु आहे... आता त्याने परसाकडे साफ करायची, कि तहान भागवायची, कि गाडी-कपडे-जोडे धुवायचे, कि मस्तपैकी दारुचा पॅग बनवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे. तुम्हाला खरच जर फक्त आणि फक्त भ्रमनिरास करणारे भेटले असतील तर पुन्हा खेदाने नमुद करतो कि तुमचे सँपलींग चुकले.
असो.
अर्धवटराव
18 Apr 2012 - 11:38 am | कवितानागेश
तुला अजूनही कळले नाही का?
आपल्याला 'इझी प्रे' लोक शोधून त्यांच्या नावानी गळे काढायची हुक्की येते तेंव्हा सँपलींग चुकीचेच करायचे असते.
आणि चुकून एखादे बरोबर सँपल सापडले तर ते खड्यासारखे वगळायचे असते.
आणि संशोधन तुम्हीच करुन आम्हाला काय ते बसल्या जागी सांगा अशी बरोबर सँपल घेउन आलेल्यांना ऑर्डर सोडायची असते.
कुणाला काही पडलेली नाहीये, खरे काय आहे जाणून घ्यायची!
कारण आपल्याकडे 'कुतुहल' नसते, केवळ 'कुशंका' असतात आणि त्यालाच शोधक वृत्ती असे लेबल लावायचे असते!
बाकी 'स्वच्छ पाण्याचा गडु' मस्त! :)
अवांतरः खुटी उपाडपणा म्हणजे काय?
18 Apr 2012 - 1:02 pm | क्लिंटन
माझे सँपलींग चुकीचे आहे की बरोबर हे मला माहित नाही. पण माझे सँपलींग चुकीचेच आहे आणि मी मुद्दामून बरोबर सँपल वगळले आहे हा लाखमोलाचा दृष्टांत तुम्हाला कुठून झाला?का ते पण हजारो वर्षांपूर्वी कोणत्या तरी ग्रंथात कोणीतरी लिहून ठेवले आहे?
अर्थातच. जे लोक एखादा दावा करतात त्यांच्यावरच तो योग्य आहे की नाही हे सिध्द करायची जबाबदारी येते आणि इतरांना या दाव्याविषयी प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार आहे.
इथे प्रश्न कधी उभा राहतो?जेव्हा माझ्यासारखे लोक असा दावा करत असलेल्यांना प्रश्न विचारतात तेव्हा असा दावा करणारे लोक कधीच त्याचे उत्तर देत नाहीत. उलट प्रश्न विचारत असलेल्याच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उभे करतात किंवा "काळा इंग्रज" इत्यादी विशेषणांनी संबोधतात. आपण स्वतः अगदी धुतल्या तांदळासारखे आणि सगळ्या जगाच्या वर्तणुकीचा न्यायनिवाडा करायचा अधिकार केवळ आपल्यालाच असाही या संस्कृतीवाद्यांचा आविर्भाव असतो.म्हणजे तुम्ही म्हणता म्हणून डोळे झाकून कोणताही दावा स्विकारावा का?ते अजिबात होणे नाही.
बाकीच्यांचे माहित नाही पण तुम्ही मात्र अशा चुकीच्या सँपलपैकीच आहात असे वाटते.
(काळा इंग्रज असल्याचा अभिमान असलेला) विल्यम जेफरसन क्लिंटन
18 Apr 2012 - 2:23 pm | कवितानागेश
मला तुम्हाला व्यक्तीशः काहीच ठरवायचे नाहीये.
मी एकंदरीत संस्क्रुतीला/ नक्की काळ माहित नसलेल्या पुरातन गोष्टींना, झुरळासारखे वागवणार्यांबद्दल बोलत होते.
पण तुम्ही व्यक्तिगत रोख घेउन बोलताय म्हणून एक व्यक्तिगत प्रश्नः कधीतरी कुणीतरी 'काळा इन्ग्रज' संबोधल्याचा राग तुम्ही कायम प्रत्येकावर काढणार का?
एकदा कधीतरी आईनी फटका मारला तर जगातली प्रत्येक आई मारकुटीच आहे, असा निष्कर्ष निघतो का?
( या प्रश्नाचे उत्तर नकोय, फक्त यावर विचार करावा अशी विनंती आहे.)
अवांतरः "आपण स्वतः अगदी धुतल्या तांदळासारखे आणि सगळ्या जगाच्या वर्तणुकीचा न्यायनिवाडा करायचा अधिकार केवळ आपल्यालाच असाही या संस्कृतीवाद्यांचा आविर्भाव असतो."
इथे संस्कृतीवाद्यांच्या जागी इतर अनेक शद्ब घालता येतिल.
शिवाय इथे कुणाच्याही 'वर्तणूकीबद्दल' चर्चा सुरु नहीये. शास्त्रिय संशोधन झाले होते की नाही याबद्दल सुरु आहे.
वर्तणूकीबद्दलची तक्रार कुठून आली?
18 Apr 2012 - 6:05 pm | अर्धवटराव
तंबू सारख्या गोष्टी खुट्या (खुंट्या म्हणतात काहि जण) गाडुन सावरलेल्या असतात ना... तर बसल्या बसल्या अश्या खुट्या उचकटुन तंबूचा आधार मोडायचा उद्योग म्हणजे खुटी उपाडपणा... सहकारी पक्ष सरकारचे करतात तसं थोडंफार .... बाकी तु सूज्ञ आहेस ;)
अर्धवटराव
18 Apr 2012 - 1:03 pm | क्लिंटन
एका अतिशय संयत प्रतिसादाबद्दल अर्धवटराव धन्यवाद. वेळ मिळेल तसे सविस्तर लिहितो.
18 Apr 2012 - 1:10 pm | मृत्युन्जय
स्टॅलिनच्या हिंसेचा, त्याच्या पक्षाच्या विचारसरणीचा (जर का असलीच तर) आणि राज्यव्यवस्थेचा मी कट्टर विरोधक आहे. तरीही त्याचे एक वाक्य मला खूपच भावते. आणि ते म्हणजे--"धर्म ही एक अफूची गोळी आहे." आणि ती अफूची गोळी एकदा घेतली की माणूस त्याच्या दैनंदिन आयुष्यातील समोर दिसणारे आणि जास्त त्रास देणारे प्रश्न विसरून जातो आणि त्याचे लक्ष अधिकाधिक वेगळ्याच विश्वाकडे लागते.आता हे "वेगळे विश्व" काहींच्या बाबतीत "जन्ममृत्यूचा फेरा टाळणे" असेल तर काहींच्या बाबतीत कायमच भूतकाळात वावरणे असेल (ज्याला मी वेदकालीन जंगलात भटकणे म्हणतो).त्यातून "आमचा" धर्म आणि "आमची" संस्कृती हा अभिमान डोक्यात शिरला की काही विचारायलाच नको.अशा लोकांसाठी "आमचा" धर्म आणि "आमची" संस्कृती किती किती थोर, आमच्या परंपरा किती चांगल्या, आमचे पूर्वज किती महान इत्यादी इत्यादी गोष्टी बोलणारा माणूस अगदी योग्य वाटतो
मला नाही वाटत त्यात चुकीचे असे काही आहे. केवळ गीतेतले तत्वज्ञान या मुद्द्यावर अभिमान वाटावे असे तर्कशास्त्र आणि व्यवहारज्ञान आपण जोपासले आहे असे मला वाटते. भारतीय संस्कृतीतल्या इतर गोष्टी तर आहेतच,.
तर या सगळ्या गृहितकांना आधार काय हे किंवा असे प्रश्न विचारले तर तो माणूस क्षणभरात "जे काही भारतीय असेल त्यावर थुंकणारा", "ज्या काही गोष्टी आपल्या आहेत त्याच वाईट दिसणारा आणि पाश्चिमात्यांचे सगळे काही चांगले दिसणारा", "मेकॉलेच्या परंपरेतला काळा इंग्रज" इत्यादी इत्यादी विशेषणांचा धनी होऊन जातो.
मला वाटते की सगळ्याच संस्कृतींमध्ये अधिक उणे आहे. जर एखाद्याला स्वतःच्या संस्कृती केवळ उणेच उणे दिसत असेल आणि चांगले आहे असे काही वाटतच नसेल तर त्याला काळा इंग्रज किंवा तत्सम विशेषणांनी संबोधणे चुकीचे ठरु नये.
संस्कृती घडत जाते आणि समाज सुद्धा. समाजाच्या जडण घडणीचे पण एक चक्र असते. ते चक्र जसे वर जाते तसे ते कधीतरी खाली पण येते. त्यामुळेच एकेकाळी अतिशय प्रगत असलेली इजिप्शियन आणी ग्रीक संस्कृती आज लयाला गेली आहे. एकेकाळी रानटी अवस्थेत असणारी ज्यु संस्कृती आता प्रगत झाली आहे तर त्या रानटीपणापासून फार दूर नसलेली रोमन संस्कृती आज युरोपीयन संस्कृतीच्या रुपात आपल्यासमोर उभी आहे. ती ही संस्कृतीच आहे. आपल्यासारखी नसेल समजा पण एक संस्कृतीच. त्यांच्या संस्कृतीच्या व्याख्या आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत इतकेच. फार जग नाही पाहिलेले मी. नवनवीन पुराणे प्रसवणार्या लोकांइतका महानही नाही. पण जे माहिती आहे त्यावरुन इतके नक्की सांगु शकतो की अमेरिकन संस्कृती तर या सर्वांहुनही निराळी आहे. प्रत्येकजण त्या त्या समाजातील रितीरिवाज सांभाळुन जगत असतो. पण होते काय की अचानक अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या काही महानतम लोकांना एकाएकी गोर्यांची संस्कृती ती काय श्रेष्ठ असे वाटायला लागते (क्लिंटन तुमच्या बद्दल नाही आहे हे किंवा तसे खास असे कोणाबद्द्दलही नाही. साधारण निरीक्षण आहे). आणि मग भारतीय संस्कृतीत काहीच चांगले दिसेनासे होते. हे असे कसे रे बाबा?
आजघडीला अमेरिकन आणि युरोपीयन समाज जास्त पुढारलेला नक्कीच आहे. मला नाही वाटत त्यावर कोणाला आक्षेप असु शकतो. पण त्या पुढारलेल्या समाजात सुद्धा इतिहासाचा अभिमान आहेच की. त्या इतिहासाचा जो आपल्या इतिहासापेक्षा नक्कीच निकृष्ट दर्जाचा आहे. तर मग तो अभिमान आपल्याला का नसावा?
