दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.
हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..!
राजा वदला कशी बिनसली "न्युक्लिअर डील" ची भाषा.
माझ्या नशीबासवे खेळती या "पंज्याच्या रेषा.
त्या राणीच्या डोळा पण ना दाटून आले पाणी ..! ..१
तिला विचारी राजा खासदार कसे फोडावे ?
का डाव्यांनी पाठिंब्याचे हात असे सोडावे ?
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी..! ..२
राणी वदली बघत एकटक युपीकडच्या वाटा.
उद्या पहाटे अमरसिंग अन मुलायमाला गाठा.
अन राजाला लगेच पटली "मायाजाल" निशाणी..! ..३
त्या राणीने मिटळे डोळे "क्रॉस व्होटिंग" होताना.
त्या राजाचा भाव वाढला गीत तिचे गाताना.
विरोधकांच्या मुखात उरली "सिंग इज किंग" विराणी..! ..४
दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.
हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..!
-- अभिजीत दाते
प्रतिक्रिया
31 Jul 2008 - 2:10 pm | झकासराव
चपखल विडंबन :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
31 Jul 2008 - 8:46 pm | प्राजु
लयीत एकदम पर्फेक्ट....
तुझ्या बुद्धीला सलाम... :)
राणी वदली बघत एकटक युपीकडच्या वाटा.
उद्या पहाटे अमरसिंग अन मुलायमाला गाठा.
अन राजाला लगेच पटली "मायाजाल" निशाणी..! ..३
त्या राणीने मिटळे डोळे "क्रॉस व्होटिंग" होताना.
त्या राजाचा भाव वाढला गीत तिचे गाताना.
विरोधकांच्या मुखात उरली "सिंग इज किंग" विराणी..! ..४
हे म्हणजे तर कहर आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Jul 2008 - 8:51 pm | चतुरंग
प्रासंगिक विडंबन चपखल!!
(स्वगत - अभिजिताची आणि केशवटुकाराची लावून द्यावी का आपसात? दोघांची पिसं झडली की विडंबनं टाकायला आपण मोकळे! :P )
चतुरंग
31 Jul 2008 - 8:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त जमलंय ... लयीत बसलंय आणि अर्थपूर्णही झालंय
अदिती
1 Aug 2008 - 12:30 am | विसोबा खेचर
ताज्या घटनेवर मार्मिक भाष्य करणारे लै भारी विडंबन! अतिशय आवडले! :)
अभिजिता, जियो..!
1 Aug 2008 - 12:36 am | विकास
एकदम भारी!
1 Aug 2008 - 8:08 am | फटू
मस्तच रे अभिजीत...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
1 Aug 2008 - 7:53 pm | अविनाश ओगले
झ... का..... स.........!