तो काहीसा अबोल विषेशतः हळव्या विषयांवर
ती बडबड करणारी विषेशतः हळव्या विषयांवर
तो 'दील और दिमाग़ से' आयुष्याबद्दल व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असणारा
ती फक्त 'दील से' आयुष्याकडे बघत जगण्यात दंग असणारी
तो कलासक्त, आस्वादी, बंधने झुगारुन काहीसा बेधुंद, आसक्तीने आयुष्य जगणारा
ती नातेवाइक, मुले, समाज... काय म्हणेल ह्या विचाराने हैराण होत आयुष्य जगणारी
तो काहीसा हळवा, बराचसा माघार घेणारा पण कधी कधी आक्रमक होणारा
ती हळवेपणाचा आव आणून टोचून बोलून घायाळ करणारी
तो नाजूक आठवणींच्या वलयात गुरफटून, गालातल्या गालात हसून आनंद मिळवणारा
ती कसला विचार करतोय कोण जाणॆ?’ असे म्हणून आपल्याच विश्वात आनंदणारी
तो एकांतात, नाजूक क्षणी, नाजूक क्षण वेचून आठवणींच्या कप्प्यात साठवण्याचा कसोशिने प्रयत्न करणारा
ती एकांतात, नाजूक क्षणी 'तुझे माझ्यावर खरेच प्रेम आहे ना रे'? असे विचारून धुंदी उतरवणारी
तो अचानक उत्कटतेने तीला कवेत घेउन, चुंबनांची बरसात करून घुसमटून टाकावे असा विचार करणारा
ती वेळे काळाचे भानच नाही, जनाची नाही तर मनाची तरी असे म्हणून रंगाचा बेरंग करणारी
तो त्याच्यातल्या उणिवा तीने भरून काढून त्याला साथ द्यावी असे वाटणारा, पण हे तीला कसे समजवून सांगावे ह्या विचारांनी घुसमटणारा
ती सगळे मलाच बघावे लागते, तो कधीतरी मला समजून घेइल, ह्या एकांगी विचारांनी घुसमटून जाणारी
तो कधी-कधी हे सगळे असह्य होउन भांड-भांड भांडणारा
ती तेवढ्याच आक्रमकतेने भांड-भांड भांडणारी
तो नंतर माघार घेउन तीला रंगात आणून खुलवणारा
ती समजूतदारपणे, खुषीने रंगात येउन खुलणारी
तो तीच्यावाचून आयुष्य अपूर्ण आहे हे जाणून तीच्यावर मनापासून प्रेम करणारा
ती त्याच्यावाचून आयुष्य अपूर्ण आहे हे जाणून त्याच्यावर तीतकेच मनापासून प्रेम करणारी
प्रतिक्रिया
10 Jul 2011 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तो तिच्यापेक्षा बरा आहे एवढं मात्र कळतं. :)
-दिलीप बिरुटे
11 Jul 2011 - 9:42 am | निवेदिता-ताई
:)
11 Jul 2011 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार
ह्याला विजोड म्हणावे का पूरक ?
11 Jul 2011 - 1:29 pm | सोत्रि
परा,
विजोड जरी असले तरीही घट्ट प्रेमाची जाणिव एकमेकांना पूरक बनवते.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत :)
- (पूरक) सोकाजी
11 Jul 2011 - 2:23 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी.
शब्दांमधून त्यांच्यातले प्रेम जाणवत आहेच. फक्त ह्या जोडीकडे कुठल्या नजरेने बघावे असा प्रश्न पडला होता.
अवांतर :- हे वाचून काहीही संबंध नसलेल्या संदीप खरेंच्या 'परस्परांना त्रास , तरीही परस्परांविण ना गत्यंतर' ह्या ओळी उगाच आठवुन गेल्या.
सध्या विविध लेखन प्रकारात तुम्ही उतरताना बघून आम्हाला असुरक्षिततेची भावना येऊ लागली आहे ;)
(इथे हलकटपणे विविध लेखन प्रकारत यशस्वीपणे उतरत आहात हे वाक्य टाळलेले आहे.)