आधीच म्हणल्याप्रमाणे हे एक चक्र आहे. त्या चक्राच्या उच्चावर आज पाश्चिमात्य आहेत. काल आपण होतो. उद्या कोणी अजुन असेल. कदाचित आपणही असु. तत्वज्ञान, भाषा, साहित्य, कला, विज्ञान, वैद्यकशास्त्र या सर्वात एकेकाळी आपण प्रगत होतो. कलौघात आपण माती खाल्ली. प्रगतीची कास सोडली. धड ना अध्यात्म जोपासले न विज्ञान. या सर्वाचा एकत्रित परिणाम असा झाला की आपली प्रगती खुंटली. आणि आज आपण इतरांच्या मागे आहोत. इनोव्हेशन असे जे म्हणतात ते आपल्याकडे फारसे होताना दिसत नाही. त्याचा बराच दोष शिक्षणपद्धतीलाही जातो आणि त्याचे श्रेय मला वाटते मेकॉलेकडेच जाते.
माझ्या जवळच्या नात्यात एक गृहस्थ असेच होते.अशांच्या प्रभावामुळे मी सुध्दा अनेक वर्षे अशाच गोष्टी बोलत असे. पण नंतर स्वत:चा विचार केल्यानंतर त्यातला फोलपणा मला जाणवला आणि या सगळ्या प्रवृत्तीचाच मला मनस्वी तिटकाराच नव्हे तर संताप आला.
म्हणजे असे बघा तुमचा अमेरिकन झाला. तुम्ही एकदम टोकाच्या निष्कर्षांप्रतीच पोचलात. जेव्हा तुम्ही त्या गृहस्थांच्या प्रभावाखाली होता तेव्हा तेच बरोबर वाटायचे आज तिरस्कार करणेच बरोबर वाटते. याउलट संस्कृतीचा अभिमान बाळगणारी माणसे किमान मध्यममार्गीय असतात असे मला वाटते. म्हणजे त्यांना इतिहासाचा अभिमानही असतो आणि वर्तमानाचे भानही, वर्तमान काळेकुळकुळीत आहे म्हणुन सोनेरी इतिहासाची लाज कशाला बाळगायची. लाज वाटायचीच झाल्यास (खरे म्हणजे त्याचीही गरज नाही) वर्तमानाची बाळगा कारण तो काही भूषणावह नाही. पण मग वर्तमान भूषणावह नसेल तर त्यासाठी सध्या जिवंत असलेली एक पिढीच कारणीभूत आहे. चरक, सुश्रुत, चाणक्य, कालिदास, राम, कृष्ण प्रभूतींनी येउन तुम्हाला माती खायला सांगितलेली नव्हती. ती तुम्ही स्वतःच खाल्ली. मग त्यांची लाज कशाला वाटते आहे? उलट त्यांच्यापासून प्रेरणा घ्या ना की जेव्हा जग माती खात होते तेव्हा ते प्रगत होते. अभिमान वाटला पाहिजे त्याचा. संताप कसला येतोय? ते प्रगत होते आणि आपण अडाणी निपजलो याचा?
माझ्या परिचयातले काही लोक जेव्हा अशा गोष्टी बोलू लागतात तेव्हा त्यांना बघून मला वाटते की जर उद्याला महंमद अली जीना जरी "भारतीय संस्कृती किती चांगली" असे तोंडदेखल्या बोलायला लागला तर ते पण अशांना योग्य वाटेल पण माझ्यासारखा कोणी जर काही प्रश्न विचारायला लागला तर मी "काळा इंग्रज" ठरायला मिनिटाचाही अवधी लागायचा नाही!!
आता हे बघा की भारतीय संस्कृती चांगली होती हे जर इतरांना कळत असेल पण आपले समजले जाणार्या लोकांनाच कळत नसेल तर त्रागा तो होणारच की हो. चुकीचे काय त्यात?
१. आमची संस्कृती किती चांगली, आमचे पूर्वज किती महान होते, सगळे शोध त्यांनी कसे लावले होते, "आपल्या" विविध चालीरितींमध्ये विज्ञान कसे आहे इत्यादी गोष्टींचा सतत विचार करून आणि बोलून नक्की काय फायदा होतो? जर का कोणी इंग्रज माणूस "एकेकाळी आमच्या लोकांनी साता समुद्रावर राज्य केले" याचा घोषा लावू लागला तर अशा माणसाला "आताचे काय" हा प्रश्न विचारायचा नाही का?या प्रश्नाचे उत्तर "हो" असेल तर या भारतीय संस्कृतीचा अभिमान धरणाऱ्यांना पण तोच प्रश्न का विचारू नये?
एक मिनिट. एकेकाळी आम्ही भिक्कार जुल्मी साम्राज्यवादी होतो हे सांगण्यात कसला आलाय अभिमान? आणि मूळात तो नसतो असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? इंग्रजांच्या साम्राज्यावरचा सुर्य एकेकाळी मावळायचा नाही असे इंग्रजांना शिकवत नाहीत की काय त्यांच्या शाळेत? दोन्ही महायुद्धात राणीची कनवाळू बाळे कशी जिंकली हे शिकवत नाहीत की काय त्यांच्याकडे. ऐकावे ते नवलच.
"पूर्वीच्या काळी आमच्याकडे सगळे होते" हा विचार करण्यात घालवला जातो त्याच्या १% वेळ जरी नंतरच्या काळात नक्की काय झाले म्हणून आपली पडझड झाली याचा dispassionately विचार करण्यात घालवला तर नक्कीच चित्र वेगळे दिसायला मदत होईल हे नक्कीच.
आता तुमच्याच शब्दात तुम्हाला विचारतो. कुठल्या गृहितकांवर बेतलेले आहे हे वक्तव्य? काही विदा आहे काय हातात?
पुराणातली वांगी पुराणात राहू द्या. आपण नंतरच्या काळात नक्की कुठे कमी पडलो हे शोधून काढून ते दोष दूर
करायचा प्रयत्न आपण कधी करणार?
म्हणजे नंतरच्या काळात कुठे कमी पडलो हे समजावुन घेण्यासाठी इतिहासाची लाज बाळगणे गरजेचे आहे की काय? इतिहासात आपण प्रगत होतो हे कळाल्याशिवाय मधल्या काळात आपण मागे पडलो हे कसे समजावुन घेता येइल? आणि जर एकेकाळी प्रगत होतो तर त्याचा अभिमान बाळगण्यात काय चूक. मला वाटते की गल्लत अशी होते आहे की काही लोक आपण मागे पडलो आहोत हे मान्यच करायला तयार नसता त्यामुळे सुधारणेला वाव नसतो. त्यांचे ब्रेनवॉशिंग गरजेचे आहे,. पण ज्यांना इतिहासाचा अभिमान असण्याबरोबर वर्तमानाचे भानही आहे असेच लोक बदल घडवु शकतात. केवळ वर्तमानाचे भान असणे उपयोगी नाही पडत.
की स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना असल्या गोष्टींचा विचार करायची गरज वाटत नाही? आणि जर का असे (अडचणीत टाकणारे) प्रश्न विचारणारे लोक क्षणभरात "काळे इंग्रज" ठरतात ते योग्य आहे का?
का याचे उत्तर दिल्यावरही माझेच ते खरे असे म्हटल्यावर काळा इंग्रज तरी का म्हणावे?
३. पाच-दहा हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आजच्या काळात कदाचित लागू ठरणार नाहीत. पण मग जे काही लिहून ठेवले आहे त्याचा अभ्यास करून जे relevant आहे तेवढे घेऊन ते पुढे न्यायचा प्रयत्न कोणी करत आहे का? त्यातूनही आजच्या विज्ञानाला न समजलेल्या कोणत्या गोष्टी पूर्वीच्या ग्रंथांमध्ये आधीच लिहून ठेवल्या आहेत हे जगापुढे कोणी आणायचा प्रयत्न करत आहे का?
अहो जर मूळात ते ग्रंथ उपयोगी आहेत हेच मान्य नसेल किंवा ते टाकाऊच वाटत असतील तर हे काम करणार कोण? आपल्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान असल्याशिवाय हे जमावे कसे?
४. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे "आपला धर्म" आणि "आपली संस्कृती" म्हणजे नक्की काय? माझ्यासाठी तरी जे जे काही मला पटते/भावते/आवडते ते माझे मग ते कुठूनही आलेले असू दे. "आपले ते चांगले" यापेक्षा "चांगले ते आपले व्हावे" असा प्रयत्न का नसतो?
असायलाच हवा आणि मला वाटते भारतीय समाजाने खासकरुन हिंदु समाजाने नेहमीच योग्य त्या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. हिंदु संस्कृती त्यामुळेच कोडिफाइड नाही. अगदी भगवदगीता सुद्धा स्टेटिक नाही आहे. धर्मग्रंथात लिहिलेले अमान्य केले तर शिरच्छेद करण्याची पद्धतही आपल्यात नाही. भारतातील मुस्लिम समाजही माझ्यामते तरी वैचारिक्ल दृष्ट्या मिडल ईस्ट पेक्षा कितीतरी पुढारलेला आहे. जुने तो सोने पण नवे ते माती असा अॅटिट्युडही नाहीच आहे.
५. मी अमक्या धर्मात/जातीत जन्माला आलो याचा अभिमान का धरावा? त्या धर्मात/जातीत जन्माला यावे यासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचे माझ्या तरी लक्षात नाही. आमच्या संस्थेत वसतीगृहाच्या एकूण २४ इमारती होत्या.त्यातील १९ क्रमांकाच्या इमारतीत मी राहत होतो. एकदा तिथे प्रवेश मिळाल्यावर संस्थाचालकांनी मला २४ पैकी कोणत्याही इमारतीत पाठविले असते. नेमकी तशीच गोष्ट जन्म घेण्याविषयी नाही का? मलाही जन्म कोणत्याही धर्मात/जातीत मिळाला असता. ज्याप्रमाणे "मी १९ क्रमांकाच्या इमारतीत राहत होतो" हा अभिमान धरणे हास्यास्पद आहे त्याचप्रमाणे धर्माचा/जातीचा अभिमान धरणे ही हास्यास्पद आहे असे मला वाटते.
