जा दिल्या घरी तू सुखी रहाच्या चालीवर.....
मुळा मुठा या डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ
जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा.
वटवट ही तुझी आठवता बाळा
तरूणपण आले खाता चिकन मसाला
आठवले पराठे सारे, गहिवरले आत्मेऽऽऽ
कढ कढीचे तुला सांगती जा...
दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा....
दारात उभी राहिली तुझी बुलेट दुचाकी ती.
बघ डोळे मित्रांचेऽऽऽ तुझ्याच जाण्यावरती..
पुस रे डोळे या फडक्याने लपव ही गाडी
गाडी येथे तू मला ठेऊनी जाऽऽऽऽऽ.....
दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा....
साहेब तू रे आयटी हमालांचा मानाचा
हसतील ती पंजाबी, बंगाली जाटेऽऽऽऽऽ.
बघू नकोस मागे मागे वेड्या बघ पुढे ऽ
नकोस विसरू परी खादाडीला जा...ऽऽऽऽ.
मुळा मुठा डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ
जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा.
दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा...ऽऽऽऽऽ.
जयंत कुलकर्णी....
प्रतिक्रिया
6 Apr 2012 - 10:23 am | मोदक
:-D
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखीव... बूच मारू नये.
याचा अर्थ काय हे खवत विचारावे. :-)
6 Apr 2012 - 11:00 am | पैसा
.
6 Apr 2012 - 11:09 am | तुषार काळभोर
बूच!!!
6 Apr 2012 - 8:44 pm | मोदक
नो कॉमेंट्स..! :-)
6 Apr 2012 - 10:24 am | मी-सौरभ
मस्त :)
(तुमचा पंखा)
6 Apr 2012 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्सही.
-दिलीप बिरुटे
6 Apr 2012 - 10:26 am | इरसाल
छान लिहिलेय काका.
मोदका दरवेळेस बाटली अशी उघडी का बरे ठेवुन जातोस ?
6 Apr 2012 - 10:29 am | अन्या दातार
झक्कास!
6 Apr 2012 - 10:33 am | पियुशा
मस्त :)
6 Apr 2012 - 10:41 am | कपिल काळे
छान छान !!
6 Apr 2012 - 10:43 am | पैसा
मनोबा, आता काही शंका बाकी राहिल्यात का?
6 Apr 2012 - 10:54 am | मी-सौरभ
काकू: हे बरोबर नाही आपला तो मोदक अन दुसर्याचा तो सौरभ :(
धिस इज नॉट फेअर
6 Apr 2012 - 11:01 am | पैसा
खूश आता?
6 Apr 2012 - 1:41 pm | मी-सौरभ
पैसा काकू झिंदाबाद!!
पैसा काकू झिंदाबाद!!
पैसा काकू झिंदाबाद!!
पैसा काकू झिंदाबाद!!
पैसा काकू झिंदाबाद!!
आता तुम्ही खूष का? ;)
6 Apr 2012 - 2:45 pm | सूड
सारखं झिंदाबाद झिंदाबाद काय लावलंय, अमर रहे पण म्हणा ना !!
6 Apr 2012 - 7:41 pm | पैसा
मी अजून जिती आहे! मेल्यानंतर "अमर रहे" म्हण हवं तर. इथल्या आत्म्याना पण म्हणू शकतोस "अमर रहे!"
6 Apr 2012 - 4:43 pm | मृत्युन्जय
झिंदाबाद या शब्दाचा अर्थ "जो झिंदा (जिंदा) असतानाच कामातुन बाद होतो तो " असा आहे असा माझा बरीच वर्षे समज होता.
6 Apr 2012 - 10:46 am | प्यारे१
अगदीच हृदयस्पर्शी नि भावनाप्रधान (ह्या एकच आहेत) काव्य!
6 Apr 2012 - 10:57 am | जयंत कुलकर्णी
धन्यवाद !
6 Apr 2012 - 11:36 am | पिंगू
हाहाहा... मनोबा तुझ्या वारीवर विडंबनाची पोळी शेकली गेली आहे आणि पोळी खरपूस भाजली गेली आहे.
- पिंगू
6 Apr 2012 - 12:03 pm | मुक्त विहारि
आमचा दंडवत स्वीकार करा...
6 Apr 2012 - 12:35 pm | सूड
हा हा हा मस्तच !!
6 Apr 2012 - 1:13 pm | प्रचेतस
काका तुम्ही सुद्धा. :)
झकास.
आता मनोबा दिल्या गावी नक्कीच सुखी राहील.
6 Apr 2012 - 2:06 pm | जयंत कुलकर्णी
घोळ मिटेपर्यंत हा प्रेतिसाद स्थगित ठेवलेला आहे.
घोळ : बुलेटचे मालक आणि दिल्लीला चाललेले हे एकच नाहीत असे काहींचे म्हणणे आहे..........
6 Apr 2012 - 3:00 pm | प्रचेतस
हो.
