मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...

संकेता's picture
संकेता in जनातलं, मनातलं
1 Aug 2008 - 12:30 pm

मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...

कधी मी वारयाची झुलूक असते
तर कधी बेफाम वारा असते

कधी मी पावसाची हलकी सर असते
तर कधी समुद्रची लाट असते

कधी मी डोलनारे कणिस असते
तर कधी खम्बिर तरु असते

कधी मी शांत नदी असते
तर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असते

मी तो सुर आहे

जो मनाला दिलासा देतो,
तर कधी हुरहुर लावतो

बस आणि काय सांगू
सगलच लिहिता येत नाही
म्हनून म्हणते
मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...

मांडणीविचार

प्रतिक्रिया

पावसाची परी's picture

1 Aug 2008 - 1:52 pm | पावसाची परी

अतिशय सुन्दर!
माझ्याच मनातल्या भावनान्ना शब्द दिल्याबद्दल खुप खुप आभारी :)
खर तर मी मि पा वर ख फ वरच येते फक्त ...पण टायटल बघितल म्हणुन तुझी कविता ओपन केली.
खुपच आवड्ली
:)

टारझन's picture

1 Aug 2008 - 3:25 pm | टारझन

परी खरच फक्त ख.फ. वर येते... पण तुमची कविता ईतकी भारी की ,, ना तिने केवळ परीला भुरळ पाडी .. पण आमच्या सारख्या अरसिक टग्यांना पण कविता लय आवडी..

टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी तर जा घरी

पारिजातक's picture

1 Aug 2008 - 2:04 pm | पारिजातक

छान कविता!!! संकेता!! आणि मिपावर स्वागत !!!

पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

अनिल हटेला's picture

1 Aug 2008 - 2:43 pm | अनिल हटेला

अप्रतीम !!!
मी तो सुर आहे

जो मनाला दिलासा देतो,
तर कधी हुरहुर लावतो

एकद॑म झकास !!

अजुन ही कविता वाचायला आवडतील !!!

अवान्तर : ही कला जन्मजातच असते वाटत.आपल्याला नाय जमायचे इतक सुन्दर लिहायला !!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विसोबा खेचर's picture

2 Aug 2008 - 1:40 pm | विसोबा खेचर

बस आणि काय सांगू
सगलच लिहिता येत नाही
म्हनून म्हणते
मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही...

बरं बरं, राहू द्या. नकाच सांगू! :)

बाय द वे, तुम्ही कश्याही असलात तरी गद्य, पद्य विभाग निवडतांना नीट काळजी घ्या म्हण्जे झालं! :)