जे तुम्हाला वाटते तेच इतरांना वाटावे असा अट्टाहास का? मी हिंदु आहे मी ब्राह्म्ण आहे मी महाराष्ट्रीयन आहे आणि त्याचा अभिमान असणे काहीच गैर नाही. मी स्टॅलिनचा किंवा हिटलरचा किंवा ओसामा बिन लादेनचा वंशज आहे हे सांगणे कदाचित अभिमानास्पद नसावे पण हिंदु अथवा ब्राह्मण अथवा मराठी असल्याचा अभिमान न बाळगण्याचे कारण दिसत नाही. माझा धर्म सोडुन इतर सर्व धर्म टाकाउ किंवा मराठी भाषा सोडुन इतर स गळ्या भाषा फालतू असा तर विचार नाही ना? मग झाले तर. मी माझ्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो , तु तुझ्या संस्कृतीचा बाळग. तुही शिवाजी मीही शिवाजी. मला नाही वाटत यात काही गैर आहे.
मला अशा भारतीय संस्कृती/धर्माच्या कट्टर अभिमान्याचा आलेला अनुभव सांगतो. माझाच धर्म सगळ्यात चांगला, माझीच संस्कृती सगळ्यात चांगली हा अभिमान माझाच पेशा (इंजिनिअरींग) सगळ्यात चांगला, त्यातही माझेच इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग सगळ्यात चांगले या पातळीवर गेला आणि त्या गृहस्थाने त्याच्या मुलाला आवड नसताना इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगला जायला लावले. तो बिचारा मुलगा गेली अनेक वर्षे त्याच्या वडिलांच्या या वृथा अभिमानामुळे आजही स्ट्रगल करतच आहे आणि त्याच्या हुषारीच्या आणि पात्रतेच्या मानाने त्याची achievement काहीच नाही. हा प्रकार अगदी जवळून बघितल्यानंतर या अभिमान प्रकरणाचा भयंकर संताप आला आहे मला.इतरांच्या आयुष्याचे नुकसान करणारा कसला आलाय अभिमान? चुलीत घाला त्या अभिमानाला!!
मला वाटते हा त्या माणसाचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता. असे बघा माझे आज्जी आजोबा आणि माझे आई वडील अश्या सर्वांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. पण त्यांनी कधी मला अमूक तमूकच कर असा आग्रह नाही धरला. जे आवडेल ते कर अशी मोकळीक दिली. म्हणजे सरळ आहे की हा अट्टाहास संस्कृतीच्या अभिमानातुन येत नाही तर मानसिक विकृतीमुळे येतो. तसे असल्यास संस्कृतीच्या नावाने खापर कशाला फोडता? सावरकरांना आपल्या इतिहासाचा जाज्वल्य अभिमान होता पण ते विज्ञानवादी होते हे मान्य करताच ना? मग संस्कृतीचा अभिमान असणे वाईट नाहीच याचा अर्थ.
असे प्रश्न विचारायची माझी पहिली वेळ नाही. विविध फोरमवर इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून (अगदी मिसळपाववर सुध्दा) मी हे प्रश्न वेळोवेळी विचारले आहेत. त्याची उत्तरे मला कोणाही भारतीय संस्कृतीवाल्याने दिलेली नाहीत. काळा इंग्रजच नव्हे तर "तू ख्रिस्ती का मुसलमान" हा प्रश्नही मला विचारला गेला आहे. माझा या भारतीय संस्कृतीवाल्यांपासून भ्रमनिरास झाला तो अशामुळेच.
हरकत नाही. पुढच्या वेळेस पासून किमान तुम्हाला असे वाटणार नाही. बादवे मी तुम्हाला काळा इंग्रजही म्हणत नाही किंवा ख्रिस्ती अथवा मुसलमानही नाही. अतिशय पक्के विचार असलेला आणि ते बदलु न इच्छिणारी एक हुषार व्यक्ती एवढेच म्हणेन. तुम्ही या विषयावर खुप विचार केलेला दिसतोय पण दुर्दैवाने एकांगी. दुर्दैवाने तुम्ही त्या इलेक्र्टिकल इंजिनीयरच्या उदाहरणाचे जनरलायझेशन केले आणि आसपास दिसणारी सामान्य पण आपल्या मुद्द्यांबद्द्दल आग्रही नसणारी माणसे दुर्लक्षिली. जरा निरखुन बघा त्यांनाही त्यांच्ज्या संस्कृतीचा अभिमान असेलच पण ती तुमच्या ओळखीतल्या इंजिनीयर सारखी हट्टी आणि दुराग्रहीए नसतील.
असो.
राम कृष्णांचा परंपरेतला काळा भारतीय
मृत्युंजय
18 Apr 2012 - 10:43 pm | क्लिंटन
जर का तथाकथित संस्कृतीवाद्यांनी केलेल्या दाव्यांना "नक्की आधार काय" हा प्रश्न विचारला किंवा एखादा शोध लागल्यानंतर पश्चातबुध्दी म्हणून "आमच्या ग्रंथांमध्ये हे आधीच लिहून ठेवले आहे" असे म्हटल्यावर मग "ती माहिती यापूर्वी का उघड केली नाहीत किंवा आधुनिक विज्ञानाला न कळलेले असे आणखी काय जुन्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवले आहे?" असे प्रश्न विचारले तर याचा अर्थ "आपल्या" संस्कृतीत उणेच उणे असे वाटते किंवा काही चांगले नाही असे वाटते असा बादरायण संबंध कुठून जोडला जातो हेच कळत नाही. म्हणजे यांनी काहीही दावे करावेत, "आमच्या" संस्कृतीच्या नावावर काहीही खपवावे आणि इतरांनी त्याला साधे प्रश्नही विचारू नयेत असा अर्थ का? आणि कोणतेही प्रश्न विचारले तरी "कुतुहल नाही केवळ कुशंका आहेत", "माहिती मिळवायची प्रामाणिक इच्छा नाही तर टर उडवायची आहे" ही बोंब करायला परत हे मोकळे!!
दुसरे म्हणजे "आमच्या" संस्कृतीचे कौतुक मला तरी अजिबात सांगू नका. व्यक्तिश: माझ्यासाठी तरी जे जे मला पटते/आवडते/भावते ते कुठूनही आलेले असले तरी माझेच असते. तेव्हा इतरांची "आमच्या" संस्कृतीची व्याख्या आणि माझी व्याख्या यात खूप फरक आहे.
कोणी सांगितले मला चरक,सुश्रूत, चाणक्य,कालिदास आणि भगवद्गीता सांगणारा कृष्ण यांची लाज वाटते? (रामाचा उल्लेख यात मुद्दामून केलेला नाही पण तो या चर्चेचा मुद्दा नसल्यामुळे त्यावर लिहित नाही). मी भगवद्गीतेवरील थोडीफार पुस्तके वाचली आहेत इतकीच माझी आणि वरील लीस्टमधील महापुरूषांची ओळख आहे. चरक आणि सुश्रूत हे आयुर्वेदाचार्य होते, चाणक्याने अर्थशास्त्र लिहिले आणि चंद्रगुप्ताला सम्राट बनविण्यात महत्वाचा वाटा उचलला आणि कालिदास हा मेघदूतासारखी काव्ये लिहिणारा महाकवी होता यापलीकडे मला यांच्याविषयी काहीही माहित नाही.पण एक गोष्ट अगदी निक्षून सांगतो.एखाद्या व्यक्तीमत्वाविषयी मला अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास करताना त्या व्यक्तीचा देश/धर्म/जात/भाषा इत्यादी गोष्टींचा मी अजिबात विचार करत नाही तर त्या व्यक्तीचे कार्य आणि त्यामागील प्रेरणा मला भावते की नाही याच गोष्टीचा मी विचार करतो. त्यामुळे केवळ भारतीय होते याच कारणाने चरक et al. मला अधिक जवळचे वाटतील याची शक्यता अगदी शून्य. आता यातून मला जर चरक et al. विषयी लाज वाटते असा अर्थ काढत असाल तर खुषाल काढा.
Exactly. माझा मुद्दा नेमका हाच की आपण नक्की कुठे कमी पडलो याची कारणे शोधून काढायचे सोडून आपण जर वेदकालीन जंगलात भटकायला लागलो तर त्याचा उपयोग काय?पण हे भारतीय संस्कृतीवादी लोक कायमच भूतकाळात अडकून पडलेले असतात. त्यांना त्यातून बाहेर कोण आणणार?
काय सांगता?आपल्याकडे असलेली "गप्प बसा" संस्कृती इनोव्हेशनच्या मार्गातला फार मोठा अडसर आहे. ती नक्की कधी रूढ झाली याची कल्पना नाही.प्राचीन काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे असे म्हणतात.या गप्प बसा संस्कृतीने सोन्याचा तर सोडाच कोळशाचा पण धूर निघायची शक्यता नाही तेव्हा ही संस्कृती भारतात नंतरच्या काळात रूढ झाली असावी.मी स्वत: अमेरिकेत ५-६ वर्षे राहिलेलो आहे. तिथे मुलांना असलेले निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य बघून मला तर खूप हेवा वाटायचा त्यांचा. आपल्याकडे काहीही करायचे झाले तरी इतरांना (read मोठ्यांना आणि "जुन्या वळणाच्या" लोकांना) काय वाटेल हाच विचार जास्त करायला लागतो!! आता हा मुद्दा मांडला तर भारतीय संस्कृतीवादी "बघा तिकडचे कसे सगळे चांगले वाटते आणि इकडचे सगळे टाकाऊ वाटते" ही हाकाटी करायला मोकळे!! दुसरे म्हणजे शिक्षणपध्दतीचे म्हणाल तर दोष त्यात आहेच. आणि शिक्षणपध्दतीत सगळा सावळा गोंधळ आपल्या लोकांनीच घातला आहे. भारतात जे काही मोठे शास्त्रज्ञ झाले (सी.व्ही.रामन, जगदीश चंद्र बोस, मेघनाद साहा, सत्येंद्रनाथ बोस, होमी भाभा इत्यादी) इंग्रज काळातच झाले. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, आशुतोष मुखर्जी यासारखे शास्त्रज्ञ नाही तरी मोठे academicians पण त्याच काळातले. आपल्या पिढीत त्या तोडीचे शास्त्रज्ञ होत नसतील तर तो दोष मेकॉलेचा नाही तर शिक्षण पध्दतीत प्रत्येक ठिकाणी सावळागोंधळ घालणाऱ्या आपल्याच लोकांचा आहे.