12 Jul 2011 - 2:09 pm | सोत्रि
ह्या वेळी हा हलकट्पणा खपवून घेतला गेल्या आहे, पुढ्च्या वेळी खपवून घेतला जाणार नाही अशी ताकीद आत्ताच देउन ठेवतो आहे :)
12 Jul 2011 - 2:40 pm | धमाल मुलगा
सक्त हा शब्द राहिलाय की हलकटपणानं गाळलाय? ;)
शिवाय ह्यानंतर कडक निषेध, सक्त इशारा वगैरे सरकारी प्रवासही असेलच ना?
11 Jul 2011 - 1:03 pm | michmadhura
अव्यक्त भावना असतात ह्या.
दोघांचा मूळ स्वभाव वेगळा असला की असतं असं नातं दोघांमधे, पण त्यात प्रेमही असतंच ना !
ते प्रेमच दोघांना घट्ट बांधून ठेवतं, एकमेकांसोबत आयुष्यभर.
प्रकटन खूप आवडलं.
11 Jul 2011 - 1:23 pm | सोत्रि
मधुरा,
प्रकटनामागच्या माझी मनोभुमिका अचुक पकडल्याबद्दल मनापासून धन्यावाद!
प्रतिसादातील तुमच्या शब्दा-शब्दाशी सहमत.
- (अव्यक्त ) सोकजी
11 Jul 2011 - 2:02 pm | गणेशा
मुक्तक मनापासुन आवडले ..
असेच लिहित रहा... वाचत आहे...
11 Jul 2011 - 2:03 pm | गणेशा
मुक्तक मनापासुन आवडले ..
असेच लिहित रहा... वाचत आहे...
11 Jul 2011 - 3:33 pm | धमाल मुलगा
काय रियलिस्टिक ष्टोरी आहे राव. ;)
11 Jul 2011 - 3:34 pm | धमाल मुलगा
काय रियलिस्टिक ष्टोरी आहे राव. ;)
11 Jul 2011 - 3:53 pm | मितभाषी
:)
12 Jul 2011 - 9:42 am | प्राजक्ता पवार
प्रकटन आवडले :)
12 Jul 2011 - 10:05 am | विजुभाऊ
पूरक हे बरेचदा विजोड असू शकते.
सुंदर वाइनच्या बाटलीला कॉर्कचे बूच लावलेले असते.
मला माझ्याच एका लेखाची आठवण झाली "चांगल्या झाडावर माकड बसते"
10 Apr 2012 - 9:30 pm | जेनी...
वॉव ......
फक्त इतकेच
अप्रतिम ...
फक्त इतकेच
सुंदर ...
फक्त इतकेच
अफलातुन ....
फक्त इतकेच
अस काहि वाचायला जि मजा आहे ना ती
ती मजाच न्यारि ,,,,सोकाजि तुमि लिहिता राव लयच भारि ;)
10 Apr 2012 - 9:44 pm | रेवती
मस्तच! बाकी, तुम्ही चेन्नैला एकटेच मूव्ह झालेले दिसताय.;)
10 Apr 2012 - 10:20 pm | चाफा
सोकाजीराव, मस्तच,
विजोडपणात जास्त प्रेम असतं असं माझं वैयक्तीक मत :)
10 Apr 2012 - 10:23 pm | यकु
+१
स आणि ह आणि म आणि त म्हणजेच सहमत!
10 Apr 2012 - 11:46 pm | पैसा
सोत्रि, आणखी काय काय लिहितो रे? सध्या तुला हे विषय जास्त सुचतील आणखी. मग परिणामी दारवांवरचे लेखही! ;)
11 Apr 2012 - 12:30 am | सोत्रि
बराच जुना धागा आहे हा. चाफा यांच्या धाग्याच्या शिर्षकाशी आणी गाभ्याशी जुळणारा होता म्हणून सहजच आठवण झाली.
असो, धन्यवाद! दारवा वरचा एक लेख तयार आहे, शुक्रवारची वाट बघतोय ;)
- (दारवांखेरीज बरेच काही सुचणारा) सोकाजी :)
11 Apr 2012 - 12:17 am | बदक
पण क्षणो-क्षणी 'तो आणि ती' च जुळतच राहतय काहीबाहीस (का असं मलाच वाटतय?)
:)
पुलेशु.
11 Apr 2012 - 12:22 am | सूड
असं काही वाचलं की मला मुंबै-पुणे-मुंबै मधलं मुक्ता बर्वेचा डायलॉग आठवतो. 'ढेकरेपासून जांभईपर्यंतच्या एकमेकांच्या सवयी समजून घ्यायला काय करायचं, तर लग्न? '