बुलेटचे मालक मनराव आहेत आणि दिल्लीवाले मन१ आहेत.
फुकट विकेट उडाली विचार्या मनोबाची. :)
6 Apr 2012 - 3:08 pm | मनराव
माझ्या कडे बुलेट आहे पण मि दिल्लीला चाल्लो नाहिये........
मन१ कडे आहे कि नाही माहिती नाही.......
6 Apr 2012 - 3:44 pm | ५० फक्त
मग आता कविचे शब्द सत्य ठरवण्यासाठी तुला दिल्ली जावं लागेल किंवा मन१ ला बुलेट घ्यावी लागेल, बघा काय ते ठरवा तुम्हि.
बाकी, काका कविता मस्तच, लढाया, युद्धनीत्या, प्रेतं वगैरे मधुन बाहेर पडल्याबद्दल धन्यवाद.
6 Apr 2012 - 3:59 pm | जयंत कुलकर्णी
मन १ लवकरच बुलेट घेतील हा आमचा त्यांना खास आशिर्वाद !
तसेच या घोळामुळे हे विडंबन सपशेल आपटले आहे असे जाहीर करतो...........अरेरे ! गोंधळात गोंधळ झाला की राव !
असो दोघांचीही आता क्षमा मागावी लागणार, नाहीतर एकावरच भागले असते.............
6 Apr 2012 - 3:59 pm | मनराव
मन१, घेऊन टाक रे एकदाची.......विडंबन सार्थकी लागेल......
6 Apr 2012 - 8:28 pm | मोदक
>>>तसेच या घोळामुळे हे विडंबन सपशेल आपटले आहे असे जाहीर करतो..
फक्त इतक्या क्षुल्लक कारणाने विडंबन आपटले असे समजू नका हो...
मनोबा.. काढ रे अजून एक धागा.. आणखी थोडा चान्स दे बघू.. ;-)
6 Apr 2012 - 1:34 pm | सुहास..
यु टू
6 Apr 2012 - 4:36 pm | स्मिता.
:D
6 Apr 2012 - 5:47 pm | रेवती
खी खी खी.
जयंतकाकांना खरंच वैट वाट्टय.;)
6 Apr 2012 - 8:54 pm | जयंत कुलकर्णी
मला वाईट वाटतय की मी दोघांना एकच समजलो त्याचे.... लक्ष नाही दुसरे काय ..........
6 Apr 2012 - 6:06 pm | यकु
खॅखॅखॅ
=)) =)) =))
लै मज्जा आली.
6 Apr 2012 - 7:07 pm | जयंत कुलकर्णी
तुझा जीव कशात आहे रे ? पिरगाळूनच टाकतो त्या पक्षाची मुंडी.............
-चांदोबा मोड ऑफ -
6 Apr 2012 - 7:31 pm | यकु
हाहाहाहा
माझा जीव चिमणीत आहे ;-)
कुठे उडालीय ती चिमणी राम जाणे :p
6 Apr 2012 - 8:56 pm | जयंत कुलकर्णी
असो ! पण मन-१ यांच्या कडे बुलेट आहे आणि ते पुरंदरला गेले होते असे समजून वाचा. हाकानाका. आणि ते काय घेऊ शकणार नाहीत का ?.......
:-) :-) :-)
7 Apr 2012 - 12:50 am | मी-सौरभ
'मन१' ३/४ पँट घालून बुलेट वर कॅडबी खात दिल्लीला निघालाय अन मागे बसून चौरा काका फुग्यात हवा भरतायत असे चित्र डोळ्यासमोर येऊन अंमळ मौज वाटली ;)
7 Apr 2012 - 5:56 am | सूड
बुलेट नाही मग हे थोडं मोडिफाय केलेलं जमतंय का बघा बरं !!
दारात तुझी थांबली दुचाकी गाडी
बघ मित्र थांबले सगळे सारुनिया काडी
मिट तोंड रे या सदर्याने काढू देत खोडी
भीक नको रे तयां घालू तू जाऽऽऽ
जा मनोबा दिल्लीमधी तू सुखी रहा...
8 Apr 2012 - 12:05 pm | मन१
पण काकांचा शब्द खाली पडता उपयोगी नाही.
शक्य तितक्या लवकर वरील धाग्यात उल्लेख केलेली बुलेट आमच्याकडे पोचती करा म्हणाव मनराव ह्यांना.
;)
8 Apr 2012 - 10:23 pm | अत्रुप्त आत्मा
8 Apr 2012 - 10:59 pm | अन्या दातार
हेल्मेट का नाही?
आरसी बुक दाखवा.
पीयुसी दाखवा.
लायसन्स आहे का?
बाकी सगळं असलं तरी हेल्मेट नाही म्हणून २००/- दंड भराच. पावती फाडू की..... (पुढे बोलायची गरज आहे? सूज्ञ आहात तुम्ही)
9 Apr 2012 - 10:55 am | गवि
कृ हे वाचा ..