ग्रंथ टाकाऊ वाटायच्या मुद्द्यावर माझे उत्तर वरीलप्रमाणेच. आणि इतिहासाचा जाज्वल्य अभिमान म्हणत असाल तर माझ्या मते तो जाज्वल्य अभिमान त्रासदायकच. असा अभिमान आला की वस्तुनिष्ठ अभ्यास करताना लागणारा तटस्थपणा गेलाच म्हणून समजा आणि जाज्वल्य अभिमान असला तर अशा लोकांच्या हातून मिशीला पीळ देण्याव्यतिरिक्त फारसे काही होणार नाही याची खूणगाठ बांधा.मुळात आपले नक्की काय कमी पडले हा विचार तरी करू शकतात का हे जाज्वल्य अभिमानी?
माझेच उदाहरण द्यायचे झाले तर करियरच्या बाबतीत मी खूप भरकटलो होतो.एक वेळ अशी आली होती की जर क्लिंटन आयुष्यात मोठे failure बनणार अशी पैज कोणी लावली असती तर ती पैज आपण अगदी सहजच जिंकू असे त्याला वाटले असते.अशावेळी माझ्या करियरची गाडी परत रूळावर आणण्यासाठी माझे नक्की काय चुकले हा वस्तुनिष्ठ अभ्यास आणि आत्मपरिक्षण गरजेचे होते की मी शाळेत असताना मिळविलेल्या शैक्षणिक यशाबद्दल जाज्वल्य अभिमान?एक गोष्ट सांगतो की मी त्यावेळी जर असा फालतूचा अभिमान मी ठेवला असता तर माझी गाडी रूळावर येऊच शकली नसती आणि आता मी हे ज्या लॅपटॉपवर टाईप करत आहे तो विकत घेणेही मला शक्य झाले नसते.
बाकी इतर सगळ्या मुद्द्यांना उत्तरे देत राहिलो तर त्याच त्याच मुद्द्यांची पुनरावृती होईल तेव्हा एकाच मुद्द्याला उत्तर देतो आणि आवरते घेतो.
मी विचार बदलायला तयार नाही? काय सांगता? मी मिसळपाववरचेच माझ्याच जुन्या लेखनाचे दुवे देतो. आणि माझी ती भूमिका चुकीची होती हे मला जाणवल्यानंतर माझ्यातला फरकही सांगतो:
१. २६/११ च्या हल्ल्यानंतर मी लिहिलेले ही एक इष्टापत्ती ठरो हे मिपा संपादकीय. त्या हल्ल्यानंतर आलेला तात्कालिक संतापाचा भर ओसरल्यानंतर माझा मीच विचार केला तेव्हा असे आपण असा कसा विचार करू शकलो असेच मला वाटले. अर्थात आपल्या चुका पुस्तक लिहून जगजाहीर करायला महात्मा गांधींकडे असलेला प्रांजळपणा माझ्याकडे नव्हता म्हणून तसे मी जाहिरपणे मान्य केले नाही.पण माझ्या वैचारिक प्रवासात तो २६/११ चा हल्ला खरोखरच इष्टापत्ती ठरला हे नक्की. ही गोष्ट नोव्हेंबर २००८ मधली. त्यानंतर दीड-एक वर्षात २२ जून १८९७ ही मिसळपाववरील चर्चा मी माझे विचार (माझी चूक लक्षात आल्यानंतर) बदलले याचा पुरावा नाहीत का?
२. एकेकाळी गांधींचे नाव ऐकताच माझ्या तळपायाची आग मस्तकात जात असे. तिथपासूनच गांधींना ’टकल्या" पासून "महात्मा गांधी" असे म्हणण्यापर्यंतचा प्रवासच बरेच काही सांगून जातो. त्याविषयी आणखी काही लिहायला नको.
तेव्हा "आपले विचार बदलायला तयार नसलेली व्यक्ती" असे तरी कृपया म्हणू नका.जसे अधिक जग बघितले, इतरांचे ऐकून पोपटपंची करायचे बंद केले आणि स्वत:चा विचार करून मते बनवली तेव्हा हा बदल घडला इतकेच.
19 Apr 2012 - 7:55 am | चित्रा
तुमचे या चर्चेतले काही प्रतिसाद पाहून मलाही राहवले नाही. :-) (चर्चा मला विशेष महत्त्वाची वाटली नाही).
> चाणक्य,कालिदास आणि भगवद्गीता सांगणारा कृष्ण
अरे बापरे.
चाणक्य? आणि कृष्ण? आणि गीता? (आंतरजालाचा) अभ्यास कमी पडला वाटते.
असो. चेष्टा करण्याचा हेतू नाही.
>आपण नक्की कुठे कमी पडलो याची कारणे शोधून काढायचे सोडून आपण जर वेदकालीन जंगलात >भटकायला लागलो तर त्याचा उपयोग काय?पण हे भारतीय संस्कृतीवादी लोक कायमच भूतकाळात >अडकून पडलेले असतात. त्यांना त्यातून बाहेर कोण आणणार?
कुठे नक्की कमी पडलो याची कारणे नक्कीच बघायला हवी, चुका दिसल्या तर दुरुस्तही कराव्या. पण भूतकाळात अडकणारी माणसे ही वेगवेगळ्या पद्धतीने भूतकाळात वावरत असतात असे वाटते.
काहीजण भूतकाळच सुंदर होता म्हणून अडकलेली असतात तर काहीजण भूतकाळात घडले ते सर्वच वाईट होते म्हणून सध्याच्या हवेत तरंगत असतात.
>आपल्याकडे काहीही करायचे झाले तरी इतरांना (read मोठ्यांना आणि "जुन्या वळणाच्या" लोकांना) >काय वाटेल हाच विचार जास्त करायला लागतो!!
पटले नाही. ज्यांना हवे ते करायचे आहे ते तसे करतातच. अशांचे कोणी अडवत नाही, आणि अडवू शकत नाही. सगळे राजकारणात आलेले लोक पहा. बरेवाईट सोडून दिले तरी त्यांना हवे ते करतात.
आईवडिलांनी मुलांना आपल्या धाकात, किंवा कंट्रोलमध्ये ठेवले आहे असे आईबाप बरेच आढळतील पण ते जुन्या वळणाचेच असतात म्हणून कोणी सांगितले? उगाच सर्वाचे खापर जुन्या पद्धतींवर फोडत बसण्यात काय हशील आहे? सध्या सत्तरीच्या घरात असलेल्या कुठल्या "जुनाट" आईवडिलांनी नवीन सुविधा तयार करू नको, शोध लावू नको, पाप लागेल, म्हणून आपल्या इंजिनीअर मुलाला सांगितले आहे? कायतरीच काय? आजच्या अनेक जुन्या वळणाच्या वडिलधार्यांनी मुलांचे गरजेनुसार पैशामागे धावणे स्विकारलेले आहे, मुलांची लग्ने, डिवोर्स, सर्व काही इच्छा असून/नसून स्विकारलेले आहेच ना?
>एक गोष्ट सांगतो की मी त्यावेळी जर असा फालतूचा अभिमान मी ठेवला असता तर माझी गाडी >रूळावर येऊच शकली नसती आणि आता मी हे ज्या लॅपटॉपवर टाईप करत आहे तो विकत घेणेही >मला शक्य झाले नसते.
अभिनंदन. तुमचे स्वतःकडे वस्तुनिष्ठ नजरेने बघणे कौतुकास्पद आहे. शारुख खाननेही अलिकडे येल मध्ये आला तेव्हा लोकांनी पैशाची सोय आधी लावावी, आणि मग आवडीच्या गोष्टी कराव्यात असा सल्ला दिला आहे.
पण, हे पुढचे काय आहे?
>मला अशा भारतीय संस्कृती/धर्माच्या कट्टर अभिमान्याचा आलेला अनुभव सांगतो. माझाच धर्म >सगळ्यात चांगला, माझीच संस्कृती सगळ्यात चांगली हा अभिमान माझाच पेशा (इंजिनिअरींग) >सगळ्यात चांगला, त्यातही माझेच इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग सगळ्यात चांगले या पातळीवर गेला >आणि त्या गृहस्थाने त्याच्या मुलाला आवड नसताना इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगला जायला लावले. तो >बिचारा मुलगा गेली अनेक वर्षे त्याच्या वडिलांच्या या वृथा अभिमानामुळे आजही स्ट्रगल करतच आहे >आणि त्याच्या हुषारीच्या आणि पात्रतेच्या मानाने त्याची achievement काहीच नाही. हा प्रकार अगदी >जवळून बघितल्यानंतर या अभिमान प्रकरणाचा भयंकर संताप आला आहे मला.इतरांच्या आयुष्याचे >नुकसान करणारा कसला आलाय अभिमान? चुलीत घाला त्या अभिमानाला!!
दोन गोष्टींची गल्लत करत आहात असे वाटते. त्या मुलाचे वडील धर्माभिमानी असले तरी त्यांच्या चुकीच्या व्यावसायिक मार्गदर्शनाचे खापर त्यांच्या तुम्हाला (परिचित असलेल्या) धर्माभिमानावर फोडत आहात असे वाटते. मी अगदी अजिबात निधर्मी लोकांनाही आपल्या मुलांना मर्यादित नजरेतून मुलांवर पुढे मर्यादा आणू शकणारे व्यावसायिक मार्गदर्शन करताना पाहिले आहे. त्याचे खापर त्यांच्या निधर्मीपणावर फोडण्यात जसा अर्थ नाही, तसाच धर्माभिमान्यांच्या इतर चुकांचे खापर त्यांच्या धर्माभिमानावर फोडण्यात अर्थ नाही.
तुमचा संतापही विशेष कळला नाही. त्या वडिलांचा सल्ला काळाला अनुसरून नसावा, पण तुम्हाला त्यांनी केलेल्या चुकीच्या मार्गदर्शनाबद्दल फारतर इतक्या वर्षांनंतर त्यांची कीव यावी. अजूनही एवढा संताप आणि राग कशाला? त्याला स्ट्रगल करावे लागावे ही वडिलांची इच्छा नसावी असे वाटते. कितीही जुनाट, बुरसटलेल्या विचारांचे असोत.
शेवटचे म्हणजे ज्यांची आयुष्ये अशा चुकांनी तुमच्या मते "वाया" गेली आहेत त्यांनी (तुमचेच म्हणणे पुढे चालवायचे तर) तुमचे तरी का ऐकावे? तुम्ही सध्या यशस्वी आहात म्हणून? तुम्ही कशावरून चुकीचे ठरणार नाहीत? (ह. घ्या).
19 Apr 2012 - 8:33 am | क्लिंटन
योगायोगाने आताच सकाळचा प्राणायाम करून बघायला आलो तर हा प्रतिसाद आलेला. हा प्राणायामही "तुमच्या" किंवा "आपल्या" भारतीय संस्कृतीतला बरं का आणि भूतकाळातला! (आणि त्या प्राणायामाचा उगम भारतात न होता सोमालिया किंवा बुर्किना फासो मध्ये झाला असता/असला तरी मला त्याच्या उगमात काहीही इंटरेस्ट नाही तर तो प्राणायाम माझ्यासाठी उपयुक्त ठरला आहे ही गोष्टच माझ्यासाठी महत्वाची). तेव्हा मी काही प्रश्न विचारले तर "भूतकाळ सगळा वाईट" असे मला म्हणायचे आहे असा अर्थ करून घेतल्यास त्याला माझा नाइलाज आहे.
(आणि असा अर्थ करून घेत असलेल्यांना माझा हा शेवटचा प्रतिसाद. दरवेळी तीच तीच गोष्ट लिहायचा कंटाळा आला आहे).
हीच तर मजा असते. असे नुकसान झाले तरी मोठी मंडळी "मी तुझ्या हिताचेच सांगितले" हे म्हणून कधीच पसार होऊ शकतात आणि त्याचे परिणाम मात्र त्या मुलांना भोगायला लागतात (कदाचित आयुष्यभरासाठी). माझा संबंधित नातलग मिपाचाच सदस्य आहे आणि मीच त्याला मिपाविषयी सांगितले. अर्थात त्याचे नाव उघड करावे असे त्याला नक्कीच वाटत नसणार म्हणून त्या सदस्याचे टोपणनाव मी इथे लिहित नाही. पण त्याचा स्ट्रगल मी अगदी जवळून बघितला आहे. आणि झाल्या प्रकाराचा मला तरी संताप आल्यावाचून राहिलेला नाही. भारतीय कुटुंबांमध्ये अशी सक्ती झाल्यास त्याला तितक्या सहजपणे डिफाय करता येत नाही पण पाश्चिमात्य "संस्कृतीत" ते करणे अधिक शक्य असते याविषयी फारसे मतभेद असू नयेत. आणि मला तिकडला हा प्रकार जास्त अपील होतो. आता यावर मला काळा इंग्रज म्हणायचे असेल तर खुषाल म्हणा.
कोणी सांगितले की मी म्हणत आहे की अशांनी माझे ऐकावे? त्यांनी स्वतःच्या मनाला जे योग्य वाटते तेच करावे. (थ्री इडियटमधला संवाद आठवा: आमीर खान करिनाच्या बहिणीच्या पोटातल्या बाळाला सांगतो-- तू तेरा दिल केहता है वही कर). पण जे काही होईल त्याची जबाबदारी पूर्णपणे आपल्यावर घ्यायची हिंमत असली पाहिजे. तशी नसेल तर मात्र असल्या भानगडीत न पडलेले अधिक चांगले. माझे तरी तत्व आहे-- मी शंभर चुका करेन पण those mistakes should be attributable only to me and nobody else. इतरांचे ऐकून खड्ड्यात पडण्यापेक्षा मी माझ्या मार्गानेच खड्ड्यात पडेन. तेव्हा इतरांनी माझे ऐकावे असे मी अजिबात म्हणत नाही.
19 Apr 2012 - 5:41 pm | चित्रा
>तेव्हा मी काही प्रश्न विचारले तर "भूतकाळ सगळा वाईट" असे मला म्हणायचे आहे असा अर्थ करून >घेतल्यास त्याला माझा नाइलाज आहे.
प्रश्न विचारायला मी कधी नाही म्हटले असे दिसले? आणि तुमच्याबद्दल वैयक्तिक हे बोलणेच नाही, तेव्हा हे काय आहे तेही मला कळले नाही.
>असे नुकसान झाले तरी मोठी मंडळी "मी तुझ्या हिताचेच सांगितले" हे म्हणून कधीच पसार होऊ >शकतात आणि त्याचे परिणाम मात्र त्या मुलांना भोगायला लागतात (कदाचित >आयुष्यभरासाठी).भारतीय कुटुंबांमध्ये अशी सक्ती झाल्यास त्याला तितक्या सहजपणे डिफाय करता येत >नाही पण पाश्चिमात्य "संस्कृतीत" ते करणे अधिक शक्य असते याविषयी फारसे मतभेद असू नयेत.
परत तेच.
ज्यांना आईवडिलांच्या बर्यावाईट कुठच्याही सल्ल्याविरुद्ध बंड करायचे आहे ते कसेही करून ते करतात. पौर्वात्य असोत का पाश्चिमात्य. ज्यांना तसे करण्याची हिंमत होत नाही, ते इतरांच्या भितीने करतात एवढेच नाही तर स्वतःत बदल घडवून आणण्याची त्यांची तयारी नसते म्हणून. हाही आईवडिलांच्या शिकवणुकीचा परिणाम आहे असे कोणी म्हणू शकते, पण वयात आलेल्या मुलांना जर आपले लग्न करण्याचे सुचते, घर घेण्याचे, कर्ज घेण्याचे सुचते तर ते असे सर्व इतरही स्वतःला आहे त्या खाईतून उठवण्याचे प्रयत्न करू शकतात असे वाटते. ते करत नसले तर तो त्यांचा प्रश्न आहे.
तुम्ही ज्याला "स्ट्रगल" म्हणता ते करणारी शेकडो मुले मला आजूबाजूला दिसतात. आईवडिल शिकलेले नाहीत, त्यांच्याकडे चार पैसे गाठीशी नाहीत म्हणून मुलांना शिकवू शकत नाहीत. म्हणून मुलांनी आईवडिलांना आयुष्यभर दोष देत राहणे हा आततायीपणा आहे, तुम्ही तरी तो करू नये.
तुमच्या रागाचा रोख अजूनही त्या जुन्या पिढीतल्या वडिलांवर आहे ते माझ्या दृष्टीने चुकीचे आहे एवढेच म्हणते.
मित्रांना चुकीचे सल्ले देणारे तरुणही आजूबाजूला दिसतात, म्हणून तरुण पिढी मूर्ख आहे असे म्हणायचे का? तसेच हे आहे.
बाकी पाश्चिमात्य संस्कृतीत जर काही सर्वात चांगले असले तर ते आपल्या निर्णयांचे परिणाम शेवटी आपल्यावर होणार आहेत ही कल्पना.
19 Apr 2012 - 9:52 pm | क्लिंटन
देअर यु गो.
आणि काही प्रश्न विचारले म्हणजे भारतीय संस्कृतीतले सगळे वाईट दिसते, मुद्दामून सँपलींग चुकीचेच केले आणि बरोबर सँपल मुद्दामून खड्यासारखे वगळले, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या काही महानतम लोकांना एकाएकी गोर्यांची संस्कृती ती काय श्रेष्ठ असे वाटायला लागते, आपल्याकडे 'कुतुहल' नसते, केवळ 'कुशंका' असतात आणि त्यालाच शोधक वृत्ती असे लेबल लावायचे असते! इत्यादी इत्यादी जनरलायझेशनही चुकीचे आहे हे त्याच दमात म्हणणार का तुम्ही? काही प्रश्न उभे केले तर मुद्दामून सँपलींग चुकीचेच केले किंवा तत्सम काही लिहायचे आणि वर असे लिहिताना "मी व्यक्तिशः तुम्हाला काहीच म्हणत नाही" असे म्हटले तर त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? असो.
बाकी जनरलायझेशन करू नये यात वादच नाही.मी मुळात लिहिलेल्या गोष्टीत त्या व्यक्तीविषयीचा माझा संताप ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि ती अयोग्य होती याचे मलाही भान आहे. पण ज्या आवेशाने त्या जनरलायझेशनला विरोध केला गेला तेवढाच विरोध प्रश्न विचारत असलेल्या समोरच्या माणसाच्या उद्देशालाच खोटे पाडणे, त्याला भारतातले काहीच चांगले दिसत नाही वगैरे प्रकारच्या स्टेटमेन्ट्सना का केला जात नाही? असो.
मी इंटरनेट वापरायला लागल्यापासून म्हणजे २००० सालापासून मी विविध फोरमवर हेच प्रश्न उभे केले आहेत. तेव्हा I am veteran at this game. पूर्वी युजनेट म्हणून डिस्कशन फोरम होते (त्यानंतर ते गुगलने विकत घेतले). तिथेही मला तेव्हापासून नेमका हाच अनुभव आला. त्यातील जय महाराज या नावाने लिखाण करणाऱ्या व्यक्तीबरोबर मी अगदी भीडलो होतो. शेवटी त्यानेच मला विचारले होते की "तू मुस्लिम की ख्रिस्ती"? माझा भ्रमनिरास तेव्हा व्हायला लागला.
या सगळ्या चर्चेत अर्धवटराव यांचा sampling चा प्रतिसाद हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे हे इथेच लिहितो. गेल्या १२ वर्षात विविध चर्चेत मला कदाचित चुकीचे सँपलींग मिळाले असेल आणि बरोबर सँपलींग मिळायची मात्र नक्कीच वाट बघत आहे. असो.
माझ्या प्रतिसादावर उपप्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद. माझ्याकडून या चर्चेला पूर्णविराम (आणि त्याबद्दल ज्या मिपाकरांना हायसे वाटेल त्यांना आधीच धन्यवाद).
20 Apr 2012 - 2:48 am | चित्रा
आपल्याकडे 'कुतुहल' नसते, केवळ 'कुशंका' असतात आणि त्यालाच शोधक वृत्ती असे लेबल लावायचे असते! इत्यादी इत्यादी जनरलायझेशनही चुकीचे आहे हे त्याच दमात म्हणणार का तुम्ही?
हो, म्हणेन. पण या चर्चेत भाग घेणार्या प्रत्येकाचे काय काय चूक आहे हे दाखवायला लागले तर मला वेळ पुरायचा नाही.
वर असे लिहिताना "मी व्यक्तिशः तुम्हाला काहीच म्हणत नाही" असे म्हटले तर त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? असो.
तुम्ही वाचत आहात का नीट? वरील वाक्य मी लिहीलेले नाही. मी तुम्हाला व्यक्तिशः काय बोलले? तुम्ही दोन गोष्टींची गल्लत करत आहात असे म्हटले तर मी एकवेळ चूक असेन, तुम्हाला व्यक्तिगत काय बोलले हे समजून घ्यायला मात्र आवडेल.
ज्या आवेशाने त्या जनरलायझेशनला विरोध केला गेला तेवढाच विरोध प्रश्न विचारत असलेल्या समोरच्या माणसाच्या उद्देशालाच खोटे पाडणे, त्याला भारतातले काहीच चांगले दिसत नाही वगैरे प्रकारच्या स्टेटमेन्ट्सना का केला जात नाही? असो.
हे मी करायला हवे होते असे म्हणणे आहे का?
अनेक संकेतस्थळांवर, माझ्या मते मी चुकीची नसताना लोक मला तोंडाला येईल ते वाट्टेल तसे, आरोप करत बोलले आहेत. अशा वेळी अनेक शहाणेसुरते, मला ज्यांच्याबद्दल कौतुक/ आदर वाटतो असे लोक बघ्याची का भूमिका घेत असतील असा मलाही प्रश्न पडलेला आहे. पण असा प्रश्न विचारावासा वाटला असूनही अलिकडे कधीही विचारलेला आठवत नाही. कारण एकतर अनेकदा लोकांना आपापली कामे असतात, प्रायॉरिटी/ आवडी वेगळ्या असतात, किंवा त्या क्षणी काय त्यांच्या मनाला खटकलेले असते ते मला वाटत असते त्यापेक्षा वेगळे असू शकत असते. किंवा अगदीच विरोधी विचार करायचा तर कधी बरे आहे ना, तेवढीच गंमत बघावी, असाही विचार असू शकतो. :-) दुसरे म्हणजे कोणी माझा डीफेन्स करण्याची गरज मला वाटत नाही म्हणून मी असा प्रश्न विचारत नाही. तसेच आंतरजालावर बरीच वर्षे काढलेली आहेत म्हणूनही काही गोष्टींबद्दल काही वाटेनासे झाले आहे.
तरी तुमचे जनरलायजेशन ज्याने केले त्यांनी बरोबर नाही केले असे म्हणते.
> माझा भ्रमनिरास तेव्हा व्हायला लागला.
मला अमेरिकेत नवीनवी असताना पुढचा प्रश्न काय असणार याची ढिम्म कल्पना नसताना मलाही तू मुसलमान का हिंदू असा प्रश्न एका इराणी मुसलमान मुलाने माझ्या इराणीच अॅडवायजरसमोर बैठकीत विचारला होता त्याची आठवण झाली. सो वॉट? या वाक्याचा आणि चर्चेचा काय संबंध आहे कळले नाही, पण ते असो.
17 Apr 2012 - 11:10 pm | चित्रगुप्त
वेदात काय काय आहे याची संपूर्ण यादी द्यावी, म्हणजे खरोखर नवे शोध कोणते, तेही नक्की कळेल.
18 Apr 2012 - 1:19 am | पिवळा डांबिस
आजच्या सकाळच्या रामपाराला येका भल्यामोठ्या बोईंग ७४७ च्या पाठंगुळीवर बसूनशान त्ये शिंचं डिस्कव्हरी उडतांना टीवीवर पघितलं....
म्हनलं त्ये आपल्या पौरानिक इमानाचं काय जाहालं, शेवटी गावलं का नाय ते पघायला आल्तू!!!
अजून शोधतासां म्हंताय?
चालू द्या, चालू द्या....
:)
18 Apr 2012 - 1:46 am | Nile
आमच्या पुराणात पण पुष्पकावर ऐरावताला बसवून नेल्याचे उल्लेख आहेत की. ऐरावताला पृथ्वीच्या वातावरणात घुसल्यावर सर्दी व्हायची म्हणून त्याला पुष्पकात बसवायचे असं एकदम क्लियरकट लिहलेलं आहे ढगपुराणात.
18 Apr 2012 - 10:54 am | शिल्पा ब
या धाग्यांमुळे एक झालं की मी आता युट्युबवर महाभारत बघायला लागलेय. :)
18 Apr 2012 - 11:14 pm | हुप्प्या
स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा, वंशाचा, जातीचा अभिमान बाळगणे हे अगदी नैसर्गिक आहे. केवळ हिंदूंचाच संकुचितपणा आहे असे नाही. एखादा समूह जेव्हा जिद्दीने एखादे अवघड काम करतो त्या वेळेस असा अभिमान ही एक प्रेरणा होते. अनेक युद्धे अशा प्रेरणेमुळे जिंकली आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यातले मावळे जर असे म्हणाले असते की आदिलशहा काय, निजामशहा काय, औरंगजेब काय आणि शिवाजी काय सगळे सारखेच. केवळ योगायोगाने मी मराठा मावळा आहे. तर ते शून्यातून राज्य उभे करु शकले असते का? भवानी, शंभू महादेव असल्या देवांचे नाव घेऊन युद्धाला सज्ज होणे हे घडले असते का? मुळात देशाकरता आपला जीव पणाला लावावा असे वाटले असते का?
तेव्हा योगायोगाचा भाग खरा असला तरी आपण ज्या समूहाचा भाग असतो त्या समूहाशी आपले नाते निर्माण करुन त्याला आपले मानण्याची मनुष्याची एक मूलभूत प्रेरणा आहे. कळप करुन रहाणार्या, तुलनेने दुबळ्या प्राण्याकरता ही प्रेरणा अत्यावश्यक होती. आज कदाचित ती तितकी आवश्यक नसेल पण लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर बनलेला हा पिंड इतक्या थोड्या वेळात नष्ट होणार नाही. तेव्हा त्याला तुच्छ न मानता विधायक वळण देणे उचित ठरेल.
अगदी वैयक्तिक पातळीवरही माणूस आपली जनुके पुढच्या पिढीत पोचतील ह्या दृष्टीनेच वागत असतो. समृद्धी मिळावी, चांगली बायको मिळावी, मुले व्हावीत, त्याचे हित व्हावे हा एक स्वार्थीपणाच आहे आणि तो नैसर्गिक आहे. मला जो जीन पूल मिळाला आहे तो योगायोगाने मिळाला आहे. मी काही तो कमावलेला नाही त्यामुळे माझ्या बायकोला होणारी मुले माझ्याकडून झाली काय आणि दुसर्या कोणाकडून झाली काय, काय फरक पडतो? असा आततायी विचार बहुधा जाती, धर्म, राज्य, देश ह्यांचा सीमा विसरलेले पुरोगामीही बहुधा करणार नाहीत.
19 Apr 2012 - 12:33 am | बॅटमॅन
>>मला जो जीन पूल मिळाला आहे तो योगायोगाने मिळाला आहे. मी काही तो कमावलेला नाही त्यामुळे माझ्या बायकोला होणारी मुले माझ्याकडून झाली काय आणि दुसर्या कोणाकडून झाली काय, काय फरक पडतो? असा आततायी विचार बहुधा जाती, धर्म, राज्य, देश ह्यांचा सीमा विसरलेले पुरोगामीही बहुधा करणार नाहीत.
स्पॉट ऑन, बुल्स आय वगैरे जे काय म्हणतात ते केला बघा तुम्ही!!! मस्त ठासलीत $%%% ची !! जियो!!!!
आता हा प्रतिसाद इन जनरलः
आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा की नाही, बाळगावा तर तो किती, सध्याच्या काळात निव्वळ तो बाळगणे कसे मूर्खपणाचे आहे, उगीच परधार्जिण्या विचारसर्णिच्या आधारी जाऊन जे जे भारतीय त्याला झोडपणे कसे गैर, इ.इ.इ. तर्हेतर्हेचे प्रतिसाद वाचले. सर्वांना एक विचारावेसे वाटते, की हे काय चाल्लंय नक्की? मूळ प्रश्न " प्राचीन भारतात विमाने तयार करण्याची टेक्नॉलॉजी होती की नव्हती?" हा साधासुधा प्रश्न आहे. पुरावे द्या, नसतील तर तसे सांगा, निष्कर्ष काढा काय तो की मग विषय कट. त्याला हे असले गावभरचे फाटे कशाला फोडताहेत विनाकारणी सर्वजण??
(साध्या बायनरी डिसिजन व्हेरिएबल चे अॅनॉलॉगीकरण झालेले पाहून वैतागलेला)
19 Apr 2012 - 4:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे
वेलकम टू गोवा, सिंघम !!!
19 Apr 2012 - 6:05 pm | बॅटमॅन
आली रे आली आता तुझी बारी आली ;)
सटकली रे माझी :D
19 Apr 2012 - 7:58 am | मदनबाण
हा धागा अजुन चालु आहे तर !
पुराणात विमान हाच शब्द का वापरला गेला असेल बरं ? असा सध्या विचार करतोय ! ;)
बाकी चालु द्या...
अवांतरः- च्यवनमुनींच्या वॄधत्वाचा नाश करण्यासाठी अश्विनीकुमारांनी बनवलेले च्यवनप्राश आजच्या घडीला च्यवनप्राश याच नावाने उपलब्ध आहे याचे मला नवल वाटते. ;)
19 Apr 2012 - 4:43 pm | नितिन थत्ते
>>पुराणात विमान हाच शब्द का वापरला गेला असेल बरं ?
आँ? अहो पुराणात/जुन्या वाङ्मयात विमान हा शब्द वापरला आहे म्हणून आज उडणार्या यंत्राला "आपण" विमान म्हणतो. विमान शब्द आहे म्हणजे पुराणकाळात आजच्या सारखे विमान होते असा होत नाही.
उदा. वाहनाला रथ असा शब्द पूर्वी वापरला आहे म्हणून टोयोटाच्या वाहनातून काढलेल्या यात्रेलाही रथयात्रा म्हणतात. रबरी टायर असलेल्या डिझेलवर चालणार्या वाहनाला आज रथ म्हणतात याचा अर्थ जुन्या काळात रथ या शब्दाने असे रबरी टायर असलेले डिझेलवर चालणारे वाहन होते असा होऊ नये.
20 Apr 2012 - 7:51 am | मदनबाण
रबरी टायर असलेल्या डिझेलवर चालणार्या वाहनाला आज रथ म्हणतात याचा अर्थ जुन्या काळात रथ या शब्दाने असे रबरी टायर असलेले डिझेलवर चालणारे वाहन होते असा होऊ नये.
असं पण असतय काय ! असो असो...
अवांतर :--- रामदास स्वामींने हनुमान स्तोत्र रचले आहे त्याच्या ओळी उगाच आठवल्या !
अणुपासुनी ब्रम्हांडाएवढा होत जातसे, तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे || ११||
19 Apr 2012 - 4:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मदनबाणा, हल्लीच्या साहित्यात उडत्या तबकड्यांचा उल्लेख असतो, पण मला अजून एकही दिसली नाही.
जुल व्हर्न ने पाणबुडीच्या शोधाआधी "20 thousand leagues under the sea" लिहिले. पण म्हणून तेव्हा पाणबुड्या होत्या असे सिद्ध होता नाही ना. नुसता उल्लेख असून काय होते ?
19 Apr 2012 - 6:10 pm | यकु
पुराणातली विमाने नेमकी कोणत्या दिशेने उडत आहेत ?
नुसतेच 4 नवे प्रतिसाद, 6 नवे प्रतिसाद दिसत आहेत आणि धागा उघडला की मात्र पार बाजार उठलेला दिसत आहे... कोणता प्रतिसाद नवा आहे हे दिसत नाहीय :(
19 Apr 2012 - 6:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अरे धागा दोन पानी झाला की असेच होते. पहिल्या पानावरचे नवीन प्रतिसाद दिसतात, पुढील पानावर जाईपर्यंत, तुम्ही तो धागा वाचला आहे अशी नोंद होते, त्यामुळे सगळे प्रतिसाद वाचले गेले आहेत असे गृहीत धरून मार्क केले जातात (असे माझे निरीक्षण + अंदाज)
19 Apr 2012 - 6:39 pm | यकु
धन्यवाद विमे,
किमान तुझा हा उपप्रतिसाद तरी दिसला एकदाचा :D
20 Apr 2012 - 4:28 am | बॅटमॅन
वर्तकांची संशोधने या नावाखाली जें दिलेले आहे ते म्हणजे मुख्यत: खालील ४ पैकी १ आहे:
१. एखादे महाभारतसारखे पुस्तक मुळातून वाचले की लक्षात येते चायला बाकी इतर पुस्तकातून वगैरे जें वाचले ते तर बकवास आहे. हे फीलिंग संशोधन म्हणून मांडले आहे.
२. कैच्याकै निष्कर्ष, वडाची साल पिंपळाला.
३. शुद्ध भाकडकथा.
४. क्षुल्लक गोष्टींना महत्वाचे संशोधन म्हणून मांडले आहे/दुसर्यांचे संशोधन स्वत:चे म्हणून मांडले आहे.
आता १३० संशोधनांची चिरफाड करू:
क्र. १ ते १०:
प्रामुख्याने २ ऱ्या व ३ ऱ्या प्रकारचे मिश्रण. क्र. ८ व ९ म्हणजे वर्तकांचे कर्तृत्व अजिबात नाही. क्र. १० निखळ विनोदी. "very scientific knowledge in Geeta etc. discovered" म्हणजे काय? इतके संशोधन केले म्हणता तर काय केले याबद्दल इतकी संदिग्धता का? तसेच क्र.१ व २ शंकास्पद, बाकी सर्व जवळपास शुद्ध भाकडकथा.
क्र. ११ ते २०:
विशेषत: क्र. १५ ते १९ म्हणजे tax free करमणूक : बिनबुडाची आणि म्हणूनच इतकी आग्रही विधाने पाहिली की मस्त मजा येते. क्र. २० हे वर्तकांचे कर्तृत्व नाही, ते सर्वमान्य विधान इतर संशोधकांच्या कार्याचा परिपाक आहे. क्र.१२ ते १४ शंकास्पद किंवा इतरांचे ढापून स्वत:च्या नावावर खपवलेले. क्र.११ मजेशीर.
क्र. २१ ते ३०:
क्र. २१ इतरांचे ढापलेले. क्र.२२ ते २४ हहपुवा. क्र.३० - शिवाजी, बाजीराव, ज्ञानेश्वर वगैरेंची कुंडली बनवली तर काय मोठा तीर मारला? क्र. २५ असू शकते, क्र. २६ शंकास्पद, क्र.२७- निव्वळ लॉजिक ने जो निष्कर्ष लगेच काढता येतो त्याचे काय कौतुक/स्तोम? क्र.२८-हहपुवा, क्र.२९-संदिग्धपानाचा कळस.
क्र. ३१ ते ४०:
क्र. ३७- काय कौतुक? उद्या आम्हीपण कार्टून प्रमाणे विश्व डिफ़ाईन करतो. क्र.४०-असेल बुवा. बाकी सर्व: महाभारत, रामायण वगैरे ग्रंथांच्या मूळ संहिता वाचल्या की क्षणार्धात जें कळते, त्याला संशोधन म्हणायचे धाडस केले आहे.
क्र. ४१ ते ५०:
क्र. ४१, ४२- हहपुवा. क्र. ४५-४६: असेल. खगोलशास्त्राला विसंगत असे काही वाटत नाही यात आत्ता तरी. क्र. ४३- तेच-महाभारत वाचले, कोपर्यातला उल्लेख काढला झालं. आम्हीपण हे असेच करायचो हो ;) क्र.४४-वर्णाश्रमधर्माबद्दल रम्य पण शाळकरी विचार. जरा एक थोडं कुरुंदकर वाच किरे.. क्र.४७-हहपुवा. द्वारकेत डायनासोरची अंडी सापडली म्हणून कृष्णाने मारलेले जनावर डायनासोर.आता उद्या पुण्यात डायनासोर सापडला तर तानाजीची यशवंती काय डायनासोरीण होती म्हणणार काय? क्र.४८-५०:हहपुवा किंवा साध्या सरळ गोष्टींचे रिसर्च म्हणून सादरीकरण.
क्र.५१ ते ६०:
क्र.५६ मधील अगस्तिना विजेचे ज्ञान होते हे सांगणारा तो चुकारतट्टू श्लोक लई आधीपासून इतरांनी प्रकाशात आणला आहे, वर्तकांचा त्याच्याशी संबंधच काय? ची: क्र. ५७ मध्ये २ संकल्पनांमधील साधर्म्य दाखविले की त्या सारख्याच होत्या हे सांगण्याचा हट्टाग्रह तर क्र. ५८ मध्ये सत्य घटनेचा बादरायणी संबंध लावला आहे.बाकी साधारणपणे एकजात हहपुवा.
क्र. ६१ ते ७०:
क्र. ६१ व ६२ ओके, कारण कैच्याकै दावे नई वाटत.क्र. ६४ सहमत आहे-तो ग्रंथ वाचवतो, इन्टरेस्टिंग आहे. बाकी उर्वरित मूळ ग्रंथ वाचले की "युरेका" असे ओरडावेसे वाटते तसा बराचसा आरडाओरडा आहे. क्र. ६८ म्हणजे तर विनोदाची परमावधी आहे: म्हणे सावरकर त्यांच्या आयुष्यात गीतेप्रमाणे वागले हे सिद्ध केले. वागणार सावरकर, सिद्ध करणार वर्तक, काय मोठे तीर मारले? निरर्थक वेळेचा अपव्यय आहे हा तर.
क्र. ७१ ते ८०:
क्र.७९-८०:महाभारत वाचले असे ओरडून सांगितले फक्त. क्र.७१-७३: महा प्रचंड हहपुवा. क्र.७४,७७,७८: काय कौतुक? क्र.७५-७६:पास.असेलही नसेलही.
क्र. ८१-९०:
रामायण व महाभारत वाचले असे ओरडून सांगितले फक्त. डायरीतील नोंदी वाटाव्या अशा त्रोटक नोंदी आहेत आणि आव मात्र मोठे संशोधन केल्याचा आणला आहे.
क्र . ९१-१००:
क्र. ८१-९० प्रमाणेच.
क्र. १०१-११०:
पैकी क्र. १०१ ते १०६: वरील प्रमाणेच. क्र. १०७-हे त्यांचे"च" कर्तृत्व नाही. असल्यास संदर्भ द्या, शेरा बदलतो. क्र.१०८-११०:पास. पैकी १०८ खरे असू शकेल रीमोटली तरी. बाकीचे नै माहिती.
क्र. १११-१२०:
क्र.१११-खरे आहे, पण देवनागरीच काय, जगातील कोणत्याही लिपीबद्दल असे करता येते. आणि देवनागरी ही काही १००% फोनेटिक लिपी नाहीये-जगातील कुठलीच लिपी नाहीये तशी. हे माहिती नाही म्हणजे हद्द झाली. क्र.११२- हहपुवा: गटणेस्टाईल निबंध . क्र. ११७-हहपुवा. बाकी पास. क्र.११८ मधील पक्षी सील बद्दल उत्सुक.
क्र.१२१-१३०:
क्र. १२१: "have done some research about ghosts and existence after death and convinced about both". संदिग्धतेची हद्द, हहपुवा.
क्र. १२४ हे क्र. १२१ रिपीट झाले आहे. क्र. १२२-१२३: ब्वोर्र्र.... बाकी एकजात हहपुवा. क्र.१२८: आर्य हे मुळाचे उत्तर ध्रुवावर राहणारे होते हे टिळकांचे मत रद्द झाल्याला जमाना झाला आणि तसे सांगणारे वर्तक हे पहिले अथवा एकमेव देखील नाहीत. उगीच कशाला टिमकी? आर्क्टिक होम ऑफ वेदाज वाचून मलापण जें कळले,ते नवीन संशोधन म्हणून मांडण्याचा अट्टाहास का?(असले मुद्दे तर भारत इतिहास संधोधन मंडळातील चर्चेत लोक क्षणोक्षणी मांडत/खंडत असतात.) क्र.१२६: ब्वोर्र..क्र.१२७: अहो बास की आता कितीदा तेच तेच! बिचारे आर्य! कुठून ऋग्वेद रचला असे वाटत असेल ऋषींना हे असले चारवीत(चुकून लिहिले असले तरी बरोबर बसते नैका? म्हणजे चारवीत लांब पानाचे) चर्वण हेहेहे ;) क्र. १२५, १३०: पास. क्र. १२९ विनोदी:"brought forward BOLDLY the Ishavasya Upanishad's philosophy" इ.इ. पुन्हा एकदा गटणे बघा.(तुम्ही आणि सानेगुरुजी माझे आदर्श लेखक आहात)
सारांश:
वर्तकांना थोर संशोधक वगैरे म्हणण्याची घोडचूक नका करू अजिबात. माणूस म्हणून ते नक्की चांगलेच आहेत( अनुभव आहे-आमच्या घरी ते आले होते), पण संशोधन बरेच गंडलेले आहे.
20 Apr 2012 - 10:45 am | मृत्युन्जय
आता प्रतिसाद क्रमांक परत तपासून पहा बरे ;)
20 Apr 2012 - 4:41 am | सुनील
श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या एका उत्खननात एअर लंकेचे दोन बोर्डिंग पास मिळाले आहेत. पासवर १ अप्रिल इ.स. पूर्व ५००० अशी तारीख स्पष्टपणे लिहिलेली आहे. आसन क्रमांक १-A हे श्रीमती सीता यांच्यासाठी तर १३-A ते १३-K ही सर्व आसने श्रीयुत रावण यांच्या नावे असल्याचे समजते.
हे बोर्डिंग पास भूर्जपत्रांवर लिहिले असून त्यांची लिपी ही एक कूट तामिळ लिपी असल्याचे समजते. ती वाचण्यासाठी भारतातून काही नाडी वाचकांना खास आमंत्रित केले होते.
भारत आणि श्रीलंका यांच्यात तेव्हापासूनच विमान सेवा होती हे आता पूर्णपणे सिद्ध झाले आहे. मात्र ही सेवा फारच महाग असून फक्त उच्च्भ्रूच त्याचा लाभ घेत असावेत. सामान्यांना सागरी सेतूचा वापर करावा लागत होता.
जसा जुन्या ग्रंथात वर्णिलेल्या औषधी वनस्पतींचा विदा
साठवला गेला आहे, तसाच पुराणकाळी आम्ही लावलेल्या अशा विविध शोधांचा विदादेखिल साठवून ठेवावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे, असे कळते.
20 Apr 2012 - 5:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे आताचे काँकोर्ड आणि साधे एअरबस म्हणजे तेव्हाचे विमान आणि सेतू असंच का हो सुनीलशेट? का त्यात आर्थिक आरक्षण नसून राजघराण्यात जन्म अथवा लग्न असा आरक्षणाचा निकष होता?
बॅटमॅनचा वरचा आख्खाच प्रतिसाद यूसलेस आहे, पण चुकारतट्टू हा शब्द अती-यूसलेस आहे.
20 Apr 2012 - 2:31 pm | बॅटमॅन
>>बॅटमॅनचा वरचा आख्खाच प्रतिसाद यूसलेस आहे, पण चुकारतट्टू हा शब्द अती-यूसलेस आहे.
कसा काय ब्वॉ?? माझ्या प्रतिसादात चूक असेल तर दाखवा, बाकी मुद्द्यांवरती नंतर बोलू.
20 Apr 2012 - 2:45 pm | पुण्याचे वटवाघूळ
अहो नासा भारतीय भाषांचा अभ्यास करते (त्यातूनच संगणकासाठी संस्कृत ही सगळ्यात योग्य भाषा आहे हे कळले ना?), पुण्यातील वर्तकांचे सूक्ष्मदेहाने मंगळ, शनी, गुरू आणि आणखी कुठे कुठे जाऊन आल्याचे दावे पडताळते इतकेच काय तर भारतातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेऊन कोण शास्त्रज्ञ बनण्यास योग्य आहे हे पण बघते (सौरभ सिंग नावाच्या उत्तर प्रदेशातील बलियाच्या मुलाने हा दावा काही वर्षांपूर्वी केला होता). नासाकडे इतकी महत्वाची कामे आहेत हे संस्कृतीद्वेष्ट्यांना समजत कसे नाही? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. पुराणात लिहिलेल्या गोष्टींना आव्हान द्यायची हिंमतच कसी होते तुम्हा लोकांची? संस्कृतीद्वेष्टे कुठचे!!
20 Apr 2012 - 3:19 pm | कपिलमुनी
दिल्ली मधला लोह स्तंभ हा प्राचीन भारतीय धातुशास्त्राची साक्ष देत आजही उभा आहे ....
20 Apr 2012 - 3:39 pm | कवितानागेश
साक्ष वगरै ठिक आहे हो.
पण अभिमान बाळगलात तर याद राखा!! ;)
20 Apr 2012 - 3:50 pm | परिकथेतील राजकुमार
स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान नसलेल्या आणि आपल्या निष्ठा परदेशांच्या पायात वाहिलेल्या ह्या बेशरम लोकांना चाबकाने मारले पाहिजे.
अहो पार्याचे इंधन काय घेऊन बसलात ? वनस्पतीच्या रसापासून आणि पाण्यापासून गाड्या पळवणारे शास्त्रज्ञ ह्याच मातीतले आहेत हे विसरु नका. काही परदेशी इंधन कंपन्यानी हा शोध दाबून टाकला आणि शोधकर्त्यांना धाक दाखवून गप्प केले.
सुपरमॅन सुपरमॅन करत आनंदविभोर होऊन उड्या मारणारे आमच्या हनुमानाच्या पराक्रमांना मात्र नाके मुरडतात. बिचारा देशी पडला ना तो. त्याचे कौतुक काय करायचे ?
आणि हो तो कोण तो तुमचा अती लोकप्रिय वैग्रे वैग्रे असलेला 'हॅरी पॉटर' आहे ना, ते पात्र तर सरळ सरळ आमच्या 'हरी प्रसाद' वरुन उचललेले आहे. खोटे वाटले तर आमच्या डाण्रावांना विचारा. पुराव्यानिशी साबीत करतील ते.
21 Apr 2012 - 9:56 am | पुण्याचे वटवाघूळ
हा १९८ वा प्रतिसाद. आणखी दोन प्रतिसाद देऊन द्विशतक झळकावा रे कोणीतरी.
21 Apr 2012 - 10:08 am | पैसा
चर्चेचा सारांश आणि त्याचा निष्कर्ष सांगा रे कोणीतरी!
21 Apr 2012 - 11:21 am | कवितानागेश
कळविण्यास अत्यंत खेद :) वाटतो की, काही अपरिहार्य ;) कारणांमुळे सारांश काढण्याइतकी महत्त्वाची चर्चा या ठिकाणी होउ शकलेली नाही!
( घरी जा रे पोरांनो. :) )
21 Apr 2012 - 11:45 am | पैसा
म्हणजे आता मला एक तर सगळ्या प्रतिक्रिया वाचाव्या लागणार आणि तुमच्या "नाजुका लाईन्सचं काय झालं" हेही गुलदस्त्यातच राहिलं तर!
21 Apr 2012 - 5:34 pm | विकास
चर्चेचा सारांश आणि त्याचा निष्कर्ष सांगा रे कोणीतरी!
ही तर केवळ चित्रपटांची नावे आहेत... सारांश ह्या हिंदी आणि निष्कर्ष या क्न्नड चित्रपटांचा पौराणिक विमानांशी काय संबंध?
21 Apr 2012 - 11:05 am | शिल्पा ब
अगंबै!! हा घ्या २००वा.
21 Apr 2012 - 3:15 pm | पुण्याचे वटवाघूळ
द्विशतकाबद्दल सर्वांचे अभिनंदन.
पण एक प्रश्नः या उत्कंठावर्धक चर्चेची सुरवात करणारे "आनन्दा" कुठे गायब झाले? की ते पुराणकालीन विमानात बसून पसार झाले?
25 Apr 2012 - 3:03 pm | शाहिर
http://www.world-mysteries.com/sar_11.htm
व अशा अनेक उदाहरणांची ( http://www.world-mysteries.com/ ) उत्तरे नसतात ...
कदाचित ९० % उदाहरणे ताणलेली असतील..पण जी १०% उदाहरणे असतात ती नीट तपासली तर बरेच काही गवसते ...
पण जसे सनातनी डोल्यावर पुराणांचा पडदा टाकतात आणि सर्व होते म्हणतात तसेच विज्ञान वादी सुद्धा त्यांच्या उदाहरणांची टींगल करतात ..पण पुराव्यानिशी खोडत नाही...
उदा :http://www.world-mysteries.com/sar_1.htm
हा नकाशा
आणि
विमाने
http://www.world-mysteries.com/sar_7.htm
फक्त भारत च नाही तर इतर देशामध्ये सुद्धा
25 Apr 2012 - 2:59 pm | अत्रुप्त आत्मा
लैच ऊंच उडालं की या धाग्याचं इमान ;-)
27 Jul 2022 - 3:28 pm | सर टोबी
या धाग्यावरील चर्चा आज वाचली आणि केवळ आश्चर्य वाटले. एखाद्या सामाजिक स्थित्यंतरासाठी दहा वर्षाचा काळ हा प्रगती अथवा अधोगती मोजण्यासाठी फार कमी आहे. म्हणजे या काळात आपण अधोगतीने जात असल्यास हि अधोगती समाजाला पेलवणार नाही इतक्या वेगाने होत आहे असे खेदाने म्हणावे लागेल.
या धाग्यात प्रगतिशील, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्यांची फुरोगामी, लिब्रान्डु अशी संभावना झाली नाही किंवा हिंदू असण्याची लाज वाटते का असा मुजोरपणाचा प्रश्न विचारला गेला नाही. सद्य काळात येता जाता द्वेषाच्या पिंक टाकणारे अथवा गरळ ओकणारे प्रसिध्ध आइडी देखील त्या दिवसांमध्ये बरेच सभ्य प्रतिसाद देत होते असे दिसते.
जाता जाता: माशेलकरांच्या हळद विषयक बौद्धिक स्वामित्वाविषयी देवदत्त दाभोलकर, जे स्वतः एक संशोधक आहेत, खिल्ली उडवित असत. अंटार्क्टिकावर संशोधन करण्यासाठी उभारलेल्या लाकडी इमारतींना तेथील तीव्र सूर्यप्रकाशामुळे आग लागू नये असे वार्निश तयार करण्याची जबाबदारी सोडून तुलनेने निरुपयोगी (हळदीचा त्वचेवरील उपचारात जंतुनाशक म्हणून उपयोग सिध्ध्द करणे, ज्या साठी पर्यायी उपचार अगोदरच ज्ञात आहेत) संशोधन करण्याचं काम माशेलकरांनी केले असा गंभीर आक्षेप त्यांनी घेतला होता.
27 Jul 2022 - 4:17 pm | Trump
जबरदस्त चर्चा आहे.